विडंबन : निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पना - 'फुल्टू' एंटरटेनमेंट विथ 'टील डेथ' व्हॅलिडिटी.

रंगीला रतन's picture
रंगीला रतन in जनातलं, मनातलं
15 Dec 2017 - 11:26 pm

निरीश्वरवाद आणि निधर्मी नावाच्या संकल्पना कशा अस्तित्वात आल्या आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे. यावर बऱ्याच थेअरीज आहेत. पैकी उत्क्रांतीवादानुसार निरीश्वरवाद आणि निधर्मी यावर बऱ्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत झाल्यावर त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार. अतिमानवाच्या (मंद)बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणाऱ्या अनिश्चिततेवर, त्यातून येणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक, बौद्धिक दरिद्री(दळभद्री) कल्पना विकसित केल्या त्यात निरीश्वरवाद आणि निधर्मी यांचा क्रमांक सर्वात वरचा लागतो. पण ही पण एक थेअरी आहे, याला सर्वानुमते आधार नाही.
मग मनुष्याने विकृत मानसिक समाधान देऊ शकणाऱ्या पण बौद्धिक दिवाळखोरीकडे नेणाऱ्या निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पना का विकसित केल्या असाव्यात?. एका क्षमतेच्या बदल्यात दुसरी क्षमता सोडून देणे हे होतच असते (trade off). पण निरीश्वरवाद, निधर्मी असल्या खुळचट गोष्टींनी असे काय दिले असावे जे फार गरजेचे होते? मला असे वाटते की निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पनांनी मनुष्याला भरपुर (विकृत) मनोरंजन दिले असावे. मी या निष्कर्षावर बऱ्याच वर्षांपुर्वी आलो होतो. २०१६ साली 'डेडपूल' हा अँटीहीरोपट (डेडपूल हे मूळचे खलनायकी ढंगाचे व पुढे विनोदी अँटीहीरो असा प्रवास केलेले मार्व्हल कॉमिक्स चे एक फिक्शनल पात्र आहे.) बघायला गेलो असताना माझ्या मनात या निरीश्वरवाद, निधर्मी गोष्टींच्या (विकृत) मनोरंजन मुल्याचा विषय आला. म्हणजे बघा, अँटीहीरो, सुपरहिरो किंवा फिक्शन वर आधारीत नॉवेल वाचताना किंवा चित्रपट बघताना आपण लॉजिक रिजनिंग वगैरे सगळ्याचीच बोळवण करुन ते एंजॉय करतो. याचे कारण या गोष्टींना असलेले मनोरंजन मुल्य! निरीश्वरवाद, निधर्मी गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला चक्क त्यात अँटीहीरोज सापडतात आणि फिक्शन तर या गोष्टींचा बेसच आहे. आजपर्यंत लिहलेल्या कोणत्याही (विकृत) फिक्शनपेक्षा कैकपट अधिक (विकृत) मनोरंजन मुल्य या निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पनांचं आहे.आणि या संकल्पना लहानपणी मेंदूत पद्धतशीरपणे सोडल्या जातात ,मग सुरु होतो (विकृत) स्वमनोरंजनाचा टील डेथ गेम. यातून सुटका नसते.
काही दिवसांपुर्वी न्यूज चॅनेलवर जे.एन.यु. ची एक बातमी बघत असताना या स्वमनोरंजनाचा चमत्कार पहायला मिळाला. “अफजल, हम शरमिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं!”, “भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी”…."भारत तेरे टुकडे होंगे...." अशा घोषणा देत असताना त्या विद्यापीठातल्या थोराड विद्यार्थ्यांना प्रचंड उन्माद चढलेला दिसत होता. आवाज टिपेला पोचुन जो तो त्या (विकृत) स्वमनोरंजनाचा आनंद घेत होता. नंतर कन्हैयाकुमार नि कोणी ओमर खालिद काहीतरी तारे तोडत असताना विद्यार्थ्यांचे उन्मादी चित्कार मला अँटीहीरो, सुपरहिरो मुव्ही बघताना थिएटरात होणार्या चित्कारापेक्षा फार वेगळे वाटले नाहीत. असाच अनुभव मध्यंतरी बऱ्याचदा घेतला आहे. असहिष्णुतेच्या नावानी बोंबा मारताना अगदी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, संपादक, सिने कलाकार यांना आलेला युफोरीया बघितला आहे. पुरस्कार वापसीचा खेळही चांगलाच रंगला होता (पुरस्काराचे नुसतेच कागद परत केले म्हणे, कोणी रक्कम परत केल्याचे वाचनात नाही आले कुठे). लाल साहित्य, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, ख्मेर रूज अन काय काय वाचताना स्त्री पुरुषादिंना होत असलेला आनंद, उन्माद युफोरीया हे अभ्यासाचेच विषय आहेत. 'दास कॅपिटल' हा ग्रंथ वाचताना काहिंना ऑर्गॅझमही येत असल्याचे कुठेतरी वाचले होते. कुठेतरी जामोप्यांनी युफोरीया इंडेक्स विषयी लिहले आहे तसा युफोरीया इंडेक्स या निरीश्वरवाद आणि निधर्मी संकल्पनांच्या बाबतीत नक्कीच काढला पाहीजे.
तर जगातले सगळ्यात मोठे अँटीहीरो म्हणजे मग तो कार्ल मार्क्स असो वा लेनिन वा स्टॅलिन किंवा माओ यांच्या एकसे एक स्टोऱ्या ऐकत आयुष्यभराचे (विकृत) मनोरंजन करुन घेणे म्हणजे निरीश्वरवादी, निधर्मी असणे ही व्याख्या माझ्या पुरती मला मान्य झाली आहे. आपले काय मत आहे या 'फुल्टू' एंटरटेनमेंट विथ 'टील डेथ' व्हॅलिडिटी विषयी.

टिप : माझा हा मिपावरचा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे, तरी काही चुकले माकले असल्यास क्षमा असावी.

विडंबनलेख

प्रतिक्रिया

विडंबनाला कुठे कुठे हसायचे हे जरा डिसकलमेर टाकले असते तर मदत झाली असती.

सतिश गावडे's picture

16 Dec 2017 - 7:43 pm | सतिश गावडे

विडंबन विनोदी असायला हवे ना. यात विनोदाचा मागमूसही नाही. केवळ जळफळाट आहे. =))

मूकवाचक's picture

16 Dec 2017 - 8:31 pm | मूकवाचक

हा लेख विडंबन न होता मूळ लेखाची 'मिरर इमेज' झाला आहे.

विशुमित's picture

16 Dec 2017 - 8:40 pm | विशुमित

ते साप पकडतात, जरा जपून...!!

मार्मिक गोडसे's picture

16 Dec 2017 - 11:13 pm | मार्मिक गोडसे

सिलेक्टिव कलर ब्लाइंडनेस असल्याने त्यांना भगवा रंग दिसत नाही,त्यामुळे भगवे साप ते पकडत नाही किंवा अशा रंगाचे साप अस्तित्वात आहेत हे ते मान्यही करत नाही.

वकील साहेब's picture

16 Dec 2017 - 10:37 pm | वकील साहेब

मिरर इमेज बद्दल सहमत. विडंबन नाही जमले

खात्री झाली की विडंबन पक्क जमलंय....