दररोज सकाळी सायंकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी दुसर्‍या दिवसापासुनच

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
26 Mar 2008 - 2:43 pm
गाभा: 

मला माझ्या सरानी (डॉ. अरोरा ) एक प्रार्थना शिकवली होती. त्यावेळी त्यानी मला सांगितले होते की ही प्रार्थना तू रोज दोनदा अर्थ लक्षात घेउन म्हंटली तर तू सर्व त्रासांमधुन मुक्त होशील आनन्दी होशील्...मला त्याचा अनुभव आला आहे.
अर्थ नीट समजुन घेउन प्रार्थना आचरणात आणली तर १०००% टक्के परिणाम दिसतो अगदी दुसर्‍या दिवसापासुनच
प्रार्थना ईंग्रजीत आहे.मुद्दामच त्याचे भाषांतर कलेले नाही
Oh God Please Give me Courage
to Change the things that I can Change
Oh God Please Give me Patience
to accept the things that I Can’t Change
And above all
Oh God Please Give me Wisdom
to know the difference......

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 2:54 pm | विसोबा खेचर

क्या बात है...

क्लास! :)

सहा महिन्यांपेक्षा, दुसर्‍याच दिवशी अनुभव देणारं हे इंग्रजी स्तोत्र मला आवडलं! मीदेखील आजपासून म्हणत जाईन..:)

तात्या.

आनंदयात्री's picture

26 Mar 2008 - 3:04 pm | आनंदयात्री

दररोज सायंकाळी शुचिर्भुत होऊन (किंवा न होता) पिणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी त्याच क्षणापासुन ...

काही म्हणायची बिणायची गरज नाही .. इंग्रजी तर नाहिच नाही ....

त्या स्तोत्राचा मराठी तर्जुमा हा असा
हे परमात्म्या.....जे मी घडवु शकतो...धैर्य दे ते करण्यासाठी
हे परमात्म्या.......जे मी घडवु शकत नाही ....दे शक्ति ते सहन करण्या
आणि सर्वात महत्वाचे...
हे परमात्म्या......काय घडवु शकतो...काय नाही ....दे समज ते उमजण्याची

आनंदयात्री's picture

26 Mar 2008 - 3:24 pm | आनंदयात्री

तुम्ही तर एकदम येशु ख्रिस्ताच्या थाटात उत्तर दिले ... आपण तर फॅनच झालो बुवा तुमचे ...
स्वगतः आता मिपा वर स्तोत्रांचे प्रार्थनांचे फ्याड येणार दिसतेय.

अवांतरः
आनन्द यात्रीजी हे आनंदयात्री किंवा आंद्या किंवा अगदीच आंद्या फोकलिच्या (कोकण फेम) असे लिहिले तर आमची आनंदयात्रा सफल होइल. जी वैगेरे लावले की उगाचच पारलेचा क्षुल्लक पुडा झाल्यासारखा वाटते.

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 3:32 pm | विसोबा खेचर

अरे असे भांडू नका रे! :)

असो, येशू व गणपती तुम्हाआम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो...

आपला,
तात्या ख्रिस्त!

आनंदयात्री's picture

26 Mar 2008 - 3:41 pm | आनंदयात्री

तात्या ख्रिस्त .... आम्ही "तात्याकाम जाबाली" वाचल्यावर पण पोट धरधरुन हसलो होतो :)

बाकी विजुभाउनी डिप्लोमसी केली ... त्यांचा मुळ प्रतिसाद संपादित केला ... आमच्या प्रत्युत्तरातली हवाच घालवली !!

देवदत्त's picture

27 Mar 2008 - 1:38 am | देवदत्त

तात्या ख्रिस्त!??
अहो तात्या,
आता मग राजस्थानात थोडे दिवस जाऊ नका. नुकतेच धर्मांतरणावर बंदी घालण्यात आली आहे तिथे.. :)

धमाल मुलगा's picture

26 Mar 2008 - 3:40 pm | धमाल मुलगा

वा विजुभाऊ,
बखरी लिहिता लिहिता इकडेही सिध्दहस्त? क्या बात है!

Oh God Please Give me Wisdom
to know the difference.....
ह्याची मात्र निता॑त गरज आहे बॉ आमच्यासारख्या पामराला!

>>आता मिपा वर स्तोत्रांचे प्रार्थनांचे फ्याड येणार दिसतेय.
आ॑द्या माझा पण तोच अ॑दाज आहे :-))

तात्या ख्रिस्त ????
हा हा हा...काय काय म्हणून करेल हा इसम....धन्य आहात तात्याबा!

आपला,
- से॑ट पीटर ध मा ल.

सर्किट's picture

27 Mar 2008 - 8:06 am | सर्किट (not verified)

माझेही गुरुदेव श्री. अरोडा मरोडा तेल लगाके ***, ह्यांनी मला खालील प्रार्थना सुचवली आहे..

मी ती रोज म्हणतो..

(भाषांतर मुद्दामच केलेले नाही))

सांगसांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय ?

हे रोज सकाळी १०८ वेळा म्हणावे.
कॅन्सर, हृदयविकार, वगैरे सगळे बरे होतात.

नपुसंकतेसाठी मात्र हा मंत्र उपयोगाचा नाही. त्याचा मंत्र सार्वजनिक संकेतस्थळांवर लिहिण्यासारखा नाही.

सर्व गुरुदेवांनी त्यासाठी माझ्याशी व्यनि ने संपर्क साधावा.

- (व्याघ्रपुरस्कर्ता) सर्किट

ठणठणपाळ's picture

27 Mar 2008 - 9:25 pm | ठणठणपाळ

या चर्चेवरुन मला smsवर आलेला एक जोक आठवला.

सिद्धिविनायक मंदिरासमोर रोज हा मंत्र म्हणा. एका महिन्यात श्रीमंत होण्याची गॅरेंटी.
मंत्र असा:
...भगवानके नाम पे दे दे बाबा