भीमा-कोरेगाव : चष्मा काढून बघा

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
8 Jan 2018 - 3:23 pm
गाभा: 

"या हिंदुत्ववाल्यांचंच काहीतरी आहे", "उगाच जनतेला भडकावतात", "दलितांची अस्मिता यांच्या डोळ्यात खुपतेय", "दलितांची प्रगती यांना बघवंत नाहीय्ये" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या चष्म्याआडूनच करायचा आहे हे खास आहे.

(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषय आहे. : मुळात हे स्मारक २०० वर्षांपूर्वीचं. १९२७ पूर्वी त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते. परंतु १९२७ मध्ये प्रथम आंबेडकरांनी याला आपल्या अभिमानाचा विषय बनविले. तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.

(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्धात पेशव्यांचा पराभव झालेला होता: असेलही. इंग्रजांनी १८१८ पर्यंत भारताचा बराचसा भाग आपल्या नियंत्रणात आणला होता. स्थानिकांचा सैन्यात समावेश करून, भारतातील राजेराजवाड्यातील फुटीचा, दुहीचा लाभ घेऊन, इथल्या राजांना एकमेकांविरूद्ध लढायला लावून इंग्रजांनी भारताच्या बहुतांशी भूभागावर कब्जा मिळविला होता. पेशव्यांचे उरलेसुरले राज्य जिंकून घेणे हा इंग्रजांसाठी फक्त काही काळाचाच प्रश्न होता. पेशव्यांचं राज्य तसंही खिळखिळं झालंच होतं. जनरल वेलस्लीने महादजी शिंद्यांच्या मोठ्या फौजेचा आधीच पराभव केला होता. होळकराने पुणे लुटून पेशव्यांचं साम्राज्य पूर्ण मोडकळीला आणलेलं होतं. एखाद्या डगमगत्या खांबाला टिचकी मारली तरी तो खांब कोसळतो. तसेच पेशयांच्या पराभवाला एक छोटासा धक्का आवश्यक होता आणि तो भीमा-कोरेगाव येथे मिळाला व साम्राज्य भुईसपाट झालं. इंग्रजांच्या सैन्यात काही महारांचा समावेश होता. परंतु त्यामुळे पेशवे हरले व महार जिंकले हा शुद्ध भ्रम आहे. तसं म्हणायचं असेल तर पहिलं व दुसरं महायुद्ध भारताने जिंकलं असं म्हणावं लागेल. इंग्रजांच्या सैन्यात महार नसते तरी पेशवे हरलेच असते. हे युद्ध पेशवे हरले नाहीत व महार जिंकले नाहीत. जिंकले ते इंग्रज व हरला तो भारत. परंतु या युद्धाला पेशवे वि. महार म्हणजेच ब्राह्मण वि. अस्पृश्य असे मखर चढवून युद्धानंतर २०० वर्षांनी वातावरण पेटविणे कोणत्या संस्कृतीत बसतं?

(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत हिंदू संघटनांना, संघाला, ब्राह्मणांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात ब्राह्मण हा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. ब्राह्मणांच्या वागण्यातल्या असलेल्या/नसलेल्या विसंगती शोधून, त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं सावरकर जयंती साजरी करतात? किती जण थोरले बाजीराव पेशव्यांचे योगदान मानतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते संघवाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं.

(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं :- लढवय्या महारांवर अशी सक्ती करणं शक्य होतं का? अशा लोकांना वतने कशी व कोणी दिली असावीत? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खरं होतं. पण आता तशी स्थिती आहे का? २०० वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी जे होतं त्याची शिक्षा आता २०० वर्षांनंतर का?

(४) प्रकाश आंबेडकरांनी मनुवाद्यांविरूद्ध आवाज उठवला: मुळात मनुस्मृती भारतातील ९९.९९% हून अधिक जनतेने वाचलेली नाही. मनुस्मृतीत काय लिहिलंय, काय नाही याबद्दल इथल्या जनतेला कणभरही घेणंदेणं नाही. १४०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकातील कालबाह्य झालेल्या क्रूर गोष्टी जशाच्या तशा आज अंमलात आणण्याचा आग्रह धरणार्‍या एका मोठ्या समाजगटाबद्दल प्रकाश आंबेडकरांची दातखिळ बसलेली असते. परंतु एक पूर्णतः कालबाह्य झालेल्या व जनतेने पूर्णतः दुर्लक्षित केलेल्या पुस्तकाचा सातत्याने बागुलबुवा दाखविण्यामागे नक्की अन्यायाविरूद्ध लढण्याचाच हेतू आहे का? राजकीय कारकीर्द पूर्णपणे संपलेल्या प्रकाश आंबेडकरांना स्वत:च्या जीवावर वर येण्याऐवजी मेवाणी, खलिद असल्यांची गरज का लागते? उमर खलिदवर देशद्रोहाचे आरोप आहेत. भारताचे हजारो तुकडे व्हावेत अशी इच्छा मनी बाळगून तशा घोषणा देणारा यांच्या मांडीला मांडी लावून कसा काय बसतो? भाजप किंवा संघाविरूद्ध राजकीय लढा देणे समजू शकते. परंतु त्यासाठी खलिदसारखे साथीदार बरोबर घ्यायचे? १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर याच प्रकाश आंबेडकरांनी अशी मागणी केली होती की भारताने अणुचाचणी केल्याबद्दल पाकिस्तानला २००० कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी कारण भारतामुळे पाकिस्तानला सुद्धा खर्चिक अणुचाचणी करावी लागली.

(५) भीमा-कोरेगाव दंगलीमागे भिडे-एकबोटे आहेत: भीमा-कोरेगाव समारंभाच्या पूर्वसंध्येला मुद्दाम शनिवारवाड्यासमोर सभा घेऊन, त्यात मेवाणी-खलिद सारख्यांना बरोबर आगपाखड करणारी भाषणे करणे यामागे नक्की कोणता उद्देश होता? १ जानेवारीला शिवरायांचे चित्र असलेल्या तरूणाला मारहाण करणारे नक्की कोण होते? १ जानेवारीला वातावरण पेटलेले असताना मुद्दाम ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद करण्याची चिथावणी देऊन वातावरण अजून पेटविण्याचा प्रयत्न का केला? बंदच्या दिवशी शेकडो बसेसचं, वाहनांचे नुकसान झाले, लाखो मनुष्यतास वाया गेले, पोलिसांच्या लाठीमारात एका तरूणाला प्राण गमवावे लागले, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? त्यामागे भिडे, एकबोटे आहेत याचे पुरावे आहेत का? प्रकाश आंबेडकर स्वतःच्या खिशातून अब्जावधी रूपयांची नुकसानभरपाई देणार आहेत का? आंबेडकरांचे स्वतःचे राजकीय पुनरूज्जीवन करण्यासाठी जनतेला फार मोठी किंमत द्यावी लागली आहे.

एखाद्या उभ्या असलेल्या स्ट्र्क्चरला देवस्थानाचे स्वरूप देऊन आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट १८ व्या शतकात नेऊन, "मनुवाद", "ब्राह्मणी कावा" असा बागुलबुवा उभा करून हिंदू समाजात फूट पाडणार्‍यांनी हिंदू संघटनांविरूद्ध कांगावा करावा हा शुद्ध दांभिकपणा नाही का?

यांनी जंगजंग पछाडूनसुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांना नावडणारे हिंदू पक्ष सत्तेवर आलेत. पुरस्कार परतीची नाटके करून झाली, विकासाला वेडा ठरवून झाले, पाकिस्तानची मदत मागून झाली, शिक्षण-पदव्यांची उठाठेव करून झाली . . . हे सातत्याने अपयशी ठरताहेत. म्हणून आता ठेवणीतले जातीयवादाचे अस्त्र बाहेर काढले आहे. पेशवाई, मनुवाद, ब्राह्मणी कावा असे अस्तित्वात नसलेले बागुलबुवा निर्माण करून समाजातील एका गटाला भयभीत करून समाजात फूट पाडून आपली पोळी भाजणे हा एकमेव उद्देश यामागे आहे.

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

8 Jan 2018 - 3:52 pm | प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी,

उत्तम व संतुलीत लेख. खुप दिवसांनी असा सकस लेख वाचला.

आगाऊ कार्टा's picture

8 Jan 2018 - 3:54 pm | आगाऊ कार्टा

अप्रतिम लेख.

अमर विश्वास's picture

8 Jan 2018 - 4:04 pm | अमर विश्वास

अहो हो दंगल आणि बंद हे शुद्ध राजकीय होते

आपण आपले उगाच जातीय अस्मिता वगैरे कुरवाळत बसायचे

मला कधी नव्हे ती देशाची खूप काळजी वाटायला लागलेय.
बहुतेक काही दिवस सोशल मिडियापासून दूर रहावे लागेल असे वाटतेय

मुक्त विहारि's picture

8 Jan 2018 - 10:07 pm | मुक्त विहारि

तुम्ही फारच मनाला लावून घेतलेले दिसत आहे.

असो,

बाकी, सध्या काय सुरु आहे?

आजच्या मॅच मधली हाराकिरी बघीतली असेलच. बाहेर जाणार्‍या चेंडूला, बॅट लावलीच पाहिजे, असा आपल्या खेळाडूंचा नियम आहे म्हणा.

डिस्क्लेमर : माझा प्रतिसाद फक्त श्रीगुरुजींनाच आहे, हे सूज्ञांना सांगायला नकोच.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2018 - 2:36 pm | श्रीगुरुजी

मनाला वगैरे काही लावून घेतलेले नाही हो. सध्या नेहमीसारखाच निवांत आहे. सामना संपूर्ण पाहिला. निकाल अपेक्षितच होता. एकदिवसीय सामन्यांचा व ट-२०/आयपीएलचा अतिरेक झाल्याने खेळपट्टीवर पाय रोवून दोनदोन दिवस खेळणारे गावसकरसारखे किंवा द्रविडसारखे फलंदाज आता पहायला मिळत नाहीत कारण दोन दिवसात ७५% सामना संपलेला असतो. तंत्रशुद्ध फलंदाज आता फारसे तयार होत नाहीत.सरावासाठी रणजी स्पर्धासुद्धा राष्ट्रीय संघातले खेळाडू फारसे खेळत नाहीत. त्यामुळे केपटाऊनसारख्या चेंडू उसळणार्‍या खेळपट्टीवर डाव कोसळणे अपेक्षितच होते.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2018 - 11:07 pm | मुक्त विहारि

ओके

भक्त प्रल्हाद's picture

8 Jan 2018 - 10:15 pm | भक्त प्रल्हाद

प्रकाश आंबेडकरांना दोष देण्यापूर्वी हा त्यांचा लेख वाचला तर मतपरिवर्तन होण्याची आहे. https://rightangles.in/2017/12/31/battle-of-koregaon/

बरं झालं हा लेख दिलात. उरला सुरला विश्वास पण उडाला.
आदल्या दिवशी हे असं लिहायचं, आणि दुसऱ्या दिवशी तमाशा?
It's typical political behavior ..

आणि बाय द वे, त्या लेखात इतिहासाची बाजू अगदीच अर्धवट आहे, जी इथेच आली आहे वेगवेगळ्या प्रकारे.

मी माहितगारांना विनंती करतो की त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेल्या लेखातील निसटत्या बाजू मांडाव्यात..

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2018 - 2:47 pm | श्रीगुरुजी

लेख वाचला. प्रकाश आंबेडकर पूर्णपणे गोंधळलेले आहेत. एकीकडे म्हणतात की भीमा-कोरेगाव युद्धामुळे अस्पृश्यांचे झाडू-मडके गेले, दुसरीकडे म्हणतात हा भावनिक मुद्दा आहे, तिसरीकडे म्हणतात की झाडू-मडके असलेल्या महारांना लष्करी शिक्षण कसे काय मिळाले असेल हे एक गूढच आहे. झालेल्या प्रकारामुळे आपले राजकीय पुनरूज्जीवन होईल या गैरसमजातून ते आनंदलेले दिसतात. परंतु त्याचवेळी आपल्या चेहर्‍यावर चढविलेला पुरोगामी मुखवटा निसटू नये याचाही प्रयत्न करताना आढळतात.

आंबेडकर फक्त या लेखातूनच व्यक्त झाले असते तर आदर दुणावला असता.

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

विकास's picture

9 Jan 2018 - 5:14 pm | विकास

प्रकाशराव तुमच्याशी पूर्ण सहमत आहे!

(खरेच प्रामाणिक प्रश्न: हल्लीच्या शाळांमध्ये ही प्रतिज्ञा वाचली जाते का?)

पण दुर्दैवाने आजकाल रामदास फुटाणे यांनी लिहिलेलेच डोक्यात ठेवणारे जास्त आहेत. (चेपू वरून चिकटवत आहे)

भारत कधी कधी माझा देश आहे.

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत.

माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही

त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही.

माझ्या जातीचा,माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे...

माझा देश माझा खाऊ आहे.

खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांताची जुंपणार आहे.

जुंपल्या नंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील.

पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील.

त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील...

खुर्चीवर बगळे बसतील.

पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ, "हम सब एक है,

हिंदू-मुस्लीम भाई भाई,

हिंदू-सिख भाई भाई,

हिंदू-इसाई भाई भाई,

हिंदू-बौद्ध भाई भाई,

हिंदू-जैन भाई भाई

जमलेच तर... हिंदू-हिंदू सुद्धा भाई भाई".

तोपर्यंत मित्रानो मला माझ्याच स्वातंत्र्याची तहान आहे

या देशापेक्षा मीच महान आहे.

मी माझ्यासाठीच जगतो,

मी माझ्यासाठीच मरतो.

आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो.

तेव्हा-

माझा जयजयकार असो,

माझ्या धर्माचा जयजयकार असो,

माझ्या पंथाचा जयजयकार असो,

माझ्या प्रांताचा जयजयकार असो.

झालाच तर... कधी कधी...

माझ्या देशाचा सुद्धा जयजयकार असो.

-रामदास फुटाणें

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2018 - 2:49 pm | श्रीगुरुजी

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।

उमर खालिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसताना आणि कबीर कला मंचवाल्यांची गाणी ऐकताना ही प्रतिज्ञा गुंडाळून ठेवण्यात आली होती.

प्रतिज्ञा मानणं, घेणं, पाळणं इ इ पूर्ण श्रद्धा आहे, अशास्त्रीय आहे नि असं सोयीच्या वेळी सांगणं चूक आहे. (प्रेरणा - यनावालांचे लेख)
------------------------
हे कायद्यात आहे का? घटनेत आहे का? मग ही प्रार्थना म्हणून घेण्यात जातीयवादी शक्तींचा हात आहे. (प्रेरणा - असावुद्दिन ओवैसी)
---------------------

माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

इतिहासात दलितांवर अन्याय झाला सवर्णांकडून. सर्वणांवर झाला ब्राह्मणांकडून. ब्राह्मण स्त्रीयांवर झाला ब्राह्मण पुरुषांकडून. खालच्या ब्राह्मणांवर झाला वरच्या ब्राह्मण पुरुषांकडून (तसं मी विसरलोच कि या लॉजिकनं अपुनका भी उधर जाना बनता है भीमा कोरेगाव उत्सव मनाने के लिए.). सोवळ्यातल्या वरच्या ब्राह्मण पुरुषांकडून ओवळ्यातल्या वरच्या ब्राह्मण पुरुषांना अस्पृश्य मानलं गेलं. या सोवळ्यातल्या वरच्या ब्राह्मण पुरुषांत पण एका टोळक्यात एक अल्फा मेल असणार.
मंजे मज्जा केली फक्त ३.५% गुणिले ५०% (बायका काढून) गुणिले ५% (उच्च ब्राह्मण) गुणिले ५% (सवळ्यातले) गुणिले १% (अल्फा मेल) ....
आणि अशी संस्कृतिला विविधतेने नटलेली म्हणत तिचा अभिमान बाळगायचा?

तेजस आठवले's picture

9 Jan 2018 - 3:55 pm | तेजस आठवले

श्रीगुरुजी,
चांगला समाचार घेतला आहे.

रामदास२९'s picture

10 Jan 2018 - 2:24 pm | रामदास२९

श्रीगुरुजी,
उत्तम व संतुलीत लेख.

दोन समाजानमधील गावाच्या पातळीवरील भान्डण या लोकान्नी राजकिय पुनर्वसन करण्यासाठी वापरला. दोन समाजानम्धे तेढ निर्माण करण्यासाठी बाहेरच्या देशान्चे कारस्थान आहे असा कधी कधी वाटत.
http://www.thehindu.com/2005/09/18/stories/2005091803540900.htm

https://www.cia.gov/library/readingroom/docs/CIA-RDP79-01194A00010043000...

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2018 - 2:51 pm | श्रीगुरुजी

दोन समाजांमध्ये तेढ लावण्याचा प्रयत्न मागील ३ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. यामागील कारण सर्वश्रुत आहे. हे करण्यामागे कोणताही बाहेरील देश नसून या देशात राहणारे देशद्रोहीच आहेत.

गामा पैलवान's picture

11 Jan 2018 - 12:24 am | गामा पैलवान

आयशप्पत आता मात्र हद्द झाली. प्रकाश आंबेडकर म्हणतात : भिडेंच्या हस्तकाकडून फडणवीसांना धोका

मी पैज मारून सांगतो प्रकाश आंबेडकर ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष उत्पन्न करू पाहताहेत. दलित विरुद्ध सवर्ण संघर्ष पेटलाच नाही. बौद्ध विरुद्ध मराठा पक्ष घेऊन कोणीच लढायला तयार नाही. अशा परिस्थितीत ब्राह्मणांत फूट पाडून बघूया असा विचार केलेला दिसतो आहे.

असा तिरपागडा विचार केवळ माझ्यासारखा अत्रंगीच करू जाणे. प्रकाश आंबेडकर आचरटपणांत चक्क माझी बरोबरी करू पाहताहेत. मी बरा त्यांची डाळ शिजू देईन !

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2018 - 8:52 am | श्रीगुरुजी

प्रकाश आंबेडकरांची दिग्विजय सिंह होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू आहे (method in madness and high nuisance value).

रामदास२९'s picture

12 Jan 2018 - 12:14 pm | रामदास२९

हहपुवा .. खर आहे..

समाज आता एका मर्यादेबाहेर जातीवादाला थारा देत नाही.. म्हणून त्यान्ची अस्वस्थता वाढलीय ..
दोन समाजामधे तेढ वाढवून कसली राजकिय पुनर्वसनाची स्वप्न बघता.. त्याऐवजी जर जाती-जातीन्मधे एकी आणण्याचे प्रयत्न केले असते तर आज राजकारणात (राजकारण करण्यात नाही) खूप पुढे गेले असते..

मी पैज मारून सांगतो प्रकाश आंबेडकर ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष उत्पन्न करू पाहताहेत.

भारतातले सारे राजकिञ संघर्ष ब्राह्मण वि. ब्राह्मण असेच असतात.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2018 - 3:37 pm | श्रीगुरुजी

कोरेगाव-भीमा येथील तथाकथित विजयाचं (?) श्रेय महारांना देताना त्याआधी फक्त १ महिना बाळाजी नातूने फितुरी करून अलुपिष्टन साहेबाला शनिवारवाड्यावर इंग्रजांचा झेंडा लावायला मदत करून पुण्यातून पेशव्यांना पळवून लावलं होतं हे का विसरलं जातं? बाळाजी नातूलाही श्रेय दिलं पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2018 - 11:02 pm | श्रीगुरुजी

भीमा कोरेगाव हिंसाचार: एटीएसकडून नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या सात जणांना अटक

भीमा कोरेगाव येथील हिंसाचार व नंतर 'बंद'मधील जाळपोळ ही पूर्वनियोजित होती याला दुजोरा मिळालेला आहे.

https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-ats-arrested-7-people-h...

हायला काय तत्परता पोलिसांची आणि गृहमंत्रांची? मानले बुवा.
मला पण तोच संशय होता. नक्षलवादीच सापडणार भीमा कोरेगाव भीमा प्रकरणी.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2018 - 11:20 pm | श्रीगुरुजी

अरेरे, तुमची निराशा झालेली दिसतेय.

विशुमित's picture

13 Jan 2018 - 11:47 pm | विशुमित

नाही हो. तुमचा गैरसमज होतोय. मला उलट आनंद झाला आहे कार्यतत्परता बघून.

चौकटराजा's picture

16 Jan 2018 - 2:09 pm | चौकटराजा

प्रकाश आम्बेडकरांचे राजकीय पुनर्वसन अशक्य आहे. भारतातील दलित आता अनेकानी वाटून घेतले आहेत.

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2018 - 2:57 pm | श्रीगुरुजी

आपली राजकीय इनिंग आता कायमची संपली आहे यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही किंवा कळून वळत नाही.

उदा. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, शौरी, शरद पवार, आंबेडकर, राज ठाकरे, देवेगौडा, लालू, मुलायम, शरद यादव, करूणानिधी, मणीशंकर, दिग्विजय इ.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2018 - 12:43 pm | श्रीगुरुजी

भिडे, एकबोटेंना अटक न झाल्यास पुन्हा हिंसाचार

म्हणजे आधीचा हिंसाचार कोणी केला याचीच ही कबुली आहे.

यांची अजून काही मुक्ताफळे -

- उमर खलिद याला देशद्रोही ठरवणे म्हणजे स्वत:ला न्यायमूर्ती ठरवण्यासारखे होईल (परंतु यांनी स्वतःच न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसून
कोरेगाव-भीमा येथील व उर्वरीत महाराष्ट्रातील हिंसाचाराला भिडे-एकबोटे यांना आधीच जबाबदार ठरविले आहे आणि ते कोणत्याही पुराव्याशिवाय व खटल्याशिवाय).

- भारतात प्रत्येक राज्यात असे हाफीज सईद आहे.

- हिंदू संघटना हाफिज सईदला ‘रोल मॉडेल’ मानायला लागल्या आहेत.

- भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारास संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे जबाबदार असून, दोघांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, सरकार या दोघांना पाठीशी घालत आहे. त्यांना अटक करावी, अन्यथा पुन्हा हिंसाचार उफाळून परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील

- महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर पोलिसांनी ‘शोध मोहीम’ राबवून कार्यकर्त्यांची धरपकड केली. खरे तर पोलिसांना अशी मोहीम राबवण्याचा अधिकार नाही

गामा पैलवान's picture

17 Jan 2018 - 7:25 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

प्रकाश आंबेडकर नामे दिवटा काय म्हणतो ते मनोरंजक आहे. म्हणे भिडे गुरुजी गुन्हेगार आहेत कारण पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश तसं म्हणतो. च्यायला, याच कृष्णप्रकाशच्या जीपवर सांगलीत शहीद बेपारी पाकिस्तानी झेंडा फडकावत नाचला होता. मुंबईत २०१२ साली रझा अकादमीची दंगल झाली तेव्हा हाच कृष्णप्रकाश दंगेखोरांसोबत व्यासपीठावर उपस्थित होता. आणि भिडे गुरुजी म्हणे सईद हाफिज. याला म्हणतात उंदराला मांजर साक्षी.

धन्य झालो आम्ही हे ऐकून. प्रकाश आंबेडकर म्हणजे दिव्याखाली अंधार आहे.

आ.न.,
-गा.पै.

१९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर याच प्रकाश आंबेडकरांनी अशी मागणी केली होती की भारताने अणुचाचणी केल्याबद्दल पाकिस्तानला २००० कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी कारण भारतामुळे पाकिस्तानला सुद्धा खर्चिक अणुचाचणी करावी लागली.

महात्मा गांधीजींचं अ‍ॅडवान्सड व्हर्जन दिसतो हा माणूस. ते फाळणीच्या काळातले ५५ कोटी रुपये किमान पाकच्या अधिकृत वाट्याचे तरी होते. हा बाबा आपण आयेनेस कलावरी कमिशन केली तेव्हा पाकला आपण त्याहून सुसज्ज ५-६ पाणबुड्या फुक्कट देऊनच मग कलावरी समुद्रात उतरावयची इ इ म्हणाला असेल. याच्या डीफेन्स रिलेटेड कमेंट्स ट्रॅक करायला पाहिजेत. मज्जा येईल. शिवाय युद्धाच्या वेळी अजून जवळून ट्रॅक केला पाहिजे. मंजे भारत पाक युद्धावेळी भारताने लाहोरवर एक अणूबाँम्ब टाकला तर (भारतानेच) दोन अणुबाँम्ब मुंबईवर (एक कुलाबा, एक अंधेरी) टाकले पाहिजेत असा आग्रह असेल. शिवाय यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आता संघ/भाजप जेव्हा बंद पुकारतील तेव्हा यांची पार्टी ३ जानेबारीची नुकसानभरपाई म्हणून सढळ हाताने मदत करेल असं वाटतं.
----------------------
मला वाटलेलं फक्त नेहरूंकडेच नातू, पंतू निर्बुद्ध निघालेत. पण हा तर कहरच आहे. प्रकाश आंबेडकरांचं "रा स्व संघास खुले पत्र" नावाचं एक आर्टीकल वाचलं होतं. ते खूप छान, लॉजिकल, इंप्रेसिव, अभ्यस्त, नि आवश्यक असं होतं. त्यातले अनेक प्रश्न मला पण होते. संघावाल्यांनी त्याचं उत्तर कुठं दिलेलं दिसलं नाही. आणि हा सन्नाटा मला आवडला नव्हता/नाही. तेव्हापासून प्रकाशरावांना एक मोठे विचारवंत मानून फार काहि फॉलो केलं नाही. पण आता या माणसाला थोरल्या आंबेडकरांचं वलय काढून पहायला हवं असं जाणवतंय.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2018 - 7:51 pm | श्रीगुरुजी

>>> तेव्हापासून प्रकाशरावांना एक मोठे विचारवंत मानून फार काहि फॉलो केलं नाही.

हे तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी, निधर्मी, मानवतावादी, विचारवंत देशासाठी अत्यंत घातक आहेत.

बंदच्या दिवशी शेकडो बसेसचं, वाहनांचे नुकसान झाले, लाखो मनुष्यतास वाया गेले, पोलिसांच्या लाठीमारात एका तरूणाला प्राण गमवावे लागले, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण?

ते मार्मिक गोडसे कुठे आहेत? त्यांना महाराष्ट्रात नोटबंदीच्या वाया गेलेल्या तासांचे मूल्य आणि त्या बंदच्या आसपास वाया गेलेल्या तासांचे मूल्य इ इ गणिते व्यवस्थित जमतात.

यांनी जंगजंग पछाडूनसुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांना नावडणारे हिंदू पक्ष सत्तेवर आलेत. पुरस्कार परतीची नाटके करून झाली, विकासाला वेडा ठरवून झाले, पाकिस्तानची मदत मागून झाली, शिक्षण-पदव्यांची उठाठेव करून झाली . . .

न्यायपालिका बुडवून झाली, लोकशाही धोक्यात आणून झाली.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गूढ आहे तसेच पुणे-शिरूर रस्त्यावरील कोरेगावाचेही आहे. ज्या ठिकाणी ब्रिटीश आणि एतद्देशीयांमध्ये ज्या लढाया झाल्या त्यांचा इतिहास त्यांनी दगडावरती कोरला आणि त्या लढाईमध्ये त्यांच्या बाजूने जे सहभागी आणि हुतात्मा झालेल्यांच्या नावाने स्मारक उभे केले. असेच एक स्मारक सध्या ‘भीमा कोरेगाव या नावाने ओळखले जाते. महार समाजातील मंडळी याला हा आपला गौरवशाली इतिहास आहे असे संबोधतात. याचे कारण, कोरेगावाला पेशवाईने सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या माथी गाडगे आणि मडक्याच्या प्रथेचा अंत केला.

इति प्रकाश आंबेडकर.
https://rightangles.in/2017/12/31/battle-of-koregaon/
या वर कोणीतरी दिलेल्या लिंकेतून.
===============
युद्धातल्या विजयामुळं एक सामाजिक प्रथा संपली?????????नक्की?????????
असंच असतं तर या विजयामुळं अस्पृश्यता अख्ख्या ब्रिटिश भारतात संपली असती. शेवटी महार जिंकले म्हणून त्यांच्या विरुद्धच्या मडक्याच्याच प्रथेचा अंत झाला? मडक्याच्या प्रथेपेक्षा देखील जाचक अशी सामाजिक बंधनं तशीच राहिली? याला काय अर्थ आहे? घरी अन्न बनवायचं नाही, सवर्णांचे निरोप देत बसायचं, सवर्णांच्या कडे खाली बसायचं, शेती करायची नाही, उद्योग करायचा नाही, ढोर ओढायचं, गावकुसाबाहेर राहायचं, इ इ हे सगळं तसंच नि फक्त मडकं त्यागलं?

arunjoshi123's picture

17 Jan 2018 - 4:10 pm | arunjoshi123

पेशवाईचा झेंडा उतरून ब्रिटीशांचा युनियन जॅक (झेंडा) हा शनिवार वाड्यावर फडकवला आणि यानंतर भारतामध्ये एकही स्वतंत्र राज्य राहिले नाही, तर सर्वजण ब्रिटीशांचे मांडलिक झाले.

शीख सार्वभौम होते १८५६ पर्यंत.
===============

या समूहातील भावूक व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला कोरेगावाला भेट देत असत असे म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब एकदाच या ठिकाणी येवून गेले.

तरीच. थोरले आंबेडकर असली प्रथा चालू नाही करणार.
=================

कोरेगावाच्या लढाईमध्ये ब्रिटीशांना आपली मदत होईल आणि ब्रिटीशांचे राज्य भारतावरती पूर्ण होवून जाईल याची जाणीव अस्पृश्य, महार समाजाला होती की नाही हे संशोधन झाल्याशिवाय कळणार नाही.

आणी

आज जशी अस्पृश्य आणि महार समूहाची मानसिकता आहे, तीच त्याच वेळीसुद्धा असेल असे मला वाटते. पेशवाईच्या विरोधात लढतांना ब्रिटीशांना मदत होईल आणि त्याबदल्यात ब्रिटिशांकडून आपल्या सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्याची हमी करारनाम्यामार्फत करून घेतली पाहिजे अशी जाणीव तत्कालीन अस्पृश्य समाजात दिसत नाही.

आज तरी ब्रिटिशांचे राज्य देखील आल्याचा विशाद करायला हरकत नाही.
----------
तत्त्कालीन समाजात ही हमी इ नव्हती म्हणता तर मग आज कशाचं कौतुक साजरं करताय? मंजे ते सैनिक म्हणून लढले. तुमच्या सामाजिक स्टफची त्यांना त्यावेळी काही माहिती नव्हती. पण इष्टापत्ती म्हणून त्याचा चांगला सामाजिक (नि वाईट राजकीय ) परिणाम झाला. मग त्या सैनिकांचं सामाजिक बदलासाठी काहीही योगदान नव्हतं असं झालं ना हो? फार तर फार शौर्याचं कौतुक आज करता येईल. पण हे कौतुक पोरसच्या विरोधात अंभीचं केल्यासारखं होइल. जाणिवपूर्वक सामाजिक बदलासाठी काई केलं असतं तर ठिक होतं.
=============================

कोरेगावाची लढाई सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारी एक लढाई आहे. या धार्मिक गुलामगिरीला/मनुवादी व्यवस्था, राजेशाहीचा वरदहस्त असणारी ही व्यवस्था कायमस्वरूपी संपवली ही या लढ्यातील सर्वात जमेची बाजू आहे.

१. त्या ब्रिटिशांकडे आजही राजेशाही आहे. तेव्हा तर होतीच.
२. ब्रिटिश दलित आणि सर्वण यांना एकसमान प्रकारे अस्पृश्य/दलित/नीच/खालचे इ इ मानत. याचा तांत्रिक अर्थ ते दलितांत आणि सवर्णांत भेद करत नसत असा होत असला तरी ते दलितांना त्यांच्या समान मानत हा नविनच इतिहास होईल.
३. इतिहासात ज्या प्रकारे जिथे जिथे भारतीय संस्कृतीचा स्पर्श नव्हता तिथे तिथे ब्रिटिशांनी वंशविच्छेद केला. अन्यत्र वंशांना गुलाम केलं. भारताची संस्कृती अन्य देशांप्रमाणे असती तर इथेही हेच झालं असतं.

१९९० पर्यंत कोरेगाव स्तंभाला फार कमी लोक भेट देत. १९९० साली कार्यक्रमाला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या वर्षापासून लष्कराने येवून सकाळी मानवंदना द्यायला सुरुवात केली.

कि निवृत्त अधिकार्‍यांनी?
=================

नंतरच्या दोन वर्षातच कोरेगावाचा स्तंभ १ जानेवारी हा सर्व फुटीरवादी, विभक्तवादी, व्यक्तिवादी दलालांचा राजकीय परवाने नूतनीकरण करण्याचा अड्डा झाला.

हे प्रकाशजींना देखील मान्य दिसतं. मला ज्या कारणांनी हा अड्डा आवडला नाही, अंशतः त्याच कारणांनी प्रकाशजींना पण आवडत नाही हि सुखाची बाजू आहे.
======================

ज्या बेबंदशाहीने, निर्लज्जपणाने स्वतःच्या राजकीय व्यभिचाराचे समर्थन तिथे येऊन केले जाते त्यातून भीमा कोरेगावातल्या शूरवीरांना त्यागाबद्दल आम्ही बक्षीस देत नाही.

आंबेडकर या लेखात या उत्सवाला विरोध करणारांबद्दल काहीच बोलले नाहीत. ज्यांनी हा उत्सव घाणेरडा बनवला आहे, त्यांच्यावर टिका केली आहे.
त्यांचा हा लेख आणि त्यांची टीवीवरची भाषणं, मुलाखती दोन ध्रुव दूर आहेत. काय म्हणावं काय कळत नाही.

पैसा's picture

17 Jan 2018 - 9:31 pm | पैसा

त्यांचा हा लेख आणि त्यांची टीवीवरची भाषणं, मुलाखती दोन ध्रुव दूर आहेत. काय म्हणावं काय कळत नाही.

लिहून देणारे वेगळे असतील.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Jan 2018 - 10:19 pm | घाशीराम कोतवाल १.२

१९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर याच प्रकाश आंबेडकरांनी अशी मागणी केली होती की भारताने अणुचाचणी केल्याबद्दल पाकिस्तानला २००० कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी कारण भारतामुळे पाकिस्तानला सुद्धा खर्चिक अणुचाचणी करावी लागली.

ह्या विधानाचा काहि माहितिचा स्त्रोत उपलब्ध होइल काय काय आहे एकाला रेफ्रेन्स द्यायचा आहे

बबन ताम्बे's picture

17 Jan 2018 - 10:59 pm | बबन ताम्बे

माझ्या आठवणीप्रमाणे अखिलेश यादवांचे तीर्थरूप असे म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर असे म्हणाले होते का आठवत नाही.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2018 - 11:10 pm | श्रीगुरुजी

संदर्भ शोधतोय. १९९८ ची बातमी असल्याने संदर्भ मिळण्याची खात्री नाही. मुलायम व प्रकाश आंबेडकर या दोघांनीही अशी मागणी केल्याचे वृत्तपत्रात वाचलेले आठवते.

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 10:54 am | सुबोध खरे

प्रकाश आंबेडकरांच्या बेफाट वक्तव्यापेक्षा त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया जास्त बोलक्या आहेत.
दुसरे डॉ बाबासाहेब निर्माण करू शकले नाहीत यापेक्षा असला दळभद्री माणूस बाबासाहेबांचा नातू असावा हे डॉ बाबासाहेबांचे दुर्दैव जास्त मोठे आहे.