(मिपादिन?: नवेच आहे शत्रू नव्यांचे!! प्रस्थापित नाहीत.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
9 Mar 2010 - 2:20 pm

डिस्क्लेमर्सः
१. कृपया ह. घेणे नाहितर जोडे तयार आहेत.
१.अ. कुणाचे जोडे तयार आहेत हे विचारू नये, अपमान होईल.
२. सदर विडंबन हे विरंगुळा म्हणून लिहीले आहे. वरचे दोन शब्द काही लोकांच्या नजरेआड जाण्याची शक्यता आहे म्हणून हे ही लिहीले आहे.
२.अ. प्रेरणा ... लिहायलाच हवी का? बरं, वाङ्मयचौर्याचा आळ नको, ही घ्या.
३. नीरजाकडून एक कल्पना (न विचारता) उधारीवर आणली आहे, तिचे आभार.
४. सदर विडंबन आम्हाला आव्हान देणार्‍या श्री.श्री. राजेशबाबा पूजावाले घासकडवी यांना सादर समर्पण!

साल २११०

गणेशचतुर्थी हा जागतिक मिपा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातोय.

विविध फतव्यांच्या चर्चा होताहेत. प्रस्थापितांविरुद्ध जास्तीत जास्त बोलले म्हणजे मिपा दिन खऱ्या साजरा झाला असे समजले जात आहे. पण, प्रस्थापित हे नव्यांचे कधीच शत्रू नव्हते, नाहीत आणि यापुढेही नसणार आहेत.

नव्यांचे खरे शत्रू नवे(पण)च असते.

नव्यांचे एकमेकांतील नातेसंबंध बघितल्यास असे दिसून येते की, नवे-नवे, नवे-संपादक, नवे-मालक... याप्रकारची नाती सगळ्यात बदनाम नाती आहेत. टोकाच्या शत्रूत्त्वाची नाती आहेत.

धागे लिहून संपादन सांभाळणाऱ्या संपादकाला "समजून न घेणारा" हा नवाच असतो. प्रस्थापित किंवा टारझन नाही.

हा जर प्रस्थापित-नव्या सदस्यांचा वाद मानला, तर मग मालक-प्रस्थापितांचे ही एकमेकांशी का पटत नाही? ते तर एकाच काळातले आहेत.

तसेच प्रस्थापित हे नव्यांकडे टार्गेट म्हणून बघतात अशी ओरड केली जाते. ते खरे नाही. नवेच बऱ्याच अंशी याला जबाबदार आहे. धागा क्षेत्रात लेख लिहीताना नवेपणाच्या आधारे नवे आपले एकोळी धागे पाडून टाकतात, प्रतिसाद पदरी पाडून घेतात. खरडफळ्यावरचे प्रस्थापितसुद्धा लाजतील अशा खरडी नवे एकमेकांना आणि धागे मुख्य पानावर लिहीत असतात.

नवेच स्वत:ला अशा पद्धतीने पेश करत आहेत की प्रस्थापितांचा दृष्टीकोन हा टवाळीचाच राहील!!

प्रतिसाद मिळतात म्हणून नवेच एकोळी धागे टाकतात, निरर्थक खरडी टाकतात. त्यांना नको असेल तर ते असे टवाळखोर धागे नाकारू शकतात. असे टवाळ्खोर प्रतिसाद थांबवायचे असतील तर कोणत्याच नव्या-जुन्याने अशी प्रलोभने/धागे/खरडी नाकारल्या पाहिजेत. नाहितर याला दुटप्पीपणा किंवा दांभिकपणा म्हणावे लागेल. कारण आपल्याला वाटेल तसे स्वैर वागायचे आणि काही झाले की प्रस्थापित आणि कंपूबाजीला दोष देवून मोकळे.

आणि प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापितांच्या बरोबरीने समानता पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. समानता पाहिजे असेल तर मग नवे आहेत हे बोलायला कशाला हवे? कारण फतव्यांबाबतही असमानता आहे. सगळे फतवे आवडीच्यांच बाजूने आहेत.

फतव्यांमुळे आजकाल असे झाले आहे की, एखादा कंपूत विचारी आणि टवाळ सगळेच लिहीणारे, तर एखाद्या कंपूबाहेरच्या एखाद्याचे बरेच प्रतिसाद गायब. प्रतिसाद उडवताना संपादकांनी हा विचार जरूर करावा.

मिपादिनानिमित्त नव्यांनी प्रस्थापितांचा विचार करावा आणि प्रस्थापितांवरचा अन्याय दूर करावा.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

9 Mar 2010 - 2:36 pm | टारझन

count +=1 ;

चालू द्यात ... खांबावर चढून बसलो आहे! *आणि इथे एकंच जागा आहे ... कोणी मला बी जागा द्या म्हणुन च्यावच्याव करु नये .. *

- १_०७ सारखा सासरी

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2010 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार

वरील मुर्ख विधान म्हणजे
कोल्ह्याला द्राक्ष आंबट असला प्रकार आहे

आजचा दिवस हुंगेश पायवरकर यांस समर्पीत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

वाहीदा's picture

9 Mar 2010 - 6:19 pm | वाहीदा

आजचा दिवस हुंगेश पायवरकर यांस समर्पीत.
=)) =)) =)) =))

~ वाहीदा

Nile's picture

9 Mar 2010 - 2:43 pm | Nile

मुळात नवे खरेच नवे आहेत का? त्यांना अश्या प्रकारे एको-दुकोळी धागे काढुन, रडारडी करुन आम्ही नवे आहोत असे भासवायचे नसेल कशावरुन?
त्याशिवाय पुर्वी डोके दुखी होउन संपलेल्या अमृतांजन बामचे वचपे काढायचे प्रयत्न होत नसतील कशावरुन? कशाचाच पत्ता लागत नसल्याने आम्ही प्रतिक्रीयेस नकार देत आहोत.

--नव्यानेच प्रस्थापित आणि जुना नवखा.

नाना बेरके's picture

9 Mar 2010 - 2:46 pm | नाना बेरके

अतिशय योग्य विचार मांडलेत ताई तुम्ही.

गेले बरेच महिने मी मिपावर येऊ शकलो नाही, परंतु तुम्ही मांडलेले मुद्दे बरेच दिवसापासूनचे आहेत असे मला वाटते.

कधी कधी प्रस्थापितच नवे आय्.डी.ज काढून नव्याने वावरतात असावेत असे वाटते. नव-प्रस्थापित हि सुध्दा एक वेगळी जाती निर्माण झाली आहे कां ? संपादक कदाचित ह्यावर प्रकाश टाकू शकतील.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2010 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! दणका....

बिपिन कार्यकर्ते

राजेश घासकडवी's picture

9 Mar 2010 - 3:07 pm | राजेश घासकडवी

तुम्ही बॅट घेऊन यायच्या ऐवजी गोफणच घेऊन आलात! आणि तेसुद्धा प्रत्येक दगडात किती पक्ष्यांचं विडंबन!

पहिल्या पातळीवर मूळ लेखाचं ... नंतर एक पदर उलगडला की नुकत्याच नव्या जुन्यांच्या संदर्भात झालेल्या प्रेमळ चर्चेचं विडंबन... आणि त्यातही जाता जाता मालक - प्रस्थापित मध्ये होणाऱ्या पडद्यामागच्या प्रेमसंवादांना कोपरखळ्या. आणि इतर कित्येक असे असतील जे मला कळले सुद्धा नसतील. आमच्यावर तुम्ही ते श्री. श्री. बाबा आणि त्या पांढऱ्यातल्या पांढरं यापलिकडे काही बोलला नसावात अशी आशा आहे. नंतर कधीतरी एकदम मला एक टेंगूळ आलंय असं समजायला नको.

आतापासून मी कानाला 'खडा' (तुमच्याच गोफणीतून उडलेला एक छोटासा...) लावलेला आहे. तुमची गोफण फिरायला लागायच्या आतच दूर पळायचं. सुदैवाने यावेळी शत्रूपक्ष दरवेळी आमच्यापासून लांब होता, त्यामुळे बचावलो.

असो. स्वत:शीच खरड - या विक्षिप्त अदितींना आव्हान देताना जरा सांभाळूनच....

तुमचे '३.१४' धरतो.

राजेश

मेघवेडा's picture

9 Mar 2010 - 3:35 pm | मेघवेडा

दोन्ही ३.१४ एकत्र आल्यास '९.८' होते! पक्षी: अधःपतन! तेव्हा जरा सांभाळून हो घासकडवीबुवा! ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

राजेश घासकडवी's picture

9 Mar 2010 - 3:52 pm | राजेश घासकडवी

भौतेक भौत भौतिकी भूतं जमलीयेत...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2010 - 4:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:D

आली की नाय मज्जा ... ?

(पांढरीफटक) अदिती

मेघवेडा's picture

9 Mar 2010 - 5:06 pm | मेघवेडा

असतील आकड्यांची शितं तर जमतील भौतिकी भूतं!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

दिपक's picture

9 Mar 2010 - 3:23 pm | दिपक

चालुद्या...

मिपादिनाच्या नव्यांना शुभेच्छा ! :)

विसोबा खेचर's picture

9 Mar 2010 - 3:36 pm | विसोबा खेचर

आहे हे असं आहे....

पटलं तर र्‍हावा नायतर दारं सत्ताड उघडी आहेत....! :)

तात्या.

अरुण मनोहर's picture

9 Mar 2010 - 3:55 pm | अरुण मनोहर

मागील काही दिवसात झालेला हल्ला, प्रतिहल्ला मग शरणांगती हा सारा टी आर पी वाढवायचा खेळ तर नाहीना?

येरे येरे पावसा
पाऊस झाला मोठा
पाऊस होता खोटा

कसें??????????????

jaypal's picture

9 Mar 2010 - 4:24 pm | jaypal

या विषयी आम्ही आप्ले...........

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2010 - 4:17 pm | प्रकाश घाटपांडे

चालू द्यात! हल्ली आम्ही काय बोलत नाय! तशि विच्छाच व्हत नाई!
(निरिच्छ)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

कवितानागेश's picture

9 Mar 2010 - 4:38 pm | कवितानागेश

आदिती,
तुझ्य त्यच त्या गावाच्या पाण्यामुळे तुझा वात्रटपणा वाढत्च चाललेला दिस्तोय,
असो, मला तुझा अभिमान आहे!!
कीप इट अप.
============
>:D< माउ

चतुरंग's picture

9 Mar 2010 - 6:57 pm | चतुरंग

एकदम जोरात फटकेबाजी लावलीये!! =)) =))

(प्रस्थापित)चतुरंग

शानबा५१२'s picture

9 Mar 2010 - 8:12 pm | शानबा५१२

आहे हे असं
नवीन
प्रेषक विसोबा खेचर ( मंगळ, 03/09/2010 - 15:36) .

आहे हे असं आहे....

पटलं तर र्‍हावा नायतर दारं सत्ताड उघडी आहेत....! Smile

तात्या.
सहमत,तात्या
भांडा च्यामारी!!

मंगेशपावसकर's picture

10 Mar 2010 - 1:11 am | मंगेशपावसकर

आपल्याबरोबर ऑर्कुट वर बोलायला मला मनापासून आवडेल

mgccmangeshpaw@gmail.com

Nile's picture

10 Mar 2010 - 1:29 am | Nile

ते बोलणे कोणाला समर्पित करणार ते ही सांगा ना.

-समर'पीत.

मुक्तसुनीत's picture

10 Mar 2010 - 1:44 am | मुक्तसुनीत

निळ्या ! लेका , हे वाच :

सिनिअर मिपाकरांची थट्टा नको..
मिपाला कमीपणा येईल असे वर्तन नको..

कुणाची थट्टा करतो , ते कुठे , आपण कुठे ? तुला काय रीतभात ?? आँ ?

प्रभो's picture

10 Mar 2010 - 1:45 am | प्रभो

मुसुशेठ, जरा संदर्भासह स्पष्टीकरण द्या की..

मी लहान आहे. मार्गदर्शन करावे.

टारझन's picture

10 Mar 2010 - 2:05 am | टारझन

सिनिअर मिपाकरांची थट्टा नको..
मिपाला कमीपणा येईल असे वर्तन नको..

च्यायला .. हे वाक्य राहुन राहुन कुठं तरी वाचल्या सारखं वाटतंय :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2010 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुणाची थट्टा करतो , ते कुठे , आपण कुठे ? तुला काय रीतभात ?? आँ ?

वडिलधार्‍यांनी कृपया मार्गदर्शन करावे.

असो मंगेशराव! आम्ही ऑर्कुटपासून आलिप्त आहोत.

अदिती

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:08 am | मंगेशपावसकर

नवीन लेख आठवणी ने वाचा

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:39 am | मंगेशपावसकर

DNT BE NOW ITS BETTER

ऋषिकेश's picture

10 Mar 2010 - 11:55 am | ऋषिकेश

हा हा हा =))
अदितैंनी दुर्बिणसोडून लेखणी (आपलं किबोर्ड ) हातात घेतला की असे चमत्कार जन्म घेतात.. लय भारी फटकेबाजी

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.