निनावी कल्लोळ

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
18 Apr 2018 - 6:56 pm

जेटयुगाचे बडवा ढोल,बडवा ढोल !!

निषेधाचाच डब्बा गोल ,डब्बा गोल!!

कर्म अंधारी, वासना विखारी !!

(अ)धर्म तुतारी ,क्लांत शिसारी !!!

टाळाटाळ सरळसोट , टाळाटाळ सरळसोट!!

आपलेच दात आपलेच ओठ !!!

जालपिपाणी टिवटिव गाणी !!

विदेशी विद्वेषी वणवण,तर्कशुध्दि सदैव चणचण !!!

भुक्कड दक्षक भणंग रक्षक !!

दुर्बलांची ऐशीतैशी !! मुजोरांप्रती प्रीतखाशी!!

विफल अरण्यरुदन ,विदीर्ण मूक पीडन !!

गाये हरफनमौला ,गाये हरफनमौला !! तन सुंदर धवल ,पर मन (रहे) सदा मैला!!

आडवाटेला थांबलेला वाचक नाखु

मुक्त कविताकरुणमुक्तकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Apr 2018 - 9:58 pm | पैसा

:)

सस्नेह's picture

18 Apr 2018 - 10:15 pm | सस्नेह

:(

प्रचेतस's picture

19 Apr 2018 - 6:15 am | प्रचेतस

शब्दयोजना जबरदस्त

नाखु's picture

20 Apr 2018 - 11:32 pm | नाखु

..

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2018 - 7:44 pm | प्रसाद गोडबोले

+१ अणुमोदन !

शिवाय अनेक यमक वापरल्याने एकदम रॅप च्या चालीत म्हणतही येईल ;)
किव्वा असं करुयात का की - ते ८ माईल्स चित्रपटात दाखवले आहे तसे रॅप बॅटल ठेवुयात ,

MH 12 vs MH 14 ! पुणे विरुध्द पिंची !
एकी कडुन नाखु वल्ली गणा आणि पुण्या कडुन बॅट्या वप्या आणि पन्नास !!

आणि डी जे कोण म्हणुन काय विचारताय - सोलापुरच्या बोलाव माझ्या डी जे ला =))))

शरदिनी काकूंची प्रेरणा दिसतेय.
चालू द्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Apr 2018 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली कविता,
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2018 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

चित्रगुप्त's picture

27 Apr 2018 - 5:25 am | चित्रगुप्त

आडवाटेवरची कविता आवडली.

शाली's picture

2 May 2018 - 4:51 pm | शाली

भारी!

शाली's picture

2 May 2018 - 4:52 pm | शाली

भारी!