50 First Dates आणि गोजिरी

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
21 Oct 2010 - 1:12 pm

काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही)

चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे. "अग बावळट 'गोजिरी' म्हणजे '50 First Dates' ह्या नितांत सुंदर चित्रपटाचे मराठीकरण आहे." मी लगेच ज्ञान पाजळून घेतले. "अय्या ! खरच की." म्हणत मैत्रिणीने डोक्याला हात मारला.

50 First Dates हा एक नितांत सुंदर अनुभव देणारा चित्रपट आहे. त्याला मराठीत आणताना 'गोजिरी'चे दिग्दर्शक विजु माने कुठेही कमी पडलेले नाहीत. जेवढा सुंदर अनुभव इंग्रजी चित्रपट देतो तेवढाच झकास अनुभव 'गोजिरी' देखील देतो. पण मग मुळात माझ्यासमोर प्रश्न आल की मिपाकरांना नक्की ओळख कोणत्या चित्रपटाची करुन द्यावी ? इंग्रजी का मराठी ? मग ठरवले दोन्ही चित्रपटांना हातात हात घालुन मिपाकरांसमोर उभे करु.

50 First Dates आला २००४ मध्ये तर गोजिरी आला होता २००७ मध्ये. इंग्रजी चित्रपटात अ‍ॅडम सँडलर आणि ड्र्यु बॅरिमॉर ह्यांनी वठवलेल्या भुमिका मराठीत अनुक्रमे सुनिल बर्वे आणि मधुरा वेलणकर ह्यांनी वठवलेल्या आहेत. 50 First Dates च्या नायकाकडे एक झकास अ‍ॅक्वेरिअम आहे तर मराठी चित्रपटात ती कमतरता कोकणचा किनारा भरुन काढतो.

मी येवढे कौतुक करत असलेल्या ह्या चित्रपटांची कहाणी अशी आहे तरी काय ? कहाणी म्हणाव तर अगदी साधी, म्हणाव तर जिवाला चटका लावणारी. खुशालचेंडु नायकाला नायीकेचे भेटणे आणि थोड्याश्या वादावादीनंतर त्याला 'हिच ती' असा साक्षाक्तार होउन खर्‍या प्रेमाची ओळख पटणे, इथपर्यंत कहाणी अगदी टिपिकल फिल्मी वगैरे आहे. पण आदल्या दिवशी नायकाला भेटलेली, एकेमेकांचे विचार जुळल्याने नायकाच्या बर्‍याच जवळ आलेली आणि त्याला कुठेतरी ती आपल्या प्रेमात पडत आहे असा विश्वास बसत असतानाचा अचानक दुसर्‍या दिवशी नायकाला ओळखही न दाखवणारी नायीका समोर येते आणि इथे चित्रपट एक वेगळेच वळण घेतो. काही वेळासाठी तर नायक (पक्षी :- अ‍ॅडम सँडलर किंवा सुनिल बर्वे) देखील चक्रावुन जातो. आणि मग नायकाला खरे रहस्य कळते के नायिकेला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' आहे. आज जे काही घडेल ते सर्व ती उद्या पुन्हा विसरुन जात असते.

मराठी चित्रपटात सुनिल बर्वेला हे रहस्य तो जेंव्हा मधुरा वेलणकरला मागणी घालायला तीच्या घरी जातो तेंव्हा तिच्या आजोबांकडून (अरुण नलावडे) कळते असे दाखवले आहे. मग सुरु होतो तो नायकानी रोज सकाळी नायिकेला एका वेगळ्या रुपात भेटण्याचा आणि तिला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्याचा एक अनोखा खेळ. त्याला खेळ तरी कसे म्हणावे ? पण रोज नव नव्या युक्त्या योजुन नायिकेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करत जाणे हे अ‍ॅडम सॅंडलर असो वा सुनिल बर्वे ह्या दोघांनिही इतके अप्रतिम उभे केले आहे की जणु ते ति भुमिका जगत आहेत असेच वाटते. मधुरा वेलणकर मात्र ड्र्यु बॅरिमोरच्या तुलनेते साफ फिक्की पडली आहे असे आपले माझे मत ! हि भुमिका करताना मधुरा वेलणकर काहीशी अवघडलेली वाटते.

आयुष्यात फक्त रोज एकच दिवस जगणारी 50 First Dates चि नायिका रोज आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत असते तर 'गोजिरी' मध्ये मधुरा वेलणकर रोज आपल्या लहान बहिणीचा. आधी गंमत वाटणारा हा प्रसंग नंतर नंतर नायिकेच्या हतबलतेची आणि मुख्य म्हणजे तिला त्याची जाणीवच नाहिये हे कळल्यानंतर अंगावर काटा उभा करायला लागतो. अभिनयाच्या बाबतीत बॅरिओरला १०/१० मार्क्स आणि हो सौंदर्याच्या बाबतीत देखील १०/१०. 50 First Dates मध्ये उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केल्यानंतर बॅरिमोरची भेट एका फक्त १० सेकंद स्मरणशक्ती टिकुन राहत असलेल्या रुग्णाशी होते, त्यावेळी तिने केलेला अभिनय आणि तिचा बरच काही बोलुन जाणारा चेहरा ह्या साठी मी कमित कमी ३ वेळा 50 First Dates पाहिला असेल.

चित्रपटाचा शेवट सांगून तुमचा रसभंग नक्कीच करणार नाही, पण एकाच कथेवर बेतलेले असले तरी हे दोन्ही चित्रपट एकदा तरी आवश्य पहाच अशी शिफारस मात्र नक्की करीन. गोजिरील मिलिंद इंगळेने दिलेले संगित देखील सुंदर, त्याच बरोबरीने एक वेगळाच कोकण किनारा देखील आपल्या इथे भेटिला येतो हे विशेष. हे दोन्ही चित्रपट तु-नळी वर ११/१२ भागात उपलब्ध आहेत.

कलासमाजजीवनमानमौजमजाचित्रपटमतशिफारसमाध्यमवेधअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

झकास परिक्षण रे परा !!

फस्ट फिफ्टी डेटस नाही पाहिलाय पण गोजिरी पाहिलात झी टाकीज वर , पण तुकड्या-तुकड्यात ...

आता पुन्हा बघायला हवा ....मधुरा अभिनयात जरी कमी पडली असली तरी दिसण्यात मात्र बाजी मारून जाते, आणी अरुण नलावडे ही छोट्याश्या भुमिकेत असुनही भाव खाऊन जातो ...

मधुराचा फॅन
सुहास..

मराठमोळा's picture

21 Oct 2010 - 1:54 pm | मराठमोळा

>>मधुराचा फॅन
सुहास..

अरेरे....

मदिराचा फॅन,
तुहास..

मराठमोळा's picture

21 Oct 2010 - 1:19 pm | मराठमोळा

मस्त रे..
दोन्ही पाहिले आहेत.
मत नंतर मांडतो.

जागा राखीव!!! (उपप्रतिसाद देऊ नये.)

कानडाऊ योगेशु's picture

21 Oct 2010 - 1:24 pm | कानडाऊ योगेशु

अजय देवगणचा यु मी और हम पण ह्याच कथेवर बेतलेला आहे असे वाटते.(संपूर्ण चित्रपट काही पाहीला नाही.पण नायिकेला असलेला आजार आणि जहाज हे साम्य चटकन जाणवले.)

अनिल हटेला's picture

21 Oct 2010 - 9:00 pm | अनिल हटेला

अगदी अशीच कहाणी यु मी और हम ची आहे !!

अर्थात कथेत फेरफार केलेला आहे !!

असो!!

:-)

मी_ओंकार's picture

22 Oct 2010 - 10:31 am | मी_ओंकार

तो द नोटबूक या चित्रपटावर आधारित होता.
http://www.imdb.com/title/tt0332280/

- ओंकार

ऋषिकेश's picture

21 Oct 2010 - 1:39 pm | ऋषिकेश

50 first dates पाहिला आहे.. यावर मरठीत चित्रपट आहे हेच माहित नव्हते (आणि माहित असते तरी आपल्या लौकीकाला स्मरून गोजिरी पाहिला असताच असे नाहि)

पण आता तु म्हणतोयस तर 50 first dates ह्या नितांतसुंदर चित्रपटाचा मराठी रिमेक बघतो. बाकी चित्रप्टाचा शेवट दिला नाहिस हे बरे केलेस.. छान परिचय

मेघवेडा's picture

21 Oct 2010 - 1:45 pm | मेघवेडा

दोन्हीही चित्रपट अप्रतिम आहेत!

कोकणातल्या मस्त जीवनमानाचं नि निसर्गाचं विलोभनीय दर्शन घडवल्यामुळे 'गोजिरी' जास्त जवळचा वाटतो! इंग्रजी आम्हाला नीट कळत नाही तरीही आम्ही प्रयत्न करतो समजवून घेण्याचा पण अ‍ॅडम सँडलर व ड्र्यू, दोघांच्याही अत्यंत सुंदर अभिनयामुळे '५० फर्स्ट डेट्स' बघता बघताही गुंतून जायला होते खरे!

पर्‍याचे परीक्षण आवडलेच! नायल्याच्या प्रतिसादाला व्यवस्थित फाट्यावर मारशील आणि पुढे आणखी 'मूव्ही डेट्स' वर जाऊन आणखी परीक्षणं लिहीशील याची खात्री आहे! ;)

बाकी अ‍ॅडम सँडलर हा आमचा आवडता अभिनेता व मधुरा वेलणकर आमची आवडती अभिनेत्री (?) असल्याने दोन्ही चित्रपट त्या त्या भाषांमधले 'वन ऑफ द फेव्हरीट्स' आहेतच!
पर्‍या एकदा सँडलरच्या "मिस्टर डीड्स" किंवा "अँगर मॅनेजमेंट" बद्दलही लिही रे!

अवलिया's picture

21 Oct 2010 - 1:50 pm | अवलिया

मस्त रे !

sneharani's picture

21 Oct 2010 - 1:57 pm | sneharani

मस्त परिक्षण.
दोन्ही चित्रपट बघायचे आहेत, बघू वेळ मिळाल्यावर.

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2010 - 2:09 pm | स्वाती दिनेश

दोन्ही पैकी ५० फर्स्ट डेटस बघायचा राहून गेला आहे, पण गोजिरी असाच नेटावर टवाळक्या करताना हाताला लागला होता.
चित्रपटाची मांडणी आवडली होती.
स्वाती

गणेशा's picture

21 Oct 2010 - 2:10 pm | गणेशा

50 first dates पाहिलेला आहे .. जबरदस्त आहे , कथा.. अभिनय .. नायक .. नायिका सुंदर आहे.

गोजीरी अजुन पाहिलेला नाही .. त्यामुळे लवकर पाहिन ..

धन्यवाद

असुर's picture

21 Oct 2010 - 2:44 pm | असुर

व्वा! '50 first dates' आणि 'गोजिरी' या अतिशय सुंदर चित्रपटांचं त्यातलं गुपित न फोडता केलेलं परिक्षण;
पराषेट, मस्त लिहिलंय!
आपल्या मताचा पूर्ण आदर राखून म्हणावेसे वाटते की मधुरा वेलणकरने गोजिरी मध्ये सुनिल बर्वेपेक्षा काकणभर सरसच काम केलंय. कोकणातल्या एका छोट्याश्या गावातली मुलगी किंचित बुजरी असू शकते, किंबहुन क्वचित प्रसंगात गेल्या दिवसाचं काहीही न आठवल्याने होणारा गोंधळही तिने फार सुंदर दाखवलाय. पण दुसर्‍या बाजूने सुनिल बर्वे थोडा हातचं राखून अभिनय करतो की काय असे वाटून जाते. अरुण नलावडे नेहेमीप्रमाणेच दिलेल्या भुमिकेत फुटेज खाऊन जातात.
अर्थात मतमतांतर असल्याने ज्याला जे आवडेल ते योग्य!

चित्रपटाची मांडणी अप्रतिम आहे. चित्रपट मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल, किंवा प्रेक्षकांना तो संपूर्ण मराठी चित्रपटच वाटावा यासाठी चित्रपटात केलेले बदल हे अतिशय स्तुत्य आहेत. असे चित्रपट पाहिल्यावर आनंद नक्कीच होतो की हिंदी/इंग्रजीतील सुमार चित्रपटांच्या भिकार भाषांतराऐवजी कोणीतरी विचारपूर्वक मांडणी करुन मराठीत चित्रपट बनवतंय! मग भले तो चित्रपट एखादा रिमेक का असेना. जोपर्यंत असे चित्रपट बनताहेत तोपर्यंत रिमेक बनवण्याला किंवा पाहण्याला कुणाचा विरोध नसावा! :-)

--असुर

सहज's picture

21 Oct 2010 - 3:03 pm | सहज

चान चान....

पावसामुळे अनिर्णीत राहीलेल्या पण थोडावेळ खेळ त्यात सचिनने सेंच्युरी / (ऑलमोस्ट सेंच्युरी) / एक तूफान फटकेबाजी केलेल्या इनिंग्जला आपण उपस्थित होतो असे अभिमानाने सांगता यावे त्याप्रमाणे पराच्या सर्व शतकी धाग्यात माझा एक प्रतिसाद होता हे नंतर सांगता यावे म्हणून हा प्रतिसाद!

मेघवेडा's picture

21 Oct 2010 - 3:06 pm | मेघवेडा

"लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेस" ला मोडीत काढणारा एकमेव फलंदाज/आयडी - परिकथेतील राजकुमार?

निवेदिता-ताई's picture

21 Oct 2010 - 3:04 pm | निवेदिता-ताई

मस्त परिक्षण..

इन्द्र्राज पवार's picture

21 Oct 2010 - 4:40 pm | इन्द्र्राज पवार

प.रा....

फार सुंदर काम केले आहे तुम्ही हे '५० फर्स्ट...' बाबत..... मी मराठी रुपडे पाहिलेले नाही, त्यामुळे माझ्या ज्या भावना आहेत त्या मूळ इंग्लिश चित्रपटविषयीच्याच. ड्र्यू खरं तर भारतीय प्रेक्षकांना मुख्यतः माहिती आहे ती त्या गल्लाभरू 'चार्लिज् एंजेल्स' मुळे. पण '५०..' मधील अभिनयाबद्दल तिला 'हॅट्स ऑफ' म्हणावे लागते. दिसली आहे खूप सुंदर....आणि हसरी तर ती आहेच मूळचीच.... (इ.टी. चीच छोकरी आहे.)

शेवट सांगितला नाही ते तुम्ही फार चांगले केले आहे....कथानक मला तर भारतीय बाजाचेच वाटले. "मेमरी लॉस' चे आपले 'सदमा' चेही उदाहरण छानच होते. ५० च्या दिग्दर्शकाची (पीटर सेगल) चित्रपटांची हाताळणी अशी कॉमेडी पद्धतीची आहे, आणि ड्र्यू व सँडलरने त्याला अभिनयाची उत्कृष्ट जोड दिली आहे.

"गोजिरी' पाहीन...पण ड्र्यू नजरेसमोरून जाणार नाही असेच वाटत राहिल....(म्हणजे तुम्ही ज्या शब्दात मधुराच्या अभिनयाचे वर्णन केले आहे त्यावरून...!)

इन्द्रा

गणपा's picture

21 Oct 2010 - 3:59 pm | गणपा

टिपीकल परा स्टाईल परिक्षण.
दोन्ही ही नाही पाहिले अजुन.

कुणी फुकटच टोरेंट देणार असेल
तर पहाण्यात अर्थ आहे.
विकतची सीडी घेउन पहायला
माझा खिसा असमर्थ आहे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Oct 2010 - 5:03 pm | फ्रॅक्चर बंड्या

दोन्हीही सिनेमे फार सुंदर आहेत..
गोजिरी मधे दखवलेला कोकण अप्रतिम..

योगी९००'s picture

21 Oct 2010 - 5:18 pm | योगी९००

दोन्ही पाहिले आहेत..first 50 काकणभर सरस वाटतो..कदाचित तो पहिल्यांदा पाहिला म्हणून असे वाटले असावे..

मा. परा
तुमच्याकरिता नम्र विनंती..असे परीक्षण लिहीत जाऊ नका..मला परत चित्रपट पहावासा वाटतो..आणि मी तो परत पहातो सुद्धा..(वेळ जातो त्याचे काय?)

तुम्ही लिहीलेल्या Troy च्या लेखामुळे तो चित्रपट परत पाहिला आणि नंतर काही काही प्रसंग वेड लागे पर्यंत पाहिले. (उदा. युद्धाचे सर्व प्रसंग)..

सहज's picture

21 Oct 2010 - 5:29 pm | सहज

तुमच्याकरिता नम्र विनंती..असे परीक्षण लिहीत जाऊ नका..मला परत चित्रपट पहावासा वाटतो..आणि मी तो परत पहातो सुद्धा..(वेळ जातो त्याचे काय?)

आयला! म्हणजे तुम्ही काय स्व:ताला 'खादाडमाऊकुलकर्णी' व पराला 'युजी परामूर्ती' समजता की काय?

योगी९००'s picture

21 Oct 2010 - 6:11 pm | योगी९००

आयला! म्हणजे तुम्ही काय स्व:ताला 'खादाडमाऊकुलकर्णी' व पराला 'युजी परामूर्ती' समजता की काय?

हा हा हा.. आतापर्यंत नाही.. पण आता असे समजून घेईन..

अनामिक's picture

21 Oct 2010 - 5:42 pm | अनामिक

५० फर्स्ट डेट्स एक चांगला चित्रपट आहेच. त्यातला ड्र्यू आणि अ‍ॅडमचा अभिनयही वा़खाणण्याजोगा आहे. पण त्यावरच आधारित असलेला गोजिरी दोन आठवड्यापुर्वी पहायला घेतला आणि पहिल्या १०-१५ मिनीटातच बंद केला. मधुरा वेलणकर एरवी आवडत असली तरी तिचा अभिनय (पहिल्या १५ मिनीटातला) फारच बालीश वाटला. सुनील बर्वेला जोकर स्टाईल कपड्यात बघवल्या गेलं नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. पराशेटने परिक्षण मात्र फर्मास लिहिलं आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2010 - 5:46 pm | बिपिन कार्यकर्ते

परा, तुला २ चित्रपट माझ्याकडून स्पॉन्सर. अट एकच... परिक्षण / धुलाई (अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल) लिहिले पाहिजेस.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Oct 2010 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार

कोन्तेकोन्ते ?

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2010 - 6:04 pm | बिपिन कार्यकर्ते

तू बोल.

मिसळभोक्ता's picture

21 Oct 2010 - 10:31 pm | मिसळभोक्ता

सदाशिवपेठेतून गायब झालेल्या सीडीज पराला देऊन, स्वतः स्पॉन्सर करतोय, हा आव आणणार्‍या बिकाशेठचा निषेध !

भारी रे...५० फस्ट डेट्स आपला पण आवडता आहे.. :)

मस्त कलंदर's picture

21 Oct 2010 - 7:43 pm | मस्त कलंदर

मी अनामिकाशी सहमत आहे.. 50 first dates आधी पाहिला आणि त्यानंतर गोजिरी पाहिला. काही प्रसंग ओढून ताणून आणलेले वाटले, मधुरा खरेतर खूप सशक्त अभिनेत्री आहे. सुनील बर्वे तर अगदी लपंडावपासून आवडीचा. पण मराठीकरण करताना चित्रपटाची वाट लागली आहे. मला व्यक्तिशः अ‍ॅडमने ड्र्यु ला पन्नासवेळा पटवण्यासाठी केलेले उद्योग जास्त चांगले वाटले. आणि शेवटही मूळ चित्रपटाचाच आवडला.
परत एकदा खेदाने नमूद करावेसे वाटते की आपल्याकडे प्रत्येक गोष्ट समजावून (पक्षी: इस्कटून) सांगितली तरच लोकांना कळते असे आपल्याकडच्या दिग्दर्शकांना का वाटते???

जाता जाता: आमचे मित्र श्री. परा यांनी आम्ही त्यांना फुकटचे डाऊनलोडवलेले चित्रपट देतो असे म्हणून अप्रत्यक्षपणे उल्लेख केल्याबद्दल त्यांचे आभार. असाच जरी आम्ही दिला नसला तरी करमणूक प्रधान आणि धम्माल टाईमपास 'लपंडाव' या चित्रपटाचे परिक्षण की परिचय जे काही असेल ते त्यांनी लिहावे अशी त्यांना झाहिर इनंती!!!

मस्त कलंदर's picture

21 Oct 2010 - 7:46 pm | मस्त कलंदर

आणि हो, परिचय छान झाला आहे, हे सांगायचंच राहिले.
पुपशु!!!
पुढच्या चित्रपटाच्या(पहाटेच्या नाही) प्रतिक्षेत......
--मस्त कलंदर

मिसळभोक्ता's picture

21 Oct 2010 - 10:33 pm | मिसळभोक्ता

मला ड्रू बॅरिमोर आवडत नाही. आणि अ‍ॅडम सँडलर तर अजीबातच नाही.

मला ड्रू बॅरिमोर आवडत नाही. आणि अ‍ॅडम सँडलर तर अजीबातच नाही. >>>

श्री मिसळ्भोक्ता ऊर्फ .... ऊर्फ .... ऊर्फ....,

मला आजवर आपले परतिसाद " अजिबात आवडले " आणी अजिबात अवाडले नाही या व्याख्येत बसतच नाही !!

पण ह्यो प्रतिसाद अभ्यंकर(फोड=अतिभयंकर) आवडला !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2010 - 10:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्‍या, 50 first dates बद्दल आधी कधीतरी ऐकलं होतं आणि नंतर कधीतरी 'आलेल्या' अ‍ॅडम सँडलर प्रेमलाटेत ही डीव्हीडी विकतही घेतली. मलाही हा पिच्चर जाम आवडतो. मला एकूणच अ‍ॅडम सँडलर फार आवडत नसला तरी त्याचे काही पिच्चर्स आवडतात. ड्र्यू बॅरिमोरनेही काम मस्त केलं आहे.
'गोजिरी' पाहिला नाहीये, तुझ्याकडे एखाद्या शनिवारी आलं पाहिजे युएस्बी हार्डड्राईव्ह घेऊन!!

अवांतरः तू Big Daddy पाहिला आहेस का सँडलरचा? तुला आवडेल असं वाटतंय.

अतिअवांतरः बहुदा विजु माने माझ्या एक बॅच पुढे आमच्याच कॉलेजात होते शिकायला!

विकास's picture

22 Oct 2010 - 1:52 am | विकास

दोन्ही चित्रपट पाहीलेले नाहीत. अ‍ॅडम सँडलर तसा आवडत नसल्याने पाहीला गेला नाही, गोजिरी माहीतच नव्हता... मात्र आता दोन्ही नक्की बघेन. शिवाय आता मनाची तयारी आहे की गोजिरी इंग्रजी चित्रपटावरून आहे... (कायद्याचे बोला हा चित्रपट असे माहीत नसताना पाहीला आणि मग जरा वैतागायला झाले... असो.)

योगी९००'s picture

22 Oct 2010 - 10:41 am | योगी९००

कायद्याचे बोला ह्यापेक्षा त्याचा originnal चित्रपट My Cousin Vinny पहा..ultimate ..!!!!

Joe Pesci, Marisa Tomei यांचा उत्क्रुष्ट अभिनय आणि धमाल कॉमेडी..

इन्द्र्राज पवार's picture

22 Oct 2010 - 10:58 am | इन्द्र्राज पवार

"....My Cousin Vinny..."

Vinny

~ १००% सहमत. जो पेसी याला चित्रपटाच्या अगोदर पाहिले होते ते Home Alone या धमाल चित्रपटातील दोघांपैकी एका घरफोड्याच्या भूमिकेत... त्यानंतर Raging Bull मध्य रॉबर्टे डी नीरो समवेत. दोन्ही भूमिका साईड हीरोच्या पण 'माय कझीन विनी' मध्ये चक्क हीरो....आणि तेही भावखाऊ भूमिकेतील.

मरीसा टोमी ला या चित्रपटाबद्दल 'सहाय्यक अभिनेत्री' चे ऑस्कर मिळाले होते.

Marisa

अजिबात चुकवू नये हा चित्रपट..... एका बिनकामाच्या पण तल्लख बुद्धीच्या वकिलाचा.

इन्द्रा

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2010 - 11:01 am | नगरीनिरंजन

'कायद्याचं बोला' मध्ये या गोष्टीचे मराठीकरण फार चांगले केले आहे असे माझे मत आहे.

इन्द्र्राज पवार's picture

22 Oct 2010 - 11:05 am | इन्द्र्राज पवार

रिअली ? मी हा (मराठी) चित्रपट पाहिलेला नाही.....माहितीही नाही. (आमच्याकडे फार वाईट अवस्था असलेल्या चित्रपटगृहातून मराठी चित्रपट प्रदर्शीत होत असल्याने इच्छा असली तरी तिकडे पाय वळत नाही...)

पण तुम्ही यावर थोडे सविस्तर लिहाल?

इन्द्रा

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2010 - 11:20 am | नगरीनिरंजन

सविस्तर लिहीण्याएवढे तपशील मला आठवत नाहीयेत. गोष्ट तीच आहे. मकरंद अनासपुरेच्या भाच्यावर आणि त्याच्या मित्रावर खुनाचा आळ येतो आणि वकीलीची सनदही न मिळालेला असताना तो त्या दोघाना आपल्या मैत्रिणीच्या मदतीने वाचवतो. मकरंद अनासपुरेने त्याच्या खास ढंगात गावरान चातुर्य झकास दाखवले आहे. चित्रपटातली स्थळे, संवाद आणि एकूणच प्रसंग अजिबात उपरे वाटत नाहीत. न्यायाधीशाच्या भूमिकेत मोहन आगाशे मस्त. या तरूण गावठी वकीलाबद्दल वाटणारे कौतुक आणि आलेला संशय वगैरे आगाशेंनी नेहमीप्रमाणेच फार छान दाखवलाय. प्रतिस्पर्धी वकीलाच्या भूमिकेत सचिन खेडेकरही छान.
एकच गोष्ट खटकणारी म्हणजे या गावरान वकीलाची मॉड मिनीस्कर्ट घालणारी मैत्रीण (शर्वरी जमेनीस).

इन्द्र्राज पवार's picture

22 Oct 2010 - 11:32 am | इन्द्र्राज पवार

अरेच्च्या....तुम्ही तर शब्दनशब्द "माय कझीन विनी' मधला वापरला आहेत 'का.बो.' बाबत. मग आता मूळ इंग्रजी चित्रपट तुम्ही पाहाच (की पाहिला आहेच?).....काबो विसरून जाल.

"...मॉड मिनीस्कर्ट घालणारी मैत्रीण (शर्वरी जमेनीस)..."

~ हे वर्णनदेखील मरीसा टोमीचेच आहे....पण अफलातून अभिनय आहे तिचाही....(नो वंडर शी लिफ्टेड द ऑस्कर फॉर दॅट वन !)

इन्द्रा

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2010 - 11:54 am | नगरीनिरंजन

माय कझिन विनी मी पाहिलेला आहे आणि तो मला प्रचंड आवडला. मरीसा टोमी तर मस्तच!
का.बो. पाहताना मला माहिती होतं की तो मा.क.वि.ची नक्कल आहे तरीही तो मला एक मराठी चित्रपट म्हणून आवडला.

शिल्पा ब's picture

22 Oct 2010 - 1:56 am | शिल्पा ब

स्वतःला इंग्रजी कळते हे दाखवायचा प्रयत्न आवडला.

माझीही शॅम्पेन's picture

6 Nov 2010 - 9:22 am | माझीही शॅम्पेन

आत्ताच हा इंग्रजी चित्रपट लागोपाठ दोनदा पहिला
अजुन एक - चित्रीकरण अतिशय भन्नाट आहे , कोणीही रोज प्रेमात पडेल :)
मला नाही वाटत मी या नंतर गोजिरी पाहु शकतो , ओरिजिनल ते ओरिजिनलच

चिंतामणी's picture

6 Nov 2010 - 2:47 pm | चिंतामणी

जरा उशीरानेच वाचले हे परिक्षण.

मेमरी लॉसवरून इन्द्रज प्रमाणे मलासुद्धा "सदमा"ची आठवण झाली.