बराक हुसेन ओबामाचे अमेरिकेतील वंशवादाविषयी भाषण
मित्र मैत्रिणींनो,
काही असे शब्द असतात, की त्यांवर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
केनेडीचे, नेहरूंचे पहिले महत्वाचे भाषण. ("थिंक नॉट व्हॉट युवर कंट्री कॅन डू फॉर यू, थिंक व्हॉट यू कॅन डू फॉर युवर कंट्री", किंवा "व्हाईल द रेस्ट ऑफ द वर्ल्ड स्लीप्स्..")
मार्टीन ल्युथर किंग चे "आय हॅव अ ड्रीम" हे भाषण..
काल-परवाच असेच एक भाषण अमेरिकेत झाले.. मला प्रत्यक्ष ते भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही, पण आज न्यू यॉर्क टाईम्स वर हे भाषण वाचण्याची संधी मिळाली:
बराक हुसेन ओबामाचे भाषण
आजवर वंशवादाचा मुद्दा प्रत्येक अध्यक्ष पदाच्या उमेदवाराने गादीखाली ढकललेला आहे.. (आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड, उर्फ "ब्लाईंड फूल")
पण ओबामाने धाडस करून हा मुद्दा जाहीरपणे मांडला..
कृपया, आपल्या सहकार्याने ह्या भाषणाचे मराठी भाषांतर होऊ शकेल का ?
एन वाय टी च्या स्थळावर हे भाषण सात पृष्ठांवर विभाजित आहे.. सात सदस्यांनी ही सात पृष्ठे वाटून घ्यावी..
येथे भाषांतर तज्ञ आहेत, त्यांना हे सोपे जाईल, असे वाटते.
कळवा..
आपला आ. सर्किट
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



दुवा
वरील भाषणाचा दुवा.
क्षमस्व.
- सर्किट
+१
मी पूर्ण भाषण वाचलेले/ऐकलेले नाही पण काही भाग दुर्दर्शनवर बघीतला.. अतिशय प्रभावी भाषण.. 'रेशीयल स्टेलमेट' चा मुद्दा फारच आवडला. मी एक पान घ्यायला तयार आहे!
अवांतर: आपल्या तोंडाळ बायकोला आणि त्या मूर्ख धर्मगुरूला जरा आवरले तर बराक ओबामा हा आदर्श उमेदवार ठरेल!
भाषण ऐकूनही ??
अवांतर: आपल्या तोंडाळ बायकोला आणि त्या मूर्ख धर्मगुरूला जरा आवरले तर बराक ओबामा हा आदर्श उमेदवार ठरेल!
तोंडम्ळ बायको, किंवा मूर्ख धर्मगुरूंमध्ये काही वाईट आणि काही चांगले गुण असतात.
त्या वाईट गुणांसाठी त्यांच्यातला चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष्ह करू नये, हा मूळ मुद्दा ओबामाने त्या भाषणात मांडला..
(आम्हीही आजवर तसेच म्हणत आलो आहोत.. आहे तात्या तोंडाळ, म्हणून काय त्याला वाळीत टाकायचे ? त्याच्यातले चांगले गुण बघायला नको का विषयांतरावबद्दबद्दल क्षमस्व..)
- सर्किट
"मी पूर्ण
"मी पूर्ण भाषण वाचलेले/ऐकलेले नाही"
क्षमस्व
आपली भूमिका समजली..
धन्यवाद..
- सर्किट
चला
होऊन जाऊ दे..
पान क्र. दोन माझे.
चित्रा
सही
माझे तिसरे (किंवा इतर कुठलेही)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दोन पाने झालीत
दुसरे पान चित्रा, ह्यांचे
तिसरे नंदनचे..
आणखी चार पाने क्लेम करा, म्हणजे उरलेले पान माझे.
-- (आनंदित) सर्किट
भाषांतराच
भाषांतराचा उपक्रम छानच आहे..उद्या गुड फ्रायडे निमीत्त तीन दिवसांचा विकांत आल्याने बाहेरगावी असणार आहे. तो पर्यंत हे भाषण भाषांतरीत झाल्यास उत्तमच! नाहीतर सोमवारी जे कुठले पान राहिले असेल ते नक्की भाषांतरीत करेन. उत्साहाच्या भरात हे लिहायचे राहूनच गेल्यामूळे क्षमस्व!!
पान ६ घ्या
अन्यत्र केलेली उमेदवारमोजणी :a
१. ऋषिकेश
२. चित्रा
३. नंदन
४. मुक्तसुनीत (खाली बघावे)
५. धनंजय
६. (कोणी नाही - किंवा माहीत नाही)
७. राजेंद्र
कोलबेर कुठलेही एक पान घेण्यास तयार. तर त्यांनी पान ६ निवडावे.
सर्किट यांनी जुळवाजुळव करावी.
पान क्र ५ माझे
असे मी अन्यत्र म्हटले आहे. तर तेच ठेवतो. पान ५ - धनंजय
(पान १ ऋषिकेश करत आहे म्हणतो.)
उरलीत पाने ४,६,७
मी पान क्र. ४ घेतले!
आता शेवटची दोनच पाने ६, ७ उरलीत!
चतुरंग
फार हाइप्ड
ओबामाचे भाषण प्रभावी होते, यात शंकाच नाही. केनडी, लूथर किंगच्या भाषणांशी तुलना करणे जरी अतीच आहे. ही तुलना फार हाइप्ड वाटते.
ओबामा हावर्ड लॉ रिव्यूचा संपादक होता. बीबीसीच्या रॉबिन लस्टिगने त्याच्या भाषणात काढलेली गमतीशीर व्याकरणाची चूक वाचा.
अनेकांना ओबामाची देहबोली, त्याची भाषणे कधी कधी किंचित उद्धट वाटतात. रॉन फोर्नियेचा यावरचा ओबामा वॉक्स ऍरगन्स लाइन हा लेख वाचावा.
उपक्रमाला शुभेच्छा...
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भाषण श्रवणात अप्रामादिकच - लेखी प्रमाद संदर्भहीन
भाषण हे मुख्यत्वे श्राव्य माध्यमात आहे. त्याच्या लेखी प्रतीत त्या शब्दाचे स्पेलिंग चुकलेले दिसते, पण लेखन (प्रसार-सोयीसाठी) एक दुय्यम कृती आहे.
"हूज़" एकाच उच्चाराचे दोन अर्थ आहेत, आणि सोयीसाठी त्याची दोन स्पेलिंगे आहेत :
१. जो (कोण) आहे (who's)
२. ज्या (कोणा) चा/ची/चे (whose)
"जो आहे" आणि "ज्याचा" या अर्थांची गफलत बोलताना/ऐकताना पूर्णपणे अशिक्षित माणूस किंवा बालकही करत नाही. आणि भाषण बोललेले/ऐकलेले असते (लिहिलेले/वाचलेले गौण) हे निश्चित. बीबीसी वरील त्या ब्लॉगरने व्याकरणशास्त्र पुन्हा शिकावे.
तुमचे म्हणणे योग्यच पण
धनंजय,
हे जे तुम्ही म्हणता ते अगदी योग्यच आहे.
पण
१. बीबीसीच्या रॉबिन लस्टिगला व्याकरणशास्त्र पुन्हा शिकवण्याआधी आपण हे बघितले पाहिजे की अशी भाषणे वाचण्या/देण्यापूर्वी लिहिली जातात. भाषणलेखकांना त्यासाठी चांगले पैसेही मिळतात. अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या ओबामा यांच्या भाषणलेखकांनी who's and whose मध्ये गफलत करणे अपेक्षित नाही. लस्टिगने केवळ टेक्सकडे निर्देश त्यासाठीच केला असावा.
२. "-- the white woman struggling to break the glass ceiling, the white man whose been laid off..." मधल्या गमतीकडेही लस्टिग याचा इशारा असावा. एवढ्या साध्या गोष्टीसाठी बिचाऱ्याला पुन्हा साळंत कशाला पाठवता राव?
जाता-जाता, अमेरिकेत ओबामाला 'ड्रूल ओवर' करणं आता 'कूल' गोष्ट झाली आहे. I Got a Crush...On Obama अगदी हा गमतीशीर विडिओ बघावा
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
न्यूयॉर्क टाइम्स मध्ये चूक नाही, भाषण क्यूट न मानणार्यांसाठीही
बीबीसीच्या लस्टिग यांनी "रियल क्लिअर पॉलिटिक्स" नावाच्या संकेतस्थळाकडे निर्देश केला आहे. काही प्रसारमाध्यमांनी चुकीचे स्पेलिंग दिले आहे, आणि काहींनी नाही (उदा : न्यू यॉर्क टाइम्स).
त्यामुळे नेमकी कोणाची चूक आहे सांगणे कठिण आहे.
इंग्रजीतल्या स्पेलिंगच्या चुका जणू महत्त्वाच्या विचारांच्या चुका आहेत असे काढणारे लोक (शाळाशिक्षक नसले तर) साधारणपणे कुडूमुडू अनभिज्ञ असतात. मतिमंद नसलेला कुठलाही प्रौढ स्वभाषा चुकीची बोलत नाही, असे व्याकरणशास्त्राचे पायाभूत तत्त्व आहे. (बरळणे, लडखडणे, बोलताना मध्येच थांबावे लागणे, वगैरे, या व्यतिरिक्त.)
तरी अशा "राखुंडी" (संजोप राव यांचा शब्द) तज्ञांची पुस्तके कधीकधी तुफान प्रसिद्धी पावतात - उदाहरण "ईट्स, शूट्स, अँड लीव्ह्ज" - हे लिन ट्रस यांचे पुस्तक इंग्लंड आणि अमेरिका दोन्हीकडे "बेस्टसेलर" यादीत झळकले. त्यांच्या मिळकतीचा मला फार मत्सर नाही (मीही कुडूमुडू व्याकरणावर लिहितो की!) पण त्या या विषयावर तज्ञ मुळीच नाहीत. त्याचप्रमाणे लस्टिगही.
वैयक्तिक रीत्या माझा कल ओबामा यांच्यापेक्षा क्लिंटन यांच्याकडे आहे. त्यामुळे क्यूट-ओबामा यादीत मी जात नाही.
पण वांशिक भेदभावाविषयी अमेरिकेत हे आज एक महत्त्वाचे भाषण आहे, असे मला वाटते.
केनडी यांच्या "कॅथोलिक" भाषणाइतके हे भाषण नक्कीच ऐतिहासिक आहे. जर ओबामा राष्ट्रपतिपद जिंकले, तर हे भाषण कदाचित किंग यांच्या "माझे स्वप्न आहे..."भाषणाच्या ऐतिहासिक पंक्तीत जाऊन लगेच बसेल. जर ते जिंकले नाही, पण राष्ट्रकार्यात अग्रणी राहिले, भ्रष्टाचारात सापडले नाहीत, तरीही अनेक वर्षांनी हे भाषण बर्यापैकी महत्त्वाचे मानले जाईल. जर ओबामा काही गडबड करून लवकरच "राजकीय मरण" पावले, तर मात्र हे भाषण इतिहासात किरकोळ मानले जाईल (पण मानभावी मानले जाणार नाही).
(चर्चा मूळपदावर यावी, हा प्रयत्न.)
१००% टक्के सहमत
वरील मताशी मी १००% टक्के सहमत आहे. पण लस्टिग यांनी "इंग्रजीतल्या स्पेलिंगच्या चुका जणू महत्त्वाच्या विचारांच्या चुका आहेत" असा पवित्रा घेतल्याचे मला तरी वाटत नाही. ते तसे कुणाच्या मनात आल्यास काय करावे?
वैयक्तिकरीत्या मी हिलरीचाही समर्थक नाही.
ओबामांचे व्यक्तिमत्व अत्यंंत करिष्माई असेलही पण या "ऐतिहासिक" भाषणामुळे ओबामाला कवटाळण्याची, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची चांगली संधी मिळाली आहे. मला ओबामाने नियंत्रित वातावरणात केलेले भाषण किंग यांच्या 'आय हॅव अ ड्रीम'च्या पंक्तीत जाऊ शकेलसे वाटत नाही. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, त्या भाषणाची पार्श्वभूमी अतिशय वेगळी . किंग यांचे ते शब्द, आवाजातले उतारचढाव, लिंकन मेमोरियल समोरची ती लाखोंची गर्दी, सारे काही अद्भुत. म्हणूनच त्या भाषणाला आजही बघितले, ऐकले की अंगावर काटा येतो, पापण्यांचे काठ नकळत ओलावतात.
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
यापेक्षा
ह्या लेखाच्या अनुषंगाने एक अनुभव सांगावास वाटतो. बीबीसी काय किंवा सिएनेन काय, पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असलेल्या अश्या वाहिन्यांचे बाकीच्या देशांतील लोकांना काही सोयर सुतक नाही. मागे एकदा चीनने शार्क मारणे बंद करावे याकरता याच वाहिन्यांनी लॉबिंग केले होते. शार्क वाचवा अश्या आरोळ्या देणार्या तथाकथित सुधारणावाद्यांनी त्यांच्या देशांत कत्तल होणार्या गाईंचे मांस तोलून पहायला हवे होते. त्यांच्या लॉबिंगला भीक न घालता चीनने शार्क मारणे चालूच ठेवले आहे कारण हा तिथल्या कोळ्यांचा उपजिविकेचा आधार आहे आणि त्याचबरोबर हे मासे तिथल्या आहारात आधीपासून वापरात आहेत. गाई मारू नका म्हणून चीन अथवा भारत अथवा ह्याच वाहिन्यांनी आघाडी उघडल्याचे मात्र ऐकीवात आले नाही.
अमेरिकेच्या निवडणुकांचा जागतिक इव्हेंट करणार्यात आपणही या भाषणाचे भाषांतर करून हातभार लाऊ यात शंका नाही. त्याने आमचे कितपत प्रबोधन होईल ही शंकाच आहे. सर्किटरावांचा हेतू चांगला असला तरी माझ्यासारख्या व्यवहारी (आणि कूपमंडुक म्हणा हवे तर!) माणसाला मात्र या भाषणाच्या कागदांत भेळ खायला जास्त आवडेल.
यापेक्षा आयुर्वेदाचे वगैरे भाषांतर करायला मंडळी अशीच सरसावली तर छान वाटेल. असो. आपला तो ...
येथे दोन वेगवेगळे मुद्दे दिसत आहेत
१. हे भाषण भारताला गैरलागू आहे असा मुद्दा :
ॐकार यांचा हा मुद्दा तपशिलात खराच आहे. पण हे भाषण तपशिलांसाठी नव्हे तर तत्त्वासाठी भारताला/महाराष्ट्राला लागू आहे, असे मानून भारताबाहेर राहाणार्या अनेकांना वाटले. अशाच प्रकारे महाराष्ट्राबाहेर मिसळपावाचे काही सभासद राहातात. बेंगळूर, हैदराबाद, दिल्ली, इ.इ. मिसळपावकरांस रोचक, मनोभावक समर्पक वाटेल असे त्या त्या गावांतले काहीकाही ते मिसळपावावर लिहितील. (उदा. येथील राज जैन यांचे उत्तर भारतातील अनुभव, जे मानवस्वभाव सगळीकडे सारखाच असल्यामुळे महाराष्ट्रातल्या मिसळपावकरांनाही आवडतात.) लोक आपापल्या आजूबाजूचे अनुभव, आपापल्या विशेष कौशल्याच्या माध्यमातून मिसळपावावर आणतात. अमेरिकेतील काही लोक त्यांच्या आजूबाजूचे अनुभव त्यांच्या इंग्रजी-मराठी द्वैभाषिक कौशल्याचा उपयोग करून येथे आणत आहेत. आयुर्वैद्यकाच्या प्रशाळेत शिकणारे मिसळपावकर आपले संस्कृत-मराठी द्वैभाषिक कौशल्य वापरून आयुर्वेदाचे भाषांतर करायला सरसावतील. (ते सरसावत नाहीत त्याचा त्रागा या चर्चाविषयात अप्रस्तुत आहे असे वाटते.)
येथील अनेकांना हे भाषण भारतास/महाराष्ट्रास लागू वाटते, कारण याच्या अगदी समांतर चर्चा आपण कॉलेजात/घरात ऐकली आहे - अनुसूचित जातींविषयी आरक्षणाच्या बाबत. तशा जातीतला माझा मित्र म्हणतो की सवर्णांना शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा मारूनमुटकून मिळालेला आहे, त्यामुळे "मुक्त" स्पर्धा ही खरोखर मुक्त नसून सवर्णांसाठी पक्षपाती आहे. माझा सवर्ण मित्र म्हणतो की त्याने व्यक्तिशः कुठल्याही खालच्या जातीच्या व्यक्तीला मारलेही नाही आणि मुटकलेही नाही. मग आरक्षणाचा तोटा त्याला काव्हावा. दोघेही न्याय आपल्या बाजूने असल्याचे मनापासून मानतात, पोटतिडकेने बोलतात - मग यांची समेट कशी घडणार? बहुतेक नेते एकतर याच्याशीच बोलतात, किंवा त्याच्याशीच. भविष्यकाळात सर्वांनी एकात्म व्हायचे आहे असे वाटणार्यांचे या दोन्हीकडून-खर्या वैषम्याचे काय करावे? दोन्हीकडून-खरे-वैषम्य ही बाब अमेरिकेत काळ्या-गोर्यांमधील दरीत जाणवते. ओबामा बोलतात ते अशा प्रकारे भारताच्या अत्यंत समांतर आहे.
आता भारतातील तपशील अमेरिकेत निरुपयोगी आहेत असेही कोणी म्हणेल. तरी भारतातील स्वातंत्र्यलढ्याची तत्त्वे (तपशील नव्हे) अमेरिकेतील मार्टिन लूथर किंग जूनियर यांनी वापरली. आदान-प्रदान दोन्ही होत असते, व्हावे.
आता मायावती यांचीही अशी भाषणे असतील (त्यांनी ब्राह्मण-अनुसूचित अशी काही आघाडी बांधली आहे, असे आपण वर्तमानपत्रांत वाचतो.) त्यांनी इतक्याच विचारपूर्वक एखादे भाषण केले असेल तर तेही इतकेच, याहून अधिक समर्पक राहील. तुम्हाला तशी भाषणे सापडली तर जरूर येथे द्यावी, मी आवडीने वाचेन.
२. शार्कचा मुद्दा
हा इतका असमर्पक आहे, की त्याचे पुढील हास्यास्पद विडंबन तुम्हाला रुचावे :
"वाघ वाचवा" अशा तथाकथित सुधारणवादी आरोळ्या भारतातील शहरांतून ऐकू येतात. त्या शहरांमध्ये बोकडांची जी कत्तल होते, त्यांच्या मांसाचे वजन तोलून धरायला हवे. त्यांच्या लॉबिंगला भीक न घालता "व्याघ्रप्रकल्प" धुडकावून जंगलाकडच्या लोकांनी वाघ मारणे चालू ठेवले आहे. हा तिथल्या शिकार्यांचा उपजीविकेचा आधार आहे, आणि त्याचबरोबर व्याघ्रचर्म हे तिथल्या आसनांत आधीपासून वापरात आहेत. बोकड मारू नका म्हणून मुंबई अथवा दिल्ली अथवा ह्याच वाहिन्यांनी आघाडी उघडल्याचे मात्र ऐकीवात आले नाही.
कसे काय?
वंशवाद अथवा वर्णद्वेशाचा मुद्दा महाराष्ट्राला कसा काय लागू पडतो? जात-पात आणि वंश/वर्णभेदाच्या चर्चा समांतर आहेत हे मान्य केले तरी ह्या दोन्ही वादांची मूळे वेगळी आहेत ( वसाहतवाद, भांडवलशाही आणि धर्म, जातिव्यवस्था) त्यामुळे त्या त्या विषयांवरील चर्चा एकमेकांशी पडताळून बघता बरेचसे मुद्दे गैरलागू ठरतात.
आयुर्वैद्यकाच्या प्रशाळेत शिकणारे मिसळपावकर आपले संस्कृत-मराठी द्वैभाषिक कौशल्य वापरून आयुर्वेदाचे भाषांतर करायला सरसावतील. (ते सरसावत नाहीत त्याचा त्रागा या चर्चाविषयात अप्रस्तुत आहे असे वाटते.)
या चर्चाविषयात हा मुद्दा अप्रस्तुत आहे हे मान्य आहे, म्हणूनच तो तसाच सोडला.
आता भारतातील तपशील अमेरिकेत निरुपयोगी आहेत असेही कोणी म्हणेल. तरी भारतातील स्वातंत्र्यलढ्याची तत्त्वे (तपशील नव्हे) अमेरिकेतील मार्टिन लूथर किंग जूनियर यांनी वापरली. आदान-प्रदान दोन्ही होत असते, व्हावे.
स्वातंत्र्यलढ्याचे तपशील आणि तत्वे, भाषणबाजीच्या बाबतीतही लागू पडतात हे माझ्यासाठी नवेच आहे!
आता मायावती यांचीही अशी भाषणे असतील (त्यांनी ब्राह्मण-अनुसूचित अशी काही आघाडी बांधली आहे, असे आपण वर्तमानपत्रांत वाचतो.) त्यांनी इतक्याच विचारपूर्वक एखादे भाषण केले असेल तर तेही इतकेच, याहून अधिक समर्पक राहील. तुम्हाला तशी भाषणे सापडली तर जरूर येथे द्यावी, मी आवडीने वाचेन.
भाषणबाजीबाबत मुद्दा तोच आहे आणि माझे मत तेच आहे. मायावती असो अथवा ओबामा, जोवर ह्या भाषणांत राजकारणाचा भपकारा आहे तोवर त्यातून मांडलेले विचार समाजाभिमुख असतील ह्यावर विश्वास बसणे कठीण आहे.
शार्कचा मुद्दा असमर्पक कसा? वाघाचा मुद्दा तर विडंबनालाही गैरलागू आहे. वाघ हा कोणा मानवसमूहाच्या आहारातील घटक नव्हे. गाई, बोकड, कोंबडी, शार्क हे कोणा ना कोणा मानवसमूहांच्या आहारातील घटक आहेत. जर अमेरिका आणि युरोपातील देशांत गाय खाल्ली जाते तर चिनने शार्क खाण्यात हरकत घेण्यात कोणती तत्वे/तपशील समर्थनीय आहेत? ही बातमी म्हणजे अमेरिका आणि युरोप मधील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांना असला पोकळ पुळका येण्याचे हे ता फक्त एक उदाहरण आहे. एखाद्या निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी संस्थेने हाच मुद्दा मांडला असता तर त्यांची भूमिका नक्कीच समर्थनीय ठरली असती. पण जगाच्या कल्याणाचा विडा उचलल्याचा आव आणणार्या संस्था, प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांना 'आधी केले मग सांगितले' या उक्तीचा केव्हाच विसर पडला आहे. ह्या सगळ्याला अमेरिकेचे राजकारण हे एक महत्त्वचे कारण आहे हे नाकारून चालणार नाही.
इंग्रजी-मराठी द्वैभाषिक कौशल्याचा उपयोग करून अनुभव नक्कीच मांडावेत. मी नकारघंटा वाजवली म्हणून ते मांडता येणार नाहीत अशी परिस्थिती मिपावर नक्कीच नाही आणि तशी परिस्थिती असावी असे मला वाटतही नाही. पण एखाद्या गोष्टीची केवळ री ओढण्यात मात्र मला काही स्वारस्य नाही. माझ्याकडून मी यापुढचे तिरके प्रतिसाद इथेच थांबवतो आहे. सुज्ञजनांनी आपला वेळ भाषांतरात खर्ची घालून जनप्रबोधन करावे आणि या सदराचा योग्य उपयोग करून घ्यावा.
तुलना होऊ शकत नाही
ओक्के! ओबामाच्या भाषणात जात नाही. पण शार्कचा मुद्दा मात्र खटकला. शार्कची तुलना ही गायींशी होऊ शकत नाही. आज शार्कच्या कितीतरी जाती नष्ट होण्याच्या मर्गावर आहेत. (नुसते 'शार्क एक्स्टींक्शन' असे गुगलुन पहा!) चिन आणि जपान मधील होणारी शार्कची हत्या थांबवणे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने अधिक गरजेची नाही का? गायींच्या हत्येचे समर्थन नाही पण गायींच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर नाहीत त्यामुळे कत्तल थांबवण्याचे प्राधान्यीकरण करताना अर्थातच शार्क/ध्रुवीय अस्वले ह्यांना अधिक प्राधान्य देणे (गायी आणि बोकडांपेक्षा) आवश्यक आहे. पाश्चात्य प्रसार माध्यमांनी चिन/जपान मधील गायी मारण्याबद्दल आरडा ओरड केलेली नाही तशी केली असती तर तो त्यांचा दुटप्पीपणा ठरला असता. उद्या समजा एखाद्या पाश्चात्य प्रसार माध्यमाने ध्रुवीय अस्वलांच्या कत्तली थांबवण्यासाठी जन जागृतीची मोहिम हाती घेतली तर त्यांना देखिल आधी तुमच्या देशातल्या गायी मरायच्या थांबवा असेच सांगायचे का?
थोडक्यात इथे तुलना सफरचंदांची संत्र्यांशी केली जातेय (ऍपल्स टू ऑरेंजेस)!
त्रागा अनावशक वाटला.
वा!
ॐकारशेठ,
काय मस्त प्रतिसाद दिला आहे. फार आवडला!
(आनंदित) आजानुकर्ण
काय कुणी
काय कुणी भाषांतर केले की नाही?
का नुसतीच सरकटलेली बडबड?
गां* मे नही * और चले हग्गुः)
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
सर्किट यांनी
संकलन केले आहे आणि प्रकाशित केले आहे.