दादोजी कोंडदेव

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
23 Dec 2010 - 8:01 pm
गाभा: 

पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला.

लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्‍वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा.

सकाळ पेपरातली बातमी

प्रतिक्रिया

शक्यता नाकारता येत नाही.

स्वानन्द's picture

23 Dec 2010 - 8:34 pm | स्वानन्द

हेच म्हणणार होतो :)

शक्यता नाकारता येत नाही
- कसले कस्ले कंद

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 8:37 pm | नरेशकुमार

कोन दादोजी कोंडदेव ?

सुहास..'s picture

23 Dec 2010 - 8:50 pm | सुहास..

लेख : दादोजी कोंडदेव
लेखक : अविनाश कुलकर्णी (नेहमीचेच यशस्वी कलाकार.)
प्रकाशक : वापर फूकाची बॅन्डविड्थ प्रकाशन, पुणे - ३०
शब्द : अदांजे शंभर (मोजले तर त्याच्या ही खाली निघतील.)
ओळी : मीटर लावुन पाच
विषय : इतिहास/ टिआरपी खेचणारा/ आधीच चावुन चोथा झालेला.

आज पुणे महापालिकेत , सर्वसाधारण सभेमध्ये , दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवुन, त्याएवजी शहाजीराजांचा पुतळा बसवावा याकरिता ५४ विरुध्द ३७ अश्या बहुमताने मंजुरी दिली. खर तर इथेच स्वच्छपणे दिसत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी ब्रिगेडला झुकते माप दिले आहे. (सर्वात मोठा मूर्खपणा हा आहे की दादोंजीच्या पुतळ्याचे काय करणार हे आमसभेने सांगीतले नाही. बघतील कुठलातरी कोपरा नंतर .) असो . या विषयावर मिपावर आधीच चर्चा झाली असल्याने(आणि त्यातुन काहीही निष्पन्न नाही झाल्याने) पुन्हा शिळ्या कढीला उत का आणला गेला असावा मला एक प्रश्न पडला आहे (खर तर खाजवुन खरुज का काढली आहे असे दोन मिनीटे मला वाटुन गेले. )

धन्यवाद.

टारझन's picture

23 Dec 2010 - 9:02 pm | टारझन

पुलंचे गटणॅ आठवले :) गटणेंकडे प्रतिसाद टंकायला भरपुर वेळ

बाळटारु आलास परत.?
बेट्कुळ्या किती फुगल्या पाहु बर.

दाखवल्या असत्या , पण मिसळपाव वर आमच्या पेक्षा मोठ्या असणार्‍यांना काँप्लेक्स यायची शक्यता नाकारता येत नाही ;)

- गणिल

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 11:55 am | llपुण्याचे पेशवेll

अहो पण त्यांच्या बेटकुळ्या तुमच्यापेक्षा मोठ्या असतील तर त्यांना कॉप्लेक्स कसा येईल. :)
असो. पण तुम्ही म्हणता आहात तर शक्यता नाकारता येत नाही.

वेताळ's picture

23 Dec 2010 - 9:02 pm | वेताळ

त्यामुळे जपुन शब्द वापरा.

तिमा's picture

23 Dec 2010 - 9:05 pm | तिमा

शिवाजी महाराज यासारख्या थोर व्यक्तिसंबंधात कुठल्याही प्रकारची चर्चा करु नये. हा विषय पूर्वीच झाला असल्यामुळे अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करावे.

अविनाशकुलकर्णी's picture

24 Dec 2010 - 12:04 am | अविनाशकुलकर्णी

शिवाजी महाराज हा मुद्दा कॉंग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेकडून शिताफीने हिसकावून घेतला....
मराठीचा मुद्दा राज साहेबांनी हाय जॅक केला

शिवसेनेच्या पेटंट चा पिरियड संपला..

नविन भावनात्मक मुद्दा शोधावा लागणार...नाहितर जना धार घसरेल.

कॉंग्रेस+ मनसे..... व राष्ट्रवादी+ शिवसेना हि नविन समीकरणे होणार का?

दादांनी बिहार पॅटर्न चे सुतोवाच केलेच आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 1:39 am | निनाद मुक्काम प...

हा मुद्दा आहे का हिंमत कोणात हिसकून घ्यायची
(अफजल खानाचा धडा पाठ्य पुस्तकात परत आणण्याची )
तेव्हा परत एकदा जुना खेळ
गर्व से कहो ..........

टारझन's picture

24 Dec 2010 - 11:02 am | टारझन

कॉंग्रेस+ मनसे..... व राष्ट्रवादी+ शिवसेना हि नविन समीकरणे होणार का?

शक्यता नाकारता येत नाहि.

-अनिल

अविनाश कदम's picture

24 Dec 2010 - 2:16 am | अविनाश कदम

ठाण्याचे अ.भा.मराठी साहित्य संमेलन वाचवण्यासाठी आता दादोजी कोंडदेव स्टेडीयम चे नावही बदलायचे काय?
पुणे महापालीकेतील सेना-भाजपचे नगरसेवक काय करीत होते.?
शिवाजी व संभाजी दोघेही हातातून गेले कोनदेव व रामदास हाताशी राहिलेत त्यांना तरी धरून ठेवायला नको का?
बाबासाहेब पुरंदरेंचं काय करायचं?

rajeshkhilari's picture

24 Dec 2010 - 7:51 am | rajeshkhilari

संभा बि-ग्रेडच्या रूपाने महाराष्ट्रात फोफावत असलेला सांस्कृतीक व राजकिय आतंकवादाला सडेतोड विरोध करा. आज जर या अतिरेकी टोळीला विरोध केला नाही तर महाराष्ट्राची एकता, जातीय व धार्मीक एकता, जज्वलनतेस व सार्वभौम मराठी इतिहासाचे विकृतीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. संभा बि-ग्रेड जातीय राजकारण खेळत महाराष्ट्राचा खरा इतिहास पुर्ण बदलून स्वत:च्या सोयीचा महाराष्ट्राच्या घशात उतरवू पाहत आहे. त्यांचा संपुर्ण व अखण्ड महाराष्ट्र आणि मराठी समाज जाहीर निषेध ! निषेध ! निषेध करतो.

पंगा's picture

24 Dec 2010 - 9:59 am | पंगा

...तर महाराष्ट्राची एकता, जातीय व धार्मीक एकता, जज्वलनतेस व सार्वभौम मराठी इतिहासाचे विकृतीकरण झाल्याशिवाय राहणार नाही.

अधोरेखित शब्दाचा अर्थ समजला नाही.

धन्यवाद.

आम्हाघरीधन's picture

24 Dec 2010 - 8:27 am | आम्हाघरीधन

आज जर या अतिरेकी टोळीला विरोध केला नाही तर महाराष्ट्राची एकता, जातीय व धार्मीक एकता, जज्वलनतेस व
सार्वभौम मराठी इतिहासाचे विकृतीकरण झाल्याशिवाय राहणार नाही.

(अगदी योग्य प्रतिक्रिया)....................................... चालु द्यात.......

अजुन कोणत्या टोळ्या आहेत त्यांची पण यादी द्या....

अमोल केळकर's picture

24 Dec 2010 - 9:44 am | अमोल केळकर

संभाजी ब्रिगेड्चे मत काहीही असो. 'जाणता राजाचे प्रयोग होवोत न होवोत, ठाण्याच्या स्टेडिअम चे नाव काहिही असो आमच्यासाठी शिवाजी महाराजांचे गुरु दादोजीच होते !!

अमोल केळकर

मैत्र's picture

24 Dec 2010 - 9:49 am | मैत्र

गेली साधारण दोन वर्ष आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि माहितीपूर्ण लेखाची वाट पाहतोय. त्यातली थोडी फार मिळाली तर बाकी यादी पाहू...
लाल महालात शहाजी राजांचा पुतळा लावणं उत्तमच. जिजाऊंचा असता तर जास्त योग्य ठरलं असतं स्थळाच्या संदर्भाने.
महालातून शिल्प काढण्याने पुण्याच्या संस्कृतीत काय हातभार लागणार आहे आणि असल्याने काय तोटा होणार आहे
ते राष्ट्रवादी आणि ब्रिगेडच जाणे...

पण उकरून काढण्यात पटाईत आहेत हे मात्र खरं...

ऋषिकेश's picture

24 Dec 2010 - 11:10 am | ऋषिकेश

:tired:

रामजोशी's picture

25 Dec 2010 - 4:18 pm | रामजोशी

ब्राह्मणांनी या साठी ताबडतोब ओबामाकडे अर्ज करावा. नाहीतरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे आमच्या पुढार्‍यांनी सांगितले आहेच. आणि त्यांचे या भुमीवरचे अवतारकार्य संपल्यात जमा आहे.

छोडो महारष्ट्र ! छोडो भारत !
जय शरद पवार ! जय अजितदादा.

खरंतर संभाजी ब्रिगेड इ. दादोजी कोंडदेव विरोधकांनी ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते हे सिद्ध करावे. हुल्लडबाजी करून इतिहासाचा मुद्दा सोडवता येत नाही..
दादोजी कोंडदेव हे शहाजी राज्यांच्या विश्वासातील पुणे परगण्याचे कारभारी होते अशी नोंद आहे. म्हणून जिजाऊ महाराज व शिवाजीराजांचा कारभार ते सांभाळत होते. यापलिकडे त्यांनी शिवाजी महाराजांना कसले शिक्षण दिले व कसे लढायचे ते शिकवले वा त्यांच्यावर स्वराज्याचे संस्कार वगैरे केले इ. बाबत खरोखरच पुरावा नाही. तरी नेमकी कधी व कोणी त्यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणायला सुरूवात केली याचा अभ्यासू पद्दतीने शोध घेणे भाग आहे. रामदास व शिवाजी महाराजांची भेट झालेली नव्हती हे न.र. फाटकांनी पुराव्यानिशी सिद्ध केले होते.
सोन्याचा नांगर वगैरे दंतकथा व अंधश्रद्धा आहे. सोन्याचा नांगर फिरवून शेतीत भरभराट होत असेल तर आत्महत्या करणार्‍या सर्व शेतकर्‍यांना शासनाने सोन्याचा नांगर बक्षिस द्यावा. ( पीपली लाइव्ह मधील ‘लालबहादूर’ सारखा) खरं तर शिवाजी महाराजांविषयी अंधश्रद्धा पसरवणारे हे शिल्पच चुकीचे आहे. शिवशाहीच्या इतिहासात अशा अनेक महान घटना आहेत ज्याचे चांगले शिल्प बनवता येईल.

रामजोशी's picture

26 Dec 2010 - 9:19 am | रामजोशी

आम्ही पुरावा आमच्याबाजूने असेल तरच मानतो आणि मानणार. पुराव्यावर काय अवलंबऊन असते ? आता जेम्सलेनने सुध्दा पुरावा सादर केला तर आम्ही तो मानावा काय ? खरंतर महाराजांनी ब्राह्मणांना त्यांच्या मंत्रिमंडळात बहुसंख्येने सामील करून आमच्या शिवधर्माचा विश्वासघातच केला आहे. त्याची दाद कुठे मागावी असा आमच्या संघटनेत विचार चालू आहे. ते ठरताच, बहुदा आम्ही शहाजीराजांना देशद्रोही ठरवायचा ठराव मांडू व तो मंजूर करू, म्हणजे आमच्या पुढच्या पिढ्यांना मजबूत पुरावा मिळेल आणि तुमच्या सारख्या सुर्याजी पिसाळांना ते उत्तर देऊ शकतील.

अविनाश कदम's picture

28 Dec 2010 - 12:17 am | अविनाश कदम

पुराव्याच्या आणि अभ्यासाच्या जोरावर सुर्याजी पिसाळांना उत्तर देण्याची गरजच नाही. आपल्या गुढग्यांना तेव्हढा ताण सहन होणार नाही. गुढगे खाजवून सुद्धा उपयोग नाही. पुणे महापालिकेत जे केलं तीच आपली उत्तर देण्याची खरी मेथड.
आता शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा जिजामाता यांचे कर्तृत्व मागेच पडेल कदाचीत,. “दादोजी कोंडदेव झिंदाबाद!” हीच आपली नवी घोषणा आहे. कदाचित सगळा शिवशाहीचा इतिहास दादोजी कोंडदेवांनीच घडवला असा नवा इतिहास आपण पुढे आणू.

वेताळ's picture

26 Dec 2010 - 9:54 am | वेताळ

अजुन एक ठाण्यातील मराठी साहित्य संमेलनात असाच आशा जोशी नावाच्या संपादिकेने इतिहास बदलण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
त्यानी चक्क स्मरणिकेत नथुराम गोडसे ह्याना लेखक असे संबोधुन ते महात्मा गांधीचे कट्टर चाहते होते असे लिहले आहे. त्यावर कडी म्हणजे त्यानी "ए मॅन ए महात्मा " असे महात्मा गांधीच्यावर पुस्तक देखिल लिहले आहे, असे छापले आहे. ह्यावर आपले मत काय?

स्वानन्द's picture

26 Dec 2010 - 10:39 am | स्वानन्द

वेगळा काथ्याकूट करा त्यावर...

पिवळा डांबिस's picture

26 Dec 2010 - 11:00 am | पिवळा डांबिस

पाहिजे तर तिथे मराठी साहित्य संमेलन करा नाय तर करु नका!!! संमेलन गेलं तेल लावत!!!!
ठाणेकरांचं भवितव्य त्यावर अवलंबून नाहिये!!!!
पण स्टेडियमला नांव "दादोजी कोंडदेवां"चंच पाहिजे!!
मग ते कोणाचे गुरू असले-नसले तरी हरकत नाही!!!
समस्त ठाणेकरांच्या इच्छेने ठेवलेलं नांव आहे ते!!!! आणि इतकी वर्षे अबाधित चाल्लंय ते!!!!
हे कोण उपरे ते बदला म्हणून सांगणारे?
आणि वरती प्रबोधनकारांचं नांव देणार म्हणून मखलाशी करतायत! कारण शिवसेनेचा आणि मनसेचा विरोध सोसायला नको म्हणून!!!
अरे आदरणीय स्व. प्रबोधनकारांच्या नांवाने नवीन स्टेडियम उभं करू!!! त्यासाठी ह्यांच्या वकिलीची गरज नाही!!!!
-नीरक्षीरविवेक राजहंस

छोटा डॉन's picture

26 Dec 2010 - 11:40 am | छोटा डॉन

पाहिजे तर तिथे मराठी साहित्य संमेलन करा नाय तर करु नका!!! संमेलन गेलं तेल लावत!!!!
ठाणेकरांचं भवितव्य त्यावर अवलंबून नाहिये!!!!
पण स्टेडियमला नांव "दादोजी कोंडदेवां"चंच पाहिजे!!
मग ते कोणाचे गुरू असले-नसले तरी हरकत नाही!!!
समस्त ठाणेकरांच्या इच्छेने ठेवलेलं नांव आहे ते!!!! आणि इतकी वर्षे अबाधित चाल्लंय ते!!!!
हे कोण उपरे ते बदला म्हणून सांगणारे?
आणि वरती प्रबोधनकारांचं नांव देणार म्हणून मखलाशी करतायत! कारण शिवसेनेचा आणि मनसेचा विरोध सोसायला नको म्हणून!!!
अरे आदरणीय स्व. प्रबोधनकारांच्या नांवाने नवीन स्टेडियम उभं करू!!! त्यासाठी ह्यांच्या वकिलीची गरज नाही!!!!

+१, १००% सहमत.
ह्यापेक्षा अजुन जास्त बोलण्यासारखे काही रहात नाही. :)

- छोटा डॉन

रामजोशी's picture

26 Dec 2010 - 10:23 pm | रामजोशी

तुम्ही तेल लावा, आम्ही आग लावू.
तेल लावणार्‍यांना कोण विचार्तय ? ठाणेकरांना भवितव्य आहे का याचीच आम्हाला शंका आहे. आणि स्टेडियम्ला कोण चाटतय ? आम्ही त्यांचे नाव इतिहासातून पुसायला निघालोय. काही दिवसानी आमचीच पुस्तके बाजारात दिसतील व मिळतील. थेरड्यांना कोण विचारणार ? त्यांची पुस्तके बाजारात मिळाली तर प्रश्न येतो. ते शे दोनशे रुपायांचा खोटा इतिहास व नाटके कोण बघणार ? आमची पुस्तके आम्ही फुकट वाटू, शेवटी जाणत्या राजांचा आणि त्यांच्या पुतण्यांना पैशाचे काय करावे हा प्रश्न पडलाय. यांच्यासारखे द्ळिद्री नाही आमची संघटना आणि धर्म. अहो अलेक्संडरसुध्दा आमच्या धर्माचे पालन करत होता... यांना कोण विचार्तोय ...

आज पुतळा आहे उद्या माणसे आहेत.. हे लक्षात ठेवा.

पिवळा डांबिस's picture

26 Dec 2010 - 11:54 pm | पिवळा डांबिस

हाहाहा! भलतेच विनोदी विचार!!!!
पुस्तकं फुकट वाटून जर लोकांचे विचार बदलता येत असते तर आज भारतात सगळे लोक ख्रिस्ती झाले असते....
इंग्रज अमदानीत मिशनर्‍यांनी दीडशे वर्षे काय कमी प्रयत्न केले?
असो. आम्हाला मुंबई-ठाण्यापुरता इंटरेस्ट, इतरत्र तुम्ही कायपण करा. तो तुमच्या आणि तिथल्या लोकांमधला प्रश्न!!!

रामजोशी's picture

27 Dec 2010 - 8:55 pm | रामजोशी

आहो तेव्हा वाचता येणार्‍या लोकांच्या संख्येच्या तुलनेत बरेच लोक ख्रिस्ती झालेच की.
तेव्हा आम्ही आशावादी आहोत.

आत्ताच हाती आलेल्या बतमीनुसार, आमचा पहिला विजय झालेला आहे. आमचे एक थोर नेते यांनी म्हटलेच आहे की या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करणार. त्याचीच पहिली पायरी समजा ही.

इसको तो हटाया, अब आदमी बाकी है !

सुहास..'s picture

27 Dec 2010 - 10:16 pm | सुहास..

इसको तो हटाया, अब आदमी बाकी है ! >>>>

अच्छा !! याला " शिवधर्म " म्हणतात व्हय !! मी इतके दिवस काहीतरी वेगळच समजत होतो.

हुप्प्या's picture

27 Dec 2010 - 10:31 pm | हुप्प्या

शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात सगळ्या जातीधर्माच्या लोकांचे आदरस्थान आहे. त्यांचे कर्तृत्व हे त्यांचेच आहे. त्यांचे सहकारी, त्यांच्या सहवासातल्या ज्येष्ठ व्यक्ती यांनी त्यांच्यावर प्रभाव पाडला असला तरी कर्ते करविते तेच आहेत ह्याविषयी सामान्य जनात कुठे संभ्रम नव्हता.
परंतु अशा देवतुल्य, सर्वमान्य व्यक्तीला जातीच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षेपायी असे गलिच्छ राजकारणात आणल्याबद्दल वाईट वाटते.
एखाद्याने देव्हारा सजवला असावा आणि कुण्या विघ्नसंतोषी माणसाने घाणीने बरबटलेले पाय त्या देवघरात नेऊन त्याची नासधूस केल्यासारखे वाटते.
ज्यांना दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरू वाटतात त्यांनाही दादोजींचे कर्तृत्व महाराजांइतके आजिबात वाटत नाही.
बहुधा आता पुढची मोहीम कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याविरुद्ध निघावी. अफझलखान हा एक सुस्वभावी, मनमिळावू आणि प्रेमळ माणूस होता आणि त्याच्या सगळ्या मोहिमेचा कर्ताकरवता कृष्णाजीच होता असा नवा धडा टाकायला हरकत नाही.
तदनंतर शिवकालीन कायस्थही कसे वाईट होते असा इतिहास लिहिला जावा. त्यानंतर ओबीसीचा नंबर!

थोरल्या ठाकर्‍यांच्या पश्चात शिवसेना संपणार हे नक्की आहे. पण अशा मुद्यांवर लढणारी केवळ शिवसेनाच आहे हे लक्षात घेतले की आता पुढे काय काय वाढून ठेवले आहे याविषयी कुशंका येतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Dec 2010 - 12:50 am | निनाद मुक्काम प...

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी
ह्यांनी अफजल खानाला महाराजांना भेटायला प्रतापगडावर या (महाराज घाबरले आहेत ) असे पटवून देऊन मृत्युच्या तोंडात दिले .म्हणून अफजल प्रेमी संघटना व पक्ष ह्यांनी खरे तर ह्यांच्या निषेधाचा फतवा काढावा
प्रथम पुतळा बनवावा मग तो काढून ध्यावा .
बाकी त्या कुलकर्ण्याशी ह्या कुलकर्ण्याचा संबंध नाही .
मुक्काम पोस्ट निनाद कुलकर्णी