अतृप्ती-एक चिरंतना

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Dec 2013 - 1:23 am

अतृप्त असावे सारे
मन तृप्तीतूनच पाही
तृप्ती'ही असते क्षणिका
अतृप्ती चिरंतना'ही

मानवास जन्मी एका
नीज सांगे ति ही काही
मन क्षणात चाखे तिजला
अन् क्षणात काही नाही

सारा हा जन्म तरिही
का धावे तिच्याच पाठी
मरणाही भेटी येता
अतृप्ती उरते गाठी

ऐश्या या अतृप्ती'ला
मी देतो एक सलाम
मन तृप्तीचे ना वैरी
अतृप्तीचे न गुलाम
==०==०==०==०
*************
अत्रुप्त
*************
https://lh5.googleusercontent.com/-jahNQ2N2XGE/TqQt3Ev4zAI/AAAAAAAABD4/l0WHSRpPc8c/s600/PB050640.JPG
(फोटो-अं.जा.साभार.)

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

5 Dec 2013 - 3:10 am | अग्निकोल्हा

छान!

स्पंदना's picture

5 Dec 2013 - 3:30 am | स्पंदना

खुपच सुरेख आत्मुस.

राजेश घासकडवी's picture

5 Dec 2013 - 4:42 am | राजेश घासकडवी

(शीर्षक वाचून तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोविषयी लिहिलं आहे की काय असा संशय आला होता ;) )

क्षणिका-चिरंतना हा भेद आवडला. जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत मैहबूबा है अपने साथ लेकर जायेगी या भेदासारखा.

मात्र टायटलमुळे किंचित गोंधळलो. उभा जन्म आपण अतृप्तीला संगे घेऊन तृप्तीच्या मागे लागतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात तृप्तीविषयी लिहिलं आहे हे पटकन लक्षात आलं नाही. शेवटच्या दोन ओळींत निश्चित काय सांगायचं आहे हे थोडं अजून स्पष्ट व्हायला हवं.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 5:18 am | अत्रुप्त आत्मा

@ शेवटच्या दोन ओळींत निश्चित काय सांगायचं आहे हे थोडं अजून स्पष्ट व्हायला हवं.>>>

@मन तृप्तीचे ना वैरी
अतृप्तीचे न गुलाम >>> आहे त्या स्थितीचा,आहे तसा स्वीकार! :)

चौकटराजा's picture

5 Dec 2013 - 6:08 am | चौकटराजा

बुवा, एक सो एक कविता ! मला वाटते तुम्ही अलिकडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून चालत गेलेत काय ?
स्मायलीवाले बाबाकी जय हो ! काही असो बुवा मेंदूत प्रतिभेचा वास नक्की आहे !

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा

@ मला वाटते तुम्ही अलिकडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून चालत गेलेत काय ? >>> =)) गेलो होतो खरा! त्यातल्याच एका पारंबीनी गळा गच्च अवळला आहे! =))

प्रचेतस's picture

5 Dec 2013 - 11:24 am | प्रचेतस

कुठली म्हणे ही पारंबी??

बाकी पिंपळाला पारंब्या फुटलेल्या पाहून निर्वाणास गेलो आहे. =))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा

@पिंपळाला पारंब्या फुटलेल्या पाहून निर्वाणास गेलो आहे>>> http://www.sherv.net/cm/emo/angry/bang-head-on-wall.gif अवघड आहे रे भगवंता! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif प्रत्येक गोष्ट तात्विक...प्रत्येक गोष्ट!

प्रचेतस's picture

5 Dec 2013 - 11:38 am | प्रचेतस

प्रत्येक गोष्ट तात्विक...प्रत्येक गोष्ट!

अरे हो, खरंच की. कवीला काही कल्पनास्वातंत्र्य असू असते ते मी पामर पार विसरूनच गेलो होतो.
म्हणतात ना
जे न देखे रवी....ते ते देखे कवी
जरी वृक्ष असो पिंपळ, तयास फुटो पारंबी =))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 12:55 pm | अत्रुप्त आत्मा

असोच! :p :p :p

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 8:22 am | मुक्त विहारि

"सारा हा जन्म तरिही
का धावे तिच्याच पाठी
मरणाही भेटी येता
अतृप्ती उरते गाठी"

हे जबराच

प्रचेतस's picture

5 Dec 2013 - 9:11 am | प्रचेतस

अप्रतिम.
अतिशय सरस कविता रचायलेत बुवा आजकाल.

शैलेन्द्र's picture

5 Dec 2013 - 9:43 am | शैलेन्द्र

बुवा, आवडली तुमची चिरंतन अतृप्ती.. :)

जेपी's picture

5 Dec 2013 - 9:57 am | जेपी

आवडली .

वेल्लाभट's picture

5 Dec 2013 - 11:38 am | वेल्लाभट

चिरंतना..........
आहाहा ! आहा हा! क्य बात ! काय मस्त लिहिलंयत ! वाह!
जबरदस्त...

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Dec 2013 - 2:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

आवडली

युगन्धरा@मिसलपाव's picture

5 Dec 2013 - 2:21 pm | युगन्धरा@मिसलपाव

मन तृप्त झाले तुमची कविता वाचुन.
खुप आवडली कविता..............

पैसा's picture

8 Dec 2013 - 12:49 pm | पैसा

कविता आवडली!

(जाता जाता: तो पणतीचा फोटो मी काढलेला आहे)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2013 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा

@तो पणतीचा फोटो मी काढलेला आहे>>> हायला! :D मी गुगलबाबाला, "पणती" असा सर्च दिल्यावर तो फोटू मला मिळालावता! पण आता http://www.sherv.net/cm/emoticons/thanks/animated-thank-you-smiley-emoticon.gif

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2013 - 2:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

बुवा,
सगळ आहे खर असच.
बरोब्बर शब्दात पकडलत.

कवितानागेश's picture

8 Dec 2013 - 6:34 pm | कवितानागेश

ही वाचायचीच राहिली. छान लिहिलय. :)

सस्नेह's picture

9 Dec 2013 - 4:40 pm | सस्नेह

क्या बात है !

सुधीर's picture

13 Dec 2013 - 10:14 pm | सुधीर

कविता आवडली.

सांजसंध्या's picture

14 Dec 2013 - 12:55 am | सांजसंध्या

मन तृप्तीचे ना वैरी >>>

सुंदर ओळ आहे.
संपूर्ण कविता आवडली.

असंका's picture

15 Dec 2017 - 9:09 am | असंका

फारच सुंदर!!!

सचिन चौगुले's picture

15 Dec 2017 - 10:13 am | सचिन चौगुले

खरच छान खुप आवडली कविता................

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2017 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा

@असंका , सचिन चौगुले ››› धन्यवाद.

कविता आवडली. मोजक्या शब्दांत बरेच काही सांगून जाणारी. अतृप्ती येते ती अपूर्णतेच्या अथांगतेच्या जाणिवेतून. पूर्णत्व म्हणजे ज्याने-त्याने आपापल्या परीने आपापल्या अपूर्णतेला घेतलेला छेद म्हणता येईल. तो गाठला की तृप्ती मिळाली असे त्या क्षणापुरते भासते. एकूणच तृप्ती-अतृप्तीचा लपंडाव हा चिरंतन आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2017 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

वॉव.... दिल का राज खोल दिया मेरे... थांकू सो मच. :)