मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
19 Mar 2008 - 12:29 pm
गाभा: 

मित्रानो मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करुया असा एक विचार प्रवाह येतोय. पुण्याच्या मि पा संमेलनात या बाबत उहापोह होइलच्..तुम्हाला काय वाटते.? या बाबत काय / कसे करता येईल सांगा
हे साहीत्य खरोखर्च मिसळ पाव प्रकारचे आहे...पोटही भरते/ जिभेचे चोचले ही होतात / वेगवेगळ्या स्वरूपात मिळु शकते.
कथा/ काव्य/ विडंबन / खादाडी / सल्ले/माहीती/चारोळ्या/ आरोळ्या सगळे प्रकार आहेत
.......................साहीत्य मिसळ चरणारा साहीत्य खादाड विजुभाऊ.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Mar 2008 - 1:09 pm | विसोबा खेचर

मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर (इथून पुढे 'मिपावर') लिहिणार्‍या मंडळींचाच त्यांच्या त्यांच्या लेखनावर (लेख, काव्य, चर्चा, पाककृती, प्रतिसाद, व इतर) संपूर्ण अधिकार आहे असेच मिपा मानते. त्यावर मिपाचा कुठलाही अधिकार नाही. मिपा केवळ एक आंतरजालीय माध्यम आहे, जे सभासदांच्या लेखनास विनामूल्य प्रसिद्धी देते.

इथे लिहिल्या जाणार्‍या लेखनाकरता, त्यापासून कुणालाही होणार्‍या आर्थिक, मानसिक व इतर सर्व प्रकारच्या फायद्या/तोट्याकरता संबंधित लेखक/लेखिका मंडळीच संपूर्णपणे जबाबदार असतील. मिपावर लिहिल्या जाणार्‍या लेखनाची कुठलीही जबाबदारी/उत्तरदायित्व मिपावर अथवा तात्या अभ्यंकर यांच्यावर नाही.

मिपावरील साहित्य मुद्रित स्वरुपात प्रकाशित करायचे किंवा कसे याचा निर्णयाधिकार हा त्या साहित्याच्या संबंधित लेखकांचा/लेखिकांचा आहे. सदर साहित्य प्रकाशित करण्यास परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार मिपाला अथवा तात्या अभ्यंकर यांना नाही!

सरपंच, विसोबा खेचर यांच्याकडून पुढील सूचना मिळेपर्यंत वरील प्रकटन हे कायमस्वरुपी व्हॅलिड राहील!

कळावे,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर ऊर्फ विसोबा खेचर ऊर्फ सरपंच,
मालक,
मिसळपाव डॉट कॉम.

बुधवार, दिनांक १७ मार्च, २००८.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून १० मिनिटांनी वरील प्रकटन प्रकाशित केले.

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 3:16 pm | इनोबा म्हणे

आम्ही तर केव्हापासून छापील अंकाचा हट्ट धरुन बसलो आहे.पुण्यात भेटलो की या विषयावर चर्चा करु.
मिसळपावचा विजू...स्वारी ....विजय असो!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

स्वयम्भू's picture

19 Mar 2008 - 4:41 pm | स्वयम्भू (not verified)

अगदी मनतलं बोललात विजूभाउ. पुण्य नगरीत भेटलात की चर्चा कराच ह्यावर. माझा पुर्ण पाठींबा आहे.

आपला,

स्वयंभू

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 10:35 pm | सुधीर कांदळकर

शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 5:02 pm | धर्मराजमुटके

विजुभाऊ ! तुमची मनोकामना पुर्ण होईल असे वाटतेय. एकदा मिपावर चक्कर मारा आज-उद्या जमल तर !