कन्नथिल मुथ्थुमित्ताल ( २००२) ... राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
28 Jan 2010 - 4:36 pm

कथा पटकथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम....
हम्म्म....
दहशतवादाच्या आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा मणिरत्नमने यापूर्वी रोजा ( १९९३) , बॊम्बे ( १९९५) आणि दिल से ( १९९८) बनवल्या होत्या. त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड :) म्हणून ) आणि दिलसे ठीकठाक वाटला होता... शेवट भलताच गुंडाळल्यासारखा वाटला होता..

बर्‍याच वर्षांपूर्वी एका मित्राने मला या "कन्नथिल मुथ्थुमित्ताल" सिनेमाबद्दल सांगितल होते, कोणत्यातरी फेस्टिवलमध्ये त्याने पाहिला आणि बघच म्हणाला होता....
मणिरत्नम आणि तामिळ दहशतवाद वगैरे म्हटल्यावर मी तोंडदेखले बरं बरं असे म्हटले होते... आता टेररिस्ट मंडळी , त्यांच्यात अडकलेला सामान्य माणूस किती निराळ्या पद्धतीने दाखवणार असं आपलं मला वाटत होतं.... पण काल चित्रपट पाहिल्यावरती आपली तर बोलतीच बंद झाली... अप्रतिम सिनेमा आहे...
( ... टाईम मासिकात आलेल्या सत्यघटनेवरून या सिनेमाची प्रेरणा घेतली आहे... एका अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या दत्तक मुलीची खरी आई शोधण्यासाठी फिलिपाईन्सपर्यंत प्रवास केला, अशी काहीशी ती कथा होती)

थोडक्यात कथा अशी...
चेन्नईमध्ये राहणार्‍या एका लेखकाला (आर. माधवन)आणि त्याच्या बायकोला ( सिम्रन) तीन मुले , त्यतली अमुधा ( कीर्तना) ही नऊ वर्षांची.... तिच्या नवव्या वाढदिवसाला तिचे वडील तिला सांगतात की ती त्याची मुलगी नाही, तिला दत्तक घेतले आहे. मुलीचे भावविश्व टोटल गंडते. आपली खरी आई कोण? आपल्या आईने आपल्याला का सोडून दिले असेल असे प्रश्न तिला सतावायला लागतात... आई शोधण्यासाठी मुलगी स्वत:च प्रयत्नाला लागते , ते पाहून मुलीसाठी तिचे दत्तक आईवडील तिची खरी आई शोधायचे मान्य करतात... त्यांना अर्थात खर्‍या आईचे नाव आणि श्रीलंकेतले एक गाव इतकेच ठाऊक असते. पुढे सुरू होतो, तुटपुंज्या माहितीवरचा श्रीलंकेतला प्रवास.....

हा सिनेमा दहशतवादावर काहीच स्टँड घेत नाही असा काहींचा आक्षेप आहे.. ( मला काही असे वाटले नाही... गोष्ट एका नऊ वर्षे वयाच्या मुलीची आहे, तिच्या आईला शोधण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आणि त्यांची होणारी भेट इतकाच आहे...

२००२ च्या या सिनेमाला ६ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली.
रजत कमळ उत्कृष्ट प्रादेशिक सिनेमा, संगीत ( रहमान) , गीत ( वैरामुथु), बालकलाकार ( कीर्तना) , सिनेमॅटोग्राफी ( रवि के चंद्रन).......


हॅप्पी फ्यामिली




माझी आई कुठाय?


मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन


प्रवास

आई सापडली??

ल्यापटापावर पाहतानाही सिनेमेटोग्राफी भारी वाटत होती, थिएट्रात तर काय होत असेल? बालकलाकार कीर्तना अप्रतिम.... मणिभाऊ पोरांकडून मस्त काम करून घेतात...
आप्ली सिम्रन ( पूर्वी फ़क्त हिच्यावर आम्चा फ़ार जीव ..टायपातली कामं करताना पाहिली होती...इथे ती चक्क उत्तम अभिनय करते)... रहमानचं संगीत नेहमीप्रमाणेच मस्त..... शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्‍या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे....... दोन तीन गाणी अजिबात अनावश्यक... आम्ही पुढे ढकलून पाहिली... जालावर एका पाश्चात्य मानवाचे परीक्षण वाचले... तो म्हणतो ,'सिनेमा आवडला पण मध्ये मध्ये म्यूझिक व्हिडिओसाठी इतका वेळ थांबतात का देव जाणे..." :)

हा पिक्चर सोडून आपण ऑस्करसाठी २००२ साली देवदासला पाठवले हे समजल्यावर मन भरून आले.... ( ०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले. :) मज्जा आली.. )

या सिनेमावर एका दत्तक मुलांसाठी काम करणार्‍या एन्जीओमधल्या एका ताईंनी प्रचंड शिव्या घातलेल्याही वाचल्या... ( हा सिनेमा पाहून आईवडील मुले दत्तक घ्यायला घाबरतील , यात दत्तक कोणाला घता येते यासंबंधी अपूर्ण माहिती आहे , वगैरेवगैरे त्यांचे आक्षेप होते...... चित्रपट पाहताना काही असे वाटले नाही, हे खरे...

चुकवू नये असा हा सिनमा आहे...

जरूर बघा...

कलाचित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2010 - 4:38 pm | भडकमकर मास्तर

आम्ही फ्लिकरवरती अपलोड केलेली चित्रे दिसत नाहीत ...
सारे प्रयत्न करून पाहिले...
मदत द्या...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2010 - 4:41 pm | भडकमकर मास्तर

कन्नथिल मुथ्थुमित्ताल या नावाचा अर्थ ढोबळमानाने ( गालावरचा पापा) असा काहीसा होतो म्हणे...
मात्र उच्चार स्पेलिंगप्रमाणे लिहिला आहे... चुकला असल्यास माफ करा आणि दुरुस्ती करावी...

झकासराव's picture

28 Jan 2010 - 5:04 pm | झकासराव

०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा>>>>>>>>>>
=)) =)) =))

परिक्षण आवडल.
आता बघेन म्हणतोय पण सापडणार कुठे काय माहिती. :)

रेवती's picture

28 Jan 2010 - 5:22 pm | रेवती

दोनेक महिन्यांपूर्वी बघितला होता. खरच चांगला सिनेमा आहे.
रेवती

सहज's picture

28 Jan 2010 - 6:50 pm | सहज

मधे कधीतरी कुठलातरी चॅनेल बदलताना हा सिनेमा एका आडवाटेतल्या चॅनेलवर चालू होता असे आठवते. ह्या सिनेमात श्रीलंकेतील कॉन्टॅक्ट / पोलीस/ मदतनीस भूमीकेत प्रकाशराज नावाचा नट आहे ना? एका मोकळ्या मैदानातून लोक स्थलांतर करत आहेत, मग गोळीबार का सुरुंग असे काही सिन आहेत का?

असो नेक्स्ट टाईम. धन्यु मास्तर.

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2010 - 12:34 am | भडकमकर मास्तर

करेक्ट..
प्रकाशराज आहे... तोच सिनेमा तो...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jan 2010 - 7:16 pm | बिपिन कार्यकर्ते

चित्रपट बघायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे आता. मास्तर, चित्रपट मिळेल का बघायला?

अवांतर: चित्रं सुधारली आहेत. आता सगळ्यांना दिसावीत बहुतेक.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

28 Jan 2010 - 8:51 pm | चतुरंग

नेटफ्लिक्सवर बघितला.
इंग्रजी नामकरण "A Peck on the cheek" असं आहे.
अप्रतिम सिनेमा. सर्वांचे अभिनय दृष्ट लागण्याजोगे आहेत. लहानगी कीर्तना तर सर्वात भावली.
सिंहली-तमिळ वांशिक संघर्षाची स्फोटक पार्श्वभूमी असूनही मणिरत्नमने खूपच संयमित हाताळणी केली आहे त्याबद्दल त्याचे कौतुक वाटते.
चुकवू नये असा सिनेमा.
(ह्या सिनेमाबद्दल लिहिण्याचे मनात होते पण वेळाचे गणित जमेना. माझे काम केल्याबद्दल धन्यवाद मास्तर! :)

चतुरंग

धनंजय's picture

28 Jan 2010 - 8:59 pm | धनंजय

परीक्षण वाचून चित्रपट बघावासा वाटतो आहे.
नेटफ्लिक्स वरती मागवला आहे.

सखी's picture

28 Jan 2010 - 9:31 pm | सखी

चांगले परीक्षण झाले आहे. लगेच बघावासा वाटला. चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचीच कामे/अभिनय दृष्ट लागण्याजोगे आहेत. तुनळीवर सगळे भाग नाहीत, पण गुगल व्हिडीयोवर आहे - दुवा

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jan 2010 - 7:52 am | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद , सखी. लगेच उतरवऊन घेतला आहे. महून मधून बघितला पण.

मास्तर, चित्रपट खरंच उच्च आहे. धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2010 - 12:44 am | भडकमकर मास्तर

चित्रे सुधारून दिल्याबद्दल धन्यवाद...
... चित्रपट नेटफ्लिक्सवरती उपलब्ध आहे म्हणताहेत रंगाकाका..
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Jan 2010 - 9:04 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मास्तर, चुरचुरीत आणि संक्षिप्त परिचय आवडला. धनंजयप्रमाणे मीही नेटफ्लिक्स रांगेत लावला आहे. इंग्रजी नाव दिल्याबद्दल श्री चतुरंग यांचे आभार.

I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

चतुरंग's picture

28 Jan 2010 - 9:34 pm | चतुरंग

थेट ऑनलाइनही बघता येईल. चकतीची वाट बघावी लागणार नाही.

चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Jan 2010 - 9:39 pm | अक्षय पुर्णपात्रे

रांगेत लावला आहे. (आधीचे बरेच पहायचे आहेत.)

.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत

मित्र हो,
"कन्नथिल मुथ्थुमित्ताल" या तमिळ सिनेमातील रेहमाननी म्हटलेल्या एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आपल्या साईटवरील तमिळतज्ञ हैयोहैयैयो यांनी त्या तमिळ गीताचा मराठीत अनुवाद करून ते गीत ए. आर.रहमान यांनी मराठीत गावे असा प्रेमळ आग्रह केला आहे. त्याला मान्यता देऊन ते गीत मराठीत गायला सोपे व्हावे म्हणून पुण्यातील वाद्यवृंदासमावेत प्रसिद्ध गायक श्री.ह्रषिकेश रानडे यांनी गाऊन त्या गीताला तयार केले आहे.काही कारणांनी ते गीत अद्याप मराठीतून रहमानांच्या आवाजात ऐकायला मिळायचा योग आलेला नाही. लवकरच तो येवो.
मी हैयोंना विनंती करतो की त्यानी ते गीत व त्याची ध्वनी फीत या इथे जरूर संलग्न करावी.

शशिकांत

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2010 - 12:38 am | भडकमकर मास्तर

या माहितीबद्दल धन्यवाद...
जरूर ते गाणे येथे चढवावे.. प्रतीक्षेत आहे
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

शुचि's picture

29 Jan 2010 - 6:51 am | शुचि

गान अप्लोड करावे चे "चढवावे" भाषान्तर लै मस्त :P

शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्‍या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे =)) =)) =))

शिणुमा थोडा गम्भीर हाये .... मला पचायचा न्हाइ. पन परीक्शनाची इश्टाईल लै आवडली.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

फारएन्ड's picture

29 Jan 2010 - 7:12 am | फारएन्ड

छान लिहीले आहे. बघायला पाहिजे हा.

सुनील's picture

29 Jan 2010 - 7:28 am | सुनील

छान परिचय.

रेहमानच्या आवाजात मराठी गाणे ऐकायची उत्सुकता आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण's picture

29 Jan 2010 - 7:49 am | मदनबाण

परिक्षण आवडले... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

कालिन्दि मुधोळ्कर's picture

29 Jan 2010 - 1:01 pm | कालिन्दि मुधोळ्कर

कण्णतिल मुत्तमिटाळ मधले एक अप्रतिम गाणे.

ह्याचे शब्द/अर्थ अत्यंत आर्त आहे. कदाचित हैयो हैयैयो अनुवाद देऊ शकतील.

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2010 - 1:17 pm | स्वाती दिनेश

मास्तर ,परीक्षण आवडले. चित्रपट पहायची उत्सुकता आता वाढली आहे,वर दुवे आहेत, आता लवकरच पाहते.
स्वाती

वाहीदा's picture

30 Jan 2010 - 4:55 pm | वाहीदा

कीर्तना या लहानगी चे चेहर्यावरील हावभाव अप्रतिम !

त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड म्हणून ) =)) =))
०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले
=)) =)) =)) =))

~ वाहीदा

स्वाती२'s picture

30 Jan 2010 - 6:18 pm | स्वाती२

छान परिक्षण! आता वेळ काढून नक्की बघणार.

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Jan 2010 - 7:55 am | डॉ.प्रसाद दाढे

उत्तम परिक्षण! मास्तरांनी सुचविलेला पिक्चर वा नाटक सहसा बेकार मामला असत नाही (बारा वर्षांची तपश्चर्या!)
पाहिला पाहिजे..

मराठीकरणामागील सारांश + मिपाकरांस आवाहन!

श्रीलंकेमध्ये इ.स. २००१ चे घनघोर नागरी युद्ध आरंभिले जावून अनेक निष्पाप नागरिकांचे निष्कारण बळी गेले. सदरचे युद्ध चालू असताना होणार्‍या नरसंहारामुळे मद्देशीयसुहृद्विद्वान श्री. ए.आर. रहमान अत्यंत उद्विग्न झाले होते, आणि त्या मनस्थितीत त्यांनी 'कन्नत्तिल मुत्तमिट्टाल' ह्या चलच्चित्रपटासाठी सदरील गीताची रचना केली. त्यास श्री. वैरमुत्तु ह्यांचे अत्यंत परिणामकारक शब्दही जोडीस लाभले. हे गीत निरागस भावनांचे प्रकटीकरण म्हणून पडद्यावर येते.......

मध्यंतरीची कथा श्री. ओक सरांनी लिहिल्याप्रमाणे.

......दीदींनी "हैयो, ह्याच गाण्यासारखी रहमानची आणि इळैयराजाची इतर ७-८ गाणी - जी मराठी लोकांना माहिती नसतील ती - मराठीत करून तमिळ संस्कृतीची मराठी लोकांना एक ओळख करून देण्याचा एक प्रयत्न करा" असा आदेश अत्यंत प्रेमळ आवाजात दिला आहे.

...त्यानुसार जसा वेळ मिळेल तसे काम चालु आहे. ह्या सार्‍या कार्यक्रमास कमीतकमी साधारण ३० लाख रु. खर्च येईल अशी अपेक्षा आहे. मिपाकरांनी सढळहस्ते मदत करावी! ;-)

-----------
हैयो हैयैयो!

शशिकांत ओक's picture

1 Feb 2010 - 8:42 pm | शशिकांत ओक

श्री.हैयोहैयैयो व अन्य मित्र हो,
अभिनंदन!!!
दीदींच्या आशीर्वादानेच हे शक्य आहे. आम्हाकडून शक्य तितकी मदत होईलच. आपला दीदींशी कसा व कोणत्या कारणाने संपर्क घडला हे जाणण्याची मिपाकरांना उत्सुकता आहे. कळवावे.
शिवाय हक्काभंगाची चौकट न मोडता त्या गीताचे मराठीबोल सादर करायला विनंत करतो.
शशिकांत