अधुरी प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
25 Nov 2010 - 3:05 pm

अधुरी प्रेम कहाणी
का पुन्हा पुन्हा मी शोधते
त्या भुत काळातल्या वाटा.
का दु:ख्ख करुन घेते.
जेंव्हा पायी रुततो काटा

बसता अशा कातर वेळी
कानी कोण गुणगुणे गाणी?
झोंबताना ह्या कोवळ्या तनुस
कोण करते भलतीच मागणी?

ज्याने ह्रुदयास पीडा दिली
तोच कसा ह्रदयी बसला?
कोवळ्या मम तनुस छेडुन
यौवन कसे जागवून गेला.

कसा मी विसरु त्याला
तो रोम रोमात भिनला
सारखा तो आठवतो का?
जो जखमा देवुन गेला

तुझी लागलेली हि आस
हा भास कि आभास आहे
तु आता माझा नाहि
हे मज का उमगत नाहि?

केंव्हा सरेल ति माझी
काळरात्र घनघोर अंधारी?
कधि उजाडणार मम जिवनी
ति पहाट सोनेरी?

काय सांगु काय बोलु
मन माझे था~यावर नाहि
दाटुन येते निर नयनि
लिहिताना अधुरी प्रेम कहाणी

अविनाश...

करुणप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

25 Nov 2010 - 3:47 pm | प्रकाश१११

अधुरी प्रेम कहाणी
का पुन्हा पुन्हा मी शोधते
त्या भुत काळातल्या वाटा.
का दु:ख्ख करुन घेते.
जेंव्हा पायी रुततो काटा

मित्रा हे मात्र छान .
आवडले .मनापासूनन लिहिलेस रे !!

गणेशा's picture

25 Nov 2010 - 5:05 pm | गणेशा

छान