उर्मिला धनगर विजयी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Feb 2010 - 11:43 am

झी च्या सारेगमप स्पर्धेमधे उर्मिला धनगर विजयी..... महागायिका उर्मिला धनगर हिचे हार्दिक अभिनंदन.........
<:P <:P <:P <:P <:P

कला

प्रतिक्रिया

अनामिका's picture

1 Feb 2010 - 12:14 pm | अनामिका

उर्मिलाचे मनःपुर्वक अभिनंदन! =D> <:P
उर्मिलाचे "भुई भेगाळली खोल"हे गाण ऐकल तेंव्हाच वाट्ल होत कि जेतेपद हिच पटकवणार...सारेगमपच्या यापर्वाचा विजेता कोण असेल याचा अंदाज पुन्हा एकदा अचुक आल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटावी का? :?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

Dhananjay Borgaonkar's picture

1 Feb 2010 - 2:55 pm | Dhananjay Borgaonkar

मला माहित नव्हतं झी ने सुद्धा कोटा चालु केला आहे ते.
अभिनंदन झी आणि ऊर्मिला.

आयडीया स्वप्न स्वरांचे च्या ऐवजी त्यानी स्वप्न (फक्त खड्या) स्वरांचे अशी जाहिरात करायला हवी होती मागचे दोन्ही सिझन.

कवटी

Nile's picture

1 Feb 2010 - 9:10 pm | Nile

हा हा हा! वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे.

मृगनयनी's picture

2 Feb 2010 - 12:06 pm | मृगनयनी

आयडीया स्वप्न स्वरांचे च्या ऐवजी त्यानी स्वप्न (फक्त खड्या) स्वरांचे अशी जाहिरात करायला हवी होती मागचे दोन्ही सिझन.

कवटी

हा हा हा.... १०८ % सहमत!!!

"राहुल सक्सेना" खरं तर महागायक होईल... असं वाटलं होतं...
पण असो....
त्याने त्याच्या मराठी मित्राकडुन (कौशिक देशपांडे' कडुन) उत्तम मराठी ही शिकून घेतलं होतं!...

अभिलाषाचं ही... "मला जाउ द्या ना घरी...".... अप्रतिम होतं!!!

सर्वांगीण विचार करता..... अभिलाषा आणि राहुल या दोघांनाही कोमल स्वराची, सुगम संगीताची जाण ... उर्मिला'पेक्षा नक्कीच जास्त आहे... हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.

पण मागील वर्षी प्रमाणेच "झी-मराठी"चे कर्ते-करवते लोक वेगळे असल्यामुळे आणि 'पल्लवी-ताई जोशी-अग्निहोत्री ' यांना पुढील वर्षी देखील झी-मराठी वर त्यांचे 'सारेगमप' आणि अन्य मालिका टिकवायच्या असल्या कारणाने... "कार्तिकी"... ;) सॉरी सॉरी.... 'उर्मिला धनगर' विजेत्या ठरल्या.

असो.....

कालाय तस्मै नमः |

मेरा भारत महान! ! ! ! ! :-? :-/

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Feb 2010 - 3:43 pm | llपुण्याचे पेशवेll

राहूल सक्सेना झी मराठीच्या सारेगमप चा महागायक झाला नाही याबद्दल अत्यंत आनंद झाला. असो.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

विनायक रानडे's picture

1 Feb 2010 - 8:11 pm | विनायक रानडे

खरा मराठमोळा आवाज लाभलेली एकमेव गायीका. काय तो ठसका, काय ते शब्द उच्चारण, ताल, सुर अप्रतिम. योग्य व्यक्तिला नीवडल्या बद्दल झी ला व निवड समितीला धन्यवाद.

अनामिका's picture

2 Feb 2010 - 1:12 am | अनामिका

जातीवाद व आरक्षण याने आपण किती पोखरलो गेलोय याचा प्रत्यय वरिल काहि (कुंठीत)प्रतिसादांवरुन येतोय.
अहो निदान जे चांगल आहे ते चांगल म्हणण्याचे कष्ट घ्यायला खरच रसिक म्हणवणार्‍यांची तयारी का नसावी?
अनुकुल परिस्थितीतुन सगळेच वर येतात पण प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुढे जाणार्‍यांचे कौतुक करण्यास देखिल जिगर लागते हेच खर!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अमृतांजन's picture

2 Feb 2010 - 7:15 am | अमृतांजन

१००% सहमत!

मृगनयनी's picture

2 Feb 2010 - 12:10 pm | मृगनयनी

कॉल्-बैक राउंड ला...... जेव्हा संहिता चांदोरकर, मृण्मयी तिरोडकर्, अश्विनी देशपांडे... इ... प्रगल्भ गायिकांची निवड न होता... "उर्मिला" ची निवड झाली... तेव्हाच खरंतर निकाल समजला होता..... :/ :-?

आणि.... अखेरीस... जेव्हा स्वरदा गोखले' सारख्या गायिकेला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं..... तेव्हाच खरं तर निकाला वरती शिक्का-मोर्तब झालं होतं......

झी- मराठी वाल्यान्ना... उर्फ झी-च्या कर्त्या-करवत्यांना निवेदनः

पुढील वर्षी पासुन "महाराष्ट्राचा महागायक कोण?" ही पुर्वनियोजित निकाल असलेली स्पर्धा बंद करावी....

किन्वा..

ग्रामीण विभागासाठी वेगळी , शहरी विभागासाठी वेगळी, पैसे चारून.. (श्शी... चारुन.... ! कसं तरी वाट्टं नै!....
हो... पण झी-मराठी' चे कर्ते-करवते... अशीच भाषा बोलतात!!!!! ;) ...... असो...
) जिंकणार्‍यांसाठी वेगळी स्पर्धा आयोजित करावी....
म्हणजे.... राजहंस, बगळे, कावळे, यातील फरक सर्वांना कळेल....

असो.... उर्मिलाचे अभिनंदन!
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

शाहरुख's picture

2 Feb 2010 - 12:21 pm | शाहरुख

मृगनयनी-ताई-जी,

मला त्या स्पर्धेत कोण हरले वा जिंकले याचे काहीही सुख-दु:ख नाहीय, पण आपली सांगितिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल.

Nile's picture

2 Feb 2010 - 12:36 pm | Nile

जर भाग पाहिलेत तर सांगितीक पार्श्वभुमीबद्दल विचारायची गरज लागणार नाही असे वाटते.

मला तर स्पष्ट जाणवत होतं, मी माझ्या मामीला म्हणालो होते उर्मिला धनगरलाच विजयी करणार म्हणुन. खरं मानायचं का नाही ते तुम्ही ठरवा.

शाहरुख's picture

2 Feb 2010 - 12:56 pm | शाहरुख

>>जर भाग पाहिलेत तर सांगितीक पार्श्वभुमीबद्दल विचारायची गरज लागणार नाही असे वाटते.

मृगनयनी ताईंनी किंवा तुम्हीही 'सगळ्यात चांगले कोण गातो/ते' या बद्दलचे तुमचे मत बाळगण्याच्या मी विरुद्ध नाहीय..ते ठरवण्यासाठी तुम्हाला संगीताची पार्श्वभुमी असायची काडीमात्र गरज नाहीय..फक्त त्या मताला मी एका एस. एम. एस. चे महत्व द्यायचे कि जास्त द्यायचे हे मला ठरवायचे होते..त्यासाठी पार्श्वभुमीबद्दल विचारले.

मृगनयनी's picture

2 Feb 2010 - 12:38 pm | मृगनयनी

मृगनयनी-ताई-जी,

मला त्या स्पर्धेत कोण हरले वा जिंकले याचे काहीही सुख-दु:ख नाहीय, पण आपली सांगितिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल.

:-? शाहरुख -भाई साहब....

२५ फेब्रुवारी २०१० रोजी, रात्री ८.१५ वाजता टिळक-स्मारक मंदिरामध्ये माझा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे. आपण तिथे आलात, तर कदाचित आपले शंकानिरसन होईल... अर्थात... आपल्या संगीताची थोडीफार जाण असेल तर !!!! :-?

प्रवेशिका : रुपये ७५० आहे....

दि. २०.२.२०१० रोजीपासुन पुढे "उद्यानप्रसाद कार्यालय"- सदाशिव पेठ, पुणे -३० येथे मिळतील .
संध्या. ६.३० - ९.३० या वेळेत.

:)

टीपः कर्मधर्मसंयोगाने आपण आलात, तर कृपया आमची ओळख करुन घ्यायला विसरु नये.

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

शाहरुख's picture

2 Feb 2010 - 12:54 pm | शाहरुख

धन्यवाद..मला संगीताची काडीमात्र जाण नाही.त्यामूळे आपल्या सांगितिक पार्श्वभुमिचे "शंकानिरसन" करण्याची माझी पात्रता नाही (खरं तर ती शंका नव्हती..प्रश्न विचारला होता.असो)

आपल्याला कार्यक्रमासाठी शुभेच्छा !!

उगाच महानसंगीतकार लोकांच्या लिखाणात कस्पटे शोधत बसतोस.
तिकिटाचा दर सांगितल्यावर कसा गप्प बसलास. :>

वेताळ

मानस's picture

4 Feb 2010 - 10:01 am | मानस

कॉल्-ब्याकला उर्मिला कधी होती ?

कॉल्-ब्याक मधे अपुर्वा गज्जला परत आली ..... उर्मिला कधीच स्पर्धेच्या बाहेर गेली नाही.

बाकी चालू द्या !!!

ए. प्रशांत's picture

19 Feb 2010 - 11:12 am | ए. प्रशांत

कॉल्-बैक राउंड ला...... जेव्हा संहिता चांदोरकर, मृण्मयी तिरोडकर्, अश्विनी देशपांडे... इ... प्रगल्भ गायिकांची निवड न होता... "उर्मिला" ची निवड नाही झाली होती तर अपुर्वा गजलाची झाली होती, मॅडम. उर्मिला स्पर्धेतुन बाहेरच गेली नव्हती तर कॉल-बॅक चा प्रश्नच येत नाही.

चिऊ's picture

2 Feb 2010 - 10:48 am | चिऊ

Dhananjay Borgaonkar आणि कवटी या॑च्याशी सहमत...आता निकाल आधिच कळतो....तरी पण अभिनंदन ....

मि माझी's picture

2 Feb 2010 - 1:16 pm | मि माझी

तिन्हीही स्पर्धक आपआपल्या शैलीत उत्तम गातात..कोणीही जिंकल असत तरी दुसर्‍या दोघांवर अन्याय झाला असच वाटल असत...
तरी संगीतात निपुण असलेल्या लोकांकडुन वरील जातीवादक प्रतिसाद वाचुन वाईट वाटले..

स्पर्धेत पहिले दोन 'नी' मिळवणारी उर्मिलाच होती..
असो... उर्मिलाला शुभेच्छा..

मी माझी..

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक

प्रमोद देव's picture

2 Feb 2010 - 1:17 pm | प्रमोद देव

मराठी गायक/गायिका जेव्हा हिंदी गाणी गातात तेव्हा त्यांना हिंदी शब्द्दोच्चार नीट जमत नाहीत असे म्हणून त्यांना कमी मार्क देणार्‍या आणि त्याच वेळी अमराठी गायक/गायिकांच्या चुकीच्या मराठी उच्चारांबद्दल न बोलता…ते अमराठी असूनही किती चांगलं मराठी गातात असे म्हणणार्‍या मराठी परीक्षकांच्या आयचा घो………..
त्यामुळेच आपले चांगले चांगले स्पर्धक गळत गेले….नाही,जाणीवपूर्वक गाळले.खरं तर ह्याच न्यायाने हे अमराठी गायक/गायिकाही सगळ्यात आधी गळायला हवे होते. पण तसे झाले नाही.
म्हणूनच मी सारेगम पाहणे बंद केले
आपल्याकडे सगळीकडेच अमराठी लोकांचे फाजील लाड होताना दिसतात.
आपण किती प्रामाणिक आहोत हे दाखवण्याच्या खोट्या अट्टाहासासाठी हे सगळं चालतं. हे परीक्षक आहेत ना तेही ४२० आहेत….त्यांना हिंदी संगीत सृष्टीत जायचं असतं जिथे जास्त पैसा आहे..म्हणून हे अमराठी लोकांचे लांगूनचालन.
उगाच संगीताला भाषा नसते वगैरे वाक्य झाडतील.
भाषा नसेल तर उच्चारांचं महत्व कशाला सांगता?

निदान शेवटी, जाग आली परीक्षकांना आणि उर्मिला धनगरला विजयी घोषित केलं. नशीब आमचं.
उर्मिला विजेतेपदासाठी लायक आहेच, त्यामुळे राहिलेल्या तिघांच्यात तीच जिंकायला हवी होती.
उर्मिलाचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन!

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

अमोल केळकर's picture

2 Feb 2010 - 2:53 pm | अमोल केळकर

मराठी गायक/गायिका जेव्हा हिंदी गाणी गातात तेव्हा त्यांना हिंदी शब्द्दोच्चार नीट जमत नाहीत असे म्हणून त्यांना कमी मार्क देणार्‍या आणि त्याच वेळी अमराठी गायक/गायिकांच्या चुकीच्या मराठी उच्चारांबद्दल न बोलता…ते अमराठी असूनही किती चांगलं मराठी गातात असे म्हणणार्‍या मराठी परीक्षकांच्या आयचा घो………..
=D> =D> =D>

प्रतिसाद आवडला हे वेगळे सांगायला नको

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मेघवेडा's picture

2 Feb 2010 - 4:43 pm | मेघवेडा

सहमत अगदी!

तरी नशीब शोचं 'टीआरपी' चढवायला कुणा अमराठी गायकाला नाही जिंकवला यांनी! ती सदैव फूकनळ्या वढणारी अग्निहोत्र्यांची सून आहेच मग "फॅण्टॅस्टिक! जस्ट ब्रिलियंट. झी मराठी हॅज क्रिएटेड हिस्ट्री टुडे!" असल्या कमेंट्स द्यायला! सगळे साले लुच्चे! तोंडावर 'मायमराठी' आणि मागे "व्हाय मराठी?"..

आणि आपण हे असले कार्यक्रम बघतो! बाकी निकाल पूर्वनियोजित असतात तो विषय सोडून द्या हो! मागल्या वेळी कार्तिकी जिंकली तेव्हाच यांचा पर्दाफाश झाला होता. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की कार्तिकी किंवा उर्मिला जिंकण्यास लायक नव्हत्या. कार्तिकी गुणी गायिका आहे, नक्कीच, पण ती जिंकेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर सारेगमप पाहिलेलं नाही मी त्यामुळे मला अजिबात ठाऊक नाही की उर्मिला कशी गाते. असो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे आलेली आणखी एक महागायिका मिळालिये महाराष्ट्राला! तिचे हार्दिक अभिनंदन!!

-- एम्. व्ही. पांडे, एम्. डी., झी मराठी.
कसली बोली कसला बाणा? आपली खोली, आपला निशाणा!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2010 - 11:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पांडे असं आडनाव विदर्भात मराठी लोकांमधे आढळतं. बाकी चालू द्या!

खालची निखिलची प्रतिक्रिया आवडली.

अदिती

मृगनयनी's picture

3 Feb 2010 - 11:50 am | मृगनयनी

"उर्मिला धनगर" महागायिका झाली, याबद्दल आनन्दच आहे!.... :)
पण हा आनंद "निर्भेळ" नक्कीच नाही. :(

कारण नको तिथे मराठी'चा डिंगोरा पिटण्यात काहीच अर्थ नाही.

कारण राहुल आणि अभिलाषा यांची गाणी ऐकताना अजिबात जाणवले नाही, की ते अमराठी आहेत. आणि जर झी-मराठी'ने ठरवलेच होते... की महागायिका / महागायक जो कोणी असेल, तो मराठी असला पाहिजे...तर मग अभिलाषा आणि राहुल'ला अंतिम फेरीपर्यंत आणण्याचा अट्टाहास कशासाठी? :-?

त्यापेक्षा झी-मराठीने मराठी आणि अमराठी लोकांसाठी दोन वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स ठेवल्या असत्या... तर अधिक बरे झाले असते.

आणि अंतिम फेरीमध्ये जर एकतरी "मराठी" स्पर्धक आणायचीच होती... तर मग "उर्मिला"च्च्च्च्च्च का? :-? असाही प्रश्न पडतो! :(

कारण ती फक्त ग्रामीण भागातली आहे, किन्वा तिची उच्चारशैली गावरान आहे, आणि तरीही आम्ही (झी-मराठी' ने) तिला "वर"आणले, किन्वा तिला यशाचे दार खुले करुन दिले... वगैरे..वगैरे... विचार करून जर झी-मराठीला टेम्भा मिरवायचा असेल... तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.

कारण अशामुळे इतर "शहरी " :-? स्पर्धकांवर नक्कीच १०८% अन्याय झाल्यासारखेच आहे. "एखादी स्पर्धक ग्रामीण भागातली आहे" म्हणून जर झी-मराठी तिला सहानुभुती दाखवत असेल ,तर ही गोष्ट इतरांवर नक्कीच अन्यायकारक आहे. :|

पण झी-मराठी जर हा आरोप नाकारत असेल आणि त्यांना मराठी मुलीलाच पुढे आणायचे होते.. तर "संहिता चांदोरकर" किन्वा "स्वरदा गोखले" यांच्यासारख्या प्रगल्भ गायिकांना का बरे डच्चू दिला गेला? :-? :/

त्या "पुणे-मुंबई "तल्या उच्चभ्रू भागात राहतात म्हणुन की अजून काही सांगता न येण्यासारखं पण तरीही सगळ्यांना माहित असलेलं नेहमीचंच कारण आहे? ;) ;) :-? ;)

काही विशिष्ट शैलीतली गाणी उत्तम म्हणू शकणं..ही गोष्ट काही "महागायिका" होण्यासाठी प्रमाण होऊ शकत नाही... हे सामान्यातल्या सामान्य माणुस ही जाणतो. पण मग तरीही "उर्मिला"च्च्च का? :-?

मागील वर्षी देखील कार्तिकी गायकवाड' सारखाच प्रथमेश लघाटे देखील रत्नागिरी च्या ग्रामीण भागातील होता.. किम्बहुना कार्तिकी'च्या "आळंदी" पेक्षा कितीतरी पटीने खेडेगावातील होता... (कार्तिकी'च्या वडिलांच्या आळंदीमध्ये स्वतःच्या मालकीच्या २ बिल्डिन्ग्ज आहेत्..असो... नन ऑफ अवर बिझीनेस्स!! ;) ;) )

पण मग प्रथमेश लघाटे किन्वा आर्या आंबेकर महागायक /महागायिका का नाही येऊ शकले?
ते तर सगळे मराठीच्च्च्च्च्च्च आहेत ना? :-? :/

की झी-च्या कर्त्या-करवत्यांना "मराठी" .. म्हणजे काहीतरी दुसरे- वेगळे अपेक्षित आहे? :-?

असो.... झी-मराठीला अतिनम्र विनंती (अडला हरि..... ;) ) आहे की :
पुढील वर्षीपासून ३ विभागामध्ये स्पर्धा भरवाव्यातः
१. शहरी मराठी २. ग्रामीण मराठी ३. अमराठी मराठी

म्हणजे, जेणेकरून सर्व स्पर्धकांना उचित संधी मिळेल.

टीपः झी-मराठी'ला अपेक्षित असणार्‍या मराठी स्पर्धकांनी कृपया "ग्रामीण मराठी" तून अर्ज भरावा, म्हणजे तिन्ही विभागातील स्पर्धा निकोप पार पाडेल.

अवांतर : "एस-एम-एस" चा आणि झी- मराठी स्पर्धेचा काहीही संबंध नाही. (तसा तर फायनल राऊंडला.. परीक्षकांचा आणि निकालाचाही काही संबंध नसतो. ! ;) )
पूर्वनियोजित स्पर्धकाला विजयी घोषित करण्यासाठी असलेले "एस-एम-एस" हे एक प्रभावी माध्यम आहे!

- जय हिंद! जय शहरी महाराष्ट्र ! जय ग्रामीण महाराष्ट्र !

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कवटी's picture

3 Feb 2010 - 12:03 pm | कवटी

+१०८
कवटी

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2010 - 12:44 pm | बिपिन कार्यकर्ते

आणि आता नैनीताईंच्या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या...

सहमत आहे हे सांगणे न लगे... असो. हा कोळसा उगाळावा तेवढा काळाच आणि काहीच सिध्द न करता येण्यासारखे. मागे तात्यांनी पण अगदी बरोबर लिहिले होते.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2010 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही वर्षांनी (झी मराठीच्या कृपेने) जातीयतावादाचे उच्चाटन होऊन शहरी-ग्रामीणवाद वाढताना दिसेल का काय? ;-)
(कोण जिंकलं, कोण हरलं मला काही फरक पडत नाही, भले ते सारेगम असेल वा टी-२०! माझा त्यातून काहीही फायदा-तोटा होत नाही.)

अदिती

समंजस's picture

3 Feb 2010 - 2:40 pm | समंजस

झी मराठी वाहिनीच्या सारेगमपा या कार्यक्रमाबद्दल एकूण चांगलीच माहिती मिळतेय तर :)

अंतिम फेरीत जिंकलेला स्पर्धक (आताच्या आणि पुर्वीच्या धरून)
हा का जिंकून आला/आली याबद्दल वेगवेगळी कारणे आतापर्यंतच्या प्रतिसादातून दिसून आली आहेत.
१) फक्त खडा आवाज असेल तरच जिंकता येतं.
२) ग्रामीण भागातील असेल तरच जिंकता येतं.
३) जिंकून येण्याकरीता पैसे द्यावे लागतात.
४) कोटा (मागासवर्गीय) वर्गातील असेल तरच जिंकता येतं.
५) उच्चभ्रू वर्गातील असेल तर जिंकता येत नाही.
६) शहरी वर्गातील असेल तर जिंकता येत नाही.
७) वगैरे वगैरे....(पुढील प्रतिसादातून येणारी)
छान वाटतेय. ज्ञानात भर पडतेय :)
हा कार्यक्रम बघणारे, कोणीतरी जिंकलं किंवा हरलं याबद्दल एवढी भावनीक गुंतवणूक ठेवून बघतात/ऐकतात हे कळून आश्चर्य वाटलं :O
ज्या स्पर्धेत विजेता ठरवण्याचा मोठा वाटा एसएमएस चा आहे (या स्पर्धेचे प्रायोजक कंपनी ही आयडीया Idea आहे) अश्या स्पर्धेत प्रत्येक वेळीस फक्त गायन/आवाज गुणांच्या जोरावर विजेतेपद ठरणे हे काही शक्य नाही.
आणि जिथे प्रस्थापित गायक/संगीतकार(परीक्षक)एक करीयर तडजोड म्हणून किंवा आर्थीक अडचण म्हणून जर गैरप्रकारांकडे कानाडोळा करत असतील तर कशाला असल्या स्पर्धांना गंभीरपणे घ्यावे???
ज्या स्पर्धेत, विजयी होण्याकरीता स्पर्धकांच्या पालकांना पैसे (संदर्भ:बिका यांनी दिलेलं प्रथमेशच्या वडीलांच उदाहरण, खरं असेल तर) मागितले जातात आणी तरीसुद्धा स्पर्धकांचे पालक काय होणार हे माहीत असून ही, स्पर्धेच्या बाहेर पडत नाहीत(निषेध म्हणून) तर सहभाग सुरूच ठेवतात आणि एवढच नाही तर पुढे होणार्‍या इतर स्पर्धेत सुद्धा गाणं गायची तयारी ठेवतात(प्रथमेश त्या नंतर झी मराठीच्या इतर कार्यक्रमात सुद्धा गायला :) )
अश्या लाचार/तडजोडी करणार्‍या परीक्षक/स्पर्धक/पालक यांच्या कार्यक्रमाला का म्हणून हजर व्हावे/बघावे ??? टिवी वर आणखी कार्यक्रम नाहीत का बघायला?? की झी मराठी आयडिया सारगमपा हे पैसे देतात आपल्याला त्यांचा कार्यक्रम बघण्याकरीता?? आपण प्रे़क्षक सुद्धा लाचार आहोत का??
ज्या स्पर्धे बद्दल/स्पर्धेच्या पारदर्शीते बाबत शंका असेल किवा खात्रीच असेल, त्या स्पर्धा बघूच नये. (या बाबतीत तात्यांश्रीचा बाणा बाळगावा :) )

आणी हे जर शक्य नसेल, बघायचेच असेल/स्पर्धेत सहभागी व्हावयाचेच असेल तर स्पर्धेच्या नियमांना मानावे/निर्णय स्विकारावा.
मात्र निर्णय झाल्यावर तो जर आवडला नाही / मनाविरूद्ध गेला तर मग त्यावर टिका करणे आणि ती सुद्धा व्यक्तीगत/वर्ग पातळीवर जाउन करणे यात काही शहाणपण नाही. असल्या टिकेमुळे तडजोड करणारे परीक्षक/लाचार असलेले स्पर्धक, त्यांचे पालक, वाहिनी, प्रायोजक ह्यांना काहीही फरक पडणार नाही.
उगाचच समाजात भेदभाव/दुफळी पाडण्याच कार्य कशाला करावं (आधीच जी आहे ती काय कमी आहे का??) :?

अनामिका's picture

3 Feb 2010 - 3:17 pm | अनामिका

समंजस!
अतिशय समंजस व झणझणीत प्रतिसाद
हा कार्यक्रम बघणारे, कोणीतरी जिंकलं किंवा हरलं याबद्दल एवढी भावनीक गुंतवणूक ठेवून बघतात/ऐकतात हे कळून आश्चर्य वाटलं

हे मात्र एकदम पटेश!
तमाम महाराष्ट्रातले व जगभरातले मराठी संगीताचे रसिक श्रोते "सा रे ग म प " हा कार्यक्रम केवळ आपले मनोरंजन करण्यासाठी बघतात/ गेला बाजार ऐकतात असा निदान माझा "गैर"समज होता.पण इथल्या प्रतिक्रिया वाचुन तो क्षणात दुर झाला.........झी वर अंतिम फेरीत निवडले गेलेले खड्या आवाजातले गायक जर रसिक मायबाप प्रेक्षकांना कणसुरे अथवा कर्णकर्कश वाटत असतिल तर मग ज्या प्रतिथयश गायक गायिकांची गाणी ,वानगीदाखल उदाहरण द्यायचे तर उषा मंगेशकर (यांचा आवाज लतादिदि व आशाताईंच्या तुलनेत वेगळा आहे) शोभा गुर्टु,सुलोचना चव्हाण, विट्ठल शिंदे,प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे (तेच ते विठू विठू पोपट वाले)पकिस्तानी गायिका ,रुना लैला रेश्मा(लंबी जुदाई वाल्या)गाणी सतत ऐकत आपण मोठे झालो अश्यांना ऐकणे या निकालानंतर तमाम मराठी रसिक बंद करणार असे दिसतय .
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मृगनयनी's picture

3 Feb 2010 - 6:47 pm | मृगनयनी

हा कार्यक्रम बघणारे, कोणीतरी जिंकलं किंवा हरलं याबद्दल एवढी भावनीक गुंतवणूक ठेवून बघतात/ऐकतात हे कळून आश्चर्य वाटलं
हे मात्र एकदम पटेश!
तमाम महाराष्ट्रातले व जगभरातले मराठी संगीताचे रसिक श्रोते "सा रे ग म प " हा कार्यक्रम केवळ आपले मनोरंजन करण्यासाठी बघतात/ गेला बाजार ऐकतात असा निदान माझा "गैर"समज होता.पण इथल्या प्रतिक्रिया वाचुन तो क्षणात दुर झाला.........
:-? आख्ख्या जगातले लोक "सा रे ग म प " हा कार्यक्रम मनोरंजनासाठीच पाहतात्..परंतु, जेव्हा महाराष्ट्राची महागायिका / महागायक कोण? असा इव्हेन्ट झी-मराठी घोषित करते, तेव्हा सारेगमप' हे केवळ मनोरंजन न राहता स्पर्धा बनते. मग भले ती "स्पर्धा" अतीव खेळकर वातावरणात का होईना... पण शेवटी कुणाला तरी एकालाच जिंकायचे असते! :)
त्यामुळे "जिंकणार कोण" याची उत्सुकता प्रत्येकाला असते. आणि अर्थातच ज्याच्या / जिच्या आवाजात व्हरायटीज आहेत उदा: शास्त्रीय, सुगम, लावणी, नाट्य, फिल्मी.. इ. इ... अशा सर्व प्रकारचे संगीत त्याच्या / जिच्या गळ्यातून उतरून रसिकांना आपलेसे करते... तोच / तीच... महागायक/ महागायिका होण्यास योग्य असतो/ते.
असे सुविद्य जनांचे प्रामणिक मत असते. (मग भले तो शहरी / ग्रामीण/ अमराठी... कुणीही असो...)

झी वर अंतिम फेरीत निवडले गेलेले खड्या आवाजातले गायक जर रसिक मायबाप प्रेक्षकांना कणसुरे अथवा कर्णकर्कश वाटत असतिल तर मग ज्या प्रतिथयश गायक गायिकांची गाणी ,वानगीदाखल उदाहरण द्यायचे तर उषा मंगेशकर (यांचा आवाज लतादिदि व आशाताईंच्या तुलनेत वेगळा आहे) शोभा गुर्टु,सुलोचना चव्हाण, विट्ठल शिंदे,प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे (तेच ते विठू विठू पोपट वाले)पकिस्तानी गायिका ,रुना लैला रेश्मा(लंबी जुदाई वाल्या)गाणी सतत ऐकत आपण मोठे झालो अश्यांना ऐकणे या निकालानंतर तमाम मराठी रसिक बंद करणार असे दिसतय .
"अनामिका"

अनामिकाताई... अंतिम फेरीत निवडलेले खड्या आवाजातील गायक/ गायिका ..रसिकांना कणसुरे (:-? बहुधा "कर्णसुरे "म्हणायचं असावं आपल्याला..!! ;) ) किन्वा कर्णकर्कश वाटतात, असं आपल्याला का बरं वाटतं? हे अजून उमगलेलं नाही! :-? :/
आणि मुळात अंतिम फेरीसाठी गायिका निवडताना केवळ "खड्या आवाजातील गाणी चांगली म्हणते" इतकीच ओळख असून चालत नाही.. आमच्या माहितीप्रमाणे "महागायिका"तिलाच होता येतं, जिला संगीताच्या सर्व प्रकारांची, सुरांची जाण आहे. उर्मिला'ला संगीताच्या असंख्य प्रकारांपैकी केवळ खड्या लावणी'ची, लोकसंगीताची जास्त ओढ आहे. अर्थातच तिचा आवाज त्यासाठी जास्त suitable आहे.
(हेच उर्मिलाला, जर "बुगडी माझी सांडली... गं".. ही गोड आवाजातली लावणी म्हणायला सांगितली, तर १०८% तिला ती जमणारच नाही....कारण तो तिचा"बाज" नाही.)
त्यामुळे मुळातच अंतिम फेरीमधे स्पर्धकांची निवड करताना.. झी-मराठीची चूक झाली, असेच म्हणावे लागेल..

अनामिकाताई, तुम्ही कधी मनोरंजन म्हणुन"संहिता चांदोरकर" चं "माहिया...माहिया"( चित्रपटः गुरु) हे गाणं ऐकलंय का?
किन्वा तिनेच गायलेली" उसाला लागंल कोल्हा"ही लावणी ऐकलीये का? ... दुर्दैवाने ऐकली नसेल.. तर परत कधी संधी मिळाल्यास नक्की ऐका... म्हणजे.. उर्मिलाचा आवाज आणि संहिताच्या आवाजातली व्हरायटी... यातील फरक नक्कीच कळेल...

आणि "सुलोचना चव्हाण, विट्ठल शिंदे,प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे (तेच ते विठू विठू पोपट वाले)पकिस्तानी गायिका ,रुना लैला रेश्मा" यांची गाणी आम्ही पण ऐकलीयेत.....
पण "देवकी पंडित, आरती अंकलीकर-टिकेकर, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी,पं. हृदयनाथ मंगेशकर, आशाताई खाडीलकर " यांची गाणी तुम्ही कधी ऐकलीयेत का हो "अनामिका-ताई" :-?...
कारण यांची गाणी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो ना!!! :) :) :)

त्यामुळे केवळ खड्या आवाजाच्या जोरावर एखाद्या स्पर्धकाची महाअंतिम फेरीपर्यंत निवड होणं... ही गोष्टच मुळी चुकीची आहे...

(अगदी केवळ मनोरंजनासाठी जरी कुणी हा कार्यक्रम पाहत असलं, तरी त्याला जर सदसद्विवेक्-बुध्दी असेल, तर तो झी-मराठी'चा निषेधच करेल..)

अर्थात इथल्या प्रतिसादांमुळे झी-मराठी'ला काहीच फरक पडणार नाही... पण सूज्ञ- जनांना नक्कीच पडेल.... :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अनामिका's picture

4 Feb 2010 - 12:36 am | अनामिका

देवकी पंडित, आरती अंकलीकर-टिकेकर, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी,पं. हृदयनाथ मंगेशकर, आशाताई खाडीलकर " यांची गाणी तुम्ही कधी ऐकलीयेत का हो "अनामिका-ताई" ...
खरच कि हो ?यासगळ्या दिव्यस्वर लाभलेल्या गुणी कलाकारांची नाव देखिल प्रथमच ऐकतेय तुमच्या कडून.ज्ञानात भर घातल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.....
अर्थात मी विसरलेच होते की आपण स्वतः उच्चप्रतिच्या थोर गायिका आहात त्यामुळे संगीताबद्दल भाष्य करण्याचा आपला अधिकार आहेच आहे...आमच्या सारख्या कानसेन असलेल्यांच्या प्रतिसादांकडे तुंम्ही लक्ष नकाच देऊ......आमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना कुठुन संगीतातले काही कळायला नाहि का?पण कलाकाराने सदैव विनम्र असावे असे कुठेतरी वाचलेय.
आणि हो मला कणसुरेच म्हणायच होत .तेंव्हा काळजी नसावी......
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मृगनयनी's picture

5 Feb 2010 - 11:36 am | मृगनयनी

आमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना कुठुन संगीतातले काही कळायला नाहि का?
:-? :/
अं .. हो... ते ही खरंच आहे म्हणा!..... :-? ;)

पण कलाकाराने सदैव विनम्र असावे असे कुठेतरी वाचलेय.

अरेच्चा!!! हे तर अगदी आमच्या मनातलं बोललात की ताई!!! :)

पण विनम्र कलाकाराने अन्यायाविरूद्ध आवाज उठवू नये, असं तर कुठल्या घटनेत लिहून ठेवलेले नाही ना? :-? ;)

आणि हो मला कणसुरेच म्हणायच होत .तेंव्हा काळजी नसावी......
"अनामिका"

छे... हो!....!!.आपल्यासारखे केवळ मनोरंजन म्हणून संगीत-कार्यक्रम पाहणारे ;) (आणि आपल्याला पाहिजे तीच्च स्पर्धक निवडून येण्याची खात्री असणारे) रसिक श्रोते असल्यावर आम्ही कशाला बरं काळजी करू? :-?

.. पण 'कणसुरे' म्हणजे नक्की काय हो अनामिका ताई? :-?
कारण शहरी किन्वा ग्रामीण मराठी मध्ये "कणसुरे" हा शब्द मी तरी आजवर ऐकलेला नाही हो ! :( :(

हा शब्द अमराठी तर नाही ना ? ;)
:-? :/ ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मि माझी's picture

5 Feb 2010 - 7:35 pm | मि माझी

पण विनम्र कलाकाराने अन्यायाविरूद्ध आवाज उठवू नये, असं तर कुठल्या घटनेत लिहून ठेवलेले नाही ना?

कोणावर अन्याय झालाय ?? आणि स्वरदा गोखले बद्द्ल न बोललेलच बर.. तिच नेझल गाण ऐकण्यापेक्षा उर्मिलाचा खडा आवाज १०० पटीने परवडला..!!

मी माझी..

मृगनयनी's picture

6 Feb 2010 - 11:10 am | मृगनयनी

कोणावर अन्याय झालाय ?? आणि स्वरदा गोखले बद्द्ल न बोललेलच बर.. तिच नेझल गाण ऐकण्यापेक्षा उर्मिलाचा खडा आवाज १०० पटीने परवडला..!!

मी माझी..

स्वरदा गोखले' च्या शात्रीय संगीतातला "शा" तरी उर्मिला व्यवस्थित गाऊ शकली होती का? :-? याचा आधी विचार करावा...

आणि अपूर्वा गज्जला, संहिता चान्दोरकर, मृण्मयी तिरोडकर यांच्या गाण्याबद्दल काय म्हणाल मग?त्यांच्या आवाजाचा पोत कितीतरी पटीने "उर्मिला" पेक्षा सरस होता. आणि मुळातच त्यांच्या आवाजात व्हरायटीज आहेत... ज्या उर्मिलाच्या आवाजात बिल्कूल सापडत नाहीत.

नुसत्या खड्या आवाजावर किती दिवस राहणार? इतरही सूरताल जमायला नकोत का? :( :-?

खरं सांगायचं तर "उर्मिला" चा आवाज हा केवळ मिरचीच्या ठेच्यासारखा आहे..एकदम झणझणीत!!!... एक वेगळीच चव आणणारा!!... पण म्हणून "मिरचीचा ठेचा" हा भाजी, वरण-भात, कोशिम्बीर, पक्वान्न, इ. ची तर जागा घेऊ शकत नाही ना! :) :-?

सांगायचा मुद्दा इतकाच की, उर्मिला'चा आवाज कितीही ठसकेदार असला, तरी काही विशिष्ट गाण्यांपुरताच तो ऐकायला बरा वाटतो!

पण अपूर्वा, संहिता, मृण्मयी..(आणि अभिलाषा सुद्धा)... यांच्या आवाजात इतक्या व्हरायटीज आहेत, की सर्व प्रकारची गाणी त्यांच्या आवाजात ऐकायला "सुश्राव्य" वाटतात!... अर्थात त्यांची गाणी ऐकताना... पंचपक्वान्न आणि मिरचीच्या ठेच्यासकट सर्व रसांचे सेवन केल्याचा आनन्द मिळतो!

आणि त्यामुळेच झी-मराठीने अनेक स्पर्धकांवर अन्याय केल्याचे सिद्ध होते !!!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम ||

मि माझी's picture

8 Feb 2010 - 11:32 am | मि माझी

स्वरदा गोखले' च्या शात्रीय संगीतातला "शा" तरी उर्मिला व्यवस्थित गाऊ शकली होती का? याचा आधी विचार करावा...

शात्रीय संगीतात "शा" नाही तर "सा" असतो .. आणि उर्मिला तो लावु शकत नाही हे म्हणण म्हणजे आतापर्यंत ज्या लोकांची तिच्या गाण्याची स्तुती केली त्याच्यांबद्द्ल काय बोलाल तुम्ही..??

पण अपूर्वा, संहिता, मृण्मयी..(आणि अभिलाषा सुद्धा)... यांच्या आवाजात इतक्या व्हरायटीज आहेत, की सर्व प्रकारची गाणी त्यांच्या आवाजात ऐकायला "सुश्राव्य" वाटतात!... अर्थात त्यांची गाणी ऐकताना... पंचपक्वान्न आणि मिरचीच्या ठेच्यासकट सर्व रसांचे सेवन केल्याचा आनन्द मिळतो!

या सर्वांमधे फक्त अभिलाषाच चांगली आहे.. बाकीच्यांच्या गाण्यात काही ना काही दोष आहेच..


नुसत्या खड्या आवाजावर किती दिवस राहणार? इतरही सूरताल जमायला नकोत का?

असो.. तुमच्या सर्व प्रश्नांना येणारा काळच उत्तर देईल..

मी माझी..

झोप येते किंवा डोके आपटुन घ्यावेसे वाटते. हा माझा दोष आहे काय?
शास्त्रीय संगीत जनमानसात का एकले जात नाही?
दररोज पंचपक्वान्ने खाणे किती जणाना परवडते?
मिरचीचा ठेचा सर्वसामान्य लोकाच्यात का इतका खाल्ला जातो?
झानेश्वर,तुकाराम,मीराबाई,कबीर इ.लोकांची गाणे गायल्याबद्दल शास्त्रीयसंगीत कार त्याच्या वारसाना रॉयल्टी देतात काय?

वेताळ

खडूस's picture

4 Feb 2010 - 4:27 pm | खडूस

तुम्ही कधी मनोरंजन म्हणुन"संहिता चांदोरकर" चं "माहिया...माहिया"( चित्रपटः गुरु) हे गाणं ऐकलंय का?
किन्वा तिनेच गायलेली" उसाला लागंल कोल्हा"ही लावणी ऐकलीये का? ... दुर्दैवाने ऐकली नसेल.. तर परत कधी संधी मिळाल्यास नक्की ऐका... म्हणजे.. उर्मिलाचा आवाज आणि संहिताच्या आवाजातली व्हरायटी... यातील फरक नक्कीच कळेल...

संहिता चांदोरकरचं 'मैय्या मैय्या' गाणं इतकंही तारीफ-ए-काबिल नव्हतं. त्यापेक्षा मौली दवेने कैक पटीने चांगले म्हटले होते.
अर्थात हे माझे प्रामाणिक मत.

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

मृगनयनी's picture

3 Feb 2010 - 6:51 pm | मृगनयनी

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Nile's picture

3 Feb 2010 - 9:52 pm | Nile

वा! अनामिका बाई, वाक्यं फिरवताना तुम्हाला फार वेळ लागत नाही हो.

तुमचा पुर्वीचा प्रतिसाद

जातीवाद व आरक्षण याने आपण किती पोखरलो गेलोय याचा प्रत्यय वरिल काहि (कुंठीत)प्रतिसादांवरुन येतोय.
अहो निदान जे चांगल आहे ते चांगल म्हणण्याचे कष्ट घ्यायला खरच रसिक म्हणवणार्‍यांची तयारी का नसावी?
अनुकुल परिस्थितीतुन सगळेच वर येतात पण प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुढे जाणार्‍यांचे कौतुक करण्यास देखिल जिगर लागते हेच खर!

त्याअद्धी आलेले प्रतिसाद पहा आणि मग ठरवा नक्की कोन मनोरंजना करता पहात होतं ते.

अनामिका's picture

4 Feb 2010 - 12:19 am | अनामिका

कशाला वडाची साल पिंपळाला जोडताय नाइलराव?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अमृतांजन's picture

3 Feb 2010 - 4:59 pm | अमृतांजन

१००% सहमत!

मेघवेडा's picture

3 Feb 2010 - 4:16 pm | मेघवेडा

शब्दाशब्दातून तळमळ जाणवतेय नैनीताई! तुम्ही आम्ही कितीही ढोल बडवले तरी कोणाला काय फरक पडणारेय? हे असंच चालत राहणारेय! बाकी खालचा समंजस यांचा प्रतिसाद काळजाला भिडला! खरंच =D>

(बिकांच्या इष्टायील मधे) खुद के साथ बातां: झी मराठी ही आपली' वाटणारी वाहिनी आणि 'सारेगमप' हा त्यावरील 'आपला' वाटणारा कार्यक्रम होता. त्याचाही यांनी 'धंदा' केल्याने जरा वाईट वाटतं.. याउपर भावनिक गुंतवणूक नाही 'समंजस'जी!

-- एम्. व्ही. दुबे, एम्. डी., झी मराठी. (कलही हमरा तबादला हुआ है, पांडे जी की जगह पे! सिंह साहब कहत रहे, 'पांडे' विदर्भा मे मराठी लोगोंमे भी होवत रहे, अब उनकी जगह पर हमारी नियुक्ती हो गयी है!!!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2010 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ मेघवेडासाहेब, रंगाशेठ मारतील तुम्हाला! खुद के साथ बातां ही त्यांची इश्टाईल है। ;-)

अदिती

मेघवेडा's picture

4 Feb 2010 - 4:44 pm | मेघवेडा

होय होय .. चुकलं.. ध्यानात आलं नंतर! :P

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

अमृतांजन's picture

3 Feb 2010 - 7:13 pm | अमृतांजन

सा रे ग म पा ही स्पर्धा म्हणजे एखादा मापदंड नव्हे. जर इतर स्पर्धेक विजेत्यापेक्षा सरस असतील तर त्यांना संधी मिळेलच व ते एक गायक अथवा कलावंत म्हणून नाव कमावतीलच. कोंबडे झाकले तरी...

जर एखाद्या शहरी स्पर्धकाने स्पर्धा जिंकली असती पण ती व्यक्ति इतर शहरी स्पर्धकांपेक्षा निरस असती तर काय प्रतिक्रिया दिल्या असत्या?

मराठी_माणूस's picture

2 Feb 2010 - 6:22 pm | मराठी_माणूस

अत्यंत योग्य प्रतिसाद १००% सहमत

कवटी's picture

3 Feb 2010 - 1:56 pm | कवटी

मराठी परीक्षकांच्या आयचा घो………..
सवंग प्रसिध्दी मिळवायचा क्षीण प्रयत्न. आणि तुमच्या मते जी सर्वात लायक होती तिलाच विजयी केल्यानंतर परिक्षकाना शिव्या देण्यात काय हशिल? की त्यांचा निर्णय तुम्हाला आवडला नाही?

त्यामुळेच आपले चांगले चांगले स्पर्धक गळत गेले….नाही,जाणीवपूर्वक गाळले.
असे असून उर्मिला मात्र शेवटपर्यन्त राहिली... न्हवे तर कॉलबॅक मधे परत आली याचे आश्चर्य वाटत.....
म्हणूनच मी सारेगम पाहणे बंद केले
आणि तरीही कोण लायक आहे आणि कोण नाही या विषयी आपले ठाम मत आहे. ग्रेट.

आपल्याकडे सगळीकडेच अमराठी लोकांचे फाजील लाड होताना दिसतात.
=)) =)) =)) =)) विठ्ठला कोणता झेंडा हाती घेतला?

आपण किती प्रामाणिक आहोत हे दाखवण्याच्या खोट्या अट्टाहासासाठी हे सगळं चालतं. हे परीक्षक आहेत ना तेही ४२० आहेत….त्यांना हिंदी संगीत सृष्टीत जायचं असतं जिथे जास्त पैसा आहे..म्हणून हे अमराठी लोकांचे लांगूनचालन.
अमराठी स्पर्धकांचे लांगूलचालन करून बर्‍यापैकी एस्टाब्लिश्ड परिक्षकाना काय फायदा होणार आहे, जास्त पैसा असलेल्या हिंदी संगीत सृष्टीत कसे जायला मिळणार आहे ते एक वरचा नाहीतर इथला बाप्पाच जाणे.

उगाच संगीताला भाषा नसते वगैरे वाक्य झाडतील.
भाषा नसेल तर उच्चारांचं महत्व कशाला सांगता?

सहमत.

निदान शेवटी, जाग आली परीक्षकांना आणि उर्मिला धनगरला विजयी घोषित केलं. नशीब आमचं.
उर्मिला विजेतेपदासाठी लायक आहेच, त्यामुळे राहिलेल्या तिघांच्यात तीच जिंकायला हवी होती.

कार्यक्रम न बघता कोण लायक आहे हे ठरवलत हेही एक गुढच आहे. की हा प्रामाणिकपणा दाखवायचा अट्टाहास?

उर्मिलाचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन!
ती जिंकली असल्यामुळे तिचे मनःपूर्वक अभिनंदन.

कवटी

प्रमोद देव's picture

3 Feb 2010 - 2:30 pm | प्रमोद देव

सवंग प्रसिध्दी मिळवायचा क्षीण प्रयत्न

हाहाहा!
तसा मी बर्‍यापैकी (कु)प्रसिद्ध आहेच की.
निदान,मिपावर तरी! ;)

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

गणपा's picture

3 Feb 2010 - 2:33 pm | गणपा

>>ती जिंकली असल्यामुळे तिचे मनःपूर्वक अभिनंदन.
थोडी सुधारणा...
तीला जिंकली असल्यामुळे झीचे मनःपूर्वक अभिनंदन.

श्रीयुत संतोष जोशी's picture

5 Feb 2010 - 4:08 pm | श्रीयुत संतोष जोशी

बरोबर गणपाशेठ.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वरील प्रतिक्रियांन मध्ये जे जे रड्ले, त्यानी कोणाला आणि किती एस एम एस केले ?

मराठी गायक/गायिका जेव्हा हिंदी गाणी गातात तेव्हा त्यांना हिंदी शब्द्दोच्चार नीट जमत नाहीत असे म्हणून त्यांना कमी मार्क देणार्‍या आणि त्याच वेळी अमराठी गायक/गायिकांच्या चुकीच्या मराठी उच्चारांबद्दल न बोलता…ते अमराठी असूनही किती चांगलं मराठी गातात असे म्हणणार्‍या मराठी परीक्षकांच्या आयचा घो………..

नानबा's picture

2 Feb 2010 - 9:36 pm | नानबा

मराठी माणसा एक हो!

पक्या's picture

4 Feb 2010 - 3:14 am | पक्या

तिला जिंकवून आणले असेल तर झी मराठीचे अभिनंदन , ती स्वतःच्या गुणावर जिंकली असेल तर तिचे अभिनंदन. आम्हाला झी सारेगमच्या स्पर्धाच (मराठी , हिंदी) आवडेनाश्या झाल्यात त्यामुळे बघतच नाही. सध्या रिअ‍ॅलिटी शो मधले फकस्त डिआयडी बघतो. डोक्याला ताप नाही.
http://www.youtube.com/watch?v=_SHntmmSMOU&feature=PlayList&p=415B33A18D...
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
जय महाराष्ट्र , जय मराठी !

अनामिका's picture

5 Feb 2010 - 1:53 pm | अनामिका

छे... हो!....!!.आपल्यासारखे केवळ मनोरंजन म्हणून संगीत-कार्यक्रम पाहणारे (आणि आपल्याला पाहिजे तीच्च स्पर्धक निवडून येण्याची खात्री असणारे) रसिक श्रोते असल्यावर आम्ही कशाला बरं काळजी करू?
म्हणुनच म्हणते मी नकाच करु काळजी....नुसता कंठ चांगला असुन चालत नाही कान देखिल चांगलेच असायला लागतात्.....कानानी सुस्पष्ट ऐकु येणार्‍याला कोण निवडुन येणार? हे खचितच योग्यप्रकारे कळते.कारण गाण्यासाठी गळ्याचा वापर करावा लागत असला तरी ऐकायला कानच लागतात्......पुर्वग्रह दुषित दृष्टी़कोन असला की तुमच्यासारखे हुच्च प्रतिचे कलाकार इतरांच्या मराठी किंवा अमराठी असल्याची उठाठेव करायला लागतात....
असल्या उठाठेवीत आपली कार्यशक्ती खर्च करण्यापेक्षा संगीताच्या साधनेत आणि रियाजा कडे अधिक लक्ष पुरवलेत तर जास्त चांगले नाही का?
घरातल्या जुन्याजाणत्यांच्या तोंडी ऐकलेले शब्द चुकीचे असतील असा विश्वास बाळगण्याचा प्रमाद निदान आमच्या हातुन तरी होणार नाही..
तुंम्ही मुळच्याच सर्वज्ञ आहात तेंव्हा शहाण्यास अधिक बोलणे न लागे.
आपल्या संगीतक्षेत्रातल्या भावी प्रवासाला आमच्या शुभेच्छा!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मृगनयनी's picture

7 Feb 2010 - 8:31 pm | मृगनयनी

गाण्यासाठी गळ्याचा वापर करावा लागत असला तरी ऐकायला कानच लागतात्......पुर्वग्रह दुषित दृष्टी़कोन असला की तुमच्यासारखे हुच्च प्रतिचे कलाकार इतरांच्या मराठी किंवा अमराठी असल्याची उठाठेव करायला लागतात....

मी तर माझ्या पहिल्या प्रतिसादातच स्प्ष्ट केले होते, की सर्वांगीण विचार करता"राहुल सक्सेना"महागायक" व्हायला हवा होता...
(उलट आपणच अगदी पहिल्या प्रतिसादामध्ये "उर्मिला"च्च्च निवडून येणार याची खात्री असल्याचे सांगितले होते! :-? )
"अमराठी" चा मुद्दा कुणी उपस्थित केला हे कृपया तपासून पहावे..
आणि हो... त्यासाठी डोळ्यांचा सुयोग्य वापर करा! :)

असल्या उठाठेवीत आपली कार्यशक्ती खर्च करण्यापेक्षा संगीताच्या साधनेत आणि रियाजा कडे अधिक लक्ष पुरवलेत तर जास्त चांगले नाही का?

बाई, तुम्ही सारख्या माझ्या संगीत-साधनेवर टपून बसलाप्रमाणे का हो बोलत असता? :( :-? माझ्या संगीत-साधनेत लक्ष घालण्यापेक्षा... तुम्ही तुमचे मूलभूत "गैरसमज" दूर केलेत, तर ते तुमच्यासाठीच हितावह नाही का? :-?

घरातल्या जुन्याजाणत्यांच्या तोंडी ऐकलेले शब्द चुकीचे असतील असा विश्वास बाळगण्याचा प्रमाद निदान आमच्या हातुन तरी होणार नाही..

घरातल्या जुन्याजाणत्यांच्या तोंडी ऐकलेल्या शब्दांचा अर्थ विचारायला तुमच्यावर बंदी आणली आहे का? की तो अर्थ सांगण्यासारखा नाहीये? ;) :-?
कारण तुम्ही "कणसुरे" या शब्दाचा अर्थ अजूनही सांगितलेला नाही! :(

तुंम्ही मुळच्याच सर्वज्ञ आहात तेंव्हा शहाण्यास अधिक बोलणे न लागे.

नाही हो!!! मी कोण सर्वज्ञ! ? :-? माझा "बापू" फक्त सर्वज्ञ आहे!!!
त्याने घालून दिलेल्या सत्या'च्या मार्गावरून चालणे, हेच आमचे कर्तव्य!
:)

आपल्या संगीतक्षेत्रातल्या भावी प्रवासाला आमच्या शुभेच्छा!

बाई!... इथे असो.. वा खरडवहीत असो!... माझ्या संगीतक्षेत्रातल्या प्रवासाला तुमच्यायेवढ्या शुभेच्छा अजून कुणीच दिल्या नाहीत हो!!! :-?
असो.... माझ्या अनिरुद्धाच्या आणि कलावती-आईंच्या कृपेने माझा प्रवास अगदी सुरळीत चालला आहे.. आणि यापुढेही चालत राहील.....
(काळजी नसावी!!!)
;)
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

प्रमोद देव's picture

7 Feb 2010 - 10:14 pm | प्रमोद देव

असो.... माझ्या अनिरुद्धाच्या आणि कलावती-आईंच्या कृपेने माझा प्रवास अगदी सुरळीत चालला आहे.. आणि यापुढेही चालत राहील....

:D
मजा वाटली.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

वाहीदा's picture

8 Feb 2010 - 2:12 pm | वाहीदा

माझ्या अनिरुद्धाच्या आणि कलावती-आईंच्या कृपेने माझा प्रवास अगदी सुरळीत चालला आहे..
राहूल सक्सेना नावाचा गायक सारेगमप मध्ये होता पण हे अनिरुद्ध आणि कलावती कोण ?? :S
ह्या चर्चासत्राची गाडी कुठ्ल्या रुळावरून चालली आहे...काहीही सुगावा लागत नाही ... :?
~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2010 - 2:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मगाशी श्री. देव यांना मजा वाटली आणि आता मी हसून बेजार झाले आहे.

वाहीदा, तुझा गैरसमज झाला आहे. मृगनयनी ताई ज्या अनिरुद्ध आणि कलावतींबद्दल बोलत आहेत ते लोकं बहुदा त्यांचे अध्यात्मिक गुरू असावेत. या स्पर्धेशी या तिघांचा, (मृगनयनी ताई + अनिरुद्ध, कलावती) काही संबंध नाही.

असो. व्यक्तीगत हाणामार्‍या अशा विनोदी होतील असं वाटलं नव्हतं!

अदिती

कुठे असतात हे अध्यात्मिक गुरू ? सारेगमप मध्ये नव्हते ना.. मग
कशाला उगाच त्यांचे नाव घेऊन confussion वाढवतात हि लोकं ? #:S
मला वाटले मी कलावती अन अनिरुध्द यांचे
काही एपीसोड मिस तर केले नाही ना.. असो या स्पर्धेशी यांचा काहीही संबंध नाही ना मग, त्यांना बळेच कशाला खेचायचे या वादात , आधीच confussion आहे, आणखीन वाढवतात :-(
Anyways thanks for the info. Maau, Next time I will remember, they are Spiritual Gurus , who have nothing to do with meaningless worldly affairs .
~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2010 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही ही ही ... तुझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. पण टी.आर.पी. वाढवण्यासाठी(?) बाबा, बुवा, ताई, माई, आक्का 'सारेगम'मधे येऊन गायले हा विचार करून आणखी एकदा जोरदार हसले.

वाहीदा, तुझ्या या प्रतिसादासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. ;-)

अदिती

गणपा's picture

8 Feb 2010 - 4:02 pm | गणपा

हॅ हॅ हॅ
आमच ही स्टँडिंग ओवेशन.

समंजस's picture

8 Feb 2010 - 4:43 pm | समंजस

:D
अदितीतै शी सहमत!!!
हा धागा मजेशीर झाला आहे, हे मला सुरवातीलाच वाटलं होतं. ५० च्या वर प्रतिसाद जाणार नाहीत असा अंदाज होता :)
मात्र आता असे दिसतेय की १०० च्या वर जाणार :)

अश्या प्रकारची स्पर्धा गंभीरपणे घेणे हेच माझ्या करता गंमतीदार आहे :D

मेघवेडा's picture

8 Feb 2010 - 5:24 pm | मेघवेडा

पण टी.आर.पी. वाढवण्यासाठी(?) बाबा, बुवा, ताई, माई, आक्का 'सारेगम'मधे येऊन गायले हा विचार करून आणखी एकदा जोरदार हसले.

उत्तुंग षटकार!!

-- नाबाद ३१४!

मृगनयनी's picture

9 Feb 2010 - 11:30 am | मृगनयनी

कुठे असतात हे अध्यात्मिक गुरू ? सारेगमप मध्ये नव्हते ना.
वाहिदाजी, वरच्या काही प्रतिसादात (आणि माझ्या खरडवहीत सुद्धा) एक मिपा-सदस्या मला माझ्या संगीत-प्रवासासाठी इतक्या शुभेच्छा देत होती.... की मला irritation झाले... त्यामुळे तिने तिच्या शुभेच्छा देणे बन्द करावे, म्हणुन मी म्हटले, की "बाई गं ... पुरे आता तुझ्या शुभेच्छा!... माझी काळजी करू नकोस.... माझी काळजी वाहायला माझे गुरू : "अनिरूद्ध बापू आणि कलावती आई" समर्थ आहेत!"
Actually "ती" मला देत असलेल्या शुभेच्छांचा आणि "उर्मिला धनगर"चा काहीही संबंध नव्हता... त्यामुळे शेवटी माझ्या 'कर्त्या-करवत्यांची' नावे घेऊन मला "त्या"शुभेच्छा थांबवाव्या लागल्या...
असो...
पण आता तुम्ही विचारलंच आहे... म्हणून बोलावं लागतंय : की,
माझे गुरू हे नेहमीच माझ्याबरोबर असतात!!! त्यांची शक्ती ही सर्वव्याप्त आहे.... त्यामुळे ते जगात असं कुठलंच ठिकाण नाही... जिथे ते जाऊ शकत नाही!
आणि वाहीदा,जी...ते- "अम्बे-माता के पहाड के पीछे" पण असतात बरं का? ;) ;) ;) ;) अगदी "कागज के शेर" को भी वो असली शेर बना सकते है!!! ;) =)) =)) =)) =))

पण... पण.... अशा जादू करून पब्लिसीटी आणि प्रसिद्धी मिळवण्यार्‍या भोंदूपैकी "ते" नक्कीच नाहीत.... त्यामुळे कुणीही काहीही म्हटले, तरी मी त्यांची अनुयायी असल्याचा मला अभिमान वाटतो.... आणि वाटत राहील!

असो..... "उर्मिला धनगर" चा आणि याचा काहीही संबंध नाहीये!!!!
माझ्या गुरुंबद्दल झालेल्या काही लोकांच्या गैरसमजामुळे हे सर्व मला सांगावे लागले! :)

विषयांतराबद्दल दिलगीर आहे!


युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नैनी अग त्रागा कुठे करून घ्यायचा ? अन किती करून घ्यायचा यालाही मर्यादा असतात.. तुझा स्वभाव मिश्कील आहे, तुला कोपर खळ्या मारणे आवड्ते हे सगळेच जाणून आहेत का ?

कोणी कोणाला शेर बनवले हे येथे लागू पडते का राणी ? उगाच शेराला सव्वाशेर व्हायचे अन धाग्याचा खव करायचा ...

'लोकांना या गुरू माउलीं बध्द्ल काय वाटते' त्यामुळे त्यांचे स्थान किंवा त्यांच्या प्रतिमेला धक्का नाही लागत पण उगाचच आस्था अन श्रध्दास्थाने चुकीच्या ठिकाणी खेचू नये..त्यांचा ही नकळत अपमान होतो . मला ही दोन श्रध्दास्थाने खरच माहीत नव्हती

असो , आता हे कृपया ईथेच संपवावे...राग मानू नये . ('अहो / जाहो 'वरून 'अग' वर आले, कारण तू नेहमीच आपली वाटली)
बाकी तू जिवढी गोड मिश्कील खरड लिहतेस तशीच गोड गातेस ही, हे वाचून आनंद झाला . :-)
~ वाहीदा

मृगनयनी's picture

10 Feb 2010 - 11:34 am | मृगनयनी

धन्यु! वाहीदा!!..... :)

या तुझ्या २-४ प्रतिसादातच तुझी "अनेक" रूपे पाहायला मिळाली!
;) ;) ;)


युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कणाकणात देव ...
तसेच अनेक रूपात वाहीदा (वाहीदा हे नाव देवाचेच आहे) !
तरीही एकमेव , अद्वितीय !!
माझ्या नावाचा अर्थच तसा आहे -- वाहीदा = Unique , अद्वितीय
;-) ;-) ;-) ;-)
(बाकी सर्व खरडवहीत .. :-) )
~ वाहीदा

मृगनयनी's picture

9 Feb 2010 - 11:34 am | मृगनयनी

-

इथे पहा - खुद्द 'मालकांच्या भाषेतली टिप्पणी' सापडेल. हा त्या धाग्याचा दुवा: http://mr.upakram.org/node/309

ह्या दुव्यावर ही माहिती सापडेल.
http://www.google.com/search?q=%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A...

बाकी चर्चा चालू दे - फारच मनोरंजक आहे.

अमृतांजन's picture

7 Feb 2010 - 11:06 pm | अमृतांजन

उर्मिला धनगरचा आवाज मी आजच युट्युबवर व्हिडीओ-ऑडीयो मधून ऐकला. आवडला. तिच्या आवाजाची पोत वेगळी आहे व असा कलाकार वर येणे आवश्यक आहे.

तिचा आवाज अधिक शास्त्रशुद्ध व्हावा ह्यासाठी तिला काय ट्रेनिंग आणि कुणाकदे आवश्यक आहे समजू शकेल काय?

मृत्युन्जय's picture

8 Feb 2010 - 2:02 pm | मृत्युन्जय

धनगर जिंकणार हे आधीपासुनच माहिती होते.

पहिल्या सत्रात मंगेश बोरगावकर न जिंकता अभिजीत कोसम्बी जिंकला तेंव्हा वाटले की चुकुन झाले असेल.

दुसर्यांदा सायली पानसेच्या ऐवजी वैशाली म्हैस्णे माडे जिंकली तेंव्हा आम्ही मनाची समजुत घातली की दोघी तुल्यबळ होत्या. वैशाली कदाचित परिक्षकांना जास्त चांगली वाटली असेल.

पुढच्या वेळेस मात्र जेव्हा प्रथमेश लघाटे आणी आर्या आंबेकर ऐवजी कार्तिकी गायकवाड जिंकली तेंव्हा कळुन चुकले की परिक्षक विकले गेलेले आहेत. झी मराठीच्या सेटवर एक दलित नेता (नाव देत नाही इथे.) नेहेमी असतो हे ऐकुन होतोच. लहान मुलांबरोबर असे नको होते करायला त्या हरामखोर लोकानी. प्रथमेश लघाटे आणी आर्या आंबेकर हे दोघेही कार्तिकी गायकवाड च्या ऐवजी किमान १००० पट चांगले होते. मुग्धा वैशंपायन आणी रोहित राऊत देखील कार्तिकी गायकवाड पेक्षा चांगले होते. असो.

त्यानंतर मी त्या भेन** लोकांचा कार्यक्रम बघायचा नाही हे पक्के ठरवले होते. पण मातोश्री बघायच्या. त्यांना असा भाबडा आशावाद होता की यावेळेस तरी हे भिकार** ल "कोटा सीस्टिम" पुढे चालवणार नाहीत. मी आधीच पैज लावली होती कि उर्मिला धनगर जिंकेल. तशी ती जिंकली. लोंग लाईव डेमोक्रसी, फोर एवर लाईव "कोटा सीस्टिम"

मृगनयनी's picture

9 Feb 2010 - 11:03 am | मृगनयनी

मृत्युंजयजी,

१०८ % सहमत!

"झी-मराठी'चे कर्ते-करवते" लोक वेगळे आहेत... त्यामुळे पल्लवी-जोशी- अग्निहोत्री काकूंचा आणि त्यांच्या परीक्षकांचा दरवेळी नाईलाज होतो हो! :( :(

असो... पण पल्लवी-ताई देखील कमी नाहीयेत!. ;) .. असंभव' सारख्या मालिकांमधून "शास्त्री" कुटुम्बावर होणारा अन्याय दाखवून सुलेखा "राऊत", यशवन्तराव "सरंजामे", परमेश्वर "गोडाम्बे" इ.... हलकट प्रवृत्तीच्या माणसांची विचारसरणी उत्तमरीत्या दाखवली आहे!... स्वार्थासाठी "ही" माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात..... याचे उत्तम उदाहरण सुलेखा "राऊत" च्या माध्यमातून दिग्द. सतीश राजवाडे आणि संगीत कुलकर्णी यांनी स्पष्ट केलेले आहे.

असो... "उर्मिला धनगर " प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाही.....
त्यामुळे... संबंधितांनी संभ्रमित होऊ नये.....
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मि माझी's picture

9 Feb 2010 - 12:38 pm | मि माझी

ज्याच्यांमुळे आज तुम्ही स्त्री असुनही घराच्या बाहेर पडुन शिकु शकता ते महात्मा फुले च होते..तुमचे विचार वाचुन खुपच वाईट वाट्ले . कलाकाराने आधी माणुस म्हणुन मोठे असावे...(असं माझे गुरु सांगतात..!!)

मी माझी

अमृतांजन's picture

9 Feb 2010 - 1:28 pm | अमृतांजन

कलाकाराने आधी माणुस म्हणुन मोठे असावे
१०००००% सहमत.

अमृतांजन's picture

9 Feb 2010 - 1:28 pm | अमृतांजन

कलाकाराने आधी माणुस म्हणुन मोठे असावे
१०००००% सहमत.

टिउ's picture

10 Feb 2010 - 4:54 am | टिउ

हीच का तुमच्या गुरुंची शिकवण? धन्य ते अनिरुद्ध बापु आणि धन्य त्यांचे शिष्य!
तिकीटं पण जातीचा दाखला बघुन विकणार असाल?

पंकज's picture

19 Feb 2010 - 12:48 pm | पंकज

दुसर्यांदा सायली पानसेच्या ऐवजी वैशाली म्हैस्णे माडे जिंकली तेंव्हा आम्ही मनाची समजुत घातली की दोघी तुल्यबळ होत्या. वैशाली कदाचित परिक्षकांना जास्त चांगली वाटली असेल.

झी वाले इथेच थांबले नाही तर त्यांनी वैशाली भैसने-माडे हिला हिंदी सारेगमाचं देखिल विजेतेपद दिलं. म्हणजे ह्यांची लॉबी किती मजबूत आहे ते दिसून येते.

अमृतांजन's picture

9 Feb 2010 - 7:10 am | अमृतांजन

ज्या कलाकारांची कला उजवी असूनही त्याला स्पर्धेतून बक्षीस मिळाले नाही म्हणून त्यांच्या कलेची गुणवत्ता थोडीच झाकली जाते? ते नक्कीच पुढे येतील.

गेल्या ३ ते ४ वर्षात सा रे ग मा मधून चुकीची निवड होते आहे असा आक्षेप घेतला जात असतांना ह्या गेल्या स्पर्धेतून बाद झालेल्या कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणेही आवश्यक आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2010 - 12:52 pm | बिपिन कार्यकर्ते

या धाग्याला मिळालेले जातिय वळण अतिशय दु:खदायक आहे.

(व्यथित) बिपिन कार्यकर्ते

प्रमोद देव's picture

9 Feb 2010 - 1:37 pm | प्रमोद देव

अध्यात्मिकतेच्या नावाखाली गुरूमंडळी देखिल जातीयतेची शिकवण देतात की काय नकळे.
की आपल्या जातीयवादी भुमिकेला अधिष्ठान प्राप्त करण्यासाठी काही जण अध्यात्मिक गुरुंनाही वेठीला धरतात?
नेमकं काय समजायचं?
कुणीतरी म्हटलंच आहे ना की "माणसं सुशिक्षित झाली तरी सुसंस्कृत होतातच असे नाही."

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

मि माझी's picture

9 Feb 2010 - 3:38 pm | मि माझी

अगदी बरोबर.. शेवटी "जशी दृष्टी तशी सॄष्टी"

मी माझी..

मृगनयनी's picture

10 Feb 2010 - 11:24 am | मृगनयनी

"उर्मिला धनगर" प्रकरणाला जातीय वळण लावले जात आहे... असा आरोप वरील काही प्रतिसादांमधून केला जात आहे......

परन्तु, दुर्दैवाने तेच सत्य आहे...

झी-मराठी चं "सारेगमप" खरोखर जातीयवादामध्ये अडकलं जात आहे. :( :( आणि त्याचं प्रत्यंतर गेल्या काही वर्षांपासून येत आहे.
जर निकालाची प्रतवारी सर्व जाती-धर्मीयांनी डोळसपणे पाहिली, तर मागासवर्गीय, अनुसुचित जाति-जमातींना अति-प्राधान्य दिले जात आहे. जर संगीताची भाषा "UNIVERSAL" आहे, तर मग असा भेदभाव का?
बरं ही गोष्ट एकदा घडली, तर ठीक अहे... पण आता तर हे वारंवार होऊ लागले आहे! :(

जर झी-मराठी'च्या या जातीयवादी धोरणामुळे जर इतर( open catagery तल्या ) चांगल्या गायकांचे सतत नुकसान होत असेल, तर कुठेतरी या विषयाला वाचा फोडणे महत्वाचे आहे.

पूर्वनियोजित स्पर्धकाला पुढे आणण्यासाठी असलेले "एस एम एस" चे कारण- हे एक प्रभावी साधन / माध्यम आहे. सारेगमप्'चे कर्ते-करवते (म्हणजे: पल्लवी जोशी नाही! ) त्याचा अगदी व्यवस्थित वापर करत आहेत!

त्यामुळे जर माझ्या जातीय लेखनाचा इथल्या सुखवस्तू सदस्यांना इतका त्रास होतोय... तर झी-मराठीच्या जातीय धोरणाचा तिथल्या (open catagery )स्पर्धकांना किती बरे त्रास होत असेल? :-?

आणि हो!... कृपया माझ्या "गुरूं"ना यामध्ये आणण्याची कुणालाही काहीही गरज नाही! ज्यांना माझ्या गुरुबद्दल शंका होत्या.. त्यांचे व्यवस्थित निरसन मी केलेले आहे! त्यामुळे कृपया पुन्हा माझ्या "गुरुंचा" उल्लेख करून आणि त्यांच्या बद्दल उगीचच अर्थहीन प्रश्न विचारून त्यांचा अपमान करू नये... आणि नंतर स्वतःचाही अपमान करून घेऊ नये!


युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अमृतांजन's picture

10 Feb 2010 - 2:10 pm | अमृतांजन

>>>जर झी-मराठी'च्या या जातीयवादी धोरणामुळे जर इतर( open catagery तल्या ) चांगल्या गायकांचे सतत नुकसान होत असेल, तर कुठेतरी या विषयाला वाचा फोडणे महत्वाचे आहे.>>>

जर इतर स्पर्धेक विजेत्यापेक्षा गुणवान असतील तर ते आपसुकच पुढे येतील. कोंबडे झाकले तरी....

मृत्युन्जय's picture

11 Feb 2010 - 1:11 pm | मृत्युन्जय

ते येतीलच पुढे. १०-१२ नंतर नाही का कोट्यामुळे प्रवेश मिळवतात लोक. पण शेवटी प्रतिभाशाली लोकच आयुष्यात पुढे जातात. तसेच आहे हे. पण म्हणुन आर्या आणि प्रथमेश वर झालेला अन्याय विसरायचा का? लहान आहेत रे ति मुले. त्यांना लहानपणापासुनच हा भेदाभेद दिसला ना डोळ्यासमोर. ते दोघेही जास्त लायक होते कार्तिकी पेक्षा. कार्तिकी वर राग नाही. ती पण चांगली होती पण इतर ४ पेक्षा जास्त चांगली नव्हती. दु:ख हेच आहे की सगळे जातीवर अवलंबुन आहे.

प्रमोद्_पुणे's picture

10 Feb 2010 - 3:10 pm | प्रमोद्_पुणे

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||

हे असे आहे की,

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण निश्चित मरणार||

म्हणजे तुम्ही जसे लिहिले आहे त्यात यमकाचा लोचा वाटत आहे; ते महावाक्यम् बर्याच वेळा वाचले एवढयात त्यामुळे ही शंका. राग मानू नये. .

मृगनयनी's picture

13 Feb 2010 - 11:35 am | मृगनयनी

माझ्या अनिरुद्धाचं महावाक्य :

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||

हे असंच आहे! आणि असंच राहील.... :)
यमकाचा लोचा वगैरे काहीही नाही.

टीप : अधिक माहितीसाठी जवळच्या "अनिरुद्ध उपासना केन्द्रा"मध्ये संपर्क साधावा.

धन्यवाद!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

ए. प्रशांत's picture

19 Feb 2010 - 11:14 am | ए. प्रशांत

Mobile9.com - ooomph your phone

फ्रॅक्चर बंड्या's picture

19 Feb 2010 - 6:27 pm | फ्रॅक्चर बंड्या

अर्धा तास लागला हा धागा वाचायला....
का वाचला ~X( ~X(
आता परत हा धागा बघणार नाही..
शेवटी कोण जिंकेल त्यानी आम्हाला खरडवहीत लिहुन कळवा....

binarybandya™