मतमोजणीपूर्व धागा: गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुक-२०१७

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
12 Dec 2017 - 2:35 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

गुजरातमध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान १४ डिसेंबरला होईल. हिमाचलमध्ये मतदान नोव्हेंबर महिन्यातच पार पडले आहे. दोन्ही राज्यात मतमोजणी १८ डिसेंबरला होईल. एक्झिट पोलचे निकाल १४ (किंवा १५) तारखेला येतील. ते निकाल यायच्या आत नेहमीप्रमाणे मतमोजणीपूर्व धागा प्रकाशित करत आहे. एक्झिट पोलचे निकाल यायच्या आतच हा धागा प्रकाशित करत आहे कारण नाहीतर एक्झिट पोलचे निकाल बघून काही प्रमाणात बायस्ड व्हायची शक्यता आहे.

माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल. तर हिमाचल प्रदेशात भाजप ४० ते ४५ तर काँग्रेस २० ते २५ जागा जिंकेल. मी निवडणुकांच्या निकालांचे अंदाज गेल्या अनेक वर्षांपासून वर्तवत आलेलो आहे. काही वेळा ते बरोबर आले आहेत. तर काही वेळा ते चुकलेही आहेत. तेव्हा या धाग्यात सर्वच शक्यतांचा विचार करून त्याचे नक्की काय परिणाम होतील यावर माझे मत मांडणार आहे.

गुजरात
गुजरातमधील निवडणुक ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता मार्च १९९५ पासून सतत भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे लोकांमध्ये 'भाजप फटिग' आला असल्यास त्याचा उपयोग करून निवडणुक जिंकायची यापेक्षा मोठी संधी काँग्रेसला मिळणार नाही.

तरीही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची एकूणच देहबोली आणि त्यांनी केलेल्या गोष्टी यावरून काँग्रेसला ही निवडणुक जिंकायची खात्री नाही असे वाटायला लागले आहे. राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्ष बनणार ही बातमी गेल्या साडेचार-पाच वर्षात कित्येक वेळा आली होती. पण प्रत्येकवेळी या बातम्या म्हणजे वावड्याच सिध्द व्हायच्या. पण यावेळी मात्र राहुल गांधी दिवाळीच्या आसपास नक्कीच अध्यक्ष बनणार असे काँग्रेसच्या नेत्यांनीही म्हटले. राहुल गांधींनी गुजरात निवडणुकांची तयारी बर्‍याच आधीपासून सुरू केली होती. अशावेळी निवडणुकांच्या तारखांची घोषणा व्हायच्या आधीच त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेऊन मग गुजरातमध्ये विजय मिळाल्यावर लोकांनी राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारले असा प्रचार करायची नामी संधी काँग्रेसकडे होती. तसे त्यांनी केले नाही. याचे कारण तसे करणे ही एक दुधारी तलवार होती. जर निवडणुकांपूर्वी राहुल अध्यक्ष झाले असते आणि पराभव झाला असता तर मग राहुलचे नेतृत्व लोकांनी नाकारले असे म्हणायलाही जागा राहिली असती. अध्यक्षपद नंतर स्विकारायचे तर जर गुजरातमध्ये पराभव झाल्यास त्यानंतर लगेच अध्यक्षपद स्विकारणेही अप्रशस्त होईल. आता राहुल गांधींची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांनी अध्यक्षपद स्विकारायची तारीख १६ डिसेंबर म्हणजे गुजरातमधील मतदान झाल्यावर पण निकाल लागायच्या आधी अशी ठरवली गेली आहे. यावरून मला तरी वाटते की मुळातच काँग्रेसला निवडणुक जिंकायची खात्री नाही. अन्यथा आधी अध्यक्षपद स्विकारून विजय झाल्यावर त्याचा अर्थ राहुल गांधींचे नेतृत्व लोकांनी स्विकारले असा प्रचार करायची संधी काँग्रेसनी नक्कीच सोडली नसती.

दुसरे म्हणजे गुजरात काँग्रेसकडे स्वतःचा खमका नेताच राहिलेला नाही. एक शंकरसिंग वाघेला होते. ते कितपत लोकप्रिय होते, पूर्ण राज्यात मते ते फिरवू शकले असते का वगैरे प्रश्न आहेतच. पण त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करायचा उदंड अनुभव होता आणि संघटना कौशल्यही त्यांच्याकडे होते. त्यांची मागणी होती की पंजाबमध्ये अमरिंदरसिंगांना जसे स्वातंत्र्य दिले गेले तसे आपल्याला द्यावे. पण तसे केले असते तर इतर नेते-- अर्जुन मोडवाढीया आणि भरत सोलंकी नाराज झाले असते.त्यामुळे वाघेलांना स्वातंत्र्य दिले गेले नाही. त्यातूनच ते नाराज झाले आणि पक्षाबाहेर पडले. आजही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिलेला नाही. विरोधी पक्षांनी लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर भाजपचा जोरदार पराभव करता येतो हे दिल्ली आणि बिहारच्या अनुभवावरून समजतेच. पण काँग्रेसकडे असा कोणी लोकप्रिय चेहराच नाही ही समस्या आहे. आणि आता हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटावर विसंबून राहायची वेळ कॉंग्रेसवर आली आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला स्वतःचा एकही नेता मिळू नये आणि बाहेरच्या त्रिकूटावर विसंबून राहायची वेळ येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

असो. आता बघू विविध परिस्थितींमध्ये काय परिणाम होऊ शकतील.

परिस्थिती १: भाजप १५०+, काँग्रेस २० ते २५
अमित शहा भाजपला १५० पेक्षा जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. तसे झाल्यास देशाच्या राजकारणावर भाजपपेक्षाही नरेंद्र मोदी यांची पकड किती घट्ट झाली आहे याचे ते द्योतक असेल.

डिसेंबर २०१३ मधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी योगेन्द्र यादव म्हणाले होते: "१९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्याला आपला पंतप्रधान निवडायचा आहे असे समजून मतदार विधानसभा निवडणुकांमध्ये मत देत असत. पण १९८० च्या दशकाच्या शेवटापासून आपल्याला आपला मुख्यमंत्री निवडायचा आहे असे समजून लोकसभा निवडणुकांमध्ये मत द्यायला मतदारांनी सुरवात केली." म्हणजे १९५२ पासून १९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत भारतीय राजकारणाचा पहिला टप्पा होता आणि १९८० च्या दशकाच्या शेवटपासून दुसरा टप्पा सुरू झाला. मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात मोदींनी सर्व विरोधकांना एकहाती झोपवल्यानंतर आपण परत एकदा पहिल्या टप्प्याकडे जात आहोत का हा प्रश्न नक्कीच उभा राहिला. एप्रिल २०१७ मध्ये दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालावर परत एकदा योगेन्द यादव यांनीच म्हटलेली एक गोष्ट द्यायचा मोह आवरत नाही. ते म्हणाले होते: "मतदार घराबाहेर पडले त्यांचा स्थानिक नगरसेवक निवडायला. पण त्यांनी प्रत्यक्षात मते दिली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बाजूने".

गुजरातमध्ये भाजपने १५०+ जागा जिंकल्या तर आपण परत भारतीय राजकारणातील पहिल्या टप्प्याकडे गेलो आहोत असे म्हणायला हवे. त्या परिस्थितीत मोदींची अगदी 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा बनेल. राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अगदी सुरवातीलाच 'प्रथमग्रासे मक्षिकापात:' होईल. तसेच निवडणुक जिंकायची असेल तर लोकांना विकता येण्याजोगा (सेलेबल) एक कार्यक्रम आणि एक लोकप्रिय नेता पुढे आणणे गरजेचे आहे, आपले नेते सोडून आयत्या वेळी बाहेरच्या त्रिकूटाला बरोबर घेऊन निवडणुक जिंकता येऊ शकणार नाही हे राहुल गांधींना समजायला हवे. शेवटी अशी जातीपातींवर आधारीत आवाहने करून निवडणुक जिंकणे हे १९९० आणि २००० च्या दशकातले गणित झाले. मोदी-शहांनी गेल्या काही वर्षात हे सगळे गणित बदलून टाकले आहे.तेव्हा या बदललेल्या गणिताला सामोरे जाऊन निवडणुकांसाठी आखणी करायला हवी हा धडा राहुल गांधींना मिळेल.

भाजपला असा जोरदार विजय मिळाला (म्हणजेच हार्दिक प्रभृतींचा पराभव झाला) तर त्याचा एक फायदा चांगला होईल. इतर राज्यांमध्ये असे कोणी हार्दिक उभे राहणार असतील तर लोक त्यांना महत्व देत नाहीत हे लक्षात येऊन त्या प्रक्रीयेला पायबंद बसायला मदत होईल.

भाजपने (खरे तर मोदींनी) गुजरातमध्ये एवढा मोठा विजय मिळवला तर त्याचे २०१९ वर काय परिणाम होऊ शकतील? एक तर मोदींना हरवायला म्हणून सगळे विरोधक एकत्र यायची शक्यता वाढेल. त्या विरोधकांच्या आघाडीला मोदींचे भाजपमधील पक्षांतर्गत विरोधक (यशवंत सिन्हा, अडवाणी इत्यादी) खुलेपणाने किंवा पडद्याआड मदत करतील. १९७१ ची लोकसभा निवडणुक इंदिरा गांधी विरूध्द इतर सगळे अशी झाली होती. त्याप्रमाणेच २०१९ ची लोकसभा निवडणुक नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे अशी होईल ही शक्यता आणखी वाढेल. सगळे विरोधक एकत्र आले तर त्या आव्हानाला मोदी कसे परतवून लावतात हे बघायचे. (त्या दृष्टीनेच बिहारमध्ये नितीशकुमारांना विरोधी पक्षांमधून फोडून आपल्या बरोबर घ्यायची खेळी हा एक मास्टरस्ट्रोक होता असे मला वाटते).

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या आधी पुरस्कारवापसी, वाढती असहिष्णुता वगैरे गोष्टींवरून पुरोगाम्यांनी मोठा हलकल्लोळ उठवला होता. आता ती शस्त्रे बोथट झाली आहेत त्यामुळे परत ती शस्त्रे वापरता येणार नाहीत. पण पुरोगामी दुसरा कुठलातरी मार्ग शोधून सर्वत्र-- मिडिया, सोशल मिडिया वगैरे ठिकाणी मोठा आवाज उठवतील हे नक्कीच. तसेच काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी ऐन डोकलाम प्रश्न जोरात असताना चीनी वकिलाला भेटले होते. मागच्या आठवड्यात मनमोहन सिंग आणि मणीशंकर अय्यर पाकिस्तानी हायकमिशनरला भेटले. ही चिन्हे बरी दिसत नाहीत. आपले मोदींपुढे चालत नाही हे बघून काँग्रेसने पाकिस्तान, चीन असल्या परकीयांची मदत घ्यायचा प्रयत्न अधिक जोरात केला तर ते फारच धोक्याचे ठरेल.

असा मोठा विजय मिळाल्यास भाजपच्या दृष्टीने आणखी एक धोक्याची घंटा वाजेल. तशी ती आधीपासूनच वाजायला लागली आहे पण त्या घंटेचा आवाज आणखी मोठा होईल. भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी चंडीगडमध्ये हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विकास बराला नामक दिवट्या चिरंजीवाने एका मुलीचा पाठलाग करायची घटना घडली होती. मी भाजप प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे, माझे कोण काय वाकडे करणार असा काहीसा आविर्भाव त्याचा होता. लोकांचे मोदींविषयीचे मत चांगले असले तरी अशा घटना वारंवार व्हायला लागल्या तर लोक मोदी या एका नावावर किती वर्षे मत देणार हा प्रश्नही उभा राहिलच. काहीही झाले तरी 'लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलीटी' कधी चुकत नसतो. ती मार्जिनल युटीलिटी अधिक वेगाने कमी करायचे काम असले माजलेले लोक करायला लागले तर ती भाजपसाठी धोक्याची घंटा असेल. तसेच भाजप जिंकत आहे म्हटल्यावर इतर पक्षांमधली फालतू मंडळी भाजपमध्ये येऊ बघतील. आसामात सरबानंद सोनोवाल या चांगल्या माणसाला पक्षात घेतले हे चांगलेच झाले. पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या लोकांना, उत्तराखंडमध्ये विजय बहुगुणासारख्यांना पक्षात घेण्याविषयी तेच बोलता येणार नाही. अटकपूर्व जामीन असतो त्याप्रमाणे 'अटकपूर्व भाजप प्रवेश' हा घातक पायंडा पडायला नको. अशा लोकांना पक्षात घेतल्यामुळे नंतर अडचणी वाढतील आणि लोकांचा विश्वास कमी होईल.

परिस्थिती २: भाजप ११५-१५०, काँग्रेस २०-६०
ही दुसरी परिस्थिती म्हणजे भाजपला राज्यात मागच्या वेळेपेक्षा मोठा विजय मिळेल ही आहे. या परिस्थितीत वर दिलेल्या पहिल्या परिस्थितीप्रमाणेच परिणाम (काहीशा कमी तीव्रतेने) होतील.

परिस्थिती ३: भाजप ९५ ते ११५ , काँग्रेस ६० ते ८५ आणि परिस्थिती ४: भाजप ६० ते ८५ , काँग्रेस ९५ ते ११५
यातील तिसर्‍या परिस्थितीत भाजपला विजय मिळेल पण तो मागच्या वेळेपेक्षा कमी असेल. तांत्रिकदृष्ट्या भाजपच जिंकेल पण भाजपची 'ऑथोरिटी' मात्र नक्कीच कमी झाली आहे असे चित्र उभे राहिल. आणि चौथ्या परिस्थितीत तर भाजपचा पराभवच होईल.

तरीही मोदींची लोकप्रियता या परिस्थितीतही कायम असेलच आणि त्याचा भाजप २०१९ मध्ये फायदा करून घेईलच. युपीए-१ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसचा उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, बंगाल, बिहार या राज्यांमध्ये पराभव झाला होता पण २००९ मध्ये परत युपीएचेच सरकार सत्तेत आले होते. आतापर्यंत मोदी सरकारच्या कार्यकाळात भाजपने अनेक विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. तेव्हा एका राज्यात यश कमी मिळाले किंवा अगदी पराभव जरी झाला तरी २०१९ मध्ये त्याचा फार फरक पडणार नाही. तरीही मोदींच्या राज्यातच भाजपचा पराभव करणे ही काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांसाठी मोठी उत्साहवर्धक घटना असेल. काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांना मात्र मोदी आता परतीच्या मार्गावर आहेत असा प्रचार करायची संधी मिळेल.

काँग्रेसने या निवडणुकांमध्ये स्वतःचा नेता पुढे न आणता हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटावर आणि त्यांच्या जातीपातींच्या गणितावर विसंबून राहून काँग्रेसने यश मिळवले तर ती धोक्याची घंटा असेल. कारण इतर राज्यांमध्येही असेच जातीपातींचे राजकारण खेळायचा प्रयत्न केला जाईल. भविष्याकडे वाटचाल करताना जातीपातींचे राजकारण मागे सोडायचे सोडून जर त्यावरच भर देण्यात येणार असेल तर आपण परत १९९० च्या दशकातील घाणेरड्या राजकारणाकडे वाटचाल करू हा सगळ्यात मोठा धोका या परिस्थितीत उद्भवेल.

चौथ्या परिस्थितीत जर भाजपचा पराभव झाला तर तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जाईल. पण त्यातूनच काँग्रेसला आपण पुनरागमन करायच्या मार्गावर आहोत असा समज होऊन २०१९ मध्ये सर्व विरोधकांची आघाडी उभी करायच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस अधिक आक्रमकपणे बार्गेन करेल आणि त्यातून प्रस्तावित आघाडीपुढे संकट उभे राहू शकेल ही पण शक्यता आहेच. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १९७ जागा जिंकल्या होत्या त्यावेळी तो काँग्रेसचा मोठा पराभव मानला गेला होता. पण २००९ मध्ये त्यापेक्षा थोड्याच जास्त म्हणजे २०६ जागा जिंकल्यावर तो काँग्रेसचा नेत्रदीपक विजय वगैरे मानला गेला होता. तेव्हा थोडेसे यश मिळाले तर आपले आभाळाला हात टेकले आहेत हा समज काँग्रेसचा व्हायची शक्यता आहेच.

तसेच या निवडणुकांमध्ये काँग्रेसने काही प्रमाणात सॉफ्ट हिंदुत्व वापरले. राहुल गांधींनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. जर तिसर्‍या किंवा चौथ्या परिस्थितीप्रमाणे निकाल लागले तर या सॉफ्ट हिंदुत्वाचा उपयोग होतो असा अर्थ काढला जाऊन १९८० च्या दशकात इंदिरा आणि राजीव गांधींनी ज्याप्रमाणे 'हिंदू अपीजमेन्ट' करायचा प्रयत्न केला होता त्याची पुनरावृत्ती काँग्रेसकडून व्हायची शक्यता आहे. यातून पुढे मुस्लिम मते समाजवादी पक्ष, राजद यांच्यासारख्यांकडे जातील ही शक्यता आहे. ती एम.आय.एम कडे जाणार नाहीत हीच इच्छा आणि अपेक्षा.

हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय व्हायची शक्यता त्यामानाने बरीच कमी आहे. तर भाजपच जिंकायची शक्यता जास्त. फक्त जागा किती मिळणार हा प्रश्न असेल. तेव्हा हिमाचलमध्ये मी वेगवेगळ्या शक्यता न घेता एकच शक्यता--- भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव ही ध्यानात घेत आहे. काँग्रेसनेही हिमाचलकडे फार लक्ष दिले नव्हते आणि सगळी शक्ती गुजरातवरच केंद्रित केली होती. तेव्हा हिमाचलमध्ये जिंकू ही अपेक्षा स्वतः काँग्रेसवाल्यांची नाही असे दिसते.

हिमाचल हे फार मोठे राज्य नाही आणि देशाच्या राजकारणावर त्याचा विशेष परिणाम होतही नाही. तरीही हिमाचलमध्ये पराभव झाल्यास काँग्रेसच्या हातात केवळ पंजाब आणि कर्नाटक (आणि गुजरातमध्ये जिंकल्यास गुजरात) ही मोठी (१० पेक्षा जास्त लोकसभा जागा असलेली) राहतील. त्यातही गुजरातमध्ये विजय झाल्यास काँग्रेसला मोठाच दिलासा मिळेल. पण गुजरातमध्येही जिंकता आले नाही आणि हिमाचलही गेले ही परिस्थिती काँग्रेससाठी फार उत्साहवर्धक नसेल. भाजपच्या दृष्टीने हिमाचलमध्ये विजय मिळाला (किंवा मिळाला नाही) तरी त्याचा फार फरक पडणार नाही.

दोन्ही राज्यांमधील एकत्रित परिस्थितीवर भाष्य
वर म्हटल्याप्रमाणे माझ्या मते भाजपला गुजरातमध्ये १३० ते १३५ तर हिमाचलमध्ये ४० ते ४५ जागा मिळतील. म्हणजे माझ्या मते दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव होणार आहे.

वर म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने सगळी शक्ती गुजरातवर केंद्रित केली होती आणि हिमाचलकडे त्यामानाने दुर्लक्ष केले होते. गुजरातमध्ये राहुल गांधींनी जो प्रचार केला त्यात नोटबंदी आणि जी.एस.टी विरूध्द त्यांनी रान उठवले होते. जी.एस.टी ला गब्बर सिंग टॅक्स असेही राहुल गांधी म्हणाले होते. जर काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला तर नोटबंदी आणि जी.एस.टी या मुद्द्यांचा फार उपयोग होणार नाही हे स्पष्ट होईल. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत जी.एस.टी च्या अंमलबजावणीमधील अडचणी नक्कीच दूर झाल्या असतील. तेव्हा अजून १६-१७ महिन्यांनी या मुद्द्यांचा रेलेव्हन्स काहीही राहणार नाही. असहिष्णुतेच्या मुद्द्यात टीव्हीवर चर्चा करणारे, मोठेमोठे विचारवंत इत्यादी मूठभर मंडळी सोडली तर ९९% भारतीयांना फार रस होता असे वाटतही नाही. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळी ते शस्त्र आधीच वापरून झाले आहे. आता त्याचा परत उपयोग करायला गेले तर तो प्रयोग नक्कीच फसेल.तेव्हा २०१९ मध्ये मोदींना नक्की कोणत्या मुद्द्यावरून घेरायचे हा प्रश्न विरोधकांपुढे नक्कीच पडेल.

आपले या मुद्द्यांवर मत काय? तसेच माझ्या हातून कुठचा मुद्दा निसटला असल्यास तो लक्षात आणून द्यावा ही विनंती.

असो. आता वाट बघत आहे १८ डिसेंबरची.

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

12 Dec 2017 - 3:59 pm | महेश हतोळकर

माझे पैसे गुजरातच्या पहिल्या शक्यतेवर.
प्लॅन बराच पुढचा वाटतोय.

पगला गजोधर's picture

12 Dec 2017 - 4:07 pm | पगला गजोधर

निकाल काहीही लागो, कृपया भावनेच्या भरात वैयक्तिक कमेंट्स टाळा, दोन्ही राष्ट्रीय पक्षांना शुभेच्छा...

माझा अंदाज बीजेपी 95, काँग्रेस+ 85

जयहिंद

निकाल काय लागेल तो लागेलच, पण भाजप गुजरात मधे हरलेले मला बघायला आवडेल. आवडणार्‍या प्रत्येक गोष्टी होतच नाहीत म्हणा.
पण मोदींचे केंद्रातले आणि फसवणिसांचे महाराष्ट्रातले सरकार कुठल्याच आघाडिवर जमिनीवर दिसतील असे बदल करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांना धक्का बसणे गरजेचे आहे, कदाचित उरलेल्या दिड वर्षात काम करतील

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडुन यायचे आणि केंद्रात, राज्यात पूर्ण सत्ता असताना काहिही कारवाई न करणे हे समजण्यापलिकडे आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Dec 2017 - 5:43 pm | मराठी कथालेखक

शेअर मार्केटमध्ये थोडी पडझड होईल पण त्याकडे "गुंतवणू़क वाढवायची संधी असं"ही बघता येईल.

इरसाल's picture

12 Dec 2017 - 4:54 pm | इरसाल

कॉग्रेसजनांची रॅली जात होती, त्यात उभे असलेल्या उमेदवाराचे घोषवाक्य होते" मारा वडोदरा मने पाछु आपो".
बडोद्याचे जुन्याकाळातील वैभव ( ???) परत मिळवण्यासाठी मलाच मत द्या. अस पण अजुन काय बदल करणार दोन्ही पक्ष कोण जाणे.
बडोद्यामधे भाजप आणी कॉग्रेस यांना व्यवस्थितरित्या ट्क्कर देवु शकेल असा एक (राष्ट्रीय समाज पक्ष) उमेदवार आहे राजेश आयरे म्हणुन, बाकी काही असो, माणुस कोणालाही कधीही अडल्यानडल्या वेळी मदतीला उभा असतो. (स्वानुभव नाही, पण प्रत्यक्ष पाहिलेले.)

रामदास२९'s picture

12 Dec 2017 - 4:56 pm | रामदास२९

माझ्या मते

गुजरात
भा.ज.पा - १०५-११०
काँग्रेस - ७०-७५

हिमाचल प्रदेश
भा.ज.पा - ४०-४५
काँग्रेस - २०-२५

अनुप ढेरे's picture

12 Dec 2017 - 5:07 pm | अनुप ढेरे

हिमाचल प्रदेशला राहुल द्रवीडसारखं वाटत असेल असा जोक आलेला कायप्पावर.

babu b's picture

12 Dec 2017 - 5:24 pm | babu b

भाजपा १०० जागा का जिण्कणार यापेक्षा काँग्रेस हरण्यास कशी योग्य आहे , यावरच पूर्ण लेख उभा आहे.

असो.

काँग्रेस शंभरी गाठावी

आणि भाजपाच्या शंभरीची सुरुवात व्हावी .

ही आमची अपेक्षा.

पावनं, तुमी भाजपला ८२ जागा दिवलालाव. आक्रितच की.

babu b's picture

13 Dec 2017 - 6:26 pm | babu b

काँग्रेस शंभरी जिंकून तिथेच उभे रहावी, असे कुठे म्हटले मी ? त्यापलीकडेही जाईल की

किती पुडं? डायरेक १८२? का अजूनही पुढं? भाजप ०? समद्याचं डिपॉझिट जप्त? भाजपवर बॅन? कमळ एंडेंजर्ड स्पेसिसमधे? निर्वाचन आयोग काँग्रेसमधे सामील?
======================
जरा नक्की कुठे थांबायचं आहे ते सांगता का?

babu b's picture

13 Dec 2017 - 6:43 pm | babu b

इतकं याक्युरेट सांगायला मी दातार भटजी किंवा साळगावकर गुरुजी वाटलो का ?

पारावरचा ममद्या बोलायचं मनून कायबी ठोकून देतो तसं ठोकून द्या. ते त्येला बी माईत र्‍हातंय आन गन्याला बी माहित र्‍हातंय कि बेफाल्तूक हाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच सुंदर, समतोल, सारासार विवेकी विश्लेषण !

१. भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे.

लोकसभेच्या निवडणूकीतील विजयापासून विरोधकांपेक्षा जास्त याच लोकांचे बोलणे-चालणे मोदी/भाजप साठी मोठा धोका ठरला आहे. अश्या लोकांचा बंदोबस्त करणे हेच मोदींसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. २०१९ च्या निवडणूकीसाठी, नाठाळ लोक टाळून, योग्य उमेदवार निवडण्याइतकी ताकद जमा झाल्याशिवाय या मानसिकतेचा बिमोड होण्याची शक्यता दिसत नाही. सद्यातरी भाजपला (उप्र सोडून) बहुतेक ठिकाणी आकडेमोडीचे राजकारण करणे भाग पडते आहे असे दिसत आहे... गुजरातसारख्या मोदींच्या घरच्या आणि म्हणूनच मानाच्या राज्यामध्ये तरी ते करायला लागू नये असा त्यांचा जोरदार प्रयत्न असणारच.

२. भारताचे उघड शत्रू/विरोधक असलेल्या पाकिस्तान/चीन/फुटीरतावाद्यांशी सतत गुप्त घरोबा करणे, प्रथम ते माध्यमांत छातीठोकपणे नाकारणे आणि एकदोन दिवसांत माध्यमांत ते उघडपणे स्विकारायला भाग पडणे... कितीही हताशपणा (डेस्परेशन) आला तरी असले आतताई उद्योग काँग्रेस का करत आहे हे, तेच सांगू शकतील ! असे वागणे त्यांच्या अंगाशी आल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण, या वागण्याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होत असेल हे सांगायला फार बुद्धिमत्तेची गरज नाही.

३. काँग्रेसने सुरुवात चांगली केली होती. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटाच्या मदतीने आणि जीएसटीबद्दलच्या असंतोषाचा फायदा घेऊन काँग्रेस भाजपावर मात करू शकेल असे वातावरण निर्माण केले होते. मात्र, नंतर युतीतील रुसवेफुगवे उघड्यावर आल्यने त्यातली हवा कमी झाली. तसेच वरच्या मुद्दा क्रमांक २ आणि इतर काँग्रेसी नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांनी (या बाबतीतही भाजपशी चढाओढ ?!) वातावरण बरेच गढूळ केले आणि स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारण्याचे काम केले.

४. रागांची मंदीरयात्रा पाहून इंदीराजींच्या बालाजीमंदीरभेटींची आठवण आली... मोठा फरक असा की त्यांच्या भेटी केवळ निवडणूकींपुरत्या नव्हत्या ! शिवभक्त आणि जानवेधारी रागांच्या माध्यमातल्या प्रसिद्धीने चांगलीच करमणूक केली. "जनता उल्लू आहे आणि तिला काहीही स्टंट करून आपण फसवू शकतो" ही मानसिकता राजकारण्यांच्या मनात अजूनही घट्ट रुजलेली आहे हेच याने दिसून आले. जनता राजकारण्यांपेक्षा जास्त विकसित आहे आणि राजकारण्यांनी "सद्यकाळात जागे व्हायची" गरज आहे. :)

५. गेल्या काही दिवसांत, विशेषतः काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती येणार याची खात्री झाल्यानंतर, रागांच्या बोलीत आणि देहबोलीत लक्षणिय सकारात्मक फरक दिसत आहे. तो टिकवून ठेवला तर, हा केवळ भाषणचे लेखक आणि सार्वजनिक भाषणांचे प्रशिक्षक बदलल्याचा परिणाम नाही असे होईल... आणि काँग्रेससाठी ते सकारात्मक होईल.

६. एकंदरीत पाहता, भाजपला बहुमती विजय (११७+) मिळेल असे वाटते. पण काही काळ (आणि अजूनही निकाल लागेपर्यंत) काँग्रेसने भाजपची हवा टाईट केली आहे/होती, आणि तीही मोदींच्या गृहराज्यात, यात वाद नाही ! याकरताच, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची माध्यमातली दिखाऊ वक्तव्ये सोडता, इतर कोणीच छातीठोकपणे निकालाची खात्री देत नाही. (या लेखातही निकालाच्या तीन शक्यता द्याव्या लागल्या आहेत.)

दोलायमान होत राहिलेली ही निवडणूक दोन्ही पक्षांना जड गेलेली आहे आणि मोठे धडे देऊन गेलेली आहे... व तिच्यापासून घेतलेले बोध (घेतलेच तर !) त्यांना भविष्यात केवळ गुजरातच्याच नव्हे तर भारतभरच्या राजकारणात उपयोगी ठरतील.

गॅरी ट्रुमन's picture

12 Dec 2017 - 9:03 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद डॉक्टरसाहेब.

१. लोकसभेच्या निवडणूकीतील विजयापासून विरोधकांपेक्षा जास्त याच लोकांचे बोलणे-चालणे मोदी/भाजप साठी मोठा धोका ठरला आहे.

नक्कीच. अजून पर्यंत मोदींवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांची लोकप्रियता टिकून आहे असे चित्र आहे. पण असले उपटसुंभ लोक मात्र त्यात अडचणी निर्माण करू शकतील.

२. भारताचे उघड शत्रू/विरोधक असलेल्या पाकिस्तान/चीन/फुटीरतावाद्यांशी सतत गुप्त घरोबा करणे, प्रथम ते माध्यमांत छातीठोकपणे नाकारणे आणि एकदोन दिवसांत माध्यमांत ते उघडपणे स्विकारायला भाग पडणे

काँग्रेस जे काही करत आहे ते संशयास्पद आहे हे नक्कीच. राहुल गांधी डोकलाम प्रकरण जोरात असताना चीनी वकिलाला भेटले. सुरवातीला काँग्रेस पक्षाने अशी कुठलीही भेट झाल्याचेच नाकारले. पण नंतर चीनी दुतावासानेच अशी भेट झाल्याचे उघड झाल्यावर त्यांना मान्य करावेच लागले. तीच गोष्ट मनमोहनसिंगांच्या बाबतीत झाली. अशी कोणती भेट झाल्याचे सुरवातीला काँग्रेसने नाकारले पण नंतर मात्र मान्य करावे लागले. मुळात असे गुप्तपणे भेटणे, अशी भेट झाल्याचे नाकारणे आणि मग स्विकारणे आणि वर 'मग त्यात काय झाले' असा आविर्भाव आणणे यात काही संशयास्पद आहे हेच अनेक सुशिक्षित मंडळींना मान्य असल्याचे दिसत नाही. बहुदा मोदीद्वेषात ते पुरते आंधळे झाल्यामुळे या प्रकरणी काँग्रेसची चूक आहे हे लक्षात न घेता उलटा मोदींना प्रश्न विचारत आहेत. आपल्या नशीबाने भारतात सुशिक्षित लोकांची संख्या त्यामानाने कमी आहे. सुशिक्षित समाजातून अशा अनाकलनीय प्रतिक्रिया सोशल मिडियावर (फेसबुक, ट्विटर इत्यादी) येत आहेत त्यामुळे भविष्यात मोदीही इंदिरा गांधींप्रमाणे सुशिक्षित लोकांना हिंग लावून विचारणार नाहीत हा धोका गेल्या वर्ष-दिड वर्षापासूनच जाणवायला लागला आहे.

३. काँग्रेसने सुरुवात चांगली केली होती.

याविषयी भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवर जनरल जानेवारी आणि फेब्रुवारी हा एक जबरदस्त लेख आला आहे. भाऊंनी दुसर्‍या महायुध्दातील रशियाचे उदाहरण दिले आहे. सुरवातीला हिटलरच्या सैन्याने रशियात बरीच खोलवर मजल मारली होती. पण नंतर रशियातील हाडे गोठविणार्‍या थंडीमध्ये जर्मन सैन्याचे हाल झाले. इतक्या आत घुसलेल्या जर्मन सैन्याला रसदपुरवठा करणे कठिण होऊन बसले आणि जर्मन सैन्याचा पराभव झाला त्यात हे मोठे कारण होते. हिटलरने रसदपुरवठा कसा होणार याची तजवीज न करता रशियात आतपर्यंत मजल मारली ही त्याची चूक झाली. भाऊंच्या मते राहुल गांधींनी बर्‍याच आधीपासून गुजरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आणि गुजरातमध्ये दौरे आणि सभांचा धडाका लावला पण मोदींच्या गोटातून फार हालचाल झाली नाही याचे कारण मोदी-शहांनी राहुल गांधी आणि टिमला अती उत्साहात चुका करून स्वतःलाच गोत्यात आणायची संधी दिली. मग ते युथ काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलवरून मोदींना चायवाला म्हणणे असो, मणीशंकर अय्यरनी मोदींना नीच म्हणणे असो की मनमोहनसिंगांनी पाकिस्तानी राजदूताला भेटणे असो. प्रतिस्पर्धी व्हल्नरेबल झाला असे दिसल्यावर मोदींनी मोठा हल्ला चढवला. या डावपेचांचा उपयोग काय होतो हे १८ तारखेलाच समजेल.

रामदास२९'s picture

12 Dec 2017 - 9:12 pm | रामदास२९

गॅरी ट्रुमन, डॉ सुहास म्हात्रे - सुन्दर आणि माझ्या मते तरी निष्पक्ष, समतोल, सारासार विवेकी विश्लेषण

माझ्या मते, राहूल गान्धीन्नी मुद्दे प्रथम बरोबर उठवले होते पण नन्तर जी.एस.टी मधे सरकारने सुधारणा करून त्यातील हवा काढून टाकली.

राहूल गान्धीन्चा ग्रुहपाठ नेहमीप्रमाणे कमी पडला, त्यामुळे त्यान्नी प्रथम आरोपान्ची राळ उठवली पण भा.ज.पा ने शेवटी सोमनाथ भेटीची नोन्द, जानवेधारी हिन्दू, अय्यर, पाकिस्तानी उच्चायुक्ताशी गुप्त भेट असे मुद्दे ऐरणी वर आणून कुम्पणावरचे मतदार आपल्याकडे वळतील अशी तजवीज केली.

मुळात हार्दिक आणि अल्पेश यान्चे आन्दोलन एकमेकान्च्या विरोधात होते आणि जिग्नेश (ऊना हल्ल्यामुळे माध्यमान्नी मोठा केलेला असल्यामुळे) त्यान्चा प्रभाव किती पडेल यात साशन्कता आहे. कोन्ग्रेस कडे कार्यकर्त्यान्चा बळ नाही त्यामुळे उसने लोका त्यान्ना किती यश देऊ शकतील.

सर्वात महत्वाचा म्हणजे गुजरात सरकार कडून लोकान्च्या अपेक्षा पूर्ण जरी होत नसतील तरी सरकार च्या विरोध जाण्याएव्हढी नाराजी नक्कीच नाही.

माझ्यामते , भा.ज.पा १०५-११० आणि काँग्रेस ७०-७५ पर्यन्त जातील

सुबोध खरे's picture

13 Dec 2017 - 8:07 pm | सुबोध खरे

गॅरी ट्रुमन, डॉ सुहास म्हात्रे - सुन्दर आणि माझ्या मते तरी निष्पक्ष, समतोल, सारासार विवेकी विश्लेषण
+१००
भाजप जिंकले तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मध्ये घोटाळा केल्यामुळे असेल
आणि काँग्रेस जिंकली तर तो लोकशाहीचा विजय असेल हे सर्वानी पक्के ध्यानात ठेवावे.
पण धर्मनिरपेक्ष , पुरोगामी, डावे इ इ लोक सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबद्दल सावध पवित्रा घेत आहेत. कारण न जाणो आज इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मध्ये घोटाळा आहे असे म्हटले आणि उद्या काँग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या तर तोंडघशी पडावे लागेल.

गॅरी ट्रुमन's picture

12 Dec 2017 - 9:44 pm | गॅरी ट्रुमन

गुजरातमधील सर्वच १८२ विधानसभा मतदारसंघांच्या निकालांमध्ये मला रस आहे. पण त्यातल्या त्यात खालील मतदारसंघांमध्ये विशेष रस आहे:

१. जमालपूर-खाडिया

अहमदाबाद रेल्वे स्टेशनजवळच्या परिसरातला हा मतदारसंघ आहे. २००८ च्या पुनर्रचनेपूर्वी हा मतदारसंघ खाडिया या नावाने ओळखला जात होता. मतदारसंघ पुनर्रचनेत खाडिया मतदारसंघामध्ये जवळचा काही भाग जोडला गेला आणि हा मतदारसंघ 'जमालपूर-खाडिया' या नावाने ओळखला जाऊ लागला.

खाडिया मतदारसंघातून १९८० ते २००७ दरम्यानच्या ७ निवडणुकांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भट निवडून गेले होते. त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचा पुत्र भूषण भट जमालपूर-खाडियामधून निवडून गेला.

पुनर्रचना झाल्यानंतर जमालपूर-खाडियामध्ये ६०% पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. या मतदारसंघात २०१२ मध्ये भाजपचा विजय झाला पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार किरीट सोळंकी या मतदारसंघातून पिछाडीला होते. जर या मतदारसंघातून भाजपचा परत विजय झाला तर पुरोगाम्यांच्या नाकाला नक्कीच मिरच्या झोंबतील हे नक्कीच. उत्तर प्रदेशातही देवबंदसारख्या मुस्लिमबहुल मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय झाला होता.पण देवबंदमध्ये सपा-बसपा उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली त्यामुळे ४३% मते मिळून भाजप उमेदवाराचा विजय झाला. तशी परिस्थिती जमालपूर-खाडियामध्ये नाही. तिथे भाजपचे भूषण भट आणि काँग्रेसचे इमरान खेडावाला यांच्यात थेट लढत आहे.

२. राजकोट (पश्चिम)

या मतदारसंघातून भाजपकडून मुख्यमंत्री विजय रूपाणी उमेदवार आहेत तर काँग्रेसने २०१२ मध्ये राजकोट (पूर्व) मधून जिंकलेल्या उद्योगपती इंद्रनील राजगुरू यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ पूर्वी राजकोट-२ या नावाने ओळखला जायचा. या मतदारसंघातून भाजपचे हेवीवेट उमेदवार निवडून आले आहेत. १९८५ ते २०१२ या ६ निवडणुकांमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते वजुभाई वाला निवडून गेले होते. ते अनेक वर्षे गुजरातचे अर्थमंत्री होते. सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत. २००१ मध्ये त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देऊन नव्याने मुख्यमंत्री झालेल्या नरेंद्र मोदींना पोटनिवडणुक जिंकून विधानसभेत जायचा मार्ग मोकळा केला होता. या मतदारसंघातून फेब्रुवारी २००२ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिली निवडणुक जिंकली होती. वजुभाई वाला यांची कर्नाटकच्या राज्यपालपदावर नियुक्ती झाल्यावर त्यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तिथे सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय रूपाणी निवडून गेले.

३. विरमगाम

अहमदाबाद जिल्ह्यातील या मतदारसंघात हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या दोघांचेही वास्तव्य आहे. त्यामुळे या दोघांचा काँग्रेसला कितपत फायदा झाला आहे याचे या मतदारसंघातील निकाल हा बर्‍याच प्रमाणात दर्शक असेल. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला वगैरे नाही. काँग्रेसचे उमेदवारही इथून निवडून गेले आहेत. २०१२ मध्ये काँग्रेसकडून डॉ.तेजश्री पटेल निवडून गेल्या होत्या. मध्यंतरी बरेच आमदार भाजपमध्ये आले त्यात या डॉ.तेजश्री पटेलही भाजपमध्ये आल्या. यावेळी त्या भाजपच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या लाखाभाई हरवड यांच्याविरूध्द निवडणुक लढवत आहेत.

डॉ. तेजश्री पटेल विरमगाममधील एक नामांकित गायनॉकोलॉजिस्ट आहेत. त्यांचे नावही त्या परिसरात चांगले आहे. त्याचा फायदा त्यांना झाला आणि विजय झाला तर तो हार्दिक पटेलला बरोबर घेणार्‍या काँग्रेसला तो धक्का बसेल हे नक्कीच. हार्दिकचे घर असलेल्या मतदारसंघात एक पटेल उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडून जाणे हार्दिकसाठी तितकेसे चांगले नसेल.

श्रीगुरुजी's picture

13 Dec 2017 - 2:57 pm | श्रीगुरुजी

२०१२ मध्ये भाजपने ११५ जागा जिंकल्या होत्या. भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्षाने २ जागा जिंकून अजून ८ जागांवर भाजपचे नुकसान केले होते. त्यांचा पक्ष नसता तर भाजपने १२५ जागा जिंकल्या असत्या.

२०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजप १२५+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ६८ पैकी ५०+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे.

गुजरातमध्ये काँग्रेस जिंकणे किंवा काँग्रेसची परिस्थिती सुधारणे देशासाठी अत्यंत घातक ठरेल. तसे झाले तर १९८० च्या दशकात गुजरातमध्ये खाम या जातीयवादी प्रकाराची पुनरावृत्ती होईल. तसेच ९० च्या दशकात वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या बाटलीचे बूच उघडल्यामुळे त्यातून उ. प्र., बिहारमध्ये मुलायम, लालू, काशीराम इ. जातीयवादी भुते बाहेर पडली याचीच पुनरावृत्ती अल्पेश, जिग्नेश इ. मुळे होईल व तसे होणे देशाला परवडणारे नाही.

श्रीगुरुजी's picture

13 Dec 2017 - 2:57 pm | श्रीगुरुजी

२०१२ मध्ये भाजपने ११५ जागा जिंकल्या होत्या. भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्षाने २ जागा जिंकून अजून ८ जागांवर भाजपचे नुकसान केले होते. त्यांचा पक्ष नसता तर भाजपने १२५ जागा जिंकल्या असत्या.

२०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजप १२५+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ६८ पैकी ५०+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे.

गुजरातमध्ये काँग्रेस जिंकणे किंवा काँग्रेसची परिस्थिती सुधारणे देशासाठी अत्यंत घातक ठरेल. तसे झाले तर १९८० च्या दशकात गुजरातमध्ये खाम या जातीयवादी प्रकाराची पुनरावृत्ती होईल. तसेच ९० च्या दशकात वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या बाटलीचे बूच उघडल्यामुळे त्यातून उ. प्र., बिहारमध्ये मुलायम, लालू, काशीराम इ. जातीयवादी भुते बाहेर पडली याचीच पुनरावृत्ती अल्पेश, जिग्नेश इ. मुळे होईल व तसे होणे देशाला परवडणारे नाही.

babu b's picture

13 Dec 2017 - 5:53 pm | babu b

भाजपाच्या बाटलीतून यक्ष , किन्नर आणि अप्सरा येतात का ?

arunjoshi123's picture

13 Dec 2017 - 6:21 pm | arunjoshi123

एकटा मोदी मोप आहे.

ह्या गांधी लोकांना हाकलून देत नाहीत तोवर काँग्रेस सर्वत्र आपटो. नंतर आलटून पालटून सत्तेत येवो.

रमेश आठवले's picture

13 Dec 2017 - 7:51 pm | रमेश आठवले

शिवसेना आणि आप पक्षां विषयी कोणी भाकीत करेल काय ? हे पक्ष एखादी जागा जिंकतील असे वाटत नाही. पण ते किती जागांवर डिपॉझीट घालवतील या बद्दलचे भाकीत वाचायला आवडेल.

पैसा's picture

14 Dec 2017 - 10:14 am | पैसा

गुजरातमध्ये सुरुवातीला भाजप बॅकफूटवर वाटत होता पण त्याचे कारण राहुल गांधीचा धडाका नव्हे तर काहीसे विरोधात गेलेले पटेल समाजाचे मत होते. काँग्रेसचे लोक ज्या प्रमाणात सेल्फ गोल करत आहेत ते बघून खरे तर वाईट वाटते.

एकूण अधिक उणे बघता फार मोठी उलथापालथ होईल असे वाटत नाही. महागाईच्या मुद्द्यावर निवडणूक निकाल बदलू शकतात पण त्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष का केले हे अनाकलनीय आहे.

इरसाल's picture

14 Dec 2017 - 10:48 am | इरसाल

उदा. एका बंद खोलीमधे काँग्रेस आणी भाजपाला बंद करुन, तिथे, १ रु. ते २००० र. च्या खुपसार्‍या नोटा उधळल्या,
काँग्रेस- जास्तीत जास्त नोटा जमा कराव्या म्हणुन तुटुन पडली नोटांवर
भाजप- कोपर्‍यात उभी राहुन आधी अंदाज घेतला की जास्त मुल्य असलेल्या नोटा कुठे कुठे पडल्यात मग जमा करायला तुटुन पडली.

या भानगडी मुळे त्यांना कुठला मुद्दा घेवु कुठला नको असे झाले असल्याने महागाईचा मुद्दा निसटला असेल.

पैसा's picture

14 Dec 2017 - 11:03 am | पैसा

=)) =))

अमर विश्वास's picture

14 Dec 2017 - 12:29 pm | अमर विश्वास

गॅरी भाऊ व डॉक्टर साहेब उत्तम विश्लेषण ...

माझ्या काही गुजराती मित्रांचे (गुजरात मध्ये राहणारया) मत : इंग्लिश मीडिया दाखवते तेव्हडी भा ज पा ची स्थिती वाईट नाही .... लोक भाजपा वर नाराज आहेत पण ते काँग्रेस ला पर्याय मनात नाहीत ...

माझे स्वतःचे अंदाज
गुजरात : भाजप ११० ते १२० काँग्रेस ६० तो ७०
हिमाचल : भाजपा ४५+

बघूया काय होतंय ते ...

जाताजाता .... शेवटी गुजरात मध्ये हिंदूंचे सरकार येणार ... फक्त ते "जनेऊधारी" हिंदुचे असेल का राममन्दिरवाल्या हिंदूंचे ते तरखेलाच कळेल

फक्त ते "जनेऊधारी" हिंदुचे असेल

मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते काशीमधे पुजा करू लागले. त्यामुळे पुरो लोक भयभीत झाले आयुष्यात हिंदू हजारदा शीवपूजा करत पाहायची सवय असलेल्या मुस्लिमांना सुद्धा कंप सुटावा अशी अपेक्षा करू लागले. तरी तो ओबीसी देवाची पूजा करतोय असा होता.
आता चक्क जानवं-फ्लाँटींग भुटोर्गामी नेते पूजांचा सपाटा लावत आहेत आणि पुरोगामी लोकांना कौतुकाचं पेव फुटलंय.

babu b's picture

14 Dec 2017 - 2:12 pm | babu b

३.५ % मध्ये एक डोके वाढले .. आनंद नाही का झाला तुम्हाला ?

अमर विश्वास's picture

14 Dec 2017 - 2:22 pm | अमर विश्वास

बाबु

आलू ची फॅक्टरी लावणारे डोके काय कामाचे?

babu b's picture

14 Dec 2017 - 2:54 pm | babu b

अविश्वास कुणावर दाखवताय ? त्यांच्या डोक्यावर , जानव्यावर की देवावर ?

एक व्याध शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता , टाइमपास म्हणून वरनं पानं तोडून टाकत होता . खाली शंकराची पिंडी होती म्हणे आणि त्यामुळे त्याला शंकर पावला म्हणे.

तसेच ह्यान्नाही क्षणभर घातलेले जानवे फळेल अन मग तुमास्नी कळेल !

त्यात तुमचे देव तर राक्षस , दैत्य , भुताखेतानाही वाट्टेल ते वर देवून बसतात !

त्यात तुमचे देव तर राक्षस , दैत्य , भुताखेतानाही वाट्टेल ते वर देवून बसतात !

अहो, वाट्टेल ते वर देणं ही एक सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. त्यात देव, दानव सर्व आले. आता नै का पुरोगामी दिग्विजय सिंगांनी ओसामाजींना त्यांच्या जिवितकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
==========================

अविश्वास कुणावर दाखवताय ? त्यांच्या डोक्यावर , जानव्यावर की देवावर ?

त्याच्या डोक्यावर.
==============================

एक व्याध शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता , टाइमपास म्हणून वरनं पानं तोडून टाकत होता . खाली शंकराची पिंडी होती म्हणे आणि त्यामुळे त्याला शंकर पावला म्हणे.

हे देखील सामान्य मानवी के जीवन में ( ते मोदीसायेब मानव न मंता मानवी का मंतात देव जाणो) कॉमन आहे. आपल्याकडे दिल्लीत प्रचंड प्रमाण व्याध्रकार होते नि ते म्हणे खुर्च्यांवर बसून पुरोगामी पिंडींवर (वृत्त)पत्रेच (व्रुत्त)पत्रे अपर्ण करायचे म्हणे. मग त्यांना पुरो नेते प्रसन्न होत. मस्त गाड्या, बंगले, बायका (वा पुरुष), विदेशवार्‍या, इ इ भेट देत. फुक्कट. चालायचंच हो. कुठेपण पत्रे वाहा, कोणी ना कोणी प्रसन्न होतंच.

त्यात तुमचे देव तर राक्षस , दैत्य , भुताखेतानाही वाट्टेल ते वर देवून बसतात !

अहो, वाट्टेल ते वर देणं ही एक सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. त्यात देव, दानव सर्व आले. आता नै का पुरोगामी दिग्विजय सिंगांनी ओसामाजींना त्यांच्या जिवितकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
==========================

अविश्वास कुणावर दाखवताय ? त्यांच्या डोक्यावर , जानव्यावर की देवावर ?

त्याच्या डोक्यावर.
==============================

एक व्याध शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता , टाइमपास म्हणून वरनं पानं तोडून टाकत होता . खाली शंकराची पिंडी होती म्हणे आणि त्यामुळे त्याला शंकर पावला म्हणे.

हे देखील सामान्य मानवी के जीवन में ( ते मोदीसायेब मानव न मंता मानवी का मंतात देव जाणो) कॉमन आहे. आपल्याकडे दिल्लीत प्रचंड प्रमाण व्याध्रकार होते नि ते म्हणे खुर्च्यांवर बसून पुरोगामी पिंडींवर (वृत्त)पत्रेच (व्रुत्त)पत्रे अपर्ण करायचे म्हणे. मग त्यांना पुरो नेते प्रसन्न होत. मस्त गाड्या, बंगले, बायका (वा पुरुष), विदेशवार्‍या, इ इ भेट देत. फुक्कट. चालायचंच हो. कुठेपण पत्रे वाहा, कोणी ना कोणी प्रसन्न होतंच.

arunjoshi123's picture

14 Dec 2017 - 3:21 pm | arunjoshi123

बा बु ब राव,
खालच्या लिंकेत तुम्हा पुरोंची लोकसंख्या कशी आक्रस्ताळेपणाने वाढते आहे हे कळेल. त्याने तुम्हाला हर्षवायू होईल.
https://en.wikipedia.org/wiki/Growth_of_religion#Growth_of_religious_groups

खालची बातमी वाचून तर नवस फेडायला नक्कीच जावे लागेल पुरोगाम्यांना.
https://www.theatlantic.com/international/archive/2015/04/islam-could-be...
==============================
तसा राहुल बाबाने बाप मरते वेळी जानवे घालून फिर्‍या मारल्या होत्या अग्नि देण्यापूर्वी. त्यामुळे त्यात नविन आनंददायक काही नाही. त्यावेळेस ते ३.५% +१ डोके धरले होते. मग ते ३.५% + १ कवटी असे निघाले.
================================
http://www.firstpost.com/politics/woo-brahmins-to-win-prashant-kishor-te...
यावेळी मात्र (विकृत) आनंद झालेला. पुरोगाम्यांनी ब्राह्मणांची चाटूगिरी करावी असे त्यांचा सल्लागार म्हणतो. अरे काय वेळ यावी तुमच्यावर?

तर्री's picture

14 Dec 2017 - 3:04 pm | तर्री

भा. ज.पं. १५० जागा ( सहज) जिंकेल.

मी उत्तर प्रदेश आणि गुजराथ च्या निवडणुकी दरम्यान अमित शहाना ( मोदिन्पेक्षा) जास्त ऐकले आहे. जवळ जवळ सगळी हिंदी भाषणे आणि मुलाखती. त्या माणसाला जनतेची मानसिकता , सांखिकी , रणनीती , जातीपातीची समीकरणे यांचे चांगली समज आहे.
( २००० च्या आणि विशेषत: २००७ च्या गुजरात भाजपच्या विजयात मोदिन्पेक्षा शहा ची रणनीती चा मोठा आहे ( जेरीमानडरिंग आणि anti इनकमबन्सी झेलणे) )

उत्तर प्रदेश निवडणुकी दरम्यान त्यांनी भाजप ३०० जागा जिंकेल असे सांगितले होते पण त्याचा पुढचे वाक्य महत्वाचे होते , एकदा तीनशे जागा जिंकल्या कि वर कितीही जागा येवू शकतात. ( अमित पूर्वी शेअर ब्रोकर होते असे ऐकण्यात / वाचण्यात आले आहे)आणि ती निवडणूक गुजरात पेक्षा खूप कठीण आणि जिकिरीची होती. पठ्ठ्या ४ महिने तळ ठोकून होता. असेच मत त्यांनी आसाम निवडणुकीत केले होते आणि तेथील मुस्लीम मतदाराचा टक्का पाहता हे भाकीत अचूक येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही , कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याची खेळीही नाही.

आता मी आज ते सोमवार पर्यंत काय ( आणि कसे) बोलतात त्यावर लक्ष ठेवून आहे. पण त्यांच्या अप्रोच मध्ये काही बदल होईल असे वाटत नाही.

गुजरातच्या घरच्या मैदानात त्यांचे भाकीत चुकल्यास तो त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाला , मोदींना , भाजपला एक सेट back असेल असे मी मानेन.
येथे १५० म्हणजे १४१ तो १५१ ही रेंज पकडली आहे.

माझा वैयक्तिक अदमास - १६०+

विशुमित's picture

14 Dec 2017 - 4:48 pm | विशुमित

बहूतांशी प्रतिसाद पटला..

सगळ्यात हे वाक्य खूप महत्वाचे आहे.

"""भाजपच्या विजयात मोदिन्पेक्षा शहा ची रणनीती चा मोठा हात आहे"""

या धाग्यावर नेमके शहांना जास्त श्रेय दिले गेलेले दिसत नाही आहे.

babu b's picture

14 Dec 2017 - 6:08 pm | babu b

भाजपाचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात. पुर्वीच्या काळात पोलादी पुरुष खायला अन कविवर्य दाखवायला होते.

विशुमित's picture

14 Dec 2017 - 6:27 pm | विशुमित

खायचे दात पूर्वाश्रमीचे ब्रोकर होते म्हणे. सुपा एवढ्या काना मागच्या डेडळात लय मोठे खेळाडू बसलेत. त्यांचा पैसे हे ब्रोकर दाखवायच्या दातावर लावत आहेत. बाकी काही नाही.
हे लोकांना आता नाही समजणार..

डेडळ म्हणजे? वऱ्हाडी शब्द आहे का हा?

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Dec 2017 - 8:59 pm | हतोळकरांचा प्रसाद

हा तुमच्या द्वेषाचा मुद्दा असू शकतो काय? किंवा...अच्छा हा तुमच्या द्वेषाचा मुद्दा आहे होय?..

भाजपाचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात. पुर्वीच्या काळात पोलादी पुरुष खायला अन कविवर्य दाखवायला होते.

काँग्रेसचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात. पुर्वीच्या काळात मोगरागजरा पुरुष खायला अन पंचापुरुष दाखवायला होते.

श्रीगुरुजी's picture

14 Dec 2017 - 11:37 pm | श्रीगुरुजी

जबरी! अजून एक उत्तुंग षटकार!!!!!!

babu b's picture

14 Dec 2017 - 11:39 pm | babu b

तुम्ही एकच बॉल खेळून गायबलेत की !

पहिल्या हॅपी बर्ड्डेनंतर तुम्ही पुन्हा खेळायला आलेच नै गुरुजी !

श्रीगुरुजी's picture

14 Dec 2017 - 11:49 pm | श्रीगुरुजी

पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सामना जिंकल्यावर पुढे खेळण्याची गरज नसते.

babu b's picture

15 Dec 2017 - 7:05 am | babu b

अग्गोबै ! खरं की काय ?

तुम्ही एकच बॉल खेळून गायबलेत की !

प्रिय बंधू बाबू बी,
तुमची खेळायची सगळी हौस पूर्ण करायला मी आहे की. माझ्यामधे अघोरी पेशंस आहे.
-------------
बाकी तुमच्यासोबत एकच बॉल खेळून जाणं हे गुरुजींचं जैविकदृष्ट्या असममितीय वर्तन मला देखील विचित्र वाटतंय.

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 12:37 pm | श्रीगुरुजी

जन्मजात निर्लज्जपणाला हरविण्यासाठी अघोरी पेशन्स पुरा पडेल का?

शाम भागवत's picture

14 Dec 2017 - 3:43 pm | शाम भागवत

३:०० नंतर मार्केटने उसळी मारली.
भाजपाला भिती नसावी.
ट्फ फाईट झालेली दिसत नाहिय्ये.
भा जपाच्या मागच्यावेळेपेक्षा जागा वाढल्या असाव्यात..

किती ते मात्र नाही सांगता येणार. कारण
तेवढा अभ्यास नाही.

babu b's picture

14 Dec 2017 - 4:23 pm | babu b

बाय ऑन रूमर
सेल ऑन न्यूज

सोमवार लालेलाल !!

शाम भागवत's picture

14 Dec 2017 - 4:51 pm | शाम भागवत

:)

मंदार कात्रे's picture

14 Dec 2017 - 5:53 pm | मंदार कात्रे

TimesNow Exit Polls
Bjp 109
Cong 70

मंदार कात्रे's picture

14 Dec 2017 - 5:54 pm | मंदार कात्रे

Republic TV- C Voter Exit Poll Survey
Bjp 115
Cong 64

SHASHANKPARAB's picture

14 Dec 2017 - 6:14 pm | SHASHANKPARAB

#TCExitPoll Himachal Elections
Vote Forecast
BJP 51% ± 3%
Congress 38% ± 3%
Others 11% ± 3%

SHASHANKPARAB's picture

14 Dec 2017 - 6:16 pm | SHASHANKPARAB

Seat Projection
BJP 55 ± 7 (Plus / Minus 7) Seats
Congress 13 ± 7 (Plus / Minus 7) Seats
Others 0 ± 3 (Plus / Minus 3) Seats

SHASHANKPARAB's picture

14 Dec 2017 - 7:10 pm | SHASHANKPARAB

#TCExitPoll Gujarat Elections 2017
Seat Projection
BJP 135 ± 11 (Plus / Minus 11) Seats
Congress+ 47 ± 11 (Plus / Minus 11) Seats
Others 0 ± 3 (Plus / Minus 3) Seats
33 replies 444 retweets 381 likes
Reply 33 Retweet 444 Like 381

#TCExitPoll Gujarat Elections 2017
Vote Forecast
BJP 49% ± 3%
Congress+ 38% ± 3%
Others 13% ± 3%

गॅरी ट्रुमन's picture

14 Dec 2017 - 7:14 pm | गॅरी ट्रुमन

चाणक्यने गुजरातमध्ये भाजपला १२४ ते १४६ तर काँग्रेसला ३६ ते ५८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशात चाणक्यने एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वात जास्त २८५ जागा दिल्या होत्या. आणि त्यांचा एक्झिट पोल प्रत्यक्ष निकालाच्या सर्वात जवळ होता.

चाणक्यचे गुजरात आणि हिमाचलमधील एक्झिट पोल्सः

गुजरात

हिमाचल प्रदेश

गॅरी ट्रुमन's picture

14 Dec 2017 - 8:01 pm | गॅरी ट्रुमन

आतापर्यंत आलेले सगळे एक्झिट पोल गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार आहे असे म्हणत आहेत. विजय किती मोठा असेल याविषयी वेगवेगळ्या पोल्सचे आकडे वेगवेगळे आहेत पण विजय भाजपचाच असेल यावर सगळ्यांचे एकमत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर सर्व एक्झिट पोल्सचे एकमत असायची ही पहिलीच वेळ असावी. २०१४ मध्ये प्रत्यक्षात निकाल लागले ते चाणक्यच्या अंदाजासारखे लागले होते.

जर हे निकाल प्रत्यक्षात लागले तर भाजपने १९९५, १९९८, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या सहा विधानसभा निवडणुका लागोपाठ जिंकल्या असतील. बंगालमध्ये डाव्या आघाडीने ७ निवडणुका लागोपाठ जिंकल्या होत्या. अलीकडच्या काळात असे दुसरे उदाहरण पटकन आठवतही नाही.

गॅरी ट्रुमन's picture

14 Dec 2017 - 8:18 pm | गॅरी ट्रुमन

यशवंत देशमुखांनी थोड्या वेळापूर्वी आकडेवारी जाहिर केली. त्या आकड्यांप्रमाणे पाटीदार समाजाच्या मतांत काँग्रेसने मोठी आघाडी मिळवली आहे. पाटीदारांमधील विविध गटांमध्ये काँग्रेसने १०% ते २०% इतकी मते मागच्या वेळेपेक्षा जास्त मिळवली आहेत असा अंदाज आहे. पण त्याचवेळी इतर समाजघटकांमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट होण्याचा अंदाज आहे. ती मते भाजपकडे जायचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेसने पाटीदार समाजाकडून बरीच जास्त मते मिळवूनही निकाल फिरायची शक्यता नाही.

यशवंत देशमुखांनी अजून एक इंटरेस्टींग आकडेवारी सादर केली. त्यांच्या मते १८ ते २२ वर्षे वयोगटात काँग्रेसला ४६% तर भाजपला ४३% मते मिळतील आणि जसे वय वाढत जाते त्याप्रमाणे भाजपला मत द्यायचे प्रमाण वाढत जात आहे. हा कल भविष्यात कायम राहिला तर ते भाजपसाठी धोक्याचे असेल. १८ ते २२ वयोगटातले मतदार म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार कधीच न अनुभवलेले मतदार आहेत. बहुदा हार्दिक पटेल वगैरे तरूण नेत्यांमुळे ते प्रभावित झालेले दिसतात. तसे असेल तर ती वाईट गोष्ट असेल. कारण असल्याच मतदारांमधून आणखी एखादा जातीपातीचे राजकारण करणारा हार्दिक पुढे यायचा.

आनन्दा's picture

15 Dec 2017 - 12:49 pm | आनन्दा

१८ ते २२ वयोगटातले मतदार म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार कधीच न अनुभवलेले मतदार आहेत.

अजून एक, साधारण याच वयात राजकीय धारणा पक्क्या होत जातात, त्यामुळे असे होत राहणे भाजपासाठी दीर्घकालीन धोक्याचे आहे.

माझे व्यक्तीगत मत -
रहुल गांधी सिरिअस आहे, किंवा त्याच्या मागची जी कोनती लॉबी अहे ते सेरिअस आहेत, पण २०१९ साठी नव्हे, तर ते २०२४ मध्ये संपूर्ण काँग्रेस सरकार आण्ण्याचा प्लॅन बनवत आहेत असे वाटते. साधारण लोकांची मेमरी ३-४ वर्षे असते, त्यानंतर बर्याच संवेदना बोथट होत जातात, जसेजसे २०२० सरेल, तसे २जी ३जी कोळसा वगैरे चे गांभीर्य कमी होत जाईल, आणि त्यावेळेस राहुलला एक गंभीर राजकारणी म्हणून सादर करायला लागेल. त्याची ही आत्ता फक्त पूर्वतयारी चालू आहे.

बोलायला बाकी सर्व ठीक आहे. गुजरात ही एक प्रयोगशाळा होती, आणि त्यात काँग्रेस बर्‍यापैकी यशस्वी झाली आहे असे माझे मत आहे..

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 2:39 pm | श्रीगुरुजी

यशवंत देशमुखांनी अजून एक इंटरेस्टींग आकडेवारी सादर केली. त्यांच्या मते १८ ते २२ वर्षे वयोगटात काँग्रेसला ४६% तर भाजपला ४३% मते मिळतील आणि जसे वय वाढत जाते त्याप्रमाणे भाजपला मत द्यायचे प्रमाण वाढत जात आहे. हा कल भविष्यात कायम राहिला तर ते भाजपसाठी धोक्याचे असेल. १८ ते २२ वयोगटातले मतदार म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार कधीच न अनुभवलेले मतदार आहेत. बहुदा हार्दिक पटेल वगैरे तरूण नेत्यांमुळे ते प्रभावित झालेले दिसतात. तसे असेल तर ती वाईट गोष्ट असेल. कारण असल्याच मतदारांमधून आणखी एखादा जातीपातीचे राजकारण करणारा हार्दिक पुढे यायचा.

हा अंतिम निष्कर्ष नाही. हा सर्सेक्षणातून निघालेला एक अंदाज आहे. हा अंदाज प्रत्यक्षात खरा निघाला तरी ३% फरक हा फार कमी आहे. हार्दिक सारख्या तरूण नेत्यांचे पितळ उघडे पडायला सुरूवात झाली आहे. हार्दिकमध्ये काँग्रेसने व्हेन्चर कॅपिटलसारखी गुंतवणू़क केलेली दिसते. द्वितीय श्रेणीत बी कॉम झालेल्या एका निरूद्योगीला काँग्रेस जेव्हा मर्सेडिझ, भारी हॉटेले, बायका इ. पुरविते तेव्हा त्याच्याकडून तितक्याच परताव्याची अपेक्षा असणार. कॉंग्रेसला अपेक्षित परतावा त्याच्याकडून मिळाला नाही तर काँग्रेस आपली गुंतवणूक त्याच्याकडून दामदुपटीने वसूल करेल आणि त्यावेळी त्याच्यामागे गेलेल्या तरूणांचा भ्रमनिरास होईल. तो दिवस फार दूर नाही.

ट्रेड मार्क's picture

15 Dec 2017 - 7:34 pm | ट्रेड मार्क

हार्दिक पटेलचा साथीदार आता हार्दिक ने कसं फसवलं याची हकीकत सांगतोय.

सिंथेटिक जिनियस's picture

14 Dec 2017 - 8:53 pm | सिंथेटिक जिनियस

असल्याच मतदारांमधून आणखी एखादा जातीपातीचे राजकारण करणारा हार्दिक पुढे यायचा.
>>>
मोदी जातियवादी नाहीत हा आपला समज आहे काय?
मी तेली जातीचा आहे,बहुजन आहे वगैरे बरेचदा रडून झाले आहे मोदींचे.पण या बहुजनाचे बोलवते धनी नागपुरात बसले आहेत.व ते जातीयवादी आहेत हे सत्य आहे.आरएसएसच्या संघप्रमुखांची यादी बघितली की बहुजनांना वापरुन घ्यायचे व पदं द्यायची वेळ आली कि आपलाच जातबंधू बघायचा हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.

ब्राह्मणांना १९४८ मधे मस्त मार बसला आणि पुढेही असा बसावा, बसेल अशी खात्री आहे म्हणणारा जिनियस मोदींचा जातीयवाद काढतो? काय पुरोगामी स्टँडर्ड आहे म्हणावं!!
==================
नागपुरच्या ब्राह्मणांनी गुजराती तेल्यासाठी जीवाचं रान करावं, त्याला पक्षापेक्षा मोठं करावं, होऊ द्यावं, तो गेला तर पक्ष हारेल इतका मोठा करावा हा जातीयवाद कसा?
====================

आरएसएसच्या संघप्रमुखांची यादी बघितली की बहुजनांना वापरुन घ्यायचे व पदं द्यायची वेळ आली कि आपलाच जातबंधू बघायचा हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.

जणू काही संघाची पद बहुजनांना देऊन ब्राह्मण राष्ट्रपती, पंतप्रधान झाले असते तर तुम्ही कौतुकच करणार होतात.

सुबोध खरे's picture

14 Dec 2017 - 10:37 pm | सुबोध खरे

जिनियस राव
आपली पातळी फारच खाली उतरली आहे.

अर्धवटराव's picture

14 Dec 2017 - 10:37 pm | अर्धवटराव

जातीयतेचे प्रॉब्लेम्स, त्याचा परिघ, आणि त्याचे सद्यःस्थितीतले/भविष्यकालीन परिणाम फार गंभीर आहेत. येऊन जाऊन आर.एस.एस च्या नावाने नको ति बिलं फाडुन त्या समस्येच्या आकलनाचा बोजवारा का उडवतोस ? आर.एस.एस सुद्धा एक समस्या आणि संधी आहे. पण त्यांना असं चुकीच्या खिंडीत पकडता येणार नाहि. तुझ्याच डोक्याला टेंगळं येतील. ट्रोलींग म्हणुन असले विषय काढायचे असतील तर गोष्ट वेगळी. पण मुद्दाम चुकीचे विचार करुन स्वतःच्या बुद्धीची हानि करुन घेऊ नकोस. अधिक काय बोलणे.

mayu4u's picture

15 Dec 2017 - 12:16 pm | mayu4u

आरएसएसच्या संघप्रमुखांची यादी बघितली की बहुजनांना वापरुन घ्यायचे व पदं द्यायची वेळ आली कि आपलाच जातबंधू बघायचा हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.

सध्या देशाच्या पंतप्रधानांची आणि राष्ट्रपतींची जात काय आहे?

अजूनही तुम्ही जाती आणि धर्मावरच अडकून पडलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2017 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल.

गॅरी ट्रुमन अभिनंदन....!!!! आज जवळ जवळ सर्वच एक्झिट पोल आपल्याच अंदाजापर्यन्त बोलत आहेत.

ग्रेट....!

-दिलीप बिरुटे

सर्व पुरोगाम्यांचे मनःपूर्वक सांत्वन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2017 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं म्हणतात, वाईट दिवस असले की उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो.

खरं तर आमची बांधीलकी आधुनिक जगाशी आणि आधुनिक विचारांशी....!

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

15 Dec 2017 - 10:06 am | सुबोध खरे

वाईट दिवस असले की उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो.
ह ह पु वा

वाईट दिवस असले की उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो.

वाईट दिवस वैगेरे काही नसतं. या सगळ्या मागास संकल्पना आहेत. किमान कुत्रा चावल्यावर तरी आपण ज्या उंटावर तोर्‍यात निघालो होतो तो फार काही योग्य दिशेने जास्त नाहीये हे कळायला हवं. कुत्री उठून अश्शीच कुणालाही चावत नाहीत.
========================
आधुनिकता एक भंकस संकल्पना आहे. मनुष्याची प्राथमिक बांधिलकी चांगुलपणाशी हवी.

आधुनिकता एक भंकस संकल्पना आहे. मनुष्याची प्राथमिक बांधिलकी चांगुलपणाशी हवी..

जोशानु
क्वचित कधीतरी लै भारी लिहून जाता तुम्ही.

चिनार's picture

15 Dec 2017 - 12:45 pm | चिनार

बरोबर आहे रे अभ्या तुझं..
पण एका वाक्यासाठी त्यांचे सगळे प्रतिसाद वाचणं नाही ना परवडत...

आनन्दा's picture

15 Dec 2017 - 12:50 pm | आनन्दा

हो ना, आणि ते करतात तेव्हा गठ्ठा मतदान करतात.. त्यामुळे त्या गठ्ठ्यातून असले मोती शोधंणे फार जिकीरीचं काम आहे.

उपमा कशाचीही कशालाही द्या, पण तिच्यात बेसिक तांत्रिक चूक नसावी ना?
=================
बाकी आपल्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य सर्वात स्वस्त असल्याने आम्ही तेच स्टेपल फूड म्हणून वापरतो, अचार म्हणून नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Dec 2017 - 8:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

निसंशयपणे राजकीय अथवा गैरराजकीय चर्चांमध्ये सर्वात जास्त लॉजिकल प्रतिसाद देणारे एकमेव म्हणजे अ. जो. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

नाखु's picture

15 Dec 2017 - 10:35 pm | नाखु

एकदा एकांगी शिक्का मोर्तब केलं की कितीही मनापासून सांगीतले तरी फरक पडत नाही.

अश्याच जेष्ठ पुरोगामी संपादकांच्या ​ न पुसता येणार्‍या शिक्क्याचा बळी नाखु

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Dec 2017 - 10:38 am | हतोळकरांचा प्रसाद

दुर्दैवाने खरे आहे :(.

गॅरी ट्रुमन's picture

15 Dec 2017 - 9:05 am | गॅरी ट्रुमन

२०१४ मध्ये लोकसभेच्या वेळी माझे अंदाज चुकले होते त्याप्रमाणे आताही चुकले तर चांगले वाटेल :)

कापूसकोन्ड्या's picture

16 Dec 2017 - 8:37 am | कापूसकोन्ड्या

गॅरी ट्रुमन अभिनंदन....!!!! आज जवळ जवळ सर्वच एक्झिट पोल आपल्याच अंदाजापर्यन्त बोलत आहेत.
बीजेपी येणार याचे वाईट वाटत असले तरी

भाजपा: 160+
congress: 10

गामा पैलवान's picture

15 Dec 2017 - 1:09 am | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

मतदानाची टक्केवारी ६८% च्या आसपास आहे. इथे वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे भाजपला १३० तर काँग्रेसला ५२ जागा मिळायला पाहिजेत. या तक्त्यात मतदान टक्केवारीनुसार पक्षांचा हिस्सा आणि जागांचा अंदाज बांधला आहे. सहसा अशा प्रकारचा तक्ता कुणी बनवंत नाही. म्हणून मला या तक्त्याच्या भाकिताबद्दल जाम कुतूहल आहे.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

15 Dec 2017 - 9:04 am | गॅरी ट्रुमन

मला वाटते भाजपला पाहिजे होते तितके मतदान झालेले दिसत नाही. जर जास्तीत जास्त लोकांना घराबाहेर काढून मतदान करायला उद्युक्त करणे हा उद्देश असेल तर तो सफल झालेला दिसत नाही. अन्यथा मागच्या वेळेपेक्षा कमी मतदान का झाले याचे उत्तर देता येणार नाही.

याविषयीचा माझा तर्क हा की २२ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर काही प्रमाणावर भाजप सरकारविरूध्द नाराजी होतीच. पण तरीही काँग्रेस हा पर्याय वाटत नसल्यामुळे अनेकांना मतदान न करणे अधिक श्रेयस्कर वाटले असेल. या गोष्टीची कल्पना करता येते. समजा काही कारणाने मोदी सरकारविरूध्द माझे मत बनले तरीही अफजल गुरूला हुतात्मा वगैरे समजणार्‍यांना मी तरी कधीच मत देऊ शकणार नाही. असेच अनेकांना वाटले असेल ही शक्यता आहे. जर काँग्रेसने या मतदारांना आपल्याकडे वळवून घेतले असते तर काँग्रेसला विजय मिळवणे सोपे गेले असते.

हा तर्क खरा असेल तर यावरून एक गोष्ट चांगली घडेल. लोकांना मोदींना पर्याय हवा असेल तर तो पर्याय मोदींपेक्षा चांगला हवा असा त्याचा अर्थ होईल. मोदींना काही प्रश्न सोडविण्यात अपयश आले म्हणून मोदींना मत द्यायचे नाही पण नेमके तेच प्रश्न निर्माण करणार्‍यांना मत द्यायचे हा विचित्र प्रकार सुशिक्षित-पुरोगामी इत्यादी वर्गात दिसत आहे.पण इन जनरल लोकांचे ते मत नाही असा अर्थ त्यातून निघत असेल तर ते चांगलेच असेल.

नवऱ्याबरोबर भांडण झालं म्हणून कोणी स्त्री शेजाऱ्याबरोबर लफडं करणार नाही.
पुरोगाम्यांची तशी अपेक्षा होती असे वाटते.
त्यामुळे त्यांचा अपेक्षा भंग झाला तर त्याला ते स्वतः जबाबदार आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2017 - 4:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदींना काही प्रश्न सोडविण्यात अपयश आले म्हणून मोदींना मत द्यायचे नाही पण नेमके तेच प्रश्न निर्माण करणार्‍यांना मत द्यायचे हा विचित्र प्रकार सुशिक्षित-पुरोगामी इत्यादी वर्गात दिसत आहे.

चपखल ! एकदम कानाखाली :)

सौन्दर्य's picture

15 Dec 2017 - 4:06 am | सौन्दर्य

मी राजकारणातला आपल्या सगळ्यांसारखा अभ्यासू, जाणकार वगैरे काही नाही त्यात गेली दहा एक वर्ष भारतात राहतही नाही, त्यामुळे गुजरातमधील निवडणुकांवर अधिकार वाणीने बोलू शकत नाही. पण मी, १९९० ते २००४ पर्यंत जवळजवळ चौदा वर्षे गुजरातमध्ये नोकरी निमित्त्ये घालवली. अगदी सुरत ते कच्छ आणि संपूर्ण सौराष्ट्र कामानिमित्ते पालथं घातलं. मार्केटिंगची नोकरी असल्यामुळे अनेक स्थानिक गुजराती व्यापार्यांशी अगदी जवळून संबंध आला. ह्या संपर्का दरम्यान गुजराती माणसाची व्यापारी वृती अगदी जवळून पाहिली आणि अनुभवली. ह्याच निरीक्षणावरून मला असे वाटते की ही निवडणूक बीजेपीसाठी संघर्षाची ठरणार आहे.

निश्चलनीकरण, कॅशलेस व्यवहार आणि जीएसटी ह्या तिन्ही गोष्टींचा भारतातील बहुसंख्य व्यापार्यांना त्रास झाला आणि गुजरातमधील व्यापारी देखील त्याला अपवाद नसावेत. त्यामुळे जातीयवाद, आरक्षण, धर्म वगैरेपेक्षा आर्थिक निकषांवर मतदान होईल असे मला वाटते. जर तसे झाले तर माझ्या मते बीजेपीला ८०-८५ जागा, काँग्रेसला देखील तितक्याच म्हणजे ८०-८५ व उरलेल्या जागा इतर पक्षांना मिळतील. जर तसे झाले तर गुजरातमध्ये सरकार स्थापन करायला ह्या दोन्ही मुख्य पक्षांना, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल.

ही गोष्ट खरी आहे, मी पण भाजपा सरकारला कंटाळलोय, पण माझ्याकडे पर्याय आहे कुठे? मी भाजपाला मत दिलं नाही तर काँग्रेस येइल, आणि ते मला परवडणार अहे का?

इन्ग्रजीत एक म्हण आहे -
known devil is better than unknown angel

यावरून काय ते समजून जा.

टर्मीनेटर's picture

15 Dec 2017 - 1:00 pm | टर्मीनेटर

आपल्या गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७ ह्या आधीच्या धाग्यावर मी खालील प्रतिसाद दिला होता :

काल पहिल्या फेरीत झालेले ६८% मतदान आणि गुजरात मध्ये राहणारे नातेवाईक, मित्र व व्यावसायानिमित्ताने ओळखीचे झालेले काही व्यापारी ह्यांच्याशी झालेल्या बोलण्यावरुन असा अंदाज वर्तवायचे धाडस करतोय कि (अमित शहा व बाकीच्या कार्यकर्त्यांचा अंदाज १५०+ असला तरी) बीजेपी १४० चा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

काल दुसऱ्या फेरीत झालेले ६८.७०% मतदान विचारात घेता मी माझ्या १४० ह्या अंदाजावर कायम राहतोय. कारण २०१७ मध्ये झालेले ६७.४०% मतदान हे २०१२ मध्ये झालेल्या ७१.३२% पेक्षा कमी आहे परंतु आपल्या हक्काच्या मतदारांची मते दोन्ही पक्षांनी म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी ह्यांनी नक्कीच मिळवली असतील. २०१७ मध्ये झालेली हि घट माझ्या मते काठावरचे मतदार, बीजेपी वरील नाराज मतदार तसेच कुठलाही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे उदासीन राहिलेले मतदार ह्यांच्यामुळे झाली असावी.
अर्थात पटेल आंदोलन व ईतर काही प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश ह्या कारणामुळे आपल्याला मिळणाऱ्या मतांमध्ये ह्यावेळी घट होणार आहे हे आधीच विचारात घेऊन अमित शहांनी हि तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना करून ठेवलेली असणार.
नोटबंदी हा मुद्दा निरर्थक असल्याचे उ.प्र. मध्ये सिद्ध झालेले आहे. जी.एस.टी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असून त्या कारणा मुळे व्यापाऱ्यांमध्ये कितीही नाराजी असली तरी राज्यात विरोधात मतदान करून गुजराती पंतप्रधानांचे त्यांच्याच राज्यात नाक कापण्याची आमची मानसिकता नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

आपण परिस्थिती १: भाजप १५०+, काँग्रेस २० ते २५ मध्ये म्हंटल्याप्रमाणे

भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे.

असे होण्याचा धोका नक्कीच मोठा आहे पण नरेंद्र मोदी व अमित शहांच्या एकंदरीत विचारपद्धती, तसेच अनेक कटू निर्णय व धोके पत्करण्याची त्यांची क्षमता ह्यांवरून असे वाटते कि त्यांनीही हा धोका विचारात घेतला असावा. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेली असल्यामुळे सध्यातरी त्यांचे मुख्य उद्दिष्ट राज्यसभेत बहुमत मिळवणे असून ते पूर्ण झाले कि शेवटच्या वर्षभरात लोकप्रिय निर्णय घेऊन जनमानसात आपली प्रतिमा आणखीन उंचावण्याचा त्यांचा हेतू असावा. हा हेतू साध्य झाला कि २०१९ ची लोकसभा व त्यापुढील निवडणुकांत कोणत्याही आयाराम गयारामांना उमेदवारी नाकारून दिल्ली महानगर पालिकांत सर्व नवीन उमेदवार देण्याचा यशस्वी झालेला प्रयोग (काही अपवाद वगळता) देशभर करण्याचा धाडसी निर्णय ते घेऊ शकतात.

चिर्कुट's picture

15 Dec 2017 - 3:59 pm | चिर्कुट

>>गुजराती पंतप्रधानांचे त्यांच्याच राज्यात नाक कापण्याची आमची मानसिकता नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

काय ही वैचारिक दिवाळखोरी.. :(

गॅरी ट्रुमन's picture

15 Dec 2017 - 6:14 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद टर्मिनेटर.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेली असल्यामुळे सध्यातरी त्यांचे मुख्य उद्दिष्ट राज्यसभेत बहुमत मिळवणे असून ते पूर्ण झाले कि शेवटच्या वर्षभरात लोकप्रिय निर्णय घेऊन जनमानसात आपली प्रतिमा आणखीन उंचावण्याचा त्यांचा हेतू असावा.

हो. मोदींना लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत मिळवायचे आहे असे दिसते. पण त्यासाठी मोदी ज्याप्रकारे पावले उचलतात त्यामुळे विरोधकांना नेहमीच कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी होतात. उत्तर प्रदेशात शेवटी २ दिवस मोदी वाराणसीमध्ये तळ ठोकून होते. तेव्हा ल्युटिन्स मिडियामध्ये म्हटले जात होते की बहुमताला जागा कमी पडतील हे लक्षात आल्यामुळे मोदी ताकद पणाला लावून हातातून निसटत चाललेले बहुमत मिळवायचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्यक्षात मोदी स्वतःची ताकद पणाला लावून नुसत्या बहुमताला आवश्यक असलेल्या २०० जागांपलीकडे नाही तर ३०० च्या पुढचा पल्ला मारायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रपती निवडणुक आणि राज्यसभेत लवकरात लवकर बहुमत मिळवायचे हे दोन उद्देश होते असे दिसते. यावेळीही मोदींनी मणीशंकर अय्यर, मनमोहन यांना अधिकाधिक जाळ्यात कसे पकडले याविषयी भाऊ तोरसेकरांनी http://jagatapahara.blogspot.in/2017/12/blog-post_14.html हा आणखी एक जबरदस्त लेख लिहिला आहे.

एकूणच मोदी नक्की काय करतात आणि कशाकरता करतात हे लगेच लक्षात येत नाही तर काही काळ गेल्यानंतरच समजते.

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 2:47 pm | श्रीगुरुजी

२०१५ मधील दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीनंतर सर्वेक्षणावरील विश्वास पूर्ण उडाला आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणत्याही एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर विश्वास नाही. भाजप दोन्ही राज्यात जिंकणार हा माझा सुरवातीपासूनच अंदाज आहे व त्यासाठी कोणत्याही एक्झिट पोल्सच्या आकड्यांचा आधार घेण्याची गरज नाही.

babu b's picture

15 Dec 2017 - 4:49 pm | babu b

राम करो अन ह्यावेळीही सर्व सर्वेंवरचा तुमचा विश्वास उडो !

मराठी कथालेखक's picture

15 Dec 2017 - 6:09 pm | मराठी कथालेखक

भाजप ९० च्या आसपास
काँग्रेस ८० च्या आसपास

गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच भाजपला पक्षातूनच घरचा अहेर मिळाला आहे. गुजरात निवडणुकीत पक्षाचा पराभव होणार, असं धक्कादायक वक्तव्य करून भाजपचे खासदार संजय काकडे यांनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. तर पक्षातील इतर नेत्यांनी मात्र काकडेंचं भाकीत फेटाळून लावलं आहे.

णे महापालिका निवडणुकीत भाजपला ९२ जागा मिळतील असा अंदाज काकडे यांनी वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरला होता. पालिका निवडणुकीत भाजपचा ९८ जागांवर विजय झाला होता. गुजरातमधील निवडणुकीचं सर्वेक्षण अशाच निकषांवर केलं आहे. यामुळे भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमीच आहे, असं काकडेचं म्हणणं आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bjps-kakad...

विशुमित's picture

15 Dec 2017 - 7:05 pm | विशुमित

काकडे फेक (ऊ) माणूस आहे.

गामा पैलवान's picture

15 Dec 2017 - 10:07 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

भाजप दोन्ही राज्यात जिंकणार हा माझा सुरवातीपासूनच अंदाज आहे व त्यासाठी कोणत्याही एक्झिट पोल्सच्या आकड्यांचा आधार घेण्याची गरज नाही.

भाजप बहुमत जिंकणार हे नक्की. त्यासाठी उत्तरचाचणींची आवश्यकता नाही. मात्र किती जागा मिळवेल हे कुतूहल आहेच. त्यासाठी या चाचण्या बऱ्या पडतात.

आ.न.,
-गा.पै.

जेसीना's picture

16 Dec 2017 - 11:32 am | जेसीना

माझ्या मते मोदींचा सगळ्यात मोठं ध्येय आहे कि त्यांनी २०१४ च्या इलेकशन च्या वेळेला दिलेली आश्वासन पूर्ण करणं, त्यात सगळ्यात मोठा घोडा आहे तो म्हणजे त्यांची राज्यसभेतली संख्या ती वाढवणे त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे (उदाहरण म्हणजे काश्मीर मधील ३७० कलम )
आता उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या बहुमताने त्यांचे आमदार निवडून आले त्याने निश्चितच त्यांचे संख्याबळ राज्यसभेत वाढले आहे , पण तरीसुद्धा थोडी जी कमी आहे ती जर गुजरात मध्ये मोठ्या बहुमताने जर त्यांचे आमदार निवडून आले तर खूप प्रमाणात वाढेल. आणि मोदी-शहा जोडीने सध्या त्याच उद्धेशाने गुजरात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला
खरे पाहता त्यांच्या प्रचारात एव्हडा भाग न घेता सुद्धा त्यांना आरामात निवडून येणं शक्य होता पण त्यांच्या खरा हेतू हा त्यांच्या आमदारांची संख्या वाढवणं हा होता
जे कोणी म्हणत होते कि काँग्रेस चा ह्या वेळी खूप दबदबा असणार आहे म्हणून मोदी शहा जोडी खूप मोठ्याप्रमाणात प्रचार करते हे माझ्या मारे तरी खूप चुकीचे आहे, काँग्रेस , हार्दिक किती पण बोलले तरी ५०-५५ च्या पुढे जाणं कठीण आहे
माझ्या मते तरी गुजरात मध्ये भाजप १३५ च्या आसपास जाईल कदाचित पुढे सुद्धा
२०१९ मध्ये निश्चितच मोदी येतील पण त्या अगोदर २०१८ मध्ये ते खूप मोठे निर्णय घेतील असे वाटते (लोकसभे मध्ये त्यांच्याकडे निर्विवाद बहुमत आहेच, राज्यसभेत सुद्द्धा येईल आणि राष्टपती सुद्धा आता त्यांचेच आहेत ) त्यामुळे त्यांना आता कोणत्याही निर्णयात कोणताच घोड़ा मध्ये येणार नाही
अपेक्षा हीच कि जो काही निर्णय घेतील तो जनतेच्या हिताचा निर्णय असावा
३७० हा खूप गुंतागुंतीचा कलम आहे पण २०१८ च्या अखेरीस पर्यंत नक्की सुटेल असा वाटते , बाकीचे आश्वासन जसे काळा पैसा साथीचे विधेयक जे कदाचित खूप कठीण असेल ते राज्यसभेत सध्या तरी अडकण्याची शक्यता खूप आहे ते सुद्धा २०१८ च्या अखेरीस येईल असा अंदाज आहे
कदाचित हेच दोन महत्वाचे निर्णय त्यांना २०१९ मध्ये ३५०+ घेऊन जाईल असे वाटते ... आणि हेच मोदींचे सध्याचे टार्गेट आहे असा माझा तरी अंदाज आहे

बघूया १८ तारखेची वाट बघत आहे

डँबिस००७'s picture

16 Dec 2017 - 2:51 pm | डँबिस००७

जेसीना,

१००% सहमत !!

श्रीगुरुजी's picture

16 Dec 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी

गुजरात मध्ये भाजप जिंकला किंवा हरला तरी २०१८ व २०१९ च्या पूर्वार्धात मोदी काही धाडसी निर्णय घेऊन जनमत मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.

त्याची सुरूवात तिहेरी तोंडी तलाक विरूद्ध कायद्याचा मसुदा करण्याने झाली आहे. या अधिवशेनात हा मसुदा संसदेत चर्चेसाठी येऊ शकेल. त्याचे प्रत्यक्ष कायद्यात रूपांतर करण्याची संसदीय प्रक्रिया बरीच मोठी असून मोदी ती प्रक्रिया किमान १ वर्षे चालेल यासाठी प्रयत्नशील असतील. हे विधेयक म्हणजे विरोधी पक्षांसाठी व विशेषतः काँग्रेससाठी पुन्हा एकदा एक सापळा आहे. आपली मुस्लिम मतपेढी जाऊ नये यासाठी या विधेयकाला काही ठराविक पक्ष (म्हणजे राजद, सप, बसप, नॅकॉ, तॄणमूल इ.) हे नक्की विरोध करणार. काँग्रेसची अवस्था इकडे आड व तिकडे विहीर अशी होणार. जर विधेयकाला पाठिंबा दिला तर मुस्लिमांची पारंपारिक मते इतर विरोधी पक्षांकडे जाण्याची आणि त्याचवेळी नवमध्यमवर्गाची, सुशिक्षित वर्गाची आणि मुस्लिम महिलांची मते भाजपकडे जायची भीति आणि जर विधेयकाला विरोध केला तर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप येऊन नवमध्यमवर्गाची, सुशिक्षित वर्गाची आणि मुस्लिम महिलांची मते भाजपकडे जायची भीति. एकंदरीत दोन्ही बाजूने काँग्रेसचा तोटाच आहे. विधेयक मंजूर झाले तर श्रेय भाजपला आणि विधेयक नामंजूर झाले तर दोष काँग्रेसला मिळेल. या विधेयकावरील संसदेतील निर्णय जितका लांबेल तितका जास्त फायदा भाजपला होणार. भाजपचा कमी फायदा होण्यासाठी व विधेयकाचे थोडेसे श्रेय मिळविण्यासाठी काँग्रेसने याच अधिवेशनात या विधेयकाला सक्रीय पाठिंबा देऊन ते मंजूर करायला मदत करायला हवी.

मोदींकडे असलेले दुसरे हुकुमाचे पान म्हणजे संसदेत महिलांना ३३.३३% जागा राखीव ठेवण्याचे विधेयक. भाजप हे विधेयक संसदेत आणण्याचा विचार करीत आहे याची मागील वर्षी कुणकुण लागल्याबरोबर त्या विधेयकाचे आपल्याला श्रेय मिळविण्यासाठी सोनिया गांधींनी तातडीने मोदींना एक पत्र लिहून महिला राखीव जागा विधेयक संसदेत आणण्याची सूचना केली होती जेणेकरून हे विधेयक संसदेत आले तर ते आपल्या पत्रामुळे अशी जाहिरात करता आली असती. मोदींनी हा डाव ओळखून त्या पत्रावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता सर्वजण बेसावध असताना मोदी अचानक हे विधेयक संसदेत आणून काँग्रेसची कोंडी करतील. या विधेयकाला सुद्धा राजद आणि सप नक्कीच विरोध करणार. काँग्रेसने विरोध केला तर विधेयक नामंजूर करण्याचे खापर काँग्रेसच्या डोक्यावर फुटेल आणि विधेयक मंजूर झाले तर श्रेय मोदींना जाईल. म्हणजे पुन्हा एकदा इकडे आड तिकडे विहीर!

२०१९ च्या अंदाजपत्रकात मोदी सरकार व्यक्तिगत आयकरसाठी भरपूर सवलती देऊन व काही लोकानुययी निर्णय जाहीर करून मध्यमवर्गाला व शेतकर्‍यांना खुष करण्याचा प्रयत्न करतील.

त्याचबरोबर जर श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल मंदीराच्या बाजूने लागला तर त्याचेही श्रेय भाजपलाच मिळणार हे नक्की. जर खटल्याचा निकाल विरूद्ध गेला तरी धार्मिक ध्रुवीकरण होऊन निकाल विरूद्ध गेल्याचे खापर काँग्रेसच्याच डोक्यावर फोडले जाईल.

एकंदरीत काँग्रेसने अनेक प्रश्न अनिर्णित ठेवून स्वतःला या विचित्र अवस्थेत नेऊन ठेवले आहे व त्याचाच फायदा मोदी उचलत आहेत. श्रीरामजन्मभूमी, तिहेरी तलाक, महिला राखीव जागा विधेयक असे अनेक प्रश्न काँग्रेसने न सोडविता ६०-७० वर्षे लोंबकळत ठेवले. त्याचा तोटा आता होत आहे.

मार्मिक गोडसे's picture

16 Dec 2017 - 11:29 pm | मार्मिक गोडसे

मोदींकडे असलेले दुसरे हुकुमाचे पान म्हणजे संसदेत महिलांना ३३.३३% जागा राखीव ठेवण्याचे विधेयक. भाजप हे विधेयक संसदेत आणण्याचा विचार करीत आहे याची मागील वर्षी कुणकुण लागल्याबरोबर त्या विधेयकाचे आपल्याला श्रेय मिळविण्यासाठी सोनिया गांधींनी तातडीने मोदींना एक पत्र लिहून महिला राखीव जागा विधेयक संसदेत आणण्याची सूचना केली होती जेणेकरून हे विधेयक संसदेत आले तर ते आपल्या पत्रामुळे अशी जाहिरात करता आली असती. मोदींनी हा डाव ओळखून त्या पत्रावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता सर्वजण बेसावध असताना मोदी अचानक हे विधेयक संसदेत आणून काँग्रेसची कोंडी करतील.

गैरसमज आहे तुमचा. त्यांच्या पक्षाचे नवीन अध्यक्ष जागरूक आहेत ह्या विधेयकाबाबत.

अर्धवटराव's picture

17 Dec 2017 - 2:28 am | अर्धवटराव

गुरुजींनी वर्णन केलेला एकही मुद्दा हुकुमाचं पान नाहि.

खरं आहे, मध्यंतरी ते काहीतरी बडबडत होते बुवा याच्यावर.. कोणताही प्रश्न विचारला की महिला सबलीकरणाकडे घेऊन जायचे..

जसे की महागाई का वाढली आहे? महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, त्याशिवाय लोकांना धान्याची खरी किंमत कळणार नाही अश्या पठडीतील उत्तर ऐकलेयत..
आपण कॉलेजमध्ये ओरलला कसं आपल्याला जो टॉपिक येतो तिकडेच एक्झामिनरला न्यायचा प्रयत्न करतो तसेच.

पण यावरून त्यांचा महिला सबलीकरणाचा दांडगा अभ्यास मात्र सिद्ध होतो हे खरं.

ट्रेड मार्क's picture

17 Dec 2017 - 7:33 am | ट्रेड मार्क

चार वर्षांपूर्वीच काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाने या मुलाखतीत वूमन एम्पॉवरमेंटचा मुद्दा परत परत मांडला होता. त्यामुळे आता मोदींनी स्रियांसाठी ३३% आरक्षणाचं विधेयक आणलं तरी श्रेय मात्र काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांनाच मिळणार. किती व्हिजनरी आहेत ते बघा. मोदींची ही चाल त्यांनी ४ वर्षांपूर्वीच ओळखली होती.

मार्मिक गोडसे's picture

17 Dec 2017 - 8:43 am | मार्मिक गोडसे

करेक्ट, योगायोगाने ह्याच विधेयकला बहुदा हिवाळी अधिवेशनात प्राधान्य दिले जाणार असं दिसतंय. नवीन अध्यक्ष त्यामुळे खुशीत असणं साहजिकच आहे.

जानु's picture

16 Dec 2017 - 3:46 pm | जानु

जेसीना आणि गुरुजी +१

रामदास२९'s picture

16 Dec 2017 - 8:52 pm | रामदास२९

जेसीना आणि श्रीगुरुजी .. सहमत ..

टीकोजीराव's picture

16 Dec 2017 - 10:34 pm | टीकोजीराव

गुरुजी एकदम पर्फेक्ट विश्लेषण