काही रेखाचित्रे

स्वानन्द's picture
स्वानन्द in कलादालन
28 Oct 2010 - 6:35 pm

आज सहज जुन्या फाईली बघत असताना मी कधी तरी सहज म्हणून काढलेली रेखाचित्रे हाती लागली. ती इथे चिकटवली आहेत. आणखीही काही होती. पण सापडत नसल्याने सद्ध्या एवढीच चिकटवतो. कशी वाटली ते सांगा. काही सुधारणा सुचवाविशी वाटली तरी सांगा. ( कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे .)

१. हे रेखाटन पै. मुहम्मद रफी यांच्या तरुणपणातील छायाचित्र पाहून काढले आहे.

२. हा कोण हे आपण ओळखू शकाल .... अशी अपेक्षा :)

३. हे रेखाटन कोणा व्यक्तीचे असे नसून... ज्या वहीत चित्र काढत होतो त्या वहीच्या मागच्या पानावर काढलेले होते.
एरव्ही मी आधी डोळे रेखाटून मग उरलेला चेहरा पूर्ण करायचो. या चित्राच्या वेळी मी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कच्चे चौकोन काढून त्याच्या अनुषंगाने पूर्ण चित्र काढायचा प्रयत्न केला.

रेखाटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

28 Oct 2010 - 6:42 pm | मदनबाण

छान... :)

यशोधरा's picture

28 Oct 2010 - 6:43 pm | यशोधरा

मला शेवटचे सगळ्यात जास्त आवडले.

भाऊ पाटील's picture

28 Oct 2010 - 7:11 pm | भाऊ पाटील

मलाही शेवटचे जास्त आवडले.

प्रियाली's picture

28 Oct 2010 - 11:02 pm | प्रियाली

+१

सहज's picture

29 Oct 2010 - 8:52 am | सहज

+१

आंबोळी's picture

29 Oct 2010 - 11:34 am | आंबोळी

मला पण...
ते थोडेसे मधुमती मधल्या प्राण चे असल्यासारखे वाटतय...

सूड's picture

2 Nov 2010 - 8:20 pm | सूड

+१

स्वानन्द's picture

28 Oct 2010 - 7:00 pm | स्वानन्द

धन्यवाद. काही सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या, टिप्स द्याव्याशा वाटल्या तर ऩक्की सांगा...

प्रगतीत स्वानन्द :)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2010 - 7:10 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर आहेत :)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2010 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहेत.

पु.रे.शु.

योगेश२४'s picture

28 Oct 2010 - 11:11 pm | योगेश२४

मस्तच!!!

कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे

विचार करू नकाच थेट सुरुच करा :)

शिल्पा ब's picture

28 Oct 2010 - 11:12 pm | शिल्पा ब

छान...रफी पटकन ओळखु आले..

स्वानन्द's picture

29 Oct 2010 - 8:49 am | स्वानन्द

हे वाचून तर फार बरं वाटलं. :) एक तर रफींचं छायाचित्र फारसं पाहण्यात नस्तं. त्यातून मी हे त्यांच्या तरूणपणातल्या फोटोवरून रेखाटलं होतं!

स्वानन्द's picture

29 Oct 2010 - 8:53 am | स्वानन्द

बाणाचे, यशोताई, परा, बिका, भाऊ, प्रियाली, योगेश... सर्वांचे आभार.

शेवटचा प्रयत्न खरंच चांगला झालाय. क्रॉस हॅचिंगची पहिली स्टेप नीट दिसतीये. शेडींग करण्याचा प्रयत्नही स्तुत्य. अर्थात् सुधारणेस वावही भरपूर आहे. :)

रेखाटनांबद्दल चर्चा करता येईल.. पण येथे अवांतर होईलसं वाटतंय!

मधु बन's picture

29 Oct 2010 - 11:57 am | मधु बन

खुपच छान !!!!!!!!

विसोबा खेचर's picture

29 Oct 2010 - 1:08 pm | विसोबा खेचर

रफीसाहेब साफ फसले आहेत.. :(

ऋतिक रोशन छान आला आहे, शेवटचं चित्र अभिनेता प्राणचं वाटतं..तो प्रयत्नही चांगला आहे..

रफीला मात्र सुधारा मालक. कैच्याबैच आहे ते चित्र..चेहेर्‍याची उजवी बाजू ठीक वाटत नाही.. दातही बरोबर नाहीत.. रफिसाहेबांच्या चेहेर्‍यावरील सात्विक भाव त्यामुळे थोडा बिघडल्यासारखा वाटतो..

शुभेच्छा..

तात्या.

सहज's picture

29 Oct 2010 - 1:15 pm | सहज

जुने मिपासदस्य श्री ॐकार दिसले नाहीत? त्यांची रेखाटने फार छान असतात. त्यांनी चित्रकळा नामक एक मस्त कूटप्रश्न चित्रमाला देखील निर्मीली होती.

स्वानन्द's picture

29 Oct 2010 - 1:56 pm | स्वानन्द

त्याचा दुवा मिळू शकेल का मला?

धन्यवाद.

स्वानन्द's picture

29 Oct 2010 - 1:17 pm | स्वानन्द

धन्यवाद तात्या. ते रेखाटन ज्या चित्रावरून काढले ते आत्ता माझ्याजवळ नाही. नाही तर पुन्हा एकदा प्रय्त्न करावा म्हणत होतो.. असो दुसरं कुठलं चित्र मिळतय का ते बघतो.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2010 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

रफी साहेब थोडेशे धिरुभाई अंबानींच्या वळणाने गेल्यासारखे वाटतात ;)

चिगो's picture

30 Oct 2010 - 1:56 pm | चिगो

तुमचा छंद नक्कीच पुढे सुरु ठेवा.. ऑल ढी बेष्ट...

अविनाशकुलकर्णी's picture

29 Oct 2010 - 1:41 pm | अविनाशकुलकर्णी

चित्रा खाली नाव लिहिले ते बरे केले..
हा कोण? .....
नाव का नाहि लिहिले?

स्वानन्द's picture

29 Oct 2010 - 1:48 pm | स्वानन्द

कुलकर्णी साहेब... काही तरी गडबड होते आहे आपली....
मी रेखाटनाच्या 'वर' नाव लिहीले आहे, खाली नाही ... नेम चुकला ;)

जागु's picture

30 Oct 2010 - 4:20 pm | जागु

छानच आहेत.

जयेशसर's picture

2 Nov 2010 - 3:00 pm | जयेशसर

हल्ली मी एका आश्रम शाळेत मास्तर म्हणून काम करतोय..........
.........त्यामुळे अस बोलण्याची सवयच झालि आहे......
पुन्हा एकदा हा छंद चालू करा........ सुधारना आपोआप कळतील

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Nov 2010 - 3:11 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रयत्न चांगला आहे. शेवटचे चित्र खासच.

स्वानन्द's picture

2 Nov 2010 - 6:23 pm | स्वानन्द

धन्यवाद पेशवे भाऊ, आणि चिंटू सर :)

स्वप्निल..'s picture

2 Nov 2010 - 11:21 pm | स्वप्निल..

चांगलीच जमली आहेत .. शेवटचे चित्र एकदम छान!