संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?

नीलकांत's picture
नीलकांत in पुस्तक पान
22 Feb 2011 - 4:08 pm

मिसळपाव.कॉम वर सदस्यं नोंदणी केल्यावर तुम्हाला तुम्ही दिलेल्या ईमेलवर त्या खात्यासंबंधी माहिती पाठवली जाते. त्यात त्याखात्याचे संकेताक्षर पाठवलेले असते.
पहिल्यांदा मिसळपाववर येण्यासाठी एक दूवा (लिंक) सुध्दा दिलेली असते.
त्यासंकेताक्षराचा वापर करून तुम्ही मिसळपाववर येऊ शकता व येथे सहभागी होऊ शकता.

तुम्हाला पाठवलेले संकेताक्षर लक्षात ठेवण्यास कठीण असेल किंवा कुठल्याही कारणाने तुम्हाला ते बदलायचे असेल तर खालील टप्प्यांनी तुम्ही ते बदलू शकता.

१) मिसळपावमध्ये प्रवेश करा.
२) उजव्या समासात माझे खाते नावाचा दूवा आहे त्यावर टिचकी मारा.
३) त्यानंतर उघडलेले पान हे तुमचे व्यक्तिचित्राचे (प्रोफाईल) चे पान आहे.
४)या पानाच्या वरच्या बाजूला तुम्हाला काही दूवे दिसतील, त्यातील संपादन या दूव्यावर टिचकी मारा.
५) आता तुम्ही तुमच्या खात्याच्या संरचनेच्या जागेवर आहात.

- येथून तुम्ही तुमचे संकेताक्षर बदलू शकता.
- तुमची खरडवही चालू /बंद करू शकता.
- तुमच्या खरडवहीवर स्वागताचा मजकूर लिहू शकता.
- तुमच्या संदेशांसाठी ईमेलने सूचना मागवण्याची सोय करू शकता.
- तुमचा फोटो चढवू शकता.
- तुमचे व्यक्तिचित्र पुर्ण करू शकता. ( यासाठी याच पानाच्यावर # वैयक्तिक माहिती
# व्यावसायिक माहिती असे दूवे आहेत.)

तुम्ही तुमचे व्यक्तिचित्र पुर्ण करावे अशी तुम्हाला विनंती आहे. कारण लोक तुमच्याबद्दल माहिती घेण्यासाठी तुमच्या व्यक्तिचित्राला भेट देतात.

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Feb 2011 - 7:50 pm | पैसा

खूप नवीन लोकाना अशा गोष्टी सुरुवातीला कशा कराव्यात ते कळत नाही. सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद!