मळ्यातली सहल

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
29 Jul 2010 - 6:25 am

मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्‍याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.

आपल्यासाठी काही छायाचित्रे:


मळ्यातले घर


"माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलाय लळा"- यांच्याच ताज्या दुधाचा चहा घेतला


"कोंबडी शेळी बकरं मेंढरं
तसच पाळीतो मी रानपाखरं
गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं" (माझ्या जमीनीचं गाणं)

शेती उपयोगी जनावरे कपिला गाय, राजा व सर्जा बैल


"गाय वासरू - .... नका विसरू!"


"हिच्यामंदी करीतो मी जोंधळा
लावीतो कधिमधी हरभरा
पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर "

८ तुकडे बाजरी लावलेली आहे. मी गेलो तेव्हा निंदणी चालू होती.


बांधावरून फिरतांना राणी कुत्री आमच्या बरोबर आली.


या कुत्रीला माणसांचा फार लळा होता. फोटोसाठी खास पोज दिली तिनं!


हे गावीत काका. हे शेतातच राहतात अन देखभाल करतात. मिरचीला नुकतेच खत टाकलेले होते. त्याची पाहणी चालू आहे.


"एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास" - जनावरांसाठी लावलेला घास


हे मिरचीच्या वावराचे तुकडे. मी गेलो तेव्हा २ हप्ते काढलेले होते.


मिरचीची रोपे


हे आणखी वेगळे रोप मिरचीचे. ही तिखट जातीची अन मोठ्या आकाराची मिरची होती.


गावित काकांनी मग वानोळा घेवून जाण्यासाठी इतक्या मिरच्या तोडल्या की माझ्या मोटरसायकलची डिक्की तर भरूनच गेली. शेवटी मीच काही मिरच्या कमी केल्या.

नंतर गाईचे दुध काढतांना उशीर झाला. अंधारायला आलेले होते. पावसाचे वातावरण असल्याने मी मग घाईघाईने शेतातून निघालो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

पक्या's picture

29 Jul 2010 - 7:30 am | पक्या

छान लेख.
फोटोज ही मस्त. मिरचीच्या रोपांचा फोटो मस्त वाटला.
मध्ये मध्ये गांण्याच्या ओळी टाकल्या आहेत त्याही चपखल बसल्या आहेत.

शुचि's picture

29 Jul 2010 - 7:37 am | शुचि

असेच म्हणते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 7:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मळा मस्तच....!

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

29 Jul 2010 - 7:39 am | शिल्पा ब

मस्त...खूपच आवडले फोटो...एकदम गावाला गेल्यासारखं वाटलं...शेत पाहूनही किती काळ झाला...

नितिन थत्ते's picture

29 Jul 2010 - 7:44 am | नितिन थत्ते

वा. छान फोटो.

(पाषाणभेद यांच्याकडून बर्‍याच काळाने गद्य लेखन पहायला मिळाले)

बद्दु's picture

29 Jul 2010 - 10:51 am | बद्दु

मळा पाहुन हिरवेगार वाटले..

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

29 Jul 2010 - 12:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....मला माझ्या मळ्याची आठवण आली..
अगदी असाच.....छान हिरवा गार,२ मोठ्ठ्या विहिरी.....मोठ्ठा गोठा....
आणि भरपूर ऊस........
..... आणि झाडवरच्या मिरच्या पाहुन .... मस्त खर्डा -भाकरी ची आठवण आली..
....त्या झाडावरुन तोड्लेल्या मिरच्या + भरपूर लसुण् + भरपूर कोथिंबीर + चवीपुरते मीठ = मस्त खर्डा (पुणेकर ज्याला ठेचा म्हणतात)

...गरम गरम चुलीवरची ...टम्म फुगलेली भाकरी....वर ताज्या ताज्या लोण्याचा गोळा ...आणि झणझणित खर्डा...
....... अक्षरशः सू...........ख ....
...काय राव्... चतुर्थी दिवशी अश्या जिवघेण्या चवीची आठवण करुन देता...
>>>. बाकी मळा छान आहे हं....... झकास....!

वेताळ's picture

29 Jul 2010 - 12:09 pm | वेताळ

मळा एकदम मस्त आगे. रात्रीची प्यार्टी करायला एकदम मस्त जागा आहे.पण हे शेत कोणत्या भागातले आहे? म्हणजे कोणता जिल्हा?

मामाच गाव कोणत ते नाहि लिहिल

माझ्या मामाच घर तर शेतातच आहे, गेल्यावर परत येउ वाटत नाहि

फोटो छान, मिरचीचे झाड मस्तच

पाषाणभेद's picture

20 Sep 2010 - 8:51 am | पाषाणभेद

मामाच्या गावाचं नाव आहे ठेंगोडे (ता. सटाणा, जि. नाशिक) http://wikimapia.org/410494/girna-pul-thengoda">मॅप बघा:

झक्कास रे पाषाणा.
माझे लहान असतानाचे शेत आठवले.
आजी असे पर्यंत शेत कस हसतं खेळतं होत. गोठा गाई गुरांनी भरलेला होता.

मजुरी वाढलेली . वीज पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतातुन पुरेस उत्पंन येत नाही.
मुलही शिकायला लागली. नोकरीपेशा झाली.

आता अख्ख गावच हळुहळु बदलतेय :(

खल्लास फोटो !
गावा कडची मजा च काही वेगळी.. हिरवगार शेत अन गाय वासरुने भरलेला गोठा ..

बाकी पाषाण भाऊ तुम्ही खुप भाग्यवान आहात

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात,
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवित ...
दादाच्या मळ्यामंदी मोटचं मोठ पाणी ,
पाजिते रान सारे, मायेची वहीनी ..
हसत-डूलत मोत्याच पिक येत,
गुलाब जाई जुई मोगरा फुलवित ..

हे गाण युटुब्स वर पहात होते पण ते सापडले नाही कदाचित firewall मुळे Block असेल :-(
तुम्ही ते शोधून येथे टाकाल का ?

स्पंदना's picture

30 Jul 2010 - 4:23 pm | स्पंदना

झकास! आणी नंबर एक.
छान आठवणी जग्रुत केल्या तुम्ही.
बाकि गणपा म्हणतात ते ही खरच अजुन पाहिजे तस शेतीच सुधरिकीकरण न झाल्यान हल्ली तरुण पिढी बेकार फिरेल पण शेतात जायला तयार नाही.

चित्रा's picture

31 Jul 2010 - 4:55 am | चित्रा

गाव कुठचं हो? मागचा डोंगर ओळखीचा वाटतो.

लिहीले छानच आहे. फोटोही सुंदर.

पाषाणभेद's picture

20 Sep 2010 - 8:52 am | पाषाणभेद

मामाच्या गावाचं नाव आहे ठेंगोडे (ता. सटाणा, जि. नाशिक) http://wikimapia.org/410494/girna-pul-thengoda">मॅप बघा: