घोरणे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
2 Nov 2010 - 9:02 pm
गाभा: 

घोरणे हा एक भयानक रोग/सवय आहे..अश्या माणसाच्या सहवासात झोपणे म्हणजे कठिण काम असते..
पुण्याल होस्टेल मधे असताना माझा एक राजापुरचा पार्टनर होता...
त्याला घोरायची सवय होति..झोप लागली कि काहि मिनिटातच हा प्राणी घोरणे सुरु करायचा..
बर घोरण्याचा आवाज हि टिपेला असायचा..सारे होस्टेल दणाणुन सोडायचा..
एका लयीत त्याचे घोरणे चालायचे..पण मधेच ट्रक जसा गिअर बदलतो तसा हा गिअर बदलायचा..
तो पर्यंत लय व आवाजाचा डेसीबल बदलायचा मग गीअर पडला कि पुन्हा जुन्या लयीत घोरणे सुरु..बायका पण दुपारी.लवंडल्या कि घोरतात..
लग्न घरात तर लोक इतके घोरतात ..सामुदायिक घोरणे...कि एस टी स्टंड वर झोपलो कि काय असा भास होतो
काहि माणसे का घोरतात?
हा रोग आहे का?
नवरा घोरतो म्हणुन परदेशात घटस्फोट झाल्याचे वाचले आहे.
यावर उपाय म्हणुन एक यंत्र पण आले आहे असे समजते..
आपले अनुभव..मत..चिकित्सा वाचण्यास उत्सुक आहोत

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Nov 2010 - 10:08 pm | पैसा

सगळेजण घोरतायत, म्हणून अजून कोणी जागे झाले नाहियेत प्रतिक्रिया लिहायला...

अन्या दातार's picture

2 Nov 2010 - 10:10 pm | अन्या दातार

तरी बरं! वेबसाईट्सवर लोकांच्या घोरण्यांचे आवाज येत नाहीत. ;)

अनिरुद्ध

चिंतामणी's picture

2 Nov 2010 - 10:23 pm | चिंतामणी

नवरा घोरतो म्हणुन परदेशात घटस्फोट झाल्याचे वाचले आहे.

घटस्फोट कोणाचा होतो?????

लग्न झालेल्यांचा. बरोबर ना अविनाशकाका? ;)

आणि भारतात झालेले ऐकले आहेत का तुम्ही????? :(

वाटाड्या...'s picture

3 Nov 2010 - 12:28 am | वाटाड्या...

"नवरा घोरतो म्हणुन परदेशात घटस्फोट झाल्याचे वाचले आहे." >> हो मी पण असे ऐकले आहे.

ज्या लोकाना मेदाचा (fat) चा गंभीर प्रॉब्लेम असतो ते लोक खुप घोरतात आणी आपल्याला घेरतात...;) असा सर्वसाधारण समज आहे.

मी mp3 प्लेयर वर ३ तासाचं आमच्या रुममेटचं घोरणं रेकॉर्ड केलं होतं आणि त्याला समोर बसवुन ऐकवलं होतं तेव्हा त्याला खात्री पटली होती. तोपर्यंत साहेबांना कळ्ळंही नव्हतं. त्यांच घोरणं म्हणजे डरकाळ्या फोडणं होतं.

- वाघोबा

मी-सौरभ's picture

3 Nov 2010 - 12:42 am | मी-सौरभ

पण ते फक्त जेव्हा मोठी उशी घेतो तेव्हा :)
श्वास घ्ययला अडथळा होतो तेव्हा लोक घोरतात....

इंग्रजीमधे चांगल्या झोपेला sound sleep का म्हणतात?????????

(अविनाशकाका टॉपीकला जन्म देउन निघुन जातात हे माहिती असले तरी उत्तराची अपेक्षा करतो)

अविनाशकुलकर्णी's picture

3 Nov 2010 - 3:03 pm | अविनाशकुलकर्णी

नितिन भाऊ....खरे तर आमचे टोपिक अगदी ...निरुपद्रवि..कुणाचीच खोड न काढणारे..व अति क्षुद्र व टी.पी ..असे असतात..मग हा कोलाहाल का? कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या?

नितिन थत्ते's picture

3 Nov 2010 - 3:58 pm | नितिन थत्ते

काय झाले अविनाशकुलकर्णी साहेब?

ते वर थत्ते चाचा वगैरे आहे ते या धाग्याविषयी नाहीये.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Nov 2010 - 4:05 pm | अविनाशकुलकर्णी

माफ करा गैर समज झाला,....दिवालीच्या शुभेछ्या

आप्पा's picture

3 Nov 2010 - 5:19 pm | आप्पा

मी पण घोरतो असे सगळे म्हणतात, पण मला का ऐकु येत नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2010 - 5:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे एक आंजा मित्रही अशीच तक्रार करत होते. शेवटी त्यांच्याच घरी बसून रात्री उशीरापर्यंत पब्लिक गप्पा छाटत असताना स्टिंग ऑपरेशन करण्याची संधी मिळाली! मग काय, डान्स पे चान्स मार लिया।

मस्त कलंदर's picture

3 Nov 2010 - 5:58 pm | मस्त कलंदर

स्टिंग ऑपरेशन करायचे एकीने, श्रेय लाटायचे दुसरीनेच!!! म्हणजे आम्ही तेवढ्या शापांचे धनी आणि मलई मात्र.....

असो, त्या पहाटे तोंडावर हात ठेवून हसू दाबता दाबता काय पुरेवाट झाली ते पाहायला तू खरंच जागी असायला हवी होतीस!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2010 - 6:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या वरच्या प्रतिसादातच मी स्टिंग ऑपरेशन करणार्‍यांना श्रेय देणार होते. पण उघडउघड नाव दिल्यास सदर बेडर कार्यकर्त्यांस त्रास होईल (काय आहे, त्या अ"घोरी" मित्राचे हात वरपर्यंत पोहोचले आहेत.) म्हणून मुद्दामच सौजन्य दाखवलेलं नाही.

मस्त कलंदर's picture

3 Nov 2010 - 7:54 pm | मस्त कलंदर

त्या स्टिंग ऑपरेशनच्या भीतीनेच बहुधा वरपर्यंत हात नसलेले आपले दुसरे आंजा काका रात्रभर झोपले नसावेत. हो ना हो काका?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2010 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> हो ना हो काका? <<

=)) =))
मेले, मेले ... काका, मामा मेले! ;-)

श्रावण मोडक's picture

3 Nov 2010 - 9:30 pm | श्रावण मोडक

बहुधा वरपर्यंत हात नसलेले आपले दुसरे आंजा काका

हा कोण आता?