भाषा आणि प्रमाण

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
20 Apr 2008 - 12:59 pm

गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं?

'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई. किती तरी काळ पद्य हाच साहित्याविष्कार होता.

मराठीला गद्य स्वरूप आणि तेही ग्रंथबध्द, असं स्वरूप दिलं ते महानुभावपंथानं. अमरावतीच्या रिध्दपूर नावाच्या खेड्यातून हा मराठी साहित्याचा प्रवास सुरू झाला. आज तो एवढा फोफावला आहे की, मराठी का शिकावं तर मराठी साहित्य वाचण्यासाठी असं सुद्धा म्हणू शकतो, (भा. नेमाडे याच्याशी असहमत असतील कदाचित, अजानुकर्णा !) पण हे खरं आहे की मराठीत अतिशय उत्तम साहित्य निर्मिती झाली आहे. होते आहे.

मराठी सामान्य लोकांची भाषा आहे. तिचं खरं रूप मर्‍हाटी असं आहे. सातवाहन,राष्ट्रकुट, यादव, वाकाटाक, त्यानंतर मुघल आदी राजवटींत तिचा प्रवाह चालत राहिला आहे. सामान्य जनतेइतका तिचा वाली कुणीच नव्हता. अनेकानेक भाषेसोबत तिचा संकर झालेला आहे. कित्येक भाषेतील शब्द अगदी बेमालूमपणे मराठीत सामील झालेले आहेत.या 'बे' ला जाड करण्याचे कारण असे की असा समोर 'बे', 'बद' लावण्याचा प्रघात मराठी नाहीये हे लक्षात यावं.

पुढे मराठी राजवट आली, छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की स्वराज्य सामान्य माणसाचं आहे . राज्य कारभार त्याच भाषेत व्हायला हवा. सामान्य माणसाला समजायला हवं की कारभार कसा होतो. खरोखर जाणता राजा. त्यावेळी एक राजभाषा कोश तयार करण्यात आला. मराठीला बोलीतून भाषेत आणि त्यातही सरकारी कामकाजाच्या भाषेत नेण्याचा हा सर्वात प्रभावी उपाय होता. कित्येक शतकानंतर भारतात कुठल्या स्वतंत्र छत्रपतीची राजमुद्रा फारसीत नसून संस्कृतात उमटली होती. हे सर्व करण्या मागचा उद्देश काय असेल हो? लोकांना नवी भाषा शिकवणं की लोकांना कुठल्याही मंचावर आपल्याच बोलीत व्यक्त होण्याचा आत्मविश्वास देणं? यावर थोडा विचार करू व नंतर पुढे जाऊया.

मराठे, पेशवाई खरं तर पेशवाईचा पुर्वाध आणि उत्तरार्ध असं म्हणायला हवं. पेशवाईत बखरी लिहिल्या गेल्या, आपल्या स्वामींचा पराक्रम गाण्यासोबतच आता अतिरंजित लिहिणं सुरू झालं होतं असो, पण मराठी लिहिणं सुरू झालं होतं. पुढे पेशवाई बुडली. महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं. हे नेमकं कधी झालं असावं?

बरं मला आणि एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं म्हणजे कधी? १८५३ ला जेव्हा वर्‍हाड प्रांत निजामापासून काढून इंग्रजांनी कायम आपल्या कारभारात सामील केला तेव्हा? की मुंबईला जेव्हा इंग्रजांनी आपला कारभार सुरू केला तेव्हा? वसईचा तह झाला तेव्हा ? की पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला तेव्हा?

तर याचं उत्तर असं देता येईल की सार्वभौम मराठी सत्ता १८१८ मध्ये संपली, त्यानंतर उरला तो मांडलिकांचा कारभार, संस्थानं,जी खालसा झाली ती परत मिळवण्यासाठी लढली. जी खालसा झाली नाहीत ती आहे त्यात सुख मानायला लागली.

या टप्प्यानंतर आता पर्यंत मराठीला किंवा एकूण भाषेलाच कामात येणारं असं स्वरूप होतं. भाषेतून गद्याविष्कार अजूनही तेवढा पचनी पडलेला नव्हता. पेशवाई गेल्यानंतर जे राजकारणी होते किंवा ज्यांना सत्ता केंद्रात राहायची सवय पडली होती असे, किंवा त्याही पेक्षा अचूक वाक्य असे की ज्यांना येत्या काळाची पावले ओळखता येत होती अश्यांनी ताबडतोब इंग्रजीची कास धरली. इंग्रजी वाचन सुरू झालं .

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'.

यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. ज्याही पुढार्‍याला , समाजसुधारकाला आवश्यक वाटलं त्याने आपला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी वृत्तपत्र काढले. लोकांना समजावं, आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावा. त्यासाठी वृत्तपत्र काढलं. वाचक वर्ग कोण यावरून ठरायचं की भाषा कुठली असावी. 'केसरी' मराठीत होता तर 'मराठा' इंग्रजीत.

थोडं घाईत पुढे जाऊया, १९५६ ला भाषिक आधारावर राज्यनिर्मीती व्हावी असं म्हणून पोट्टी श्रीरामलु यांनी उपोषण सुरू केले. मागणी होती स्वतंत्र तेलगू भाषिक आंध्रप्रदेशाची. त्यांचा उपोषणात मृत्यू झाल्यावर आंदोलन पेटलं, अजिबात इच्छा नसताना नेहरूंनी या मागणीवर विचार करण्यासाठी 'फाजल अली आयोग' नेमला. त्यांनी काही भाषेंसाठी अनुकूल मत दिलं व त्यांची निर्मिती झाली. मराठीसाठी मात्र अशी काही योजना करण्यात आलेली नव्हती. मुंबई हे मराठी आणि गुजराती द्वैभाषिक राज्य कायम ठेवण्यात आलं होतं. म्हणजे मुंबई+कोंकण+प.महाराष्ट्र+गुजरात आदी मिळून मुंबई राज्य(इलाखा) होता. मग मराठी जनमानस पेटलं. संयुक्त महाराष्ट्र बनावा. त्यासाठी वर्‍हाड घ्यावा मध्य प्रदेशातून, मराठवाडा घ्यावा हैदराबादजवळून , खालून बेळगाव घ्यावे निपाणी - कारवार घ्यावे, मुंबई तर आपल्या हक्काची आहेच. आंदोलन पेटले आणि शेवटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा निर्मिती वृत्तांत सुद्धा खूप छान आहे. 'कर्‍हेचं पाणी' वाचल्यास सविस्तर कळेल.

हा सगळा इतिहास कशासाठी? हे एवढं पल्हाड कशासाठी? तर मराठी ज्यांच्या साठी आधी पुण्याच्या एका पेठेत सुरू होऊन दुसर्‍या पेठेत संपायची आणि आज सुद्धा ज्यांचा महाराष्ट्र पुण्यात सुरू होऊन मुंबईत जाऊन संपतो त्यांना मराठी आणि महाराष्ट्राचं स्वरूप, व्याप्ती आणि थोडा इतिहास कळावा तरी.

अर्थात हा एवढासा लेख काय मराठी बद्दल सांगेल? पण काहींची उत्सुकता तर चावळल्या जाईल ना?

तर अशी ही जनसामान्यांच्या स्वाभाविक भावनाविष्कारातून बनलेली मराठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात बोलल्या जाते, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोल्हापूर, प. महाराष्ट्र आदी वेगवेगळ्या जागी बोलण्याची पद्धत , बोलण्याचा स्वर ( हेल) वेगवेगळा आहे. तुम्हाला त्या बोलीचा सराव नसेल तर बोलणे सोडा पण जे ऐकतो आहोत ते मराठीच आहे का असा प्रश्न पडावा. एवढं ते नवीन वाटू शकतो.

महाराष्ट्र व्हायच्या आधी एक ठीक होतं की आपण विखुरलेले होतो. आता मात्र आपण एकभाषक बांधव म्हणून लढा दिला होता. मराठी सारा एक आणि चांद्या पासून बांद्यांपर्यंतच्या घोषणा दिल्या होत्या , त्यामुळे सर्वांना मान्य असेल आणि लेखनाचा अर्थ सर्वांना कळावा या उद्देश्याने ह्या प्रमाण भाषेचा किंवा भाषेला प्रमाण देण्याचा प्रयत्न झाला आहे.

म्हणजे मराठीची एक बांधणी ठरवण्यात आली. सर्वांनी मिळून लिखाणात, साहित्यात, वर्तमानपत्रात तिच वापरावी असे ठरले. यामुळे लिखाणाची अर्थनिश्चिती कायम झाली. एक सारखं लिहिणं सुरू झालं.

अर्थात या प्रमाण भाषेत पुणेरी भाषेचा जास्त भरणा झाला. सुरुवातीला आणि आताही मराठी साहित्य निर्मितीचे केंद्र हे पुणे असायचे/ आहे. त्यामुळे येथे लिहिलेले प्रमाण मानले गेले आहे.

मराठीसाठी शुद्धलेखनाचे काही प्रमाणित नियम आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्या व्यतिरिक्त शासकीय मराठी हे प्रकरण तुम्ही आम्ही वापरतो त्या प्रमाण मराठीहून थोडेसे भिन्न आहे. मात्र हे शब्द प्रमाण आहेत आणि हे नाही असं काही प्रकरण नसावं.

मराठीला विरामचिन्हे एका इंग्रज अधिकार्‍याने दिले आहेत. ते ही बळजबरीने. सुरुवातीच्या काळात मराठी ग्रंथ हस्तलिखित असत. मराठी मुद्रणाला सुरुवात झाली ती ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रात आल्या नंतर. त्यांनी बायबल मराठी आणण्याचा प्रयत्न केला. पहिला मराठी छाप हा असा तयार झाला. जागा श्रीरामपूर येथे ( हे कदाचित बंगाल मधील असावं असा अंदाज आहे.)

तर मराठीचं व्याकरण सुद्धा असं संस्कृतवर आणि इंग्रजीवर आधारित आहे. अश्या आपल्या मायबोलीचे आपण शुद्धलेखनाचे नियम ठरवलेले आहेत. कोल्हापूर कसे लिहावे व कोल्हापुरास कसे लिहावे? तत्सम आणि देशी शब्द कसे लिहावे , मि नको तर मी हवा आदी..

हे सगळं करण्यामागची भूमिका फार छान होती की आम्ही सगळे एक तर आमचा आविष्कार सुद्धा जवळपास सारखाच असेल ना? मग एकाचं लिखाण वाचताना त्याच्या मनातील भाव-भावना , विचार जसेच्या तसे वाचणार्‍या पर्यंत पोहोचाला हवेत. लिखित मसुद्याचे अनेक अर्थ निघायला नकोत , गोंधळ व्हायला नको हीच या प्रमाणीकरणामागे मूळ प्रेरणा. सर्वांनी हे प्रमाणीकरण मान्य करण्यामागे सुद्धा हाच तर्क.

लेखन सहज व्हावं आणि इतरांना समजावं म्हणून तयार करण्यात आलेलं हे प्रमाणीकरण मात्र आपण बोलतो त्या भाषेशी जास्त जुळतं असं काहींच्या लक्षात आलं. आणि झालं , गोंधळ सुरू झाला. मग पुढे आपल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान पाळणार्‍या लोकांचं आपली बोलीच कशी प्रमाण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने असाच समज पसरला की पुण्यात बोलली जाते तिच प्रमाण भाषा.

आमचे शालेय पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं आदी प्रमाणभाषेत काढण्यास सुरुवात झाली. लोकांना सांगण्यात आलं की 'ही' म्हणजे मराठी. आणि तुम्ही बोलता ती 'बोली'. हे इतपत ठीक होतं पण पुढे हे आणखीनंच वाढलं आणि 'ही' म्हणजे 'शुद्ध' मराठी आणि तुम्ही बोलता ती 'अशुद्ध मराठी' , हे अशुद्ध जरा जड जातंय असं म्हणताच मग भाषा आणि बोलींवर लिखाण झालं. प्रमाणित असते ती भाषा आणि भाषा ही शुद्ध असावी नियमांच्या चौकटीत असावी आदी अनेक पंडिती विचार विनिमय झाले.

हळूहळू आमच्यावर असं बिंबविण्यात आलं की विदर्भातील मराठी ना? अहो तिच्यावर हिंदीचा अंमळ जास्त प्रभाव आहे ! आणि मराठवाड्याचा हैदराबादशी जास्त संबंध म्हणून हैदराबादी उर्दूचा जास्त प्रभाव. खरी मराठी पुण्यातच आणि त्यातही मी राहतो त्या पेठेत बोलल्या जाते.

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल.

बरं आम्ही बोलतो ते अशुद्ध का? तर ते प्रमाण नाहीये. प्रमाणभाषेत 'असं' सांगितलंय आणि तुम्ही लिहीतांना 'तसं' लिहिता.

ठीक आहे, मी प्रमाण म्हणून ज्याला मान्यता आहे तसं नसेन बोलत कदाचित. पण मी अशुद्ध बोलतो हे कशावरून? मी मराठी बोलत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तर नाही ...तसं नाही.... अहो तुम्ही हे 'असं' बोललं पाहिजे ( आमच्या सारखं !) , तुमच्या बोलण्यात अनुनासिकं नसतात, किंवा त्यांचे उच्चार पुरेसे स्पष्ट नसतात. तुम्ही वेगळाच हेल काढता. हा आमचा जो हेल आहे ना 'तो' प्रमाण आहे. तुमचं तसं आणि आमचं असं. शेवटी तुमचं कार्टं आणि....

ही अशी सुरुवात होते एखाद्या चांगल्या गोष्टीचे वाभाडे काढण्याची. प्रमाण चांगलेच. मात्र प्रमाण हाच केवळ आविष्कार असावा ही सक्ती का? ही सक्ती जेव्हा अनेकानेक (वेगवेगळ्या) उद्देशांनी केली जाते तेव्हा त्याला विरोध होतो. काही वेळा हा विरोध आपली बोली वाचवण्याच्या हेतूने होते काही वेळा ही आपल्या आविष्काराला दुय्यम म्हटल्याने होतो. आमच्या साहित्य विश्वाला ह्या असल्या वादांची नवलाई नाही. हे आणि असे अनेक वाद मराठीत आहेत.

येथे इंटरनेटवर सध्या कुठे मराठी बर्‍या स्थितीत येतेये. जरा काही मराठीतून शोधायला लागलं तर हिंदी मिश्रीत का होईना काही निकाल येतात. चार पाच मराठी चर्चासत्रे आणि काही स्थिर संकेतस्थळं अशी सध्या मराठी माणसांची 'मराठी' मिळकत. लाखोच्या संखेत मराठी लोक इंटरनेटवर आहेत. इंग्रजीत प्रवीण असल्यामुळे मराठीमुळे त्यांचं काही अडत नाही. मात्र आतलं मराठीपण त्यांना आपल्या भाषेकडे, आपल्या बोलीकडे खेचून आणतं. अश्या स्थितीत कुणाला जर का इंटरनेटवर लिहिल्या गेलेलं सगळं प्रमाण मराठीत हवं असेल तर त्याने आधी त्या विषयी लिहावं. प्रमाण का ? हे सांगावं. आणि कुणी जर का चुकीचं लिहीत असेल तर त्याला प्रमाणभाषेत लिहिणे आवश्यक का आहे ते समजावून सांगावे. त्याला पटलं तर तो ते करेन. नाही पटलं तर नाही. कृपया सांगताना प्रमाण भाषेबद्दल सांगा, शहरात किंवा पुण्यात असं बोलतात म्हणून तुम्ही असं बोला असं नका म्हणू. ते दिवस आता गेले.

प्रमाण हे सर्वांचं आहे. सर्वांसाठी आहे हे लक्षात घेऊया.

इंटरनेटवर प्रत्येकजण जे लिहितो तो त्याचा आविष्कार आहे असं समजून त्याला मान देऊया.

तुम्हाला असं वाटतं की त्यांनी प्रमाणभाषेत लिहावं यामुळे भाषेचा फायदा होईल आणि हीच माझी भाषासेवा, तर समोर या, त्यांना पटवून द्या.

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.)

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.

पण येथे महाजालावर ज्याला जे आवडते ते करण्याचं स्वातंत्र्य आहे.

मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.

येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं.

अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.

------------------------------------------------------------------------------
(टीप एका बैठकीत लेख लिहिलेला असल्याने काही संदर्भ अपुरे आहेत याचे भान आहे. त्याबद्दल क्षमस्व)

नीलकांत

हे ठिकाणवावरभाषावाङ्मयइतिहासव्युत्पत्तीसमाजप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

20 Apr 2008 - 1:27 pm | प्रमोद देव

नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर)
आवडले तुझे विचार.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर's picture

20 Apr 2008 - 2:17 pm | भडकमकर मास्तर

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.)
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.
येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं.
अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.

हे एक एक वाक्य जबरदस्त आहे...
सहमतच आहे...

मदनबाण's picture

20 Apr 2008 - 10:21 pm | मदनबाण

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.)
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.
येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं.
अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.

हे एक एक वाक्य जबरदस्त आहे...
सहमतच आहे...

मी सुद्धा १००% सहमत आहे.

(करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा.....
मदनबाण

ऐश्वर्या राय's picture

20 Apr 2008 - 2:48 pm | ऐश्वर्या राय

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय?

टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी,
ऐश्वर्या

विदेश's picture

20 Apr 2008 - 4:44 pm | विदेश

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.

मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.

अगदी मनातलं टंकलात!

इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये.

'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे.

आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

आत्तापर्यंतचा सर्वोत्तम सोदाहरण प्रतिसाद असं मला म्हणावंस वाटतं!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

21 Apr 2008 - 5:47 am | चतुरंग

आम्ही आणि तुम्ही चे आपण व्हायला दोन्ही बाजू तितक्याच लवचिक असायला हव्यात!!

चतुरंग

प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं?
म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय?
आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत
१)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय?
२) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय?
इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश ,
तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच.
ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा.
शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे.
अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत.
मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले's picture

20 Apr 2008 - 8:45 pm | अविनाश ओगले

नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत's picture

20 Apr 2008 - 9:04 pm | नीलकांत

अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता.

अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट's picture

20 Apr 2008 - 10:07 pm | व्यंकट

नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता..

व्यंकट

स्वाती दिनेश's picture

20 Apr 2008 - 10:13 pm | स्वाती दिनेश

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.
+१
लेख आवडला हेवेसांनल.
स्वाती

आणिबाणीचा शासनकर्ता's picture

20 Apr 2008 - 11:49 pm | आणिबाणीचा शासनकर्ता

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल.

अगदी खरे!

नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.

ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे!

येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं.

नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो!

अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.

सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील!

प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम!

-- जनरल डायर.

चित्रा's picture

22 Apr 2008 - 8:14 am | चित्रा

प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते.

भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा.

येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.
हे पूर्णपणे मान्य.

ॐकार's picture

22 Apr 2008 - 9:11 am | ॐकार

कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही.

भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का?

मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही.

अवांतरः
सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

चतुरंग's picture

22 Apr 2008 - 8:22 pm | चतुरंग

तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन.
ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते.
असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक.
जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील.

चतुरंग

मनस्वी's picture

22 Apr 2008 - 10:14 am | मनस्वी

नीलकांतभाऊ
लई छान लिवलंय.. यक नंबर.

इनोबा म्हणे's picture

22 Apr 2008 - 11:04 am | इनोबा म्हणे

लई छान लिवलंय.. यक नंबर.
ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण.
इरोध करणारे गेले खड्ड्यात.

फारच मस्त लेख...

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

नरेंद्र गोळे's picture

23 Apr 2008 - 5:09 pm | नरेंद्र गोळे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो.

तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा.
विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील.

मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा.
त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते.

अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Apr 2008 - 10:30 pm | प्रकाश घाटपांडे


प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.


सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं.
बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे.

प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >>

नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद.

प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर,
एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे.

मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो.

मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

नीलकांत's picture

23 Apr 2008 - 6:32 pm | नीलकांत

मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे.

गोळेसर,
माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय?

केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही.

प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही.

नीलकांत

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Apr 2008 - 3:44 pm | llपुण्याचे पेशवेll

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग.
तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे.

पुण्याचे पेशवे

नाना चेंगट's picture

7 Jun 2012 - 6:13 pm | नाना चेंगट

मस्त लेख !! :)

चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jun 2012 - 8:26 pm | बिपिन कार्यकर्ते

फारा दिवसांनी वाचले हे. जुन्या आठवणी! :)

मृगनयनी's picture

7 Jun 2012 - 8:34 pm | मृगनयनी

एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jun 2012 - 8:43 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो, हेतुरहित कर्म करा असं ते कृष्णाजी वसुदेव सांगून गेले आहेत ना!

सुनील's picture

7 Jun 2012 - 9:03 pm | सुनील

कृष्णाजीपंत वसुदेवराव यादव!

मृगनयनी's picture

7 Jun 2012 - 10:06 pm | मृगनयनी

अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!!

___________________________________

मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

बॅटमॅन's picture

7 Jun 2012 - 10:11 pm | बॅटमॅन

महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

मृगनयनी's picture

8 Jun 2012 - 9:56 am | मृगनयनी

आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ...

मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ...

आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे...

आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :|

टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

हम्म्म्म्म्म्म्म्म्म.......हे हम्मा..हम्मा..हम्मा हम्मा हम्मा......

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jun 2012 - 10:58 am | बिपिन कार्यकर्ते

नाना चेंगट's picture

8 Jun 2012 - 1:22 pm | नाना चेंगट

एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?...

तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)