भुबनेश्वर

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
2 Jan 2018 - 10:24 am

भुबनेश्वर किंवा त्रिभुबनेश्वर ही ओडिशा राज्याची राजधानी स्वातंत्र्यानंतर झाली. अगोदर कटक होती ती महानदीच्या बेटावर असल्याने जागा अपुरी पडू लागली. ब्रिटिशांनी ही भुबनेश्वरची जागा नियोजित करून बांधायला घेतली. रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात जुने शहर होते तिथूनच कटक - पुरी रस्ता(NH 203) जातो. पश्चिम भाग हा नवीन भाग. इथे तीन किमिवर विमानतळ, पाच किमिवर मोठा बस स्टँड आहे.( NH 5 ) रस्ते मोठे आणि दोन्ही बाजूस सुंदर इमारती दिसतात. साठ किमिवरच्या जगन्नाथपुरी आणि कोनार्क येथे जाण्यासाठी हे मुख्य शहर असले तरी भुबनेश्वरला स्वत:चे असे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व होतेच. ती सर्व माहिती विकिलेखांत सापडेल.

डिसेंबरमध्ये केलेल्या पुरी यात्रेच्यावेळी इथले स्थळदर्शन झाले त्याचे थोडक्यात फोटो आणि माहिती देत आहे. पुढे कोणास जाताना टुअर नियोजनास थोडीफार उपयोगी पडेल अशी आशा आहे. भुबनेश्वर -पिपली - साक्षीगोपाल - पुरी - कोनार्क - परत अशी कार हायर करणारे बरेच आहेत.
प्रमुख स्थळे, अंतर
१) उदयगिरी - खंडगिरी
स्टेशनपासून सहा किमि. समोरासमोरचे दोन डोंगर आहेत. अंदाजे १५० मिटरस उंच. इ०पू०दुसय्रा शतकापासूनच्या गुंफा,शिलालेख. जैन,बौद्ध आणि हिंदू लेणी. तीन ते सहा संध्याकाळी उत्तम वेळ. पिकनिक स्पॅाटच होतो. NH 5 रस्त्यावर बरमन्डा चौकपाशी मोठा आंत राज्य बस स्टँड आहे. तिथून दीड किमीवर खंडगिरी चौक सिग्नल लागेल. या आतल्या रस्त्यावर दोनशे मिटरसवर डावीकडे खंडगिरी आणि उजवीकडे उदयगिरी डोंगर आहे.
२ ) धौली
कलिंग विजयानंतर अशोकाने येथे बौद्ध धर्म स्विकारला. पुरी रस्त्यावर आठ किमिवर आहे.
३ ) नंदनकानन प्राणी संग्रहालय
उत्तरेस वीस किमिटरस कटकजवळ.

४ ) बिंदुसागर तलाव आणि परिसर मंदिरे
स्टेशनपासून अडीच किमिवर जुन्या गावात.

५ ) म्यूजियम
स्टेशनपासून १ किमि कल्पना चौक, बिंदुसागर अगोदर. काही चांगल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
बिंदुसागर तलाव आणि त्याभोवती पसरलेली पन्नासेक मंदिरे सातव्या ते तेराव्या शतकांतील आहेत. यांमध्ये लिंगराज मंदिरात आणि अनंत बसुदेवमध्ये पूजा होते. लिंगराज भव्य आहे. अनंत बसुदेव अगदी बिंदुसागरसमोरच आहे.
६ ) चिलिका सरोवर
शंभर किमि दक्षिणेस.
पिपली, नंदनकानन आणि धौली येथे गेलो नव्हतो.
चिलिका सरोवर येथून शंभर किमि दक्षिणेस आहे. हिवाळ्यात येथे स्थलांतरीत पक्षी येतात. या नावाचे स्टेशनही आहे. सरोवर सत्तर किमि लांबीला आहे आणि रेल्वे ,इस्टकोस्ट हाइवे बाजूनेच जातो. इस्टकोस्ट एक्स्पप्रेस (१८६४६) येथून पहाटे पाचवाजता जात होती तेव्हा अतिशय दुर्गंधी येत होती. कशामुळे माहित नाही. पाणपक्षी पाहायचा उत्साह कमी झाल्यामुळे चिलिका वगळले.

फोटो १ ) भुबनेश्वर - बिंदुसागर तलाव _अ

फोटो २ )बिंदुसागर तलाव_ब

फोटो ३ )अनंत वसुदेव मंदिराचा सिंह, मागे दिसणारा लिंगराज मंदिर कळस

इथला कृष्ण मथुरेचा कृष्ण आहे तो बलराम सुभद्रेसह.

फोटो ४ )अनंत वसुदेव मंदिराचा कळस/शिखर.

फोटो ५ )उडिशा देवळाची संपूर्ण रचना ( कल्याण,नाट्य,भोगमंडप आणि देऊळ असे चार भाग असतात) पाहायला मिळते.मंदीर रचना

फोटो ६ )अनंत वसुदेव मंदिराच्या भोगमंडपात असे हारे नेतात त्यात भात,डालमा,भाज्यांची मडकी असतात. भोग ठेवतात तेव्हा अर्धा तास मंदिर बंद असते.

बिंदुसागर तलावाभोवती पसरलेली सर्व शंकराचीच मंदिरे आहेत, त्यासमोरच असलेले अनंत वसुदेव मंदिर हे एकमेव विष्णू मंदिर आहे. मूर्ती पुरीच्या जगन्नाथासारख्या आहेत. गर्भगृहसोडून फोटो काढू देतात. गर्दी अजिबात नसते. अवश्य पाहा. लिंगराज मंदीर हे भुबनेश्वरातले महत्त्वाचे आहे पण मंदिरात फारनरना प्रवेश नाही. आवारात इतर छोटी मंदिरे आहेत.

फोटो ७ )नकाशा, भुबनेश्वर - बिंदुसागर तलाव - आसपासची मंदिरे . परशुरामेश्वर मंदिराबाहेरच्या भिंतीवर.

फोटो ८) परशुरामेश्वर मंदीर, भुबनेश्वर

फोटो ९) कार्तिकेय, परशुरामेश्वर मंदीर. वरच्या शिल्पपट्टीत कोणती कथा असावी?

फोटो १० )शिवपार्वती , परशुरामेश्वर मंदीर, भुबनेश्वर.

फोटो ११ )गंधर्व, परशुरामेश्वर मंदीर, भुबनेश्वर

मंदिरे पाहण्याचा क्रम -
मुख्य मंदिरे
१) अनंत वसुदेव - उडिया मंदिराची छोटी प्रतिकृती. फारनर आत जाऊ शकतात. फोटो काढता येतात. हे अगदी बिंदुसागर तलावासमोरच आहे.
२)लिंगराज - मोठे पुजा होणारे देऊळ. फोटोग्राफी बंदी.
३) कोटितिर्थेश्वर छोटा तलाव/कुंड.
४) स्वर्णजलेश्वर - शिल्पे आहेत शिखरावर.
५)परशुरामेश्वर - छान शिल्पे.,६)सिद्धेश्वर आणि ७) मुक्तेश्वर - सुंदर एकाच आवारात आहेत.
८) राजारानी. हे थोडे दूर आहे. मुक्तेश्वरपासून पंधरा मि चालत.
९)भास्करेश्वर आणि १०) ब्रह्मेश्वर ही दोन राजारानीपासून थोडी पुढे आहेत.
११) यामेश्वर आणि वेताळ देऊळ ही बिंदुसागर तलावापलिकडे.
बरेच पर्यटक फक्त लिंगराज मंदिर पाहातात.

फोटो १२)
मुकुटेश्वर /मुक्तेश्वर. तलाव आणि तोरण असलेले छोटेसे खुप सुंदर.

फोटो १३)/मुक्तेश्वर/मुकुटेश्वरचे तोरण प्रवेशद्वार

फोटो १४)राजारानी मंदिर. ( यास पंधरा रु तिकिट आहे.)

फोटो १५)उदयगिरीची पाटी

फोटो १६) उदयगिरीची वानरसेना. वानरे त्रास देत नाहीत.

फोटो १७)उदयगिरी हत्ती

फोटो १८)उदयगिरीची शिल्पपट्टिका १/३

फोटो १९)उदयगिरीची शिल्पपट्टिका २/३

फोटो २०)उदयगिरीची शिल्पपट्टिका ३/३

फोटो २१) खरवेला शिलालेखाची प्रतिकृती

फोटो २२)भुबनेश्वर म्युझियम.

फोटो २३)म्युझियममधील पट्टचित्र १

फोटो २४)म्युझियममधील पट्टचित्र २

फोटो २५)म्युझियममधील पट्टचित्र ३, जगन्नाथ सुभद्र,बलराम.

फोटो २६) कोणार्क. सूर्यमंदीराचे एक चाक

फोटो २७ ) कोणार्क सूर्यास्त

इतर ऐतिहासिक, पर्यटन उपयुक्त माहिती अवश्य लिहा.

प्रतिक्रिया

श्रीधर's picture

2 Jan 2018 - 12:52 pm | श्रीधर

+1

श्रीधर's picture

2 Jan 2018 - 12:52 pm | श्रीधर

+१

समर्पक's picture

3 Jan 2018 - 4:16 am | समर्पक

भुवनेश्वर शहरात एकाम्र-हाट : क्राफ्ट मार्केट : अत्यंत दर्जेदार कलाकुसरीच्या वस्तू मिळण्याची जागा. सरकारने इथल्या ग्रामीण-शहरी-वनवासी सगळ्याच कलाकारांना उत्तम बाजारपेठ इथे बनवून दिली आहे. ओडिशाचे ताड-पत्रावरील कोरीव काम, पिपलीचे रंगीत कापडी कंदील, वारली सारखी सावरा आदिवासी चित्रकला, ढोकरा पितळी दिवे व मुर्त्या, अद्वितीय कलाकुसरीच्या रेशमी बोम्बकाई, बिचित्रपुरी व पसापाल्ली साड्या, संबळपूर सिल्क आणि सुती साड्या, टसर रेशीम व साध्या रेशमाची सुरेख जरीकाठी सोवळी, संगमरवरी दगडातील कोरीव मूर्ती व डबे हे विशेष उल्लेखनीय. येथील मूर्तिकला फार विशेष आहे, शहराच्या आसपास अनेक शिल्पशाला असून उच्च दर्जाची आणि त्या तोलाची किंमत असणारी सुरेख शिल्पे लाईफ साईज आकारापर्यंत मिळतात, वाहतूक आणि किंमत जमत असेल तर जरूर जाऊन घेण्याइतकी विशेष.

वरील उल्लेखित मंदिरांबरोबरच राजाराणी मंदिराच्याच रस्त्यावर आणखी पुढे पूर्वेकडे शिल्पकलेचा अधिक खजिना : भास्करेश्वर व मेघेश्वर मंदिरे. व थोडे दक्षिणेस ब्रह्मेश्वर मंदिर. एकेकाचे बांधकाम तासनतास कौतुक करत पाहाव असं आहे. ओडिशा च्या मंदिरांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नागशिल्पे व कामशिल्पपट.

पाहण्यासारखे फार नसले तरी ऐतिहासिक महत्वाचे ठिकाण, शिशुपालगढ. मौर्यकालीन किल्ल्याचे अवशेष व कदाचित भारतातील सर्वांत जुना शिल्लक असलेला किल्ला अशी त्याची महती, विषयात रस असलेल्यांनी जरूर भेट द्यावी. लिंगराज मंदिरापासून फार लांब नाही, पूर्वेकडे नदीच्या किनाऱ्यावर.

कटक : शहरात बाराबाती किल्ला व परिसरातले कटकचंडी चे शक्तीपीठ पाहण्यासारखे आहे. त्याशिवाय जवळच धवलेश्वर नावाचे महानदीतील बेटावरील एक स्थान फार सुंदर आहे. फारसे माहितीतले नसल्याने गर्दी नसते. इथे महानदी दुभंगून पुढे त्रिभुज प्रदेश निर्माण करत पूर्वसमुद्राला मिळते, महानदीच्या विस्तीर्ण पात्रातून नावेने प्रवास हा वेगळाच अनुभव!

जाजपूर : थोडे उत्तरेकडे हे लहानसे शहर, विरजा/बिरजा देवीचे स्थान. ५१ शक्तिपीठांपैकी व त्यातही विशेष महत्वाच्या शक्तिस्थानांपैकी एक.

माहितीत भर आवडली. भारतात पर्यटक यादीत पुरी असते परंतू भुबनेश्वरसाठीही दोन दिवस वेगळे ठेवतील ही अपेक्षा आहे.
इथे सिटीबस सर्विस अपुरी,असमाधनकारक आहे.ओटोवाले फारच पैसे मागतात - दोन किमिसाठी शंभर रु. राजारानी मंदिरपासून खंडगिरी सहा किमि आहे मोठ्या पुलावरून परंतू ६०३ नंबरच्या बसने चांगले पंधरा किमि फिरवून उत्तरेच्या पुलावरून नेले त्यात बराच वेळ वाया गेला.रेल्वे स्टेशनवर वेगळा पादचारी पुल नाही त्यामुळे पटकन इकडून तिकडे जाण्यासाठी प्लॅटफाम तिकिट काढावे लागते.भास्करेश्वर,मेघेश्वर,ब्रम्हेश्वर ही तीनही मंदिरे ( लोनली प्लॅनिट पुस्तकात दिली आहेत.फारनर पुस्तकाच्या पानांच्या फोटोकापी घेऊनच फिरतात.)बघायची राहिली.

प्रचेतस's picture

3 Jan 2018 - 8:45 am | प्रचेतस

भारी माहिती.
मंदिरे मिश्र नागर शैलीतील आहेत. भुवनेश्वर संग्रहालयातली चामुंडेची मूर्ती अद्वितीय.

दुर्गविहारी's picture

3 Jan 2018 - 11:04 am | दुर्गविहारी

अतिशय उत्तम धागा. ओरिसाला गेलेले माझ्या माहितीत फारसे कोणी नाही. पण तुमच्या या धाग्यामुळे चांगली ओळख झाली. समर्पक यांचा प्रतिसादही अतिशय उत्कृष्ट.

पगला गजोधर's picture

3 Jan 2018 - 1:33 pm | पगला गजोधर

१+
वा खु साठवण्यात आलेली आहे.

ओदिशा पर्यटनावर सुधीर कांदळकर यांनी नऊ भागांत लेखन केले आहे २०१३मध्ये त्यापैकी नवव्या भागाची लिंक-

ओदिशा - ९ अंतिम: भुवनेश्वरची दोन वस्तुसंग्रहालये | मिसळपाव लिंक:http://www.misalpav.com/node/25890

अगोदरच्या भागाच्या लिंक्स त्यामध्येच आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2018 - 12:04 am | डॉ सुहास म्हात्रे

दुर्लक्षित आकर्षणाची ओळख आवडली !

मंदीरांच्या बहिर्भागाचे कोरीवकाम अप्रतिम आहे ! मुख्य म्हणजे ते आजतागायत उत्तम अवस्थेत शिल्लक राहीले आहे.

निशाचर's picture

4 Jan 2018 - 3:44 am | निशाचर

छान धागा. समर्पक यांचा प्रतिसादही आवडला.

मागच्याच आठवड्यात भुवनेश्वर मध्ये होतो आणि पुन्हा निघालो आहे.
माहिती मध्ये आणखी भर.
पुरी आणि लिंगराज मंदिराला भेट दिली. अप्रतिम ...!!
या भेटीत सुदर्शेन शिल्पशाळेला धावती भेट दिली होती. गावातील नवनिर्मित मारुतीच्या मंदिरासाठी बजरंगीबलीची सॅण्ड स्टोन मधील मूर्ती घेण्याचा मानस आहे.
अफलातून शिल्प आहेत तिथे. अवश्य भेट देण्या योग्य ठिकाण आहे.
संपर्कात आलेले भुबनेश्वरचे सगळे लोक आवडले.

विशुमित, पुन्हा जात आहात तर उदयगिरीवरचा खरवेला याचा जो इ०पू दुसय्रा शतकातला शिलालेख आहे १७ ओळींचा त्याचा फोटो मिळाल्यास आणा. मी त्याची माहिती असलेल्या तीन पाट्या पुरातत्त्वाने लावल्या तो फोटो घेतला पण मूळ फोटो राहिला.

विशुमित's picture

13 Jan 2018 - 10:11 pm | विशुमित

क्षमा करा कामाचे वेळापत्रक खूप व्यस्त असल्यामुळे उदयगिरीला जाण्यासाठी वेळ मिळणे कठीण दिसतंय.

कंजूस's picture

14 Jan 2018 - 4:59 pm | कंजूस

हो.
त्या खरवेला शिलालेखाचा स्पष्टपणा कालाच्या आघाताने धूसर झाल्याने पुरातत्त्व खात्याने तिथे एका ठिकाणी लेखन पाट्या लावल्या आहेत॥ परंतू त्यासुद्धा उन्हापावसात उघड्याच ठेवल्याने पुसट झाल्या. संगमरवर फारच लवकर झिजते. लेख १७ ओळींचा होता.
पाटी १

२) पाटी २

३) पाटी ३

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2018 - 7:38 am | सुधीर कांदळकर

सुस्पष्ट आणि रेखीव प्रतिमा आवडल्या. आपल्या चष्ष्म्यातून दिसलेले ओदिशा वाचायला आवडेल.

या ट्रिपमध्ये वरंगळ येथे थांबून पाहिले तो लेख आहे - काकतियांचे वरंगळ.
भुबनेश्वरची मंदिरे मला फार आवडली. पुरी आणि कोणार्क जाऊन परत आलो. पुरीसाठी भाविकपणा हवा. कोणार्क मंदीररथावर बरीच कामशिल्पे आहेत आणि ती {माझ्या मते} खजुराहोपेक्षा सुंदर आहेत. चेहरे आनंदी आहेत.

खेडूत's picture

13 Jan 2018 - 8:08 am | खेडूत

केवळ सुरेख!

चौकटराजा's picture

13 Jan 2018 - 8:30 pm | चौकटराजा

सुमारे २२ वर्षापूर्वी पुरी कोनार्क व भुवनेश्बर असा सुवर्णत्रिकोण पुरा केला होता. धौली नंदनकानन पुरीचा सोनेरी किनारा सारे आठवले. नंदनकानन मधे आमच्या गाडी शेजारून वीसेक सिंह रस्त्याने आरामात जाताना पाहिलेत .आपले फोटो उत्तम. कंका , नुकताच मोढेरा, पाटण करून आलो आहे.