तीन बातम्या...........

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
14 Aug 2010 - 5:44 pm
गाभा: 

टिव्हीवर काही बातम्या एक दोन दिवस अगदी कंटाळा येईपर्यत दाखवत राहतात. नंतर त्या लगेचच लोकांच्या विस्मृतीत जातात. गेल्या एक दोन महिन्यात घडलेले काही बातम्या आणि आजकालच्या काही बातम्या ह्यात खुपच जवळचा संबध वाटतो. त्याबद्दल खालील तीन बातम्या देत आहे.आपणाला त्या बद्दल काय वाटते त्याचे अभिप्राय जरुर द्या.

पहिली बातमी म्हणजे धान्यापासुन दारु बनवायला महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. त्या निर्णयाचा फायदा सर्व आघाडीच्या राजकारण्यानी घेतला.आपआपल्या नातेवाईकांच्या नावे त्यानी धान्यापासुन दारु बनवायला परवानगी घेतली व नंतर इतराना परवानगी देण्याचे बंद केले.त्यावर सगळीकडे खुप गदारोळ उठला. इथे काहयचे वांदे असताना दारु बनवायला कुठले धान्य वापरणार? आता अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडतील. सामान्यानी आता खायचे काय? इ. प्रश्न उठले आणि थोड्या काळाने ते थंड देखिल पडले.पण अचानक एक बातमी परवापासुन दिसु लागली ती म्हणजे १८००० टन अन्न ध्यान्ये सरकारच्या अन्नमहामंडळाच्या गोडाऊन मध्ये चक्क सडत पडले आहे. आता त्याचा वापर खाण्यायोग्य नाही. मग त्याचा वापर आता कशाला करायचा? सरळ आहे दारु बनवायला कच्चा माल अगोदरच तयार होता.व आता तोच वापरुन दारु गाळायला हे राजकारणी तयार बसलेच आहेत.आता सडलेले ते धान्य ह्याना एकदम अल्प किंमतीत विकत मिळणार. त्यातुन दारु गाळल्यावर लिटर मागे २० रुपये सबसिडी व धान्याची दारु म्हणुन जास्त दर,चंगळ आहे त्याची.

दुसरी बातमी देखिल सर्वानी वाचली/एकली असेल. ती म्हणजे सध्याच्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने मुंबईमधील मुंबई पोर्ट ट्रस्ट हे मुंबईतुन बाहेर काढायचा ठराव पास केला आहे.मुंबई पोर्ट जर बाहेर नेले तर त्याची प्रचंड मोठी रिकामी जागा सरकार व बिल्डराना सहज उपलब्द होऊ शकेल. सरकार ने बंदरामुळे मुंबईला होणारे प्रदुषण व गर्दीचा मुद्दा धरुन असा ठराव मंजुर केला आहे.आता त्यावर नेहमी प्रमाणे शिवसेना व इतर पक्षानी टिकेची झोड उठवली आहे. पंरतु आघाडी सरकार ने तसा ठराव करुन केंद्राकडे मंजुरीला पाठवला आहे.त्यानंतर थोड्याच दिवसात मुंबई बंदरात दोन जहाजाची टक्कर झाली व हजारो टन तेल मुंबईच्या समुद्रात सांडले गेले. त्यातल्या एका जहाजावर जे कंटेनर होते त्यात किटकनाशके होती. ती देखिल पाण्यात मिसळली गेली आहेत. मग काय चोवीसतास बोंबाबोब करणार्या वृत्त्वाहिन्याच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे. त्यानी ह्या अपघातामुळे मुंबई व उपनगरात किती प्रदुषण झाले ,किती मासे मेले.कुणाचे किती नुकसान झाले हे आकडे फुगवुन सांगायला सुरुवात केली आहे.त्यातुन सरकारच्या मुद्द्याला आयतेच बळ मिळाले आहे.प्रदुषण होते म्हणून बंदर बाहेर न्यायला पाहिजे हा आमचा मुद्दा बरोबर आहे हे ठसवायला सरकार यशस्वी होताना दिसत आहे. पण पुर्वी कधी असला अपघात मुंबई बंदरात झाला नसताना एकदम अचानक असा अपघात कसा काय झाला?तो पण नेमका मुंबईच्या अगदी जवळच्या किनारयावर कसा झाला? बोट वळवायला जागा नव्हती असा देखिल कोणता प्रश्न नाही कारण जिथे अपघात झाला तिथे खुप जागा आहे.मग हे काम कुणाचे?दोन्ही बातम्या एकमेकाशी संबध दर्शवत नाहीत का?

पुढची एक बातमी ज्यावर मिपावर बरेच दिवस चर्चा झाली होती . ती म्हणजे भारतात नक्षलवादी खुप प्रबळ होत आहेत. त्याची आता स्वप्ने खुप मोठी झाली आहेत. २०२० पर्यत त्याना दिल्ली ताब्यात घ्यायची आहे.तसा केंद्र सरकारला देखिल पुरावा सापडला आहे.गेल्या एकदोन महिन्यातील घटना बघितल्या तर दहशतवादी शांत झाले आहेत व नक्षलवादी उड्या मारु लागले आहेत. जवळ जवळ ३००/४०० लोक त्याच्या हल्ल्यात ह्या दोन/तीन महिन्याच्या कालावधीत मृत्युमुखी पडले आहेत्.सरकार ने आता पर्यत त्याच्या विरुध्द खुप उपाय केले आहेत पण नक्षलवादी अजुन ताकतवान होत आहेत.
आता ह्या बातमीला दुसरा भाग होईल अशी मी एक बातमी परवा वाचली आहे. ती म्हणजे राजस्थान मधुन मध्य प्रदेशाकडे निघालेले ६१ ट्रक ज्यात स्फोटके भरली होती ते अचानक गायब झाले आहेत.६१ ट्रक स्फोटकाचे एकाएकी गायब होणे हे एक आश्चर्यच आहे.१ किंवा २ ट्रक गायब झाले असते तर ठिक होते पण ६१ ट्र्क?हे नक्षलवाद्याच्या एकाद्या नव्या हल्ल्यासाठी झाले नसतील कशावरुन?कारण गायब झाले तो भाग नक्षल पट्ट्याजवळचा भाग आहे.मग ह्या ६१ ट्र्क मधील स्फोटकाचा वापर कोण कसा करणार आहे हे तरी लवकरात लवकर सरकार ने शोधुन काढणे गरजेचे आहे.कारण १० सशस्त्र माणसे मुंबई जर ३ दिवस ओलिस ठेवु शकत असतील तर हे लोक काय करु शकतील?

प्रतिक्रिया

ही अशी प्रतिक्रिया देण्याचे कारण ?

तुम्हाला ह्या बातम्या सिरियस वाटत नाहीत का ?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6310286.cms

हलकट दाऊद नक्षलवाद्यांना मदत पुरवतोय म्हणे. ह्याचा कुणी केसही वाकडा करु शकत नाही असे दिसतेय.

बहुधा येणारी काही वर्षे नक्षलवाद्याच्या हिंसाचाराने बरबटलेली असतील. दोनचार उच्चपदस्थ राजकारणी त्यांच्या हातून मेले तरच सरकार जागे होऊन काही तरी करेल. नाहीतर असेच शेकडो पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाचे लोक मरणार.

चिरोटा's picture

14 Aug 2010 - 10:37 pm | चिरोटा

दोनचार उच्चपदस्थ राजकारणी त्यांच्या हातून मेले तरच सरकार जागे होऊन काही तरी करेल

खरे आहे. सरकार्,पोलिसांमधले लोक त्यांना मिळाल्याशिवाय बॉम्बस्फोट होवू शकत नाहीतं. जंगलात राहणार्‍या नक्षलवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळतातच कशी? तुरुंगात बस्तान मांडणारे दावूद/शकीलच्या लोकांना दारु/चरस वगैरे सेवा पुरवल्या जातात.

शिल्पा ब's picture

14 Aug 2010 - 10:55 pm | शिल्पा ब

भयावह आहे...सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ...मग ते धान्यापासून दारू असो कि नक्षलवाद.

रश्मि दाते's picture

14 Aug 2010 - 11:13 pm | रश्मि दाते

अगदि बरोबर आहे,जरका त्या संसद हल्ला झाला होता त्यात १०-२० हलकट राजकारणी मारले गेले असते तर अत्ता पर्यन्त अफजल गुरु फासावर असता,आघी दहशतवादी आणी आता नक्श्लवादी कसे होणार देवच जाणे

इंटरनेटस्नेही's picture

15 Aug 2010 - 3:55 pm | इंटरनेटस्नेही

इस देश का कुछ नही हो सकता असे काहे लोक का म्हणतात ते या बातम्यांवरुन स्पष्ट होते.

बातमी केवळ वाचून त्यावर तात्कालीक प्रतिक्रिया देणे सोपे असते मात्र एखाद्या बातमीचा मागोवा घेणे आणि त्याच अनुशंगाने येत्या काळातील घडामोडींवर लक्ष ठेवणे हे अभ्यासाचे काम आहे. वेताळ यांनी वर तीन महत्वाच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेतला आहे. आणि तिन्ही घटना भारतीय व्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम करणार्‍या आहेत.

विवेचन आणि सहसंबंध आवडले ...

- नीलकांत

सहज's picture

15 Aug 2010 - 4:04 pm | सहज

हेच म्हणतो.

स्फोटके भरलेले ट्र्क नाहीसे होणे अतिशय गंभीर बाब आहे. :-(