आम्ही कोण?

मिसळपाव .कॉम हे संकेतस्थळ मराठीवर प्रेम करणार्‍या लोकांसाठी एक मोकळं ढाकळं संकेतस्थळ असावं या प्रेरणेतून तयार झालेलं आहे. मराठीतून व्यक्त होण्याची आपली गरज मिसळपाव संकेतस्थळाला अस्तीत्वात आणण्यापासून ते आज एवढ्या पल्ल्यावर आणायला कारणीभूत झालेली आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या सामाजीक आणि ऐतिहासीक वारश्याचा रास्त अभिमान मिसळपावला आहे. मराठी समाजाच्या बहूआयामी व्यक्तिमत्वाचा ठसा मिसळपाववर सुध्दा आहेच. त्यामुळे येथे अनेक वेगवेगळ्या विषयांवर वाचायला मिळेल. तुम्हाला हव्या त्या विषयावर तुम्ही लिहू शकता. केवळ आपल्या समाजात जे जाहीर लिहू किंवा बोलू शकू त्याच विषयांवर आणि तश्याच पातळीवर लेखन किंवा चर्चाकेली जावी हे किमाण बंधन आहे.

मिसळपाव हे संकेतस्थळ उभं झालं ते श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रेरणेतून. त्यांनी हे संकेतस्थळ उभं केलं, अतिशय कष्टांने ते मोठं केलं. मिसळपाव आज एवढं मोठं झालं आहे त्याला तात्यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत आहेत.

श्री तात्या अभ्यंकर मिसळपाववर विसोबा खेचर नावाने लेखन करतात. आज तात्या मिसळपाव हे श्री नीलकांत यांच्याकडे सोपवून मोकळे झालेले आहेत. मात्र मिसळपावच्या कुठल्याही पेच प्रसंगाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडल्यास ते सदैव हजर असतात. आज मिसळपावचे मुख्य सल्लागार म्हणून तात्या आहेत.

(तात्या फोटो)

मिसळपाव हे हौशी संकेतस्थळ असल्यामुळे व्यवस्थापन मंडळ हे आपल्या नियमीत कामानंतर मोकळ्या वेळात हे काम करतात त्यामुळे त्यांच्यावर बंधणे येतात हे लक्षात घ्यावे.

मिसळपाव व्यवस्थापन आणि संपादन मंडळ

१) नीलकांत ( व्यवस्थापक)
२) छोटा डॉन ( संपादक)
३) बिपीन कार्यकर्ते ( संपादक)
४)