कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in काथ्याकूट
2 Aug 2010 - 5:25 pm
गाभा: 

मिपावरच्या सदस्य आणि वाचकांपैकी अनेकजण कुठल्या कुठल्या कंपन्यात काम करत असतील, कोण कॉलेजात शिकत असेल, इतर कोणी कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असेल.

मला मग एक सांगा की हे 'कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या ' हे प्रकरण तुम्हाला नविन आहे का हो ?

जरा खालच्या लिंकवरची बातमी वाचा ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6246549.cms

त्याचा थोडक्यात गोषवारा असा की ...

फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने थेऊर येथील एका बंगल्यात आयोजिण्यात आलेल्या विनापरवाना दारू पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते. परंतु पोलिसांनी त्यांची नशा उतरवली.

पार्टीत सहभागी असलेले विद्यार्थी खडकी येथील सिंबॉयसिस मॅनेजमेंट ऑफ स्टडीज या एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. ' फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने सिनिअर्सनी ज्युनिअर्सना दिलेल्या या पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठाही आढळला. परंतु ड्रग्ज वा अन्य अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आढळले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

गंमत वाटली बातमी वाचुन.
१. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे.
२. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच.
अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ?
३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ?
तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ?
४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते.
इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात.
५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ?
का चौकात जमुन उगाच उतमात घातला ?

इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्‍याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्‍या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे.
ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ?
जर एखाद्या गावाला तसे नको असेल तर त्यांनी तसा नियम बनवावा, पण शक्यतो अशा बंगल्याचे मालक हे बिगशॉट किंवा राजकिय वरदहस्त असणारे असल्याने व त्यांच्याविरुद्ध हे गावकरी बोलु शकत नसल्याने त्यांच्या 'सुडचक्रा'चा त्रास निष्कारण ह्या पार्टीवाल्यांना होगावा लागत आहे असे आम्हाला स्पष्ट शब्दात सांगु वाटते.

आता पोलिस तक्रारी झाल्या, पुढे काय निकाल लागु तो लागु पण तोवर ह्या पार्टीतल्या निमंत्रितांना जी नामुष्की भोगावी लागेल व आयोजकांच्या पुढच्या कारकिर्दीवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार कोण करणार आहे की नाही ?

जाता जाता :
मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही.
ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

2 Aug 2010 - 5:28 pm | अवलिया

चर्चा वाचण्यास उत्सुक. :)

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 11:36 pm | मिसळभोक्ता

आम्ही येईपर्यंत इथल्या ग्रामस्थांनी ही चर्चा-पार्टी संपवलेली दिसते.

बाकी, थेऊर की येऊर ? थेऊरला अष्टविनायक असल्याने दारूची पार्टी करू नये, असे गणेशपुराणात लिहिले आहे. येऊरला तसे काही ही बंधन नाही. तसेही पश्चिम महाराष्ट्राची नैतिक अधोन्नती झालीच आहे, आणखी काय फरक पडणार ?

गणपा's picture

4 Aug 2010 - 4:48 pm | गणपा

नबाद १०० अभिनंदन :)

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

नक्की नक्की सगळे परप्रांतीयच असणार !

साला पुणेरी माणुस कधी 'टाकुन' आला ते घरच्यांनापण कळत नाही ;)

विनोदाचा भाग सोडुन देउ... पण बर्‍याचदा २/४ पेगनंतर आपल्याला बारमध्ये देखील आवाज चढवणारी लोक दिसायला लागतात. कदाचीत ह्या पार्टीत देखील २/४ पेग नंतर धांगडधिंगा वाढला असावा असे वाटते.

ह्यावरच परवा आलेला एक समस आठवला.

दारु पिणार्‍या भारतीय आणि परदेशी लोकांमध्ये फरक काय ?
दोन पेग नंतर परदेशी व्यक्ती म्हणते "ओक्के, बाय. गुडनाईट !" भारतीय म्हणतो "आता कोणाची आ* **यची बोल !!"

Arun Powar's picture

15 Sep 2010 - 8:48 pm | Arun Powar

साला पुणेरी माणुस कधी 'टाकुन' आला ते घरच्यांनापण कळत नाही

खूपच मजेशीर..!!!!!

स्वतःच्या घरात कराना मग पार्टी कशाला दुसर्याका त्रास

मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही.

अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ??????

काय तर म्हणे टेन्शन घालवायला याना पार्टी करावी लागते

वाया गेलेले सगळे

मामु

छोटा डॉन's picture

2 Aug 2010 - 5:59 pm | छोटा डॉन

>>स्वतःच्या घरात कराना मग पार्टी कशाला दुसर्याका त्रास
अहो मी कॉलेजच्या किंवा कॉर्पोरेट पार्ट्या म्हणतो आहे.
त्या 'स्वतःच्या घरात' कशा करता येतील ?
किमान ३००-४०० जण येतात, घरी कशी करता येईल ?

>>अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ??????
तुमची बहुतेक "कॉलेज / कॉर्पोरेट पार्ट्या" आणि "नवश्रीमंताम्च्या पेड उच्चभ्रु पार्ट्या" ह्यात गल्लत होत आहे.
त्यामुळे मी ह्यापेक्षा जास्त प्रतिक्रिया देउ इच्छित नाही.

>>काय तर म्हणे टेन्शन घालवायला याना पार्टी करावी लागते
मुद्दा गैरलागु, अशा प्रकारच्या कुठल्याही पार्टीविषयी मी चकार शब्दही काढला नाही.
सध्या आपण फक्त कॉलेज / कॉर्पोरेट पार्ट्यांचे बोलुयात, ओके ?

>>वाया गेलेले सगळे
नक्की कोण ?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ??????

मुलांची थेरं चालतात का? म्हणजे, मुलींनी केली तरच ती निषिद्ध आहेत का?

बाकी अशा पार्ट्या खाजगी घरातून, बंगल्यातून वगैरे चालत असतील आणि कोणालाही त्रास होत नसेल, आणि अवैध पदार्थांचे सेवन होत नसेल तर काय हरकत आहे? शिवाय, अशा खाजगी पार्ट्यांना दारूचा परवाना लागतो की नाही ते माहित नाही.

छोटा डॉन's picture

2 Aug 2010 - 6:19 pm | छोटा डॉन

बिकांशी सहमत ...

बाकी "त्रास" ह्या शब्दाबाबत माझाच जरा गोंधळ आहे.
नक्की कसला हो त्रास ?
पार्टीच्या जागी बिस्लेरी, सिगारेट्सची पाकिटे, अन्य काही चिल्लर मटेरियल अव्वाच्या सव्वा किमतीत विकताना होणारा त्रास का ?
का आपल्या गावात आलेले हे हेल्पलेस लोक आहेत म्हणुन त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना टोमणे मारताना, अचकट विचकट शेरा मारताना, पोरींकडे पाहुन वेडेवाकडे हातवारे करताना होणारा त्रास का ?
का त्यांच्या गाड्यांची ' पार्किंग कॉस्ट' म्हणुन फुक्कटचा पैसा लाटताना होणारा त्रास ?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

2 Aug 2010 - 6:24 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

४०० % आवड्लं!

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 11:30 pm | मिसळभोक्ता

मुलांची थेरं चालतात का? म्हणजे, मुलींनी केली तरच ती निषिद्ध आहेत का?

निषिद्ध ? छे ! पण थेरं करायच्या वेळात, कुकर लावणे शिकता आले असते, असे कुठे तरी वाटून गेले :-)

(साला आपण सुजय कुलकर्णीचा फ्यान झालो कालपासून)

बाकी, ग्रामस्थांनी ह्या पार्ट्यांकडे इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी म्हणून बघावे. इव्हेंट म्यानेजमेंट ग्रामस्थांकडेच द्यावी.

सोम्यागोम्या's picture

4 Aug 2010 - 10:17 am | सोम्यागोम्या

बिका,
दारू पिण्यास परवान्याची आवश्यकता असते हेच पिणा-यांना माहित नसते. कॉलेजचे पोरं पोरी ऑफिसच्या पार्ट्यांत पिणारे यांना दारू पिणं एवढ सहज वाटतं की त्यासाठीच्या कायदेशीर बाबी लागतात याची माहितीच नाही. विनापरवाना दारू पिणे कुठेही आणि केव्हाही गुन्हाच ठरतो. त्यामुळे केलेली कारवाई योग्य आहे. बाकीच्यांनी काय बिघडलं वगैरे म्हणताना आपण एका बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहन देतो आहोत याचे भान ठेवावे.

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2010 - 8:43 am | अप्पा जोगळेकर

अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ??????
त्यांना काय करायचं ते करु दे की ? आपुण मजा घ्यावी. आणि नैतिकता आड येत असेल तर गुमान तिथून कल्टी मारावी.

कार्लोस's picture

2 Aug 2010 - 6:00 pm | कार्लोस

मि तर अनन्दित झालो

बद्दु's picture

3 Aug 2010 - 12:28 pm | बद्दु

तुमचा पाथिबा पाहुन्/वाचुन डोले पानावले...
उगाच गुळांबा/साखरांबा ची आठवण झाली.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Aug 2010 - 6:18 pm | llपुण्याचे पेशवेll

१. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे.

गाव ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने गावाने ठरवले कि त्यांच्या गावात असली पार्टी होऊ नये तर होऊ दिली जाऊ नये. त्यावर कोणी काही म्हणो. बातमी पाहता येऊर येथील बंगल्यात ३००-४०० विद्यार्थी पकडले जातात याचे वाईट वाटते. एखाद्या गावात ३००-४०० लोक एकदम आले तर गोंगाट वाढत नाही का? आणि गावातल्या लोकांनी तिथे जाऊन दगड मारले नाहीयेत. रितसर पोलिस कारवाई करविली आहे.

२. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच.
अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ?

ओ मालक आमच्या कंपनीच्या पार्टीत फुकट मिळते म्हणून पिऊन आऊट होणारे अनेक पाहीले आहेत. आणि कार्पोरेट पार्ट्यात काय फक्त वरिष्ठ अधिकारीच असतात काय?

३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ?
तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ?

बातमीत वाचा, विनापरवाना पार्टीवर म्हटले आहे. दारू सर्व्ह करण्यासाठी परवाना लागतो.

४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते.
इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात.

याच्यातल्या पहिल्या वाक्याशी सहमत.

५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ?
का चौकात जमुन उगाच उतमात घातला ?

३००-४०० लोक झिंगून एखाद्या मैदानात जरी उतमात घालत असतील तर बाहेरच्यांना त्रास होतो कि नाही? होतोच. बाकी पार्टीच्या लाऊडस्पीकरबद्दल बातमीत काही दिसत नाहीये.

इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्‍याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्‍या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे.

मग गणपतीउत्सव हे देखील सेलिब्रेशनच असते विशिष्ठ वर्गाचे. मग त्यातल्या हिडीसपणाला नावे ठेवता ना? मग यातल्या हिडीसपणाला कसं कुरवाळता.

ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ?

करा ना आपापल्या कॉलेजांमधे किंवा कंपन्यांच्या लॉनवर वगैरे. झालंच तर एखादा कोरीन्थियन सारखा भिंतबंद क्लब घ्या भाड्यानं आणि करा. म्हणजे आजूबाजूच्याना त्रास नको.

मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही.

तुम्हाला म्हणून सांगतो अजूनही सिंबायोसिसच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांमधे किती स्थानिक किती परप्रांतीय असतात ते बघा. आणि परप्रांतीय आणि मुली हाच गावकर्‍यांच्या उद्रेकाचं कारण असेल तर? किंबहुना असतंच. शेवटी सांस्कृतिक फरक हाच अशा उद्रेकांना कारणीभूत असतो.

ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते.
असहमत. स्थानिक परप्रांतीय हा भेद असतोच. शक्यतो स्थानिक मुली नंतर घरी जायचं असतं म्हणून पीत नाहीत.

अगदी मनातल.

+ १००

च्यायच एकतर दारु प्यायची न लोकांना त्रास द्यायचा आणि लोकांनी तक्रारही करायची नाही ?

हे तर शेण खायच आणि तोंडाला लागलेल दाखवणार्‍याची तक्रार करण्यासारख आहे.

Pain's picture

3 Aug 2010 - 11:03 am | Pain

सहमत

मन's picture

3 Aug 2010 - 6:28 pm | मन

शिवाय गावातील रस्ते लांब रुंद नस्तात.
गावात असते ती गल्ली किंवा अळी.(सदर घटनेतील ठिकाणाची नक्की माहिती नाहि अजुन.)
कल्पना करा, तुमच्या स्वतःच्या घरासमोरचा पाच सात फुटी रस्ता ओलांडताच एक बंगला आहे(गावात उंच इमारती आणि फ्लॅट नस्तात फारशे, "घरं"(किंवा वाडा/बंगले) असतात.) , तिथं नाचं गाणी सुरु आहेत.(ती नसली तरी पिउन टल्ली झालेले तरुण आणि तरुणी आहेतच.) बर्‍यापैकी गोंगाट आहे.(भले ती माणसं तुम्चं दार बडवुन तुमच्या छाताडावर बसत नाहियेत.पण हेड्याक होतोच ना?)
आवडेल हे दृश्य तुम्हाला?
आवडत असेल तर खुश्शाल करा बुवा पार्टी अशी "बंगल्यात" जाउन.आणि आपापल्या घरासमोरच्या जागा जाउन स्वतः सुचवा ह्या सत्शिल पब्लिक ला...
मद्य प्राशनाला दमड्या जमवता ना? मग तेच तुम्हला अजुन जरा रक्कम जमवुन एखाद्या "रिसोर्ट" मध्ये जाउन, कायदेशीर रित्या,दुसर्‍याला त्रास होणार नाही असं नाही करता येत?

बाकी सिंबी चा विद्यार्थी म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी प्रतिमा ही माध्यमांपेक्षा खूपच मोठ्या परमाणावर स्वतः विद्यार्थ्यांनी "स्वपरक्रमाने" पसरवली आहे.

मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही.
हीच प्रसारमाध्यमं फिर राज ठाकरे ने उगला जहर असं म्हणुन ब्रेकिंग न्युज सुद्धा देतात डॉनराव... ;)
आता मोठ्या संख्येने परप्रांतिय महाराष्ट्रात आहेत हे नाकाराता येणे आजच्या घडीला शक्य आहे ?
बाकी चालु द्या... ;)

(ओल्या पार्ट्यां पासुन नेहमीच लांब राहणारा)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

2 Aug 2010 - 6:19 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.... आपल्या लोकांना काय वाचण्यात जास्त इंटरेस्ट असतो ते पत्रकार जातीला व्यवस्थित महिती असते...
त्यात त्यांना नतद्र्ष्ट गावकर्‍याकडून मिळणारी माहिती . .... आणि आपल्या लोकांचा असल्या बातम्या वाचण्यातला रस या सर्वाचे अतिरंजित द्रूश्य म्हणजे आपल्यापर्यंत येणारी बातमी.
... कॉर्पोरेट पार्टी असु दे,फ्रेंडशिप डे असु दे ...किंवा अन्य कोणताही डे असु दे .....तो साजरा करायचा कि नाही....कसा करायचा ...दारू प्यायची कि नाही हा ज्याचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे..
उगाचच दारू प्यायली नाही म्हणजे दारू न पिणारेच संस्क्रूती टिकवणारे असतात किंवा त्याने संस्क्रूती जपली जाते हा एक अतिशय फोल्..तथ्य नसलेला विचार आहे...
.....गावकरी : यांना काय त्रास होणार आहे?वास्तविक हे सो कॉल्ड संस्क्रुतीऱक्षक गावकरी स्वतः रोज देशी /थर्रा लाऊन गाव भलेही डोक्यावर घेत असेनात पण, दुसरे करताहेत ना मग यांचं डोकं फिरतं.

मला त्या ग्रूप च्या वागण्याचं समर्थन नक्किच कराय्च नाहीये..कदाचित त्यांच्या कडुन काही प्रमाणात उल्लंघन झालेही असेल...जर त्यांनी तारतम्य सोडुन वर्तन केले असेल तर त्याची दखल घ्यायलाच लागेल.
पण सहसा गावगुंडाचा बेसिक उद्देश "विघ्नसंतोषी पणा" हाच असतो.

* त्या ३०० लोकांमध्ये बरेच जण दारू न पिणारे असु शकतात... आप्ल्या कलिग्ज बरोबर मित्र मैत्रिणींबरोबर काही वेळ मजेत घालवाय्ला आलेले हि असु शकतात्....पण आपल्याकडे ही मानसिकता तयार व्हायला युगं जावी लागतील.

*परप्रांतियांचा सहभाग :
हे मात्र्..उगाचच सध्या चर्चेत असलेल्या वादांना नवे खाद्य पुरवाय्च्या उद्देशाने उग्गाच्चच अधोरेलिखित केले गेले असावे..
..असो.....

>>.....गावकरी : यांना काय त्रास होणार आहे?वास्तविक हे सो कॉल्ड संस्क्रुतीऱक्षक गावकरी स्वतः रोज देशी /थर्रा लाऊन गाव भलेही डोक्यावर घेत असेनात पण, दुसरे करताहेत ना मग यांचं डोकं फिरतं.

आयला तुम्च्या शेजारच्या रिकाम्या घरात रोज नविन नविन लोक येउन जर धिंगाना घालाया लागले त चालल का ताई?
आनि गाववाले देशि / ठर्रा लावतात वो पन 'तुम्च्या' घरा फुड येउन 'तमाशा' नाय करत.

तुमि शहरात रहाता म्हनुन काय लै शाने झाले का?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Aug 2010 - 9:52 am | जाई अस्सल कोल्हापुरी

भाऊ,
शहरात राहुन शानपना येण्यच्या गोष्टी बाजुला ठेवूया,...पण खरंच अनेक गावात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत किंवा इतर काही समाजिक्/धार्मिक कार्यक्रमांमध्ये बर्‍याच प्रमाणात हे होतं........प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे हा...
आणखी एक गोष्ट..... वाईट प्रवृत्ती ही वाईटच असते.....त्यामध्ये शहर - गाव्,ठर्रा का व्हिस्की हा भाग येतच नाही...
ज्यांना धिंगाणा घालायचा आहे ते कुठेही घालू शकतात...
मी मागे म्हटलेच आहे....जर त्यांच्याकडुन ग्रामस्थांना त्रास झाला असेल तर त्याची दखल घ्यायलाच हवी...या पार्टीमध्ये झालेही असेल तसे....
पण मी मांडलेला मुद्दा हा गावात राहुनच अनुभवलेला आहे... पाहिलेला आहे.

स्वछंदी-पाखरु's picture

3 Aug 2010 - 5:50 pm | स्वछंदी-पाखरु

हम्म्म्म,....... याले म्हणतात नाद खुळा... गणपती पुळा.......

नावातकायआहे's picture

3 Aug 2010 - 10:11 pm | नावातकायआहे

जाई ताई,

दारु पिने हि काय लै भारि गोष्ट नाय ह्यात काय वाद नाय.

>>पण खरंच अनेक गावात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत
शहरातल्या गनपति मिरवनुकित कधि गेलात का?
गनपतिच्या ट्रक मंदि माग काय चालत ते बगितलत का??

>>किंवा इतर काही समाजिक्/धार्मिक कार्यक्रमांमध्ये बर्‍याच प्रमाणात हे होतं
सवाईला स्टॉल्च्या माग संगित ऐकायला आलेले 'शहरि रसिक' काय काय करतात म्हैतिय का?

>>त्यात त्यांना नतद्र्ष्ट गावकर्‍याकडून मिळणारी माहिती
ह्या वाक्यातच तुम्हाला काय म्हनायच ते कळतय

गाववाल्यांबद्दल तुम्च्या मनात जि आढि हाय ना ति तुमच्यकडच ठेवा....

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

डॉन्रावांनीच आता पुढाकार घेउन गावकर्‍यांना इनो वाटावे असा ठराव मी मांडत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Aug 2010 - 6:25 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे.
आणि थोडं स्वतःही घ्यावं. ;)

प्रसन्न केसकर's picture

2 Aug 2010 - 6:25 pm | प्रसन्न केसकर

जस्ट टु कीप रेकॉर्डस स्ट्रेटः
१) पार्टी संस्थेची नव्हती. विद्यार्थ्यांनी स्वतःच पार्टी आयोजित केली होती. असे कळते की काहीजणांनी होस्टेलवर रात्री उशीरा परतण्यासाठी परवानगी काढली होती पण पार्टी आहे असे सांगीतले नव्हते. पार्टी एका खाजगी व्यक्तीच्या फार्महाऊसमधे होती. तेथे तब्बल ४०० मुले-मुली जमली होती. बीयर, दारु क्रेट भरभरुन आणली होती म्हणे. अ‍ॅम्प्लीफायरवर संगीत तर होतेच. कारवाई मध्यरात्री नंतर झाली तेव्हा संस्थेला कळले म्हणे.
२) तिथे सुरु असलेल्या गोंगाट व आवाजाबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यामुळे पोलिस तेथे गेले. त्यानंतर पार्टी करण्यासाठी आवश्यक ते परवाने घेतलेले नाहीत, कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही असे कळल्यामुळे त्यांनी पार्टीत असलेल्यांना ताब्यात घेतले असे कळते. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यानंतर विनापरवाना मद्यप्राशन करणे, प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणे याबाबत मुंबई पोलिस कायदा, प्रोहिबिशन अ‍ॅक्ट या कायद्यांनुसार खटला भरण्यात आला.
३) याबाबत कायदेशीर तरतुदी पुरेश्या स्पष्ट आहेत. कोणतीही ओली पार्टी करताना पोलिस, एक्साईज डिपार्टमेंट इत्यादी खात्यांच्या परवानग्या घेणे अनिवार्य आहे. परवाना नसताना दारुचे सेवन करणे हा देखील गुन्हा आहे. दारुच्या अंमलाखाली वा अन्यथा गोंगाट-गडबड्-गोंधळ करणे, विनाकारण शांतताभंग करणे हा देखील गुन्हा आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या वापरासाठी देखील पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे. जरी अशी परवानगी असली तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्री १० ते सकाळी ६ या वेळात वर्षातील शासनाने स्पष्ट केलेले १५ दिवस वगळता अन्य दिवशी ध्वनिक्षेपक वापरण्यावर बंदी आहे. बंदी नियम शिथिल असेल त्या पंधरा दिवसांमधेही ध्वनिक्षेपकांचा वापर रात्री १२ नंतर करता येत नाही.
४) यासंदर्भात ग्रामस्थांना दोष देण्यात मला अर्थ दिसत नाही. अश्या पार्ट्यांचा त्रास ग्रामस्थांना बर्‍याचदा होत असतो. शहरामधे रहाणार्‍यांना जर त्रास होतो तर ग्रामस्थांनाच तो होणार नाही असे नाही. सर्वच पार्ट्यांबाबत अश्या तक्रारी होतात, कारवाई होते असेही नाही. जेव्हा त्रास असह्य होतो तेव्हा ग्रामस्थ तक्रारी करतात, क्वच्चित कायदाही हातात घेतात हे नाकारता येत नाही. कायदा हातात घेणे हे सर्वथा अस्मर्थनीय असले तरीही असे उद्रेक पार्टी करणार्‍यांनीच संयमाने वागले तर होणार नाहीत हे देखील खरे आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त.
आता जाणकार (खरी बातमी व त्या बद्दलच्या कायद्याचे जाणकार ह्याअर्थी) मैदानात उतरु लागल्याने चर्चा वाचायला मजा येईल.

मदनबाण's picture

2 Aug 2010 - 6:31 pm | मदनबाण

सहमत... ;)

छोटा डॉन's picture

2 Aug 2010 - 6:52 pm | छोटा डॉन

प्रसनदाच्या माहितीपुर्ण आणि सत्य सांगणार्‍या प्रतिसादानंतर आमचे बरेच आक्षेप मागे घेत आहोत ...

पार्टी ही त्या संस्थने 'आयोजीत केली नव्हती' हे जर सत्य असेल तर मग त्या ओघाने आम्ही मांडलेले सगळे मुद्दे बाद ठरत आहेत. प्रायव्हेट किंवा नुसत्या पैशाच्या जोरावर केलेल्या स्वैराचाराचे कसलेही समर्थन करण्याचा आमचा हेतु किंवा इच्छा नाही.
वरील प्रतिसादात अनेकांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांशी आता "सहमती" दर्शवतो ...

आम्ही केवळ एका मुद्द्यासाठी भांडत होतो व तो म्हणजे "जर आयोजक एखादी संस्था किंवा कॉर्पोरेट कंपनी असेल " तर इतके सगळे नियम धायावर बसवले जात नाहीत ( बहुतेक केसेसमध्ये, १००% असे नाही ) व म्हणुनच प्रामथिक माहितीत ( संदर्भ : मटा ) एक नावाजलेली शिक्षण संस्था त्याची आयोजक असल्याच्या उल्लेखावरुन आम्ही सदर काथ्याकुट मांडला.
असो, प्रसनदाच्या प्रतिसादाशी सहमत आहे. :)

स्वैराचाराचे अजिबात समर्थन नाही.
मात्र कायद्याची आणि सामाजिक बंधने ह्यांची योग्य नोंद घेऊन केल्या जात असणार्‍या अनेक कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्यांना आमचा अजुनही पाठिंबा आहे.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 5:06 am | आमोद शिंदे

>>पार्टी एका खाजगी व्यक्तीच्या फार्महाऊसमधे होती.

खाजगी जागेत प्यायला कधी पासून परमिटे लागायला लागली? दर शनिवारी घरी बसून दोन पेग घेताना प्रत्येकजण परमिट आणतो की काय?

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 1:38 pm | प्रसन्न केसकर

खाजगी जागेत प्यायला कधी पासून परमिटे लागायला लागली? दर शनिवारी घरी बसून दोन पेग घेताना प्रत्येकजण परमिट आणतो की काय?

यातला पहिला भाग संपुर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. मद्याची खरेदी किंवा कोणत्याही प्रकारे विक्री करणे, मद्य बाळगणे, मद्य सेवन करणे या प्रत्येक गोष्टीसाठी परवाना/ लायसेन्स घेणे अनिवार्य आहे. हे निर्बंध आजचे नाहीत तर अगदी १९४९ पासुनचे आहेत. याबाबतची माहिती हवीच असेल तर THE BOMBAY PROHIBITION ACT, 1949 किंवा Bombay Foreign Liquor Rules, 1953 पहा.

कायद्याची अंमलबजाबणी कितपत होते हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे. ती केली किंवा नाही केली तरी टीका होतेच. पण मुळात कायदा आहे म्हणल्यावर एकतर त्याचे पालन झाले पाहिजे किंवा तो चुकीचा असेल तर बदलला पाहिजे. कायद्याचे अधिराज्य यालाच म्हणतात.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 6:33 pm | आमोद शिंदे

मद्य खरेदीला\विक्रीला परमीट लागते. ते माहित आहे. घरी बसून प्यायला लागत नाही. खरेदीचे\सेवनाचे परमीट असलेली व्यक्ती कुठल्याही खाजगी जागेत मद्यसेवन करु शकते. थोडक्यात परमीट हे व्यक्तिचे असते. जागेचे* नाही.

*येथे खाजगी जागा अपेक्षीत आहे.

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 7:14 pm | प्रसन्न केसकर

वाचुन पहा जरा!

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 10:45 pm | आमोद शिंदे

पिण्यासाठी घरच्या जागेचे पिण्यासाठी परमीट काढावे लागते असे मला वाटत नाही. खरेदी करण्याचे परमीट असले म्हणजे झाले.

इन्द्र्राज पवार's picture

2 Aug 2010 - 7:04 pm | इन्द्र्राज पवार

अशा धाडीतून केवळ पोलिस हात धुवून घेत असतात. टाईम्सच्या त्या बातमीचा पुढील मागोवा संबंधित पत्रकार कधीच घेणार नाही कारण त्याचे लक्ष आता दुसर्‍याच असल्या "सनसनाटी" कॉर्नरकडे; तसेच म.टा. काय किंवा लोकसत्ता, सकाळ काय एकदोन दिवसात स्फुटाखाली दोनचार पॅर्‍याचे कानोसा अशा सदरात "काय होणार या पिढीचे ?" ठरलेले अश्रू ढाळणार आणि पुढील फ्रेंडशिप डे पर्यंत सारे काही शांत शांत !

ग्लोबलायझेशनचे फायदेतोटे काही असू देत पण उच्च शिक्षणाच्या नावाखाली सध्याचे विद्यार्थी (दोन्ही गट) मोकळेपणाने वावरत असतात. बातमीत फ्रेंडशिपचा उल्लेख केला आहे पण जर तुम्ही शनिवार-रविवार महाबळेश्वर, पन्हाळा अशा ठिकाणी याच गटातील 'युवा' ची गर्दी पाहिली की जाणाल, अशा रितीच्या पार्ट्या यांना अजिबात नवीन नाहीत. पालकांना बोलावून पोलिस काय दम देणार आहेत? आणि पालक तरी काय यात सामील असलेल्या आपल्या मुलीला "हो घराबाहेर" म्हणतील? फक्त "गांधीबाबा" च्या हिरव्या/लाल नोटांच्या देवाणघेवाणीसाठी हा सारा मामला.

श्री.डॉन यांनी केलेले निरिक्षण अचूक आहे ("कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो"). बातमीत ज्या थेऊरच्या बंगल्याचा उल्लेख केला आहे तो पाहता "फ्रेंडशिप डे" संपूर्ण राज्यात फक्त याच बंगल्यात झाला असे मानायचे का? अशा पार्ट्या शेकडो ठिकाणी होत असतात पण आयोजक इतके हुशार असतात की अगोदरच त्या त्या गावातील "दादां"ची अन्यत्र सोय करून देतात व आपली पार्टी सहजगत्या यशस्वी करतात. थेऊरमध्ये ते झाले नाही इतकाच बोध.

"दारूच्या नशेत धुंद होऊन बेहोश धिंगाणा घालत होते." पटत नाही. बेहोश होण्यासाठी ४००-५०० मुलामुलींना दारूच लागते असे नाही. मोकळे वातावरण, झिंग आणणारी ऑन म्युझिक सीस्टिम, घरापासून दूर दूर मित्रांसमवेत, चित्रपटात आमीर, सलमान, शाहरूख, काजोल, माधुरी, करीना करीत असलेल्या अशा पद्धतीच्या पार्ट्या यांची आठवण, शिवाय यामध्ये खर्च करणारे तीनचार बडे बाप के बेटे, त्यामुळे खास मध्यमवर्गीय "कॉमन कॉन्ट्रिब्युशन"ची दगदग नाही हा विचार आदींचे मिश्रणही नशा आणण्यास पुरेसे आहे. (याला दुजोरा म्हणजे उद्या त्या वार्ताहराने या ४००+ मुलामुलींची पोलिसांनी घेतलेली अधिकृत मेडिकल टेस्ट मिळवावी. निम्म्यापेक्षा जास्त मुले "निगेटीव्ह" असतील. शिवाय ड्रग घेतलेले कुणी नव्हते हे पोलिसांनीच मान्य केले आहे.)

कॉलेजच्या अंतीम वर्षात असताना मी स्वतः असल्या पार्टीत सामील झालो होतो. किमान १०० तरी होतो (३०-३५ मुलीसह). पार्टी पन्हाळ्यावर होती. सायंकाळी ५ ला तिथे जमा झालो. ८ वाजेपर्यंत जेवण तयार होते, त्यानंतर जसे सर्वसाधारणपणे होत असते तसे हास्य, विनोद, कवितावाचन, गाणी म्हणणे, नृत्य करणे, ज्यांना बीअर घ्यायची होती ते बाजूला जाऊन घेत होते, पण जे घेणार नव्हते त्यांना आगाऊपणा करून घेण्यास कुणी भाग पाडत नव्हते. बरे हे सर्व गडाच्या तीन दरवाजा या भागात "ओपन टू स्काय". मध्यंतरी एक पोलिस व्हॅनदेखील येऊन "जास्त आरडाओरडा करू नका" अशी मैत्रीपूर्ण "ताकीद" देऊन गेलीसुद्धा. जेवणासाठी लागणार्‍या सार्‍या वस्तुंची खरेदी खुद्द पन्हाळ्यातच केली असल्याने (सर्वच करतात) बाजारपेठेतूनदेखील काही विरोध होण्याचे कारण नव्हते. शिवाय शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस अशा पद्धतीच्या गेट टुगेदरची ग्रामस्थांना माहिती आणि सवय असतेच. पार्टी ११.०० वाजता संपली आणि संयोजक लीडर्सनी (त्यात मी देखील होतो) सर्व काही व्यवस्थित आहे हे पाहुनच पन्हाळा सोडला आणि प्रत्येकाला अगदी घराच्या दारापर्यन्त सोडले.

अशाच रितीने या पार्ट्यांचे नियोजन असते. एमबीएची मुले मोकळापणा घेतात म्हणून त्यांना परप्रांतीय हे लेबल लावायचे ही सोयिस्कर पत्रकारिता.

बातमी तर अशी रंगवली आहे की, ती मुले म्हणजे "आर्य मदिरा मंडळा"चे लाईफ मेंबर.

श्री पवारसाहेब! एव्हढा `सखोल' अभ्यास केल्याबद्दल मुजराच केला पाहिजे तुम्हाला!

अशा धाडीतून केवळ पोलिस हात धुवून घेत असतात.

असे होत असणे नक्कीच शक्य आहे. पण शक्यता ही सार्वत्रिक असतेच असे नाही ना? कदाचित एखाद्या धाडीत हात धुऊन घेतलेले नसतील पण! की हे अशक्य आहे.

टाईम्सच्या त्या बातमीचा पुढील मागोवा संबंधित पत्रकार कधीच घेणार नाही कारण त्याचे लक्ष आता दुसर्‍याच असल्या "सनसनाटी" कॉर्नरकडे

हम्म्म! कुठला पेपर वाचता म्हणे तुम्ही? आमचा साप्ताहिक बोंबाबोंक की काय? बहुतेक सर्व प्रतिष्ठित वृत्तपत्रात त्याला जिव्हाळ्याचे वाटतात त्या विषयांचा अगदी खोलात जाऊन पाठपुरावा करतात. जेसिका लाल प्रकरण, आरुषी प्रकरण, सत्येंद्र दुबे प्रकरण, तेलगी केस, अगदी २६/११ केस सगळीकडे ते झालेय. अनेक प्रकरणात तर वृत्तपत्रांच्या बातम्याच लिटीगेशन म्हणुन वापरल्यात. ज्या टाईम्सचं तुम्ही नांव घेतलय ना, त्या टाईम्समधेच अन या महाराष्ट्रातच शबनम मीनावाला, पी साईनाथ, अंबरिष मिश्र यांची बातमीदारी गाजलीये.

पालकांना बोलावून पोलिस काय दम देणार आहेत?

मी तर अश्या अनेक प्रसंगी पालकांनीच पोलिसांना दम दिलेलं पाहिलय.

"दारूच्या नशेत धुंद होऊन बेहोश धिंगाणा घालत होते." पटत नाही.... याला दुजोरा म्हणजे उद्या त्या वार्ताहराने या ४००+ मुलामुलींची पोलिसांनी घेतलेली अधिकृत मेडिकल टेस्ट मिळवावी. निम्म्यापेक्षा जास्त मुले "निगेटीव्ह" असतील. शिवाय ड्रग घेतलेले कुणी नव्हते हे पोलिसांनीच मान्य केले आहे.

ड्रगचा मुद्दा कुठुन आला बुवा? अन जर पोलिसांच्या धाडींवर विश्वास नसेल तर टेस्टचे निकाल कसे विश्वासार्ह ठरतात हो?

कॉलेजच्या अंतीम वर्षात असताना मी स्वतः असल्या पार्टीत सामील झालो होतो. किमान १०० तरी होतो (३०-३५ मुलीसह). पार्टी पन्हाळ्यावर होती. सायंकाळी ५ ला तिथे जमा झालो. ८ वाजेपर्यंत जेवण तयार होते, त्यानंतर जसे सर्वसाधारणपणे होत असते तसे हास्य, विनोद, कवितावाचन, गाणी म्हणणे, नृत्य करणे, ज्यांना बीअर घ्यायची होती ते बाजूला जाऊन घेत होते, पण जे घेणार नव्हते त्यांना आगाऊपणा करून घेण्यास कुणी भाग पाडत नव्हते. बरे हे सर्व गडाच्या तीन दरवाजा या भागात "ओपन टू स्काय". मध्यंतरी एक पोलिस व्हॅनदेखील येऊन "जास्त आरडाओरडा करू नका" अशी मैत्रीपूर्ण "ताकीद" देऊन गेलीसुद्धा. जेवणासाठी लागणार्‍या सार्‍या वस्तुंची खरेदी खुद्द पन्हाळ्यातच केली असल्याने (सर्वच करतात) बाजारपेठेतूनदेखील काही विरोध होण्याचे कारण नव्हते. शिवाय शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस अशा पद्धतीच्या गेट टुगेदरची ग्रामस्थांना माहिती आणि सवय असतेच. पार्टी ११.०० वाजता संपली आणि संयोजक लीडर्सनी (त्यात मी देखील होतो) सर्व काही व्यवस्थित आहे हे पाहुनच पन्हाळा सोडला आणि प्रत्येकाला अगदी घराच्या दारापर्यन्त सोडले.

बीयर घेणारे बाजुला जाऊन घेत होते, ११ वाजता पार्टी संपवली, संयोजकांनी प्रत्येकाला घराच्या दारात नेऊन सोडले यातच बरेच काही आले. असे करणारे व्यावसायिक संयोजक असतील तर पत्ते कळवा कृपया. पोलिस पण त्यांची जाहिरात करतील नक्की, अगदी बर्गलर्स अलार्मची करतात तशी. ते पत्ते पोलिसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. वाटल्यास त्या सगळ्यांचा जाहिर सत्कार पण आयोजित करुन देतो.

अशाच रितीने या पार्ट्यांचे नियोजन असते. एमबीएची मुले मोकळापणा घेतात म्हणून त्यांना परप्रांतीय हे लेबल लावायचे ही सोयिस्कर पत्रकारिता.

आता तुम्हीच `अश्या' पार्ट्या आयोजित करता म्हणजे तुमचेच बरोबर असेल!

इन्द्र्राज पवार's picture

2 Aug 2010 - 9:33 pm | इन्द्र्राज पवार

श्री.पुनेरी, मला मुजरा करायची काही गरज नाही. मी पत्रकारिता न करताही काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, अनुभवल्या आहेत. कॉलेज, वा विद्यापीठात शिकणारी मुलेमुली पिकनिक स्वरूपाच्या पार्ट्या अजिबातच करीत नाहीत असे तुम्हाला म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला. पोलिसांनी थेऊरच्या त्या बंगल्यावर धाड टाकली ती तिथे दंगा चालला आहे असा ग्रामस्थांचा फोन आल्यानंतर. म्हणजेच "दंगा" नावाचा प्रकार झाला नसता (किंवा प्रमाणात झाला असता) तर पार्टीला आपल्या पाल्याने हजर राहिले ते मग क्षम्य मानायचे का? आणि मी प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तुम्ही असे म्हणू शकता का की, राज्यात त्या दिवशी अन्यत्र कुठेही पार्ट्या झाल्या नसतील?

टाईम्सच्या ज्या वार्ताहरांची नावे तुम्ही लिहिली आहेत ती मलाही माहित आहेतच. पण आज सरसकट ज्या पद्धतीने पत्रकारराज चालले आहे तीवरून ती परंपरा योग्य दिशेने चालली आहे असे मी मानत नाही. (अर्थात हे वैयक्तिक मत आहे.)

व्यावसायिक संयोजक असतील तर पत्ते कळवा कृपया.
आम्हाला अशा व्यावसायिक संयोजकाची कधी गरज भासली नाही. सहलीचे आयोजन आम्ही करीत असू आणि सामील झालेल्या सर्वांना व्यवस्थित घरी पोच करून मगच आमच्या रूमकडे जात असू. अशा पद्धतींचे नियोजन सर्वच करत असतात.

असो. माझ्यापुरता हा विषय संपला.

मी ज्यांची नावे घेतली ते आजही पत्रकारितेतच आहेत आणि ज्यांची नावे घेतली नाहीत असे शेकडो प्रामाणिक पत्रकार मला माहिती आहेत. अर्थातच `साप्ताहिक बोंबाबोंब' एव्हढेच फक्त वाचुन आपल्याला बरेच कळते असा समज करुन घेण्याचे अन काहीही तर्कटे लढवण्याचे अन जाहिर भाष्य करण्याचा `वकुब' अन `धाडस' त्यांच्यामधे नसल्याने ते आंतरजालावरच्या विद्वानांच्या तुलनेत छटाक-नवटाकच!

पत्रकारराज म्हणजे काय असते, ते कुठे चालते हे मला माहिती नाही. पण आपल्या घरी बसुन शेकडो मैलांवर घडलेल्या घटनेबाबत कोणतीही माहिती नसतानाही ठाम मते व्यक्त करणारे जालीय विद्वान हे खरेच घटनास्थळी जाऊन, स्वतः परिस्थिती पाहुन, सर्व संबंधितांशी बोलुन दोन ओळी खरडणार्‍या पत्रकारांपेक्षा थोरच! त्यामुळेच सर्व जालीय विद्वानांना मुजरा करणे क्रमप्राप्त ठरते.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 6:35 pm | आमोद शिंदे

पत्रकारही काही धुतल्या तांदळाचे नाहीत.
उगाचच परप्रांतिय, दारू पिणार्‍या मुली वगैरे उल्लेख बातम्यांमधून हायलाईट करणार्‍या पत्रकारां विषयी तुमचे काय मत आहे?

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 7:17 pm | प्रसन्न केसकर

उगीचच कै च्या कै!

अन आमची पत्रकारांबद्दलची मतं मिपावर परत परत सांगत बसण्याची गरज नसावी. काल परवा आलेल्या लोकांनी जरा अभ्यास पण करावा!

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 10:47 pm | आमोद शिंदे

तुमची मते मला खरंच माहित नाहीत. तुमच्या इथल्या प्रतिसादावरुन तुम्ही पत्रकारांना पाठीशी घालू आहात असे वाटले म्हणून. पत्रकार प्रत्यक्षात हजर असतो म्हणून जालावर मत मांडणार्‍यांपेक्षा तो श्रेष्ठ वगैरे युक्तिवाद मला पटला नाही.

बरं ते जाऊ दे. सदर बातमी छापणार्‍या पत्रकाराविषयी आपले मत काय आहे?

सुहास..'s picture

2 Aug 2010 - 10:38 pm | सुहास..

अशा धाडीतून केवळ पोलिस हात धुवून घेत असतात. >>>

केवळ ह्याच वाक्याच ऊत्तर देतो ....आशा आहे की पुढील सर्व चर्चेला मला ऊत्तर देण्याची गरज भासणार नाही ...

नेमक पोलीसांनी काय करायच अस आपणास वाटत.कचर्‍यातल्या डब्यातली,ईकडे तिकडे,आख्ख्या गावात मोकळ्या ठिकाणी,पोरांच्या खिशातली,पोरींच्या पर्समधली, युज्ड कंडोम/अनयुज्ड कंडोमची पाकिटे मोजायची.त्याची बातमी पत्रकारांना द्यायची आणी पत्रकारांनी ती छापुन आणायची.दुसर्‍या दिवशी पंचनामा करण्यार्‍या, हवालदाराचा शाळेत जाणारा मुलगा,सकाळी-सकाळी पेपर वाचतो अन आईला विचारतो.......नाही म्हणजे लिहु का पुढे .....असो ....संपादकांची परवानगी असली तरी मला स्वताला काही लेखन-सीमा आहेत........

गावकर्‍यांना जे पोलीसांना कळविले ते योग्यच होतं....बस पुढे काही लिहीत नाही........

इन्द्र्राज पवार's picture

2 Aug 2010 - 11:36 pm | इन्द्र्राज पवार

सुहासराव....

मी पोलिसांनी अमुक एक केले नाही, किंवा का केले, अथवा काय काय करावे लागले याबद्दल प्रतिसादात कुठेही लिहिलेले नाही. 'पोलिस पंचनामा' हा बेवारशी प्रेताचादेखील इन-डिटेल करावाच लागतो; आणि थेऊरची तर धाड होती, तेव्हा तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यापेक्षा जास्त लिखाण त्या हवालदारांनी त्या ठिकाणी केले असणार.

माझा मुद्दा ~~ हात धुवून घेतात, आणि तो आहेच आहे. कुणाकडून, कसा, किती या गोष्टी अगदी दुय्यम आहेत. (मी अशा प्रकरणातून फार वेळा गेला आहे ~ अशा म्हणजे 'पार्ट्यांच्या" नव्हे, तर पोलिस पंचनामे आणि त्यापुढील कारवाया, त्यामुळे विश्वास ठेवा की माझे अनुभवाचे बोल आहेत.)

अहो, जे पोलिस आणि संबंधित अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्याला "अमुक एका कैद्याच्या कोठडीत जाऊ नका" असा रोखठोक सल्ला देतात, इतकी बडदास्त त्या कैद्याची त्यांनी ठेवलेली आहे, ते पोलिस अशा एकगठ्ठा ४००-५०० पोरांच्या बापांना धुतल्याशिवाय सोडतील असे कुणीही मानत नसेल.

इन्द्र

कॉलेजच्या अंतीम वर्षात असताना मी स्वतः असल्या पार्टीत सामील झालो होतो. किमान १०० तरी होतो (३०-३५ मुलीसह). पार्टी पन्हाळ्यावर होती. सायंकाळी ५ ला तिथे जमा झालो. ८ वाजेपर्यंत जेवण तयार होते, त्यानंतर जसे सर्वसाधारणपणे होत असते तसे हास्य, विनोद, कवितावाचन, गाणी म्हणणे, नृत्य करणे, ज्यांना बीअर घ्यायची होती ते बाजूला जाऊन घेत होते, पण जे घेणार नव्हते त्यांना आगाऊपणा करून घेण्यास कुणी भाग पाडत नव्हते. >>>>

बघ रे डॉन्या, तुला बोललो होतो ना ? चुक आपल्या पिढीची नाही ....आपल्या आधीच्या पिढीने हे दिलय आपल्याला...

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 11:07 am | इन्द्र्राज पवार

बघ रे डॉन्या, तुला बोललो होतो ना ? चुक आपल्या पिढीची नाही ....आपल्या आधीच्या पिढीने हे दिलय आपल्याला...

आपल्या आणि आधीच्या पिढीची व्याख्या काय आहे हे मला माहित नाही. मी ज्या पार्टीचे आयोजन केले होते ती २००४ मधील होती (मी अजून तिशी ओलांडलेली नाही, सुहासराव....) आणि आता व्यवसायानिमित्ताने अनेकविध गटातील लोक एकत्र येत असल्यानेदेखील खाजगी पातळीवर का होईना पार्टीचे आयोजन करावे लागतेच. आणि हे सर्व सहजगत्या शांततेनेच चाललेले असते. सर्वच थरावर अशा पद्धतीच्या 'गेट टूगेदर' घटना होत असतात. त्यामुळे "चुक" कुठल्या पिढीची अशी शंका अप्रस्तुत ठरावी.

आर्तिच्या आयला आमी येइस्तो शो खपला :(
आता हे चणे फुटाणे घेउन कुठल थेटार गाठाव रं?

राजेश घासकडवी's picture

2 Aug 2010 - 8:29 pm | राजेश घासकडवी

पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले.

डानरावांनी जाता जाता केलेल्या निरीक्षणाशी सहमत. वरील वाक्य प्रसारमाध्यमांना खरंच शोभत नाही. या ओळींत बिटवीन द लाईन्स बरंच काही वाचता येतं. ते वाचता यावं अशा प्रकारेच ते लिहिलेलं वाटतं.

'हे ** *** साले ** (परप्रांतीय) इथे येतात आणि गोंधळ करतात, त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे'
'होना, आणि त्यात मुलीही होत्या म्हणे'
'आपल्या मुलींना दारू पाजतात...' (किंवा) 'त्यांच्या पोरीही तसल्याच उठवळ, दारू पिऊन नसती थेरं करतात'
'तेच तर. मुलांनी दंगा केला दारू प्यायली तर ठीक आहे, बॉइज विल बी बॉईज. पण मुली दारू पितात?'
'समाजाची नीतीमत्ताच भ्रष्ट होणार नाही का?'

अशी वाक्यं लपलेली आहेत हे जाणवतं. IT WIFE निमित्ताने स्त्रियांविषयीच्या बुरसटलेल्या अपेक्षा किती खोलवर रुजलेल्या आहेत हे दिसून आलं. प्रसारमाध्यमांनी त्या उचलून धरणं शोभत नाही.

+ १

राजेशशी सहमत.

मुलीने दारु प्यायली तर जगबुडी झाल्याचा कांगावा का?

चिन्मना's picture

2 Aug 2010 - 10:57 pm | चिन्मना

आत्ताच मी NDTV वर पाहिलं की मुलींना वॉर्निंग देऊन सोडून दिले आहे आणि मुलांना मात्र सुटण्यासाठी जामीन घ्यायला लावलेला आहे. याबाबत काय बोलायचे आहे तुम्हाला? हा भेदभाव कसा करु शकतात?

जुन्या विचारसरणीचे लोक बघाना कसे असतात...त्यांना वाटले असेल मुली ताकीद दिल्यावर परत असे करणार नाहीत...आणि मुले मात्र करतील कारण मुलेच ती, दारू पिणारच, पार्ट्या करणारच...
अशी मुले कशी ओळखावी? (आजकाल लोक हातातल्या मोबाईल वरून आणि प्यांट कोणती घातली यावरून लोक आणि त्यांचा व्यवसाय ओळखतात म्हणे.)

मुलींना वॉर्निंग देऊन सोडून दिले आहे
तेवढीच पोलिसांवरची जबाबदारी कमी झाली हो!
एकदा का आपापली कन्यारत्ने ताब्यात घेतली की पालक पण सुटकेचा निश्वास टाकत असतील.
मग बाहेर जावून कुठे का उधळेनात!;)
तिथे पोलिस ठेसनात नुसता धक्क लागला तरी ओरडा व्हायचा!;)

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 1:49 pm | प्रसन्न केसकर

दोन्ही घटक धन्यच! अगदी रोज त्यांचे पाय धुऊन तीर्थे घ्यावीत!

पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना काही विद्यार्थ्यांनी दमदाटी केली. अगदी ए शिपुर्ड्या चल फुट उगीच भानगडीत पडु नकोस एका मिन्टात नोकरी जाईल अश्या भाषेत. वैद्यकिय तपासण्या जवळपास रात्रभर चालल्या. ८१ मुलांनी अतिमद्यप्राशन केलेले सापडले तर सात जणांनी पार्टी आयोजित केली होती. त्यांना ताब्यात ठेवले अन बाकिच्यांना भल्या सकाळी तपासण्या झाल्यावर सोडुन दिले. मग मॅजिस्ट्रेट थेऊरला गेले अन त्या अतिमद्यप्राशन केलेल्या मुलांना जामीन मिळाला. दुपार पर्यंत सगळे ८८ जण बाहेर. त्यानंतरही पोलिसांना काहीजणांनी शिवीगाळ केली. बर्‍याचश्या मुलांचे पालक शेवटपर्यंत उगवलेच नाहीत. जे उगवले त्यांचे म्हणणे आमच्या मुलांनी काय खुन बिन केलाय की काय? कायदा मोडला, लोकांना त्रास झाला त्याबाबत खेद ना खंत.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 10:48 pm | आमोद शिंदे

हे सगळे त्या बातमीत असायला हवे होते. ते न छापता परप्रांतिय मुली, दारू वगैरे गोष्टीच छापून आणल्या त्याचे काय?

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 11:07 pm | इन्द्र्राज पवार

श्री. पुनेरी जी...

तुम्ही आज मंगळवारी दुपारी हा वृत्तांत दिला आणि ४००-५०० पैकी ८१ मुले अतिमद्यप्राशन केलेले सिद्ध झाले (तर आपण असे म्हणू या की, आणखीन १०० मुलांनी कमी प्रमाणात का होईना मद्य प्राशन केले). ही बाब मी या अगोदर सोमवारीच वर प्रतिसादात लिहिली होती.

"(याला दुजोरा म्हणजे उद्या त्या वार्ताहराने या ४००+ मुलामुलींची पोलिसांनी घेतलेली अधिकृत मेडिकल टेस्ट मिळवावी. निम्म्यापेक्षा जास्त मुले "निगेटीव्ह" असतील. शिवाय ड्रग घेतलेले कुणी नव्हते हे पोलिसांनीच मान्य केले आहे.)"

त्यापुढे मुलांची आणि त्यांच्या थोर थोर पालकांची मग्रुरी, ती बाब वेगळीच. मी हेच म्हणत होतो की, असल्या धाडीतून काही म्हटल्या काही निष्पन्न होत नसते. केवळ वर्तमानपत्रांना त्या दिवसासाठी एक सनसनाटी बातमी.,...बस्स !! शासनातल्या भ्रष्टाचारी बुवानादेखील काही काळ प्रसिद्धीचा झोत आपल्यावरून दुसरीकडे गेला याचा आनंदच होत असतो.

जे पालक गुर्मी दाखवू शकत नव्हते त्यांनी कोणत्या प्रकारे आपल्या मुलाना पोलिस स्टेशनवरून घरी नेले असेल याचा अंदाज तुम्ही करू शकताच. खुद्द सिम्बायॉसिस मॅनेजमेंट या गटावर काही अ‍ॅक्शन घेणार नाही हे १००% सत्य.

विनाकारण आपण इथे डोकेफोड करीत असतो. चला विसरून जाऊ या !

इन्द्रा

Pain's picture

3 Aug 2010 - 11:17 am | Pain

समानतेचा ढोल पिटणार्‍यांचे यावर काय म्हणणे आहे ते पाहुया.

चक्रमकैलास's picture

2 Aug 2010 - 8:39 pm | चक्रमकैलास

पन्हाळ्यावर पार्टी करण्यात लाज कशी नही वाटली तुम्हाला...खुशाल तोंड वर करुन सांगताय की बीयर पीत होती काहीजणं...स्थळा-काळा चे थोडे तरी भान ठेवायचे ना....

इन्द्र्राज पवार's picture

2 Aug 2010 - 10:23 pm | इन्द्र्राज पवार

पन्हाळ्यावर बीअर घेणे हा जसा पराक्रम नाही, पण तशीच ती कुणीतरी घेतली म्हणजे जगबुडी झाली असे कृपया समजू नये. तसे असते तर याच पन्हाळ्यावर शासनमान्य बीअर बार आहेत आणि येथील टूरिस्ट हॉटेल्समधून ती सर्व्हदेखील केली जाते. शासनाला यातून अबकारी महसूल मिळतोच.

राहता राहिला पार्टी करण्याचा विषय, तर याबद्दल मी इतकेच सांगतो कैलासजी, की, कोल्हापूर जिल्हाधिकारी दप्तरी "पन्हाळा" हे "दख्खन पठारावरील निसर्गरम्य ठिकाण असून पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे." शासन ज्यावेळी पर्यटनस्थळ म्हणते त्यावेळे तिथे सहली येणारच आणि लोक पिकनिक म्हणून पार्टी ठेवणार हे आलेच. "ऐतिहासिक किल्ला" म्हणून तुमच्या लेखी पन्हाळ्याचे जे महत्व आहे ते इथल्या समस्त करवीरकरांना आहेच. मी त्या "बीअर" ग्रुपमध्ये नव्हतो, पण म्हणून इतरांना मी थांबवू शकत नव्हतो, तरीही त्यांना वाटेल तसे वागायची मुभादेखील दिली नव्हती (१०० मध्ये असे मोजून २० असावेत). अनेकापैकी एक संयोजक म्हणून या बाबी मी कटाक्षाने पाळल्या आहेत.

(जाता जाता ~~ प्रतिसाद देताना काहीतरी सभ्य भाषा आपल्या मायमराठीने आपणास दिली आहे, याची जाणीव ठेवलीत तर बरे. तुम्ही "लाज" काढली, मी वाचली. पण त्याच भाषेत मी कधीही लिहिणार नाही कारण तो माझा प्रांत नाही. घसरायचे ठरवलेच तर एक लक्षात ठेवा की मी कोल्हापुरात जन्मलो आहे, वाढलो आहे. 'ती' भाषादेखील माझ्या रक्तात आहे. तेव्हा मिसळपावच्या संपादकांनी प्रकटनाला मुक्त वाव दिला आहे म्हणून त्याचे भलतेच स्वातंत्र्य घेऊ नका. दुसरेही तो प्रयोग करू शकतात.)

मिपा संपादकाना असले प्रतिसाद चालत नसतील तर दोन्हीही उडवावेत.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 11:33 pm | मिसळभोक्ता

घसरायचे ठरवलेच तर एक लक्षात ठेवा की मी कोल्हापुरात जन्मलो आहे, वाढलो आहे. 'ती' भाषादेखील माझ्या रक्तात आहे.

पुन्हा कोल्हापूर ? साला, सुजय कुलकर्णीचा फ्यान काल झालो, आज पवार सायबांचा !

अरे कोणीतरी नागपूरच्या भाषेचा अभिमानी नाही काय रे इथे ?

इन्द्र्राज पवार's picture

2 Aug 2010 - 11:49 pm | इन्द्र्राज पवार

"अरे कोणीतरी नागपूरच्या भाषेचा अभिमानी नाही काय रे इथे ?"

श्री.मिभो, मी जितका कोल्हापुरचा तितकाच नागपूरी भाषेचा अभिमानी आहे. नागपूरच्या मित्रप्रेमाचा मी संयुक्त विद्यापीठ सोहळ्याच्या वेळी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि आजही नागपूरच्या हंसपुरी आणि महाल (की महल?) भागात राहणार्‍या माझ्या मित्रांच्या घरी हक्काने येजा करू शकतो. तसेच त्या तिघांना कोल्हापुरात बोलावून घेतो. असो.

प्रश्न इथे वापरायच्या भाषेविषयी आहे. मुद्दा पटणे वा न पटणे या बाबी इथे स्वीकृत असतातच. तुम्ही वा मी कितीही तारस्वराने म्हटले की, "आमच्या सचिन तेंडुलकरला जगात तोड नाही", तर त्यावेळी ती बाब सर्वानी मान्य केलीच पाहिजे असे तुम्हीही म्हणणार नाही. फक्त ती अमान्यता त्याने प्रमाणभूत भाषेत गुंफावी इतकेच. (खुद्द मिपा संपादक मंडळाचीदेखील हीच भूमिका असेल... असावी.)

श्री.कैलास यांना दिलेल्या उत्तरामुळे आपल्या (वा त्यांच्याही) भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व !

इन्द्र

प्रभो's picture

2 Aug 2010 - 11:53 pm | प्रभो

मिभोकाका रॉक्स...

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2010 - 9:43 am | llपुण्याचे पेशवेll

आयला देवगडातला कोणी नाही का इथे..? पूर्वी होते .. असो.

देवगडातला कोणी नाही का इथे..? पूर्वी होते .. असो. >>>

हा हा हा !!! तुम्ही त्यांचे फॅन होता का ?

पुण्याचेच सुहास

येथे पेशव्यांच्या प्रतिसादांना पंख लावून मिळतील

पार्टीच राहुद्या आता पोलिस काय करतात ते बघा..!
पकडलेल्यांवर कारवाई करतात की त्यांना सोडतात?
(कसे सोडतात तो एक वेगळा मुद्दा आहे.....)

ऋषिकेश's picture

2 Aug 2010 - 11:48 pm | ऋषिकेश

डॉन्याशी बराचसा सहमत. किंचित असहमती इतकीच की ह्या पार्ट्या आहेत/होतात त्या स्वरूपात योग्य वाटत नाहित. त्या जास्त 'लिगलाईज' व्हाव्यात असे वाटते. जसे ठराविक संख्येच्या वर लोक जमणार असतील तर अशी पार्टी करायची असल्यास जवळच्या ठाण्यात नोंद, पार्टीला मुली/स्त्रिया येणार असल्यास 'सुरक्षित' वाहनव्यवस्था व त्यांना स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय कंपल्सरी करणे वगैरे वगैरे.

पार्टि करणे हा गुन्हा नाहिच नाही मात्र पार्टीत एखादा गुन्हा अनावधानानेही घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी संचालक/संयोजक घेत नसल्यास कायद्याचा बडगा हवाच

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 12:07 am | इन्द्र्राज पवार

पार्टि करणे हा गुन्हा नाहिच नाही मात्र पार्टीत एखादा गुन्हा अनावधानानेही घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी संचालक/संयोजक घेत नसल्यास कायद्याचा बडगा हवाच

+ सहमत.
यातील "संयोजका"च्या भूमिकेतून मी कित्येकदा गेलेलो आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ती कायदेशीर खबरदारीच नव्हे तर ग्रामस्थांचाही देकार अगोदर घेतलेला असतो. लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे ज्या ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाईल तिथल्या स्थानिक बाजारातूनच भोजन, न्याहारी आदीसाठी लागणारी आवश्यक ती खरेदी झाली की ग्रामस्थांचे हार्दिक सहकार्य लाभतेच लाभते.

'थेऊर' प्रकरणातदेखील 'स्थानिक असंतोष' कोणत्या कारणास्तव झाला याचा शोध घेतल्यास या प्रकारचे पैलूही उघडतील. कुणी असे समजू नये की थेऊर गावात अशी वा तत्सम पार्टी याअगोदर झालेली नव्हती (वा इथुन पुढे होणार नाही.)

तासापूर्वी बातमी आली की, सर्व मुलींना सोडून दिले व आता उद्या मुलांच्या बापाकडून जामीन घेऊन सोडण्यात येईल. दोन दिवस ती पोरे गप्प बसतील आणि तीनचार दिवसांनी सिम्बॉयासिसचे डायरेक्टर अगदी स्वामी रामदेव बाबाच्या थाटात त्यांना एक लेक्चर देतील आणि "चला आता वर्गात". संपली "फ्रेंडशिप डे एक्साईटमेन्ट".... आता बघू पुढ्च्या वर्षी !

अशा एकदोन फालतु पार्ट्यामुळे आपली संस्कृती रसातळाला जाईल अशी वृथा भीती कुणीही बाळगू नये.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2010 - 9:44 am | llपुण्याचे पेशवेll

अशा एकदोन फालतु पार्ट्यामुळे आपली संस्कृती रसातळाला जाईल अशी वृथा भीती कुणीही बाळगू नये.
जाईल??????

"पार्टी करायची जागा भाड्याने देणे" हा सुयोग्य, कायदेशीर धंदा असू शकतो.

पार्किंगची पर्याप्त सोय असल्यास, गोंगाट मर्यादित ठेवण्याची सोय असल्यास अशा स्थळांना लायसन द्यायला हरकत नाही.

(दारू पिऊन झिंगल्यावर गाडी चालवता येऊ नये, सार्वजनिक स्थळावर धिंगाणा घालता येऊ नये... वगैरे सर्व ठीकच. पण खाजगी ठिकाणी दारू पिऊन झिंगण्याविरुद्ध कायदा आहे काय?)

विनापरवाना गोंगाट-पार्टी केल्यास परप्रांतीयांना आणि स्वप्रांतीयांना एकसारखीच शिक्षा व्हावी असे वाटते. सज्ञान मुलींना आणि मुलांना एकाच कायद्याने शिक्षा व्हावी असे वाटते. वर्तमानपत्रातला "परप्रांतीय" आणि "मुली" हा उल्लेख कळलेला नाही.

"बाहेरगावचे" वसतीगृहात राहाणारे विद्यार्थी पार्ट्यांमध्ये अधिक असतील, असा कयास पटण्यासारखा वाटतो. परंतु ते कुटुंबाबरोबर राहात नसल्यामुळे असावे, परप्रांतीयतेमुळे नव्हे. आईबापांच्या घरी राहाणारे परप्रांतीय तरुणही बहुधा रात्री शांतपणे घरी जात असतील, असे वाटते.

वर्तमानपत्रात "अमुक संस्थेच्या वसतीगृहातील मुले" असा उल्लेख "परप्रांतीय" पेक्षा अधिक सुसंदर्भ ठरला असता.

माझ्या ज्युनियर कॉलजच्या वसतीगृहात जवळजवळ सर्वच गोव्यातली (पण पणजी शहरापासून दूरदूरच्या गावातली) मुले होती. वसतीगृहातली (गावठी) मुले स्थानिक पणजीकर (शहरी+उच्चभ्रू+परप्रांतीय) मुलांपेक्षा अधिक "रात्री धिंगाणा" घालत. बिचार्‍या वसतीगृह-संचालकाला बराच त्रास होत असे, असे मला आठवते.

पंगा's picture

3 Aug 2010 - 3:34 am | पंगा

...तुमचा आयव्हरी टॉवर* आमच्या आयव्हरी टॉवरपेक्षा सफेद कसा?

* अमेरिकन इंग्रजीत लाकडाला 'आयव्हरी' आणि अपार्टमेंटला किंवा दोन मजल्यांच्या घराला 'टॉवर' म्हणतात.

(प्रतिसादातले मुद्दे पटले.)

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 12:36 am | इन्द्र्राज पवार

"वसतीगृहातली (गावठी) मुले स्थानिक पणजीकर (शहरी+उच्चभ्रू+परप्रांतीय) मुलांपेक्षा अधिक "रात्री धिंगाणा" घालत"

.... याचाच अर्थ की, अशा प्रकारचे हॉस्टेल लाईफ (आजकाल) सर्वच ठिकाणी कमीजास्त प्रमाणात अस्तित्वात आहेच आहे आणि हीच मुलेमुली ज्यावेळी काही निमित्ताने पार्टीसाठी जातात त्यावेळी अधिकचा मुक्तपणा घेतात. पण म्हणून यात सामिल झालेल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंध:कारमय झाले, होईल, असे कुणी मानते का?

....या वर्षातील सर्वाधिक गल्ला जमविलेल्या "३ ईडियट्स" मध्ये जे हॉस्टेल लाईफ दाखविले आहे ते आठवा. देशातील सर्वोत्तम समजल्या गेलेल्या त्या इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेलच्या टेरेसवर नायक आमीर खान आपला मित्र माधवन याच्या बरोबर नशापाणी करत "अ‍ॅड्रेसच्या वेळी काय गंमत केली" याचे वर्णन करतो तर त्याच वेळी कॉलेजमधील स्कॉलर समजला जाणारा "बकरा" बनलेला संतापी ओम तितकीच नशा करून त्यांच्या अंगावर चाल करून येतो, असे दाखविले आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या हे काय लक्षात आले नसेल का की एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये दारू पीत बसलेले विद्यार्थी दाखविणारा हा सीन आहे तर तो ठेवावा की कापावा? पण ज्याअर्थी त्याला धक्का लावलेला नाही त्यावरून शासनानेदेखील हॉस्टेलमधील अशा गोष्टी "कॉमन" म्हणून स्वीकारल्या आहेत.

मिसळभोक्ता's picture

3 Aug 2010 - 1:47 am | मिसळभोक्ता

"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

"मग दारू पीत चला" हे सांगितले नाहीत चंद्रकिरणांना ?

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 10:56 am | इन्द्र्राज पवार

वेल... अजून तरी त्यांना सोमरसाची गरज भासलेली नाही, शिवाय मी त्यातला नसल्याने असला आगाऊ सल्ला देवून त्यांच्या आनंदावर विरजण घालणे हे देखील माझ्या स्वभावात नाही. असो.

शिल्पा ब's picture

3 Aug 2010 - 10:58 am | शिल्पा ब

इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती...

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 12:43 pm | इन्द्र्राज पवार

"इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती..."

शिल्पाताई, असू दे. खूप विस्ताराने लिहायला हा काही वैचारिक विषय नक्कीच नाही, आणि ही बाब श्री.मिभोदेखील मान्य करतील. सहज कॅन्टीनमध्ये फावल्या वेळेत गंभीर न होता चर्चेला घ्यावा असा हा विषय.

(शक्य झाल्यास श्री.मुक्तसुनीत यांनी आताच प्रस्तुत केलेला "मुलांच्या शिक्षणाचा" धागा पहा, तो खरा विस्ताराने लिहायचा विषय.)

इन्द्र

सेन्सॉर बोर्डाच्या हे काय लक्षात आले नसेल का की एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये दारू पीत बसलेले विद्यार्थी दाखविणारा हा सीन आहे तर तो ठेवावा की कापावा? पण ज्याअर्थी त्याला धक्का लावलेला नाही त्यावरून शासनानेदेखील हॉस्टेलमधील अशा गोष्टी "कॉमन" म्हणून स्वीकारल्या आहेत.

सेन्सॉर बोर्ड /शासनानेदेखील ..

फारच गुळमुळीत लोकं आहे हो ही..त्याना सगळं चालतं..मर्डर मधील उत्तान सिन पेक्षा दारु पितांना दाखविणे म्हणजे फारच साधी घटना.

आम्ही पण कालेजात असताना वर्गातील मुलामुलींबरोबर एका वर्गमित्राच्या एका ग्रामीण भागातील फार्म हाऊस वर गेलो होतो...पार्टीसाठी आणि रहाण्यासाठी. लई गोंधळ घातला. नाचणे, (पिणे माफक प्रमाणात होते कारण पिण्यावर पैसे घालवायला तेव्हा नोकर्‍या नव्हत्या लागलेल्या कोणाला) पण न पिता पण गोंधळ मात्र तेवढाच. बार्बेक्यू केला, गाणी , गप्पा झाल्या मुले मुली गाण्याच्या तालावर बेफाम नाचली.
पण कोणाची तक्रार वगैरे आली नाही. कारण आमचा ग्रूप छोटाच होता. (२० एक जण असतील) आणि आजूबाजूची घरे लांब लांब अंतरावर होती. (तरी आम्हाला तो एवढा मोठा बंगला माणसांनी भरुन गेल्यासारखा वाटत होता. )
आता इथे ३००-४०० मुले म्हणजे त्या सर्वाचा केवढा आवाज असेल. सेलिब्रेशन करायला आक्षेप नाही पण मुलांनीही थोडे तारतम्य बाळगायला हवे. एवढा मोठा ग्रूप एका बंगल्यात जमा झाल्यास जागा तर अपुरी पडली असेलच आणि आवाजाची पातळी ही किती वाढली असेल. शिवाय आजूबाजूच्या लोकांना गाड्यांच्या पार्किंगचा ही त्रास झाला असेल. बंगला म्हणजे रेसिडेन्शियल भाग असणार्..तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध नसणारच.

' हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते....विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले.' ही लेखातील वाक्ये मात्र अतिरंजीत वाटतात.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 4:57 am | आमोद शिंदे

पक्या ह्यांच्याशी सहमत आहे. त्या निमित्ताने पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या बाजूने समर्थन करणार्‍या पुनेरी वगैरे सदस्यांनी थोडे आत्मपरिक्षण करावे. थोडीफार शिस्त मोडून सगळ्यांनीच कधी ना कधी दंगा केला आहे. हा दंगा दुसर्‍याला त्रास होण्याइतपत असल्यास नक्कीच विरोध आहे पण विरोध हा फक्त त्या त्रासाला आहे. आणि हा त्रास कशानेही होऊ शकतो. उगाच मुली, दारू, परप्रांतिय वगैरे गोष्टी बातमीला मसाला लावण्यासाठी घातलेल्या आहेत. असल्या सवंग पत्रकारांचे समर्थन अजिबात करू नये. परप्रांतिय मुलिंनी एकत्र येऊन दुसर्‍याला त्रास न देता दारू पिण्यास तुमची आडकाठी आहे का?

एखाद्याने गणपतीची गाणी वाजवून डोके उठवले तर त्यात गणपतीचा काय दोष?

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 10:52 am | इन्द्र्राज पवार

एखाद्याने गणपतीची गाणी वाजवून डोके उठवले तर त्यात गणपतीचा काय दोष?

+ बिनतोड दाखला, त्यामुळे श्री.पक्या आणि श्री.शिंदे यांच्या भूमिकेशी सहमत. अशा पार्ट्यांनी जणू काही महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली अशी जी ओरड काही महानुभव करीत आहेत त्यापेक्षा नवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या कल्लोळाबद्दल विचार करावा.

विद्यार्थी विश्व काय, कार्पोरेट जगत काय....असले पार्टी प्रकार राज्यात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू असतातच. फक्त एका ठिकाणी अतिरेक झाला म्हणून तो सर्वत्रच होतो असे समजण्याचे काही कारण नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2010 - 2:09 pm | llपुण्याचे पेशवेll

अशा पार्ट्यांनी जणू काही महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली अशी जी ओरड काही महानुभव करीत आहेत त्यापेक्षा नवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या कल्लोळाबद्दल विचार करावा.

कुठलीही गोष्ट एकाएकी घडत असते. वर जे घडले आहे ती सुरुवात मानली तर "महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली" हि गोष्ट घडायला वेळ लागणार नाही हे ही लक्षात घ्यावं . जरी एकच प्याला असला तरी ती अजून वाईट परिस्थिती येण्याची सुरुवात असू शकते.

विद्यार्थी विश्व काय, कार्पोरेट जगत काय....असले पार्टी प्रकार राज्यात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू असतातच. फक्त एका ठिकाणी अतिरेक झाला म्हणून तो सर्वत्रच होतो असे समजण्याचे काही कारण नाही.
माझ्यामते सर्वत्र असे घडत आहे असे कोणी म्हटल्याचे मला तरी दिसत नाहीये, जरी तसे घडत असले तरी.

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 2:37 pm | इन्द्र्राज पवार

मान्य !.... नीट आणि योग्य प्रमाणभूत प्रतिसाद कसे द्यावेत हे श्री.पुण्याचे पेशवे यांच्याकडून शिकावे. धन्यवाद.
"त्या" संदर्भात तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत कसलाही मतभेद असण्याचे कारण नाही, नव्हे होऊच शकत नाही. समाजात आणि समाजाने ज्या चालिरिती निषिद्ध मानल्या आहेत त्यामागील भूमिका ही समाजस्वास्थ्याचीच असते. पण प्रत्येक वेळेला आकाश गडगडले म्हणजे प्रलय झाला, पृथ्वी आता बुडणार अशी गृहितके धरून चाललो तर जीवन अस्थिरच होऊन जाईल.

निव्वळ दाढीमिशा आहेत म्हणून प्रत्येकाला आपण स्वामी रामदेव बाबा मानत नाही, तद्वतच ताणतणाव हलका करण्यासाठी (असे होते असे समजले जाते) एखाद्याने एखादे दिवशी एकदोन पेग घेतले म्हणून त्याला सुधाकराच्या चेम्बरमध्ये बसवावे असेही नाही.

ज्या काही टोकाच्या भूमिका असतील तर ती करणार्‍या गटाविरूद्ध पाऊल उचलले पाहिजेच असे मी मानतो. ही बाब केवळ द्राक्षाच्या रसायनापासून येणार्‍या 'नशे' शी लागू नसून अन्यत्रही लावावी. मनसेने "उत्तर भारतीय" कामगाराविरूद्ध घेतलेला पवित्रा आणि त्यावर झालेले कंदन हाही नशेचाच भाग ना? [मनसेच्या या भूमिकेविरुद्ध मी व माझ्या समविचारी मित्रांनी शहरात मोर्चा काढला होता (पत्रक नव्हे) आणि त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले होते. असो; हे अवांतर आहे,]

इन्द्रा

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2010 - 3:45 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रथमतः मला कुठलीही गोष्ट एकाएकी घडत नसते असं म्हणायचं होतं. माझ्या वरच्या प्रतिसादात नजरचुकीमुळे ते एकाएकी घडत असतं असं लिहीलं आहे.

पण प्रत्येक वेळेला आकाश गडगडले म्हणजे प्रलय झाला, पृथ्वी आता बुडणार अशी गृहितके धरून चाललो तर जीवन अस्थिरच होऊन जाईल.
मग प्रिव्हेंटीव्ह मेजर्स किंवा संरक्षणात्मक कारवाई याला काहीच अर्थ उरत नाही. प्रत्येक वेळेला आकाश गडगडू शकतं तेव्हा आपल्या इमारतीवर वीज पडू शकते म्हणूनच लोक आपल्या इमारतीवर लोखंडी शिग लाऊन ती ग्राऊंड करतात ना!

तद्वतच ताणतणाव हलका करण्यासाठी (असे होते असे समजले जाते) एखाद्याने एखादे दिवशी एकदोन पेग घेतले म्हणून त्याला सुधाकराच्या चेम्बरमध्ये बसवावे असेही नाही.
१-२ पेग बारमधे बसून घ्यायला किंवा स्ततःच्या घरी घ्यायला कोणीही (म्हणजे मी किंवा ते गावकरी) विरोध केला असे मला वाटत नाही.

ज्या काही टोकाच्या भूमिका असतील तर ती करणार्‍या गटाविरूद्ध पाऊल उचलले पाहिजेच असे मी मानतो. ही बाब केवळ द्राक्षाच्या रसायनापासून येणार्‍या 'नशे' शी लागू नसून अन्यत्रही लावावी. मनसेने "उत्तर भारतीय" कामगाराविरूद्ध घेतलेला पवित्रा आणि त्यावर झालेले कंदन हाही नशेचाच भाग ना?
आपण किती निष्पक्षपाती विचार करतो, आपण किती उदारमतवादी आहोत हे दाखवणे ही देखील एक मोठी नशाच आहे. मग तिथेही कायद्यांचा विसर पडून केवळ उदारमतवादावर भर सुरु होतो. आणि ते आंदोलन कुठल्या भागात रुजले वाढले याचाही विचार होत नाही. ना तिथल्या परिस्थितीची माहीती घेतली जाते.

[मी आणि माझ्या समविचारी मित्रांनी मनसेच्या आंदोलनाविरुद्ध आमच्या ऑफिसमधे बोलणारी मराठी , अमराठी तोंडे सडेतोड प्रतिवादाने बंद केली होती. आंदोलनामागची भूमिका समजावून दिली होती. पुढे जाऊन तुम्ही कोणीही अमराठी मराठीत बोलत नाही , मराठी समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि २ मराठी माणसे मराठीत बोलायला लागली तर हिंदीत बोला आम्हाला समजत नाही असे उर्मटपणाने म्हणता आणि ते लोक ऐकतात याचा अनेक मराठी लोकांना राग येतो हेही सांगितले. हे अती झाले तर जे बाहेर झाले ते आतही होऊ शकते त्यामुळे त्यांना 'असो. बदला' असेही म्हटले होते. ]

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 6:22 pm | इन्द्र्राज पवार

"आपण किती निष्पक्षपाती विचार करतो, आपण किती उदारमतवादी आहोत हे दाखवणे ही देखील एक मोठी नशाच आहे. मग तिथेही कायद्यांचा विसर पडून केवळ उदारमतवादावर भर सुरु होतो."

नाही.... या नशेचा मी बळी झालेलो नाही कारण माझी "स्टुडंट युनियन"शी जवळीक ही कुठल्या आंदोलनाशी वा राजकारणाशी संबंधीत अशी नव्हती. कॉ.गोविंद पानसरे, भा.क.प. व लाल निशाण, यांनी "मनसे" च्या घटनाबाह्य आंदोलनाला घटना तरतूदीनुसार उत्तर देणे गरजेचे आहे असे सर्वव्यापी आवाहन केल्यानंतर ज्या ९ स्थानिक संघटनांनी ती ("घटनेने दिलेले हक्क") भूमिका पटली म्हणून मोर्चात सहभागी व्हायचे ठरविले त्यात आमच्या युनि.संघटनेचा सहभाग होता. आणि एक महत्वाची बाब म्हणजे "मराठी" बाबत श्री.राज ठाकरे यांचा ठामपणा तितक्याच तत्परतेने आम्ही मान्य केला होता त्याला कारण आपल्या भाषेबद्दलची अस्मिता. मुंबई-ठाणे-पुणे पट्ट्यात 'मराठी कि हिंदी' हा वाद जितक्या तीव्रतेने सामोरा आला आहे तशी स्थिती कोल्हापुरात नाही. इथे जे आंतरराज्य कामगार आहेत ते कामचलाऊ मराठी शिकलेले असेच आहेत आणि स्थानिक लोकांशी अगदी सहजरित्या मिळूनमिसळून वागतात (यात बिहारी मुसलमानदेखील आहेत.)

जाता जाता हेही आपणास सांगतो की मी दिल्ली इथे असतो म्हणून श्री.राज ठाकरे यांच्या "महाराष्ट्र हा मराठी लोकांसाठी" या भूमिकेला विरोध करतोय असे कृपया समजू नका. माझी ती भूमिका अजून कोल्हापुरात होतो त्यावेळेपासूनची आहे. "बिहार" बद्दल मला जास्त माहिती नाही पण दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात खरोखरी एकमेकाशी भ्रातृभावाने वागण्याची रित आहे. सुरुवातीला माझे हिंदी ऐकणार्‍याच्या अंगावर काटा आणत असे, पण मला कुणी हसले नाही. इंग्लिश फक्त ट्रेनिंग सेंटर वा कामाच्या ठिकाणी ठीक असते पण राजधानीत हिंदी, उर्दु, पंजाबीचाच दबदबा आहे. मी महाराष्ट्रातील तसेच माझे दोन मित्र केरळातील म्हणून या लोकांबरोबर वावरताना ते आम्हाला आपल्यातीलच मानतात (गुरुदासपूर, पंजाबमध्ये तर तेथील मित्राच्या घरी माझे "ओये आओ मेरे मराठा लाईट इन्फ्न्ट्री के सरदार" असे आरोळीयुक्त स्वागत झाले होते). काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत "अखंड हिंदुस्थान" ही संकल्पना मानणारे खूप भेटतात, दुर्दैवाने मूठभर राजकारण्यांच्या लबाड हितासाठी "प्रांतवाद, भाषावाद" ही शस्त्रे वेळोवेळी उगारली जातात.
इतकेच !
इन्द्रा

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 2:02 pm | प्रसन्न केसकर

सेंसॉर्ड वर्णन आहे. जो प्रकार झाला तो किळसवाणा तर होताच पण बेकायदा पण होता. विद्यार्थिनींचा समावेश, महिलांचे मद्यप्राशन याबाबत काल काही लोकांशी चर्चा झाली. अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस च्या एका काउंसेलरचे म्हणणे होते की दारु स्त्री-पुरुष यापैकी कुणीच पिऊ नये अन व्यसन तर अजुनच घातक. जर अश्या सामाजिक बंधनांमुळे समाजाचा पन्नास टक्के हिस्सा मद्यप्राशनापासुन लांब रहात असेल तर ते स्वागतार्हच आहे. गेली जवळपास तीन वर्षे स्त्रीमुक्तीवादी चळवळीचे नेतृत्व करणारी एक विदुषी म्हणाली अंमली किंवा मादक पदार्थांचे सेवन म्हणजे स्त्रीमुक्ती असे समजले जाणार असेल तर आम्ही जे केले ते चुकीचेच होते असे वाटते.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2010 - 2:10 pm | llपुण्याचे पेशवेll

याच्याकडे कोणाचे लक्ष गेल्याचे दिसत नाहीये.

किंवा लक्ष जाणे सोईस्कर नसेल म्हणुन दिले नसेल.

शेवटी काय ते व्यक्तिस्वातंत्र्य का काय असते ना... तेच खरे. नाही का ? असो.

पाषाणभेद's picture

3 Aug 2010 - 8:13 am | पाषाणभेद

व्हिडीओ पाहून घ्या उडून जायच्या आधी.
http://www.youtube.com/watch?v=TkYlvUsl4dA
अन हा फटू दै. सकाळमधला. स्विमींग टँक च्या बाजूचा दिसतूया.
daily sakal photo

आमा गाववाल्यांना काय बी कळत नाय पगा. आता ह्ये समदे ऐमबीए वाले इद्यार्थी हायती म्हंजे लय मोटे सायब व्हतील तवा त्यांच्यावालं बराबर आसंल. गाववाल्यांनी गावागावात असली एखांदी जागा पार्टीसाठी कराया हवी. मस्त भाडं भेटलं आन सगळ्या सोई पुरवन्यामुळं पैशाची दळणवळन बी वाढल. बंद भिंताडाच्या मधी आसली पार्टी नको. समदं कसं उघड्याव झालं म्हंजी आमची गावातली प्वारं बी सामील व्हतील त्यात. आमच्या पोरीबाळी बाया यांना बी मजा पाह्यला भेटलं.
त्येच त्ये टिव्हीवरच्या शिरीयल पाहूनशान त्वांड आंबून ग्येलं हाय पगा.

Pain's picture

3 Aug 2010 - 11:57 am | Pain

व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.

यात कुठेही ते लोक धिंगाणा करताना, हुल्लड किंवा ओरडताना दिसत नाहीत.

दारू पिणे वाईट आहे तर मग इथे मिपावरच कित्येक जण त्याचे उदातीकरण, गौरवीकरण करताना दिसतात, निरनिराळ्या पाककृती (cocktails) सादर होतात त्याचे काय ? हल्ली वाईट गोष्टींना समाजमान्यता मिळालेली आहे आणि लोकशाही असल्याने काहीच करता येत नाही.

स्त्रियांच्या सहभागाबद्दल आक्षेप घेण्यालाच स्त्रीवाद्यांचा आक्षेप आहे.

गुन्हेगारी आणि व्यसनांमधला स्त्रियांचा सहभाग पुरुषांपेक्षा पूर्वीही कमी होता आणि आताही परिस्थिती फार बदललेली नाहीये.
उदा. उभी बाटली- आडवी बाटली: गावांमधे व्यसनाधीन पुरुष आणि त्यामुळे कुटुंबाची होणारी वाताहत टाळण्याकरता दारूबंदी करण्यात स्त्रियांचा पुढाकार असतो. एक तरी अशी घटना आहे का जिथे पुरुषांनी स्त्रियांविरुद्ध ही मोहीम आखली ?
ही वस्तुस्थिती पाहता एखाद्या समाजगटाकडून (स्त्रिया) चांगल्या अपेक्षा ठेवणे वाईट/बुरसटलेले कसे काय :O त्यामुळेच कोणत्याहे गुन्ह्यात वा अप्रिय गोष्टींमधे जेव्हा स्त्रियांचा सहभाग असतो तेव्हा तो बहुसंख्य लोकांना आश्चर्यचकित करतो.

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 1:28 pm | इन्द्र्राज पवार

"दारू पिणे वाईट आहे तर मग इथे मिपावरच कित्येक जण त्याचे उदातीकरण, गौरवीकरण करताना दिसतात,"

श्री. पेन ~ प्लीज, प्रतिसादांतील वाक्यावरून मी कुठे तुम्हाला दारु पिण्याचे 'उदातीकरण, गौरवीकरण' करत असल्याचे दिसले हे मी आता विचारत नाही कारण माझी तशी भूमिका नक्कीच नाही, अन्य कुणाचीही असेल असे वाटत नाही. दारू पिणे ही समाजाला घातक आहे हे आधुनिक काळात अगदी गडकर्‍यांच्या सुधाकरापासून सांगण्यात आले आहे, अन ते चुकीचेही नाही; कारण काळाच्या ओघात त्यापुढे कित्येक घाणेकर, दुभाषी, निकते त्याच रस्त्याने अस्तंगत झाले. "दारू पिणे" ही संज्ञा "सातत्याने" घेणार्‍याला लावल्यास तिचा योग्य उपयोग होतो. कार्पोरेट जगात, पोस्ट-ग्रॅज्युएशन शि़क्षण जगतात पार्टीच्या वेळी अशा पद्धतीची एखादी संध्याकाळ संबंधितांनी व्यतीत केली म्हणजे ते समाजविघातक कृत्य ठरू नये.

आता "थेऊर" ची रात्र तिथेच संपुष्टात आली; पण उद्या त्यातील काही विद्यार्थी भर वर्गात नशा करून आली तर त्यांना चाबकाने फोडलेच पाहिजे.

Pain's picture

3 Aug 2010 - 11:32 pm | Pain

तुमचा गैरसमज होतोय. माझा प्रतिसाद तुम्हाला नाही.
तुमच्या कुठल्याच प्रतिसादावरून मी हा निष्कर्ष काढलेला नाही. किंवा या धाग्याचाही संदर्भ धरलेला नाही.

मी जेव्हापासून सभासद झालोय तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या प्रसंगी इथले काही लोक ते करताना आढळले आहेत. ते सर्व अट्टल दारुडे नसले आणि नियंत्रणात पीत असले ( दोन्हीही त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यात येते) तरिही दारू म्हणजे सेलिब्रेशन, पार्टीची शान, चैनीची परमावधी असा संदेश जातो, लोकमानसात रूढ होतो.
आनंदाच्या तसेच दु:खाच्या उदा. चित्रपट, मालि़कांमधे प्रेमभंग झाला--> घे दारू, धंदा बुडाला--> घे दारू, टेन्शन आले--> ओढ सिगरेट असे न चुकता चालू असते. या संकल्पनेला माझा विरोध आहे.

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 11:45 pm | इन्द्र्राज पवार

तुमच्या संकल्पनेला विरोध कुणाचाच असणे शक्य नाही. अखेरीस आपण सर्वजण समाजप्रियच नागरिक आहोत आणि त्या अनुषंगाने विचारधारणादेखील राखतो. माझा मुद्दा "असल्या सनसनाटी बातमीतून/धाडीतून काहीही निष्पन्न होत नाही" हा होता. ज्या पत्रकारांने ती भडक बातमी लिहिली "४००-५०० मुलेमुली दारू पिऊन धिंगाणा घालत होती....परप्रांतीय होते...." इ. इ. त्यामुळे खरे तर हा धागा निर्माण झाला.

आपण इकडे तीव्र भावना व्यक्त करणारे विचार मांडून बी.पी. वाढवून घेत होतो, तर तिकडे पोलिसांनी सायंकाळी मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केला.....४५० पैकी फक्त ८१ मुले मद्यप्राशन केलेली सापडली. म्हणजेच सुमारे ७५% सहभागी केवळ "फ्रेंडशिप डे" ची पार्टी म्हणून तीत सामील झाले होते असेच ना? काही स्थानिक तरूण मंडळाला तीत सामील करून घेतले असते तर पार्टीबाबतची एक मुंगीदेखील पुण्यापर्यंत आली नसती.

म.टा.सारखे पत्र बातमी देताना मजकूर संपादनाला महत्व देत नाही यामुळेच ही राळ उडते.

असो. विसरून जाऊ या हा धागा.

इन्द्र

प्रसन्न केसकर's picture

4 Aug 2010 - 3:33 pm | प्रसन्न केसकर

हाहाहा!
तुम्ही होतात वाटते तिथे, प्रत्यक्ष परिस्थिती पहायला!

४५० पैकी फक्त ८१ मुले मद्यप्राशन केलेली सापडली. म्हणजेच सुमारे ७५% सहभागी केवळ "फ्रेंडशिप डे" ची पार्टी म्हणून तीत सामील झाले होते असेच ना?

नाही सगळेच अथर्वशीर्ष म्हणुन गणपतीला महाअभिषेक करत होते! त्या ग्रामस्थांनी गणपतीला अभिषेक करतात काय लेकाचे म्हणुन अन पोलिसांनी दोन पैसे मिळतील या आशेने बिच्चार्‍या `निर्दोष, निष्पाप, निरपराध, गुणी' बाळांना खोट्या प्रकरणात अडकवले.

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 2:04 pm | प्रसन्न केसकर

यात कुठेही ते लोक धिंगाणा करताना, हुल्लड किंवा ओरडताना दिसत नाहीत.

व्हिडीओ पार्टीचा नाही तर वैद्यकीय तपासण्या सुरु असतानाचे आहेत. पार्टीतली दृष्ये इथे किंवा कुठेच दाखवणे कदाचित सभ्यतेला धरुन होणार नाही.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 11:00 pm | आमोद शिंदे

बरोबर आहे. पाषाणभेद ह्यांनी हा विडीयो इथे देण्याचे काय कारण ते समजले नाही.

पाषाणभेद's picture

4 Aug 2010 - 4:41 am | पाषाणभेद

आमी कुठं व्हिडीयो दिला? आमी तर तेथील पाण्यात पवनार्‍या मुलींना थंडी बिंडी वाजती का म्हून कांबळं घोंगडी घ्येवूनशान उभं व्हतो. पुरावा पायजे आसलं तर गाववाले संगती व्हते आमच्या.

आमी तर केवळ सकाळच्या व्हिडीओची लिंक दिली. काये, येथील वाचक त्या दिसाच्या सकाळपर्यंत कशे काय पोचू शकतील? त्येंला लिंक गावल का नंतर म्हूनशान आमी सोयपानी करून दिली.

आमी गाववाल्यांनी ठराव करायचं ठरवलं हाये. आमी जकात फाडायसारकी पावती फाडनार हाय आसल्या काय पार्टीसाठी. त्येंनी मातूर आमच्यावालं डीजे, केटरर्स, लायटींग बारची सोयपानी घ्येतलं पायजे. आमच्या गावातल्या पोरांनाबी नाचासाठी बलवलं पायजे. बाजूला आमी सर्कसमदी लावत्यात तशी गॅलरी लावू म्हंजे त्याच्याव आमच्या गावातल्या पोरीबाळी बायाबाप्ये, म्हातारं बसत्याल. लय भारी करमनूक व्हयील. सरकारचा करमनूक कर बी आमी भरू. समद कसं येळवारी आन कायद्यानं व्हया पाह्यजे का नगो? आता सर्कार एवढं दारू ची सोय करूं र्‍हायलंय त्याचा खप व्हाया नगो का? सर्कार एवढं ऐम्बीए कॉलेज काढूंशान एवढे सायेब लोकं तयार करूं र्‍हायलेय त्येंची करमनूक नगो का? सर्कार एवढ्या कालेजांना परवानंगी देवू र्‍हायलेय त्या कालेजांची सोयपानी पहाया नगं? कुठूं कुठूं पोरं पोरी येत्यात शिकाया म्हाईत हाये का तुमाला त्या शिंबायशीस कालेजात! आवो उत्तरप्रदेस, बिहार, हरीयाना झालंच तर झारखंड, वोरीसा अरूनाचल प्रदेस. आवं दक्षीन आफरीका, आमेरीगा आसल्या देशातनं बी पोरं पोरी येत्यात तिथं. त्यांच्यावाली सोय पाह्यनं म्हंजे पाव्हन्यांचा मान राकन्यासार्क हाये. तवा त्येंला जे जे लागलं त्ये त्ये आमी देवू. त्यातच आमचं आन आमच्या बांधवांचं हित हाये. जय हिंद. जय म्हाराष्ट्र.

Pain's picture

3 Aug 2010 - 11:40 pm | Pain

मान्य आहे.

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2010 - 9:00 am | अप्पा जोगळेकर

इंद्रराज पवार आणि पार्टी समर्थक यांचे सगळे प्रतिसाद ++.

पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे.

आपुण बी ह्या वीकांताला मित्राच्या खाजगी फार्म हाउस वर पिणे पार्टी करणार है. तसल्या (म्हणजे माडीवाल्या टाईप) गोष्टी करण्याची खूप इच्छा आहे. पण काही ज्येष्ठ मंडळी हजर राहणार असल्याने आखडता घेतला आहे. तरी कोणाची परवानगी काढावी लागेल ?

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 2:08 pm | प्रसन्न केसकर

पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे.

संपुर्ण चुकीची माहिती. कारवाई पुणे शहरातही झालेली नाही किंवा पुणे शहर पोलिसांनीही केलेली नाही. थेऊर पुण्यापासुन तीस किमी दुर आहे. ते पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत नाही. कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांनी केली. मध्यंतरी आरोप झाले होते ते शहर पोलिसांबद्दल, ग्रामीण पोलिसांबद्दल नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसांवर असा दबाव असणे संभवत नाही.

चिरोटा's picture

3 Aug 2010 - 11:29 am | चिरोटा

पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे.

सहमत आहे. अशा गोष्टींना प्रसिद्धी पटकन मिळते आणि स्थानिकांना पण 'पैसेवाल्यांना लाईनीवर' आणल्याचे समाधान मिळते.स्थानिक लोकांना खरोखरच त्रास झाला असेल तर कारवाई योग्य आहे पण बातम्यांचा रोख स्थानिक लोक सोवळे आणि परप्रांतिय मग्र्रुर असा आहे तो चुकिचा आहे.
एवढीच सोवळेपणाची आवड आहे तर अनेक बेकायदेशीर धंदे(वेश्याव्यवसाय वगैरे) बिनदिक्कत चालु असतात त्यावर बंदी घाला की.
---

कवितानागेश's picture

4 Aug 2010 - 9:29 am | कवितानागेश

दारु पिण्याबद्दल इतका आकस का?
हल्लीचे एक जग्प्रसिद्ध वाक्य आहे, " वाईन हा एक पोषक आहार आहे!"

.......................विद्यार्थ्याना पोष्टिक आहार द्यावा!

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Aug 2010 - 1:24 pm | llपुण्याचे पेशवेll

विद्यार्थ्याना पोष्टिक आहार द्यावा!

चला बालवाडीपासून सुरुवात करूया. :)