गांधीवाद

आत्मशून्य's picture
आत्मशून्य in काथ्याकूट
29 Nov 2010 - 9:30 am
गाभा: 

पूर्वी भारतातील खेडी भलीही आर्थीकद्रूष्टया स्वावलंबी असतील पण समाज हा अनीष्ट रूढी आणी जातिभेदाने पिचलेला होता म्हणजेच भारतीयान्चे क्षात्रतेज लयाला गेले होते, जून्या राजे लोकानी सूध्दा राज्यवीस्तारा पेक्षा गादि सांभाळणे आणी आरामी जीवन जगणे हेच भूशण मानले होते. खरे तर एकही हींदू Napoleon अथवा Alexander नीपजला नाही. (आणी आजही भारताने ह्या गोष्टीची लाज बाळगण्यापेक्षा कधीही हल्ल न करणारा देश असा अभीमान बळगला.)मी शौर्य,बूध्दिमत्ता अथवा कर्तूत्वाबाबत बोलत नाही तर राज्यवीस्ताराबाबत बोलत आहे, आपल्या दूर्दैवाने भारतीय कर्तूत्ववान राजांचा वेळ प्रमूख्याने राज्य ऊभे करणे अथवा त्याचे आणी प्रजेचे रक्षण करण्यातच जास्त गेला.

म्हणूनच इग्रंजानी भारत बळकावला तेव्हां भारत United न्हवता. काही अतूलनिय शौर्य आणी बूध्दिमत्ता असेलेले सन्माननीय राजे यांचा आदर्श आणी त्यानी झूगरून दीलेल्या रूढी कल्पना यान्चा प्रसार त्त्यांच्या म्रूत्यूनंतर समन्यापर्यंत झीरपून टीकू शकला नाही. आशा परीस्थितीत भारताने सशस्त्र ऊठावाच्या जोरवर इग्रंजाना हाकलून लावले असते तर तो एक चमत्कार ठरून भारत हा एकमेद्वीतिय अशी जागतीक महासत्ता म्हणून केव्हाच ऊभा राहीला असता. अर्थात तसे प्रयत्न होत न्हवते असे न्हवे पण त्यासाठी मोजक्याच क्रन्तीकारी वीरांपेक्षा अजून फार मोठ्या समाज मानसीकतेची, पाठींब्याची आणी क्षात्रतेजाची गरज होती.

पण गमावलेल्या क्षात्रतेजामूळे समाजाला , समान्याना हे जमणे शक्यच न्हवते (आजही समान्य माणूस त्याचा ताकतीचा नीट वापर करत नाहीच, पण ह्या वेळच्या बिहारी निवडनूका या अपवाद असाव्यात), म्हणूनच शांततेने लढा देणे हा प्रकार सहजच लोकप्रीय होवू शकला, ( नूसते मोर्चे काढायचे चले जाव म्हणायचे, मार खायचा पळून यायचे, नाहीतर अटक व्हायचे आणी काहे दीवसानी सूटून परत याय्चे. उगिच शस्त्र ऊगारून कायदेशीर गून्ह्यात अडकून फाशी जायला कोणी सांगीतले.) तसेच या आधी भारताबाहेर त्याचा यशस्वी वापर केलेल्या माणसानेच त्याचा प्रसार केल्यामूळे त्याला ग्लॅमर होतेच आणी ते त्वरीत तळागाळात पोचले. माझा अभ्यास थोडा आहे , पण भारतातून इंग्रज बाहेर का पडले याची करणे जी पाठ्यपूस्तकात होती त्यामधे प्रमूख कारण हे आर्थीक होते. कीव्हा आता असे म्हणायला जागा आहे की कारण फक्त आर्थीकच होते... म्हणजेच... फक्त लढा चालू ठेवणे असेच होय ?

आता अमेरीकेचेच उदाहरण घ्या Vietnam, Afgaanistaan येथे जर त्याना गाधीवादाने लढा दीला असता तर अमेरीकेला तेथे पायसूध्दा रोवता आला नसता का ? मग सध्याजे सैन्य मघारी घेणे वैगेरे धोरण तर दूरची गोष्ट ठरली असती काय ? अमेरिकेला इराक मधून सैन्य मागे घ्यावे लागण्या मागे गांधीवाद कारणीभूत आहे काय ?इस्त्राइल ने गाधीवादाने लढा दीला तर ते टिकतील काय ?

की आपणच गाढवा प्रमाणे जातीवादाने अंधः बनून क्षात्रतेज गमावून नपूंसक बनून १५० वर्षे घेतली इग्रजांना हाकलायला ? मग मला इतकेच सूचवायचे आहे की जर आर्थीक नाड्या आवळल्या तर यूध्द संपत असेल, महसत्ता जेरिस येत असेल, दहशतवाद काबू करता येत असेल तर गांधीवाद हाच शांततेचा, त्वरीत आणी एकमेव ऊपाय ठरतो काय ?

पण हे मात्र नक्कीच की ब्रीटीशांप्रमाणे एखाद्या भारतीय राजाने प्रजेवर लोकशाही लादली असती काय हा संशोधनाचा विषय आहे... त्यामूळे गांधीवादाचा महत्वाचा पण फक्त देशांतर्गत परीणाम म्हणजे लोकशाहीची सहज स्थापना आणी समाजामधे स्वीकार असे म्हणता येइल.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

29 Nov 2010 - 11:14 am | क्लिंटन

डिस्क्लेमर: या प्रतिसादावरून मी कोणाही क्रांतिकारकावर टिका करत आहे किंवा त्यांचे योगदान अमान्य करत आहे असा अर्थ काढू नये ही विनंती.सगळे क्रांतिकारक तळहातावर शीर घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणारे महामानव होते असेच मला म्हणायचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.

काही मुद्दे

या लेखात गांधीवादाचा आणि क्रांतिकारकांचा परामर्ष केला गेला आहे.तेव्हा या दोन्हीविषयी मते लिहिणे अस्थानी ठरू नये.

आपणच गाढवा प्रमाणे जातीवादाने अंधः बनून क्षात्रतेज गमावून नपूंसक बनून १५० वर्षे घेतली इग्रजांना हाकलायला
यातील पहिल्या भागावर (गाढवा प्रमाणे जातीवादाने अंधः बनून क्षात्रतेज गमावून नपूंसक बनून) याविषयी आपल्या मताशी १०००% सहमत. माझा मुद्दा आपण इंग्रजांना हाकलायला १५० वर्षे का घेतली याविषयी आहे.

अगदी अलिकडल्या काळापर्यंत माझेही मत होते की स्वातंत्र्य मिळाले ते क्रांतिकारकांमुळे आणि हिटलरने महायुध्द सुरू केल्यामुळे. तसेच गांधींच्या अहिंसक चळवळीचे योगदान मी मान्य करायलाच तयार नव्हतो. पण यावर अजून विचार केल्यावर मला पुढील मुद्दे सुचले.

१. स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता झुंजणे हे महान काम आहेच. आणि त्यासाठी अत्यंत महान दर्जाची देशभक्ती हवी.क्रांतिकारकांचा भर होता जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्यावर आणि त्यातूनच पुढे जाऊन इंग्रज सत्ता सशस्त्र क्रांतीने उलथवून लावण्यावर.हे सगळे वाचायला मजा वाटते आणि ए.सी खोलीत बसून "गांधींनी काय केले" असे म्हणणेही सोपेच आहे. पण जर आज मी घरी आलेले झुरळही मारण्यापूर्वी शंभरवेळा विचार करणार असेन तर सशस्त्र क्रांती वगैरे या सगळ्या माझ्यासारख्यांसाठी बोलायच्या गोष्टी नाहीत का? एका झुरळाला मारायला हातात झाडू घेताना मी शंभर वेळा विचार करत असेन तर एका माणसाला (इंग्रज असले तरी ते माणूसच) मारायला मी बंदूक हातात धरेन ही शक्यता फारच कमी (अगदी शून्यच).तेव्हा समजा आज इंग्रज असते तर एकतर मी स्वातंत्र्यलढ्यात काहीही केले नसते किंवा काही केले असतेच तर ते म्हणजे गांधींच्या अहिंसक चळवळीतच सामील झालो असतो हीच शक्यता जास्त नाही का? असे असेल तर "गांधींनी काय केले" असे म्हणायचा मला काय अधिकार? (इथे "मी" हे मिसळपाववर हे वाचणाऱ्या बहुतेक सगळ्यांना लागू होते)

२. अनेकदा आपण ’क्रांतिकारक’ या एका लेबलाखाली सशस्त्र क्रांती करणाऱ्या सगळ्यांना एकत्र क्लब करतो.पण अशा क्रांतिकारकांच्या विचारधारांमध्ये मूलभूत फरक होता हे विसरतो.उदाहरणार्थ क्रांतिकारकांमध्ये हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट अशा भिन्न विचारधारा होत्याच ना? त्या दोन विचारधारेच्या लोकांचे एकमेकांशी मूलभूत मतभेद आहेतच ना? समजा सशस्त्र क्रांतीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते तरी त्यानंतर या भिन्न विचारधारेच्या नेत्यांमध्ये नंतर खटके (कदाचित हिंसक खटकेही) उडालेच नसते असे आपण कोणत्या आधारावर बोलतो?

अफगाणिस्तानात रशियन होते तोपर्यंत रशियनांना हाकलायचे या एका ध्येयासाठी अहमदशाह मसूद, गुलबुद्दिन हिकमतयार, अब्दुल रशीद दोस्तम यासारखे अनेक एकत्र लढले.पण रशियन गेल्यानंतर पुढे काय याविषयी त्यांची मते भिन्न होती. उदाहरणार्थ कोणी त्यातील कोणी पश्तू होते तर कोणी ताजिक.त्यांच्यातून विस्तव जात नाही हे तर नक्कीच.रशियन असेपर्यंत सगळे एकत्र होते पण नंतर त्यापैकी प्रत्येकाला आपापला वंश नव्या राज्यव्यवस्थेत प्रबळ व्हावा असेच वाटत होते.आणि नंतर ते एकमेकांच्या उरावर बसले नाहीत का? तसेच भारतातही झाले असते का हा जर-तरचा विषय झाला.पण ती एक शक्यता नव्हती का?

एक उदाहरण द्यायचे झाले तर मला स्वत:ला स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट राज्य आलेले अजिबात आवडले नसते पण सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुराज्य आलेले आवडले असते.तेव्हा माझ्यासारख्यांनी भगतसिंगांना स्वातंत्र्यापूर्वी डोक्यावर घेतले असले तरी त्यानंतर त्यांचे कम्युनिस्ट राज्य आणायचे प्रयत्न माझ्यासारख्यांना नक्कीच आवडले नसते.सुभाषबाबू यशस्वी होऊन जर जपानी नामानिराळे राहिले असते तर ठिक पण इंग्रज जाऊन हिटलरचा दुसरा अवतार जपानी आले असते तर ते मलातरी नक्कीच आवडले नसते.

तेव्हा मला वाटते की एकाच ध्येयासाठी विविध विचारसरणीचे लोक लढत असतात तेव्हा त्यात हा धोका inherent असतो.

३. मूळ लेखात आर्थिक कारणांचा मुद्दा आणला आहे.सुरवातीच्या काळात इंग्रज भारतातून कापूस घेऊन जात आणि मॅंचेस्टरच्या कापड गिरण्यांमध्ये इंग्रजी कापड बनवून भारतात विकत आणि त्यातून भारताची त्यांनी मोठी लूट केली.त्यावर विदेशी कपड्यांवर बहिष्कार हे स्वातंत्र्यलढ्यातील एक सूत्र होते.विदेशी कपड्यांची पहिली होळी सावरकरांनी १९०६ मध्ये पुण्यात केली असे वाचले आहे.गांधींनी त्याच्यापुढे जाऊन खादीचा पुरस्कार केला.त्यातूनच भारतीय लोकांचा इंग्रज कपड्यांवरील dependence कमी झाला हा आर्थिक मुद्दा आपण का विसरतो?

४. अगदी अलिकडच्या काळापर्यंत मला वाटायचे की "अमुकअमुक कॉंग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला" हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे टप्पे कसे असू शकतात? त्यावर अधिक विचार केल्यावर मला जाणवले की स्वातंत्र्यचळवळ किंबहुना स्वातंत्र्याची कल्पनाच सामान्यांपर्यंत न्यायची सुरवात टिळकांनी केली पण गांधींनी ती घरोघरी पोहोचवली.त्यापूर्वी स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कशासाठी किंवा स्वातंत्र्याची गरजच काय या गोष्टी आपल्या समाजाला पूर्णपणे उमगलेल्या होत्या असे नक्कीच म्हणता येणार नाही.पण ते काम गांधींच्या अहिंसक चळवळीतून आणि दरवर्षी विविध कॉंग्रेसमधून पास झालेल्या ठरावांमधून झाले. अशाच वातावरणातून लोकांना इंग्रज राजवटीचे दुष्परिणाम समजून क्रांतिकारक जन्माला यायची शक्यता जास्त नव्हती का?जर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीच्या लढ्याला संतांच्या कार्याची पार्श्वभूमी होती हे आपण म्हणतो तर असेच प्रबोधनाचे काम गांधीजी करत होते. मग ते कमी महत्वाचे कसे?

असो.

सहमत..

एक मुद्दा:
असाध्य / भयंकर रोग झाला असेल तरः

अ‍ॅलोपॅथी झेपत नाही किंवा साईड इफेक्ट्स भयंकर असतात म्हणून बरेच जण होमिओपॅथीकडे जातात.

गोळ्या गोड असतात आणि हार्श लॉजिकपेक्षा श्रद्धेवर भर असतो.

किंवा मग नुसतेच नैसर्गिक काही होण्याची वाट पहात बसणारे..

पण त्यालाही ते नेचरोपॅथी असे नाव देतात.

पण एक पॅथी, एक पंथ सर्वांना कंफर्टसाठी लागतोच..

तसंच आहे हे ही.

आत्मशून्य's picture

29 Nov 2010 - 12:01 pm | आत्मशून्य

:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Nov 2010 - 11:51 am | विश्वनाथ मेहेंदळे

क्लिंटन साहेब, उत्कृष्ट प्रतिसाद !!!

आत्मशून्य's picture

29 Nov 2010 - 12:10 pm | आत्मशून्य

कमी महत्वाचे नक्कीच नाही. किम्बहूना मला स्वतःला वाटते की भारतीय लोकशाहिच्या स्थापनेत आणी यशात इंग्रजांपेक्षा महात्मा गांधीचा प्रभाव जास्त आहे . देशांतर्गत घडामोडीत ते सर्वात प्रभावशाली आहेत.

मी असहकार ,स्वदेशी वगैरेचा ऊल्लेख टाळला कारण व्यापारवाढीसाठी इंग्रज फक्त भारतावर अवलंबून न्हवते. कच्चा माल घेत होते, आपण मालाचे पुरवठेदार असू पण मला वाटत नाही भारत हा त्याना वस्तू विकत घेणारा महत्वाचा व्यापारी भागिदार वाटत होता. (आले होते व्यापाराला आणी सत्ताधीश झाले)

तसेच गांधीवादाच्या सत्याग्रह वगैरे गोश्टी अत्यंत प्रभावशाली आहेत त्यामूळे लोकशाही खर्या अर्थाने जगते, सत्तधीशांवर वचक राहतो, राज्यकार्भार पार्दर्शी ठरतो, आपण आजही याचा वापर करत आहोत मग भलेही तूम्ही गांधीवीरोधी असा वा नसा कधी ना कधी कूठे ना कूठे कोणत्या ना कोणत्या प्रकारे /प्रमाणात तूम्ही त्याना FOLLOW केलेलेच आहे. पण हे सर्व घटक देशांतर्गत घडामोडीतच सर्वात महत्वाची भूमिका नीभावतात. ह्यामूळे स्वातंत्र्य भेटते, देशाबाहेरील शत्रून्चा बीमोड करता येतो, जगात शांतता प्रस्थापीत होते असे म्हणने धाड्साचे ठरते....

पण मला खटकणारी गोश्ट इंग्रजांना हाकलायला लगलेलि १५० वर्षे म्हणजे खरोखर प्रमाणाबाहेर जास्तच आहेत. जगाच्या आधूनीक इतीहासात असे hopeless उदाहारण तूरळकच. आणी ह्याची आपणाला लाज वाटली पाहिजे जे आपण अहींसा वगैरे गांधीवादाच्या गोश्टी करून दूर्लक्षीत करतो आहोत.

(स्वातंत्र्य लढ्यामधे रामाचा अथवा खारीचा वाटा असणार्या वीरांबद्दल वैयक्तीक मत प्रदर्शीत करणे हा या लेखाचा उद्देश नसून सामान्य भारतीयांचे अपंग समाजमन किती विचीत्र आहे आणी हे आपल्याच पायावर धोंडा मारणारे कसे ठरू शकते हे अधोरेखीत करणे हे आहे)

चिरोटा's picture

29 Nov 2010 - 12:30 pm | चिरोटा

पण मला खटकणारी गोश्ट इंग्रजांना हाकलायला लगलेलि १५० वर्षे म्हणजे खरोखर प्रमाणाबाहेर जास्तच आहेत

प्रमाण कसे काय ठरवायचे?त्यावळचा भारत म्हणजे आताच्या भारतापेक्षा बराच मोठा होता.ब्रिटिशांच्या सैन्यात अनेकजण भारतियच होते.अनेक जणांना-त्यावेळच्या उच्च मध्यम्/शि़क्षित वर्गाला कुठल्यातरी सुखलोलुप लहरी महाराजापेक्षा शिस्तित कारभार करणारे ब्रिटिश आवडले नसते तर नवल.

ह्यामूळे स्वातंत्र्य भेटते, देशाबाहेरील शत्रून्चा बीमोड करता येतो, जगात शांतता प्रस्थापीत होते असे म्हणने धाड्साचे ठरते....

हम्म.हे त्या त्या परिस्थितीनुसार्,काळानुसार अवलंबून असते.सांख्यिकीदृष्ट्या कुठच्याही देशांत क्रांतिकारकांची संख्या-जीव धोक्यात घालून काम करणार्‍यांची संख्या कमी असते.क्रांतिकारक निर्माण होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यातल्यात्यात मध्यममार्ग निवडायचा असतो.

पण थोडा इतीहास बघून याचा अंदाज करता येउ शकतो...

फ्रान्स दूसर्या महयूध्दात जर्मनीच्या ताब्यात किति वर्शे होते ? Napoleon अथवा Alexander यानी जिंकलेला प्रदेश किती दिवस / वर्षे त्यान्च्या गूलामीत राहीला ? आणी जेव्हां जेव्हां हिंदूस्थानावर परकीय आक्रमणे झाली तेव्हां त्याना कीती दीवस(शतके) लागली संपूर्ण स्वतंत्र व्हायला ?

नरेशकुमार's picture

29 Nov 2010 - 12:36 pm | नरेशकुमार

"भारतला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सगळे लढले, ते सगळेच शुरवीर होते. कोणीही कमी आणि जास्त नव्हता."
हे वाक्य १००० वेळा घोकले पाहिजे.

रामाचा सेतू बांधणारे सगळेच शूर होते ध्येयाने प्रेरीत होते पण सगळेच राम्/लक्षमणा इतके सामर्थ्यवान न्हवते... मग ती खार असो वा जटायू.... रामाला सामर्थ्यशाली राम म्हणने हा जटायूचा अपमान होऊच शकत नाही तसेच खारीचा वाटा ह क्षुद्र ठरूच शकत नाही. उलट खारीचा वाटा उचलणे म्हणजे ध्येयाने प्रेरीत होवून प्रसंगी जिवाची अथवा परीणामाची तमा न बाळगता एखाद्या कार्यात सर्वस्व झोकून उतरणे होय. त्यासाठी फार गट्स लागतात आणी अव्याभीचारी नीष्ठा सूधा..... फक्त महामूर्खच खारीचा वाटा कवडीमोल मानू शकतात

kamalakant samant's picture

29 Nov 2010 - 1:36 pm | kamalakant samant

मुळात गा॑धीवाद म्हणजे काय ?
सत्य,अहि॑सा,उपोषण,स्वय॑पूर्ण खेडे इत्यादि मिळून गा॑धीवाद असावा.
त्यातील सत्य व अहि॑सा या प्रमुख गोष्टी होत्.पर॑तु राष्ट्रीय जीवनात त्या॑चा अतिरेक होउ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे होते.तिथे दुटप्पीपणा दिसतो.भगतसि॑गा॑च्या फाशीमाफी अर्जावर सही करण्यास नकार देणे व श्रद्धान॑दा॑च्या मारेकरयाला
हुतात्मा म्हणण्याचे कारण नाही.
बरे अहि॑सा म्हणजे हि॑सा करण्याची ताकद अ॑गात असताना दाखविली जाते ती अहि॑सा.बाकी सर्व भ्याडपणाच ठरतो.
आपल्यातील गुणा॑मुळे राष्ट्राचे वा समाजाचे नुकसान होणार असेल तर त्या॑चा उपयोग काय?
म.गा॑धी॑च्या अ॑गी अनेक चा॑गले गुण असूनसुद्धा खेदाने म्हणावे लागते की सदगुणा॑चा अतिरेक नको.
थोडक्यात काय्,वैयक्तिक जीवनात सत्य,अहि॑सा ठीक आहे.पर॑तु राष्ट्रीय जीवनात सावरकर नीतीच उपयोगी येइल
असे वाटते.(या स॑दर्भात जय॑तराव टिळका॑नी १९६० मध्ये स्वात॑त्र्यविरा॑ची घेतलेली मुलाखत जरूर वाचावी.खूप न॑तर
ही छापली गेली.१९६० मध्ये सावरकरा॑नी आपल्याला धोका चीनकडून आहे व चीन कुठून आक्रमण करेल याचे
तपशीलवार विवेचन केले होते.ते सुद्धा हातात नकाशा न घेता.याला म्हणतात द्र्ष्टा.
सर्वा॑चेच योगदान महत्वाचे पण राष्ट्र पुढे न्यायचे असेल तर राष्ट्रव्रुत्तीच हवी.

नगरीनिरंजन's picture

29 Nov 2010 - 1:40 pm | नगरीनिरंजन

सहमत आहे. अध्यात्मिक पातळीला जाणारे विचार राष्ट्रासाठी लावले जाऊ नयेत. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला राष्ट्राला गाल नसतात.

आत्मशून्य's picture

1 Dec 2010 - 5:39 pm | आत्मशून्य

या स॑दर्भात जय॑तराव टिळका॑नी १९६० मध्ये स्वात॑त्र्यविरा॑ची घेतलेली मुलाखत जरूर वाचावी.
अंतरजालावर हे कोठे वाचायला मिळेल काय ?

आ॑तरजालावर माहीत नाही.पर॑तु केसरी-मराठा स॑स्थेतर्फे सह्याद्रि म्हणून मासिक कि॑वा त्रैमासिक पूर्वी निघत असे.
त्याच्या रौप्यमहोत्सवी कि॑वा अम्रुत महोत्सवी वर्षात ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती.साधारणपणे १९७५-१९८० च्या
दरम्यान ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती.सावरकरा॑च्या साहित्यावर वा मुलाखतीवर सरकारने,मुलाखत घेतल्याच्या रात्रीच ब॑दी घातल्याने ती उशिरा प्रसिद्ध झाली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jan 2012 - 3:23 pm | पुण्याचे वटवाघूळ

मिसळपाववर जुने लेख चाळताना हा लेख मिळाला. आज महात्मा गांधींची ६४ वी पुण्यतिथी. त्यांना श्रध्दांजली.