दसरा मेळावा

वेताळ's picture
वेताळ in जनातलं, मनातलं
18 Oct 2010 - 11:36 am

कालच मुंबईत दसरा मेळावा पार पडला.काही लोकाना तो तमाशा वाटला त्याबद्दल वाईट वाटले.बर असो,परत एकदा आपल्या लाडक्या साहेबानी शिवसैनिकाना नवा विचार व नवा नेता दिला.तो नवा विचार कोणता हे खर्‍या शिवसैनिकाला पुढच्या दसर्‍या पर्यंतदेखिल कळत नाही हे एक दसर्‍या मेळाव्याचे विशेष असते.साहेबाची प्रत्येक दसर्‍या मेळाव्याला कुठेना कुठे भगवा फडकवण्याची इच्छा असते,ह्या मेळाव्याला त्यानी एकदम साधी डोंबिवलीत झेंडा फडकवण्याची इच्छा व्यक्त केली. गेली ५ वर्षापासुन विधानसभेवर झेंडा फडकवण्याची इच्छा मात्र त्यानी त्याचा दोन पिढ्या बघुन दाबुन ठेवली असण्याची शक्यता जास्त वाटते.
साहेबानी सर्वाना परत एकदा शिवसेनेत घराणेशाही नसल्याची पुंगी वाजवुन दाखवली व टाळ्या मिळवल्या. नंतर त्यानी उदयोन्मुख युवानेते श्री मा.आदित्य ठाकरेजीना तलवार बहाल केली व त्याना युवकांच्या साठी काम करण्याची इच्छा असल्याची डरकाळी फोडली.आता आदित्यजी कोणत्या घराण्याचे आहेत असा कोता प्रश्न काही लोक विचारु शकतील .त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. युवकांच्या साठी काम करण्यासाठी आदित्यसाहेबाना दसरा सोडुन एकही चांगला मुहुर्त मिळाला नाही हे एक दसर्‍या मेळाव्याचे वैशिष्ट होते.आदित्यसाहेबानी तलवार उंचावुन काम करण्याची प्रतिज्ञा घेतली. आता तलवारीने काय काम करायचे हे एक मोठे कोडेच आहे.
नंतर मा. उध्दवजी ठाकरेनी ठाकरे शैलीत महाराष्ट्र सरकार वर नाकर्तेपणाची टिका केली. शेतकर्‍याच्या आत्महत्या,गाळपा अभावी शिल्लक राहणार उस,कापसाला दर मिळाला पाहिजे,रस्त्यांची दुर्दशा,भुखंडाचे असमतोल वाटप अश्या कित्येक विषयांवर भाषणकरुन त्यानी सरकार दोषी धरले.त्याचे चौफेर आरोप बघुन शिवसैनिक संतप्त झाला व मनातल्या मनात उध्दव साहेबाना मुख्यमंत्री करण्याचा मनात संकल्प केला.परत एकादा गद्दाराना शिव्या देण्यात आल्या व दुसर्‍या पक्षातील वाट चुकलेल्या लोकाना पवित्र करुन सेनेत प्रवेश देण्यात आला.आदेश भावोजीच्या कार्याची दखल घेवुन त्याना सचिवपदी नेमण्यात आले .
अश्या विवीधअंगी नटलेल्या शिवसेनेच्या दसर्‍यामेळाव्याची काल सांगता झाली.

राजकारणविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Oct 2010 - 11:38 am | अवलिया

चांगला वृत्तांत. धन्यवाद.

अप्पा जोगळेकर's picture

18 Oct 2010 - 11:41 am | अप्पा जोगळेकर

रा.रा. श्री. उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये रावणाचा वध ऐवजी रामाचा वध असा उल्लेख एकदा नव्हे दोनदा केला. ही स्लीप ऑफ टंग स्टार माझा वाल्यांनी बरोब्बर पकडली आणि तेच फुटेज वारंवार दाखवून लक्तरे काढली. मजा वाटली.

राज आणि उद्धव यांच्यातील फरक पुन्हा एकदा दिसून आला.
सेनेत घराणेशाही नाही हेच खरे अन्यथा थोरल्या ठाकर्‍यांचे निदान एकतरी गुण त्यानी आत्मसात केले नसते का?

शिवसेनेत घरानेशाही नाही ....

मग कार्याध्यक्ष .. युवा अध्यक्ष कोण आहेत ?
बरे यांना शिवसेनेच्या नेत्यांनी निवडून दिले असे मानले तर .. इतर ठीकाणी जी घराणी शाही आहे ते पण म्हणतील आम्हाला आमच्या नेत्यांनी निवडुन दिले म्हणुन ..

असो ..

राजकारणामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्ही मातब्बर नेत्यांचा मी चाहता आहे ..
परंतु आपपल्या पक्षाचे लोक -कार्यकर्ते नाराज होउ नये म्हणुन प्रयत्न झाले पाहिजेत असे वाटते.

शिवसेनेच्या युवाकार्यकर्त्यांपैकी कीती जणांना आदित्य ठाकरे हे आपले युवा नेते म्हणुन आवडतील ?
आणि मग वर्षानुवर्ष शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या माणसांची मते विचारत घेतली जाणार नाहित का .. हा हि एक प्रश्न उभा राहतो ...

बाळासाहेबांनंतर .. राज ठाकरे असते तर ती घराणी शाही नसती वाटली.. कारण ती जागा फक्त एकच माणुस समर्थ पणे पेलु शकत होता .. हे शिवसेनाच काय समस्त मराठी माणसाला ज्ञात होते.

बाळासाहेंबा नंतर असणारे शिवसेनेचे नेते ..
छगन भुजबळ (येवला .. नाशिक ) , नारायण राणे ( सिंधुदुर्ग ..कोकण ), गणेश नाईक ( नवी मुंबई ) .. आणि राज ठाकरे ( मुंबई .. नाशिक .. पुणे ..)
हे आता या पक्षात नाहीत .. अजुनही असेच वरच्या फळीतील नेते शिवसेनेतुन जात राहिले तर अवघड परिस्थीती होउ शकते ...

तिमा's picture

18 Oct 2010 - 8:21 pm | तिमा

वृत्तांताचा तपशील बरोबर नाही. आधी उध्दव ठाकरे भाषण करत होते. त्यानंतर बाळ ठाकरे स्टेजवर आले. त्यानंतर आदित्य ठाकर्‍यांना तलवार दिली गेली. नंतर साहेबांनी भाषण केले.
बाकी ह्या सगळ्याला किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्यानी ठरवावे.
जेंव्हा कोणी दुसर्‍याकडे बोट दाखवून शिव्या देतो तेंव्हा त्याची तीन बोटे स्वतःकडे वळलेली असतात असे म्हणतात.

अर्धवटराव's picture

19 Oct 2010 - 12:31 am | अर्धवटराव

शिवसेनेला लवकरच टाळं लागणार असं दिसतय.. आणि त्याचं दु:ख आहे

(दु:खी) अर्धवटराव