मिसळपाव - नवी रचना
प्रेषक, सरपंच, Wed, 19/09/2012 - 14:41
नमस्कार,
आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील.
राहीलेली कामे. -
१ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही.
- नीलकांत
लेखनविषय::
लेखनप्रकार:
प्रतिक्रिया
आवडले
बदल, नविन रुपडे आवडले आहे. जिथे तिथे दिसणारे इंग्रजी शब्द बदलून मराठी करता आले तर उत्तम.
धन्यवाद आणि अभिनंदन.
+१
असेच म्हणतो.
['हिरवा माज' मात्र अंमळ जास्त वाटला हो
]
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
१+
सहमत आहे.
- पांथस्थ
| पाकृ : कुकींग विथ हार्ट | अनुदिनी: रानातील प्रकाश... | छायाचित्रे: फ्लिकर |
+१
>>>'हिरवा माज' मात्र अंमळ जास्त वाटला हो
हा हा!
कदाचीत सरपंचांनी ग्रीन साईट तयार करायचे धोरण आखले असावे!
असो नवीन रूप आवडले. तॄटी अनेकांनी सांगितल्याच आहेत. त्यावर काम चालू असूनही (मिपाचा) रस्ता बंद न ठेवल्याबद्दल आभार!
प्रतिसाद, व्यनि दिसत नाहीत
मला या लेखावरती विकास यांचा वरील प्रतिसाद दिसतो. त्यावरचे कुठचेच प्रतिसाद दिसत नाहीत. खालच्यांतही काही मोजकेच दिसतात.
व्यनिदेखील असेच रिकामे झालेले आहेत. काही काही भाग दिसतात, पण बहुतांश म्याटर गायब झालेलं आहे.
इतरांनाही असाच अनुभव आहे का? हे तात्पुरतं आहे अशी आशा करतो.
माझं ऐसी अक्षरे वरील लेखन
ऐसी अक्षरे वरील नवीन लेखन
व्य नि
माझ्या खात्यात व्य नि रँडमली रिकामे झाले आहेत,आ॑णि स्वतःला पाठवलेले सगळे व्य नि रिकामे झाले आहेत
तात्पुरतं
प्रतिसादाचं आणि लेखनाचं मात्र तात्पुरतं आहे. व्य.नि.मात्र जशाच तसे आहेत, तरीही चौकशी करुन माहिती लिहितो.
-दिलीप बिरुटे
एकच कारण
बरेच प्रतिसाद दिसत नाहीत. बरेच व्यनि दिसत नाहीत... काही जुने लेखही दिसत नाहीत.
कारण एकच असावं. ते सारं सुरक्षीत आहे. पण त्याचाही मार्ग नीट आखून देण्यात काही अडथळे आले असावेत.
माझेही व्यनि उडाले आहेत. त्यातले काही तर 'पुरावे' होते हो...
मला वेगळा अनूभव आला.
"शोध" मधून जुना धागा काढल्यावर धाग्यातील मजकूर दिसत नाही. फक्त प्रतिक्रीया दिसत आहेत.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
मला वेगळा अनूभव आला.
"शोध" मधून जुना धागा काढल्यावर धाग्यातील मजकूर दिसत नाही. फक्त प्रतिक्रीया दिसत आहेत.
उदा. बाजुच्या मिसळपाव २ वर क्लिक करून बघा.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
थोडा वेळ लागेल.
मिसळपावच्या बांधणीत टेक्स्ट फॉर्मेट फूल एचटीएमएल, प्लेन टेक्स्ट, फिल्टर्ड एचटीएमल, यापैकी फूल एचटीएमल सलेक्ट करायचे असते, मिपाची बांधणी करतांना ते डिफॉल्ट करायचे राहून गेले. मिपाची बांधणी करणारे काही तातडीचे कामामुळे मिपापासून कमीत कमी आठेक दिवस दुर असणार आहेत, ते आले की सर्व लेखन-प्रतिसाद आणि व्य.नि. पूर्ववत दिसायला लागतील. काळजीचं कारण नाही.
>>> उदा. बाजुच्या मिसळपाव २ वर क्लिक करून बघा.
आता बघा बरं दिसतंय का नाही !
[संपादकांनी असे लेख किंवा प्रतिसाद फूल एचटीएमल मोडमधे नेले की सर्व लेखन पूर्ववत दिसायला लागतात. आता एकेक लेख आणि एकेक प्रतिसादांना त्या मोडमधे नेण्याचे कंटाळवाणे काम आहे ]
-दिलीप बिरुटे
आणखीन एक विचित्र अनुभव
माझं जुनं लेखन शाबूत आहे का हे पहाण्यासाठी माझ्या लेखनावर मी गेलो. http://www.misalpav.com/user/8578/authored मात्र त्यातल्या
"जनातलं, मनातलं प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय 35 Tue, 24/04/2012 - 04:03"
यावर क्लिक करायला गेलो की आख्खी लिस्ट वरखाली होत रहाते... हा माझ्याच स्क्रीनचा दोष आहे की इतरांनाही असा अनुभव येतो हे तपासून बघायचं आहे. याआधी मात्र असं कधी झालेलं नव्हतं.
माझं ऐसी अक्षरे वरील लेखन
ऐसी अक्षरे वरील नवीन लेखन
अभिनंदन
अभिनंदन मालक, प्रशांत
***************************************
- मन्या फेणे
छान आहे
अभिनंदन आणि धन्यवाद.
कोणत्याही धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेलं तर नविन प्रतिसादाच्या इथे पेज कंट्रोल जातोय ( बहुतेक ) , पण प्रतिसादाजवळ 'नविन' दिसत नाहीये.
पुष्करिणी
धाग्यावर 'नविन प्रतिसाद'
धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेल्यास, पेज कंट्रोल नविन प्रतिसाद दाखवतोय पण प्रतिसादा नजिक 'नविन' असं दिसत नाहीये.
पुष्करिणी
स्वागतार्ह बदल
अजुन काही ठिकाणी काम चालु असावे असे जाणवत आहे. सुचनेसाठीच्या येथे नोंद करावी ही लिंक वल्लीच्या धाग्यावर घेवुन जात आहे.
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
अभिनंदन. नीलकांत आणि प्रशांत.
मिपा नव्या स्वरुपात पाहतांना आनंद होत आहे, मिपाच्या वाटचालीस शुभेच्छा.
१)लेख कोणी लिहिला आहे, लेखात लेखकाचे नाव नाही.
२)नवीन रचनेत काही अडचणी असल्यास येथे नोंद करता येईल. इथे चा दुवा गंडला आहे.
३) मिपा इडिटर्स (बटनं ) दिसत नाही.
४) मराठीकरण बाकी.
५)अक्षरांचा आकार थोडा मोठा करावा.
६)प्रतिसादाचा बॉक्स मॅन्युली मोठा करावा लागतोय.
७)पूर्वीची रंगसंगती आणता आली तर आणावी.
तूर्तास इतकेच अजून बरीच कामे राहीलेली दिसत आहेत. नवीन मिपावर जरासं बावरल्यासारखं होतंय पण नव्याचीही सवय होईल. आणि अजूनही बरेच बदल बाकी दिसत आहेत, अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा.
+१
+१
जरा वेगळं वाटतय, पण सवय होईल.
--------------------------------------
सही रे सही!!!
..
>>> १)...
...
७)
तुम्ही प्राध्यापक आहात का हो?
संपादक महोदय्,अतिशय
संपादक महोदय्,अतिशय स्वागतार्ह आणी छान बदल्,विशेषतः रंगसंगती डोळ्यांना सुखावणारी आहे.
विद्याविनयेन शोभते
नवं रुप आवडलं.सध्या इतकेच.
नवं रुप आवडलं.
मिपाचा लोगो भन्नाट आहे.
मिपाटिमचे अभिनंदन आणि धन्यवाद.
काही अडचणी. (येता जाता अपडेटवत राहुच)
१) नवी खरड वा संदेश आल्यावर खवत/इन बॉक्समध्ये गेल्याशिवाय कळत नाही.
२) नवीन आलेल्या प्रतिसादांचा 'नवीन' हे लाल वा ठळक करावे.
३) प्रतिसाद देतानाचा टुल बॉक्स गायब आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
एकदमच बदलले की मिपा! सवय
एकदमच बदलले की मिपा! सवय व्हायला थोडा वेळ लागेल.
लवकरात लवकर काम आटोपून मिपा पुन्हा एकदा आमच्यासाठी खुले केल्याबद्दल धन्यवाद आणि राहिलेल्या कामासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी शुभेच्छा. फाँट थोडा मोठा ठेवता येईल का?
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
पूर्वीचं मिपा कसं भारदस्त
पूर्वीचं मिपा कसं भारदस्त होतं - तो लूक देता आला तर बघा, म्हणजे द्याच.
हे फार चीप, हलकं वाटतंय.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
मिळमिळित
"मिळमिळित" हा शब्द वापरायचाय का तुला?
माझं म्हणणं :- फुक्टात मिळतय त्यात नशीब माना.
फुकट ते पौष्टिक.
ह्याला खराब म्हणायला आपण काही दमड्या मोजलेल्या नाहित.
--मनोबा
"The last Christian died on the cross".
हो.. मिळमिळीत..
हो.. मिळमिळीत..
>>>>ह्याला खराब म्हणायला आपण काही दमड्या मोजलेल्या नाहित.
दमड्या मोजलेल्या असो की नसो - खराब असेल त्याला खराबच म्हणणार... आणि पूर्वीच्या तुलनेत म्हणतोय ते लक्षात घे.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
हेच म्हणतो
रंग संगती खरच नाही आवडली बुवा ...
पांढरा रंग जास्त झाला आहे काय ?....
http://www.aisiakshare.com
http://www.aisiakshare.com
ऐसी अक्षरे
आणि मिसळीचा कलाकार एकच असावा
शंका हो आमची !
अर्रर्र मेन तर राहीलंच.
मिपाची खास ओळख असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि लाडक्या तुकाराम महाराजांचा फोटो येऊ द्या.
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.
संतश्रेष्ठ माउली आणि लाडके!
"संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि लाडक्या तुकाराम महाराजांचा फोटो येऊ द्या"
ते आणि कशाला आता?
__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!
मस्त रुप आहे....आवडले.फारच
मस्त रुप आहे....आवडले.फारच डिसेंट !
नवीन लेखनाखाली लेखाचे नाव बरोबर दिसत आहे पण लेख उघडल्यावर मात्र अक्षरे गंडलेली दिसतात....
I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.
एडीटर मध्ये फॉर्मॅटींग चा
एडीटर मध्ये फॉर्मॅटींग चा पर्याय उपलब्ध नाही. ( बोल्ड, इटॅलीक, रंग, चित्र चढवण्याचा पर्याय वगैरे... )
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
नविन रुप आवडलं.
बर्याच ठिकाणी "वाचणे" झालं आहे. ते "वाचने" करता येईल का?
*********************************************************************
"Aut inveniam viam aut faciam"
'उर्ध्वश्रेणीकरण ' वाचून ...
.. दचकलोच! मिपावर आता शासकीय मराठी येणार का काय? ! नवा फॉर्म्याट छान आहे. जरा रूळायला वेळ लागेल. या उर्ध्वश्रेणीकरणावर काम करणार्या मंडळीना या 'लष्करच्या भाकर्या भाजल्याबद्दल' धन्यवाद.
नविन रचना वेगळी वाटली
नविन रचना वेगळी वाटली,हिरव्याच्या जागी आधीचा रंग जास्त आकर्षक वाटत होता... असो सवय होईल हळुहळु.
फोटो टाकण्याची सुविधा कुठेही दिसत नाहीये ! खरवडवहीत देखील फोटो /व्हिडीयो लावता येत नाही.
मदनबाण.....
Eesha Khare: California Teen Invents Life-Changing Instant Phone Charger
अन्न हे पूर्णब्रम्ह मधला फोटो
दिसत नाहिये. पेठकरकाकांच्या मसालेभाताच्या पोस्टमधे फोटोची लिंक आहे.
दिसतोय.
मसाल्या भाताचा फोटो दिसतोय.
फोटो टाकलाय आता.
फोटो टाकलाय आता.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
हो. आता वरती
पण दिसतोय फोटो नेहेमीप्रमाणे. धन्यवाद.
बदल स्वागतर्ह!!
बदल स्वागतर्ह!! फक्त स्वगृहा वरिल फोटो उजवीकडिल फ्रेम झाकतोय कीन्वा त्या़खाली झाकला जातोय.
मि. पा. वर आल्यासारख वाटलच
मि. पा. वर आल्यासारख वाटलच नाही
तर्रिवाल्या ,लालेलाल,रसरशीत मिसळीच्या फोटोची प्रकर्षाने आठ्वण झाली
आम्हाला तर बुवा पुर्वीच मि . पा. जास्ती भारी वाटत
असो .....
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
बदल आणि इन्कमटॅक्स या दोन
बदल आणि इन्कमटॅक्स या दोन गोष्टी कधीच टाळता येत नाहीत, तस्मात बदलाचे स्वागत. सवय व्हायला वेळ लागेल. बाकी स्वगृहावर एकच धागा दिसतोय आणि पुर्वी ज्या क्याट्यागिरी दिसायच्या त्या दिसत नाहीत.
बाकी या मागं कष्ट घेणा-या सर्वाची नावं कळाली तर फार बरं होईल मालक, तेवढं कराच. एवढं चांगलं करुन उगाच प्रसिद्धी परांमुख नका राहु.
आणि हो अजुन क्रोम आणि गमभनचं तात्विक भांडण मिटलेलं दिसत नाही. त्या गुगलला खेचावं का कोर्टात ?
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
मिपाकरांसाठी खूपच वेळ देतात आणि कष्ट घेतात.
>>>>बाकी या मागं कष्ट घेणा-या सर्वाची नावं कळाली तर फार बरं होईल मालक, तेवढं कराच. एवढं चांगलं करुन उगाच प्रसिद्धी परांमुख नका राहु.
नीलकांत आणि प्रशांत.
-दिलीप बिरुटे
मिपा उपडेट
मिपा अपडेट करण्यासाठी ज्या मिपासदस्यांनी त्यांच्याबाबतीत नीलकांत लवकरच लिहणार...
...आणि इतरहि बरच काहि
प्रशांत तायडे
धन्यवाद !!
खुप मेहनत घेतलेली दिसत आहे नव्या रुपावर !!
नव्या स्वरूपात मिपा सादर केल्याद्बद्दल धन्यु..
फक्त हॉटेलात आणि इतर इंग्रजी शब्द ' अॅव्हॉईड' करता आले तर बरे होइल
==============================
कपिलमुनी उवाच :
'पूर्णब्रम्ह' ऐवजी 'पूर्णब्रह्म' झालंय
'अन्न हे पूर्णब्रम्ह' मधे.
व्वा. ज्ञानोबाराय-तुकाराममाऊली परत आले!
'पूर्णब्रह्म' हाच शब्द योग्य
'पूर्णब्रह्म' हाच शब्द योग्य आहे.
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
नवे रुप आवडले. तसेच पाचव्या
नवे रुप आवडले. तसेच पाचव्या वर्धापन दिना निमीत्त अभिनंदन.
- सूर्य.
झकपक झाली की ओ साईट तुमची !
झकपक झाली की ओ साईट तुमची !
हाच प्रतिसाद देण्यासाठी आधी आलो होतो पण 'पूर्वपरिक्षण' करतानाच साईट गंडली.. म्हटलं 'वाखाणला गुरव...'
असो, साईट छान दिसतेय. नविन प्रतिसाद जर ठळकपणे ओळखता आले तर बघा. मिपा लोगो पण मस्त आहे.
------------------------
मराठे
http://kaaheebaahee.blogspot.com
http://ikadetikade.blogspot.com
नविन नविन मि.पा.... छान/छान
नविन नविन मि.पा.... छान/छान मि.पा...
गंपा म्हणतो तसं टूलबॉक्स हवी(च)... नायतर आम्ही सहजपणे स्मायल्या कश्या टाकणार...
...नै...टाकता येतील,पण दुसरीकडून, मंजे शंकराचं फुल काढून गणपतिवर वहायचं,,,तससं नक्को.. 
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
नवीन प्रतिसाद आल्यानंतर `नवीन
नवीन प्रतिसाद आल्यानंतर `नवीन' जरा स्पष्ट दिसले असते तर लगेच ध्यानात येईल. (जुन्या मिपाप्रमाणे लाल अक्षरात)
--------------------------------------
सही रे सही!!!
नविन मिपा छान.
नविन मिपा छान.
१. माझे किंवा इतरांचे लेखन बघायचे असल्यास कसे बघता येईल?
आधी सदस्य क्र. देऊन authored लिंक वर जाऊन बघता येत होते. पण आता काहींचे नंबर दिसत आहेत तर काहींची नावे.
२. नविन प्रतिसाद ठळक 'लाल' रंगात हवा.
३. सदस्यांबरोबरच किती पाहुणे आलेले आहेत ते दिसत नाही.
बाकी मिपामधला 'शोधा' खूपच पॉवरफुल झालाय असे निरिक्षण नोंदवतो.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
स्वारी !
आपल्याला हे नवे रुपडे अज्जीबात आवडलेले नाही.
अतिशय भयावह रुपडे आणि भयानक फाँटस आहेत.
नीलकांत आणि प्रशांत सारख्या निष्णात तज्ञांनी ही रचना केली आहे ? विश्वासच बसत नाही !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
असेच म्हणतो
आपल्याला हे नवे रुपडे अज्जीबात आवडलेले नाही.
अतिशय भयावह रुपडे आणि भयानक फाँटस आहेत.
अगदी असेच म्हणावेसे वाटते. पूर्वीचेच मिपा चांगले होते. ते परत आणा ही विनंती.
माझी पिसाळलेला हत्ती,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.
माफी असावी
च्यायला हे रुप म्हणजे दही साबुदाणा पोहे आणि पांचट तर्रि ( तर्री म्हणतात म्हणून) पण तिखट पणा नाही. आधीच प्रतिसाद पुर्वीसारखे खणखणीत झणझणीत नव्हते आता रुप पण मिळमिळीत झाले आहे.
असो. आम्ही काही दमड्या मोजत नाही तुम्ही द्याल ते घेउ. विचारले म्हणून जे वाटले ते सांगितले. राग आल्यास माफ करा.
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
निषेध.
उल्लेखाचा '(सौम्य) निषेध'.
श्रद्धा सबुरी
माझ्यामते एवढ्या टोकाच्या कमेंट्स देताना विचार करावा..
आजचं हे रूप काही फायनल नाही..
हि default थीम आहे .. लाल रंग येईलच..
फक्त सभासदांची गैरसोय होऊ नये म्हणून मिपा आज उघडले असावे..
येत्या १० १५ दिवसात योग्य ते बदल होतीलच..
वाट पाहूया कि..
लगेच बकवास म्हणून मोकळे
***************************************
- मन्या फेणे
+१११ टू स्पांडू :)
+१११ टू स्पांडू
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
'शोध'
१.'शोध' (सर्च इंजिन) पूर्वी काम करत नव्हतं. आता मस्त चालतंय.
एक तृटी आहे अजुनही - अगदी पहिल्यांदा 'शोध' मध्ये जाउन 'साहित्य' किंवा 'युजर्स' टॅब्ज् मध्ये गेल्यास तिथल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये 'गारबेज व्हॅल्यू' असते.
२. प्रतिक्रियेचे पूर्वपरीक्षण केल्यानंतर 'प्रकशित करा' एवजी 'साठवा' बटन येतयं.
:)
पुर्वीचे रुपडे अंमळ झानटामाटिक होते!
पण बदल इज मंत्रा ऑफ जीवन! त्यामुळे नवीन बदल स्वागतार्ह आहेतच!
नीलकांत आणि प्रशांतचे विशेष अभिनंदन!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
मिपा लोगो भन्नाट
मिपा लोगो भन्नाट
अभिनंदन
नवीन मिपाच्या रुपड्यात पूर्वीपेक्षा वेगळे म्हणजे कोणत्या सुविधा आहेत.
कोणती गोष्ट जी पूर्वी होती व आता सध्यातरी नवीन मिपावर दिसत नाही आहे. ह्याचा अंदाज प्रतिसादावरून येत आहे.
मात्र एका विस्तृत प्रतिसादात कोणीतरी जुन्या व नव्या मिपातील बदल सांगितले तर
काय बहार येईल.
म्हणजे प्रत्येक मिपाकराला जे सुचत आहे व जे बदल दिसत आहेत ते येथे ते टंकित आहेत
पण त्यांचे एकत्रीकरण असलेला प्रतिसाद वाचायला आवडेल.
मी मिपाच्या बाह्य अंगापेक्षा अंत रंगावर प्रेम करतो.
उत्कृष्ट लेखक , चोखंदळ वाचक व त्यांचे प्रतिसाद ., आणि निरपेक्ष संपादक
आणि मालक
हे मिपा ची खरी शान आहे.
बाह्य रूप हे खर्या आयुष्यात सुद्धा नेहमीच बदलत असते त्याला इलाज नाही.
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
उर्ध्वश्रेणीकरण
सर्वप्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
काहि अडचणी सोडवण्यात आल्यात व इतर लवकरच अडचणी सोडवण्यात येतील.
आणि हो हि फायनल थीम नाहिच लवकरच योग्य तो बदल करण्यात येईल
धन्यवाद..!
प्रशांत तायडे
फोटो जुन्या पद्धतीने टाकता
फोटो जुन्या पद्धतीने टाकता येणार नाहीत का? नवी पद्धत कुठे दिलीये?
आवडेश .कुणाकुणाचा हातभार आहे
आवडेश .कुणाकुणाचा हातभार आहे ह्या नव्या रुपाला तेहि आम्हाला कळु द्या .
धन्यवाद .
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
♥ " मेरा पती ' पती '
... तेरा पती ' वनस्पती '
" ♥
यापेक्षा चांगले करता येईल
हिरवा रंग पांढर्या पार्शवभूमीवर नीट वाटत नाही.अर्थात प्रशांत यानी म्हटल्याप्रमाणे हे अंतिम रूप नव्हे. पण ५ वर्षे हा व्याप सांभाळल्याबद्द्ल नीलकांत ,प्रशांत व बाकी अनामिक यांच्या बद्द्ल ऋण .
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
मिपा लोगो सुंदर आहे!
मिपा लोगो सुंदर आहे!
वाचणखुणा का वाचनखुणा?
व्यनि लिहिताना मराठीत टाईप न
व्यनि लिहिताना मराठीत टाईप न होता इंग्रजीतच टंकला जातोय. तसेच संदेश पूर्वदृष्य न दिसता फक्त send message इतकेच दिसते आहे.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
काही शंका
१)फोटो कसे अपलोड करावे?
लेखन करा का उडवले? त्या ऐवजी ईंग्रजी प्रतिशब्द का?
फोनेटिक टायपिंग केल्यानंतर g mail वर देवनागरीमधिल ४-५ पर्याय लेफ्ट क्लिक केल्यावर येत असतात तशी सोय येथे केली नाही. जिमेल वर मराठी टाइप करणे फारच सुलभ आहे. अगदी शिफ्ट न दाबताही ह्रस्व दिर्घ चुका होत नाहीत.अगदि मनासारखे व व्याकरणशुद्ध टंकन होत असते. ती सोय येथे हवी होती.
भरपूर कष्ट घेतलेले आहेत ते जाणवतं..
नवं (बदलतं!) रूपडं आवडलं.
फक्त या आधीच्या रुपात 'स्वगृहा'वर गेल्यावर जसे सर्व प्रमुख विभाग (जनातलं-मनातलं, जे न देखे रवि, काथ्याकुट, भटकंती, पाककृती आणि कलादालन) एका दृष्टीक्षेपात त्यांच्या त्यांच्या latest ८-१० धाग्यांसह दिसायचे, तसे आता दिसत नाहीत, त्यामुळे प्रत्येक विभागात काय आहे हे ते त्या त्या दुव्यावर टिचकी मारून पहावं लागतं, म्हणजे ६ विभागांसाठी ६ टिचक्या; यामुळे थोडा वेळ आधिक लागतो. तेवढं जर पहिल्यासारखं मुखपृष्ठावर आणता आलं तर आवडेल.
बाकी रंगसंगती नेत्रसुखद आहे ('हिरवा माज' म्हणण्यापेक्षा 'हिरवा साज' म्हणायला हरकत नाही
आणि हो, एक राहिलं...
ते 'पेज अप' चं बाणाचं चिन्ह होतं तेही परत आलेलं आवडेल, प्रतिक्रिया वाचत खूप खाली गेलं की परत वर सुरूवातीला जाण्यासाठी बरंच स्क्रोल करायला लागतं. http://www.scrolltotop.com/ या ठिकाणी काही वेगवेगळ्या चिन्हांचे कोड्स आहेत.
+१
सर्व प्रमुख विभाग एका पानावर आणता आलं तर मलाही आवडेल.... रंगसगंती, मिपालोगो अन इतर बदल झक्कास झालेत....
छान
नवीन रूप आवडले. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मिपा पेज फास्ट लोड होत आहे. बाकी वरच्या मा. मिपाकरांच्या सूचना आहेतच.
माझा ब्लॉग
इथे विरुद्ध अनुभव
इथे विरुद्ध अनुभव
मी Opera 12.02 वापरत आहे .. दुप्पट वेळ लागतोय ...
छोटीशी सूचना
'प्रकशित करा' च्या ऐवजी 'प्रकाशित करा' असे हवे...
स्वॅप्स
------------------------------------------------------------------
"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
"If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks."
-------------------------
आधीचे रंग छान होते. हे अतिच
आधीचे रंग छान होते. हे अतिच हिरवट झालंय.
नविन प्रतिसादावर लाल रंगात "नविन" असं हवं.
विचारलं म्हणुन सांगितलं इतकंच.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
आधीचे रंग छान होते
अहो, हे फक्त काही दिवसांसाठी आहे. सर्व सुरळीत पूर्वीसारखं होईल.
कालजीचा कारण नाय. आता सध्या आपण काम करण्यार्यांचा उत्साह वाढवू या.
-दिलीप बिरुटे
बदल
नमस्कार,
सिस्टीमच्या दृष्टीने महत्वाचे असे बदल झालेत. आता युझर इन्टरफेसवर काम सुरू करतोय. त्यामुळे येत्या काळात वर दिलेल्या जवळपास तक्रारी निकालात निघतील अशी आशा आहे. अर्थात मिसळपावची आधीची थिम परत येणार नाहीच. रंगाचा विचार होऊ शकतो.
याशिवाय आणि काही अडचणी असतील तर त्या जरूर येथे मांडा म्हणजे किडे वेचताना (डिबगींग ) कामात येतील.
बाकी सर्वांच्या कौतुकाबद्दल धन्यवाद.
- नीलकांत
नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन
नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन!!
मिपा चालू झालंय हेच खूप महत्वाचं आहे, बदल काय हळूहळू होतच राहतील.
Font formating बटन्स अजूनही दिसत नाहियेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..
- अशोक बागवे
Marathi madhil best site
Best luck for MIPA
May I know MIPA members from Nashik ?
कुल
नवीन आधुनिक रूप आवडलं. फ्रेश
नवीन आधुनिक रूप आवडलं. फ्रेश लुक आहे. महापुरुष, साहित्यिकांची चित्र आवश्यकच असतील तर ठीक आहे. नव्या मिपाला शुभेच्छा !
.....................................................................................................
कविता हीच ओळख
अभिनंदन
धन्यवाद निलकांत...
मिसळीचा फोटु कुठाय.? लावा बघु पहिला.
हेडर'ला काही तरी बॅकग्राऊंड इमेज द्यावी.
आणखी काही सूचना
लेआउटमधे संकीर्ण रंग, काळा व पांढरा यांचा समतोल असला पाहिजे.
यासाठी काळा रंग लेखनासाठी पांढरा रंग कागदासाठी व लाल रंग हा लक्षवेधासाठी अगदी सक्तीचेच असतात.
मिपाचा नवा लोगो ठीक आहे. खूप खास आहे असे नाही. दुसरे म्हणजे मिसळपाव या शब्दातून वैविध्य शब्दाचा अर्थ अपेक्षेत आहे त्या अर्थाने लोगोमधे काहीतरी हवे होते. स्वगृह यात मिसळपाववर स्वागत आहे हे " मिसळपाव" वर स्वागत आहे असे असावे.
सध्यातरी सभासदाचे चिन्ह येत नाही असे दिसतेय !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन
नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन!!


मिपा चालू झालंय हेच खूप महत्वाचं आहे, बदल काय हळूहळू होतच राहतील.>>अनुमोदन..
बाकि या नव्या रंगसंगतिमुळे हापिसात लो़कांना संशय येणार नाहि...नाहि तर मिपाचा लोगो बद्नाम झाला होता
बदलाचे स्वागत.
त्रुटींबद्दल वरती बरेच काही लिहीले गेले आहे. त्या लौकरच दूर केल्या जातील अशी आशा आहे.
मला अजून एक दोन त्रुटी दिसल्या आहेत.अ
व्यक्तीगत संदेशमधे मराठीत टाइप होत नाही.
डिलीट करण्यासाठी एखादी ओळ हायलाईट करून डिलीट म्हणल्यास डिलीशन होत नाही. बॅक अॅरो अथवा डिलीट कीने एक एक अक्षर डिलीट करायला लागत आहे.
टूलबारची आवश्यक्ता भासता आहे.
कोणत्याही धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेलो , पण प्रतिसादाजवळ 'नविन' दिसत नाहीये.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
दोन मुद्दे राहून गेले.
"संपादन" करू शकत नाही.
"हजर सभासद" वर क्लिक केल्यावर दिसत नाहीत. (यादी दिसत नाही)
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
अभिनंदन
सुंदर लोगो आणि सुखावह थिम. निलकांत व त्याच्या टीमचे अभिनंदन.
मोहन
एक सूचना
एक सूचना
ओळखणं कठिण जात ..
एवढे बदल करताय त्यात आणखी एक..
प्रतिसादांना जेव्हा प्रतिसाद येतात तेव्हा मूळ लेखाचे प्रतिसाद आणि प्रतिसादाचे प्रतिसाद केवळ indentation नेच वेगळे ओळखता येतात. पण बर्याच वेळा उपप्रतिसाद खूप जास्त होतात तेव्हा खूप प्रतिसादाची level (साहित्यिक नव्हे
यासाठी उपप्रतिसादांसाठी expand/collapse करता आलं तर navigation सोप होइल.
आपल्याला हा लूक अज्जीबात
आपल्याला हा लूक अज्जीबात आवडलेला नाहीये.
होईल सवय हळुहळु
http://preetamohar.blogspot.com/
technically बघता website
technically बघता website devolopment हे खूप किचकट आणि थोडेसे कठीण असे काम असते, त्यामुळे नवीन theme सर्वांसमोर finally यायला तेवढा वेळ लागेल, त्यामुळे जरा वाट बघावी लागेल सगळ्यांनाच....
पूर्वीच्या सगळ्या सोयी तर पूर्ववत होतीलच....
माझ्यामते सांगतोय ते दुरुस्त होईलच लवकरच, तरी चुकून लक्ष नसेल गेल तर एक सुचवू इच्छितो कि अगदी वर लिहिलेला मिसळपाव चा font . मध्यभागी असलेल्या फोटोवर येणाऱ्या गणेशोत्सव लिहिलंय त्याच्या वर लिहिलेल्या मिसळपाव च्या font ला match होत नाहीये, दोन्हीकडे एकाच font ठेवता आला तर तेवढ जरा बघा दुरुस्ती करताना..
---/\---
खरतर फोटोग्राफी ची आवड जपताना ट्रेकिंग ची आवड कधी लागली कळलच नाही ...
नाय राव
नाय राव, हे बात कुछ ह्ज़म नही हुई.
कुछ जम्या नही.
नि३
असूदे अन्न खाऊ नये.. वडिलांचेही |
नवे रुप आवडले ( जुने जाऊ द्या मरणालागुनी )
..जरा फोंट मात्र मोठा करायला हवा .. ( की मला चष्मा लागलाय ?) बाकीच्या अडचणी हळू हळू दूर होतीलच.
या निमित्ताने संपादक मंडळाचे हार्दिक आभार !
आपण सारे हा उद्योग खिषाला चाट देऊन करताहात. हे खरेच ( तुमच्यासाठी ) कौतुकास्पद आहे आणि (आमच्यासाठी) लाजिरवाणे आहे !
समर्थानी म्हटले आहे .. असूदे अन्न खाऊ नये.. वडिलांचेही |
तेव्हा, असा उच्च प्रतिचा आनंद फुकट घेताना प्रशस्त वाटत नाही.
अगदी थाळी फिरवण्याची आवश्यकता नाही .. एच्छिक असू द्यावे,
अर्थिक बाबतीत आपण सारे नक्कीच सक्षम आहात , तो प्रश्न नाहीच !
पण मग आम्ही फुकटेपणा का करायचा ?
आपणांस आहे मरण! म्हणोन राखावें बरवेपण!!
Pages