कर्ण हा दानशूर होता, पराक्रमी होता पण त्याचावर खरच अन्याय झाला होता का ?

आत्मशून्य's picture
आत्मशून्य in काथ्याकूट
22 Nov 2010 - 8:45 pm
गाभा: 

मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची आई कून्ती कोणत्याही राज्याची राणी अथवा सून असताना झाला न्हवता,नीयोग क्रीया म्हणून तर नक्कीच न्हवे. मग केवळ कून्ती पूत्र म्हणून कर्ण हा पांडव अथवा एखाद्या राज्याचा वारस ठरतो काय ? कर्ण दानशूर होता, पराक्रमी होता म्हणून त्त्याने स्वतःचे राज्य बहूबळावर निर्माण करणे योग्यच आहे, त्या़स् क्षत्रिय न मानणे हे चूक आणी अन्यायकारकच. पण प्रश्न हा आहे की तो राज्यपदाचा वारस होता काय , जर नाही तर त्याने केवळ रज्य मिळवन्यासाठी चूकीच्या लोकान्ची साथ दिली असेच म्हटले पाहीजे म्हणजे दानशूर, पराक्रमी आणी स्वार्थी कर्ण, ज्याला त्याच्या पापाची फळे म्हणून त्यापेक्षा कमी पराक्रमी व्यक्ती कडून पराभव माथी आला.

प्रतिक्रिया

विकास's picture

22 Nov 2010 - 9:04 pm | विकास

यावरून दाजीशास्त्री पणशीकरांचे, "कर्ण खरा कोण होता?" हे पुस्तक वाचावेत...

आत्मशून्य's picture

22 Nov 2010 - 9:48 pm | आत्मशून्य

मला कल्पना न्हवती की असे पूस्तक आहे, मि कायमच म्रूत्यून्ज्यय वाचले आहे. आणी भाषाशैली त्याचि ऊत्तम असून सूध्दा मला वर्णन क्रूत्रीमच वाटायचे. असो हे पहा

तिमा's picture

23 Nov 2010 - 1:21 pm | तिमा

त्याचे शुध्दलेखनही चांगले नसावे असे या धाग्यावरुन वाटते आहे.

आत्मशून्य's picture

23 Nov 2010 - 5:15 pm | आत्मशून्य

.

डावखुरा's picture

22 Nov 2010 - 9:28 pm | डावखुरा

धन्यवाद विकास भाउ नक्किच वाचतो..
पुस्तक सुचविण्यसाठी आभारी..

पण काय हो काम धंदा नावाचे नवे संकेतस्थळ सापडले काय?

शुचि's picture

22 Nov 2010 - 10:13 pm | शुचि

निशस्त्र असताना दुसर्‍या योद्ध्या कडून मृत्यू येणे म्हणजे अन्यायच आहे.

सुनील's picture

22 Nov 2010 - 10:34 pm | सुनील

क्व ते धर्मस्तदा गतः

निशस्त्र असताना दुसर्‍या योद्ध्या कडून मृत्यू येणे म्हणजे अन्यायच आहे.
कैच्या कैच! नि:शस्त्र माणसावर हल्ला करणारांच्या पुण्यतिथी साजर्‍या होतात हे ठाउक नाही काय?

भारी समर्थ's picture

22 Nov 2010 - 10:26 pm | भारी समर्थ

युगान्त वाचा... त्यात बव्हंशी पांडवांचा आणि कृष्णाचा उदो उदो तर कौरवांचा आणि कर्णाचा धिक्कार केला आहे (आणि तरीही ते एक न्युट्रल पुस्तक आहे असे जाणकारांचे मत!)... तेवढीच दुसरी बाजूही घालावी नजरेखालून...

भारी समर्थ

पराची मते वाचायला आवडतील या विषयावरची.

From Drop Box" alt="" />

हे घेउन येतो.

मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची आई कून्ती कोणत्याही राज्याची राणी अथवा सून असताना झाला न्हवता,
नीयोग क्रीया म्हणून तर नक्कीच न्हवे. मग केवळ कून्ती पूत्र म्हणून कर्ण हा पांडव अथवा एखाद्या राज्याचा वारस ठरतो काय ?
- निश्चितच नाही

कर्ण दानशूर होता, पराक्रमी होता म्हणून त्त्याने स्वतःचे राज्य बहूबळावर निर्माण करणे योग्यच आहे, - हा चान्स त्यानं दुर्योधनाचा मित्र् होउन घालवला होता.

त्या़स् क्षत्रिय न मानणे हे चूक आणी अन्यायकारकच. - त्या काळांत वर्णं हे जन्मानेच ठरायचे क्रुती किंवा कर्तुत्वाने नाही.

पण प्रश्न हा आहे की तो राज्यपदाचा वारस होता काय , जर नाही तर त्याने केवळ रज्य मिळवन्यासाठी - त्यानं राज्य स्वतासाठी कधीच मिळ्वण्याचा प्रयत्न केला नाही किंवा राज्यपदावर हकक सांगित्ला नाही. तो त्याला मिळालेल्या अंगदेशाच्या सत्तेत खुष होत्ता. इथे लो एम इस क्राइम असं वाटतं.

जर नाही तर त्याने केवळ रज्य मिळवन्यासाठी चूकीच्या लोकान्ची साथ दिली असेच म्हटले पाहीजे - नॅसर्गिक न्यायाच्या बाजुने पाहता दुर्योधन फार चुक नव्हताच.

म्हणजे दानशूर, पराक्रमी आणी स्वार्थी कर्ण, ज्याला त्याच्या पापाची फळे म्हणून त्यापेक्षा कमी पराक्रमी व्यक्ती कडून पराभव माथी आला. - अर्जुन कर्णापेक्षा कमी पराक्रमी कधीच नव्हता, त्याला मारण्याआधी अर्जुनाने त्याला ब-याच वेळा पराभुत केले होते. उदा - विराटाच्या गायी कॉरवांनी पळविल्यानंतर्चे युद्ध. तसेच महाभारताच्या मुख्य युद्धात सुद्धा तो ब-याच वेळा पराभुत झाला होता.

दुर्यूधनामुळे कर्णाचं जेवढे नुकसान झालं त्यापेक्षा जास्त नुकसान दुर्योधनाचं त्याच्यामुळं झालं, आणि तरीही दुर्योधनानं त्याची पाठराखण केली ह्यात खरं तर त्याचा सन्मान होता.

हर्षद

237 वाचने

237 वाचने मु

कसे काय ? पांडवाना एक अत्यन्त खराब जागा (केवळ जन्गल) असलेला जमीनिचा तूकडा फेक्न्यात आला. त्याचे त्यानी सम्राज्य नीर्माण केले हे बघून दुर्योधनाचा जळ्फळाट झाला आणी आता ती DEVELOPED जमीन सूध्दा हडप करण्यासाठी त्याने जन्ग जन्ग पछाडले, पांडवाना म्रूत्यूच्या खाइत लोटले, राज्याबाहेर हाक्लून दिले, Molestation, Abuse असे अत्यन्त गम्भीर गून्हे केले पाठीत सूरा खूपसला आणी हे आपण नॅसर्गिक मानायचे ?

...... मनुष्य अजून किती युगे इतिहासाचे वझे उरा-खांद्यावर बागळणार आहे, राम जाने.

ए.चंद्रशेखर's picture

23 Nov 2010 - 7:22 am | ए.चंद्रशेखर

निरनिराळ्या लेखकांनी केलेल्या ललित लेखनामधले (व्यास मुनी धरून) कर्ण हे एक पात्र आहे. त्याच्यावर अन्याय झाला की त्याच्यावर कोणी लोभ केला या चर्चा पूर्णपणे निष्कारण वाटतात. कथा कादंबर्‍या मधली पात्रे किंवा टीव्ही मालिकांमधली पात्रे अमुक पद्धतीने का वागली ही चर्चा सगळीकडे चालू असते. प्रस्तुत चर्चा ही त्यातलाच एक प्रकार आहे असे वाटते.

प्रियाली's picture

23 Nov 2010 - 7:23 am | प्रियाली

युगान्त, मृत्युंजय, राधेय वाचा, कर्ण खरा कोण होता वाचा. हे वाचा आणि ते वाचा.

पण महाभारत कधी वाचणार? वरची सर्व पुस्तके वाचण्यापेक्षा महाभारतच वाचा की. :)

ए.चंद्रशेखर's picture

23 Nov 2010 - 7:28 am | ए.चंद्रशेखर

युगान्त, मृत्युंजय, राधेय ही पुस्तके आणि महाभारत यात फरक असा काय आहे. सगळेच ललित लेखन आहे. कोणतेही वाचावे.

प्रियाली's picture

23 Nov 2010 - 7:30 am | प्रियाली

फरक इतकाच आहे की त्यातला एक स्वतःच्या मुळांवर जमिनीत रोवून उभा असलेला वृक्ष आहे आणि बाकीची त्या वृक्षावर लटकणारी बांडगुळं; स्वतंत्र अस्तित्व नसणारी.

प्रचेतस's picture

23 Nov 2010 - 1:41 pm | प्रचेतस

कर्णाच्या पराभवाचे महाभारतात अनेक दाखले आहेत.
द्वैतवनातील घोषयात्रेत पांडवांना खिजवण्यासाठी गेलेल्या दुर्योधनाचा कर्णासहीत चित्ररथ गंधर्वांकडून झालेला पराभव. विराटनगरीत उत्तरगोग्रहणप्रसंगी अर्जुनाकडून झालेला पराभव. युद्धात घटोत्कचाकडून कर्णाचा पराभव पण शेवटी इंद्राने दिलेली शक्ती सोडून घटोत्कच वध. ऐन युद्धात भीमाकडून कर्णाचा ४ वेळा पराभव यात शेवटी मात्र कर्णाकडून भीम निरस्त्र केला जातो. पण मारण्याऐवजी वाग्बाणांनी तो भीमाला जखमी करतो. त्यानंतर अर्जुनाकडून कर्णाचा पराभव. भीमाचे कर्णाच्या डोळ्यांदेखत दुशा:सन वध व कर्णाचे हतबल होउन पाहात राहाणे. व शेवटी अर्जुनहस्ते कर्णवध. पण कर्ण जरी येथे पदाती असला (भूमीने रथचक्र गिळल्यामुळे) तरी त्याच्या हाती शस्त्र होतेच. त्यामुळे तो वधास पात्र ठरतो. त्यामुळे कर्ण शूर जरी होता तरी तो अजेय नव्हता असे महाभारत म्हणते.

छोटा डॉन's picture

23 Nov 2010 - 5:09 pm | छोटा डॉन

उत्तम प्रतिसाद.
पण तरीही काही बाबी पटल्या नाहीत.

>> पण कर्ण जरी येथे पदाती असला (भूमीने रथचक्र गिळल्यामुळे) तरी त्याच्या हाती शस्त्र होतेच. त्यामुळे तो वधास पात्र ठरतो.
चुक.
असा युद्धाचा नियम नव्हता.
'रथातुन लढणार्‍याने केवळ रथातुन लढणार्‍याशीच, घोडेस्वाराने घोडेस्वाराशीच आणि पदातीने पदातीशीच युद्ध करावे' हा नियम खुद्द गुरु द्रोणांनी घालुन दिला होता.
रथाचे चाक भुमीने गिळल्यावर जरी कर्ण पायात धनुष्य पकडुन एका हाताने बाण सोडत असेल आणि दुसर्‍या हाताने चाक बाहेर काढत असेल तरी तो 'रथावर स्वार असलेल्या अर्जुना'बरोबर युद्ध खेळण्यास नियमाप्रमाणे लायक ठरत नाही.

नियम नि:शस्त्र असण्याचा नव्हे तर कोणी कोणाशी लढावे ह्याबद्दल होता.

>> युद्धात घटोत्कचाकडून कर्णाचा पराभव पण शेवटी इंद्राने दिलेली शक्ती सोडून घटोत्कच वध
१००% सहमत होऊ शकत नाही.
मायावी घटोत्कचाच्या मायावी युद्धामुळे कर्ण जरी त्रस्त झाला असला तरी पराभुत झाला नव्हता किंवा रणभुमी सोडुन पळुन गेला नव्हता.
मात्र घटोत्कचाकडुन कौरव सेनेचा होणारा भयंकर संहार आणि त्याचा कुणालाही न आवरणारा अनिर्बंध तांडव पाहुन संपुर्ण सेनेलाच समोर मृत्यु दिसु लागला व त्यांनी कर्णाकडे 'प्राणदान' मागितले. सैनिकांचे प्राण तातडीने वाचवणे आवश्यक असल्याने कर्णाला अर्जुनासाठी राखुन ठेवलेली व इंद्राने दिलेली अमोघ वैजयंती शक्ती वापरावी लागली.
मात्र ह्यात मला त्याअधी कर्ण 'पराभुत' झाला असल्याचे कुठे दिसले नाही.

कमी-जास्त आणि चुकभुल द्यावी घ्यावी.

- छोटा डॉन

प्रचेतस's picture

24 Nov 2010 - 8:50 am | प्रचेतस

>>रथातुन लढणार्‍याने केवळ रथातुन लढणार्‍याशीच, घोडेस्वाराने घोडेस्वाराशीच आणि पदातीने पदातीशीच युद्ध करावे' हा नियम खुद्द गुरु द्रोणांनी घालुन दिला होता.

हा नियम द्रोणांनी नाही तर भीष्मांनी घालून दिला होता. भीष्मवधानंतर अभिमन्यू च्या पराक्रमापर्यंत युद्ध नियमाला धरूनच चालले होते. पण अभिमन्यू वधात सर्व नियमांना तिलांजली दिली गेली. स्वतः गुरु द्रोण, कर्ण, अश्वथ्थामा, दुर्योधन,कृपाचार्य व बृहद्दल हे सहा महारथी अभिमन्यू वधात सहभागी होतेच. पैकी बृहद्दलाचा वध अभिमन्यूने केला. व नंतर स्वतः मारला गेला. त्यांनंतर मात्र सर्व युद्ध नियमांना सोडूनच लढले गेले. याला कर्णवधही अपवाद नाहीच. तरीही तांत्रिकदृष्ट्या कर्ण हाती शस्त्र असल्याने वधास पात्र ठरतोच. अर्थात ही निती पण श्रीकृष्णाचीच.:)

>>युद्धात घटोत्कचाकडून कर्णाचा पराभव पण शेवटी इंद्राने दिलेली शक्ती सोडून घटोत्कच वध
१००% सहमत होऊ शकत नाही.

मान्य. कर्णाचा पराभव झाला नसला तरी कर्ण पुर्णपणे संत्रस्त झाला होताच.

मृत्युन्जय's picture

26 Nov 2010 - 5:26 pm | मृत्युन्जय

कर्णाच्या पराभवाचे महाभारतात अनेक दाखले आहेत.

महाभारतातले एक तरी पात्र दाखवा की ज्याचा कधी पराभव झाला नाही.

द्वैतवनातील घोषयात्रेत पांडवांना खिजवण्यासाठी गेलेल्या दुर्योधनाचा कर्णासहीत चित्ररथ गंधर्वांकडून झालेला पराभव. विराटनगरीत उत्तरगोग्रहणप्रसंगी अर्जुनाकडून झालेला पराभव.

मग?

युद्धात घटोत्कचाकडून कर्णाचा पराभव पण शेवटी इंद्राने दिलेली शक्ती सोडून घटोत्कच वध.

त्या युद्धात कर्णाने घटोत्कचाचा अनेकवेळा पराभव केला. घटोत्कच पळुन गेला. परत आल्यावर अश्वत्थाम्याशी युद्ध केले. हारला. परत गेला. अश्वत्थामा - भीम युद्धात जेव्हा भीम हरायला लागला तेव्हा परत आला. शेवटी रात्र झाल्यावर त्याच्यातल्या "पाशवी" शक्ती जागृत झाल्या (येथे मिपा अर्थ काढु नये) आणि त्यानंतर तो आवरेनासा झाल्यावर कर्णाने शक्ती वापरली. यात कर्ण नक्की कुठे हरला ते कळत नाही.

ऐन युद्धात भीमाकडून कर्णाचा ४ वेळा पराभव यात शेवटी मात्र कर्णाकडून भीम निरस्त्र केला जातो. पण मारण्याऐवजी वाग्बाणांनी तो भीमाला जखमी करतो.

कर्ण एकदा हरला एकदा जिंकला. हरला तेव्हा तो भीमाला जीवे मारु नये यासाठी प्रयत्नशील होता (कुंतीला दिलेले वचन). भीम जेव्हा पुर्ण निरस्त्र झाला , आगतिक झाला तेव्हा कर्णाने त्याचा अपमान करुन त्याला सोडुन दिले.

त्यानंतर अर्जुनाकडून कर्णाचा पराभव.

कर्णासमोरुन अर्जुनाचे पळुन जाण्याचे पण वर्णन करा की.

पण कर्ण जरी येथे पदाती असला (भूमीने रथचक्र गिळल्यामुळे) तरी त्याच्या हाती शस्त्र होतेच. त्यामुळे तो वधास पात्र ठरतो. त्यामुळे कर्ण शूर जरी होता तरी तो अजेय नव्हता असे महाभारत म्हणते.

महाभारतातील वर्णनाप्रमाणे त्याच्या हातात शस्त्र नव्हते. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत घुसले. कर्णाने रथातुन खाली उडी मारली. अर्जुनाला थांबण्याची विनंती केली. पणा अर्जुनाने ऐकले नाही. मग दोघांनीही युद्ध केले. त्यावेळेस कर्ण पदाती पण सशस्त्र होता. नंतर तो परत रथावर चढला. रथ हालत नव्हता दोघांनी एकमेकांवर ब्रह्मास्त्रं चालवली. त्यानंतर कर्णाच्या बाणांनी अर्जुन बेशुद्ध पडला. कर्ण परत रथातुन खाली उतरला त्यावेळेस त्याच्या हातात शस्त्र नव्हते. अर्जुन सावध झाला आणी कृष्णाच्या सांगण्यावरुन अंजलिक नावाच्या बाणाने त्याने कर्णाला तो निशस्त्र आणि पदाती असताना मारले.

हे सगळे वर्णन किसारी मोहन गांगुली भाषांतरीत महाभारतात आहे. गांगुलींचे भाषांतर मूळ महाभारताचे भाषांतर मानले जाते.

शिल्पा ब's picture

27 Nov 2010 - 12:53 pm | शिल्पा ब

प्रतिसाद आवडला

कर्णप्रेमी

मिसळभोक्ता's picture

23 Nov 2010 - 9:25 am | मिसळभोक्ता

माझे एक ऐका.. पुढची अनेक वर्षे रोजचे वर्तमानपत्र देखील वाचू नका... (हे कुठेतरी वाचल्यासारखे वाटत असेल, तर तो तुमचा फाल्ट आहे)

महाभारत लिहिणार्‍याने कधी वर्तमानपत्र वाचले नाही, किंवा आणखी काहीही वाचले नाही, अथवा वाचले अशी कुठेही नोंद नाही.

त्यामुळेच तर तो महाभारत लिहिता झाला.

तेव्हा, काहीही वाचू नका. लिहीत रहा.

काय लिहिलं आहे ते देखील वाचलं नाही आहे. (हिंटः शुद्धलेखन..)

अप्पा जोगळेकर's picture

23 Nov 2010 - 9:19 am | अप्पा जोगळेकर

चु* होता.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2010 - 10:44 am | परिकथेतील राजकुमार

चु* होता.
प्रेषक अप्पाजोगळेकर दि. मंगळ, 23/11/2010 - 09:19.
चु* होता.

नशिब अप्पाजोगळेकरां विषयी कर्ण मत नोंदवू शकत नाही :)

स्वानन्द's picture

23 Nov 2010 - 10:53 am | स्वानन्द

हा हा... अगदी असेच म्हणतो!

+१

कर्णाने मत नोंदवयच्या ऐवजी बाण मारले असते तर याची अजुन पंचाईत झाली असती.
कुठे कुठे घुसले असते बाण्....कर्णच जाणो :P

कुसंगती हा त्याचा सगळ्यात मोठा दोष होता असे मला वाटते ..
त्या मुळे त्याचे दैवी गुण सुद्धा प्रभावहीन ठरले .

आनंद कवठेकर's picture

23 Nov 2010 - 7:36 pm | आनंद कवठेकर

श्रीक्रुशनाने कर्नाची कवच कुन्दले मगुन घेतलि त्या बद्दल कय मनतय.

कर्ण हा दानशूर होता आणि एक श्रेष्ठ धनुर्धर होता. त्याने मरेपर्यंत दुर्योधनाची साथ सोडली नाही. अंग देशाच्या प्रजेला चांगले प्रशासन देऊन सुखी केले या त्याच्या जमेच्या बाजू, पण त्याहून अधिक घातक ठरले ते त्याचे दुर्गुण. शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय' वाचून आपल्याला कर्णाबद्दल आत्मीयता वाटते. हा सावंतांच्या लेखणीचा चमत्कार. पण कर्णाबद्दल मूळ महाभारतातील नोंदी वाचल्या तर तो तेवढी स्तुती करण्याच्या लायकीचा नव्हता.

त्याचा बालपणापासूनचा पहिला दुर्गुण म्हणजे मत्सर. अर्जुनाला तो कायम पाण्यात पाहात असे. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हटले, की कर्णाचा जळफळाट होत असे. हा दीर्घद्वेष त्याने मरेपर्यंत जपला. अर्जुनाला ब्रह्मास्त्रविद्या प्राप्त झाली ती आपल्यालाही मिळावी म्हणून हा परशुरामांशी खोटे बोलून त्यांच्याकडे शिष्य म्हणून राहिला आणि शेवटी शापाचा धनी झाला. कर्णाचा उतावळा स्वभाव बघता त्याने अर्जुनाला संपवण्यासाठी ब्रम्हास्त्राचाही वापर केला असता.

कर्णाचा दुसरा दुर्गुण म्हणजे लंपटपणा. द्रौपदीने स्वयंवरात 'मी सूतपुत्राला वरणार नाही' असे स्पष्ट केल्यानंतर वास्तविक कर्णाने तिची अभिलाषा सोडायला हवी होती. स्वयंवर याचाच अर्थ राजकन्येला स्वतःचा साथीदार निवडण्याचा दिलेला अधिकार. द्रौपदीने तो बजावला. कर्ण मात्र पुढच्या आयुष्यात द्रौपदीकडे विषयासक्त नजरेने बघत राहिला. तिला पाचजणांबरोबर राहाणारी वेश्या म्हणणे आणि तिचे वस्त्र फेडण्याची दु:शासनाला सूचना करणे यातून ही वासना पुढे दिसून आली.

कर्णाचा तिसरा दुर्गुण म्हणजे त्याची दुष्टबुद्धी. पांडव वनवासात एकवस्त्रानिशी राहात असताना मुद्दाम तेथे जाऊन त्यांना खिजवण्याचा सल्ला दुर्योधनाला देण्याची दुष्टबुद्धी कर्णाचीच. गर्विष्टपणा तर अंगात भरलेला. त्या उन्मादात तो द्रोण व भीष्म अशा वडीलधार्‍यांना वाट्टेल ते टाकून बोलला आहे.

कर्णाला संगत वाईट होती, असे म्हणता येणार नाही. दुर्योधन हा पांडवांशी त्याचे हाडवैर सोडता एरवी उत्तम युवराज होता. त्याच्या अमलात हस्तिनापूरची प्रजा सुखी होती. दुर्योधनाबद्दल लोक चांगले बोलत असल्याचे हेराने सांगताच द्रौपदीने दातओठ खाल्ले होते (वनपर्व). बाकी दु:शासन आणि शकुनिमामाशी कर्ण फारसा मैत्री राखून नव्हता. त्याला दोन चांगले मित्र होते. विचारी अश्वत्थामा आणि त्याचा स्वतःचा भाऊ विकर्ण. पण खरे सांगायचे तर कर्णाची आणि शकुनिमामाची घाणेरडी संगत दुर्योधनाला नडली.

अर्जुन हा कर्णापेक्षा श्रेष्ठ होता, याचे दोन पुरावे आहेत.
ज्या चित्ररथ गंधर्वाने मायावी युद्धात कर्ण आणि दुर्योधनाला पराभूत केले त्या चित्ररथ गंधर्वाचा तशाच मायावी युद्धात अर्जुनाने पूर्वी पराभव केला होता.
अर्जुनाकडे कवच कुंडले नसतानाही त्याने भल्याभल्यांना धूळ चारली होती. पण कर्णाकडील कवचकुंडले आणि वासवी शक्ती गेल्यावर तो दात काढलेला नाग झाला होता.

अर्धवटराव's picture

24 Nov 2010 - 7:18 am | अर्धवटराव

आयला... या धाग्यावर इतके प्रतीसाद बघून मनोरंजनाच्या उद्देशाने धागा उघडला... तर इथे अक्षरशः विषयाला धरून मुद्देसूद चर्चा चाललीय. एव्हाना महाभारतातील युद्धाने तोंडात बोटे घालावी अश्या खडाजंगी; आणि व्यासाने महाभारत रचून केलेल्या चुकीने पश्चात्तापी होउन स्वतःचे कान धरावे अश्या कमेंट्स अपेक्षीत होत्या.
शुची तैंचे भक्तीपर लेख आणि माऊंच्या ध्यानधारणेच्या शिबीराचा हा परिणाम असावा काय ?
अहो तात्या सुद्धा चकार शब्द बोलले नाहित या धाग्यावर म्हणजे काय..

अर्थात, मिपाच्या या सुधारीत आवृत्तीचा आम्हाला आनंदच आहे.

(कर्णप्रेमी) अर्धवटराव

मी नव्हतो तेव्हा, नाहीतर कदाचित तुमच्या प्रश्नाला उत्तर देता आलं असतं मला !!

कर्ण वयाने सर्वात मोठा होता. इरावती कर्वेंच्या मते तो अर्जूनापेक्षा वयाने किमान पंधरा वर्षानी मोठा होता.
त्याने अर्जूनाशी वैर द्रोणाचार्‍यानी केलेल्या अपमानामुळे धरले होते.
तो शूर होता पण अजेय मात्र नव्हता . त्याची कवचकुंडले कृष्णाने नव्हे तर इंद्राने अर्जूनासाठी मागून नेली होती.
कर्णाचा उदारपण ही त्याची सद्गुण विकृती होती.
त्याचा वध हा कपटाने केला गेला नाही. तो त्यावेळेस सशस्त्र होता. अर्जूनाने त्याचा वध केला ते यूद्ध नीतीस धरूनच होते.
मनातून तो सदैव अपमानीत असे. त्याला पांडवांबद्दल असूया वाटत असे.
कर्णावर अन्याय झाला असे वाटत नाही . दुर्योधनाने कर्ण हा सूतपुत्र आहे हे माहीत असूनही कर्णाला राजा बनवले होते.
कर्ण कुंतीचा मुलगा नसता तर त्याला जे मिळाले ते खूपच होते

कवितानागेश's picture

24 Nov 2010 - 7:42 pm | कवितानागेश

कर्णाचा नि:शस्त्र(?) असताना वध हा अभिमन्यूचा वधाचाच घेतलेला एकाप्रकारे सूड होता.
दिलेल्या नियमांप्रमाणे युद्ध फक्त भीष्मपितामह त्यात सहभागी असेपर्यन्त सुरु होते.
नंतर झालेले प्रकार म्हणजे केवळ सूडाचा भयानक प्रवास होता, तो अश्वत्थाम्याचा मणी काढून घेइपर्यन्त चालूच होता.
अवांतर भयानक सल्ला:
कुणाला खरोखरच "काय काय" झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता (खाज) असेल, तर एक मार्ग आहे.
अश्वत्थामा अजून जिवंत आहे म्हणतात! पंजाब-हिमाचल मध्ये व नर्मदाकिनारीदेखिल तो भेटल्याचे लोक सांगतात. तिथे रानावनात 'तेल' घेउन फिरावे. तो बरोब्बर समोर येउन उभा राहील, त्याला काय ते इच्चारुन घ्या.

हजारो वर्षापूर्वी काय झाले ते कळणार कसे आणि कळले तर तेच खरे हे कशाच्या आधारावर?
व्यासांनी लिहिलेलेच महाभारत आता कसे काय मिळणार?
आणि समजा झाला असेल कर्णावर अन्याय तर आता आपण काय करू शकतो? चर्चा सोडून? आणि तीसुद्धा नेमकी कशाच्या आधारावर?

बाकी वरील काही प्रतिसादांवरून अर्जुन अगदी सद्गुणाचा पुतळाच होता असे दिसतेय...

kamalakant samant's picture

27 Nov 2010 - 11:35 am | kamalakant samant

द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळचे कर्णाचे वर्तन पाहता
तो कितीही पराक्रमी वा दानशूर असला तरी वध करण्यास
योग्यच होता.
मध्ये एक मराठी साहित्यात लाटच आली होती की ज्या॑ना
इतिहासाने दुय्यम ठरविले त्या॑ना नायक बनविणे.
म्हणूनच काद॑बरया कि॑वा ललित साहित्यात कर्णाला थोडे
वरचे स्थान दिलेले दिसते.