प्रेमेय

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
22 Dec 2009 - 1:37 pm
गाभा: 

'झिंग' ह्या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि मराठीत जवळ जवळ एकच आहे.

"काल जास्त लोड होता का"?
नेहेमीपेक्षा जरा जास्त. का ग?
"लग्न झाल्यापासुन जेवताना पेंगुळलेला मी पहील्यांदा पाहीले तुला मी. आल्यावर आंघोळ पण केली नाहीस"
लोकल ला जरा जास्तच गर्दी होती त्यामुळे असेल.
"रात्री झोप लागली ना"/
हो.
"डोळे अजुनही तांबारलेले दिसताहेत".
कालची झोप म्हणजे स्वप्नांची मालिका होती त्यामुळे असेल. स्वप्नात तु आलीस.
"अग बाई. काही तरीच हां"
खरच सांगतोय
"घरातल्या घरात मी स्वप्नात? कुठे बाहेर गावी असलास तर समजु शकते."
स्वप्न तर ऐक.
"सांग"
स्वप्नात तुच होतीस. शाळेच्या युनिफॉर्म मधे. दोन शेपट्या घालुन. शाळेच्या मैदानात रिबिनीबरोबर खेळ खेळ्त माझ्याकडे नोट्स मागणारी. दोन रांगा सोडुन बसलेली , तरीसुद्धा वर्गाच्या लक्षात न येता पेपरमधले मार्क विचारणारी. गालावर खळी पाडुन हसणारी. घार्‍या डोळ्याची.
"मला गालावर खळी कुठे पडते? माझे डोळे काळे आहेत."
तेच तर सांगतोय.
चेहेरा तुझाच. पण खळी आणि आवाज माझ्या शाळेच्या मैत्रीणीचा. टीपिकल नाकातला कोब्रा आवाज. जमेल त्या शब्दावर अनुस्वार.
"हम्म."
दुसर्‍या भागात तर आणखीनच गंमत. परत तुच. चेहेरा तोच. पण आवाज वेगळा. ह्यावेळी नर्स च्या वेषात.
"आल लक्षात."
काय?
"लग्न झाल्यावर आपण एका समारंभाला गेलो होतो तेंव्हा आपल्याला ती भेटली होती तीच ना?"
तु कसे ओळखलेस?
"आम्हाला बरोबर कळते. तुझे होते की नाही ते माहीत नाही. पण तीचे तुझ्यावर खुप प्रेम होते हे नक्की."
बरोबर आहे तुझे.
"अचानक अशी स्वप्ने का पडावीत? कुठे भेट झाली का?"
नाही ग.एक आहे अमेरिकेला. एक ओरीसा मधे.
"म्हणजे त्या कुठे आहेत त्याचा ट्रॅक अजुन आहे."
वर्गमित्र सांगतात म्हणुन. इतक्या वर्षात नंतर काही संपर्क नाही.
ठीक आहे ठीक आहे. May be you are missing the zing level. तुला हवे असेल तर मी जाते ज्योती स्टोर्स मधे.
ते कशाला?
तीथे सर्व प्रकारचे युनिफॉर्म मिळतात.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 Dec 2009 - 1:49 pm | चिरोटा

मस्त. 'D.M.Pakitwala' आणि सुपर डिलक्स वह्यांची आठवण आली.
भेंडी(अब्दुल रेहमान स्ट्रीट्-मुंबई-४००००२)
P = NP

टारझन's picture

22 Dec 2009 - 1:47 pm | टारझन

प्रकटण कळले पण धोरण नाही :(

मास्तर .. वो मास्तर .. काधीतरी पब्लिक साठी लिवा !

- (?!?)

देवदत्त's picture

22 Dec 2009 - 8:39 pm | देवदत्त

=))

मलाही नाही कळले. :(
मास्तर, जरा आमच्याकरीताही लिहा हो :)

स्वप्निल..'s picture

23 Dec 2009 - 1:32 am | स्वप्निल..

>>मास्तर, जरा आमच्याकरीताही लिहा हो

असेच म्हणतो .. नाही तर थोडं समजाउन तरी सांगा!! :D

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2009 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार

हम्म्म्म्म समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय गुर्जी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दशानन's picture

22 Dec 2009 - 1:55 pm | दशानन

चक्कर आली, पाणी पाणी.... काय लिव्हलंय काय बी नाय कळालं मास्तर... :(

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

jaypal's picture

22 Dec 2009 - 1:55 pm | jaypal

आवडले. सुत्र समजली. गणित सुटलं. आठवांचा इतिहास, समाजाच नागरीकशास्त्र, ते त्या वयातलं रसायन सगळं सगळं परत परत मनात रुंजी घालतय. छान लेख

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ's picture

22 Dec 2009 - 3:25 pm | विजुभाऊ

ओ मास्तर वात्स्यायनाने रोल प्ले बद्दल सुद्धा लिहीलय.
फ्रॉईड ने बहुतेक वात्स्यायनाच्या पुस्तकाचा रीचर्ड बर्ट॑नने केलेला अनुवाद वाचून काही थेयर्‍या मांडल्यात.
वाचून बघा काहितरी मुळातून.

अवांतरः तुमच्या लेखातून फ्रॉइड का डोकावत असतो नेहमी?

अवलिया's picture

22 Dec 2009 - 3:37 pm | अवलिया

श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब

आपला लेख - कविता - विडंबन - पाककृती वाचले.
तुम्ही जे काही लिहीता ते छानच असते असे म्हणण्याची प्रथा आहे म्हणुन वा वा छान छान.
जमेल तेव्हा विस्तृत रसग्रहण टाकणे.

धन्यवाद.

--अवलिया

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Dec 2009 - 3:42 pm | ब्रिटिश टिंग्या

खालुन ६९वा फोटो आवडला!

वात्रट's picture

22 Dec 2009 - 9:01 pm | वात्रट

मास्तर...
(Public तेच म्हण्तेय म्हणुन मी तेच संबोधतो with due respect वै..)
छोटेखानी आहे पण लई भारी...

टुकुल's picture

22 Dec 2009 - 11:37 pm | टुकुल

मास्तर,
डोस्क्यावरुन गेल, काही *ट कळल नाही..

--टुकुल

पाषाणभेद's picture

23 Dec 2009 - 3:23 am | पाषाणभेद

प्रेमाचे प्रमेय समजले. बहुतेकांनी हे प्रमेय अनुभव घेवून सोड(व)लेले असते. तुमच्या गाईडात आता सामाविष्ट झाल्याने होतकरूंना त्याचा अभ्यास करता येईल.

इतरही काही मह्त्वाचे प्रश्न असतील तर या गाईडात द्या, म्हणजे वार्षीक (की दैनिक?) परिक्षेला हे प्रश्न लागले तर अभ्यास करायला सोपे जाईल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

दररोज परिक्षेला बसणारा -पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

हर्षद आनंदी's picture

23 Dec 2009 - 6:28 am | हर्षद आनंदी

मनात कुठेतरी खोलवर दडलेल्या भावनांना अश्या प्रकारे वाट फूटते. नकळत्या वयात अजाणतेपणाने जपलेली प्रेमभावना, कोणीतरी आपले भेटल्यावर (प्रस्तुत नायकाचे नविन लग्न झाले आहे, असे वाटते) ते प्रेम उफाळून आले. प्रेमाला चेहरा, बांधा, ठिकाणे अशी स्थुल बंधने नसतात, म्हणुन त्याला बायकोचा चेहरा दिसला. पण लक्षात राहीलेली गालावरची खळी, घारे डोळे पत्नीच्या चेहर्‍यात दिसले.

नायकाचा सिक्स्थ सेन्स जबरदस्त असावा! हे खरे असेल तर देव करो, त्या मुलीच्या बाबतीत काही अघटीत घडलेले नसो.
भयकथा, भुतकथेसाठी मस्त गाभा!! विशालभौ, घ्या मनावर

नायकाचे पत्नीवर मनापासुन प्रेम आहे, ती सुध्दा समजुतदार पणे नवर्‍याच्या भावना, मानसीकता जाणुन घेते आहे. अर्थात हे फक्त कथेतच घडते किंवा प्रमेय सिध्द करायला एखादा अपवाद..

बाकी प्रेमेय झकास... मास्तर औरभी आने दो |

आम्ही हिंदूत्ववादी !!
आमची शाखा कुठेही नाही..

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2009 - 10:01 am | llपुण्याचे पेशवेll

हर्षदजी

  1. लेखकाने पत्नीला तुझा चेहरा दिसतो असे सांगितले, कदाचित खरा चेहरा सांगितला असता तर परिस्थिती वेगळी असली असती, नाही का?
  2. लेखकाने युनिफॉर्म मधे प्रस्तुत मुली दिसल्याचे सांगितले आहे. नक्की कशात दिसल्या हे पत्नीला सांगितले असते तर परिस्थिती वेगळी असली असती, नाही का?
  3. मास्तर प्रेमेय छान

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

हर्षद आनंदी's picture

23 Dec 2009 - 11:07 am | हर्षद आनंदी

१. नक्कीच महाभारत झाले असते.
२. नक्की कशात का तश्याच, तुम्हाला काय म्हणायचे आहे?

जाऊ दे ना.. इथे कोणाला दु:ख आहे, लेखक जाणो नी त्याची बायको,साला आपण ऊपाशी अन तो तुपाशी.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

फॉर ए चेंज म्हणून यूनिफॉर्मचा वापर करणे आवडले! ;)
(काय विरोधाभास आहे ना - यूनिफॉर्म फॉर ए चेंज!! मग अधून मधून गुड्डी बघता की नाही? ;) )

(नॉन यूनिफॉर्म)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2009 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छट, आमचं डोकंच तिरकं... युनिफॉर्म काय आणि काय काय ... भलत्या भलत्या गोष्टीच आठवतात हो ...
काकूंना नमस्कार सांगा.

अदिती