डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Apr 2024 - 9:30 pm

कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.

जीवनमानविज्ञानप्रतिक्रियालेख

एक अनुभव

अहिरावण's picture
अहिरावण in जनातलं, मनातलं
23 Apr 2024 - 8:16 pm

आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात.

जीवनमानप्रकटन

माझे खाद्य प्रयोग: बिन ऑईल कढ़ी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
22 Apr 2024 - 12:15 pm

दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. आजकल तुम्हाला खाण्याचे डोहाळे खूप लागतात म्हणत, माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. पण आज सोन्याचा दिवस उगवला. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 ची असते. आज तिची बीसी होती. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा, तंबोला इत्यादी. मुख्य कार्यक्रम मनाला आनंद देणारा सांस्कृतिक आदान - प्रदान,. याशिवाय आज चिरंजीव ही ऑफिसला जाणार होते.

एक लघुकथा.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
22 Apr 2024 - 8:32 am

एक लघुकथा.
उन्हाळ्यातल्या एका संध्याकाळी ते त्याला गच्चीवर घेऊन गेले. तिथून त्याला पदुआ शहराचा देखावा दिसत होता. संध्याकाळ सरली आणि अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले. आकाशात सर्च लाईट टाकले जात होते. बरोबरचे दारुच्या बाटल्या आणण्यासाठी खाली गेले. गच्चीत आता फक्त तो आणि लुझ होते. लुझ बेडवर बसली होती. ती फुलासारखी टवटवीत दिसत होती.

कथा

हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Apr 2024 - 8:21 am

भाग १
... .. .. ..

या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ.

मूलभूत रचना व कार्य
हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये मधोमध वसलेले असून ते थोडेसे डाव्या बाजूस झुकलेले आहे. एखाद्या बलदंड पैलवानाच्या एका मुठीत मावेल एवढाच त्याचा आकार आणि वजनही जेमतेम 300 ग्रॅम.
खालील चित्रात हृदयाची अंतर्गत रचना दाखवलेली आहे. ती आपल्याला ढोबळ मानाने शालेय अभ्यासक्रमातून माहित झालेली असते.

जीवनमानआरोग्य

एक अचानक मिपाकट्टा : चिंचवड

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
19 Apr 2024 - 6:24 pm

चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता.

कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन"

मला या शनिवारी सुट्टी होती त्यामुळे माझी शनिवारची सकाळ मोकळीच होती. आदल्या रात्री चित्रगुप्तांशी संपर्क साधला आणि उद्या जमेल का असा विचारलं…. आणि चित्रगुप्त यांनाही वेळ होता. योग जुळून आले !

कलाआस्वाद