टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
२६००० रु. ची साडी !!!!!
प्रेषक मदनबाण ( सोम, ०४/२१/२००८ - १९:१६) .
आत्ताच करवीर नगरी ला भेट देणे झाले.....
महालक्ष्मी मंदीर देवस्थानाच्या ऑफिस मधे मला एका भाविकाने देवीला अर्पण केलेली २६००० रु.किंमतीची साडी पहावयास मिळाली.
ती अशी होती.....

(महालक्ष्मीचा दास)
मदनबाण
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


वा
मला आवडली साडी पण २६०००? कुणाला परवडत असेल? वर्क खूप नाजुक आहे त्यावरचं....
छानच !
कोल्हापुरच्या महालक्ष्मीला नवरात्री त नऊ दिवस उत्तमोत्तम साड्या नेसवल्या जातात, त्या अतिशय महाग तर असतात पण, दसर्याच्या दिवशी सुमारे एक लाखाची साडी तिरूपती बालाजी वरुन येते व तिचा मान खुप असतो. त्या नेसवलेल्या साड्या न॑तर अर्धा कि॑मतीत विकत मिळ्तात.
हो का
हे नव्हतं माहित मला..बापरे लाखाची साडी पहायला मिळाली तरी भाग्य म्हणायचं....
पैशांचा झगमगाट!
महालक्ष्मी मंदीर देवस्थानाच्या ऑफिस मधे मला एका भाविकाने देवीला अर्पण केलेली २६००० रु.किंमतीची साडी पहावयास मिळाली.
का रे बाबा? तिथे एखाद्या गरीब मावशीने पाच रुपायाचा खणही देवीला अर्पण केला असेल ना? मग तो नाही तुला दिसला? त्याचा फोटो नाही दिलास? ह्या साडीचा मात्र दिलास! का? तर ती २६००० ची आहे म्हणून?
साली पैशाच्या झगमगाटापुढे दुनिया भुलते हेच खरं!
त्यापेक्षा हेच २६००० रुपये जर त्या भाविकाने महर्षी कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेला किंवा वनवासी कल्याण आश्रमासारख्या एखाद्या संस्थेला दिले असते तर ते महालक्ष्मीला अधिक भावले असते! हजारो रुपयांच्या साड्या दान करण्याच्या दिखाऊपणावर देवी कधीच प्रसन्न होत नसते!
अर्थात, ही माझी वैक्तिगत मतं!
आपला,
(करवीरनिवासिनीचा भक्त!) तात्या.
ह्म्म
ह्म्म सहमत... पण असं होत नाही.. लालबागचा गणपती, आणि दगडुशेठचा गणपती यांना दरवर्षी गणपती-उत्सवात जास्तीत जास्त काय मिळतं दानपेटीत (उदा: सोन्याचे सिंहासन वगैरे!) याचे फोटो येतातच.. तसेच हे..
मला तर ही साडी २६,००० ची पण वाटली नाही.. म्हणजे खूप महाग म्हणून सुंदर आहे,तर तशातला भाग नाही.. निदान मला तरी नाही आवडली.. पण ठीके कुणीतरी पदरचे पैसे (इतके पैसे) घालून दान करतंय (चांगल्या ठीकाणी) ही चांगली बाब...
* बाय द वे तुमच्या प्रतिसादावरून मला आम्ही शाळेत असताना गोळा केलेली वनवासी कल्याण आश्रमाची वर्गणी आठवली! कुणी पैसे देत नाहीत २-५ रु. सुद्धा.. घरूनच काही जास्त रू. घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या नावानी लिहून पाठवावे लागायचे कधी कधी..
विनंती..
कुणी पैसे देत नाहीत २-५ रु. सुद्धा.. घरूनच काही जास्त रू. घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या नावानी लिहून पाठवावे लागायचे कधी कधी..
हम्म! ही दुर्दैवाची बाब आहे!
प्रत्येकाने वर्षातनं एकदा तरी महर्षी कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेला आणि वनवासी कल्याण आश्रमाला यथाशक्ति देणगी दिली पाहिजे असे माझे व्यक्तिगत मत आहे. 'आधी केले मग सांगितले' या उक्तिप्रमाणे मी असे करतो आणि म्हणूनच प्रत्येकाने तसे करावे असे मला व्यक्तिगतरित्या वाटते म्हणून या चार ओळी!
असो, उंची साडीच्या लेखात मध्येच केलेल्या या विषयांतराबद्दल मी सर्व संबंधितांची क्षमा मागतो...
आपला,
तात्या अभ्यंकर,
स्वयंसेवक, भाऊबीज निधी,
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.
पैश्या पेक्षा भावना मोठी.....
का रे बाबा? तिथे एखाद्या गरीब मावशीने पाच रुपायाचा खणही देवीला अर्पण केला असेल ना? मग तो नाही तुला दिसला? त्याचा फोटो नाही दिलास? ह्या साडीचा मात्र दिलास! का? तर ती २६००० ची आहे म्हणून?
तात्या मी कुठल्याही गोष्टीचा फोटो काढताना त्या वस्तुची किंमत ठरवुन मग फोटो काढत नाही.....
२६००० रु. साडी रोज रोज पहावयास मिळ्त नाही,,,,,मला ती दिसली व ती सर्व मि.पा करांना पाहता यावी हाच हा फोटो इथ देण्याचा माझा उद्देश होता.
हजारो रुपयांच्या साड्या दान करण्याच्या दिखाऊपणावर देवी कधीच प्रसन्न होत नसते!
सहमत..... पण ज्याचा त्याचा भाव.....(ज्याला जे अर्पण कराव वाटल त्याने ते केल.)
तुम्ही देवीला कमळ अर्पण करा किंवा साडी..... देणारी तीच असल्यामुळे दिखाऊपणा करणारा हा मुर्खच !!!!!
(देवी दास )
मदनबाण
२६०००
तात्या मी कुठल्याही गोष्टीचा फोटो काढताना त्या वस्तुची किंमत ठरवुन मग फोटो काढत नाही.....
२६००० रु. साडी रोज रोज पहावयास मिळ्त नाही,,,,,
म्हणजेच किंमत पाहून फोटू काढलास ना? नाहीतर साडीच्या किंमतीचा प्रश्न येतोच कुठे?
मला ती दिसली व ती सर्व मि.पा करांना पाहता यावी हाच हा फोटो इथ देण्याचा माझा उद्देश होता.
हे कबूल!
सहमत..... पण ज्याचा त्याचा भाव.....(ज्याला जे अर्पण कराव वाटल त्याने ते केल.)
मलाही माझं मत द्यावसं वाटलं म्हणून मी दिलं!
बाकी चालू द्या..
तात्या.
अरे बापरे!
माझ्या बायकोने नाही मागितली तर फारच छान आहे.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
घाबरू नका..
ही नवर्याने द्यायची नसते. दूसरे कोणी भाविक आणून देतात.
एक लाखाची
नवरा २६-२७००० असा क्षुल्लक किंमतीची नाही.. चांगली लाखभराची साडी घेतो!
तेच...
माझे म्हणणे तेच आहे. एवढ्या क्षुल्लक किमतीची साडी नवर्याने घ्यायची नसते.
माझ्या
माझ्या बायकोने नाही मागितली तर फारच छान आहे.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
त्यानी कडक लक्ष्मी दुर्गेचे स्वरूप धारण केलेकी मग सांगा कसली साडी दिली ते.
दुर्गे दुर्घट भारी .........म्हणणारा विजुभौ.
कडक लक्ष्मी ....
वर्तमान काळही काही वेगळा असतो का तुमच्याकडे?
असो. फोटोतली साडी छान आहे.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
बरं
साडी ओके आहे पण २६०००ची वाटत नाही.
घेणारा गंडलेला दिसतोय.
मदनबाण, जरा साडी उघडून काढायचा होता ना फोटो.. अजून जरा नीट दिसली असती.
जसा भाव तसा देव.
वाचून फर काही नवल वाटले नाही !!
आपल्या पैकी किती लोक दक्षिण भारतात खरेदी करतात हे आधी सांगा !
कारण................गेल्या वर्षांभरा पासून आम्ही बंगळुरला आहोत, ईकडे तेच फॅड आहे, ईथे चिक्कपेठ म्हणुन ऐक.....दक्षिण भारताची प्रसिद्ध कपड्याची बाजार पेठ आहे. काही दुकानात साड्यांची सुरवात २० ते २५ ००० पासुन होते. (माझ्या बायकोला मी सहसा त्या भागात जाऊ देत नाही ).
मागच्या आठवड्यात आमच्या शेजारच्या कामत काकूंच्या मुलाचे लग्न ठरलंय, कांचीपुरम ला जाऊन त्यांनी. नातेवाईकांना आहेराच्या (द्याय-घ्यायच्या) साड्या आणल्यायत त्याही ३ ते ५ ००० च्या प्रत्येकी........
अहो फार दिखाऊ प्रकार आहे ऐकडे..........देवळात जाताना सरासरी दक्षिण भारतीय लोक रेशमी कपडेच घालतात. माझ्या सरख्या पामराला याची कल्पना नव्हती पण आमच्या सौ. सांगतात रस्त्याने जाताना.....हि ५ ची आणि ती १५ ००० ची वगैरे वगैरे ...............
आपणा सर्व मी पाव करांना जाहीर निमंत्रण ..............या आठवड्यात ईस्कॉन चा ब्रम्होत्सव चालू झाला आहे.
कुणाला जर कपडे, फुलं आणी सजावटिच ऐश्वर्य पण बघायचं असेल तर जरुर या...............
(लवकरच फोटो काढून आणतो..............आपल्या सर्वांसाठी)
जसा भाव तसा देव..........हे मात्र पटलं
(लक्ष्मी -नारायण भक्त) आर्य.
चिक्कपेठ
माहित आहे, पण साड्या नीट तपासून घ्याव्या लागतात, नाहीतर घरी आल्यावर मधे फाटकी असल्याचा अनुभव येउ शकतो.
)
नजरभूल खूप चालते. माझ्या मैत्रिणीने फाटकी साडी बदलून आणली. घरी आल्यावर ती पण फाटकी असल्याचे लक्षात आले
मी मागच्या वर्षी जयानगरमधील अंगडीतून साड्या घेतल्या.. काय सिल्क आहे.. १ नंबर..
जे सिल्क साड्यांबद्दल हौशी आहेत त्यांनी जरूर खरेदी करावी साऊथला (पण खात्रीच्या दुकानात.)
सर्व रेंजच्या भरपूर व्हरायटीज मिळतात.
झगमगाट.....
मागे एकदा पुण्यात एका दुकानात जरीचा ब्लाऊज पाहिला. किंमत विचारली तर म्हणाला, 'साडेचार हजार'. मी म्हणालो,'आतल्या बाईसकट नकोय मला, नुसत्या ब्लाऊजची किंमत सांगा.' असो.
मनुष्यप्राणी देवादीकांनाही ऐहिक सुखाची लालूच दाखवायला मागचापुढचा विचार करत नाही. जाऊदे ज्याची त्याची अंधश्रद्धा....
सहमत आहे..
मनुष्यप्राणी देवादीकांनाही ऐहिक सुखाची लालूच दाखवायला मागचापुढचा विचार करत नाही. जाऊदे ज्याची त्याची अंधश्रद्धा....
सहमत आहे...!
देव ह भावाचा भुकेला आहे, उंची साड्यांचा किंवा रत्नजडीत सिंहासनांचा नाही! आणि नेमकं हेच काही अज्ञानी लोकांना समजत नाही आणि ते मारे हजारो रुपयांच्या साड्या देऊन त्याचं प्रदर्शन मांडतात आणि देवीला प्रसन्न करू पाहतात आणि आम्ही त्यांचंच कौतुक करण्यात धन्यता मानतो!
असो...
तात्या.
काळा पैसा
माझ्या मते अश्या महागड्या वस्तु दान करुन काळा पैसा राजरोसपणे पांढरा करता येतो आणि आपल्या पापात देवालापण भागीदार करुन घेता येते.
साडीची किंमत २६च हजार का?
आता कळले साडीची किंमत २६च हजार का आहे ते.. कारण ती नुसतीच तबकात ठेवलेली आहे. देवीला नेसवेलेल्या साडीचा फोटो असता तर प्रत्यक्षात काहीही किंमत असली असती तरी अनमोलच म्हणवली असती !
क्या बात
क्या बात है!
लाख मोलाची गोष्ट बोललीत वेदश्रीताई!
मला वाटते..
मदनबाणने, त्याला ती सोन्याने मढवलेली साडी दिसली आणि अशी गोष्ट सहज पहयला मिळणे दुर्मिळ आहे या विचाराने केवळ तिचा चफोटो घेतला आणि इथे बाकीच्यांना पहाता यावे म्हणून दिला.. ही एकच भावना आहे. ती साडी देवीसाठी कोणी तरी आणली होती हा त्यानंतरचा भाग. त्यामुळे अंधश्रद्धा किंवा पैशाचा माज या गोष्टीना मी तरी इथे महत्व देणार नाही. कारण ही साडी एखाद्या साडीच्या दुकानात जरी पाहिली असती तर मी सुद्धा त्या साडीचा फोटो नक्कीच घेतला असता.
मला ती साडी खूप आवडली... वर्क अतिशय सुंदर आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
:>
>>> आता कळले साडीची किंमत २६च हजार का आहे ते.. कारण ती नुसतीच तबकात ठेवलेली आहे. देवीला नेसवेलेल्या साडीचा फोटो असता तर प्रत्यक्षात काहीही किंमत असली असती तरी अनमोलच म्हणवली असती ! >>>
पण देवीचा फोटो काढण्यास मनाई आहे.
हो ना
मदनबाणने, त्याला ती सोन्याने मढवलेली साडी दिसली आणि अशी गोष्ट सहज पहयला मिळणे दुर्मिळ आहे या विचाराने केवळ तिचा चफोटो घेतला आणि इथे बाकीच्यांना पहाता यावे म्हणून दिला.. ही एकच भावना आहे.
अगदी हेच म्हणते....