विनम्र श्रद्धांजली

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
29 Jun 2010 - 7:32 pm

संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे प्राचार्य माननीय शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यात दु:खद निधन झाले. या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र आदरांजली...

साहित्यिकसद्भावना

प्रतिक्रिया

माझीही भावपूर्ण श्रध्दांजली.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 7:39 pm | विसोबा खेचर

अरेरे.. मोठा माणूस गेला..

खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच!

तात्या.

केशवसुमार's picture

29 Jun 2010 - 7:49 pm | केशवसुमार

अरेरे.. मोठा माणूस गेला..

खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच!

(स्तब्ध)केशवसुमार

विकास's picture

29 Jun 2010 - 7:40 pm | विकास

विनम्र श्रद्धांजली...

त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष जरी ऐकले नसले तरी ओघवती वक्तृत्वशैली ध्वनीमुद्रीत स्वरूपात ऐकलेली आहे. त्यांचे जागर आणि दिपस्तंभ हे लेखसंग्रह वाचनीय आहेत.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2010 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन-तिनदा त्यांना ऐकलं आहे. त्यांचे 'जागर' तर क्या कहने...!

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

29 Jun 2010 - 7:42 pm | धमाल मुलगा

शिवाजीराव भोसले गेले?
शॉकिंग! :(

माझी श्रध्दांजली.

प्रभो's picture

29 Jun 2010 - 7:43 pm | प्रभो

भावपूर्ण श्रध्दांजली.

हुप्प्या's picture

29 Jun 2010 - 7:45 pm | हुप्प्या

ओघवते आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व नेहमीच स्मरणात राहिल.

विवेकानंद, शिवाजी महाराज यांच्यावरची भाषणे आठवतायत.

स्वाती दिनेश's picture

29 Jun 2010 - 7:47 pm | स्वाती दिनेश

आत्ताच समजले, शिवाजीराव भोसले गेले..
पुण्यात एक दोनदा त्यांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता. तसेच आमच्या शाळेच्या कोणत्या तरी महोत्सवातही ते एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असताना त्यांचे भाषण ऐकलेले आठवते आहे.
तात्या म्हणतो तसे रसाळ आणि प्रासादिक बोलायचे ते, जणू एखादी मैफलच ऐकतो आहेत असे वाटावे!
विनम्र आदरांजली,
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 9:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी ही कुठेतरी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. संपूच नये अशी काही व्याख्यानं ऐकली त्यात शिवाजीराव भोसल्यांचं एक!
विनम्र श्रद्धांजली.

अदिती

मला ही बातमी मिसळपाव वरच कळतीये. इ-सकाळ किंवा मटावर आधी दिसली नाही. आता इ-सकाळवर दिसत आहे.

दु:खद बातमी. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

सनविवि's picture

29 Jun 2010 - 8:17 pm | सनविवि

अरेरे! :(

आमच्या शाळेत आले होते एकदा व्याख्यानासाठी, मी आत्तापर्यंत ऐकलेले सर्वोत्क्रुष्ट व्याख्यान आहे ते. त्यांची सकाळ मधली 'जागर' लेखमालिका नियमित वाचायचो मी.

विनम्र श्रद्धांजली.

ramjya's picture

29 Jun 2010 - 8:24 pm | ramjya

प्राचार्य शिवाजीराव भोसले आणी 'आई महोत्सव'-बीड ,एक अतुट नाते होते....माझी भावपूर्ण श्रध्दांजली

या एक बातमीने योगी अरविंद,शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद सारसार एकदम आठवल
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

ऋषिकेश's picture

29 Jun 2010 - 8:34 pm | ऋषिकेश

अरेरे.. अतिशय नादमय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी बोलणारे प्राचार्य गेले हे खूपच वाईट झाले

विनम्र श्रद्धांजली

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Jun 2010 - 8:34 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अरे आत्ताच कळतीये बातमी.माझीही विनम्र श्रध्दांजली.

चतुरंग's picture

29 Jun 2010 - 8:46 pm | चतुरंग

अतिशय संयत, ओघवते आणि नर्म विनोदाची पखरण करत जनसमूहाला कवेत घेणारे प्रभावी वक्तृत्त्व. त्यांची बरीच भाषणे ऐकण्याचा योग आला. वसंत व्याख्यानमालेच्या एका व्याख्यानानंतर टिळकस्मारक मंदिरात त्यांच्याशी संभाषण साधण्याचाही योग आला होता.

(दु:खी)चतुरंग

काहीशा संथपणाने पण एका रिदम मध्ये त्यांचे भाषण असायचे.स्पष्ट उच्चार,
विचारांची पक्कीबैठक,सहजपणे उपलब्ध असलेली अचूक माहिती यासर्वांचा एक रासायनीक परिणाम होउन ऐकणार्‍याची ब्रम्हानंदी टाळी नाही लागली तरच नवल.
बोलण्यामध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा अनाठायी अभिनिवेश नाही.
आरोह अवरोह असला फार काही प्रकार नाही. (स्वराचा उंचसखलपणा हा कायम
क्ष अक्षाशी समांतर )
शब्द तर असे की. या प्रसंगी सुध्दा एक उदाहरण लिहील्याशिवाय राहवत नाही.
----
" मुलांच्या प्रकृति मध्ये जेंव्हा विकृति निर्माण होते तेंव्हा त्यांची संकृति बिघडते"
----
विवेकानंद स्मारकासाठी त्यांचे योगदान तर खूप महत्वाचे होते.
असो.
धक्कादायक नसली तरी अशी बातमी वाईटच असते.
माझी या अधुनिक ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!!

जागु's picture

29 Jun 2010 - 9:27 pm | जागु

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

स्मिता चावरे's picture

29 Jun 2010 - 9:47 pm | स्मिता चावरे

भावपूर्ण श्रध्दांजली.

नितिन थत्ते's picture

29 Jun 2010 - 10:11 pm | नितिन थत्ते

माझीपण श्रद्धांजली.

ओघवते भाषण असे त्यांचे.

नितिन थत्ते

विनायक पाचलग's picture

29 Jun 2010 - 10:17 pm | विनायक पाचलग

एकदा त्याना ऐकण्याचा योग आला होता..
भाग्यवान म्हणायचो मी..
माझा पुर्वी लिहिलेला हा लेख हीच माझी श्रद्धांजली ..
कारण त्यातले विचार आत्ताही लागु होतातच

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

केशवराव's picture

30 Jun 2010 - 2:06 am | केशवराव

विनम्र श्रध्द्धांजली !!!

भोचक's picture

30 Jun 2010 - 9:14 am | भोचक

देशोदेशीचे दार्शनिक नावाची त्यांची अतिशय सुंदर लेखमालाही सकाळमध्ये गाजली. नाशिकमध्येही ते नियमित व्याख्यानांना यायचे. त्यांना विनम्र आदरांजली.

(भोचक)
जाणे अज मी अजर

सागर's picture

2 Jul 2010 - 2:27 pm | सागर

पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील

१. योगी अरविंद
२. स्वामी विवेकानंद
३. छत्रपति शिवाजी महाराज

http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html