जस्ट लाइक अ वेव्हिंग फ्लॅग....

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
2 Jun 2010 - 12:37 pm

Give me freedom, give me fire, give me reason, take me higher
See the champions, take the field now, you define us, make us feel proud
In the streets our heads are lifting, as we lose our inhibition,
Celebration its around us, every nations, all around us

Singing forever young, singing songs underneath that sun

Lets rejoice in the beautiful game.

And together at the end of the day.

WE ALL SAY

When I get older I will be stronger

They’ll call me freedom Just like a wavin’ flag

And then it goes back
And then it goes back
And then it goes back

..... चार वर्षांनी पुन्हा एकदा....पुन्हा एकदा रूनी, ड्रॉग्बा, ऑन्री प्रतिस्पर्ध्यांच्या गोलवर धडका मारतील...पुन्हा एकदा मायकेल ओवेन, मिरोस्लाव क्लोसा, सॅम्युएल एटो'ओ समोरच्या डिफेंडर्सना पळता भुई थोडी करतील....पुन्हा एकदा रोनाल्डिन्हो-रॉबीन्हो आणि टोरेस-विलाच्या जोड्या धिंगाणा घालतील....पुन्हा एकदा मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो, काका, स्टीवन जेरार्ड आपल्या जादुई खेळाची मोहिनी घालतील... पुन्हा एकदा कानाव्हारो, टेरी, लाम, अ‍ॅशली कोल आपल्या संघासाथी बचावाची अभेद्य तटबंदी उभारतील.... पुन्हा एकदा बुफॉन, इकेर कॅसिलास, डेव्हिड जेम्स, ज्युलिओ सेझार "लास्ट मॅन स्टँडिंग" बनून आपल्या गोलचं जिवाच्या आकांतानी रक्षण करतील... आणि पुन्हा एकदा सगळं जग आपली दु:ख, भांडणं, जात पात धर्म देश ....सगळे सगळे भेद विसरून जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांची कला डोळे भरून आणि भान हरपून पाहतील.

...बस... थोड्याच दिवसांत....आम्ही वाट बघतोय... तोपर्यंत....

">

क्रीडामौजमजाप्रकटनशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

2 Jun 2010 - 12:40 pm | सहज

हे गाणे सहीच आहे. शेख बिका व शेख डॉन यांच्या पसंदीचे हे गाणे वल्ला वल्ला

मेघवेडा's picture

2 Jun 2010 - 1:20 pm | मेघवेडा

शेख मीपण!! नॅन्सीच्या प्रेमात पडलोय रे मी!! ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

छोटा डॉन's picture

2 Jun 2010 - 1:53 pm | छोटा डॉन

>>नॅन्सीच्या प्रेमात पडलोय रे मी!!
ओ, इथे लाईन आहे ते दिसत नाही का ?
पुढे कुठे घुसताय ?
चुपचाप लायनीत उभे रहा पाहु, गडबड केल्याने नॅन्सी लवकर मिळणार नाही ... ;)

------
( लायनीतला ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मेघवेडा's picture

2 Jun 2010 - 2:00 pm | मेघवेडा

>>ओ, इथे लाईन आहे ते दिसत नाही का
ओ तुमी लायनी णंतर लावा.. आधी त्ये कुठल्या कुठल्या लेखांचे वायदे पडून राहिलेत ते पूर्ण करा.. तोपर्यंत तुमचा लंबर धरून ठेवतु मी.. ;)

जास्त काय बोलत नाय डान्या.. सहीवरून काय ते ओळख.. ;)

-- दीवारीतला हामिताब

शानबा५१२'s picture

2 Jun 2010 - 2:31 pm | शानबा५१२

ह्या भौतिक जगातुन बाहेर या.
मोहपाशात अडकुन आपली समाजासाठी असलेली कर्तव्य विसरु नका.
म्रुगजळामागे धावणे थांबा.

(लायनिला फाट्यावर मारणारा...........आणी लायनीतल्यांची गिणती न करणारा)

धाग्याबद्द्ल -------- जगातल्या सर्वात प्रसिद्ध खेळाला साजेल अस लिखान.

*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jun 2010 - 12:56 pm | llपुण्याचे पेशवेll

जे पी धन्यू रे.. गाणे मस्तं आहे. ईएसपीएन वर लागते कायम. मस्तंच आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

छोटा डॉन's picture

2 Jun 2010 - 1:52 pm | छोटा डॉन

एकच नंबर रे भावा !
मस्त सुरवात केली आहेस, माझ्याकडुन मायला हाच मुहुर्ताचा नारळ फुटत नव्हता काही केल्या ;)

गाणे तर अप्रतिमच आहे, ओरिजनल सेलेब्रेशन मिक्स, त्यानंतर आलेले नॅन्सी अर्जम आणि आताचे स्पॅनिश आणि डॉइश व्हर्शन ... ऑल ऑल आर बेश्ट !

अवांतर :
ह्यावेळच्या वर्ल्डकपच्या संभाव्य विजेत्यांबद्दल ४ शब्द लिहणार आहे, डेटाही गोळा करतो आहे पण काही अर्जंट कामामुळे पुढचे काही दिवस मी गायब असेन.
परत आल्यावर आमची "ड्रिबल, टॅकल & हेडर ..." ही लेखमाला नक्की !
आमच्या आवडत्या टीम्समधल्या ४ आवडत्या प्लेयर्सबद्दल आम्ही भरभरुन लिहु असे तुर्तास इथे सांगतो.

------
शेख छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

गणपा's picture

2 Jun 2010 - 2:41 pm | गणपा

१..२..३..४..५..६..७..८.. .. .. .. ... ...................
आरे हाड, आपण नाय आता काउंट ठेवणार आता ;)

बाकी, जेपी गाण एकदम १ लंबरी.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jun 2010 - 2:55 pm | llपुण्याचे पेशवेll

+१ रे गणपा...
आम्ही हल्ली एक कायदेपुस्तक आणि एक वायदेपुस्तक जवळ बाळगतो. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

छोटा डॉन's picture

2 Jun 2010 - 4:21 pm | छोटा डॉन

तुमचे चालु द्यात.
आम्ही नाही बदणार व ही लेखमाला नक्की बोर्डावर आणणार !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

जे.पी.मॉर्गन's picture

2 Jun 2010 - 2:42 pm | जे.पी.मॉर्गन

... व्वा... क्या बात है =D> ... तुझी कामं लवकर संपव रे बाबा... आणि लवकर येऊदे काहीतरी... वाट बघतोय !

<:p>

निखिल देशपांडे's picture

2 Jun 2010 - 3:51 pm | निखिल देशपांडे

गाणे छान आहे... पण हे ऑफिशिअल आहे का??
http://www.fifa.com/worldcup/news/newsid=1205344/
ऑफिशिअल असो का नसो.. गाणे चांगले आहे.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jun 2010 - 4:10 pm | llपुण्याचे पेशवेll

या गाण्याचे लिरिक्स कोणाचे आहे? त्याचे कंपोझर्स कोण आहेत? कोणी सांगेल का?
मध्यंतरी १-२ लोकांना या गाण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी कोणतरी सलीम आणि कोणत्यातरी जोडीला त्याच्या कंपोझिशनची ऑफर मिळली आहे वगैरे सांगितले.
कोण यावर प्रकाश टाकेल का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

निखिल देशपांडे's picture

2 Jun 2010 - 4:53 pm | निखिल देशपांडे

या गाण्याचा गायक हा सोमालियन रॅपर k,naan हा आहे.
या गाण्याचे जे वर दिलेले लिरिक्स आहेत ते कोका कोलाचे वर्ल्ड्कप साठी ऑफिशीअल साँग आहे.. या वर्जनचे नाव सेलिब्रेशन मिक्स असे आहे.

या गाण्याचे ओरिजिनल लिरिक्स

सेलिब्रेशन मिक्स चे लिरिक्स वर दिलेलेच आहेत.

त्याशिवाय यंग आर्टिस्ट फॉर हैती साठी असलेल्या गाण्याचे लिरिक्स

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रभो's picture

2 Jun 2010 - 6:31 pm | प्रभो

मस्त रे!!!