चेतन भगतला अनावृत्त पत्र

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
9 May 2010 - 8:58 am

नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे.. यानंतर मात्र नवीन लिखाण येथे टाकीन..
धन्यवाद,
विनायक
***************************************

प्रति,
चेतन,
हाय चेतन ! खरतर, तुला पत्र लिहिणार नव्हतोच, तुझं पुस्तक आवडलं अस सांगणार एखादं द्विट टाकणार होतो. तेवढ बास झालं असतं .पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. खरंतर बरोबर २ वर्षापूर्वी एका लेखातून तुझी मला ओळख झाली. आणि, तेंव्हापासून आजपर्यंत मी तुझा फॅन होतो, आहे.कदाचित राहीनही आणि त्यामुळे अर्थातच तुझी सगळी पुस्तकेही मी वाचलेली आहेत.आणि आता त्या अनुशंगानेच आज तुझ्याशी बोलणार आहे.

सांगायची गोष्ट अशी की, नुकतेच तुझे चौथे पुस्तक 2 States’ वाचले. लग्नाची गोष्ट तु छान सांगितली आहेस. त्यात, स्वत:चीच कहाणी असल्याने नीट एक्स्प्रेस झाली आहे. लोकांना ही कहाणी आवडणार हे नक्की, त्याबद्दल तुझ आधीच अभिनंदन ! पण, खरं सांगु, एक ''पुस्तक'' म्हणून मला ते अजिबातच आवडले नाही. तुझे हे पुस्तक म्हणजे एका चित्रपटाची पटकथा आहे फक्त! आणि ते बाड तु डीरेक्टरला द्यायच्या आधी आमच्या तोंडावर मारलेले आहेस ,इतकेच. अर्थात, त्यावर चित्रपट निघेलच !पण मित्रा , पुस्तकावर चित्रपट निघणे वेगळे आणि, चित्रपटची स्टोरी पुस्तक म्हणून विकणे वेगळे . अगदी प्रसंग, पात्र रचनाही तशीच आहे रे, चित्रपटासारखी.... तुला हे माहित असेलच की अशा Love story कोपर्‍या कोपर्‍यावर घडतात. पडद्यावर त्या time pass म्हणुन 3 तास बघणे वेगळे, पण, वेळ काढून पुस्तकात पण तेच वाचण्यात काय अर्थ आहे? चार चित्रपट एकत्र केले की झाले तुझे पुस्तक. मी अशी स्टोरी लिहिण्याबद्दल म्हणत नाही आहे.,ती लिहावीच. पण ती ज्याप्रकारे लिहिलेली आहे, त्यात ज्या प्रकारचा मसाला जाणुन बुजुन भरला आहे ते मला खटकतय.

खरतर, तु आम्हा तरुणाईला आवडलेलास ,आवडतोस ते तुझ्या गोष्ट सांगायच्या कौशल्याने. साध्या आणि Fuck, suck वाल्या तरूणाईच्या भाषेने, विषयातल्या वेगळेपणामुळे. गेल्या 3 पुस्तकात तु एकच गोष्ट सांगितलीस, 3 मित्र, एखादा बाबा, बुवा वा घडणारा प्रसंग.अगदी फाईव्ह पाइंट समवन मधला Rhyn असो, कॉल सेंटरच्या स्टोरीमधले लोक असोत,किंवा मग गोविंदची कहाणी.तेच घडले ना तिन्ही कथेत? हे सगळे जगावेगळे करायला गेले ,पण त्याना जमेना. मग कधी देव आला तर कधी आपलाच आतला आवाज. मग ते सुधारले आणि मग नेहमीप्रमाणे Happys Endings .एखादी लव स्टोरी.एखादा Adult परिच्छेद ,असो. पण आम्ही ती पुस्तके वाचली,डोक्यावर घेतली ,आजही ही तिन्ही पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीतुन खाली आलेली नाहीत हे काय सांगते. असे झाले कारण तु ज्याप्रमाणे कथेच्या पार्श्वभुम्या बदलल्यास,थोडेफार नवे विश्व उलघडवलेस, आम्हाला गुंतवलस ते आम्हाला आवडल. पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे आणि तुझ्या कहाण्यात जो बदल व्हायला हवा तो दिसत नाही आहे. चौथ्या पुस्तकात तर तु फक्त चार चित्रपटाच्या पटकथा एकत्र केल्या आहेस.खरतर एक Message द्यायचा तु थोडाफार प्रयत्न केला आहेस खरा.पण तो मेसेज अजुन तुलाच समजलेला नाही हे लगेच कळते ,मग कशाला हा अट्टहास. चेतन, हे असे का ?

यावर तुझां MBA style उत्तर मला मिळेल, "मी लोकांना जे आवडेल ते देतो." वाचकांची पातळी घसरली, म्हणून मग मीही घसरलो. बरोबर आहे, रसिकतेचे अवमुल्यन तर सगळीकडेच झाले आहे. पण चेतन, त्याला बदलायची ताकद तुझ्यात आहे रे .आज ''चेतन भगत'' हा एक ब्रँड झाला आहे. मी हे पत्र अरविंद अडिगाला का लिहिले नाही? नाही लिहिणार, कारण अभिरूची बदलायची ताकद तुझ्यात आहे. त्याच्यात नाही. आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.एवढा लोकांचा विश्वास तुझ्यावर आहे.मग तु लोकांना बदलवु शकत नाहीस का? तु म्हणतोस, मला नव्या भारताचा घटक बनायचे आहे,तो घडवायचा आहे. मग आपली कथा सांगायची ताकद तु त्यासाठी का वापरत नाहीस? अशाच एखाद्या कहाणीतुन तु तुला समजलेला ,भावलेला आणि तरुण जनतेला उपयुक्त विचार, भावना लोकांच्या गळी उतरवु शकत नाहीस का? तसा प्रयत्न तु केलास थोडासा .पण त्यात Message तर गेला नाहीच, पण कथाच कोसळली. तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का रे?मग तुझी ती स्टोरी आठवायला पुन्हा चित्रपटाला जायचे.(थ्री इडियटस, हॅलो) आम्ही तुझ्याकडून जरा चांगल्या ,मनाच्या कोपर्‍यात कायम्न टिकुन राहील अशा लिखाणाची अपेक्षाच ठेवायची नाही का? एकदा सांग बाबा या प्रश्नाचे उत्तर......

तु चित्रपट लिही रे, जरूर लिही. 200 रूपयाचे तिकिट काढून आम्ही ते पाहू ही. पण मनोरंजनाला जीवनात दुय्यम स्थान आहे. ते साधन आहे साध्य नव्हे. तुझ्या स्वतःच्या शैलीत तु या आयुष्यातल्या ध्येयासंबंधी,ते पुर्ण करतानाच्या थराराविषयी ,जीवनातल्या निखळ आनंदाविषयी कधी लिहिणार?असं कृत्रीम कॉल सेंटर्चे जग किंवा अकल्पित घटनानी भरलेली लव्ह स्टोरी असेच काहीसे तुझे पुढचे लेखन असणार का?आम्हाला तुझ्याकडुन नव ,चांगले वाचायचय.आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. भारतीय राज्यकर्त्यानी देशाच्या उज्ज्वल भविश्यासाठी ज्या संस्था काढल्या. त्या दोन्ही संस्थांचा तु प्रतिनिधी आहेस.तुला स्वतःला व्यक्त करायची ताकद आहे. ती इथे वापर ना,पोटापाण्यासाठी चित्रपट लिहिणे वेगळे पण आपली लेखणी त्यासाठी खर्ची घालवणे वेगळे. या चित्रपटातून बाहेर ये, काहीतरी Quality, Clasic दे.आम्हाला नवी उमेद दे. सांग आम्हाला काहितरी आणि, हे फक्त तुचं सांगु शकतोस. अगदी साधी साधी गोष्ट तु आमच्या मनात बिंबवु शकतोस. कारण,
Young India loves to hear you.

मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो. पण एमएनएस वर केलेले. sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे. आमचा हिरो वैचारिकरित्या इतक्या अस्थिर, अनस्टेबेल आहे का? तुझ्या चार पुस्तकात एक बर्‍यापैकी सारखे पण होते ते म्हणजे तुझे सगळे नायक सीस्टीमच्या विरोधात जातात. बरोबर आहे ,हा विचार तु देऊ इच्चितोस .पण प्रत्येक जण त्यात हरतो आणि कोणती तरी तिसरी व्यक्ती त्याला मदत करते. आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना?

मी खुप बोलतोय मला माहित आहे, बरेचसे चुकिचेही असेल. कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे. खरतर हे सगळे माझ्या अपेक्षाभंगातून आलेले आहे. , पत्र लिहिण्याइतकी आत्मियताही कुठुन आली ते माहित नाही.कदाचित मी पण IIT त जायचे स्वप्न पाहतोय म्हणून आली असेल. मी पण गोंधळलेलो आहे. तुझ्याकडुन अशी अपेक्षा ठेवावी की नको, माझ्या हिरोला मी असे खडे बोल सुनवावेत का? नाहीतर, अशा Movie style पुस्तकात messeage शोधत बसावा का? नाहीतर असा मेसेज वगैरे काही नसते, असा दिशा देणारा कोण नसतो, लिखाण फक्त मनोरंजनासाठी असते ,निदान तूझे तरी तसे आहे असे समजायचे का? सांग रे, यंग इंडिया जाउ देत, निदान I Want to hear from my Idol, असो,जास्त बोलत नाही फक्त एवढेच की
I am waiting .........

तुझा फॅन,
विनायक पाचलग

संस्कृतीवाङ्मयसाहित्यिकसमाजप्रकटनलेखमत

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

9 May 2010 - 9:12 am | प्रकाश घाटपांडे

युवा विशेषांकाच्या या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो त्यावेळी ईनायक चा उल्लेख कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी आदरपुर्वक केला. युवा पिढीचे प्रतिनिधी!
लगे रहो ईनायक
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रा's picture

9 May 2010 - 11:12 pm | चित्रा

लगे रहो. असेच म्हणते.
आज आपल्या आजूबाजूला जी तरूण मुले आहेत (विनायक यांच्या वयाची) त्यातील कितीजण इथे मिसळपावावर लिहीत असतील? कितीजण रोजच्या वर्तमानपत्रात लिहीतात? साधनेला तरूण मुलांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे हवे असतील, पण प्रसारमाध्यमात लिहीण्याची इच्छा असलेले, आणि तसे सातत्याने प्रयत्न करणारे विनायक यांच्यासारखे तरूण फारच थोडे. त्यामुळे लगे रहो.

विनायक यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नसाव्यात, ज्यांना चांगले लिहीता येते असे वाटते त्यांच्याचकडून अधिक अपेक्षा असतात.
अर्थात चेतन भगत यांची पुस्तके आवडली नाहीत म्हणून सांगणारेच जास्त भेटले आहेत. पण स्वतः वाचलेले नसल्यामुळे मत काही नाही.

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 9:23 am | विनायक पाचलग

विनोद शिरसाठांचे लाख उपकार आहेत माझ्यावर
नुकतेच त्यांच्या सहकार्याने एक उपक्रम सुरु केला आहे.
http://www.rangakarmi.com/?p=80
त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच ,नाही का ???
धन्यवाद
विनायक

प्रभो's picture

9 May 2010 - 9:54 am | प्रभो

चेतन भगत ला मराठी येते का??

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 10:05 am | विनायक पाचलग

मित्रा ,हा लेख साधनाने इंग्रजीत भाषांतरीत केलेला आहे.
हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे (कोणत्याही मुद्द्याला उत्तर दिलेले नाही)
धन्यावाद
विनायक

Nile's picture

9 May 2010 - 11:08 am | Nile

हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे

अरे वा! अभिनंदन! बराच मोकळा वेळ दिसतो चेतन भगत कडे सद्ध्या! ;)

-Nile

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 1:24 pm | विनायक पाचलग

त्याने मला उत्तर तरी दिले
रिकामा वेळ असावा असे वाटते....
कारण सध्या त्याने नोकरी सोडून पुर्ण वेळ लिखाणास द्यायचे ठरवले आहे असे समजते...

टारझन's picture

9 May 2010 - 10:52 am | टारझन

नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे .

वेलकम कोदा-जी. पुर्ण अंतरजाल गेल्या सहा महिण्यांपासुन २-२ पोळ्या कमी खात आहे :) अन्नाचा गेल्या सहा महिन्यांत अपव्यय भयंकर वाढला आहे. :) आपण आल्याने हा अपव्यव बंद होणार हे णक्की. :)

ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे.

खुलाश्याबद्दल धण्यवाद :)

मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...

अनेक घटणांवर एखादा खुमासदार लेख होऊन जाउ द्या मालक ;) अणेक शिकायला , अनुभवायला मिळालं , ह्यात आनंद आहे. आमचे सर्वांचेच आपल्यावर खुप खुप प्रेम आहे/ राहिल.

याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता,

उप्स , वरची वाक्य कॅन्सल .. कॅन्सल ;)

आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.

हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा :)

पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.

=)) =)) =)) =)) कोदांनी भगतच्या "लिखाणाचं" जजमेंट पाहुन आज डोळे पाणावले.

आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे

चेतन ने नवनविन शिव्या शोधुन स्वतःच्या पुस्तकात टाकणे अपेक्षित आहे काय ? बाकी अंतरजालावरचा जुणा भ-कार "भां!! बा!!!" तसाच असुन त्यातली नाविन्यता अजुन हरवली नाहीये :)

ते साधन आहे साध्य नव्हे.

बापरे !! =))

sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे.

=)) =)) =)) =)) =)) अरे ते "अ‍ॅडल्ट कंटेंट" आहे रे बाबा !! तुझ्यासाठी नाही ;)

मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो.

"नसेलही" म्हणजे काय ? असण्याची शक्यता आहे काय?

कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे.

=)) =)) =)) आहे आहे , पुसटशी "शक्यता" आहे खरी !!

बाकी हे पत्र , सुदुर पुर्वेतुन सुदुर पश्चिमेकडे लिकील्या गेलेल्या पत्राच्या तोडीचे आहे , ह्यात वाद नाही ;)

- आपला फॅण
नागपुरी संत्रा

तळ टिप : दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच ! पत्राची "ओरिजिनल" प्रत वाचायला मजा आली असती.
तळ टिप-२ : तिकडे ब्लॉग वर वाचुन एक प्रतिक्रीया दिली होती, पण ती कधीच प्रसिद्ध झाली नाही, नाही नाही कारण विचारत नाहीये ;)

प्रभो's picture

9 May 2010 - 10:53 am | प्रभो

>>हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा

=)) =)) =))

=)) =))

=))

=)) =))

=)) =)) =))

* मगाचा प्रतिसाद लेखाच्या आतलं मटेरियल न वाचता दिला होता.. :D

प्रकाश घाटपांडे's picture

9 May 2010 - 12:38 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या मते टारझणनी हे पत्र आदुगरच वाचले होते.

दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच !

साधणा हे दैणीक नसुन साप्ताहिक आहे.

नाही नाही कारण विचारत नाहीये

आम्हाला आदुगर ते भय वाटल होत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

ज्ञानेश...'s picture

9 May 2010 - 12:24 pm | ज्ञानेश...

चेतन भगतकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या आहेत तुम्ही.

चिरोटा's picture

9 May 2010 - 12:44 pm | चिरोटा

सहमत आहे. लेखकांबद्दल्,त्यांच्या पुस्तकांबद्दल एवढे सेंटी होवू नये असे वाटते.चेतनची पहिली १/२ पुस्तके बरी होती.क्लासिक ह्या शब्दापासून शेकडो मैल दूर असली तरी वाचनिय होती.सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे.श्री भगत कॉलेजांत वगैरे जावून तरुणांना मार्गदर्शन वगैरे करतात्.मला 'brand building excercise' चा एक प्रकार वाटतो.
भेंडी
P = NP

इंटरनेटस्नेही's picture

9 May 2010 - 2:31 pm | इंटरनेटस्नेही

सहमत, असेच म्हणतो.
--
(स्वतःच स्वताचे नेतृत्व करणारा तरुण)
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

अप्पा जोगळेकर's picture

9 May 2010 - 1:24 pm | अप्पा जोगळेकर

सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे कारण उघड आहे. भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे. एका मोठ्या गटाचं फॅन फोलोईंग मिळवणं हेच ध्येय असणार. भगतची पुस्तकं वाचताना फारसा विचार करावा लागतोच कुठे? एक मात्र आहे की चेतन भगतचं पुस्तक वाचतो हे सांगण्याची तरुणांना फार हौस आहे. बाकी हा भैय्या भगत काही बरळला (गरळला) का मनसेबद्द्ल ? कृपया माहिती पुरवावी.

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 1:33 pm | विनायक पाचलग

अपेक्षा नव्हे...
आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो.
आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ,कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले....
बाकी भेंडी बजारच्या मताबद्दल सहमत....
धन्यवाद
विनायक
मा .टारझन यास ,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मुळ लेखासाठी साधनाची साइट पहा
त्यावर मराठीतला लेख उपलब्द्ध आहे ,आणि याचे इंग्लीश भाषांतरही असेल कदाचित...
(जमले तर साधनाचा इतिहास आणि त्यातले लेखही पहा म्हणजे साधनाचा उल्लेख दैनिक साधणा करताना विचार करावासा वाटेल...असो ,)

छोटा डॉन's picture

9 May 2010 - 5:27 pm | छोटा डॉन

श्री. पाचलग,
नमस्कार ...

>>आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो.
'चेतन भगत प्रभावशाली व्यक्ती आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असु शकते मात्र त्याच्यात कशी काय क्वालिटी आहे व त्यामुळे त्याला प्रभावशाली मानावे लागेल हे मला अजुन समजले नाही.
इंग्रजीतुन बिनधास्त ( म्हणजे मराठी आंतरजालाच्या भाषेत बा*** **त अशा शैलीत लिहणारा ) लेखन करणारा एक भारतीय म्हणुन त्याची 'माफक' ओळख आहे, अर्थात मिडियाला हाताशी धरुन त्याने त्याचे पुस्तकांचे मार्केटिंग चांगले केले हा भाग वेगळा.

बाकी त्याची पहिली २-३ लै हौसेने वाचली, त्या काळात फॅडच होते म्हणा ना 'चेतन भगत' वाचायचे. त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, बाकी पुस्तके यथायथाच होती / आहेत. ह्याच कारणामुळे त्याची नवी २ पुस्तके वाचु वाटली नाहीत, ज्यांनी वाचली आहेत त्यांचे मत खास असे चांगले नाही.
हां, मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, त्यामुळे तुमचे 'सोशल स्टॅटस' वगैरे वाढते ( 'हे ड्युड, फ्रीक आउट, हॅव फन, यु आर रॉकिंग बेबी' वगैरे प्रकारात सदर पुस्तकाने जरा जास्तच अ‍ॅडवँटेज मिळतो ) ;)

>>आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते,
हरकत नाही, अपेक्षा ठेवणे केव्हाच वाईट नाही, अगदी कुणाकडुनही.
पण एक सांगु का पाचलग, ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवाव्यात ना असे भारतात बरेच लोक आहे, अहो १ शोधा १००० सापडतील. क्षुल्लक गोष्टींसाठी मिडिया हाताशी धरुन बोंबा मारणार्‍या भगताला एवढा भाव कशाला देताय ?
असा काय मोठ्ठा तीर त्याने मारला आहे.

वर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही त्याचे 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत समजले नाही )' वर फॉलोअर वगैरे आहात.
नाय मज्जा वगैरे म्हणुन ठिक आहे पण अशा गोष्टींच्या जास्त फंदात पडु नका असे सांगु वाटते. बदल किंवा 'चेंज' असा ट्विटरवरुन घडत नसतो.
माफक पब्लिशिटी व काही उच्चभ्रु वर्तुळातल्या पार्ट्या किंवा पेज-३ अ‍ॅपियरन्सेस सोडुन ह्या सेलेब्रिटीजना ट्विटरचा दुसरा काही उपयोग होत असेल असे मला वाटत नाही.
जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका.
असो.

>>कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले....
छान केलेत.
तुम्हाला जास्त 'रिअ‍ॅलिटी' सांगत बसत नाही, तुम्ही जे करता ते चांगलेच आहे.
असो.

पण जरा एक सांगता का हो ?
कोणता हा 'फार मोठ्ठा क्रॉस सेक्शन' ?
हा वर्ग देशासाठी किंवा समाजासाठी 'ग्रासरुट' लेव्हलवर किंवा कुठेही काय करतो हो ? निदान 'मतदान' तरी करतो का हा वर्ग ?

असो.

- ( थोडक्यात ) छोटा डॉन

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 6:26 pm | विनायक पाचलग

डॉनसाहेब
आपल्या बहुतांश मतांशी सहमत .........
फक्त एवढेच की अपेक्षा धरु शकणारे लोक बरेच आहेत ..पण त्यानी केलेले काम लोकानपर्यंत अजिबात किंवा फार कमी प्रमाणात पोहोचत आहे. चेतन भगत ने ट्विटर वरुन काही लिहिले की त्याची बातमी होते ,आणि २ दिवस आख्या भारतीयाना ती बातमी ऐकावी लागते ..हॅमर केल्यासारखी ( हा आपला मीडियाचा दोष आहे .मात्र ऐकावे लागते हे मात्र नाकारता येत नाही.)
आजकाल दुय्यम गोष्टीना मोठे केले जाते हे मान्य . ही तर माझी नेहमीची खंत आहे ..विनय हर्डीकरानी सुमारांची सद्दी या लेखात त्याविशयी खुप छान बोलले आहे असे समजते(हा लेख कोणाकडे असेल तर मला पाठवुन द्या प्लीज...) पण त्यातल्या त्यात बरा ..असे आपण चेतन बाबत बोलु शकतो...आणि त्याने सिंबॉयसीस मध्ये वगैरे ज्या बाता मारल्या त्यावरुन तर ते फारच वाटते...
राहिता राहिला प्रश्न क्रॉस सेक्शनचा..
या मराठी लेखाबाबत मला आणि साधनाला साधारण इथे आले त्याच रकाराचे प्रतिसाद आले.
मात्र हा लेख जेव्हा ईंग्लीश मध्ये मी टाकला , तेव्हा माझ्याशी भांडण्यासाठी काही तरुण लोकांचे मेल आले ज्यात त्यानी अगदी मुद्दे काढुन भगते आम्हाला वाचायची आवड लावली असे बरेच काही होते..
असा बराच मोठा तरुण वर्ग आज त्याला फॉलो करतो असे वाटते,हा ही माणसे ग्रास रुट वर जाऊन शुन्य काम करतात हे मान्य ..
मात्र या लोकानी काम करणे ही देशाची गरज आहे ,त्यानी १% तरी काम केले तरी परिस्थिती बदलु शकते .
आणि ते बदलावेत म्हणुन त्याच्या पेनातुन काही चांगले यावे म्हणुन ह अलेख/पत्र इतकेच....
विनायक

> समजले नाही )'
> जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका.

कधी ईराणच नाव ऐकलाय?

छोटा डॉन's picture

9 May 2010 - 11:26 pm | छोटा डॉन

>>कधी ईराणच नाव ऐकलाय?
हो, ऐकले आहे की.
इलेक्शन कँपेन आणि ट्विटरचा अपग्रेड डिले ह्या किश्श्यामध्ये आम्ही 'इराण'चे नाव ऐकले आहे बरं का.

बाय द वे, तुम्ही 'शशी थरूर' आणि 'ललित मोदी' ही नावे ऐकली आहेत का ?
( आजकाल दोघेही 'घरी गेले' म्हणे ) ;)

------
(गुगल बझ्झ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 2:53 pm | इन्द्र्राज पवार

"....आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ....."

नक्कीच.... आणि चेतन म्हणजे कुणी ऑर्डीनरी डिक टॉम हॅरी तर निश्चितच नाही. तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर... त्यामुळे ज्यावेळी आपला सचिन चुकतो, खेळापेक्षा जाहिरातीत जास्त रमतो, त्यावेळीही आपण "समजुती"च्या दोनचार गोष्टी सांगतोच.... (इतरांना सांगत नाही, कारण... सचिन आपला आहे.... त्याच भूमिकेतून चेतन भगत या युवापिढीचा तेजस्वी प्रतिनिधी आहे.... आणि श्री.विनायक यांच्या "साधना" लेखात हाच आपुलकीच्या सावल्या दिसतात, हे त्यांच्या सौम्य भाषेवरून प्रतीत होते.

एका सुंदर वाचन आनंदाचा अनुभव आला, त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 3:15 pm | विनायक पाचलग

धन्यवाद इंद्रराज....
विनायक

विशाल कुलकर्णी's picture

10 May 2010 - 2:52 pm | विशाल कुलकर्णी

तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर>>>>

हे मात्र कायच्या काय बर्का इंद्रदेवा :-) तुम्ही भारतीय साहित्य फारसे वाचत नाही असे दिसते. अहो आयपीएल मध्ये दहा पंधरा सिक्स मारले म्हणून युसुफ पठाण तेंडूलकर होत नाही. हलके घ्या. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विकास's picture

9 May 2010 - 5:33 pm | विकास

विनायक,

पत्र वाचले आणि साधनाने छापल्याबद्दल अभिनंदन!. हे पत्र, काही अंशी आवडले. काही अंशी म्हणताना मी तुझे पत्र कमी करत नसून वर जे ज्ञानेश आणि भेन्डि बाजार यांनी जे म्हणले आहे त्या संदर्भात थोडेसे म्हणायचे आहे.

मला कायम प्रश्न पडतो की जर चेतन भगत हा आय आय टी तील आणि नंतर एमबीए वगैरे नसता तर त्याची ही पुस्तके इतकी खपली असती का? पॉप्युलर झाली असती का? - आणि ती देखील विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक म्हणून?

अर्थात त्याला तू पत्र का लिहीले आहेस (आणि इतर कुणाला का नाही) ह्याचे उत्तर तुझ्या पत्रात आहेच आणि त्याच्याशी मी सहमत आहे. त्याचा इंपॅक्ट आहे म्हणून त्याच्या कडूनच अपेक्षा करणे योग्य. त्या अर्थाने तुझ्या या पत्राशी सहमत.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुहास's picture

9 May 2010 - 7:06 pm | सुहास

कोण हा चेतन भगत, कुणी सांगेल का? :/

--सुहास

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 7:57 pm | विनायक पाचलग

त्याला म्हणे टाइम मासिकाने जगातील प्रभावशाली व्यक्तीत स्थान दिले आहे....

राजेश घासकडवी's picture

9 May 2010 - 7:09 pm | राजेश घासकडवी

पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.

मी तुमचा लेख १४० अक्षरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.

Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article.

बसलं की.

राजेश

छोटा डॉन's picture

9 May 2010 - 7:17 pm | छोटा डॉन

>>Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article.
=)) =)) =))
जबर्‍या !!!
घासकडवीसाहेब, जरा मराठीतली '१४० अक्षरे' येऊद्यात अशी विनंती कारण प्रस्तुत लेखकाचा लेख मराठीत आहे.

------
( सरासरी १४० 'ओळीं'वाला) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 7:36 pm | विनायक पाचलग

मानले बुवा आपल्याला
पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?

टारझन's picture

9 May 2010 - 7:51 pm | टारझन

>> पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?
अगदी बरोबर आहे पाचलग साहेब ... :)

परिकथेतील राजकुमार's picture

10 May 2010 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

मानले बुवा आपल्याला
पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?

बाझवला भांचोत भगत्या तुझ्या पुस्तकानी डोक्याची आई माई एक केली भाड्या. असले वांझोटे मैथुन करायला सांगत कोण रे तुला ?

कोदा आले का हो सगळे मुद्दे ?

प्रती,

श्री. टारझन
आता एक कोदा मिसळपावात असा फर्मास लेख येउन जाउ दे बॉ !!

टार्‍याचा फॅन
फॅनेश

श्रावण मोडक's picture

9 May 2010 - 10:27 pm | श्रावण मोडक

इफ यू कान्ट रेझिस्ट इट, एन्जॉय इट.
'साधना'ही हल्ली विनोद करत असतं. अर्थात, 'टाईम'ही करतंच म्हणा. मग त्यात थोडी भर तरुणाईनं टाकली तर बिघडलं कुठं. सो एन्जॉय इट गाईज... ;)

मनिष's picture

10 May 2010 - 10:55 am | मनिष

तो खरच लक्ष देण्याच्या लायकीचा माणूस आहे का?"अख्खा भारत" फॉलो करतो म्हणने धाडसाचेच नाही तर मुर्खपणाचे ठरेल...त्याची सध्या चलती आहे, ठीक आहे पण त्याची पुस्तके म्हणजे...असो!
कुठल्या "क्रॉस सेक्शन" वर परिणाम होतो नक्की??? माझ्या बहुसंख्य मित्रांना चेतन भगत वाचतो/आवडतो सांगायला लाजच वाटते...त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, पण बाकी भिकार आहेत. अगदी चोप्रा/जोहर चित्रपटांइतकी प्रेडीक्टेबल आहेत..तेच ते सेक्स चे वर्णन, मसाला आणि..याक!! प्लीज सचिनसारखा ह्याला "आपला" म्हणू नका, जिवाचा तळतळाट होतो!!!

मधे बाबा सहगल नावाचा एक गायक (?) होता, त्याचे ठंडा, ठंडा पानी (आणी इतर काही) व्हिडीओज खूप गाजले. तेंव्हा जर ट्वीटर, फेस्बुक असते तर त्याने ते खूपच छान वापरून घेतले असते, पण तो जे काही गायचा त्याला "प्रभावशाली" गायन म्हणने, असेच मुर्खपणाचे ठरेल. बाकी राजेशचा जवाब भन्नाट!!!

बहुतांशी छोटा डॉन शी सहमत. भारतात इंग्लिशमधे लिहिणारे खूप चांगले लेखक आहेत... अमिताव घोष वाचलय का? किंवा.....जाऊ दे!!!

As for Chetan Bhagat, let him write whatever he wants Who the f**k cares? He knows bloody well how to sell himself, but puhhhhhhhhhhlease; I am not buying it!!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

9 May 2010 - 10:55 pm | ब्रिटिश टिंग्या

>>Young India loves to hear you.

मला म्हातारा झाल्यासारखं वाटतयं!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

भडकमकर मास्तर's picture

10 May 2010 - 1:05 am | भडकमकर मास्तर

चेतनचं लेखन वाचून मला मजा येते असं म्हणणं इथे पोलिटिकली इन्करेक्ट असेल कदाचित..
पण वैयक्तिक मत द्यायचं झालं तर मी चेतन भगतची चारापैकी तीन पुस्तके विकत घेऊन वाचली...( तिसरे नाही वाचले..) पण तरीही पश्चात्ताप वगैरे काहीही झाला नाही... उत्तम करमणूक आणि माफक प्रबोधन वगैरे झाले...पण नक्की "पैसा वसूल" असे वाटले...
....
आता चेतन भगत राष्ट्र उभारणी , राष्ट्र चेतना, राष्ट्र जागरण करण्यासाठी मी लिहितो असे कुठे म्हणत असेल तर म्हणो बापडा.... त्यावर विश्वास ठेवून त्याला पत्र लिहायचे म्हणजे भाबडेपणा झाला, असे आमचे वैयक्तिक मत.... ________________________
बाकी अशी वाक्ये विशेष उल्लेखनीय वाटली...
१आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस.
२.तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का
_________________________

कहाणी तर आवडली.. एक्स्प्रेस छान झालीय म्हणे...
पण मूव्ही स्टाईल झालीय....
कादंबरी मूव्ही स्टाईल होणे म्हणजे नेमके वाईट काय हे स्पष्ट झाले तर बरे होईल....
___________
आमच्या थोड्याफार कुवतीप्रमाणे कादंबरी चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे उभी राहायला लागणे हे आम्ही तिचे यश मानतो बुवा...
पाचलगांच्या मते चित्रपटलेखन म्हणजे काहीतरी हीन दर्जाचे आहे ( मूव्ही म्हणजे जाता जाता टाईमपास करणे आहे, आणि पुस्तक म्हणजे काहीतरी गंभीर आणि उदात्त आहे)....

भडकमकर मास्तर's picture

10 May 2010 - 1:23 am | भडकमकर मास्तर

आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना?

ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...
खूपच मजा आली....

परिकथेतील राजकुमार's picture

10 May 2010 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार

ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...

मास्तर मी चुकुन "चेतनची आई" वाचले =)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पाचलग साहेब,लेख उत्तम आहे,पण काही प्रश्नसुद्धा आहेत. चेतन भगत सारख्यांची पुस्तके एवढ्या सीरियस्ली घ्यायची गरजच काय? अगदी आपण फॅन असलो तरीही. पुण्यात मुंबईत आहेत पण आमच्या कोल्हापुरात सांगलीत चेतन भागात आवर्जून वाचणारे लोक किती आहेत? अहो सगळ्याच खाण्यान पोट भरायच नसत काही काही गोष्टींचा जाता जाता जरा बकणा मारायचा ,तेवढीच जरा चव बदलायला. पीझझा बर्गर पोट भरायला एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज भाकरीभाजीच पाहिजे. जो नियम खाण्याचा तोच वाचनाचा . पोट भरीसाठी आजूबाजूला भरपूर पीक आहे चिंता कशाला ?

चेतन भागात वाचून देशात किंवा साहित्य विश्वात वैचारिक क्रांती होईल हि अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे.

मनिष's picture

10 May 2010 - 11:06 am | मनिष

@जिप्सी - आपला इतिहास अंमळ कच्चा दिसतोय! ;)

साधना-फेम उदयोन्मुख, प्रतिभाशाली लेखक तथा रंगकर्मी विनायक पाचलग हेच मराठी आंतरजालावरील सुप्रसिध्द "कोदा" तथा - कोल्हापुरी दादा आहेत. त्यांचा (आयआयटीत जाईपर्यंत) मुक्काम कोल्हापुरलाच की वो! त्यांच्या साहित्यसाधनेत व्यत्यय येणार नसेल तेंव्हा त्यांची भेट घ्याच, असा आमचा (म्हणजे माझाच, अंगात डान्या संचारला की होते असे, आदरार्थी बहुवचन स्वतःसाठी) आग्रह आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 May 2010 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजिबात इंग्रजी न वाचणार्‍यांनी सवय म्हणून चेतन भगतची पुस्तके जरूर वाचावीत. 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचलं, ही चूक झाली हे मान्य करते. 'हॅलो' नावाचा पिक्चर ('वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर'वर आधारीत) पाहिला यापुढे चेतन भगतचं नाव पाहिलं की डोळे मिटून झोप काढते.
कथाच वाचायच्या असतील तर मग चेतन भगतपेक्षाही अनेक चांगले भारतीय कथालेखक आहेतच ... वर मनीषने अमिताव घोष यांचा उल्लेख केला आहेच.

मुद्दाम होऊन चेतन भगतचीच पुस्तकं वाचावीत असं काहीही खास त्याच्याकडे नाही.

अदिती

मिसळभोक्ता's picture

11 May 2010 - 4:31 am | मिसळभोक्ता

मी त्याची चारही पुस्तके वाचलीत. कॉल सेंटर आणि टू स्टेट्स अजीबात आवडले नाही.

पण फाइव्ह पॉईंट समवन, आणि थ्री मिस्टेक्स मला खूप आवडले.

बर्‍याच तरुणांना/तरुणींना चेतन भगत आवडतो, असे कळले. मलाही त्याचे लेखन आवडते.

पाचलगांनी चेतन भगतचा आदर्श समोर ठेवून काहीतरी करावे, असा माझा त्यांना वडीलकीचा सल्ला आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर's picture

10 May 2010 - 11:15 am | विंजिनेर

चालायचंच...
पाचलगः अहो देशांत आणि परदेशात हजारो (ललित)पुस्तके बाजारात येत असतात. सगळ्याच लेखकांनी वाचकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या तर बकवास लेखक म्हणून आम्ही शिव्या द्यायच्या तरी कुणाला? पैसे वाया गेले म्हणून रडायचं तरी कुणाच्या नावावर?

चेतनचे त्यासाठी तरी किमान कौतूक केले पाहिजे ना! फाईव्ह पाईंट समवन ठिक होते. लोणी+आलू पराठ्यांचं वर्णन आणि शेवटचं हिरोचं आणि हिरविणीचं हॅप्पी एंडिंग आपल्याला तरी आवडलं बुवा..
तुम्ही जेम्स हॅडली चेस वाचायचा का हो? (मुखपृष्ठासकट ;))

बाकी तुमची साधनेत लेखन करण्याची वृत्ती मात्र खरंच कौतुकास्पद आहे(पुढे जाऊन बराक ओबामाला पत्र लिहू नका म्हणजे झालं ;) ). लगे रहो...

जिप्सी's picture

10 May 2010 - 11:33 am | जिप्सी

मनीष साहेब माहितीबद्दल धन्यवाद ! पण आमचा इतिहास कच्चा कसा काय ? आम्ही आमच्या प्रतिसादात इतिहास कुठ काढलाच नव्हता ! असो ! तरी जरा वेळात वेळ काढून खुलासा करावा हि विनंती.
(इतिहासच नव्हे सर्वच विषयात अंमळ नाही पूर्णच कच्चा असलेला)
जिप्सी यशोधन जोशी

मनिष's picture

10 May 2010 - 11:50 am | मनिष

अहो जरा ह.घ्या.

इतिहास म्हणजे मराठी आंतरजालिय इतिहास...एक दैदिप्यमान पर्व निबंदकार कोदा तथा श्री. रा.रा. विनायकराव पाचलगसाहेब ह्यांच्या नावावर आहे. लोकप्रिय श्री. रा.रा. 'बळेच टरउडवी' तथा 'टारझन' ह्यांनी त्यांच्यावर बरेच पोवाडेवजा लेखही रचले आहेत. आपणही जरा वेळात वेळ काढून थोडे खोदकाम करून इतिहासाचा लुत्फ उठवावा ही विनंती! ;)

Dhananjay Borgaonkar's picture

10 May 2010 - 12:16 pm | Dhananjay Borgaonkar

मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते,

डॉनशी सहमत. आजकाल बरीच मंडळी बाबा भगतची पुस्तक वाचताना आढळतात सीसीडी मधे वगैरे.
यातली बरीच मंडळी निव्वळ शोसाठी पुस्तक उघडुन बसतात.

टाईमपास साठी ही पुस्तक बरी आहेत्.त्याचा एवढा कसला विचार करायचा. काथ्याकुट करण्याईतका काही तो महान लेखक वगैरे नाही.
त्याला entertainment business चांगलाच ठाऊक आहे.

नितिन थत्ते's picture

10 May 2010 - 12:31 pm | नितिन थत्ते

बहुधा त्याचं दुसरं पुस्तक बोअर होत असावं.

मी वन नाईट आधी वाचलं ते आवडलं होतं. नंतर फाइव्ह पॉइंट वाचलं ते नाही आवडलं. (पूर्ण वाचू शकलो नाही =)) )

नितिन थत्ते

मैत्र's picture

10 May 2010 - 12:34 pm | मैत्र

मधली पुस्तकं बकवास होती... विशेषतः कॉलसेंटर आणि त्यातला क्लायमॅक्स...
पण २ स्टेटस हे नक्कीच बरंच बरं आहे. मसाला भरला आहे वगैरे साठी आधीची फार मार खातील.
मूळात ही त्याची स्वतःची गोष्ट. आता त्याने नेहमी प्रमाणे सुपर शेवट करून तो वाट्टेल ते घडवून आणतो वगैरे केलं आहे.
पण मुळातली संकल्पना, दोघांचे अनुभव ... काही वाईट नाही.

विनायक... - या पुस्तकाबद्दल या अनुभवातून गेलेल्यांना विचारून पहा (२ स्टेटस लग्न केलेल्या). तुमच्या लेखाच्या पेक्षा बर्‍याच वेगळ्या प्रतिक्रिया मिळतील. आणि त्याचं मार्केटिंग काहिही असलं तरी आय आय टी च्या पहिल्या पुस्तकाशिवाय फार काही चांगलं घडलं नाहीये. तेही काही ग्रेट नव्हतं.. पण वेगळं / पाथ ब्रेकिंग होतं हे नक्कि.
तुमच्या लेखातून चेतन तू एक ग्रेट माणूस आहेस... मग हे असलं टुकार मनमोहन देसाईच्या पिक्चर सारखं का लिहिलंस असा प्रश्न करताय असं वाटतं...
चेतन तेवढा ग्रेट नसावा लेखक म्हणून ( त्याचं आय आय टी पवई / आय आय एम अहमदाबाद सोडता)

अवांतरः साधना फारच समाज वादी झालेलं दिसतंय... हा काय भांडवलशाही समाजवाद काय ? चेतन वगैरे...
राजा शिरगुप्पे ते थेट चेतन भगत !

बिपिन कार्यकर्ते's picture

10 May 2010 - 1:41 pm | बिपिन कार्यकर्ते

विनायक, मला चेतन भगत आवडत नाही, वाचायची इच्छापण नाही. एक कुठले तरी वाचले होते... अगदीच दुसर्म काहीच नव्हतं करायला म्हणून शेवटापर्यंत पोचलो होत. तेवढीच एक चूक झालीय आत्तापर्यंत. पण, हा लेखही नाही आवडला. (आधी वाचला होताच.) ... पण मिपावर परत आल्याबद्दल नक्कीच स्वागत. तुला अजून बरेच काही वाचायचे आहे, लिहायचे आहे... तेवढं जमव बाबा. बाकी तुझ्या धडपडींबद्दल कौतुक आहेच.

बिपिन कार्यकर्ते

तु एक गोष्ट नोटीस केलीस का त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात अंक असतोच असतो ...
Have u Noticed , Each Of his Book title has a number
Five Point Someone ,
One Night @ the Call Center,
The 3 Mistakes of my life (BIG MISTAKE indeed ;-) )
2 States - The Story Of My Marriage

यात अंक मात्र राहीला
आता अंकाच्या नावाने नविन पुस्तक बाजारात नाही आले तर बघा ;-)

असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे :-)
~ वाहीदा

अस्मी's picture

10 May 2010 - 4:02 pm | अस्मी

राईट...आणि एक

त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या हीरोंची नावं ही कृष्णाची आहेत

Five Point Someone : हरी
One Night @ the Call Center : श्याम
The 3 Mistakes of my life : गोविंद
2 States : क्रिश

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त..
स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

नितिन थत्ते's picture

10 May 2010 - 5:52 pm | नितिन थत्ते

>>असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे

हा हा हा.

हल्ली १०० रुपयाच्या आत येवढी जाड पुस्तके मिळत नाहीत. याची मिळतात. म्हणून असेल.

नितिन थत्ते

विशाल कुलकर्णी's picture

10 May 2010 - 2:57 pm | विशाल कुलकर्णी

वैदातै.. लै भारी निरिक्षण ! ~X(

बाकी चेतन भगत या माणसाचं लेखन आपल्यालाही नाय आवडत. खुप जणांनी सांगितलं म्हणुन फाईव्ह पॉईंट... वाचलं अर्धवट. सोपं इंग्रजी एवढी एकच बाब आपल्याला आवडली ;-) (नायतं आमाले कळ्ळंच नस्तं ना ;-) )

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विनायक पाचलग's picture

10 May 2010 - 3:08 pm | विनायक पाचलग

मित्रानो ,
मनापासुन आभार ....
तुम्हा सार्‍यांच्या मत मतांतराना वैयक्तीक रित्या सविस्तर प्रतिसाद देणे मला शक्य नाही..
माफी असावी..
पण या निमित्ताने या विषयावर चर्चा तरी झाली , माझ्या मते ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे...
धन्यवाद सार्‍यांचे..
बाकी माझे मुद्दे मी काही प्रतिसादातुन आणि मुळ लेखातुन मांडले आहेतच...
येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन ..
तेव्हा सर्व प्रतिसाद दिलेल्यांचे आणि भविष्यात देणार्‍यांचे मनापासुन आभार
विनायक

वेताळ's picture

10 May 2010 - 5:18 pm | वेताळ

चेतन भगत बद्दल पहिला काही माहिती नव्हती ती माहिती तुझ्या ह्या लेखामुळे मिळाली. लेखाचे शिर्षक चुकुन मी चेतन भगत चे अनावृत्त चित्र असे वाचले. बहुधा दृष्टीदोषामुळे असे झाले असावे.इंग्रजी एक पुस्तक वाचावे म्हटले तर ते पुर्ण करायला १ वर्षे लागायचे. त्यापेक्षा तुच त्याच्या एका एका पुस्तकाचा परिचय इथे करुन दे बाबा.
असो तुला १२ वीचे पेपर कसे गेले?

येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन ..

का बाबा कुठे जंगलात ट्रेकला निघाला आहेस कि काय?
वेताळ

ज्ञानेश...'s picture

10 May 2010 - 5:36 pm | ज्ञानेश...

'कोदा' या (टोपण) नावाची निर्मितीकथा कोणी सांगेल का?

की टारझनला खरड टाकावी लागेल? ;)

प्रशु's picture

10 May 2010 - 8:05 pm | प्रशु

चेतनचं 'थ्री मिस्टेक्स' तर अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाण पुस्तक आहे. गुजराथेत मोदी विरोधी पुस्तक म्हणुन त्याचा चांगला ऊपयोग होऊ शकतो. अगदी कोंग्रेसी प्रचार पत्रिका आहे.

बाकी तो काहि ग्रेट ब्रिट नाहि.....

बाकि आमच्या गोनिदंची सर नाहि हो कोणाला....

घाटावरचे भट's picture

11 May 2010 - 2:41 am | घाटावरचे भट

जनाब यह चेतन भगत तो बहुत ही घटिया कि़स्म का रायटर है.... आप उसकी कि़ताबें पढतेही क्यों हैं?