नवीन थीमबाबत चर्चा

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
1 Jan 2017 - 1:40 am
गाभा: 

नमस्कार,

आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा.
या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील.
आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा.

याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी.

आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.

- नीलकांत

प्रतिक्रिया

प्रतिसादकर्त्याच्या नावाचा आकार हा प्रतिसादाच्या शीर्षकाच्या आकाराचा हवा, तिरका नको. शिवाय लॉगीन केले नसेल तर नाव गडद काळ्या रंगात दाखवले तर उत्तम.

आणि महत्त्वाचे म्हणजे वरच्या काळ्या पट्टीच्या जागी मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध लोगो टाकाच, ती मिपाची जान आहे.

पिलीयन रायडर's picture

10 Jan 2017 - 12:32 am | पिलीयन रायडर

सगळ्या मुद्द्यांना +११

लोगो हवाय...

मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध लोगो टाकाच, ती मिपाची जान आहे

अगदी, अगदी! मिपाचं मिपापण हरवलेलं आहे तो लोगो नसल्याने.

सस्नेह's picture

10 Jan 2017 - 5:23 pm | सस्नेह

आधी प्रतिसादकर्त्याचे नाव, मग वेळ असे सोयीस्कर आहे.

चिगो's picture

10 Jan 2017 - 1:03 pm | चिगो

१. लोगो आणा मालक परत..
२. माझा सहभाग (लेख व प्रतिसाद)वाला टॅब परत आणावा.. काही अत्यंत आवडलेल्या धाग्यांना पुन्हा भेट द्यायची आहे.
३. वाचनखुण साठवण्याची सोय पुनश्च द्यावी.
४. 'सुविचार' काढता येतील का? उगाच शाळेत गेल्यासारखं वाटतंय..

बाकी सांगतो झोकं-झोकं..

सावत्या's picture

10 Jan 2017 - 4:50 pm | सावत्या

वाचनखुणा सापडत नाहित

urenamashi's picture

11 Jan 2017 - 10:18 pm | urenamashi

User friendly नाही. आमच्यासारख्या वाचक वेड्यांना फारच अवघड जाते हो...

अभिजीत अवलिया's picture

12 Jan 2017 - 11:10 am | अभिजीत अवलिया

जुनी थीम उत्तम होती. ही थीम अजिबात आवडलेली नाही.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2017 - 2:55 pm | श्रीगुरुजी

काहीतरी हुकलंय. मी माझ्या सदस्यनामावर टिचकी मारून आतील 'ट्रॅक' या टॅबवर टिचकी मारली की कोणतेतरी २०१४ चे जुने धागेच दिसताहेत आणि त्यावर शेवटचे अद्यतन याखाली १४ तासांपूर्वीची वेळ दिसतेय.

Nitin Palkar's picture

14 Jan 2017 - 9:24 pm | Nitin Palkar

थीम मधील बदल नक्कीच स्वागतार्ह!

जयंत कुलकर्णी's picture

15 Jan 2017 - 2:23 pm | जयंत कुलकर्णी

एखाद्या लेखकाचे सर्व लेखन शोधण्याचा पर्याय मिपावर नाही असे वाटते. मग माझे लेखन याची लिंक देता यायची. ज्यात सभासद क्र. असायचा. मला वाटते आता तोही पर्याय नाही. का माझे काही चुकत आहे ? मी पूर्वी ही लिंक दिली की सर्व लेखनांची लिंक समोरच्याला मिळायची. आता काय करावे लागेल ? कोणी सुचवेल का ?

पैसा's picture

15 Jan 2017 - 2:30 pm | पैसा

http://www.misalpav.com/user/9199/authored या लिंकवर सगळे लेख व्यवस्थित मिळतील असे प्रशांत म्हणाला. माझे लेखन लिंकवर लेखमाला विभागातले लेखन दिसत नाहीये. पण आपला बिल्ला नंबर टाकून authored लेख पाहिले तर आपले इतर लेखन दिसते.

जयंत कुलकर्णी's picture

15 Jan 2017 - 2:39 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर आहे पण पूर्वी माझे लेखन उघडले की ब्राउजरच्या खिडकीत ही लिंक दिसायची. आता तेथे एचटीएमल् ची लिंक दिसते. आता ही लक्षात ठेवावी लागेल....

मोबाईलवर लेखाच्या नावातले फक्त चार-पाच शब्द दिसतात. उरलेले शीर्षक दिसत नाही. लेखकाचे नावही दिसत नाही.

शब्दबम्बाळ's picture

15 Jan 2017 - 7:06 pm | शब्दबम्बाळ

खेदपूर्वक म्हणावं लागतंय कि नवीन थीम चांगली नाही.
१. मोबाईल वर स्क्रोल करून करून बोट दुखायला लागली. ठराविक चौकानातच सगळी मांडणी दिसतीये आधी असे नव्हते.
२. मुखपृष्ठावर कलादालन विभागातील नवे लेख दिसायला हवेत पण प्रतिसाद संख्येनुसार दिसत आहेत बहुतेक.
३. मुखपृष्ठावरची बरीच जागा वाया गेली आहे असे वाटत राहते, शिफारस जास्तच मोठी वाटते खासकरून मोबाईलवरती!
४. काकू करणे महाकठीण झालाय मोबाईल वरून. "पानाच्या शेवटी" जाण्याचे सुद्धा एखादे बटण केले पाहिजे!
५. काळा, राखाडी आणि पांढरा हि रंगसंगती उगाच ऑफिस चा फील देतेय (हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो!)
६. सुविचार उगीच जागा खातोय असे वाटतंय! ;)

आज लॅागिन असताना/नसताना , ब्राउजर सेटिंग्ज बदलून वेगवेगळ्या पद्धतीने अनुक्रमणिका दिसते आहे.
लेखकाचे नाव, प्रतिसादांची संख्या नवे/जुने ,लेख प्रथम लिहिल्याची तारीख असे बघायची पुर्वीची सवय होती आता काहीही बोध होत नाही एका दृष्यात.

प्रसाद_कुलकर्णी's picture

18 Jan 2017 - 11:29 am | प्रसाद_कुलकर्णी

एकदम साधी, सरळ, सोप्पी, आणि सूट-सुटीत थीम आहे... खरे तर हा मिपा मध्ये एक आमूलाग्र बदल आहे, आणि तो नेहमीच आवश्यक असतो... आत्ताच्या थीम कडे पहिले कि खूपच समाधान वाटतेय..रंगाचे मिश्रण अति-उत्तम.. सर्व डेव्हलपर्स चे मनापासून कौतुक !!!

थीम बदलल्यानंतर संकेतस्थळाला रोज किती लोक भेटी देत आहेत, ती संख्या पाहून ठरवा.

"काथ्याकूट" मुख्य पानावर दिसत नाहीए. आत्ता बुलेट ट्रेन विषयावर एक पोस्ट टाकली. मेंन पेज वर ती आलीच नाही. असे अजून काय काय दिसत नाही , माहित नाही ..

अभिजित - १'s picture

21 Jan 2017 - 9:50 pm | अभिजित - १

http://www.misalpav.com/comment/784262
नक्की कुठे गेले कि हा धागा दिसेल ? आत्ता तो बेपत्ता आहे !! पण माझी पोस्ट तर आत्ताची आहे. हा धागा वर का येत नाहीए मग ?

मिपाचे नवीन रूप आवडले. पुढील वाटचालीसाठी मिपास शुभेच्छा !

मराठी_माणूस's picture

24 Jan 2017 - 10:25 am | मराठी_माणूस

जर एकापेक्षा जास्त पाने असतील तर पहील्या पानाच्या पुढील पानावरच्या नवीन प्रतिसादांना "नवीन" असे शिर्षक येत नाही .

आनंदी गोपाळ's picture

25 Jan 2017 - 10:59 pm | आनंदी गोपाळ

प्रकाशित करताना काहीतरी लोचा होत होता. फक्त ब्लँक पाण दिसत होते

वरच्या मेनु मधे मिपा विशेषांक वर टिचकी मारली असता "वारंवार विचारले जाणारे प्रश्न." हे पान उघडत आहे.
असच होण अपेक्शित आहे का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2017 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईलवरुन अजूनही फार युजर फ्रेंडली थीम नाही. मोबाईलवरुन मला तरी मिपावर यावं असं अजिबात वाटत नाही.
डेस्क्टॉपवरुन मिपावर येत असतो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

चालु द्या....!

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

26 Jan 2017 - 9:24 pm | गामा पैलवान

डॉक्टरांशी सहमत आहे. फिरस्त्यावरून मिपावर यावंसं वाटंत नाही. केवळ सत्रधारिका (= सेशन कुकी) जिवंत ठेवण्यासाठी तिथनं दररोज मिपा उघडतो. कायतरी करा राव.

-गा.पै.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jan 2017 - 9:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन ओपन करून बघा एकदा. मला तरी मोबाईलवरून मोबाईल व्हर्जनपेक्षा मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन जास्त सुटसुटीत वाटतं वापरायला!

हाप्र,

दोन्ही आवृत्त्या वापरून बघितल्या. काही जाणवण्याजोगा फरक नाही. :-(

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2017 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईलसाठी वेगवेगळे ब्राऊजर वापरुन पाहिले. पण काय फरक नाही.
असो, लैच खाज आली की डेस्क्टॉप सुरु करायचं आणि मिपा इंजॉय करायचं.

असो. विषय संपला.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

26 Jan 2017 - 10:07 pm | आनंदी गोपाळ

मोबाईलवरुन मला तरी मिपावर यावं असं अजिबात वाटत नाही.

शमत. माझ्या ब्रावजरचा एस्सेस टाकूनही कुणी मदत करीना मला. ते तसलंच जंबल्ड दिसतंय बोंबल्यावरून.

(अवांतरः काल मला धागा टाकता येईना. आज जमला.)

शब्दबम्बाळ's picture

8 Feb 2017 - 11:31 am | शब्दबम्बाळ

थीमच काहीतरी करा राव!
काही बरे वाटेना...
स्वगृह तर अस्ताव्यस्त झाल्या सारखं वाटतंय आणि मोबाईल वरून महाकठीण झालंय!

नीलकांत's picture

8 Feb 2017 - 11:55 pm | नीलकांत

नव्या थीम बाबत सर्वांच्या अडचणींची दखल घेतली आहे. त्यानुसार एक एक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो. याशिवायही काही अडचणी असल्यास येथे कळवा.