बोले हो बॉस कुणाला (विडंबन गीत), काटा रूते कुणाला (मूळ गीत)

प्रा सुरेश खेडकर's picture
प्रा सुरेश खेडकर in जे न देखे रवी...
20 Mar 2008 - 11:38 pm

बोले हो बॉस कुणाला,आक्रंदतात कोणी
मज प्यूनने बोलावे, हा दैवयोग आहे.

सांगा देऊ कोणाला,ऑर्डर ही हाफ चहाची
अन् ग्लास ही पाण्याचा,मी उठून घेत आहे.

स्टेनोस वदू पाहतो,घडतो अनर्थ तेथे
पार्ट्यांचा खर्च माझा,सगळाच वेस्ट आहे.

मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही
आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे.
============================================

प्रा.सुरेश खेडकर ( झेंडूची फुले परंपरा)
http://www.orkut.com/CommMsgPost.aspx?cmm=28868095

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 10:49 am | विसोबा खेचर

मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही
आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे.

क्या बात है, मस्त विडंबन...

आपला,
(आस्वादक) तात्या.

बाय द वे, तुमची स्टेनो दिसायला कशी आहे हो? :)

आपला,
(बाईलवेडा) तात्या.

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 7:35 pm | सुधीर कांदळकर

मजा आली.

शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.