वार्‍यावरती भुरभुरती केस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 May 2010 - 7:08 pm

वार्‍यावरती भुरभुरती केस

तू समोर अचानक उभी, वार्‍यावरती भुरभुरती केस
पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ||

तसाच बांधा अन रंगही कांतीचा
गतस्मृतीत रममाण, विसरलो मी जग
काय अवस्था केलीस? ||१||

वार्‍यावरती भुरभुरती केस....

ओळखीचे ते रूप मनामध्ये खोल
आवेग अनावर, खेचतो मज तुजसमीप
ताबा न मनावर ||२||

वार्‍यावरती भुरभुरती केस....

कशास जुने काढावे, नवे आचरावे
एकदा वळून बघ, समजते मज जरी
तू तीच नसतेस ||३||

वार्‍यावरती भुरभुरती केस....
पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ||

०४/०५/२०१०
- पाषाणभेद (दगडफोड्या)

शांतरसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

sur_nair's picture

4 May 2010 - 9:08 pm | sur_nair

नीटशी जमली नाही पाषाणभेदजी. जरा तुटक तुटक वाटते.

मीनल's picture

6 May 2010 - 1:23 am | मीनल

सुंदर शब्द आहे पण ते चपखळ बसले नाहीत असे वाटते.
अर्थात मला एवढेही जमणारे नाही हे सत्य.
:''(
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

sur_nair's picture

7 May 2010 - 6:22 am | sur_nair

तिसरं कडवं बदलल्यावर छान झालं आहे. भाव चांगले आहेत पण शब्द नीट बसले नाहीत असे वाटते. तुमची हरकत नसेल तर हे कसे वाटते पहा. material तुमचंच आहे फक्त मांडणी बदलली थोडी

तू समोर अचानक उभी, वार्‍यावर भुरभुर केस
मज दिसता पाठमोरी, प्रश्न कोण आहेस? ||धृ||

अजून तसाच बांधा अन कांतीचा रंग
गतस्मृतीत रममाण, विसरलो मी जग
घायाळ असे केलेस ||१||

वार्‍यावर भुरभुर केस....

हृदयात खोलवर दडले, ओळखीचे ते रूप
आवेग अनावर मज, खेचतो तुजसमीप
ताबा न मना उरेच ||२||

वार्‍यावर भुरभुर केस....

कशास जुने काढावे, जे नवे तेच आचरावे
एकदा वळून तू बघ, मज जरी का समजते
कि तू तीच नसतेस ||३||

वार्‍यावर भुरभुर केस....
मज दिसता पाठमोरी, प्रश्न कोण आहेस? ||धृ||

राजेश घासकडवी's picture

7 May 2010 - 10:26 am | राजेश घासकडवी

कविता खुलून आलेली आहे. (पाषाणभेद, तुमच्या कवितेत 'सुधारणा' केली याची तुम्हाला हरकत नसेल असं वाटतं. ही व्यक्तीगत मतं आहेत हे समजून घ्या)

आता फक्त 'तू' विषयी संदिग्धता अजून वाढली तर बरं होईल असं वाटतं. म्हणजे

तू समोर अचानक उभी, वार्‍यावर भुरभुर केस
मज दिसता पाठमोरी, प्रश्न कोण आहेस?

अजून तसाच बांधा अन कांतीचा रंग

ऐवजी

दुरून ओळख भासे, वाऱ्यावर भुरभुर केस
झाकून चेहेरा दूर उभी, तू नक्की कोण आहेस?

ओळखिचा तो बांधा आणि कांतीचा रंग...

(अजून सुचलं तर नंतर लिहीन...)

टारझन's picture

7 May 2010 - 10:53 am | टारझन

कवितेची खोलुन मारलेली आहे (अर्थात , वाट लावणे म्हणजे "सुधारणा" करणे असे तुम्हाला वाटत असेल तर हरकत नाही असं वाटतं . ही व्यक्तिगत मतं आहेत हे समजून घ्या)

ह्याच्या पेक्षा पाभ्याची कवीता भारी आहे असं वाटतं. म्हणजे

दुरून ओळख भासे, वाऱ्यावर भुरभुर केस
झाकून चेहेरा दूर उभी, तू नक्की कोण आहेस?

ओळखिचा तो बांधा आणि कांतीचा रंग...

ऐवजी

बळेच श्याणपत्ती दाखवे , कवितांची वाट लावे
उघडुन मलपॄष्ठ , तु सोम्या की गोम्या आहेस ?

ओळखीचा तो ** आणि लाल तो रंग ..
बोला पुंडलिक वरदेहरीठ्ठल ... तुकाआआआआराम !!

- टारेश मज्जादाखवी
(अजुन टाईम मिळाला तर अजुन लिहीन ...)

राजेश घासकडवी's picture

5 May 2010 - 9:30 pm | राजेश घासकडवी

तू कोण आहेस, तीच नाहीस मध्ये जुन्या वेदनांच्या खपल्या जाणवतात. वळून बघ हेही आवडलं...

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 9:58 pm | इंटरनेटस्नेही

चांगली कविता..
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.