लेखात दिलेला दुवा(link) हा नविन खिडकीत कसा उघडावा ?

1) संगणकाच्या उंदरावर(माऊस) उजवी टिचकी मारून 'नव्या खिडकीत उघडा' हा पर्याय निवडा.

२) दुव्यावर उंदराने टिचकी मारताना डाव्या हाताने शिफ्ट बटन दाबून ठेवायचे, दुवा नव्या खिडकीत उघडतो.

प्रतिक्रिया

तसेच फायरफॉक्स मध्ये किंवा IE7 मध्ये नवीन टॅब मध्ये उघडण्यासाठी, दुव्यावर उंदराने टिचकी मारताना कंट्रोल (CTRL) दाबून ठेवायचे.

दुव्यावर टिचकी मारल्यावर बाय डिफॉल्ट नवीन खिडकी उघडावी या करता दुवा जोडताना href="http://abc.def" च्या पुढे आणि "ग्रेटर दॅन"ने कंस बंद करण्याआधी target="blank" लिहावे.

उदाहरणार्थ, lt a href="http://youtube.com" target="blank" gt युट्युब lt /a gt
असं लिहिल्यास "युट्यूब" या शब्दाशी youtube.com चा दुवा निर्माण होईल आणि तो नव्या खिडकीत उघडेल.

(gt आणि lt ऐवजी लेस दॅन, ग्रेटर दॅनचा कंस वापरावा. एचटीएमएलचा कोड जसाच्या तसा दिल्यास दिसणार नाही म्हणून हा प्रपंच)

आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई