(अधिकार)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
12 Mar 2008 - 8:12 pm

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अधिकार

किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे
घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे

कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे
मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे

चार रंगांनी बघा बदले कशी दृष्टी जगाची
आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे

भाव थोडे वेगळे डोळ्यात माझ्या पाहिले अन
लाज थोडी, घाबरे तो काय ही करणार आहे

वाट रुळलेली कशाला चालुया दोघे पुन्हा ही
ह्या प्रवासाने जगाचे मोडले संसार आहे

मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ?
जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 8:16 pm | विजुभाऊ

कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे
मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे
या पेक्षा

कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी
मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते

धम्मकलाडू's picture

20 Mar 2008 - 12:48 pm | धम्मकलाडू

कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी
मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते
»
हाहाहाहा. तुमचं पार मीटररीडिंग चुकलेलं दिसतं.

धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धम्मकलाडू's picture

20 Mar 2008 - 5:57 pm | धम्मकलाडू

...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात....

(बापमाणूस) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इनोबा म्हणे's picture

20 Mar 2008 - 6:12 pm | इनोबा म्हणे

मला कुणाकडेही तक्रार करायची गरज नाही.शेळपट कोण आहे ते सर्वांना माहीत्र आहे.स्वतःच्या नावाने लिहीणारा की स्वतःचे नाव लपवणारा?
तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो.
इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

आणिबाणीचा शासनकर्ता's picture

20 Mar 2008 - 6:28 pm | आणिबाणीचा शासनकर्ता

धम्मकलाडूंचा येथील प्रतिसाद उडवला आहे.

...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात....

तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो.
इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील.

धम्मकलाडू आणि इनोबांना दोघांनाही जाहीर मारामार्‍या करण्याची एकेक संधी देण्यात आली आहे व समसमान न्याय केला आहे! कृपया पुढील मारामार्‍या एकमेकांच्या खरडीत किंवा एकमेकांना पोष्टकार्ड पाठवून करा.

इतर लोकांना मूळ काव्याचा आस्वाद घेता यावा या करता हे पाऊल उचलले आहे!

-- जनरल डायर.

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 8:34 pm | इनोबा म्हणे

मस्त रे केशवा! आज काय छापखाना चालू केला काय :०

मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ?
जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

अगदी बरुबर..

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 9:13 pm | सुधीर कांदळकर

आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे
आजचा 'कल' (ट्रेंड) बरोबर पकडला आहे. 'संततधार खासच आहे.

मजा आली.

शुभेच्छा.

वरदा's picture

12 Mar 2008 - 9:34 pm | वरदा

अँटीक म्हणायचय ना तुम्हाला? ऍटीक म्हणजे माळा ज्यावर सगळ्या घरातल्या नको असलेल्या गोष्टी नेऊन टाकतो तो.....
बाकी विडंबन नेहेमीप्रमाणे झकास...तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही...

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 1:10 am | इनोबा म्हणे

तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही...
नाही हो! खरे तर केशव आधी विडंबने पाडतो आणि नंतर लोक त्याच्यावर कविता रचतात.:(
बाकी वरदाताई बर्‍याच दिवसानी दिसत आहेत. काय घरी खुप काम असते वाटतं?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

केशवसुमार's picture

13 Mar 2008 - 4:57 pm | केशवसुमार

वरदाताई,
मनोगत आणि मिसळपावच्या टंकलेखन खिडकीतली ही तांत्रिक चूक आहे.. मनोगतावर 'अँटीक' टंकित करून ते इथे चिकटवले की 'ऍटीक' का दिसते कोणास ठाऊक..
(बुचकळ्यात)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 7:13 am | विसोबा खेचर

मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ?
जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

केशवा, आपण मानतो बुवा तुझा अधिकार!

मस्त विडंबन...

तात्या.

केशवसुमार's picture

13 Mar 2008 - 4:58 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!!
(आभारी) केशवसुमार

प्राजु's picture

14 Mar 2008 - 8:16 am | प्राजु

किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे
घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे

हेच आवडले..
उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.. थोडिशी बिझी आहे आजकाल..

- (सर्वव्यापी)प्राजु

मनस्वी's picture

20 Mar 2008 - 3:08 pm | मनस्वी

किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे
घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे

आवडले!