फुलांचा राजा

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in कलादालन
26 Jul 2010 - 8:13 pm

मध्यंतरी उटीला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर प्रमुख आकर्षणात बोटॅनिकल गार्डन आणि रोझ गार्डन अश्या २ बागा बघायला सांगण्यात आले. होटेल पासुन बोटॅनिकल गार्डन जवळ असल्यामुळे प्रथम तिथे मोर्चा वळवला आणि वातावरण असे काही सुरेख होते आणि हिरवळ (म्हणजे गवत फक्त) एव्हढी काही अप्रतिम होती कि २-३ तास तिथेच लोळुन काढले. त्यानंतर मित्रांना रोझ गार्ड्न मध्ये जाण्यात फारसा उत्साह नव्हता. पण तिथे गेल्यानंतर रोझ गार्डन चुकवले असते तर केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो ते कळाले. तिथल्या काही गुलाबांची छायाचित्रे:

उटीच्या रोझ गार्डन मध्ये एकुण २८०० प्रकारचे गुलाब आहेत. तरीही आम्हाला ग्रीन रोझ आणि काळा गुलाब नाही बघायला मिळाला. तो खुपच जास्त दुर्मीळ आहे. निवांत बघण्यासाठी रोझ गार्डनला किमान ५ तास लागतील. उटीला कधी गेलात तर रोझ गार्डन खचितच चुकवण्यासारखे नाही.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

>>उटीला कधी गेलात तर रोझ गार्डन खचितच चुकवण्यासारखे नाही.
सहमत.

मृत्युंजया सगेळेच गुलाब एकदम मस्त.
दुसरा फोटो म्हणजे ज्याच नाव ते.
ज ब रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2010 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर....................!

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

26 Jul 2010 - 8:49 pm | यशोधरा

पाचवे प्रकाशचित्र मस्त आलेय!
जांभळा गुलाब पहिल्यांदाच पाहिला. सुरेख आहेत प्रचि.

अरुंधती's picture

26 Jul 2010 - 9:16 pm | अरुंधती

एकापेक्षा एक सरस गुलाब आणि त्यांचे सुंदर रंग! :-) मस्त वाटले पाहून.

-- अरुंधती

स्वाती फडणीस's picture

26 Jul 2010 - 10:07 pm | स्वाती फडणीस

सुंदर..!

जयंत कुलकर्णी's picture

27 Jul 2010 - 10:14 am | जयंत कुलकर्णी

नमस्कार,

एक अनाहूत सल्ला देऊ का?
एवढे चांगले (एकाच विषयाचे) फोटो एका खाली एक एकदम टाकू नयेत व दाखवूही नयेत. त्याची मजा जाते व किंमतही रहात नाही.

पण फोटो मस्त.

जयंत कुलकर्णी.

मृत्युन्जय's picture

27 Jul 2010 - 10:46 am | मृत्युन्जय

धन्यवाद. सल्ला एकदम पटला मला. पुर्णपणे मान्य.

नेहमी आनंदी's picture

27 Jul 2010 - 1:27 pm | नेहमी आनंदी

फारच सुंदर

बद्दु's picture

27 Jul 2010 - 2:42 pm | बद्दु

प्रसन्न वाटले. पिवळा गुलाब माझ्या आवडिचा.... फोटो फारच सुन्दर आला. क्या बात है, वा!

चन्डिगडचे रोझ गार्डन सुद्धा बघण्यासारखे आहे.