तीळ व त्यांचे अर्थ...

गाभा: 

ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो.
ज्योतिष शास्त्र क्षेत्रातील जाणकार मंडळी या ठीकाणी याबद्दल अधिक माहिती सांगू शकतील काय?
या विषयाला वाहीलेले ऑनलाईन/ डाउनलोड करण्याजोगे / छापील पुस्तके / ब्लॉग्ज उपलब्ध आहेत का?
असल्यास माहिती द्यावी.
तसेच कुणी या विषयाचा अभ्यासक असेल त्याने येथे माहिती द्यावी.
कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी....
ही या चर्चेची अपेक्षा.
येथे तीळांबद्दल विज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षीत नाही.

प्रतिक्रिया

कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी....

माझ्या कपाळावर एक तीळ आहे...लोक म्हणतात मला छान दिसतो...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

"पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "

व्वा !!

- (लेडिज टेलर) टारपाल जाधव

असा कुठलातरी लक्षाचा एक पिक्चर होता ना.. काहीतरी जतिजळ का काही तरी शोधत असतो तो..हॅ हॅ

कुठे कुठे शोधू तीला.

फार पुर्वी तीळूमुनींनी प्रत्येकाच्या तीळासाठी तिळपट्टी लिहून ठेवली आहे फक्त ती जुन्या तुळू लिपीत आहे.

तुम्ही तुमच्या व घरच्यांच्या तीळाचे फोटो दिलेत की केंद्रातुन सगळी माहीती मिळेल.

तीळ तुमचा असणार । तीळूमुनिंचा घट्ट आधार॥
मी तीळगुळ खाणार । तिळपापड होणार निश्चित॥

॥इति गनु जीपीएल वाक्यम॥

हॅ हॅ हॅ..

तीळ तुमचा असणार । तीळूमुनिंचा घट्ट आधार॥
मी तीळगुळ खाणार । तिळपापड होणार निश्चित॥

॥इति गनु जीपीएल वाक्यम

नुसते वाक्यम नाही तर महावाक्यम.

माझ्याकडे तीळ, सेक्स व भाग्य असे शहाडे शास्त्री यांचे गजानन बुक डेपो छाप पुस्तक आहे
तीळशास्त्री
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

>>
माझ्याकडे तीळ, सेक्स व भाग्य असे शहाडे शास्त्री यांचे गजानन बुक डेपो छाप पुस्तक आहे

फालतु पुस्तक, त्यात नाडी नाही. मग काय वाचायचे त्यात ????

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

गजानन बुक डेपो/जोशी बुक डेपो ह्यांच्याकडे तीळावरील (आणि इतर अनेक तत्सम विषयांवरील) बर्‍याच पुस्तंकांचा संग्रह आहे. पुण्यामधे भरत नाट्य समोर त्यांचे दुकान आहे. ते वाचा आणि तुम्हिच एक प्रबोधनपर लेख इथे टा़का.

मिपाकरांना कुठे कुठे तीळ आहेत ह्यासाठी पण एक धागा टा़का!

- (अंगावर बरेच तीळ असणारा आणि तिळपापड होणारा) पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

काका, तुम्हला पैसे गुंतावायचे आहेत तर नाडी ग्रंथाची ऐजन्सी घ्या. पैसे पण चांगले मिळतील. विपणनासाठी आहेच आंतरजाल.

श्री सहज नाडीवाले, जुन्या ऋषीमुनीनी लिहील्या ज्ञानाचा उपयोग परदेशी लोकांना पण होउद्यात, आणि भारताला परदेशी चलन मिळेल ते वेगळेच.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

=)) =)) =))
तिळा तिळा दार उघड!

सहजमामा, लै लै लै फॉर्मात हा! "ग्नू जीपीएल महावाक्यम्" तर फारच आवडलं व्बा मला!!

("जीपीएल"प्रेमी) अदिती

आयला सहजराव, तुम्ही स्टॉलमन भक्त वाटतं!

॥इति गनु जीपीएल वाक्यम॥

तुम्हाला इथे गनु म्हणजे ग्नु असं म्हणायचं आहे का? ग्नु या नावाखाली मोफत संगणक प्रणाल्या मिळतात. की तुम्हाला अजून कुठला दुसराच गणु अपेक्षित आहे?

माझ्या मते पहिला ग्नुच योग्य असावा. मुळ महावाक्याच्या तुमच्या सोयीनुसार हवा तसा बदल करून कितीही प्रती बनवा. त्यांचा भक्तजनांमध्ये नि:शुल्क प्रसार करा. आणि भोळ्या भाबडया भक्तजनांचे जीवन सुखमय करा.

फटू

१. शशिकांत ओक
२. युयुत्सु
३. निमिष सोनार
४. ???
५. ?????

नितिन थत्ते

४. ???
५. ?????

संदर्भ लागला लगेच.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

तीळशः तीळशश्चैव नविन अर्थम च शोधयेत ।
तीळं नसता कुतो विद्या तीळं नसता कुतो धनम ॥

- फटू

व्वा, काय मस्त विषय आहे. अगदी विषयाकडे जाणारा विषय आहे. सहज अन घाटपांडे काकांचे मार्गदर्शन मिळाले तर एक महान ग्रंथ तयार होईल. त्यात आमचेही प्रकरण घालावे ही विनंती.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

आपण बोललात म्हणून विज्ञान वगैरे चुलीत घालुन हे लिहतोय..........

हातावर तिळ असला की सोन्याच घड्याळ भेटत.............अनुभव बोलाल तर माझ्या मनगटाच्या थोड मागे आहे मोठा तिळ.............मला सोन्याच plating असलेले घड्याळ मिळाल.
जीभेवर असल तर तो जे वाईट बोलतो ते खर होत.

बर आणि कोण्या मुलीच्या गलावर असेल तर तिला पप्या खुप भेटतात................अनुभव नाही........कोणाला घ्यायचा असेल तर बघा नि गलावर चापट भेटली................की तिळ शोधत बसा ज्याच्यामुळे अस झाल तो वाला.
बाकी आजुन एका जागेवर असण्यावरुन जे बोलतात ते नाही लिहत......
आपल्याला हे एवढ अवश्यक का वाटल समजेल का.................निमिष म्हणजे काय हो????

***************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.

मनगटावर अगदी मधोमध जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा एकतर खून होतो किंवा ती व्यक्ती आत्महत्या करते, असे ऐकून आहे. :)

क्काय!!!!!!!!!
अहो हादरलोच मी हे वाचुन!!
आणि तुमचे नाव " वेदश्री " तर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडत!!!!
आज से नो घर पे लेट आना

*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउ

आवरा ,
आता आमचा खुन?????
डावे का उजवे ते स्पश्ट करा.

ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो.

कात्रिना कैफ, अनुष्का इत्यादींसारख्या नट्यांच्या होणार्‍या नवर्‍याच्या शरीरावर नक्की कुठे तीळ आहे हे तपासून पाहावे लागेल..

परंतु एखाद्या विवक्षित जागी नक्की तीळ असणार एवढं मात्र निश्चित..;)

आपला,
(तिळगुळप्रेमी) तात्या.

=)) =)) =)) =)) =))
भेंडीत भरवला ...

साला त्या अबु हाजमीच्या पोराला पकडायला पाहिजे ... आणि त्याचा तिळ कॉपी-पेस्ट केला पाहिजे ..

-(आयेषा प्रेमी) तिळोबा पेस्टर

भेंडीत भरवला ... :-?

हे वाक्य काळजाला भिडले! ;)

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))

टारौ.... असे आणि अश्या प्रकारचे भन्नाट वाक्प्रचार मराठी भाषेत आणून तिला प्रगल्भ बनवल्याबद्दल आपले आभार ___/\___
डोळे पाणावले .... गदगदून आले .... आदर दुणावला ... :)

__________________

एक सत्य :

एखाद्या मुलीच्या दोन भुवयांच्या बरोबर मध्ये जर तिळ असेल..... तर ती अतिशय भाग्यवान असते.... तिला लक्ष्मीचेच दुसरे रूप मानतात..
अशी मुलगी ज्या घरामध्ये सून म्हणून जाते.... त्या संपूर्ण घराच्या (घरातल्या माणसांच्या) कुन्डलीत "राजयोग" बनतो! :)
आणि तिच्या पतीचे भाग्य प्रमाणाबाहेर उजळते! :)

--------------------------------

काही दुष्ट लोक, सम्पत्तीच्या लोभामुळे "अशा" मुलींना बळी देण्याचाही प्रयत्न करतात.. :( परन्तु त्यांना हे समजत नाही, की सोन्याचं अंडं देणारी कोम्बडीच मारून टाकली... तर ती सोन्याची अंडी कशी मिळणार ? आणि मग सोने कसे मिळणार ? ;)
:-?

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

>> एखाद्या मुलीच्या दोन भुवयांच्या बरोबर मध्ये जर तिळ असेल..... तर ती अतिशय भाग्यवान असते.
हे सत्य आहे याला पुरावा काय?? :? आणि हे तुला कोणी सांगितलं??

>> त्या संपूर्ण घराच्या (घरातल्या माणसांच्या) कुन्डलीत "राजयोग" बनतो!
कुंडलीत म्हणजे जन्मकुंडलीत म्हणायचंय का तुला? आणि तसं असेल तर एखादा योग लग्नानंतर 'बनतो' कसा हे जाणून घ्यायला आवडेल.

-- अडाणि

साला, ह्या तात्याने पेंडशांचे "तुंबाडचे खोत" खूप सीरियसली घेतलेले दिसते आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मग ह्या न्यायाने एकाद्याच्या *गणावर तीळ असेल तर त्याचे सर्व आयुष्य संडासातच व्यतीत होत असेल नाही.
वेताळ

अशा लेखात चित्रे असल्यास वेगवेगळ्या प्रकारचे तीळ कुठले ते कळण्याची सोय होईल.

_/\_

=)) =)) =))
काय प्रतवारी करुन अहवाल करायचा विचार आहे काय? =))

विद्यार्थी दशेत तपशीलवार अभ्यास करण्यासाठी एखादा फोटो छापून घेतला असता.

माझ्या अनेक कॉलेजमित्रांचाही असा अनुभव आहे : प्रयत्ने बाळीचे तिळ रगडता तेलही गळे - असे असले तरी खूप प्रयत्न करूनही लोकांना दाखवावा असा निष्कर्ष हातात येत नसे.

म्हणून काही हिरमुसून कोणीच छायाचित्रांचा अभ्यास सोडला नव्हता, हे तेव्हाच्या विद्यार्थ्यांच्या चिकाटीबद्दल स्मरते.

मेलो!!

अरे लागा रे तयारीला.. उचला मला!!
आज साक्षात धनंजयही दे धम्माल सुटलेत :D

अरे धन्या धन्या, तुझ्या जिभेला काही तीळ!!!! ;)

तिळरंग

म हा न!!

आमचा साष्टांग नमस्कार मान्य करा मालक! _/\_

अदिती

=)) =)) =))

अरे पाठवा रे छायाचित्रं सगळे लोक! धनंजयांचा मार्गदर्शनाखाली मी पण थोडाफार चित्रांचा आपलं तिळांचा अभ्यास करेन म्हणतो.

(संपादकांनी अस्ताव्यस्त चित्रं फिल्टर करावीत. ;) )

-Nile

सुभाषित असावं तर असं. त्याच्या पुढच्या ओळीही येऊ द्यात. कोणाचे काय धरवेना क्षणभरी याबद्दल कुतुहल लागून राहिलं आहे.

बाकी आपल्या हाती केवळ प्रयत्न राहातात, निष्कर्ष कधी कुठे उडून जातात कळत नाही.

.

मनगटावर अगदी मधोमध जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा एकतर खून होतो किंवा ती व्यक्ती आत्महत्या करते, असे ऐकून आहे.

..

मेल्लो!!
माझ्या मनगटावर्र २-२ तीळ आहेत!!
आत्ता!!

प्लास्टिक सर्जरी करून काढून टाकले तर्र काही फरक पडेल का??
;)
;)

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

मनगटावर अगदी मधोमध जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा एकतर खून होतो किंवा ती व्यक्ती आत्महत्या करते, असे ऐकून आहे.
..
मेल्लो!!
माझ्या मनगटावर्र २-२ तीळ आहेत!!
प्लास्टिक सर्जरी करून काढून टाकले तर्र काही फरक पडेल का??

अरेरे, फारच वाईट झाले .
सर्जरीचा उपयोग होणार नाही, तीळषडाष्टक योग आहे तुमच्या कुंडलीत.

मनगट कापुन ठेवल्यास बहुदा काम होऊ शकते.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

फक्त मनगट कापुन तळहात परत जोडायची काही सोय आहे काय?

फणश्या..
तुझा दोन दोनदा कसा खून होणार रे ? :?

नाही आधी खून, मग आत्महत्या, नाहीतर नंतर खून आधी आत्महत्या!

असो. आमच्या नात्यातल्या एका सुंदर मुलीच्या दोन भुवयांच्या बरोब्बर मधे तीळ आहे. तिची एकूण कहाणी माहीत आहे म्हणून वाटतं बरं झालं आमच्या चेहेर्‍यावर तीळ नसून फक्त डाग आहेत असं वाटतं!

अदिती

प्लास्टिक सर्जरी करून काढून टाकले तर्र काही फरक पडेल का??
घ्या, जिथं शे- दीडशे रुपयांत हे साधसं ऑपरेशन होण्याजोगं आहे तिथे प्लास्टीक सर्जरीचं काय काम?
अनिवासी, आय.टी.वाले दिसताय ;)

दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)

दोन्हीपैकी १ तरी मनगटाच्या मधोमध आहे का ...? नाहीतर काय उपयोग?..
पुष्करिणी

पण तीने सोन्याचे अंडे दिल्याचे माझ्या एकण्यात अजुन आले नाही.

वेताळ

तुम्ही कोंबडीबद्दल बोलत आहात का मुलीबद्दल??

अदिती

कोंबडी देवो वा मुलगी.. सोन्याची अंडी मिळाल्याशी मतलब!! ;)

दोन भुवयांमध्ये तीळ असणार। नवर्‍याची कुंडली बदलणार॥
सगळ्यांच भाग्य फळफळणार। सोन्याची अंडी मिळणार निश्चित॥

देईल हो अंडे, मरेपर्यंत देईल नक्कीच.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

पण तीने सोन्याचे अंडे दिल्याचे माझ्या एकण्यात अजुन आले नाही.

वेताळ


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

जयपाल या माणसास साष्टांग नमस्कार ! काय एक एक चित्र टाकतो. जयपालच्या चित्र प्रतिसादांवर डाक्युमेंट्री काढली पाहिजे.
फिल्म इंश्टिट्यूट ला आहे कारे कोणी मिपाकर?

लईच भारी धागा आणि हुच्च प्रतिसादांची रेलचेल आहे! =))

(तीळकथेतील गूळकुमार)चतुरंग

(तीळकथेतील गूळकुमार)चतुरंग

=)) =)) =)) =))
छ्या, स्वतःलाच काय गूळकुमार म्हणवून घ्यायचं!!

अदिती

ती फक्त गूळचट सही असेल गं.

तिळाची एव्हढी महती वाचुन कुणी "तिळोत्त्पन्न" अशी सही केली तर आश्चर्य वाटायला नको!!

-Nile

वक्ष्स्थळावर तिळ असणे खुप चांगले..आयुष्य आनंदात जाते....

चतुरंग

आणि कोणाचे (आयुष्य मजेत जाते)?

नितिन थत्ते

कुणाच्या आणि कुणाचे ?

फणश्या..
तुझा दोन दोनदा कसा खून होणार रे ?

धम्या लेका.. आधी मी कोनाचा तरी खून करीन अन् मग माझा कोनीतरी खून करेल..
च्यामायला.. बॅलेंसिंग अ‍ॅक्ट भलताच जमला ब्वा आपल्याला!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

अब मै समझा तुम्हारी रूख्सार पर तिल का मतमब ,
दौलत - ए - हुस्न पे दरबान बिठा रख्खा है.

तिळावरचे दोन सुविचार कोणास ऐकायचे असतील तर व्य. नी करा.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

ओठावर तिळ असल्यास आदर मिळतो आणि *टावर तिळ असणार्‍यांकडे रिझवण्याची कला असते.

अहाहा..
रविवारी सकाळी मस्त तीळ आख्यान वाचले आणि जीव सुखावला...

च्यामारी हे तर पुरे तीळआख्यान होईल... कुणीतरी संपादन करा रे ह्या धाग्याचं... बाकी ह्सून हसून कडेलोट झाला...

स्त्री अथवा पुरूषाच्या गुप्तांगावर तीळ असेल तर जातकास अतिरिक्त कामवासना असते असे एका ज्योतिषविषयक मासिकात चाळता चाळता
(खरं म्हणजे ह्याला चाळवणेच म्हटले पाहिजे) वाचले होते. गंमत म्हणजे माझे कॉलेजमध्ये एक दोन प्लेबॉय वर्ग-मित्र होते, ते हॉस्टेलमध्ये
अभिमानाने ही गोष्ट सांगायचे; यशाची गुरूकिल्लीच!
उजव्या हातावर तीळ असेल तर पैसा बराच मिळतो म्हणतात. डोळ्यात
तीळ अशुभ समजतात.
बाकी एकाएकी अंगावर तिळांची संख्या वाढणे हे एका प्रकारच्या घातक कॅन्सरचे लक्षण असू शकते.