उपक्रम

हर्शल's picture
हर्शल in काथ्याकूट
19 Mar 2008 - 5:55 pm
गाभा: 

हर्शल
उपक्रम ह्या मराथि ब्लोगबद्दल माहिति किन्वा त्या साइटचा पत्ता मिळेल का?

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 5:58 pm | इनोबा म्हणे

गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

19 Mar 2008 - 6:14 pm | विसोबा खेचर

गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा.

हेच म्हणतो! मिसळपाव ही काय चौकशी करायची खिडकी वाटली का रे फोकलिच्यांनो? :)

काय रे हर्षल, इथे ही चौकशी करण्यापूर्वी तू गुगलला गेला होतास काय?

पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील!

नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!

तात्या.

छोटा डॉन's picture

19 Mar 2008 - 6:40 pm | छोटा डॉन

"पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील!

नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!"

तात्या मज्जा वाटली राव, कुठनं कुठनं लोक येतात आणि काहिपण विचारतात...
बरे केलात चांगलं झाडलात ते ...
त्याला विचारा "कुठल्या गावचे ?" . मला वाटते "अलिबाग" वरून आला असावा ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बरे झाले तात्या तुम्ही हे क्लीयर केले. नाय तर्...एक टाळके विचारणार होते की पुण्यात सर्वात कुज्कट पाट्या कुठे लिहील्या जातात
पण ते सापडले या दुव्या वर http://www.busybeescorp.com/puneripatya/
आणि http://bombaydiaries.bombayaddict.com/2007/04/kahi-puneri-patya.html या इथे ही
............................................आपला पुणेरी कुज्कट पाट्या वाचुन वाचलेला विजुभाऊ

आजानुकर्ण's picture

19 Mar 2008 - 6:05 pm | आजानुकर्ण

इथे पहा

(उपक्रमी) आजानुकर्ण

हर्शल's picture

19 Mar 2008 - 7:00 pm | हर्शल

फारच उत्तम प्रतिक्रिया दिलित आपण. धन्यवाद.

गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा.

हेच म्हणतो! मिसळपाव ही काय चौकशी करायची खिडकी वाटली का रे फोकलिच्यांनो? :)

काय रे हर्षल, इथे ही चौकशी करण्यापूर्वी तू गुगलला गेला होतास काय?

पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील!

नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!

छोटा डॉन's picture

19 Mar 2008 - 7:35 pm | छोटा डॉन

बाबा तुझा गैरसमज झालेला दिसतो आहे.
आम्हाला काय म्हणायचे आहे की "गूगलवर " ही माहिती मिळत असताना या ठिकाणी विचारण्यात काय हाशिल ?
आता आमची [ म्हणजे मी, तात्या, धमु, विनोबा, टिंग्या] उत्तर देण्याची पद्धत थोडी हटके असते ... त्याच्या राग मानू नये.
मिपा वर असेच येत रहा, मजा कर, माहिती मिळव, शेअर कर, चकाट्या पिट, गंभिर विषयांवर चर्चा कर ....

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काहि प्रतिसाद मिळातील ते "लाईटली पण सिरीअसली " घे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हर्शल's picture

19 Mar 2008 - 7:54 pm | हर्शल

राग येण्याचे कारण नाहि.
मिसल पाव वरच उपक्रम बद्दल वाचण्यात आले त्यासाथि विचारणा केलि होति.

मीनल's picture

19 Mar 2008 - 7:57 pm | मीनल

आता आमची [ म्हणजे मी, तात्या, धमु, विनोबा, टिंग्या] उत्तर देण्याची पद्धत थोडी हटके असते ... त्याच्या राग मानू नये.

कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात.

छोटा डॉन's picture

19 Mar 2008 - 8:02 pm | छोटा डॉन

"कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात"
आपल्याला असा अनुभव कधी आला बरे ?
आता कसे आहे, आम्ही दरवेळी "ह.घ्या. / राग मानू नये " अशी तळटीप टाकू शकत नाही पण अर्थ तोच असतो ...
बाकी आमच्या मनात अशी आढी कधीच नसते...

याऊपर आपला असाच ग्रह राहणार असेल तर "परवरदिगार आपको खूष रख्खे !!!" एवढेच म्हणतो...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हर्शल's picture

19 Mar 2008 - 8:16 pm | हर्शल

थिक आहे आमच्या मनात राग लोभ नाहि.

विजुभाऊ's picture

19 Mar 2008 - 8:19 pm | विजुभाऊ

राग आला?...................येवु दे.
रागवुन उपयोग काय? मिसळ्पावा वर ची मंडळी तुम्ही रागावला तर आणखी जास्तच चेकाळतील.त्याना काय डिवचायला नवे कूळ मिळेल

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Mar 2008 - 8:36 pm | llपुण्याचे पेशवेll

एखादा चुकला तर त्याल मि.पा. कर चांगलाच फैलावर घेतील. कोणी आगाऊपणा करत असेल तर त्याची चांगलीच जिरवतील. पण सांभाळूनही घेतील.
अहो मि.पा. कर इरसाल आहेत पण थिल्लर नाहीत असा माझा २ महीन्याचा मि.पा. वरील अनुभव सांगतो.
असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत.
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

19 Mar 2008 - 8:14 pm | प्राजु

कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात.

मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच..

- (सर्वव्यापी)प्राजु

हर्शल's picture

19 Mar 2008 - 8:24 pm | हर्शल

हे मात्र १००% खरे आहे.

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 11:53 pm | इनोबा म्हणे

मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच..
आईशप्पथ! प्राजु तू तर कमालच केली. अगदी मनातलंच बोललीस.

हर्शलराव राग मानू नका.कान पिळणारे हेच मिसळपावकरी उद्या तुमच्या कौतुकास्पद कामगिरी करिता तुमचा गालगुच्चा घ्यायला कमी करणार नाहीत. गुगलसारखे संस्थळ उपलब्ध असताना आपण इथे केवळ एका चौकशीकरिता एक थ्रेड टाकल्यामुळेच आम्ही तसे बोललो.पुढच्या वेळी काळजी घ्यावी.

मिनल आपल्याला नक्की काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोलत जा. तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर कुणी दिले असल्याचे आमच्या माहितीत नाही.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

मीनल's picture

20 Mar 2008 - 7:36 am | मीनल

अहो ,काही नाही
मला कुणीही अशी उत्तरे दिली नाहित.

आणि उपक्रमाबद्दल विचारणा केल्यावर प्रतिक्रिया ही सटकलेल्या डोक्याने लिहिलेल्या वाटल्या.
आणि त्या वाचून हर्शल सटकलेला वाटला.

म्हणून जरा यमक जुळवावे म्ह्टले .
हटके आणि सटके!

बस!

विसोबा खेचर's picture

20 Mar 2008 - 8:48 am | विसोबा खेचर

आणि उपक्रमाबद्दल विचारणा केल्यावर प्रतिक्रिया ही सटकलेल्या डोक्याने लिहिलेल्या वाटल्या.

अहो पण मीनलताई,

हर्षलला, 'आधी गुगलवर गेला होतास का?' किंवा 'काही शोधाशोध करायची असेल तर आधी गुगलून पाहात जा आणि तरीही जर काही माहिती मिळाली नाही तर मिपावर विचार, माहिती असल्यास मिपाकर अवश्य सांगतील' असं आम्ही हर्षलला सांगितलेलं आहे त्यावर हर्षल मूग गिळून आहे, काहीच बोलत नाही हे तुम्हाला दिसलं नाही का?

आणि काय हो मीनलताई, एरवी मिपावर इतकी मंडळी लिहित असतात तेव्हा जळ्ळा कधी तुमचा दोन ओळींचा प्रतिसाद क्वचितच येतो आणि हर्षलने मिपावर ऍबरप्ट एका ओळीची चौकशी केली आणि त्यावर आम्ही त्याला दोन शब्द लिहिले तेव्हा मात्र मारे अगदी पुळका येऊन अगदी धावून धावून भांडायला आलात आणि यमकं जुळवू लागलात! :)

छ्या! कमाल आहे तुमचीही! मला तर तुम्हीही अंमळ सटकलेल्या आणि हटकलेल्या डोक्याच्या वाटता! :)

असो... हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :)

मराठी संस्थळ कसं, हासरं-भांडतं-खेळकर-हटकलेलं आणि सटकलेलं असावं! :)

हो की नाही हो मीनलताई? :)

आपला,
(हटकलेला आणि सटकलेला मिपाकर!) तात्या.

इनोबा म्हणे's picture

20 Mar 2008 - 11:36 am | इनोबा म्हणे

असो... हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :)
मराठी संस्थळ कसं, हासरं-भांडतं-खेळकर-हटकलेलं आणि सटकलेलं असावं! :)

तात्याबांशी सहमत

(मिसळ'लेला)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

मीनल's picture

20 Mar 2008 - 5:46 pm | मीनल

आणि काय हो मीनलताई, एरवी मिपावर इतकी मंडळी लिहित असतात तेव्हा जळ्ळा कधी तुमचा दोन ओळींचा प्रतिसाद क्वचितच येतो आणि हर्षलने मिपावर ऍबरप्ट एका ओळीची चौकशी केली आणि त्यावर आम्ही त्याला दोन शब्द लिहिले तेव्हा मात्र मारे अगदी पुळका येऊन अगदी धावून धावून भांडायला आलात आणि यमकं जुळवू लागलात! :)

आधी म्हटल्याप्रमाणे जरा यमक जुळवा जुळवी केली.
प्रतिसाद दिला तो झोंबला वाटत कुणाला तरी?
भांडायला आले असा सुर वाटला क माझा?
तसा नव्हता खर तर!

पुळका ?कोणाचा?तो कोण माझा?

जेव्हा जमेल तेव्हा प्र तिसाद देते.
काही लिहायला यायला ही हवे ना?
जमल तेव्हा प्रकाशित केले - उदा:-मिसळ पाव यमक प्रार्थना ,काही लेख , कविता.

मी काही कवयित्री नाही ,लेखिका नाही ,टिकाकार नाही .
आहे एक वाचक.

छ्या! कमाल आहे तुमचीही! मला तर तुम्हीही अंमळ सटकलेल्या आणि हटकलेल्या डोक्याच्या वाटता! :)

काही शंकाच नाही.
अमंळ सटकलेलली ,हटकलेली आहे,म्हणूनच तर अंमळ (दोन ओळींचा)प्रतिसाद देते ,लेखन करते.
जास्त असते तर ------
सांगणे नको!
पुन्हा काथ्याकुट !!

धमाल मुलगा's picture

20 Mar 2008 - 11:03 am | धमाल मुलगा

मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच..

प्राजुताई, जबरा ग॑!!!

हर्शल,
हर्शलराव राग मानू नका.कान पिळणारे हेच मिसळपावकरी उद्या तुमच्या कौतुकास्पद कामगिरी करिता तुमचा गालगुच्चा घ्यायला कमी करणार नाहीत.
इनोबाशी पूर्ण सहमत :-)

डॉनराव-ए-ब॑गळुरिस्तान अल् गुजरात,
शेठ, आपण आपली पद्धत सुधारायला पाय्जे काय? आयला इकड॑ पब्लिकचा लै म्ह॑जे लैच गैरसमज व्हायला लागलाय!!!

म॑डळी, अहो खर॑च आमच्या मनात तस॑ काही नसत॑ हो!!!! बर॑ इतक्या दिसा॑ची सोबत आपली, जरा समजुन घ्या ना राव..पोर॑ सोर॑ आहेत, द॑गा धूडगुस घालायचीच.
असो,

हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :)

क्या बात है तात्याबा....जिओ!!!!

शरुबाबा's picture

20 Mar 2008 - 11:44 am | शरुबाबा

हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असे वाटते.