मासे १०) खरबी ,कोलंबी

जागु's picture
जागु in पाककृती
23 Jul 2010 - 4:50 pm

खरबी आणि कोलंबी असे पावसाळ्यात वाटे मिळतात. हॅयाच्या कॉम्बिनेशनचे कालवण म्हणजे ह्या दिवसातिल चविष्ट मास्यांमधील एक. ही बहुतेक खाडीतुन मच्छी येते. त्यामुळे अजुन चविष्ट असते.

खरबी इतर छोट्या माश्यांसारखी म्हणजे खवल काढून पोट साफ करुन शेपुट काढायचे. कोलंबीच्या डोक्यावरील तुरा काढावा पुर्ण डोक काढू नये. कारण डोक्याच्याच भागाला जास्त चव असते. व शेपुट आणि मधली शेपटे काढावीत.

साहित्य :

१ वाटा खरबी कोलंबी,
८-१० लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
थोडा चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
थोडी कोथिंबीर,
१ मिरची मोडून
तेल

पाककृती:
प्रथम तेलावर लसणीची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घालुण ढवळून चिंचेचा कोळ, खरबी कोलंबी, मिठ कोथिंबीर व मोडलेली मिरची घालून कालवण उकळू द्यावे. ३-४ मिनीटांनी गॅस बंद करावा.

हिच खरबी कोलंबी मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन तळता येते. कोलंबी तळायला वेळ लागतो. कोलंबी वेगळी तळायला टाकायची.

अधिक टिपा:
कोलंबी तळायची म्हणजे शॅलो फ्राय करायची. ती करत असताना थोडा वेळ झाकण ठेवल वरुन तर लवकर शिजते.
कालवण करत असताना गॅस मिडीयम ठेवायचा नाहीतर खरबी तुटते.

कालवण

प्रतिक्रिया

स्मिता_१३'s picture

23 Jul 2010 - 4:54 pm | स्मिता_१३

टू गुड !!!

जागुताई जिन्दाबाद.

कोळंबी म्हणजे जीव की प्राण ! आता करावीच लागणार.

स्मिता

गणपा's picture

23 Jul 2010 - 5:56 pm | गणपा

वॉव कसली खत्री दिसतेय डिश.
=P~ =P~ =P~ =P~ =P~

चित्रा's picture

24 Jul 2010 - 12:51 am | चित्रा

असेच म्हणते. खतरा दिसते आहे.

सहज's picture

23 Jul 2010 - 6:00 pm | सहज

कालवण छान दिसतयं!

कोळंबी भजी पण भारी लागते.

प्रशु's picture

23 Jul 2010 - 9:01 pm | प्रशु

पाकक्रिया द्या...