मिसळपाव व्यवस्थापन

सरपंच's picture
सरपंच in काथ्याकूट
13 Aug 2010 - 9:16 am
गाभा: 

नमस्कार,

मिसळपाववर नवीन काही सोय देताना किंवा काही बदल करतांना किंवा केल्या नंतर सर्व सदस्यांचे मत घेतले जाते. त्यावर एक धागा व्यवस्थापनाकडून काढला जातो त्यात्या विषयावर सदस्यांची जी मते आहेत ती मागवली जातात. सदस्यांनी आपले मत तेथे देणे अपेक्षीत असते. तसेच मिसळपाववर व्यवस्थापनाचा असा प्रयत्न आहे की ज्या सदस्यांना शक्य आहे त्यांना मिसळपावच्या कामात सहभागी करून घ्यावे. या सर्वांचा हेतू हाच की मिसळपाव हे प्रत्येकाला अधिकाधिक आपले वाटावे. आणि ते तसे आहे सुध्दा.

मात्र एवढ्यात असे लक्षात आले आहे की काही धागे आणि काही निवडक प्रतिसाद हे मिसळपाव कसे असावे आणि कसे नसावे आदींवर केंद्रित आहेत. या सर्व धाग्यांऐवजी ह्याच चर्चा त्यात्या आधिकारीक धाग्यांवर करता आल्या असत्या. असे असतांना अश्या व्यवस्थापकीय विषयावर चर्चा सुरू करणे योग्य नाही. यापुढे कृपया असे टाळावे.

मिसळपाववर काय असावे? काय नको? ते कसे चालावे? कसे दिसावे आदी कुठल्याही बाबतीत सदस्यांना आपले मत देण्याची मूभा आहे. नव्हे सदस्यांचा तो तसा अधीकार आहे. मात्र हा अधिकार जवाबदारीने वापरावा अशी रास्त अपेक्षा व्यवस्थापनाची आहे. मिसळपावच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत कुठल्याही विषयावर यापुढे सरपंच या आयडीवर संपर्क करावा. तसेच मिसळपावचे विस्तृत संपादन मंडळ आहे. आणि त्यांची नावे जाहीर आहेत. तुम्हाला कुठल्याही अडचणीसाठी ते हजर आहेतच. मात्र अनेक सदस्यं आपल्या प्रतिक्रियांत आणि स्वाक्षर्‍यांत संपादकांबाबत टिप्पणी करीत असतात, ते त्यांनी टाळावं अशी अपेक्षा आहे. संपादक एकाच वेळी संपादक आणि सदस्यं या दोन्ही भूमिकेत असतात. तेव्हा त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा, मैत्री आणि चेष्टा समजू शकतो, मात्र एक संपादक म्हणून त्यांना काहीही बोलणं सदस्यांकडून अपेक्षीत नाही. एखाद्या विषयावर केवळ सरपंचांचेच मत अपेक्षीत असेल तर तसे लेखन जाहीर करण्याची मूळीच गरज नाही ते सरळ व्यक्तिगत निरोपाने पाठवावे. मात्र जाहीर लेखनावर केवळ सरपंचांनी मत द्यावे संपादकांनी नको असे लिहीने अजीबात खपवून घेतले जाणार नाही.

यापुढे कृपया असे प्रकार टाळावेत. मिसळपाववर अनेक जेष्ठ सदस्यांचा खूप मोठा अधिकार आहे. मात्र असे असतांना नवीन येणार्‍या सदस्यांना मिसळपाववर गैरसोईची वातवरण तयार होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची जबावदारी सर्व जेष्ठ सदस्यांची आहे. तरी यापुढे या सूचनांचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षीत आहे.

मिसळपाववरील कसल्याही व्यवस्थापकीय अडचणीसाठी सरपंच आणि संपादक मंडळ हजर आहे. त्यांची मदत घ्यावी. जाहीर धागे काढू नये.

धन्यवाद,

- सरपंच

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

13 Aug 2010 - 9:35 am | शिल्पा ब

ठीक आहे...वाचनखुणा हा धागा उडवला तरी काही हरकत नाही.
वाचनखुणा हि सोय खूपच उपयोगी आहे हे सांगू इच्छिते.

इन्द्र्राज पवार's picture

13 Aug 2010 - 10:02 am | इन्द्र्राज पवार

"मात्र असे असतांना नवीन येणार्‍या सदस्यांना मिसळपाववर गैरसोईची वातवरण तयार होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची जबावदारी सर्व जेष्ठ सदस्यांची आहे."

हे आवडले. सहमत.
आता नवीन सदस्यांचीदेखील नैतिक अशी जबाबदारी आहे की, प्रतिसाद देताना आपल्या भाषेला वाचणार्‍याला ते लिखाण परत परत ते वाचावेसे वाटेल असा दर्जा देण्याचा प्रयत्न करावा. वर सरपंचानी म्हटल्याप्रमाणे इथे जे 'ज्येष्ठ' सदस्य आहेत ते खरेच सर्वार्थाने ज्येष्ठ आहेत, वयाने, अनुभवाने, व्यवसायाने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षणाने.

तसेच लेखन कमी असले तरी चालेल पण अन्य संस्थळावरील एकदोन वर्षे चघळलेले विषय इथे "नवे" म्हणून घेऊ नयेत. (मग तो एक विचित्र असा पायंडाच पडेल आणि संपादन मंडळाला "धागे डिलिट"ची एक नवीनच डोकेदुखी होऊन बसेल.)

बाकी धाग्यातील सर्व मुद्द्यांशी सहमत आहेच.

ऋषिकेश's picture

13 Aug 2010 - 10:38 am | ऋषिकेश

पूर्ण सहकार्य होतेच तसेच राहील ही ग्वाही

नितिन थत्ते's picture

13 Aug 2010 - 10:42 am | नितिन थत्ते

सहकार्याचे आश्वासन.

मदनबाण's picture

13 Aug 2010 - 10:46 am | मदनबाण

सहकार्याचे आश्वासन देतो...

आता हा धागा उघडलाच आहे तर मिसळपाव व्यवस्थापनकडे एक विनंती करतो...
टंक लेखन सहाय्य मिपावर कुठे दिसत नाहीये...नविन सदस्यांना लिखाण करण्यासाठी काही मदत हवी असे तर त्यांनी काय करावे ?
तेव्हा लवकरात लवकर पानावर पटकन दिसेल अशा जागी टंक लेखन सहाय्य उपलब्ध करुन द्यावे की व्यवस्थापनास नम्र विनंती.

विलासराव's picture

13 Aug 2010 - 2:33 pm | विलासराव

टंक लेखन सहाय्य मिपावर कुठे दिसत नाहीये...नविन सदस्यांना लिखाण करण्यासाठी काही मदत हवी असे तर त्यांनी काय करावे ?

सहमत. मलाही हि अडचण आली होती.

एक सुचना
नविन एपिक ह्या ब्राउसर मधे राईट हे टूल यासाठी फारच उपयोगी आहे असा माझा अनुभव आहे.बघा जमतंय का......
यामधे बर्याच भारतिय भाषेत टंक लेखन करु शकता.एखादा शब्द टाईप केल्यावर त्याच्याशी सबंधित योग्य पर्यायी शब्द
पहायला मिळतात, त्यातुन योग्य शब्द निवडता येतो.

सह्कर्याची हमी आहेच.

निखिल देशपांडे's picture

13 Aug 2010 - 3:17 pm | निखिल देशपांडे

तुर्तास आपण या दुव्याचा वापर करु शकता

छोटा डॉन's picture

13 Aug 2010 - 10:43 am | छोटा डॉन

सरपंचांच्या सुचवणीशी संपुर्ण सहमती आहे आणि १००% सहकार्य करेन असे सांगतो.
योग्य वेळी घेतलेला निर्यण म्हणुन मी सरपंचांचे आभार मानतो ...

- ( मिपाकर ) छोटा डॉन

अरुण मनोहर's picture

13 Aug 2010 - 11:18 am | अरुण मनोहर

पूर्ण सहकार्य नक्कीच.
व्यवस्थापन करणारे सदस्य खूप व्यस्त आहेत हे खरेच. तरीही महत्वाच्या गोष्टींना अनेक विनंत्या नंतर देखील विचारात घेतले जात नाही, तेव्हा खेदाने असे म्हणावे लागते की व्यवस्थापनाने देखील सदस्यांच्या लोकाग्रहाला अपेक्षेनुसार साद दिली नाही. (उदा. स्व संपादन.) ह्या बाबतीत बहुमत ऐकून देखील चंद लोकांचेच बरोबर असा अट्टाहास का?
दुसरे, वाविप्र हे डंपींग ग्राऊंड आहे का? तिथे असलेल्या मदतिच्या हाकांवरून असे वाटले. माझा स्वतःचा हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
http://www.misalpav.com/help.html#comment-220477

वाविप्र मधे सगळ्यात नविन प्रश्न हा आधी दिसला पाहिजे असे वाटते, म्हणजे लेटेस्ट उत्तरे वाचत वाचत खाली जाता येईल.
तिसरे- वाविप्र मधे आपला हा प्रश्न आधी कोणी विचारला आहे किंवा नाही, व त्याचे उत्तर काय होते हे कसे शोधायचे?

अमोल केळकर's picture

13 Aug 2010 - 11:45 am | अमोल केळकर

लवकरात लवकर मिसळीचे (पुर्वीचे ) चित्र मुखपृष्ठावर आणावे ही विनंती.

अमोल केळकर

लवकरात लवकर मिसळीचे (पुर्वीचे ) चित्र मुखपृष्ठावर आणावे ही विनंती.
मी मिसळीचे २ फोटो निलकांत आणि निखिलला मेल केले होते,त्या फोटोंचे पुढे काय झालं ते माहित नाही.

बर झाल तुम्ही हे लिहीलत. पुर्ण सहकार्य.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2010 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

मिसळपाववर काय असावे? काय नको? ते कसे चालावे? कसे दिसावे आदी कुठल्याही बाबतीत सदस्यांना आपले मत देण्याची मूभा आहे. नव्हे सदस्यांचा तो तसा अधीकार आहे.

ठळक शब्दांशी असहमत !

अधिकारा बरोबर जबाबदारी देखील येते हिच जाणीव इथे बर्‍याच जणांना नाही, त्यांना कसला डोंबलाचा अधिकार देता ? काड्या सारायला आणि धुराळा उडवायलाच फक्त जे मिपावर येतात त्यांना कशाला हे असले अधिकार फिधीकार ?

आपले तर स्पष्ट मत आहे, जिथे मत विचारले जाईल तिथेच द्यावे. नाहीतर 'आहे ते हे असे आहे.. राहायचे तर रहा' हेच योग्य.

राजेश घासकडवी's picture

13 Aug 2010 - 12:45 pm | राजेश घासकडवी

मिसळपाव हे खाजगी संस्थळ आहे. सदस्यांच्या लेखनावर मालक पैसा करत नाहीत. असं असताना जर मालकांना एखादं धोरण राबवावंसं वाटलं तर ते राबवण्याच्या आड येण्याचा आडमुठेपणा लोकांनी का करावा? नाही म्हटलं तरी सदस्यांनी 'आपण दुसऱ्याच्या घरी पार्टीला पाहुणे म्हणून आलो आहोत' हे लक्षात ठेवायला नको का? समजा त्या घरातली सामानाची अॅरेंजमेंट आपल्याला आवडली नाही. किंवा पार्टी करताना त्याची अडचण होईल असं वाटलं तर फारतर आपण पोलाइटली मालकाला सूचना करू शकतो. पण शेवटी जर मालकाने आपली सूचना ऐकूनही ठाम राहायचं ठरवलं तर पुन्हा पुन्हा सूचना करण्यात पाहुण्यांचीच अरेरावी दिसत नाही का?

मला वरच्या लेखातला काहीसा क्षमायाचक स्वर (अपोलोजेटिक टोन) आहे तो आवडला नाही. उदाहरणार्थ

या सर्वांचा हेतू हाच की मिसळपाव हे प्रत्येकाला अधिकाधिक आपले वाटावे. आणि ते तसे आहे सुध्दा.

मिसळपाववर काय असावे? काय नको? ते कसे चालावे? कसे दिसावे आदी कुठल्याही बाबतीत सदस्यांना आपले मत देण्याची मूभा आहे. नव्हे सदस्यांचा तो तसा अधीकार आहे.

मिसळपाववर अनेक जेष्ठ सदस्यांचा खूप मोठा अधिकार आहे.

मला वाटतं असले अधिकार देण्यात काही अर्थ नाही. नो टॅक्सेशन विदाउट रेप्रेझेंटेशन या प्रसिद्ध घोषणेचा व्यत्यास देखील तितकाच सत्य नाही का? असं असताना केवळ चांगूलपणापोटी लिहिलेल्या अशा वाक्यांमुळे सदस्यानी भलत्या आशा-आकांक्षा बाळगणं कितपत योग्य आहे?

माझं स्पष्ट मत आहे की व्यवस्थापननाने जी कठोर भूमिका स्वीकारली आहे ती तशीच चालू ठेवावी व उगाच सदस्यांना भलतेसलते अधिकार देऊ नये. एकदा अधिकार दिले की त्यांचा गैरवापर हा ठरलेलाच नाही का?

मला वरच्या लेखातला काहीसा क्षमायाचक स्वर (अपोलोजेटिक टोन) आहे तो आवडला नाही.

असहमत. विनंती करणे कधीही अधिकार गाजवण्यापेक्षा चांगलच.
असो हे तुम्ही तुम्हाला आवडल नाही अस म्हटलय. त्यामुळे तुमच्या मताचा ही आदर आहेच.
पण पुर्वीचे मालक असेच अधिकारवाणीने बोलायचे ज्या मुळे अनेक नवे जण दुखावले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या सरपंचानी नम्रतेने आवाहन केले आहे, हे आवडले.
आता सर्व नव्या जुन्यांनी खेळी-मेळीने मिसळ्पाव चापावी. मुळात हा नवे-जुने वादच नको.
बरेच नवे सदस्यही चांगल लिहितायत. आस्वाद घ्यावा. काही चुकल माकलं तर जास्त टिंगल टवाळी न करता हक्कान सांगाव.

-अनाम.

सरपंच's picture

13 Aug 2010 - 6:09 pm | सरपंच

मिसळपाव हे सर्वांचं असावं हीच भूमिका मिसळपाव बनवण्याच्या मागे होती आणि आता सुध्दा तीच प्रेरणा आहे.

तात्या मिसळपाव हे खाजगी आहे असं केवळ शेवटी म्हणजे जेव्हा सामोपचाराचे सर्व उपाय संपतील तेव्हाच म्हणायचे. त्यापुढे संवाद बंद होतो !

माझा असा विचार असतो की होता होईस्तोवर मालकी किंवा व्यवस्थापकीय आव दाखवण्याची गरज पडू नये. त्यामुळे माझ्याकडून येणार्‍या सर्व सूचना माझ्यासारख्याच मिपाकरांना दिलेल्या असतात. मी तुमच्यातीलच एक आहे आणि आपलं मिपा चांगलं कसं चालेल अश्या भूमिकेतून दिलेलं ते निवेदन असतं.

ज्यावेळेला सरपंच म्हणून कठोर भूमिका घेणे अपेक्षीत असते तेव्हा मी तशी घेऊन मोकळा होतो. संपादन किंवा कारवाई करतो मात्र त्याचा जास्त गजवजा करीत नाही. मिसळपाव खाजगी मालकीचे आहे ही बाब जेव्हा कुणी व्यवस्थापनाला अडचणीत आणत असेल त्याला व्यक्तिगत पातळीवर सांगण्याचे वाक्य आहे. याचा जाहीर उच्चार करण्याची गरज वाटत नाही. मिसळपाववर सामान्य सदस्यांना सुध्दा याची जाणीव असण्याची विशेष गरज नाही. मात्र जे लोक स्वत:ला असामान्य समजून मिसळपाववर कशी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते असा आव आणतात त्यांना सुध्दा ही बाब खास उच्चारणीय वाटते. त्यांना याचा उच्चार करून काय अपेक्षीत असते कुणास ठाऊक मात्र याचा उच्चार मी काही ठरावीक प्रकारच्या लेखणासोबत गेले काही दिवस बघतोय, असो.

आता विषय अधिकारांचा, तर मिसळपाव आधीपासूनच सामुदायीक संकेतस्थळ म्हणून चालवावं हीच संकल्पना आहे. त्यामुळे मिसळपाववर सदस्यांच्या प्रेमासारखाच त्यांचा अधिकार सुध्दा मान्य आहे. मिसळपाव कसं चालावं कसं नाही यात बोलायचा अधिकार त्यांचा आहेच. मात्र मत,सल्ला, आग्रह आणि आदेश यांतील फरक त्यांच्या लक्षात असावा एवढाच आग्रह आहे.

जेष्ठ सदस्यांच्या अधिकाराची चर्चा झाली , खरं तर मिसळपाववर अनेक सदस्यं असे आहेत की ते मिसळपावच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेत. त्यापैकी काही संपादक मंडळात आहेत तर काही नाहीयेत. त्यामुळे त्यांचा अधिकार कमी होतो असे नाही. मिसळपावच्या अनेक पेचप्रसंगात अश्याच सदस्यांनी पुढाकार घेऊन कामे केली आहेत असा अनुभव आहे. त्यामुळे मिसळपाववर या सदस्यांचा अधिकार आहेच असे माझे मत आहे.

असं असताना केवळ चांगूलपणापोटी लिहिलेल्या अशा वाक्यांमुळे सदस्यानी भलत्या आशा-आकांक्षा बाळगणं कितपत योग्य आहे?

भलत्या आशा आकांक्षांचा प्रश्न येतोच कुठे? मिसळपाववर जे काही काळ घालवतात त्यांना मिसळपावची व्याप्ती, आपण सदस्यं म्हणून असलेले अधिकार आणि सदस्यं म्हणून असलेली जवाबदारीची जाणीव होतेच की.

सदस्यांना मिसळपाव आपलं वाटावं, मिसळपावच्या वाटचालीत त्यांचा सहभाग असावा आणि जेष्ठ सदस्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा मिसळपावला करून द्यावा हे मिसळपावचे धोरण आहे.

आणि काही शंका असतील तर स्वागतच आहे.

- सरपंच

राजेश घासकडवी's picture

13 Aug 2010 - 8:31 pm | राजेश घासकडवी

मिसळपाव सर्वांचं असावं हे उत्तम ध्येय आहे. मिपावरील प्रेमापोटी काम करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना काही मतं मांडण्याचे अधिकार मिळतात हेही रास्तच. पण जोपर्यंत सामान्य सदस्यांचे अधिकार धोरणात्मक रीत्या जाहीर होत नाहीत (मी ती मागणी करत नाहीये, परिस्थिती सांगतो आहे) तोपर्यंत मी मिपाकडे 'कोणा सज्जनाने मला उपलब्ध करून दिलेलं व्यासपीठ/खेळण्याची जागा' याच दृष्टीकोनाने पाहू शकतो. ही माझी जाहीर भूमिका आहे. अशा किमान अपेक्षा ठेवल्या तर जे अधिक मिळेल ते बोनस. इतरांनीही अशाच अपेक्षा ठेवाव्या म्हणजे काही तक्रारी वगैरे करण्याची पाळी येणार नाही, इतकंच.

मी आत्तापर्यंत एकदाही व्यवस्थापनाविषयी तक्रार करणारा धागा काढलेला नाही. मी स्वतःला सामान्य सदस्यच समजतो. कमीत कमी अधिकार गृहित धरतो. 'अधिकार दिले की गैरवापर होतात' यावर माझा तितकासा विश्वास नाही, ते संपादक मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या जाहीर विधानांवरून मंडऴाचं मत असावं असं वाटलं म्हणून लिहिलं.

वरची वाक्यं परखड आणि कोरडी वाटतात, पण अतिशय कमी अपेक्षा ठेवूनही मिपाने मला कल्पनेपेक्षा अधिक दिलेलं आहे. (हेही मी वेळोवेळी लिहिलं आहे.) त्याबद्दल मी मिपाचा ऋणी आहे.

यापुढे अधिकार व धोरणं यांविषयी जाहीर/अनाहुत चर्चा करण्याची इच्छा नाही. धोरणांना सहकार्य आहेच, तसंच पुढेही राहील.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2010 - 8:37 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. घासकडवी यांचा आग्रह धरतानाही संयतपणा न सोडण्याचा स्वभाव नेहमीच आवडतो.

क्रेमर's picture

13 Aug 2010 - 5:25 pm | क्रेमर

अशा प्रकारच्या धाग्यांमुळे सदस्यांना व्यवस्थापन सदस्यांची मते जाणून घेण्यास उत्सुक आहे असे वाटते. परंतु व्यवस्थापनास त्यात फारशी रुची नाही असा अनुभव आहे. उदा. स्वसंपादनाविषयी मी पाठवलेल्या व्यनिचे उत्तर मिळालेले नाही.

खाजगी मालकीचे संकेतस्थळ असल्याने स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तसे एकदा जाहीर करून टाकल्यास सदस्यांच्या अपेक्षा वाढणार नाहीत. पूर्वीचे मालक स्पष्टपणे तसे जाहीर करत असत. अशा हास्यास्पद धाग्यांची गरज लागणार नाही.

सरपंच's picture

13 Aug 2010 - 6:15 pm | सरपंच

मिसळपाव हे हौशी संकेतस्थळ आहे. मिसळपावचे संरपंच किंवा संपादक २४/७ आंतरजालावर नसतात. आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करून आणि आपला प्रपंच सांभाळून ते मिसळपावमध्ये सहभागी होतात.

त्यामुळे व्य.नि. ला उत्तर मिळण्यास झालेला विलंब अश्या प्रकारे गृहीत धरल्या जात असेल तर त्याबाबत वाईट वाटते.

जाता जाता... मिसळपावच्या मालकाने काय करावं याबाबत केवळ सल्ला अपेक्षीत आहे. तो तसा तुम्ही आता दिलाय. यापुढे याची पुनरुक्ती करू नये.

- सरपंच

क्रेमर's picture

13 Aug 2010 - 6:56 pm | क्रेमर

स्वयंसंपादनाविषयी व्यनिला उत्तर मिळालेले आहे. निरोपातून मालकांनी याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. मालकांच्या आश्वासनाचे स्वागत आहे. लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असा आशावादही या प्रतिसादातून व्यक्त करत आहे.

त्यामुळे व्य.नि. ला उत्तर मिळण्यास झालेला विलंब अश्या प्रकारे गृहीत धरल्या जात असेल तर त्याबाबत वाईट वाटते.

व्यनिला उत्तर मिळण्यास विलंब लागेल अशी शक्यता गृहीत धरली होती. परंतु हा धागा पाहील्यानंतर उत्तर न देण्याचा मानस असावा असे माझे मत झाले. अर्थात आता उत्तर मिळाले असल्याने गृहीतकाबद्दल मला खेद वाटतो. परंतु बोचरा प्रतिसाद लिहिल्याने हे साध्य झाले का? अशी पूसटशी शंकाही मनात येते. असो. मालकांना वाईट वाटले असल्यास दिलगीरी व्यक्त करतो.

मिसळपावच्या मालकाने काय करावं याबाबत केवळ सल्ला अपेक्षीत आहे. तो तसा तुम्ही आता दिलाय. यापुढे याची पुनरुक्ती करू नये.

सल्ला एकदाच दिला जावा असे मालकांचे धोरण असल्याचे समजले. त्याची पुनरुक्ती होणार नाही याची खात्री बाळगावी.

सरपंच's picture

13 Aug 2010 - 7:02 pm | सरपंच

कृपया आपली स्वाक्षरी तात्काळ बदला. आणि अशा पुसटश्याही शंका घेऊ नका.

क्रेमर's picture

13 Aug 2010 - 7:30 pm | क्रेमर

आपल्या विनंतीस मान देऊन स्वाक्षरी बदलली आहे.

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 6:19 pm | धमाल मुलगा

काय भौ?
आयुक्षात आपल्याला काय प्रॉब्लेम काय है?
च्यायला! बघावं तेव्हा इथं बिब्बे घालत फिरण्यात काय आनंद मिळतो?
स्वसंपादनाचा एवढाच तोरा मिरवायचाय तर तो फक्त इथंच कशाला? उपक्रमावर तर तोंडुन शब्दही फुटेना की.
का इथं मऊ लागतंय म्हणुन हे असले लोक कोपरानं खणत सुटलेत?

च्यायला! सुखासुखी रहायचं, दोस्ती करावी, जरा गप्पा चर्चा कराव्या..आपापल्या वाटेनं निघुन जावं. जिथंतिथं खुसपटंच कशाला काढत बसावं लागतं?

च्छ्या:! वाईट वाटतं. एव्हढे हुशार लोक आहेत, एव्हढे प्रगल्भ वाचक आहेत पण कधी चांगल्यासाठी चार पैची भर नाही घालणार. बघावं तेव्हा विघ्नसंतोषीपणा करत हिंडणार! ह्या प्रकारच्या लोकांनी चुकुन...चुकुनच कधीतरी भला विचार करता आला तर नक्की करावा. मराठी आंतरजालासाठी सोन्याचा दिवस असेल तो.

@सरपंच्/संपादक मंडळः
माझ्या उद्विग्नतेमधुन आलेला सदर प्रतिसाद जर योग्य वाटत नसेल तर तो उडवल्यास माझी काहीही हरकत नाहीच. फार दिवसांपासुन काही लोकांचे चाळे पाहतो आहे, आज मात्र संयम संपला.
असो.

क्रेमर's picture

13 Aug 2010 - 7:32 pm | क्रेमर

काय भौ?

श्री मुलगा, मैत्रीपूर्ण संबोधनासाठी धन्यवाद.

आयुक्षात आपल्याला काय प्रॉब्लेम काय है?

चौकशीबद्दल अनेक आभार. सगळे व्यवस्थित सुरू आहे.

बघावं तेव्हा इथं बिब्बे घालत फिरण्यात काय आनंद मिळतो?

बिब्बे घातले जाणे म्हणजे चांगल्या कामात अडथळे आणणे असा अर्थ असावा. आता कुठले कार्य चांगले आहे याबाबत प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. संकेतस्थळाविषयी, धोरणांविषयी काही एक चर्चा होत असल्यास त्यात भाग घेणे, थोडेसे बोचरे वाटणारे प्रतिसाद लिहून - अनेकांच्या मनात कटूता निर्माण करून एखाद्या नैतिकदृष्ट्या योग्य ‍कृतीचे समर्थन करणे, तसा बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असणे हे आम्हाला चांगल्या कामात हातभार लावण्यासारखे वाटते. आपणांस ते अडथळा आणणे असे वाटत असल्यास नाइलाज आहे. (मात्र तुमचे मत बदलण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू.)

मालकांनी संकेतस्थळावरचा वावर अधिक सोयिस्कर कसा होईल यावर सूचना मागवल्यानंतर आम्ही मोकळेपणाने नवीन रूपाचे स्वागत केले व सूचनाही पाठवल्या. काही सूचना अंमलात आणल्या गेल्याचे पाहून आनंद झाला. काही सूचना रास्त वाटल्याने त्यांचा पाठपुरावा करावासा वाटला. या भुमिकेतूनच आम्ही स्वाक्षरीतून, कौलातून, प्रतिसादांतून मत मांडत आहोत.

सुखासुखी रहायचं, दोस्ती करावी, जरा गप्पा चर्चा कराव्या..आपापल्या वाटेनं निघुन जावं.

हे धोरण प्रत्येक सदस्याचे असावे ही अपेक्षा रास्त आहे.

जिथंतिथं खुसपटंच कशाला काढत बसावं लागतं?

कृपया आमचे मागील पन्नास प्रतिसाद तपासावेत. बहूसंख्य प्रतिसादांतून आम्ही सदस्यांच्या लेखनाबाबत मते व्यक्त केली आहेत. खुसपटं काढलेली नाहीत. तुमचा असा गैरसमज होण्याचे कारण समजत नाही. परंतु प्रतिसाद उद्वेगातून आल्याने याविषयी फारसे आश्चर्य वाटत नाही.
________________

स्वसंपादनाचा एवढाच तोरा मिरवायचाय तर तो फक्त इथंच कशाला? उपक्रमावर तर तोंडुन शब्दही फुटेना की.

उपक्रमावर स्वसंपादनाची सुविधा कधीच नव्हती. तेथेही स्वसंपादन असावे असेच आमचे मत आहे. पण त्या संकेतस्थळाच्या मालकांनी सदस्यांच्या सूचना मी सदस्य झाल्यापासून मागवलेल्या नाहीत. तेथील संपादक कोण आहेत याविषयी निश्चित माहिती नाही. इतर सदस्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. संकेतस्थळाविषयीचे प्रतिसाद संपादक नियमीत उडवतात. थोडक्यात खाजगी मालकी असल्याचे स्पष्ट आहे. आमचा प्रतिसाद पुन्हा वाचल्यास आपल्या लक्षात येईल की असे स्पष्ट असल्यानंतर 'सदस्यांच्या अपेक्षा वाढणार नाहीत' . मिपा हे उपक्रम नाही. उपक्रमाप्रमाणे सदस्यांकडे दुर्लक्ष केले जात नाही. तसा उपक्रमी पायंडा पडू नये असे आमचे मत आहे.
___________
तुमची इतर वाक्ये एका समुदायाला उद्देशून असावीत असे वाटते. प्रगल्भपणाचे कौतुक सोडून तुमच्या उद्वेगात सामील होत आहे.

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 8:08 pm | धमाल मुलगा

वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या प्रतिसादात योग्य तिथे योग्य ती स्फोटकं भरली आहेतच ना?
बस्स. झालं तर मग.

शिवाय, स्पष्ट सांगुनही बदललेल्या स्वाक्षरीतही खोडसाळपणा आहेच.

असो! काय बोलायचं? आम्ही काही शब्दप्रभु नाही. आम्हाला सालं शब्दांच्या कोलांट्या मारुन फडणवीस वकिलासारखं ' स्कॉचची एक बाटली असताना दोन बाटल्या आहेत' असलं सिध्द करणं काही जमत नाही.
त्यामुळं आम्ही असल्या शाब्दिक खेळात नक्कीच हरु......पण म्हणुन वस्तुस्थिती बदलत नाही.!!!!!!!!!

इत्यलम.
संपले आमचे शब्दभांडार. जमेल तितकं सभ्यपणे मत्/भावना मांडुन झाले आमचे. ह्याम्होरं जमलंच आसं न्हाई.

- धम्या रामोशी.

क्रेमर's picture

13 Aug 2010 - 9:15 pm | क्रेमर

वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या प्रतिसादात योग्य तिथे योग्य ती स्फोटकं भरली आहेतच ना?

स्फोटकं भरण्याचा प्रयत्न केलेला नाही. आपणास असे का जाणवत असावे हे मला समजत नाही. प्रतिसादातून तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या उद्विग्नतेशी सहमती दाखविली आहे.

बस्स. झालं तर मग.

यावरून आपण काही निर्णयावर पोचल्यासारखे वाटते. व्यनितून कृपया कळवावे. तुमचा निर्णय पटल्यास आम्हीही त्यात सामील होण्याचा प्रयत्न करु.

शिवाय, स्पष्ट सांगुनही बदललेल्या स्वाक्षरीतही खोडसाळपणा आहेच.

स्पष्ट विनंती केल्यानंतर स्वाक्षरी बदलली आहे. खोडसाळ काहीही नाही. स्वसंपादनाबाबत सदस्यांना अडचणी येत राहणार. वेळोवेळी त्यांनी नवीन धागा किंवा प्रतिसाद लिहिण्यापेक्षा त्या धाग्यावर मत नोंदवणे मला त्यातल्या त्यात योग्य मार्ग वाटतो. त्यावरील खोडसाळपणाचा आरोप त्यामुळे अप्रस्तुत वाटतो.

असो! काय बोलायचं? आम्ही काही शब्दप्रभु नाही. आम्हाला सालं शब्दांच्या कोलांट्या मारुन फडणवीस वकिलासारखं ' स्कॉचची एक बाटली असताना दोन बाटल्या आहेत' असलं सिध्द करणं काही जमत नाही.

श्री मुलगा यांच्या दमदार कथांचा येथे उल्लेख करावासा वाटतो. (ते कथा पूर्ण करत नाहीत पण त्यावर आमच्यासारखा सामान्य वाचक त्यांना काय जाब विचारणार? जे मिळते त्यातच समाधान मानतो.) त्यावरून शब्दप्रभू कोण आहे व लोक किती विनयशील असू शकतात हे लक्षात यावे. काहीही लिहू न शकणारे व चुकून माकून लिहिलेच तर त्यातील चूका जगाला दिसण्याआधीच उडवत्या याव्यात असा आग्रह धरणारे आमच्यासारख्या मुखदुर्बळांना मिपा आहे म्हणून श्री मुलगा यांच्यासारख्या सिद्धहस्तांशी संवाद तरी साधायला मिळतो. अन्यथा ही संधी मिळणे दुरापास्तच होते.

जमेल तितकं सभ्यपणे मत्/भावना मांडुन झाले आमचे. ह्याम्होरं जमलंच आसं न्हाई.

श्री मुलगा यांचा पहिला उपप्रतिसाद सभ्यपणे लिहिलेला मानला तर याम्होरं काय येऊ शकेल याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे आम्ही बी इत्यलम.

सरपंचांनी योग्य वेळी केलेले लेखन असे या धाग्याचे वर्णन करता येइल.
संपादकांचा उल्लेख वेळोवेळी सहीत्/प्रतिसादात अयोग्यप्रकारे केलेला मीही बघितला आहे.
कोण्या सदस्याने तर संपादकांना दिल्लीकर वगैरे म्हणून घेतल्याचेही वाचनात आले होते.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2010 - 8:15 pm | बिपिन कार्यकर्ते

सरपंचांशी सहमत. सूचना करूर कळवाव्यात. पाठपुरावाही करावा. अगदी हात धुऊन मागे पडा. काही हरकत नाही. पण जिथे तिथे तेच म्हणजे जरा अतीच नाही का? :)

अवांतर: मला एका गोष्टीची गंमत वाटली. स्वसंपादनाचा आग्रह धरणार्‍यांपैकी बहुतेक सगळेच कधीही न लिहिणारे आहेत. काही लोकांच्या तर मागे लागलो आहे लिहा म्हणून पण लिहायचे नाव नाही. काय फरक पडतो अशा लोकांना, स्वसंपादन असले काय आणि नसले काय? ;)

चतुरंग's picture

13 Aug 2010 - 8:23 pm | चतुरंग

कधीच नलिहिणारे लोक असं कसं म्हणता बरं?
"स्वसंपादन द्या, स्वसंपादन द्या" असे सारखे लिहीत असतातच की ते! :)
त्यांना समजून घ्या, त्यांना आपलं म्हणा!! ;)

(आपला)चतुरंग

गणेश दातखिळे's picture

13 Aug 2010 - 8:25 pm | गणेश दातखिळे

हे नविन सन्केत स्थळ छान आहे पण मिसळपाव चा फोटो दर्शनी भागात हवाय !!!

झालच तर त्या छंदशास्त्राच्या ऐवजी कलादालनाचा टॅब मुखपृष्टावर लावावा. तोच जास्त अपडेट होत असतो.

मिसळपावचे धोरण

नमस्कार,
मिसळपावचे धोरण येथे वाचा.

मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे आहे.

-सरपंच

वरील कुठल्याही लिंकवर क्लिक होत नाही.

Pain's picture

15 Aug 2010 - 12:32 pm | Pain

तसेच मिसळपावचे विस्तृत संपादन मंडळ आहे. आणि त्यांची नावे जाहीर आहेत.

एकदा कधीतरी, कुठेतरी जाहीर केली म्हणजे ती जाहीर राहतील अस नव्हे. संपादकांची नावे वेगळ्या रंगात / फाँटमधे असावीत अशा साध्या ( अमलात आणायला) , कोणाची हरकत नसलेल्या आणि उपयोगी सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.

नवीन येणार्‍या सदस्यांना मिसळपाववर गैरसोईची वातवरण तयार होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची जबावदारी सर्व जेष्ठ सदस्यांची आहे

नवीन सदस्यांना खरडवही नसते ( त्यातही सातत्य नाही) आणि संपादक कोण हे माहित नसते. मदतीच्या धाग्याकडेही कुठलाच संपादक किमान आठवड्यात एकदा तरी लक्ष का देत नाही ?

मात्र अनेक सदस्यं आपल्या प्रतिक्रियांत आणि स्वाक्षर्‍यांत संपादकांबाबत टिप्पणी करीत असतात, ते त्यांनी टाळावं अशी अपेक्षा आहे.

या तर साध्या गोष्टी आहेत. काहींना इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील. त्यांनी त्यासंबधीच्या धाग्यावर मते मांडूनही संपादक किंवा ज्या कोणाकडे अधिकार आहेत ती व्यक्ती कृती करत नाही आणि हो/ नाही वगैरे उत्तरही देत नाही (त).

उदा. स्वसंपादन
अजिबात नसावे हे एक टोक आहे आणि सगळे अधिकार असावेत दे दुसरे टोक आहे. यासंबंधीच्या कौलात "असावे" यास बहुसंख्य मते मिळाली होती आणि चर्चेत संपादनाचा अधिकार असावा पण लेख काढून टाकायचा नको असा रास्त प्रस्ताव आला होता. यावर काहीच निर्णय कळवण्यात आला नाही आणि आत्ताच वरती चतुरंग यांनी टोमणा मारल्याचे दिसते.