टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
स्त्रीमुक्ती आणि 'ते' कुटुंब
आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. स्त्रियांनाही त्यांच्या पद्धतीने जगण्याचा, त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे असे मानतो.
मी मानतो या शब्दावर उगीच जोर देत नाहीए. आज मी एक अशी एक अक्षरश: खूप दु:खद आणि मन विषण्ण करणारी एका परिवाराची(!!!!!!!) कथा ऐकली. यातून काही प्रश्न मला येथे मांडावे वाटले ते मी येथे शेवटी मांडेनच. मिपाकर नेहमीप्रमाणेच त्यांची उत्तरे देतील ही रास्त अपेक्षा..............
तर हे कुटुंब मुळचे कोकणातले, पण कोल्हापुरचे राहणारे. घरात माणसे तीन. एक गोड मुलगी, आई, आणि वडील. मुलगी इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षात शिकणारी, आई बँकेत चांगल्या हुद्द्यावर. वडीलांबद्दल नक्की माहिती नाही. घरात बर्यापैकी पैसा आहे.(हा एक निष्कर्ष आहे. कारण त्याशिवाय मोबाईल आणि गाडी मुलीला दिली नसती.) मध्यमवर्गीय असे हे कुटुंब.
माझी आणि त्या मुलीची ओळख एका सामाजिक कार्यक्रमामुळे झाली होती.(तेंव्हा मला हे काहीच माहित नव्हते. आज त्याचे मला आश्चर्य वाटते. तिचा अशा ऍक्टीव्हिटीमधला सहभाग ही किमया तिच्या मैत्रिणींची. हॅट्स ऑफ!!!!!) त्यानिमित्ताने माझे आणि तिचे अनेकदा बोलणे होत असे. असेच काही कामाकरता मला तिच्याशी बोलायचे होते. ती तेंव्हा कॉलेजलाच येत नसल्याचे कळल्याने मी फोन करत असे आणि माझा कॉल ती कट करत असे. मला राग आला. मी फुकटच्या गप्पा मारायला नक्कीच फोन करीत नसे; मग मला टाळायचे कारण काय? याचे कारण उमजून घेण्यासाठी मी तिच्या मैत्रिणीला त्याचे कारण विचारले. तिने जी माहिती पुरवली ती ऐकून मी गारच झालो. आमचे संभाषण खाली देत आहे
मी: 'ती' माझा फोन का कट करते? काही प्रॉब्लेम आहे का?
तीची मैत्रिण: नाही. प्रॉब्लेम काहीच नाही. पण तिच्या घरच्यांना तिने मुलांशी बोललेले आवडत नाही.
मी: काय??????(मी अवाकच!!!!!!!)
तीची मैत्रिण: पण खरंच हेच कारण आहे.
मी: मग वर्गातली मुले वगैरे तिच्याशी बोलतात हे सुद्धा माहित नाही?
तीची मैत्रिण: अगदी मोजून २ मुलांची नावे घरात माहित आहेत.
मी: असं का?
तीची मैत्रिण: असंच ते. तिने स्वत:भोवती एक अनामिक वर्तुळ आखून घेतलंय ज्याच्या बाहेर ती कधी विचारच करत नाही. मी अनेकदा तिला त्यातून बाहेर पाडायचा प्रयत्न केला आहे. पण ती काही बधत नाही.
मी: बोंबला. समजा एखाद्या मुलावर तिचे प्रेम बसले तर???????(माझा एक सहज प्रश्न)
तीची मैत्रिण: शक्यच नाही. तसं होणंच शक्य नाही.
मी: समजा एखाद्या मुलाचे तिच्यावर प्रेम बसले तर?
तीची मैत्रिण: ती नक्कीच नाही म्हणेल. प्रेम, स्वातंत्र्य, मोकळेपणा या गोष्टी तिच्या गावीच नाहीत. समाजात मिळून मिसळून राहणे हे तिला माहितच नाही. वाटलं तर खूप काही बोलत बसेल; नाहीतर अजिबातच बोलणार नाही.
मी: मग तिच्या नवर्याबद्दल तरी काय अपेक्षा आहेत?(माझे फक्त कुतुहल)
तीची मैत्रिण: काही नाही. फक्त तिची काळजी घेणे आणि तिला महत्त्व देणे........
माझं बोलणंच खुंटलं..............
आज २१व्या शतकात मुलींवर अशी बंधने सुशिक्षित समाजाही घालत आहे हे ऐकून मला गलबलून आले. हा एक सामाजिक प्रश्न असू शकतो.
१] खरेच, पालकांनी मुलांवर्/मुलींवर काही प्रमाणात बंधने घालावित वगैरे जरी खरे आणि गरजेचे असले तरी हा मार्ग कितपत अनुसरणीय आहे?
२] या बंधनांमागे पालकांची काय मानसिकता असू शकते? काही तर्कसुसंगत विचार असेल का?/ आहे का?
३] अशा मुली कोणा सोम्यागोम्याच्या भूलथापांना बळी पडून पळून जायची शक्यता नाकारता येईल? कारण अशी मुले/मुली एका स्वप्नवत जगात जाण्याची अपेक्षा धरुन काहीही करायच्या (अ)विचाराप्रत येऊ शकतात.
४] अशा मुला/मुलींना त्या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे स्वत:च्या वर्तुळातून बाहेर काढण्यासाठी काय करावे? त्यांच्या मित्र्-मैत्रिणींनी याकरता त्यांचे प्रबोधन कसे करावे?
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


अपूर्ण माहिती
मी: मग तिच्या नवर्याबद्दल तरी काय अपेक्षा आहेत?(माझे फक्त कुतुहल)
तुमचे कुतुहल आणि सहज प्रश्न फार सूचक वाटतात बॉ....
तीची मैत्रिण: काही नाही. फक्त तिची काळजी घेणे आणि तिला महत्त्व देणे........
माझं बोलणंच खुंटलं..............
आता यात बोलणं खुंटायसारखं काय आहे ? हे सगळ्याच स्त्रियांना वाटतंच.... त्यात चूक काय आहे? सगळ्या नवर्यांना सुद्धा असं वाटतं की त्यांच्या बायकांनी त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना महत्त्व द्यावं... त्यावरून तिला बन्धने आहेत, स्ट्रेस आहे हे कसे कळावे वाचकांना??
___________________________________________________
१.एखाद्या गणितात अपूर्ण माहिती असली की कसे वाटते, तसे माझे झाले आहे... ती सुखी आहे की दु:खी आहे हे तिच्याकडून कळणे महत्त्वाचे...
तुमच्या गोष्टीतील आईबाप मुलीला एक्झॅक्टली काय त्रास देत आहेत हे कळले नाही की जे समजल्यामुळे मन विषण्ण होईल, आणि दु:खात बुडेल....गलबलून ये ईल...
२. आम्ही फार पूर्वी कॉलेजात असताना आम्हास मिळालेले सल्ले...शक्यतो मुलींच्या घरी फोन करू नयेत, ( हल्ली मुले वायफळ गप्पांसाठी मोबाईलवर संदेश धाडतात. तसे करावे).. आणि तरीही ती तुमचे फोन घेत नसेल; तर तिला परत फोन करू नयेत आणि तिला विसरून जावे...
३. स्वातंत्र्याची व्याख्या काय ते आधी स्पष्ट हवे...जर मुलगी सोम्यागोम्याचा हात धरून पळून जायचीच असेल तर ती जाईलच... त्याचा स्वातंत्र्य, मुलांशी बोलणे, स्वतः भोवती वर्तुळ आखणे याच्याशी काय संबंध आहे ? जायचीच असेल तर वर्तुळातलीही जाईल आणि स्वातंत्र्यवालीही जाईलच....
उलट अति स्वातंत्र्याने सोम्यागोम्याबरोबर पळून जायची शक्यता वाढणारच...
४. मुलगी आनंदी आहे की नाही हे महत्त्वाचे... ती तिच्या वर्तुळात राहून आनंदी आहे, असेच मला ध्वनित होत आहे....
स्वातंत्र्य वगैरे फार सापेक्ष कल्पना आहेत्...ज्याला वाटत असेल की आपले कुटुंब भलतेच पुढारलेले आहे, स्वातंत्र्य देणारे आहे, त्याला सुद्धा प्रतिगामी आणि जुन्या विचारांचे मानणारे एखादे अल्ट्रामॉडर्न कुटुंब असेलच्..मुद्दा आहे की , माणूस आनंदी आहे की नाही...
५. अजून एक शक्यता म्हणजे मुलगी अत्यंत हुशार आहे आणि तिने आणि तिच्या मैत्रिणीने मिळून घरी फोन करणार्या मुलाला टाळण्यासाठी ही गोष्ट रचली आहे...
६. काहीही गरज नाहीये तिला प्रबोधन वगैरे करायची...
बन्धन
बन्धन म्हणजे काय आणि स्वातंत्र्य म्हणजे काय?
विषय....
विषय नीट उलगडला नाही.
आज २१व्या शतकात मुलींवर अशी बंधने सुशिक्षित समाजाही घालत आहे हे ऐकून मला गलबलून आले. हा एक सामाजिक प्रश्न असू शकतो.
एका कुटुंबाने बंधने घातली म्हणजे सर्व समाज तेच करतो आहे असा समज का करून घ्यावा? हे प्रातिनिधीक उदाहरण होत नाही.
१] खरेच, पालकांनी मुलांवर्/मुलींवर काही प्रमाणात बंधने घालावित वगैरे जरी खरे आणि गरजेचे असले तरी हा मार्ग कितपत अनुसरणीय आहे?
वाक्याच्या पुर्वार्धात उत्तरार्धातील प्रश्नाचे उत्तर आहे. काही प्रमाणात म्हणजे किती प्रमाणात हे पालकांच्या संस्कृतीच्या कल्पना, पाल्याच्या स्वभावातील दोष आणि काही पूर्वानुभव ह्यावर अवलंबून आहे. अर्थात ह्या बंधनांचा सकारात्मक उपयोग होणे अथवा पाल्याने बंड करून बंधने झुगारून बेछूट वागणे हे पाल्याच्या परिपक्वतेवरही अवलंबून आहे. परिपक्व पाल्याच्या हातून क्षणिक मोहापायी एखादी चूक झाली असेल आणि आपले ते वर्तन चूकीचे होते ह्याची त्याला पश्चात जाण आली असेल तर बंधनांचा सकारात्मक उपयोग होऊ शकतो.
२] या बंधनांमागे पालकांची काय मानसिकता असू शकते? काही तर्कसुसंगत विचार असेल का?/ आहे का?
तर्काचा अतिरेक असण्याची संभावना अधिक आहे. पण त्या साठी पालकांचे, तसेच पाल्याचे पुर्वायुष्य तपासावे लागेल. अकारण तर्काचा अतिरेक होत असेल तर तो दोष पालकांचा असू शकतो. (जे आपण सुचवित आहात.) पण,प्रेम, स्वातंत्र्य, मोकळेपणा या गोष्टी तिच्या गावीच नाहीत. समाजात मिळून मिसळून राहणे हे तिला माहितच नाही.. पालकांच्य बंधनापेक्षा मुलीने स्वतःवर लादलेली बंधने अधिक परिणामकारक दिसत आहेत तसेच वाटलं तर खूप काही बोलत बसेल; नाहीतर अजिबातच बोलणार नाही हे वाक्य मुलीच्या मानसिक असमतोलपणाचे द्योतक वाटते. पालकांना पूर्ण दोष देता येत नाही.
३]अशा मुली कोणा सोम्यागोम्याच्या भूलथापांना बळी पडून पळून जायची शक्यता नाकारता येईल? कारण अशी मुले/मुली एका स्वप्नवत जगात जाण्याची अपेक्षा धरुन काहीही करायच्या (अ)विचाराप्रत येऊ शकतात.
अशाच का? परिपक्वतेचा अभाव असेल तर कोणीही (मुलगा/मुलगी) समोरच्याच्या भुलथापांना बळी पडू शकतो.
४] अशा मुला/मुलींना त्या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे स्वत:च्या वर्तुळातून बाहेर काढण्यासाठी काय करावे?
समुपदेशन. पण मित्र मैत्रीणींनी नाही, कुणा जाणकार, अधिकारी व्यक्तीने.
त्यांच्या मित्र्-मैत्रिणींनी याकरता त्यांचे प्रबोधन कसे करावे?
त्यांचे म्हणजे कोणाचे? पालकांचे? मित्र-मैत्रीणींनी पालकांपासून दूरच राहावे. मैत्रीणीचे प्रबोधन करण्यासंबंधी वर उत्तर दिले आहे.
काय म्हनावे त्यांच्या टकुर्याला!
आवं, अशी मानसं अस्तातच समाजात, माहाज्या मुलीच्या वर्गात पन येक व्हती कोल्हापुरीण, थितं बी असाच परकार व्हता. आपुन मनाला लावून घिऊ नये फार, काय म्हन्ले ?