व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
4 Dec 2010 - 8:46 am

व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस..

दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान..

भेंडी गव्वार ललिता पव्वार..

ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...

हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..?

हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..?

दाद्या दाद्या खच्चून पाद्या..

एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा..

रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो.

राम मून पांडू कलर डू डाय डू..

फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड..

एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला..

मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा..

कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..?

चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा..

पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..

गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..

भाषाशिक्षण

प्रतिक्रिया

विवेक मोडक's picture

4 Dec 2010 - 8:58 am | विवेक मोडक

शाळेची आठवण करुन दिलीस मित्रा!

टारझन's picture

5 Dec 2010 - 10:50 am | टारझन

ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...

रोमांच उभे करणारे ....

- (ड्रायव्हरकाका) शिवराम गोविंद

हा हा मस्त..जुन्या गोष्टींना छान उजाळा मिळाला.
अजून एक -
एकनाथ गाडी गेली कोकणात

आमची स्काऊट ची एक आरोळी होती -
हनुमंताने केला पुल , सगळे धोंडे गेले खोल
परंतू तेही आले वर , जेव्हा त्याने लिहीले वर - राम राम राम

अजून एक आरोळी - स्काउट च्या शिबिराला म्हणायचो..तारे जमीन पर मध्ये ह्याचा काही भाग वापरला आहे एका गाण्यात
चिक रिक चिक रिक ची चाय लोलम
गुंडो लोलम वन पक वन
आक्को टक्को एटी केटी केटी को
एटी पाय एटी पाय ची चाय चो.

वर तुम्ही 'एके दिवशी फॉक्स कोल्हा....लिहीले आहे ते आम्ही असे म्हणायचो -
वन्डे एके दिवशी फॉक्स कोल्हा
गार्डन बागे मध्ये वेन्ट गेला
देअर तेथे रिव्हर नदी
वॉटर पाणी ड्रँक प्याला

इंगर्जी माध्यमातील मुलांच्या तोंडून ऐकेलेले - यल्लो यलो डर्टि फेलो
लायर लायर पॅन्ट्स ऑन फायर

पंगा's picture

4 Dec 2010 - 9:34 am | पंगा

हे नेमके का आहे?

(काय आहे ते माहीत आहे. कशासाठी लिहिले आहे?)

(अवांतरः

पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..

हो कित्येकदा ऐकलेले आहे.

तसा मी लहानपणी (आजूबाजूस पुरेशा समवयस्क मुलांच्या अभावी) बहुधा मुलींत खेळत असे (शाळा-शाळा, घर-घर, बाहुलाबाहुलीचे लगीन*, वगैरे वगैरे... तेवढे डॉक्टर-डॉक्टर किंवा आई-बाबा वगैरे खेळायला लागलो की मग मात्र मोठी मंडळी वस्सकन अंगावर येत. पण ते असो.), हे सांगायला मला लाज वाटत नाही. (त्या मुलींनाही बहुतकरून माझ्याबरोबर खेळायला काही लाज वाटत नसे. तर तेही असो.)

तसेच, लहानपणापासून मी कोंबडी/कोंबडा (नक्की कोण ते तपासून पाहिले नाही.) भाजून आणि रश्शातला दोन्ही खात आलेलो आहे. त्यामुळे दोन्ही बाबींचा अनुभव आहे. (आणि 'लांबोडा'बद्दल बोलायचे, तर माझी उंचीही नेहमीच बर्‍यापैकी राहिलेली आहे.)

मात्र, या दोहोंतील नेमका कार्यकारणभाव (किंवा परस्परसंबंध) मला आजतागायत कळलेला नाही.

मात्र, आमच्या आजूबाजूच्या मुलींमध्ये काही थोड्या आगाऊ होत्या (ज्यांच्याशी आम्ही तसेही कधीच खेळायचो नाही), त्या मात्र सतत म्हणायच्या, "मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा." जेलसी, आणि कोंबडी खाण्याबद्दलचा अननुभव, दुसरे काय?)
=================================================================
* बाहुलाबाहुलीच्या लग्नात आमचा रोल नेहमी भटजीचा असे. शेवटी आम्ही भटेंच, त्याला कोण काय करणार?**
** डिस्क्लेमरः हे शेवटचे वाक्य पु.लं.च्या कोणत्याशा लेखातून जसेच्या तसे (आणि साभार) उचललेले आहे.

श्रावण मोडक's picture

4 Dec 2010 - 11:21 am | श्रावण मोडक

आधुनिकोत्तर साहित्याचा नमुना म्हणावा का हा प्रतिसाद? ;)

पंगा's picture

4 Dec 2010 - 11:24 am | पंगा

... ते तुम्ही ठरवा. 'नमुना आहे' म्हणताय एवढे यश आपल्याला रगड आहे. ;-)

एक मणूस होता
त्याला ४ ताप आला
परत ४ ताप आला
तो झोपला
मग त्याला परत ४ ताप आला
परत ४ ताप आला
तो डॉक्टरकडे गेला
डॉक्टरने त्याला गोळी दिली
घरी येऊन झोपला तर त्याचा उंदीर झाला
From zz

प्रदीप's picture

4 Dec 2010 - 10:59 am | प्रदीप

ह्या विंदा करंदीकरांच्य एका बालगीताची ह्यावरून आठवण झाली. त्यात गरूड विमानचालक असतो, व त्याच्या विमानात साप शिरतो, मग त्याची व इतर सगळ्यांची कशी भंबेरी उडते, अशा घटनेचे खमंग वर्णन होते. कवितेसोबत एक छान चित्र (बहुधा सरवट्यांनी काढलेले ) होते.

पंगा's picture

4 Dec 2010 - 11:18 am | पंगा

GJump

(उत्तरः महात्मा गांधी भिंतीवर चढून उडी मारण्याच्या प्रयत्नात. पलीकडच्या बाजूने पाहिले असता.)

अत्रन्गि पाउस's picture

18 Mar 2016 - 11:27 am | अत्रन्गि पाउस

गांधीजींची बगलेतून मागे आलेली काठी ...

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 1:06 am | अभ्या..

ग्राफीक गोगलगाय.

बेसनलाडू's picture

4 Dec 2010 - 2:16 pm | बेसनलाडू

रायगड पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला
शिरला तर शिरला वर म्हणतो कसा -
<यानंतर आपल्या आवडीचे गाणे समूहाने म्हणणे>

गाडी में छननन छननन होए रे (२) || धृ ||
गाडी में बैठे दो मराठी (२)
गाडी में तुझ्या आयला माझ्या आयला होए रे (२)
गाडी में बैठे दो मद्रासी (२)
गाडी में इडली सांबार वडा सांबार होए रे (२)
गाडी में बैठे दो पंजाबी
गाडी में बल्ले बल्ले बल्ले बल्ले होए रे (२)

या यादीत मग गुजराती, बंगाली, भैये वगैरे घालून गाडीची मालगाडी करता येते. कोणातीही ओळ २दा म्हणताना पहिल्यांदा एकानेच/मुख्य गायकाने म्हणावी आणि दुसर्‍यांदा इतर सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणावी.

मालगाडीतल्या मालावरून आणखी एक आठवले -

बम्बई से आई मेरी माल,
माल के गुलाबी गाल|| धृ ||
माल के लिए मैंने साडी मंगाई, साडी का रंग था लाल
माल के गुलाबी गाल || १ ||
माल के लिए मैंने लिप्स्टिक मंगाई, लिप्स्टिक का रंग था लाल
माल के गुलाबी गाल || २ ||

'बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो; रात को खाओ पिओ, दिन को आराम करो' याच्या चालीवर हे गाणे म्हणावे. 'माल'साठी मग चुनरी, कंगन वगैरे जमेल तितके मागवावे. केवळ मुलांची शाळा असल्याने (मुलींची शाळा वेगळी होती) आणि वयही काहीसे कच्चे/अडनिडे असल्याने 'माल' शब्दाबाबत काही वावगे, गंभीर वाटतही नसे :)

ही सगळी गाणी शालेय सहलींसाठी खास! बसमधील प्रवासात म्हणायची म्हणून प्रसिद्ध!

(शाळकरी)बेसनलाडू

चित्रा's picture

5 Dec 2010 - 9:51 am | चित्रा

माझी लाडकी माझी लाडकी माझी लाडकी सुशीला
मला एकट्याला टाकून गेली हो ती स्वर्गाला
एक होता सावकार, त्याची इस्टेट लाखावर
त्याला होती एक मुलगी, तीच माझी सुशीला
होती उंच आणि टंच, माझी लाडकी सुशीला
मला एकट्याला टाकून गेली हो ती स्वर्गाला
-- असे काहीतरी गाणे होते. सर्व आठवत नाही.

दुसरे घरच्या वडील बंधू/भगिनींनी शाळेतून मिळालेले ज्ञान आमच्यापर्यंत पोचवलेले -

मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवळ नको येऊ तुझे पप्पा बघतात
पप्पा बघतात पप्पा बघतात मेरीचे पप्पा रागं भरतात
मेरीने घातलाय डोक्यात केवडा
मेरीचा बापुस पक्काच बेवडा.. इ. इ.

अजून एक "जास्तीची" मेजॉरिटी असायची. आणि "कमी"ची मेजॉरिटी! :) :)

बेसनलाडू's picture

5 Dec 2010 - 11:49 am | बेसनलाडू

पॅक पॅक पॅक पॅक बदक पलाला कुनाच्या घरी गेला? (२) || धृ ||
अरे पानी पिउनशान आलाय कन्टाला सर्बत पायजे मला
अरे सर्बत पिउनशान आलाय कन्टाला विस्की पायजे मला || १ ||
अरे बायको घेउनशान आलाय कन्टाला साली पायजे मला
अरे साली घेउनशान आलाय कन्टाला शेजारिन पायजे मला || २ ||

हे गाणे गल्यान साखली सोन्याची ही पोरी कोनाची च्या चालीवर गावे.

(वात्रट)बेसनलाडू

जास्तीची मेजॉर्टि आणि कमीची मेजॉर्टि आठवले आणि इतके बरे वाटले!! करवंटी डबा ऐस पैस च्या वेळी आपल्यावर राज्य यायला नको म्हणून नेहमी मेजॉर्टित रहाण्यासाठी देवाची प्रार्थना करायचो ते दिवस आठवले.
(स्मरणशील)बेसनलाडू

दिपक's picture

4 Dec 2010 - 2:27 pm | दिपक

अजुन येऊद्यात.. जुने दिवस ताजा झाले.

रुईया कॉलेजच्या ‘ग म भ न’ ह्या अप्रतिम एकांकिकेतील सुरुवातीचा वर्गातला भन्नाट सिन डोळ्यासमोर आला.

यकु's picture

4 Dec 2010 - 4:59 pm | यकु

टिल्लू जोकर
राणीचा नोकर
राणी मारते छमछम छड्या
टिल्लू मारतो टूण टूण उड्या.. एवढंच येतंय

थांब टकल्या भांग पाडतो. एव्हढ एकच आठवतय हो, बाकि सार विसरल.

अवलिया's picture

4 Dec 2010 - 5:55 pm | अवलिया

मस्त धागा आणि प्रतिसाद.

डावखुरा's picture

4 Dec 2010 - 6:32 pm | डावखुरा

कट्टी बट्टी........बाल बट्टी.........बारा महीने बोलु नको...

पुन्हा खेळ्ताना दोन गट पाडुन खेळत असु तर एखाद्या गटात एखादा भिडु कमी असेल तर...
एक भिडु पोटात...खि खि खि...

रतडी........रतडी/चिटर.....चिटर(एखादा खेळाडु आउट होउन पण मान्य करत नसेल किंवा नियम तोडत असेल तर त्याला जेरीस आणण्यासाठी वारंवार ह्या शब्दांचा वापर.. )

शाळेच्या सहलीच्या वेळी शेकोटी किंवा बस मधे म्हणायला टाईमपास

१]चार वाजले कोंब्डा आरवला....
सखु गेली पाण्याला....
सखुला कोण भेटलं????????

(मग कोणाचेही नाव घ्यायचे म्हणजे उपस्थित असलेल्यांपैकी आणि मग.... )

सखु त्याला काय म्हणाली?????

(मग त्याची टिंगल सखुच्या नावाखाली आपणच करायची.....)

२]"मालाचा म्हातारा...
शेकोटीला चाल्ला

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...
शेकोटीला चाल्ले...

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..
शेकोटीला चाल्ले...

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...
शेकोटीला चाल्ले...

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....
शेकोटीला चाल्ले...

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....वासराची शेपटी...
शेकोटीला चाल्ले...

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....वासराची शेपटी...शेपटीचे केस...
शेकोटीला चाल्ले...

मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....वासराची शेपटी...शेपटीचे केस...केसावरची पिस्सु....
शेकोटीला चाल्ले...!!"

श्रावण मोडक's picture

4 Dec 2010 - 6:35 pm | श्रावण मोडक

कापूसकोंड्याची गो­ष्ट कशी विसरले?

नेहमी आनंदी's picture

4 Dec 2010 - 8:28 pm | नेहमी आनंदी

ही सगळी वाक्य जशीच्या तशी आम्ही पण म्हणायचो..

अविनाशकुलकर्णी's picture

5 Dec 2010 - 11:22 am | अविनाशकुलकर्णी

दत्त दत्त ..दत्ताची गाय..

आदा पादा कोण पादा
दामाजीचा घोडा पादा
धाम ढूस शेंडी फूस
कुजक्या बामना पाद्लास तूच

पंगा's picture

5 Dec 2010 - 1:17 pm | पंगा

धाम ढूस शेंडी फूस
कुजक्या बामना पाद्लास तूच

कृपया आपली जात समजू शकेल काय?

आभारी आहे.

डिजेबॉय's picture

5 Dec 2010 - 1:25 pm | डिजेबॉय

एलियन आय थिंक :p :hat:

मला वाटलेलच कोणीतरी हीन डोक्याचा...
लगेच जातीवर येईलच...

मी कोकणस्थ ब्राम्हण आहे....
काय म्हणणं आहे तुमचं .....

ओ पंगा उर्फ तथाकथित गागा भट्ट

कवितेतला विनोद समजण्याचा सोडून
नसते तारे बरे तोडता तुम्ही

असो बाकी चालूद्यात.....

पंगा's picture

5 Dec 2010 - 8:24 pm | पंगा

मी कोकणस्थ ब्राम्हण आहे

माहितीबद्दल आभारी आहे.

कवितेतला विनोद समजण्याचा सोडून

पुन्हा, माहितीबद्दल आभारी आहे.

चिगो's picture

5 Dec 2010 - 1:46 pm | चिगो

आदा पादा कोण पादा
दामाजीचा घोडा पादा
ठाम ठुस ठैय्या ठुस
कारे बामना पादला तुच
तेलीन बाई तेल दे
कोन पादलं सांगून दे...
.
.
.
.
पांड्या रे पांड्या
दुकान मांड्या
दुकानाची किल्ली हारपली
पांड्यानं बायको झोडपली
पांड्याच्या बायकोनं मारली लात
पांड्या पडला संडासात
संडासात निघला साप
पांड्या म्हणे बाप रे बाप...

स्पा's picture

5 Dec 2010 - 1:55 pm | स्पा

वा चीगो सही

मस्तच.......

आटली बाटली
कचकन फुटली
माझं नाव घ्यायला
लाज नाही वाटली?
-------------------------------
सांग सांग सांग
दाढी मिशा लाव
दाढी गेली वाया
पड माझ्या पाया
पायाखाली सुपारी
तुझा लग्न दुपारी
दुपारी आले पाहुणे
तेच माझे मेहुणे
....

प्राची's picture

5 Dec 2010 - 3:47 pm | प्राची

शाळेत ऑफ पिरेडला खेळला जाणारा खेळ :नाव,गाव,फळ,फुल(प्राणी,पक्षी,रंग,आडनाव,वस्तू,सिनेमा).

ramjya's picture

5 Dec 2010 - 8:00 pm | ramjya

शाळा सूट्ली
पाटी फुट्ली

यसवायजी's picture

25 Jun 2015 - 2:20 am | यसवायजी

पुढे?
-
दुकानदाराची नाड़ी सुटली.

लवंगी's picture

5 Dec 2010 - 10:23 pm | लवंगी

मला ते मालाड चा म्हातारा वाटायच.. आम्ही तसच गायचो

योगप्रभू's picture

6 Dec 2010 - 1:46 am | योगप्रभू

एप्रिल फूल, कानात डूल, हातात बांगड्या, सासूबाई लंगड्या
बॉईज डू यू अंडरस्टँड? यस सर धिस इज यष्टीस्ट्यँड
सोन्याच्या सायकलला चांदीचे स्पोक, ... सरांच्या चड्डीला भले मोठे भोक
आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये, तो बाप बन जाये

ramjya's picture

6 Dec 2010 - 9:52 am | ramjya

एक मेकाना चिडवताना

"आमचे शिकू
गाडगे विकु"....

खेळ्ताना

"नवा गडी
नवा राज"

मराठी शाळेत
"ये रे ये रे पाऊसा
तूला देतो पैसा"
किन्वा
"सान्ग सान्ग भोलानाथ
पाऊस पडेल काय?"

ईन्ग्रजी शाळेत " रेन रेन गो अवे का शिकवले जाते"?????

जास्त मनावर घेउ नका. मराठीत पावसाला लाच द्यायला शिकवतात ना.

आपणच आपल्या धाग्यावर कॉमेंट टाकल्याने आपला धागा वर येतो का ते अजूनही कळलेलं नाही. तरीही आपला धागा वर काढण्यासाठी प्रत्येक कॉमेंटवर प्रति कॉमेंट टाकतोय असा (गैर)समज होऊ नये म्हणून आता एकदाच प्रतिसाद देतोय.

सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे अत्यंत आभार. बरीच भर घातलीत या बडबडवाक्यांमधे. एकदम दोस्तांचा कट्टा जमल्यासारखं वाटलं. धमाल.

डावखुरा's picture

6 Dec 2010 - 2:41 pm | डावखुरा

आयला..
गगनविहारी कुठेही संकोच...

योगेश सुदाम शिन्दे's picture

6 Dec 2010 - 6:39 pm | योगेश सुदाम शिन्दे

शाळेची आठवण आली हो

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Dec 2010 - 4:29 am | निनाद मुक्काम प...

इयत्ता दुसरीत असताना परमवीर ह्या मालिकेच्या शीर्षक गीताचे माझे विडंबन त्याकाळी वर्गात मुलांच्या तोंडी होते .((चाल सर्वांच्या लक्षात असेलच )
परम वीर (टेटे टे.....)
परमवीर (.........)
जो करी जीवाचे आम्लेट
छातीवर झेलून चॉकलेट
जो चहात घालतो घासलेत
तो खातो पापलेट
खातो पापलेट
परमवीर (.....)खरच शाळेचे मयुरपंखी दिवस आठवले .मस्त आहे हा लेख .

हे हे हे.. :)

हेच आमच्या गोटात :

परमवीर..

जो करी जिवाची शेळी

छातीवर झेलून केळी..

जो देशदद्रोह नित पाळी..

तो परमवीर..

हा देश तुडविण्यासाठी..

अन्याय घडविण्यासाठी..

वगैरे...

फाजीलपणा सगळा..

छान आठवण करुन दिलीत. धन्यवाद..

अजून एक आठवले -
कोणी म्हणजे काय विचारले की -
'म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे
कुत्र्याचे पाय उंटाची मान.....'

असे बरेच काहीतरी होते.

अरुण मनोहर's picture

25 Jun 2015 - 5:33 am | अरुण मनोहर

म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे
कुत्र्याचे पाय उंटाची मान.....
तुझं माझं लग्न सावधान!

बॅटमॅन's picture

25 Jun 2015 - 3:07 pm | बॅटमॅन

उंटाची मान म्हशीचं शाण गाढवाची शेपूट हेही ऐकले आहे पुढे.

तदुपरि- का? कावळा खा. कावळ्याचं बी उगाळून पी. पिणार कोण ? तू. पुढे खास हग्रुप्त आज्ञा आहेत.

यसवायजी's picture

25 Jun 2015 - 3:21 pm | यसवायजी

वर्गात पैला लंबर आला की म्हणायचो-
पैला पेढा, दुसरा रेडा, तिसरा तिरंगी झेंडा, चौथा गाढवाचा लेंडा, पाचवा समथींग समथींग...

पेढा अन रेडा पर्यंत आठवतेय, पुढचे नवीन आहे/आठवत नाय.

झिम पोरी झिम
कपाळे चे भिन्ग
भिन्ग गेले फुटुन
पोरी आल्या उठून
पोरीत पोरी
मीच गोरी
आरसा फणी
घाल माझी वेणी..

आता तश्या छोट्या(शाळेत जानार्या) वेणी घातलेल्या मुली खूप कमी दिसतात

गवि's picture

7 Dec 2010 - 9:48 am | गवि

सही... हे राहिलंच..

मृगनयना's picture

27 Jul 2012 - 3:28 pm | मृगनयना

पुढे हे असे काहीसे आठवतंय ...
बरोबर आहे ना ?? .....

झिम पोरी झिम
कपाळे चे भिन्ग
भिन्ग गेले फुटुन
पोरी आल्या उठून

पोरीत पोरी
मीच गोरी
काळे ते काळे
मोत्याचे जाळे

लाट्या बाई लाट्या
सारंगी पेट्या
मामाने दिल्या
रंगीत पेट्या

हरी गुजरी
कृष्ण गुजरी
पिंडीवरचा हार माझा सोळा पदरी सोळा पदरी ......

डावखुरा's picture

7 Dec 2010 - 11:06 am | डावखुरा

आमच्या वेळी शक्तीमान..च्या शिर्ष्क गीताचे विडंबन..

"शक्तीमान चड्डीघाण..मारतो शान
आणि बायकोला म्हण्तो मीच पैल्वान..."

आणि कोणी काही बोललं की किंवा शिकवायला लागलं की "सॉरी शक्तीमान" म्हणुन त्याची उडवायची
भारत का पैला सुपर हीरो...

तेव्हा त्या मालिकेचा एवढा प्रभाव झाला होता की सगळे शक्तीमान शक्तीमान खॅळायचे आणि तेव्हा तर त्या ड्रेसची पण फॅशन आली होती...

मार्मिक गोडसे's picture

26 Jun 2015 - 6:32 pm | मार्मिक गोडसे

शक्तीमान शक्तीमान
हागला छान
वास आला घाण
बर्‍याच मित्रांनी शक्तीमानचा ड्रेस घेतला होता. एखाद्या हॉटेलच्या वेटरसारखे दिसायचे लेकाचे.

अरे वा लहानपण अगदी ओथंबुन चाललय.

इरसाल's picture

26 Jul 2012 - 3:53 pm | इरसाल

सुटुन गेलेला धागा म्हणुन वर काढतोय.
अशी पण साथ आलीय.

माझ्याकडुन
सोनु तुला सोन्याची माळ घे .....माळ घे
सोनुचे गाल कसे गोल गोल ...गोल गोल
आतातरी माझ्याशी नीट बोल....

चित्रगुप्त's picture

26 Jul 2012 - 10:46 pm | चित्रगुप्त

ऐंशी म्हण ऐंशी...
"ऐंशी"...
...ऐंशी, मड्डम तुझी मावशी, साहेब तुझा काका, रेलगाडी हाका, रेलगाडीला किल्ली नाई, साहेबाला बुल्ली नाई.

(इंग्रजी राज्याचे काळातील साहेब, मड्डम, बटीक, रेलगाडी इ. शब्द असलेले आणखी असले प्रकार लक्षात आहेत का कुणाच्या?)

बॅटमॅन's picture

27 Jul 2012 - 2:41 pm | बॅटमॅन

अप्रतिम धागा. काही माहिती होते, बरेच नव्याने कळले. याबद्दलदेखील एखादे पुस्तक आले तर मस्त मजा येईल!!!

मन१'s picture

27 Jul 2012 - 5:16 pm | मन१

:)

बाळ सप्रे's picture

27 Jul 2012 - 6:02 pm | बाळ सप्रे

महितीतल्या बर्‍याच बाल-वात्रटीका आधीच येउन गेल्या आहेत या धाग्यात..

या राहिल्या होत्या..

पत्रे के डिब्बे मे तुझको बिठाकर |
उपर से पत्रे का झाकन लगाकर |
रखूंगा संडास के पास |
आयेगा अत्तर का वास |

काय ता??
आंब्याचा रायता..
ता झाला कडू
तुका झाला चेडु
तेचा नाव भागला
तुझ्या तोंडात XXला..

यो बायला यो..
सोरो माका दी पयलो..
सोरो माका दी .. ना झाल्या फोडतलो टकलो..
हाव तुझो फोडतलो टकलो..

स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी एखादा धागा सुरू करावा काय? कारण खरी क्रिएटिव्हिटी तिथे दिसत असे.

मन१'s picture

27 Jul 2012 - 6:25 pm | मन१

जोशी जोशी जोशी
नाकात शिरली माशी
आई म्हणते करतो शी
बाबा म्हणतात द्या फाशी

अर्धवटराव's picture

29 Jul 2012 - 2:17 am | अर्धवटराव

कोणि उगाच रुसुन वगैरे बसलं असेल तर...

हसा मुलांनो हसा
याच्या चड्डीत घुसल ससा
आई म्हणाली काढु कसा
बाबा म्हणाले राहु दे तसा

अर्धवटराव

चिगो's picture

25 Jun 2015 - 7:03 pm | चिगो

याच्या चड्डीत घुसल ससा

आम्ही अवयवांचा वापर करायचो वाक्यात..

@ आम्ही अवयवांचा वापर करायचो वाक्यात.. >>>

अवयवाची वाक्यातील जागा कोणती? २ की ४?
याच्या(१) चड्डीत(२) घुसल(३) ससा(४)

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा

२ अस्णार भौतेक

चिगो's picture

26 Jun 2015 - 3:02 pm | चिगो

दोन नंबर..

आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २ & ४. :D

यसवायजी's picture

25 Jun 2015 - 2:08 am | यसवायजी

गुरजीन्ना वंदण करुण-
-------

कन्या शाळा
मास्तर काळा
मास्तर गेला हागायला
पोरी आल्या बघायला
-------
मादुरी दिक्षीत
बसली टॅक्सीत
हाxली मॅक्सीत
साफ़ करेल त्याला
५ रुपै बक्षीस
--------
१ म्हण १.
१.
वडराचा लेक
वड्डर कशाला? दगडं फोडायला.
दगडं कशाला? घर बांधायला.
घर कशाला? सायेब बसायला.
सायेब कशाला? चिठया फाडायला.
चिठ्या कशाला? सायबाची गांx पुसायला.

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2015 - 10:08 am | टवाळ कार्टा

=))

माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं लै पेटंट यमक होतं. =))

सुनील शेट्टी हागला बुट्टीत हेही लै फेमस.

केदार-मिसळपाव's picture

25 Jun 2015 - 6:09 pm | केदार-मिसळपाव

ह्याच्या तालावर आमच्या शाळेत असे म्हणायचे
आशा पारिख, खाती खारिक, हागती बारिक...

रातराणी's picture

25 Jun 2015 - 3:11 am | रातराणी

सह्ही कलेक्शन!

अरुण मनोहर's picture

25 Jun 2015 - 5:20 am | अरुण मनोहर

बिस्कीट बिस्कीट
एन्ना बिस्कीट
जाम बिस्कीट
एन्ना जाम?
रो' जाम
एन्ना रो'?
को रो
एन्ना को?
टिक्क को
एन्ना टी?
रो' टी
एन्ना रोटी?
बन रोटी
एन्ना बन?
रिब्बन
एन्ना रिब्बन?
पच्चा रिब्बन
एन्न पच्चा?
मा पच्चा
एन्ना मा?
उप्पमा
एन्ना उप्प?
कल उप्प
एन्ना कल?
रास्कल
एन्ना रास?

मद रास !!!!!

पगला गजोधर's picture

25 Jun 2015 - 8:36 am | पगला गजोधर

जाणे जिगर जानेमन
मुझको लगि नंबर वन
तू जो मुझे ना मिली
चड्डी मे करुंगा सनम

पगला गजोधर's picture

25 Jun 2015 - 8:46 am | पगला गजोधर

टीपी टीपी टीप टोपं
व्हाट कलर यु आर
माझा रंग सांगू का ?
सांग सांग ....
माझ्झा रंग .....

पगला गजोधर's picture

25 Jun 2015 - 8:50 am | पगला गजोधर

माझ्या रंगात रंगणारी
परी आहेस का तू पर्यांची राणी
का आहेस माझी प्रेमकहाणी ....
माझ्या प्रश्नांचे उत्तर ....दे ना ...

पगला गजोधर's picture

25 Jun 2015 - 9:24 am | पगला गजोधर

बालभारतीच्या पुस्तकात ऐक कविता होती
तिला आम्ही तत्कालीन हिंदी गाण्याची चाल लावून म्हणायचा वात्रटपणा करायचो.

लवलव हिरवी sss गार sss …
(तम्मा तम्मा sss दोगे sss … )
लवलव हिरवीगार पालवी
(तम्मातम्मा दोगे तम्मा )
का ट्यां ची sss वर sss …
काट्यांचीवर मोहकजाळी

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2015 - 10:22 am | अत्रुप्त आत्मा

@ हवालदाराचा ""पांडू"" पण हातात नाही दांडू.>> =)))))

विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे स्मायल्या कशा ओसंडून भरून वाहू लागल्यात =)) =)) =))

आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))

आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))

नायतर काय, हवालदाराचं नाव सकारादि केलं की झालं!! =))

बॅटमॅन's picture

26 Jun 2015 - 2:28 pm | बॅटमॅन

=))

भिंगरी's picture

25 Jun 2015 - 11:28 am | भिंगरी

गावाकडून आलेल्या मुलीने साइसुट्ट्यो करताना म्हटलेल्या ओळी
आणि त्यावरून आम्ही ओरडा खाल्ला होता.

आदुकली पादुकली ढम्माढूस
का गं म्हातारे पादली तूच.

एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं आहे. खूप छान धागा.

आमच्या बाबतीत विशेष म्हणजे आम्ही नेहमी दर्जेदार शेरोशायरी मधे रमायचो. जसे की दूर से देखा तो अंडे उबल रहे थे. पास जा कर देखा तो गंजे उछल रहे थे.....दूर से देखा तो सुंदर गुड्डा था पास आके देखा तो ख़ूसट बुड्ढ़ा था....इत्यादि...

अज़ून एक म्हणजे आमची सुंदर क्रियेटिविटी वापरुन हॉरर फिल्म्स ची नावं बनवायचो.... मैं भुतनी तेरे कब्र्स्तान की..., तू मेरा ड्रॅक्यूला मैं तेरी चुडैल.....कटोरी मे लाश....वगैरे, वगैरे...

अजूनही काही कविता...

मेरे सामने वाली खिडकी मे एक दूध-वाला भैय्या रहता है. वो चोर है वो डाकु है वो दूध मे पानी मिलाता है...

गोदरेज की अलमारी लेती जा, जा तुझको साडीयोंकी दूकान मिले....

कचरे के डब्बे मे तुझको बिठाकर, उपर से उसका ढक्कन लगाकर फेक दूँगा नाले के पास.....( ऑल टाइम फवरेट)

केदार-मिसळपाव's picture

25 Jun 2015 - 5:56 pm | केदार-मिसळपाव

"एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.."
हे आम्हाला आमच्या विज्ञानाच्या सरांनी असे सांगितले होते.
"एक दिन, वन डे, फॉक्स कोल्हा, लेक तळ्यावर, वॉटर पाणी, ड्रिंक पिऊनी, वेंट गेला".

"सांग सांग सांग
दाढी मिशा लांब
दाढी गेली वाया
पड माझ्या पाया
पायाखाली बत्ता
तुझं लग्न आत्ता
पायाखाली सुपारी
तुझा लग्न दुपारी
दुपारी आले पाहुणे
तेच तुझे मेहुणे
मेहुण्यांनी आणला भोवरा
तोच तुझा नवरा."

असे होते.

यसवायजी's picture

25 Jun 2015 - 6:15 pm | यसवायजी

हे कायाप्पावर आलेलं- :ड
ये काली काली आखें, 2√2,2√2.
ये गोरे गोरे गाल.. (टू-रूट-टू)

चिगो's picture

25 Jun 2015 - 7:18 pm | चिगो

आणखी एक..

'पांड्या रे पांड्या
दुकान मांड्या
दुकानाची किल्ली हारपली
पांड्यानं बायको झोडपली..

पांड्याच्या बायकोनं केला भात
पांड्या म्हन्ते मी नाही खात
पांडयाच्या बायकोनं मारली लात
पांड्या पडला संडासात
संडासात निंगला साप
पांड्या म्हन्ते बाप रे बाप..'

मोहनराव's picture

25 Jun 2015 - 7:42 pm | मोहनराव

सुकर.. जरा लवकर..
तुझ्या नंतर.. माझा नंबर..
बद्ला ए चड्डी.. झाली ओली आता ती तर...!!
(चालः छुकर मेरे मनको, किया तुने क्या इशारा..)

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा

=))

बॅटमॅन's picture

26 Jun 2015 - 2:28 pm | बॅटमॅन

आमच्याकडे "मला जायचंय...तुझ्या नंतर" असा पाठभेद प्रचलित होता>