इतिहास

अन्या दातार's picture
अन्या दातार in काथ्याकूट
27 Aug 2010 - 10:37 pm
गाभा: 

काल बातमी वाचली. आणि काही प्रश्न माझ्या मनात आले.

१] हिटलरचे नक्की कोणते पूर्वज स्थलांतरित झाले? याविषयी काहीही माहिती दिली नाही.
२] हिटलरला तेंव्हा कळाले असते तर काय झाले असते हा तर्क लढवणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हणले असते या पठडीतले आहे.
३] आज जर हिटलरला कळाले असते इतिहासात काही तरी फरक पडला असता का?

समजा एखादा माणूस अनेक वर्ष एखाद्या देशात राहत असेल, त्याला त्याच्या वंशाचा अभिमान असेल तर तो काय आपले पूर्वज कुठले होते, कुठल्या धर्माचे, वंशाचे होते हे बघत बसेल का? मग इथे हिटलरला दोष का देता? किती लोकांना आपल्या पूर्वजांबद्दल माहिती आहे?
आता मी ज्या वंशाचा आज आहे त्याचा इतिहास मी बघणार आहे का? काय गरज आहे त्याची?

मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

27 Aug 2010 - 10:40 pm | अन्या दातार

बातमीचा दुवा खाली देत आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=957...

sagarparadkar's picture

28 Aug 2010 - 12:21 pm | sagarparadkar

उगाचच युद्धे आणि आक्रमणे करणारा, आणि वर्णद्वेषी हिटलर धिक्कारार्हच आहे. पण त्याने आणखी एक घोर चूक करून ठेवली ती म्हणजे 'आपल्या' स्वस्तिकाला त्याने क्रूर वर्णद्वेषी राजवटीचे प्रतीक बनवून टाकले.

पाशिमात्य आणि एकूणच जग त्यामुळे स्वस्तिक पाहून हिन्दु / वैदीक संस्कृतीचे स्मरण करण्याऐवजी नाझी राजवटीचे स्मरण करतात. मग त्यांना स्वस्तिक या चिन्हाची मूळ ओळख करून देणारा माणूसदेखील नाझीसमर्थक वाटायला लागतो. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे.

मृत्युन्जय's picture

28 Aug 2010 - 12:26 pm | मृत्युन्जय

अश्या लोकांना अगदी तुच्छ शब्दांत सांगावे की त्याचा स्वास्तिक उलटा होता. त्यामुळे तो सैतानाचे प्रतीक होता.

ही बातमी खरे तर माझ्यासाठी जुनीच आहे. खूप वर्षांपूर्वी एका कादंबरी मध्ये वाचल्यासारखे आठवते, कि हिटलर आणि त्याच्या वडिलांचे पटत नसे, आणि त्याचे वडील अर्धे ज्यू असल्यामुळे त्याच्या मनात ज्युंविषयी इतका राग निर्माण झाला. (कदाचित ते त्याच्या आईला खूप त्रासही देत असावेत).
कादंबरीचे नाव 'हिटलर' किंवा 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' असावे. म्हणजे अशा नावाच्या दोन कादंबरी आहेत, पण वाचले नक्की कशातून ते आठवत नाही. असो.
त्याच्या वडिलांबद्दल थोडी फार माहिती विकीपेडिया वर आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Adolf_Hitler

प्रकाश घाटपांडे's picture

28 Aug 2010 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

आपल्याला वडिल आजोबा पणजोबा फारतर पुढे खापर पणजोबा इथपर्यंत मौखिक माहिती आपल्या घराण्याची असते. त्या अगोदरचे काय? हे माहित नसते. तरी देखील आपण पुर्वजांचा प्रांत भाषा जात पंथ यानुसार आपापल्या परीने अभिमान व अभिनिवेश बाळगत असतो.
अंतुलेंना एका पत्रकाराने वंशावळी नुसार तुमचे पुर्वज हे कोकणस्थ ब्राह्मण म्हणजे हिंदु होते असे काहीतरी सांगितले. अंतुले म्हणाले माझ्या कैक पिढ्या याच मातीतल्या आहेत त्याने काय फरक पडतो.

विकास's picture

28 Aug 2010 - 5:48 pm | विकास

(नाव विसरलो, येथील सभासद नाही/नसावेत, पण) कोणा एका थत्ते नामक पत्रकाराच्या लेखात वाचल्याचे आठवते. खरेखोटे माहीत नाही.

काही पिढ्यांपुर्वीचा अनंत करंदीकर नामक माणूस हा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडला म्हणून त्याला त्याच्या घरच्यांनी आणि हिंदू गावकर्‍यांनी वाळीत टाकले. मग त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारला. पुढे त्यांना झालेल्या मुलांना गाव "अंतुची मुले" म्हणू लागले ज्याचे पुढे आडनाव "अंतुले" झाले.

असेच मी फारूक अब्दुल्लांबद्दल ऐकून आहे. ते जेंव्हा पहील्यांदाच मुख्यमंत्री झाले तेंव्हा नवस फेडायला वैष्णवीदेवीच्या देवळात गेले. पुजार्‍यांनी फक्त हिंदूच का असे काहीतरी म्हणल्यावर त्यांनी वंशावळ काढून दाखवली!

बाकी मूळ चर्चेसंदर्भातः अनेकदा हिंदू (आणि इतरही धर्मातील) कुटूंबात जन्माला आलेल्या व्यक्ती नाही का (चांगल्या अर्थाने) बंडखोरी करण्याच्या नादात, त्या त्या धर्मियांच्या विरोधात अगदी टोकाची भुमिका घेत?

इन्द्र्राज पवार's picture

28 Aug 2010 - 12:52 pm | इन्द्र्राज पवार

"अंतुले म्हणाले माझ्या कैक पिढ्या याच मातीतल्या आहेत त्याने काय फरक पडतो."

....अगदी खरं आहे. 'काय फरक पडतो?' हीच मात्रा वरील उदाहरणाला लावायला हवी. हिटलरच्या एका नातलगाचे (तोही खापरभाचा...) डीएनए अगदी बॉण्डपटात शोभेल अशा पद्ध्तीने मिळवायचे आणि निष्कर्षाच्या पुड्या सोडीत बसायचे हा युरोपमधील खावूनपिऊन सुखी असलेल्या रिकाम्या लोकांच्या अनेक उद्योगांपैकी एक. आता हिटलरचे पूर्वज आफ्रिकन होते म्हणून आफ्रिका खंडातील लोकांनी काय "झुलू" नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करायचा की, डीएनएत ज्यू सिम्प्टम्स सापडले म्हणून इस्त्रायलमध्ये काळा झेंडा लावून त्याच्या नावाने (घरचाच माणूस काळ झाला होता म्हणून) परत एकदा बोटे मोडीत बसायचे? यातील काही होणार नाही. आफ्रिकन लोकांना सकाळ-संध्याकाळ खाण्याची भ्रांत तर ज्यू लोकांना अरबी दहशतवादाचा रोजचा सामना. काय फरक पडणार आहे त्यांच्या जीवनप्रणालीमुळे या महान शोधामुळे? त्यामुळे अंतुले म्हणतात तेच खरे "काय फरक पडतो?"