प्रियांकांची संवेदना

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
17 Apr 2008 - 8:06 am
गाभा: 

राजकाराणा पलिकडे जाउन विचार करणारी अशीही माणसे असतात.
एक चांगला लेख. जरुर वाचा प्रियांकांची संवेदना: http://loksatta.com/daily/20080417/edt.htm

प्रतिक्रिया

व्यंकट's picture

17 Apr 2008 - 8:30 am | व्यंकट

प्रियांका संवेदनशील असेल पण लेखक डोक्यात गेला.
हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय.

( अवांतर: संपादकांच्या जिभेचा रंग पहाण्याचे कुतूहल जागृत झाले आहे. )

व्यंकट

भडकमकर मास्तर's picture

17 Apr 2008 - 9:31 pm | भडकमकर मास्तर

आज सकाळी वाचला हा लेख लोकसत्तेत
मला आधीपासून केतकर फारसे ( तुमच्याइतके) डोक्यात जात नाहीत....
पण तरी हा लेख म्हणजे लांगूलचालन वाटला... अगदी विशाल सह्याद्री सारखा अन्क वाचतो आहोत असे वाटले....

विकास's picture

17 Apr 2008 - 5:17 pm | विकास

ह्या लेखातील पहीले वाक्य त्यावेळेस संगणकाच्या अवती भवती नसलेल्या आमच्या सहचारीणीस बोलून विचारले की हे कोणी लिहीले असेल. मी कधी लोकसत्तेतील अग्रलेख वाचायला जात नाही ह्याची कल्पना असुनही लगेच उत्तर आले, "अर्थातच....!"

मराठीत असल्या लेखनाला काय म्हणावे हे माहीत नाही पण सुमारसाहेब राज्यसभेचे सभासदस्यत्व मिळाले नाही तरी स्वामीनिष्ठा सोडत नाहीत हे बघून त्यांच्याबद्दल कौतुक वाटले... एक तर त्यांना खरेच तसे वाटते अथवा कधीतरी तरी खासदार होऊ अशा आशेने (की आशाळभूतपणे?) ते अजुनही लिहीत आहेत? मला तरी दुसरेच वाटते.

बाकी असले लेख आणि प्रियांकाचा पब्लिसिटी स्टंट मधे सामान्याला बुद्धीबळातील प्यादी केले जाते. काही झाले तरी काँग्रेसला आज तामिळनाडू मिळू शकत नाही... करूणानिधीच्या करूणेची गरज राष्ट्रीय पातळीवर पण आहे, दमुकचे लिट्टे बद्दलचे मत काँग्रेसला माहीत आहेच... तेंव्हा असले काहीतरी करायचे बाहेर येऊन एकतर्फी बोलायचे (ते खरे खोटे / नलीनी काही सांगू शकणार नाही कारण ती तर तुरूंगातच) आणि मग असले अग्रलेख वाचून आपण म्हणायचे वा वा किती छान!

बाकी मला हा अग्रलेख वाचताना अजून एक गंमत वाटली - हे संपादक महाशय स्वतःला सेक्यूलर म्हणणार, हिंदूत्वावाद्यांना येथेच्छ कुठेही बडवणार. तरी त्या बाबबतीत आता जरा ते सुधारलेत असे वाटतेय. पुर्वीचे असते तर बुश - प्युटीनला भेटले या वरलिहीतांना पण संघपरीवाराल शिव्या दिल्या असत्या...पण सर्वधर्म समभावात असल्या विषयी लिहीताना अद्वैत, गीता वगैरे आठवते...

असो. प्रियांका चांगली का वाईट या विषयी मी काही बोलत नाही. ती राजकारणात आहे आणि राजकारण करत आहे. त्यात गैर काही नाही. पण आपण ते राजकारण न समजता, आपले रुमाल, पिळून पाणी निघेपर्यंत आसवांनी ओले करण्याचे काही कारण नाही इतकेच म्हणावेसे वाटते.

त्या मानाने खर्‍या अर्थी हृदयस्पर्शी गोष्ट वाटली होती ती राहूल गांधींची (आठवते त्याप्रमाणे, जरी मला त्यांच्याबद्दल राजकारणी म्हणून कौतूक नसले तरी): राजीव गांधीच्या अंत्यसंस्कारांनंतर ते सरळ त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी (ज्याची पण त्यात हत्या झाली होती), गेले त्याच्या लहान बाळाबरोबर न बोलता थोडे खेळले, घरच्यांशी संवाद केला आणि परत आले.

आनंदयात्री's picture

17 Apr 2008 - 5:22 pm | आनंदयात्री

असेच वाटते.
बुश - प्युटीनला वाल्या टोल्यासाठी टाळ्या.
राहूल गांधींची गोष्ट नव्यानेच कळाली. धन्यु.

मुक्तसुनीत's picture

17 Apr 2008 - 7:35 pm | मुक्तसुनीत

प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या अलिकडील बातम्या वाचल्या. वाचताना झालेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. हे दोघे जे करत आहेत (प्रियांका तुरुंगातील अतिरेक्याला भेटणे, राहुल गांधींचे अचानक होटेलमधून उठून आदिवासींच्या घरी जाणे आणि तेथे रात्र काढणे ) त्यामधे राजकारण आहे यात शंका नाही. अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. इंदिरा गांधी आणीबाणीपूर्व काळात आपल्या करिश्म्याचा असा वापर करीत; राजीव गांधींचा तर मृत्यूच , सुरक्षिततेचे कवच ओलांडून लोकांमधे मिसळताना झाला.

तेव्हा इन्स्टंट लोकप्रियता, भावनांना हात घालणे , प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हे सर्व यातून घडते आणि एक डोळा त्यावर ठेवूनच हे केले जाते हे निश्चित. पण वरील बातम्या वाचताना त्यातील एक अंग थोडे हृदयस्पर्शी वाटले हे मी येथे प्रामाणिकपणे मान्य करतो. काँग्रेस हा पक्ष सरंजामशाही विचारांचा , चमच्यांनी , भ्रष्टाचारी लोकांनी , गुंडांनी वर्षानुवर्षे चालवलेला आहे या आणि यासारख्या सर्व सिनिक (आणि खर्‍या) गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून त्याबद्दल विचार करतो तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले.

अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये.

इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच !

>>>.... तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले.

तो करूणेचा स्पर्श मी आधी म्हणल्याप्रमाणे राजीव अंत्यसंस्कारांनंतर राहूलच्या वागण्यात दिसला. बाकी आत्ताचे वर्तन हे राजकारण जसे आहे तसेच त्यात होत असलेली माध्यमांची मदत हे पण आहे.

>>>इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच !

तुम्हाला काय वाटते माध्यमे त्याला प्रसिद्धी देतील का? आणि दिली तरी ती सरळ देतील का?

आता या संदर्भात सर्वार्थाने ज्वलंत उदाहरण देतो (वाद होऊ शकेल या अर्थी) : नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही). स्वतः इतर मागासवर्गीय, गुजरात विकास चांगला केला असे अनेकांकडून (गुजराथी लोकांकडून ) ऐकले होते. पण फारतर ५०% खरे समजायचो... निवडणूकींच्या वेळेस त्यांच्या विरुद्ध माध्यमांनी तमाशा केला. ते भ्रष्टाचारी नाहीत हे सांगताना काय म्हणणार तर ते ब्रम्हचारी आहेत त्यामुळे गरजा कमी! सुमार रावांचा तर काय तेंव्हा नुसता थयथयाट चालला होता. पण तसे गांधी घराण्याबद्दल घडते का? "मोठा वृक्ष कोसळला तर सभोवताली छोट्या गोष्टी उध्वस्त होवू शकतात" असे म्हणत राजीव गांधीनी ३००० शिखांची हत्या एका वाक्यात "जस्टीफाय" केली. कोणी काही म्हणाले? आज तुम्ही अमेरिकेत पहाल तर आजही लक्षात येईल की सर्वसाधारण पणे शिख समाज हा इतर भारतीयांपासून लांब राहतो. अर्थात माझे चांगले ओळखीचे आहेत तरी देखील सांखिकी निरीक्षण केले त्यावर बोलतोय. भारतात सुवरणमंदीरात आणि दिल्लीच्या गुरूद्वारात भिंन्द्रनवालेचा फोटो लावला जातो(तो मी स्वतः पाहीला आहे आणि त्याबद्दल चे कौतूक ही तिथेच ऐकले आहे गेल्या २ वर्षात). अर्थात या बद्दल माध्यमे काही बोलणार नाहीत...आणि हो,राहूल गांधींना बॉस्टनला (काही वर्षांपूर्वी ) पकडले होते, त्याची माहीती काही राजकारण्यांनी मागायचा प्रयत्न केला (माहीती अधिकार वापरून) तरी स्टेट डिपार्टमेंट देत नाही... पण हे आपल्याकडे सांगितले जाते का?

आता अमेरिकेतील हिलरी-ओबामाबद्दलचे बघा. माध्यमे एकाला कसे जवळ करतात आणि दुसर्‍यास बाजूला. अगदी काल सीएनएनवर परत पाहीले..असो.

यात काही गांधी घराण्याबद्दलचा द्वेष नाही, राग नाही, पण असलाच तर माध्यमांच्या बद्दल आक्षेप आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Apr 2008 - 9:29 pm | प्रकाश घाटपांडे


अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये.


Public memory is always short लोकांच्या मनात बिंबणारी कृती ही जर निवडणुकीच्या टप्प्यात असलेल्या काळात झाली तर तिचा फायदा पक्षाला होतो. राजीव गांधींच्या हत्ये वेळी सहानुभुतीची लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता. अहो आपल्या शत्रुने देखील जर मन हेलावणारी कृती केली तर आपल्याला काही काळ शत्रुत्वाचा विसर पडतो.

प्रकाश घाटपांडे

बगाराम's picture

18 Apr 2008 - 7:25 am | बगाराम

मुक्तसुनीतजी,

अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते.

नेहरुंचे ह्या विषयी एखादे उदाहरण देऊ शकाल का?

-बगाराम

बगाराम's picture

18 Apr 2008 - 8:00 am | बगाराम

किस्से वाचले पण त्यामध्ये तर नेहरूंची स्तुतीच केली आहे तुमचा रोख काहीसा उलटा वाटल्याने विचारणा केली. असो. लगोलग दिलेल्या दुव्या बद्दल आभारी आहे

विजुभाऊ's picture

17 Apr 2008 - 9:34 pm | विजुभाऊ

विकासराव ;
गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का?
विकासराव तुम्हाला गुजरातबद्दल फारसे काही माहीत नाही. थोडे संदर्भ वाचा डॉ गणेश देवींचे "वानप्रस्थ" वाचा तुम्हाला कलेल तिथे काय चालले होते. तेजगढच्या आदीवासी भागात मोदी समर्थकानी कसे थैमान घातले होते ते कळेल.
गुजरात मधला सामान्य माणूस एकमेकापसुन कसा दुरावला गेला आहे ते लक्षात येईल

ऐश्वर्या राय's picture

17 Apr 2008 - 10:30 pm | ऐश्वर्या राय

थोडेसे तर्काशी संबंध ठेवून लिहायचा प्रयत्न तरी करा. गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे त्याशिवाय माध्यमांच्या प्रभावाच्या याकाळात माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला? आणि तुम्ही सांगितली तसली पुस्तके पैशाला पासरी मिळतात. तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो?

विजुभाऊ's picture

18 Apr 2008 - 6:19 am | विजुभाऊ

ऐश्वर्या राय भाऊ साहेब
तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात म्हणजे नक्की काय?
ती पुस्तके निदान वाचली तरी जातात. "पांचजन्य" तर तुमचे आपले लोक ही वाचत नाहीत. सरळ मुलाला बसायला देण्यासाठी वापरतात.
राहता राहीले ते मी सुचवलेले पुस्तक. त्या पुस्तकात सदर संदर्भातले केवळ एक प्रकरण आहे. अर्थात तुम्हाच्या वाचनात काहीच येत नसेल तर मी बापुडवाणा तरी काय करणार.
तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो? असलो नसलो तरी सर्‍हदय नकीच आहे.
माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते
दहशती खाली जगणे कधी अनुभवले आहे तुम्ही? अन्यथा तसा तर्क केला नसता तुम्ही. असो .जालाच्या महाजालात जगणार्‍याना प्रत्यक्ष जगण्याच्या वेदना कशा जाणवणार.
पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला
राज्य कर्तेच जेंव्हा असे वर्तन करतात तेंव्हा त्या शासनास कल्याणकारी शासन म्हणायचे की कोणते.मोदी प्रेमामुळे अन्ध होण्यापेक्षा कावीळ बरी म्हणायची
गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे ? पाहीले आहे गुजरात ला जाऊन? केवळ गांधी नगर ,बडोदा ,सुरेन्द्र नगर, आणि सूरत म्हणजे गुजरात नव्हे. असो तर्काच्या जगात आणि वास्तव जगात हा फरक असणारच की

बगाराम's picture

18 Apr 2008 - 7:15 am | बगाराम

विजुभाऊ तुमची प्रतिक्रिया आवडली. पण दुर्दैवाने आज 'ऐश्वर्या राय' नावने लिहिणार्‍या व्यक्तिंसारखे अतिरेकी विचार करणारे आपल्या समाजात वाढत आहेत. आणि वाईट म्हणजे त्यातले बरेचसे चांगले शिकले सवरलेले लोक आहेत.

जिथे जिथे हींदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत तिथे तिथे हे प्रकार घडलेच आहेत. जेव्हा याप्रकारची कृत्ये होतात तेव्हा ती फक्त युध्द म्हणूनच होतात.थोड्याबहूत फरकाने ईस्रायल ने जे हल्ले पॅलेस्टाईन वर केले आहेत त्यातही अशाच स्त्रिया किंवा मुले मृत्यूमुखी पडली आहेत. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा बुध्दी गहाण पडत असते आणि लोक जे काही करतात ते केवळ एक युध्द या भावनेनेच करतात. त्यामुळे जर गर्भार स्त्रिया दंगलीत मारल्या गेल्या म्हणून शोक करायचा असेल तर सर्व देशातल्या दंगलींचा विचार करा.

पुण्याचे पेशवे

बगाराम's picture

18 Apr 2008 - 7:22 am | बगाराम

पुण्याचे पेशवे राव,
मलापण पूर्वी तुमच्यासारखेच वाटायचे. पण आता आपल्याकडे गुगल आहे. गुगल मध्ये गुजरात दंगल असे टाकून त्यावरील आकडेवारी वाचलीत तर डोळे पांढरे होतील. माझेही झाले. इतक्या प्रमाणात केलेल्या कत्तलीची तुलना अफ्रिकेतल्या यादवी युद्धांशीच होऊ शकते.
-बगाराम

विद्याधर३१'s picture

18 Apr 2008 - 7:54 am | विद्याधर३१

यावर मोदींचा विजय झाला नसून गुजराती जनतेने त्याना निवडून दिले आहे.(सो कॉल्ड मिडियाने कितीही विरोध केला तरी)
विद्याधर

विकास's picture

18 Apr 2008 - 2:26 am | विकास

नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही).

मी उदाहरण देताना सुरवातीस वरील वाक्य म्हणले होते. कारण तेच आहे की आपण - त्यात तुम्ही-आम्ही सर्वच आलो, माध्यमांमधील वाचून कोणाएकाच्या बाजूने अथवा विरुद्ध स्वतःची मते तयार करतो. बहुतांशी अशी मते तयार करताना ती काँग्रेस आणि साम्यवादींच्या बाजूने होतात. हिंदूत्ववादी असे म्हणले रे म्हणले की संपले हा गुंडच असणार, दहशतवादी, "फॅनॅटीक" सर्वच आले.

आता आपल्याच प्रतिसादातील मजा बघा ना - ३००० शिखांना मारले गेले या बद्दल आपण काही बोलत नाही आहात. आधी मुद्दा आणला नाही पण नक्षलवाद्यांनी किती सामान्यांना मारले आणि अजून कायदा कसा हातात आहे ते माहीत आहे का? सनदी अधिकार्‍यांना मारले आहे... पण त्या बद्दल बोलले जाणार नाही. कारण त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. त्याहुनही आधीचे उकरायचे तर गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात किती लोकं मेली कितीजणांची घरं उध्वस्त झाली या बद्दल बोलले गेले कधी का आता बोलले जाते? इतके सर्व करून काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांबद्द्ल कोणी बोलणार नाही. मग मोदींबद्दलच का इतका आकस? - ते मोदी म्हणून, की हिंदूत्ववादी म्हणून, का अल्पसंख्यांकांच्या विरोधात झाले म्हणून का केवळ मानवतेच्या विरुद्ध झाले म्हणून. दुर्दैवाने यातील शेवटचे कारण सोडल्यास इतर तिन्ही कारणे या मागे आहेत असे म्हणावे लागते.

मी असे म्हणत नाही की म्हणून गुजराथला प्रसिद्धी देऊ नका पण असा "आप पर" भाव कसा चालतो आपल्याला? आणि हे मी आपल्याला उद्देशून म्हणत नाही आहे तर माध्यमांना आणि तथाकथीत विचारवंत असे कसे वागतात हा प्रश्न आहे. बरं इतके आहे तर त्यांना मते कशी मिळू शकली आणि ती देखील अशा ठिकाणी जेथे त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती? मग माध्यमांचे असे काय चुकले?

हा सर्व वाद कोणा एका व्यक्तीची / विचाराची बा़जू घेण्यासाठी नाही तर निव्वळ विचार करताना आपण माध्यमांचे वाचत स्वतःचे विचारस्वातंत्र्य कसे गमवून बसलो आहोत या संदर्भात आहे.

ऋषिकेश's picture

17 Apr 2008 - 10:37 pm | ऋषिकेश

सुमार केतकरी चाटण खासदरकी मिळण्यासाठी नियमित घेत राहवे हाच निष्कर्श
बाकी अग्रलेखाने अंमळ करमणूक झाली हे खरेच ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

परवा ती प्रियांका आणि नलिनीच्या भेटीची बातमी दुरचित्रवाहिनीवर बघितल्यापासुन कधी एकदा केतकरांच्या चिरंजिवानी अर्थात कुमार केतकरांनी उधळलेली स्तुतीसुमने "लोकसत्ता" मधे वाचतेय असे झाले होते.पण काही केल्या ती "लोकसत्ताचे "आंतरजालावरील पान काही उघडत नव्हते.म्हणुन तोंडसुख घ्यायला आणि प्रतिक्रिया देण्यास अंमळ उशिरच झाला!
केतकरांनी त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे हुजरेगिरी केली हे उघड! ......वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा असावी !
पण, काहीही म्हणा !प्रियांकाचे टायमिंग जरा चुकलेच किंवा वाहिनीच्या गांधी नेहरु समर्थकांना ही बातमी जरा उशिरानेच समजली(कि जाणीवपुर्वक उशिराने दिली गेली ते काँग्रेसचे भाटच जाणोत).
भेटीच्या दिवशीच माहित झाले असते तर झुंबड करुन त्या तथाकथित संवेदनशील भेटीचे थेट प्रक्षेपण दाखवता आले असते. गेलाबाजार किमान संत नलीनी आणि सुपुत्री प्रियांका यांची गळाभेट आणि संभाषण याची देही याची डोळा भारतीय जनतेला बघता आला असते.
राजीव यांचा अंत ज्याप्रकारे झाला ते अतिशय दुखदायी होते हे अगदी खरेच ...........पण म्हणुन त्यांना का मारले ?याचा शोध घेण्याची संवेदना व इच्छा एकदम अशी अचानक त्यांची सोनपुतळी लेक प्रियांका हिच्यामधे कुठुन जागृत झाली देव जाणो?
त्याही पेक्षा या भेटिचे कुठल्याही प्रकारचे भांडवल (राजकीय भांडवल)करु नये अशी विनंती तिने प्रसारमाध्यमांना केली होती(असे नुसतेच म्हणायचे बरं का!).पण ते कुठले ऐकायला?ही बातमी लाळघोटेपणा करत सगळ्यात आधी कोण दाखवतो यासाठी स्पर्धाच लागली होती.
प्रियांकाने म्हणे शंका बोलुन दाखवली की "तिच्या वडिलांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर अर्थात लिट्टे बरोबर स्थानीक राजकिय पक्षाचा देखिल हात असु शकतो". आता हे सांगायला प्रियांका कशाला हवी ?शेंबड पोर देखिल सांगेल. आणि राजीव हत्येचा शोध चालू असताना सध्या जे UPA चे घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांची नावे देखिल संशयितांच्या यादीत होती.
नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?आणि बहुदा केतकर पण विसरलेच यांची नावे घ्यायला! केतकरांची सवय थोडीफार बदलतेय बहुदा?
हे नेहरु गांधी घराणे भारतीय जनतेची दिशाभुल करण्याचा आपला वडिलोपार्जित उद्योग(धंदा असे वाचावे) कधी बंद करणार देवच(सोनीयादेवीच) जाणो बहुतेक केतकर आहेत तो पर्यंत तरी हे असेच चालु राहणार यात शंका नाही!
सदरची प्रतिक्रिया मी मायबोली वर देखिल दिली होती.
काही आक्षेप असल्यास उडवु नेमस्तक उडवु शकतात.
(केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी)
"अनामिका"

विकास's picture

19 Apr 2008 - 8:56 pm | विकास

आपला प्रतिसाद आवडला. मस्त आहे.

>>>नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?

या संदर्भात: एकदा बीबीसी वर प्रियांकाची कुठल्यातरी निवडणूकीच्या थोडे आधी मुलाखत ऐकली होती. त्यात तीला बीबीसी वार्ताहार खोचून खोचून प्रश्न विचारत होता जेणे करून ती संघ/संघपरीवार/भाजपा वगैरे वर नेहेमीचे आरोप करेल. पण ती शेवटपर्यंत तसे बोलली नाही. जे काही सामाजीक प्रश्न आहेत ते सर्वत्र आहेत आणि ते उखडून काढले पाहीजेत अशा अर्थाचे ती म्हणाली.

वरील प्रसंगामुळे मला तिचे राजकारणी म्हणून नक्कीच appreciation करावेसे वाटले/केले जरी याचा अर्थ मी काही तीला / ती म्हणले त्यांना मत दिले असते असा नसला तरी...

परदेशात अथवा परदेशी वृत्तसंस्थांशी/कार्यक्रमात अशा पद्धतीचे ऐकलेले दुसरे म्हणजे पि.व्ही. नरसिंहराव आणि भाजपचे काही नेते.

प्रियांकाने नलिनीची घेतलेली भेट ही तुरुंगाचे सगळे नियम धाब्यावर बसवुन घेतली आहे असे निष्पन्न झाले आहे.
इथे वाचा.
http://www.hindu.com/2008/04/18/stories/2008041854781002.htm
(केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी)
"अनामिका

थिटे मास्तर's picture

28 Jul 2017 - 3:03 am | थिटे मास्तर

हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय.

छानच प्रतिसाद होता

गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का?
वाचुनच चर्र झाल...अस पशुवत कोणिहि कोणाहि बरोबर करु नये. मि काय म्हणतो विजुभाउ कि गुजरात दंगलित एकमेव दोषी ठरवलेल्या व्यक्ति ला तर झाडुन सगळ्या तपास यंत्रणांनि / न्यायालयांनि निर्दोष सोडले पण त्यानंतही भारतात अशा घटना घडल्या आहेत, घडतायत त्याचे ताजे उदाहण म्हणजे बंगाल मध्ये सरकारी छत्रछायेखालि अहिंसक आणि आदर्श अशा धर्माच्या लोकांचा चाललेला नंगानाच, ह्यावर आपण जर काहि आपले विचार व्यक्त केलेत तर बर होईल कारण वर एका प्रतिसादात आपण म्हटलय कि गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का?
मग बंगाल मध्ये मरणारे तुमच्यासाठि माणसे नाहित का हो ?

चिक्कार उदाहरण आहेत सध्या फक्त बंगालचाच उल्लेख केलाय, हा धागा वर काढणे किंवा ह्यावर प्रतिक्रिया देण्याचा उद्देश एव्हढाच आहे कि आपल्याला गुजरात दंगलिचि सातारा (महाराष्ट्रात) राहुन जर एव्हढि माहिति होति तर त्याच्या फार पुर्वि घडलेल्या दुर्दैवि अशा मुंबई दंगलिबाबत आपल्या सारखा पुरोगामि माणुस अनभिज्ञ कसा ?
ईतका कि धागा काढुन मिपाकरांस विचारावे लागले कि "१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ""

खफ वर आपण ताकाला जाउन भांडे लपविण्याचा ईन्कार केलाय.

तुर्तास एव्हढेच जर माझ्या ह्या प्रतिसादाला उत्तर आले तर मग छानपैकि राहुल आणि प्रियांका वर लिहिन म्हणतो.