दिवस जुने ते स्मरायचे

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
26 Mar 2008 - 12:23 am

वेलणकरशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (वेलणकरशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे आठवणी काढून हसायचेरस्त्यात हिंडत जाणेवाटेत शोध बे दाणेचकण्यास दाणे ते असायचेगाठावी मित्राची खोलीजमावी पारटी ओलीग्लासात वारुणी भरायचेभरारे ग्लास हे  पार वाटावा सुरे चा भारघोटात रिकामे करायचेमाझ्या तू घरच्यापाशी थांबव गाडी जराशीपायर्‍या चुकून पडायचे

विडंबन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

26 Mar 2008 - 1:08 am | चतुरंग

(आणि वरची तुझी कॉमेंटही फुल्टूच!!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 1:11 am | विसोबा खेचर

माझ्या तू घरच्यापाशी
थांबव गाडी जराशी
पायर्‍या चुकून पडायचे

हम्म! केश्या, लेका तू काही सुधारायचा नाहीस! :)

अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :)

असो, चालू द्या. पुढील विडंबनाची वाट पाहतो आहे! :)

तात्या.

इनोबा म्हणे's picture

26 Mar 2008 - 1:38 am | इनोबा म्हणे

अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :)
बाकी इडंबन फर्मास...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

26 Mar 2008 - 1:32 am | बेसनलाडू

वाटेत शोध बेदाणे

भरारे ग्लास हे पार
वाटावा सुरे चा भार
घोटात रिकामे करायचे

यातील सहजपणा विशेष भावला. बाकीचे तेच.

(वाचक)बेसनलाडू

प्राजु's picture

26 Mar 2008 - 3:09 am | प्राजु

फर्मास विडंबन...

रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे

हे एकदम भारी...
- (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे's picture

26 Mar 2008 - 9:17 am | उदय सप्रे

प्रिय केशवराव,
तुमच्या सगळ्याच विडंबन कविता एकदम झकास आणि सहज असतात, तुमची भाषा सम्पत्ती खूपच प्रगल्भ आहे !
घरी आला असतात आणि निवांतपणे भेट झाली असती तर आणखीनच बरे वाटले असते, असो, पुढल्या वेळी नक्की !
तुमच्या "नसतेस घरी" विडंबन वरून स्फूर्ती घेवून मी पण एक विडंबन केले आहे, बघा वाचून.....
उदय सप्रे

केशवसुमार's picture

26 Mar 2008 - 5:19 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार