शेतकरी आत्महत्या - एक उपाय

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
26 Apr 2018 - 9:54 am
गाभा: 

नुकतेच हे चित्र फेसबुकवर माझ्या कालरेषेवर पहायला मिळाले आणि मनात एक विचार आला.

शेतकरी आत्महत्त्यासाठी कायम सरकारने उपाय योजावेत यासाठी सरकारवर दबाव आणला जातो. सरकारला या दबावाला झुकावे पण लागते. पण कुणाच्या हे लक्षात कसे येत नाही की देवस्थानांकडे सडत असलेली संपत्ती काही प्रमाणात जरी बाहेर पडली तरी शेतकरी आत्महत्त्यांचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात सोडवता येईल.

चित्रपट अभिनेते जसे शेतकर्‍यासाठी पुढे आलेले दिसतात तसे या देवस्थानांनी पुढाकार घेतलेला दिसत नाही. सर्वात करूण विनोद असा की सचिन तेंडूलकरच्या भारतरत्नसाठी सरकारवर दबाव टाकायला जनता एकत्र येते. पण देवस्थाने आणि धार्मिक संस्थाना त्यांचे खजिने खुले करायला लावण्यासाठी भारतीय पुढे येत नाहीत.

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Apr 2018 - 6:48 pm | पैसा

या विषयसंदर्भात कितीही बोलले तरी कमी आहे म्हणून मौन बाळगणे इष्ट.

शेतकर्‍यांसाठी योजना आखणे व त्या प्रभावीपणे अंमलात आणणे हे सरकारचे काम आहे. जर त्या कामात सरकार अयशस्वी ठरत असेल तर
त्यावर देवस्थानांची संपत्ती लुटुन / लाटुन आपला नाकर्तेपणा झाकणे हा उपाय नाही. म्हणुनच जनता असा दबाव सरकारवर आणत नाही.

काही मंदीरे, चर्च, मशीदी व गुरुद्वारे त्यांच्या ट्रस्टींच्या मतानुसार लोकोपयोगी कार्ये करतात. पण देवस्थानांची संपत्ती लोकांनी देवस्थानाला देणगी म्हणुन दीलेली असते. तीचा उपयोग शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी करावा अशी सरकार सक्ती करु शकत नाही.

त्यावर देवस्थानांची संपत्ती लुटुन / लाटुन आपला नाकर्तेपणा झाकणे हा उपाय नाही

जनतेने दबाव आणला तर सरकार काहीही करू शकते.

खाली प्रतिसादात बर्‍याच जणानी असे का करु नये याचे उत्तर दीले आहे, म्हणुन तेच परत लीहीत नाही.

उगा काहितरीच's picture

27 Apr 2018 - 9:34 am | उगा काहितरीच

चित्र दिसत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Apr 2018 - 10:18 am | प्रकाश घाटपांडे

असा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मला शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा स्वतंत्र विषय वाटतो.

मार्मिक गोडसे's picture

27 Apr 2018 - 11:46 am | मार्मिक गोडसे

देशाच्या विकासासाठी आपण विविध प्रकारचे कर देतो की सरकारला. हया पैशावर सरकारचा अधिकार नसावा.

सुबोध खरे's picture

27 Apr 2018 - 11:59 am | सुबोध खरे

शेतकऱ्याच्या आत्महत्या या सामान्य नागरिकांच्या आत्महत्यांपेक्षा संख्येने जास्त नाहीत. त्याचा राजकीय फायदा उठवण्याच्या धुळवडीत सगळे हौशे नवशे आणि गवशे जमा झाल्याने हि स्थिती आली आहे.
खालील दुवा वाचून पहा.

Sorry, but there is nothing special about suicide rates of farmers, and they are not rising. The national suicide rate has historically been in the region of 10-11 deaths per one lakh of population, not very different from the rate globally or in rich countries like the US. Indian farmers have a lower suicide rate than non-farmers.

In a 2012 research paper in The Lancet, Vikram Patel and others found that suicides among unemployed persons and those professions outside agriculture were, collectively, thrice as frequent as among farmers and agricultural labourers. Suicide rates are 10 times higher in southern states than northern ones, mainly for cultural reasons. Former Niti Aayog chief Arvind Panagariya showed that barely 25% of rural suicides were farm-related.

On any broad basis, the farm suicide rate is lower than the non-farmer rate.
Puducherry, with little agriculture, has the highest suicide rate among states, followed by Kerala. This surely has nothing to do with low farm prices. Anuradha Bose in The Lancet in 2004 found that the suicide rate among Tamil girls aged 10-19 was 148 per lakh people. This is over ten times the farm suicide rate, yet the latter hogs the headlines.

https://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/farmer-agitations-...

हे स्वामिनाथन अय्यर काही भाजप संघीय वगैरे नाहीत तर काँग्रेसी आहेत वर नास्तिक आहेत आणि आपल्या लाडक्या मोदीद्वेष्ट्या मणिशंकर अय्यर यांचे सख्खे भाऊच आहेत. म्हणजे "तसा" पूर्वग्रह ठेवायचे कारण नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल वस्तुस्थिती लिहिली तर असंवेदनशील शहरी मनोवृत्तीचे इ इ लेबले लगेच लावली जातात.

आणि आपण देवस्थानांचा पैसा विकासाच्या ऐवजी शेतीचे कर्ज माफ करायला निघालो आहोत.

म्हणजे पहा आपण सर्व लोक किती सहज पत्रकारांच्या अजेंड्याला "बळी" पडतो आहोत.

सुखीमाणूस's picture

27 Apr 2018 - 2:44 pm | सुखीमाणूस

चांगली माहिती आणि परखड मतप्रदर्शन!!

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2018 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे. बर्‍याचदा राजकीय लाभासाठी समूहउन्माद निर्माण केला जातो व अशावेळी बुद्धीजन्य पातळीवर वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे अवघड होते. असे करण्याचा प्रयत्न कुणी केला तर असंवेदनशील असा शिक्का त्याच्यावर बसतो. लोक ऐकूनच घ्यायला तयार होत नाहीत.

बिलकूल नको. उलट सुजाण सामान्य नागरिकांनी या देवस्थानांना दानरूपी धन समाजोपयोगी कार्यांसाठी खर्च करण्यास भाग पाडावे. कररूपाने मंदिरांकडून पैसे घेणे सरकारला शक्य असले पाहिजे मात्र सर्व धन सरकारने ताब्यात घेण्यास विरोध राहिल. अनाम देणगी हा प्रकार बंद व्हावा, देवस्थानांद्वारे होत असलेल्या खर्च माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत यावा, तो दर महिन्याला प्रकाशीत करणे सक्तीचे असावे, देवस्थानांनी शिष्यवृत्ती, गरीब रूग्णांना, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मदत आदी स्वरूपात समाजसेवा करण्यासाठी अधिकाधिक प्रचार करावा हे उपाय अधिक परिणामकारक ठरतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2018 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात सरकारने आधुनिक रॉबीन हूड बनावे ! =))

हाच नियम मग इतर धनिकांना लावून अंदाधुंदीकडे (chaos) वाटचाल सुरू करायला हरकत नाही !

"कोणीही कायदेशीरपणे जमवलेली संपत्ती, केवळ जास्त संपत्ती जमा झालेली आहे या कारणासाठी, जबदस्तीने बळकावणे" या प्रकाराला नैतिक तर नाहीच तर सभ्य कृती असे सुद्धा म्हणता येणार नाही.

मार्मिक गोडसे's picture

27 Apr 2018 - 3:10 pm | मार्मिक गोडसे

"कोणीही कायदेशीरपणे जमवलेली संपत्ती, केवळ जास्त संपत्ती जमा झालेली आहे या कारणासाठी, जबदस्तीने बळकावणे" या प्रकाराला नैतिक तर नाहीच तर सभ्य कृती असे सुद्धा म्हणता येणार नाही.
सहमत.
असंही , देवस्थानांनाचे पैसे बँकेत वर्षानुवर्ष जमा आहेत, एक प्रकारे बँकांना स्वस्तात दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होत आहे.

अभिजीत अवलिया's picture

27 Apr 2018 - 7:20 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

सर्वात करूण विनोद असा की सचिन तेंडूलकरच्या भारतरत्नसाठी सरकारवर दबाव टाकायला जनता एकत्र येते.

जनता सचिन तेंडूलकरच्या भारतरत्नसाठी सरकारवर दबाव टाकायला एकत्र कधी आली?

युयुत्सु's picture

29 Apr 2018 - 7:49 am | युयुत्सु

त्या सुमारास वृत्तपत्रातील बातम्या वाचाव्यात

manguu@mail.com's picture

27 Apr 2018 - 2:12 pm | manguu@mail.com

आजा वीस एकरवाला होता.

त्याला चार मुले झाली . मग प्रत्येकी पाच एकर.

त्यानाही ३-४ झाली ... सगळे अल्पभूधारक झाले.

नोकरदारांच्यात प्रत्येक पिढीचे एक घर तयार होते. शेतकर्यांच्यात रिसोर्स डिवाइड होतात.

शाम भागवत's picture

27 Apr 2018 - 3:07 pm | शाम भागवत

मी चुकून अजो वाचल. :)

कपिलमुनी's picture

27 Apr 2018 - 2:28 pm | कपिलमुनी

जे पक्ष / सरकार स्वतःला मिळालेल्या देणग्या जाहीर करत नाही , समाजपयोगी कारणासाठी वापरत नाही त्यांच्या कडून कोणतेही अपेक्षा नाही

सुबोध खरे's picture

27 Apr 2018 - 7:27 pm | सुबोध खरे

चित्रपट अभिनेते जसे शेतकर्‍यासाठी पुढे आलेले दिसतात तसे या देवस्थानांनी पुढाकार घेतलेला दिसत नाही.

आपण बऱ्याच गोष्टी वाचलेल्या नाहीत आणि माहिती करून घेतलेल्या नाहीत म्हणून अशी "लोकप्रिय विधाने" देता आहात.

" लालबागचा राजा" हे डायलिसिस ची सुविधा रुग्णांना फुकट पासून ते ३०० रुपये या शुल्कात उपलब्ध करून देते. ( हे मला एका रुग्णाने सांगितले जो ती सेवा किडनी ट्रान्सप्लांट ची वाट पाहत असताना घेतो आहे. डायलिसिस चा खर्च "ना नफा ना तोटा" या तत्वावर एका वेळेस ९०० रुप्याच्या आसपास येतो हे "माझ्या माहितीप्रमाणे" आहे.

टिटवाळा येथील श्री महागणपती संस्थानने तेथे होत असलेल्या रुग्णालयाला सहा ते सात कोटींचा निधी दिलेला मला "माहिती आहे"

श्री सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस हे पुट्टपर्थी आणि बंगळुरु येथे अतिशय उच्च दर्जाची ( tertiary health care) वैद्यकीय सेवा सर्वाना ( जात धर्म लिंग आणि राष्ट्रीयत्व विरहित) फुकट देते आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Sri_Sathya_Sai_Super_Speciality_Hospital

तिरुपती देवस्थानाच्या सामाजिक कार्याबद्दलच माहिती खाली वाचू शकता

http://www.tirumala.org/SocialActivities.aspx

अशा अनेक सामाजिक कार्यांना मदत देत असणारी असंख्य देवस्थाने मला माहिती आहेत. आपणही थोडा प्रयत्न केलात/ खोदकाम केलेत तर आपल्याला हि सापडू शकेल.
केवळ शेतकऱ्यांना मदत केली नाही म्हणजे त्यांच्या कडच्या पैशाचा सुविनियोग होत नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.

मार्मिक गोडसे's picture

27 Apr 2018 - 7:47 pm | मार्मिक गोडसे

केवळ शेतकऱ्यांना मदत केली नाही म्हणजे त्यांच्या कडच्या पैशाचा सुविनियोग होत नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.
खरंय.
एक देवस्थान शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे देतं, बदल्यात त्याच्या दुप्पट शुध्द बियाणे शेतकऱ्याकडून घेतं. शेतकरयांना मार्गदर्शनही करतात.