अफलातून जाहीराती : फ्रेश एपिसोड (२०१०)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
11 Jul 2010 - 1:55 pm

(१) एक मंत्री खुर्चीवर सर्वानुमते जावून बसतात. पण, अनेक वर्षे झाली तरी खाली येण्याचे नाव घेत नाहीत.
इतर इच्छुक मनातून नाराज असतात.
जनतेला वाटते- "वा! काय सुखी मंत्रिमंडळ आहे ते!"

शेवटी इतर मंत्रीगणांचा रागाचा पारा अनावर होतो.

"खाली या हो आता"

मंत्री खुर्चीसह हवेत तरंगतात व म्हणतात- " खाली न येतो मी, खाली न येतो, खाली न येतो, खाली न येतो मी"

मंत्री मंडळातील एक जण- " जारे! खुपीरिया साबण घेवून ये. यांना आंघोळ घाल मग ताळ्यावर येतील ते"

खुपीरिया साबणाने आंघोळल्यावर मंत्री खाली येतात.

वापरा खुपीरिया साबणः मंत्र्यांचे उच्चपद डोळ्यात "खुपत" असेल तर, खुपीरिया साबण वापरल्यास मंत्री खाली येतात. जमीनीवर येतात. व तुम्हाला संधी मिळते.

(२) एकदा "कभी" हा आपली पत्नी "कॅश" सोबत आंधळा लपंडाव खेळतो. कभी च्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते.

कॅश चालाख असते. ती "कया कच्चन" ला समोर करून लपून बसते.

कभी चुकून तीला पकडतो. "अरे मम्मी तू? माझी सोन्याहून सोनसळी प्रिया कुठे आहे?"

कया : अरे मुर्ख मुला! कधीचे सांगते आहे. "हक्स" साबण वापर. ऐकत नाहीस. वापरला असतास तर ही परिस्थिती आली नसती. "हक्स" च्या वासाने तुझी सोनसळी तू लगेच ओळखली असतीस.

"कमीताभ" तेथे येतो आणि म्हणतो- हक्स वापरा आणि आपले "अक्स" आरशात बघा. आणि व्हा बिंदास बंदा!

(३) एका गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. कित्येक महिने पाउस येत नाही. तेव्हा तेथे "चिरमा" नावाची मुलगी येते.

तीच्या अंगी अद्भुत शक्ती असते बरं का! पाणी अडवण्याची.

तिच्या जवळ एक मंत्र असतो.
" चिरमा, चिरमा चिरमा डिटर्जंट पावडर के झाग ने जादू कर दिया...पानी मे रहके भि ये कम जले...."
मंत्र म्हणतांना पाणी हवेतच थिजते.
मोठमोठे साधू अचंबित होवून होवून समाधिस्थ होतात.

शेवटी तेथे धरण बांधले जाते. केवळ चिरमा डीटर्जंट मुळे.

चिरमा डिटर्जंटः पाणि अडवा. पाणी जिरवा...इतर डिटरजंटची ही जिरवा.

(४) आले आले. अद्भुत मेमरी लॉस गजनी चॉकलेट आले. कसे काय बघाच!

रमेशः " भाऊ एक चॉकलेट द्या."

सुरेशः " भाऊ एक चॉकलेट द्या."

दोघेही "वायू स्टार" चॉकलेट खातात. एकमेकांना विसरतात.

"रमेश?" "सुरेश?" तू इथे?

चॉकलेट खातात.

"रमेश?" "सुरेश?" तू इथे?

आणि दुकानदाराचे पैसे न देता निघून जातात.

कारण "वायू स्टार" गजनी चॉकलट. शंभर टक्के विसराळूपणाची गॅरंटी.

काय मग असे अद्भुत चॉकलेट घ्यायला जरुर विसरा...

(५) "अरे ती.. पाजोल झाडावर लपून बसलीय. काय झाले कळत नाही."

"आमिष दाखवा तीला.."

"कल्केनलिबे घेतेस का? ये खाली?"

"खाली येते मी .."

"पण आधी नाचून दाखव बरं"

ती नाचून दाखवते.

तरीही चॉकलेट ते मर्कट लोक देत नाहीत.

ती धमकावते- "ए! जास्ती शानपणा करु नका हा! तो पेवगण आहे ना, त्याला सांगून देईल्..चांगला बोकलून काढील तुम्हाला तो.."

तेवढ्यात टॉम जेरीचा पाठलाग करता करता एक मगर तिथे येते. ते तीघे कल्केनलिबे खात असतात. ते मर्कटांना पळवून लावून पाजोल ला वाचवतात.

शेवटी सगळे एकमेकांचे मित्र होतात.

नेहेमी खा: कल्केनलिबे - करा प्राण्यांशी दोस्ती.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

11 Jul 2010 - 5:26 pm | नावातकायआहे

:''( :''( :''(

ज्ञानेश...'s picture

11 Jul 2010 - 8:08 pm | ज्ञानेश...

क्षणाच्या सोबत्याची आठवण झाली.

निमिष सोनार's picture

11 Jul 2010 - 8:44 pm | निमिष सोनार

माझे पूर्वीचे मिसळपाव वरचे टोपण नाव- क्षणाचा सोबती हेच होते.

चतुरंग's picture

12 Jul 2010 - 6:39 am | चतुरंग

क्षण आणि निमिष तसा फारसा फरक नाही दोन्हीत! ;)

(पळ)चतुरंग

नंदन's picture

12 Jul 2010 - 7:30 am | नंदन
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jul 2010 - 2:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
पल पल है भारी बिपिता है आयी। हे गाणं उगाच नाही आठवलं म्हणायचं!

अदिती

ज्ञानेश...'s picture

12 Jul 2010 - 2:30 pm | ज्ञानेश...

की बिपदा/विपदा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jul 2010 - 3:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता काय 'विनाशपले विपरीत बुद्धी' ;-)

अदिती

मी-सौरभ's picture

12 Jul 2010 - 12:01 am | मी-सौरभ

~X(

-----
सौरभ :)

गणपा's picture

12 Jul 2010 - 2:30 am | गणपा

@) :/ :W (|: (|: I) I) I) I) I) I) I) I) I) I)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

12 Jul 2010 - 7:38 am | डॉ.श्रीराम दिवटे

फारच छान.

*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2010 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

कसे सुचते हो तुम्हाला येवढे छान छान ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शिल्पा ब's picture

12 Jul 2010 - 10:17 pm | शिल्पा ब

तुम्हाला भारी प्रश्न पडतात...
इकडे लोकं सुचलं कि लिहून टाकतात...(आणि मग नंतर उडवतात)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अवलिया's picture

12 Jul 2010 - 2:33 pm | अवलिया

वा वा मस्त लेखन.

--अवलिया